Wednesday, 14 August 2019

महाजन महाविषेशांक ३ : पत्रकार हेमंत जोशीमहाजन महाविषेशांक ३ : पत्रकार हेमंत जोशी 
अतिवृष्टीच्या महातडाख्यात उभा महाराष्ट्र बुडलेला बुडालेला असतांना त्यातही बदनामीचे राजकारण करणाऱ्यांची किंवा येते. विकृत मनोवृत्तीची माणसे जशी मरणाच्या सरणावर पहुडलेल्या तरुणीकडेही धुंद कामांध वृत्तीने बघतात, हि अशी काहीशी नीच वृत्ती अलीकडे पुराचे राजकारण करणाऱ्यांची आहे असे येथे ठासून सांगावेसे वाटते. पूरग्रस्तांसाठी बारामतीच्या रहिवाश्यांनी शरद पवार यांच्या आवाहनाला तडफेने प्रतिसाद देऊन त्यांच्याकडे मदतीसाठी क्षणार्धात, विचार न करता एक कोटी रुपये जमा करून दिले अर्थात त्यातले ५० लाख हे पवारांच्या अधिपत्याखाली असलेल्या कुठल्याशा ट्रस्टने दिले. पैसे कसे जमा केले ते कौतुक करायचे सोडून, केवळ पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांचा सतत विचार आणि विकास करणाऱ्या शरद पवारांना याआधी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा विदर्भ मराठवाडा कधी दिसला नाही का, कायम सवतीची वागणूक विदर्भाला देणारे शरद पवार बघा कसे उघडे पडले, हि अशी त्यांच्यावर टीका सतत होते आहे. भलेहि तुम्ही म्हणता ते शंभर टक्के सत्य आहे कि शरद पवारांनी सत्ता हाती असूनही विदर्भ मराठवाड्याचे कधीही भले केले नाही पण हि ती वेळ नाही त्यांचे कान टोचण्याची, त्यांना यापद्धतीने बदनाम करण्याची कारण असे बदनाम होणे नशिबी येत असेल तर का म्हणून धावून जायचे हे मग ते संभाजी भिडे गुरुजी असोत, किंवा शरद पवार, गिरीश महाजन असोत, पुरग्रस्तांच्या मदतीला धावून जात असलेल्या नेत्यांच्या मनात हे असे येणे स्वाभाविक ठरू शकते त्यामुळे होईल काय तर आपत्तीग्रस्तांना बाहेर काढण्याचा वेग नक्की मंदावेल, हे असे अजिबात अजिबात घडू नये...

विशेषतः मीडियातल्या किंवा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या विकृत आणि रिकामटेकड्या नालायकांनी हे अमुक एखाद्याला मुद्दाम टार्गेट करून बदनाम करण्याचे, खाली खेचण्याचे या गंभीर पाईस्थितीत हे पाप करू नये. बघा, खासदार आणि अभिनेता अमोल कोल्हे महागडा गॉगल घालून पूरग्रस्त भागात केवळ दिखावा म्हणून फिरतो आहे, कृपया यापद्धतीने कोणीही लिहू नये. अमोल कोल्हे यांनी नागडे उघडे फिरावे असे या विकृतांना वाटते आहे कि काय? आमच्या टेरेटरीमध्ये घुसता काय केवळ या जेलसीतून त्या मंत्री गिरीश महाजनांना पश्चिम महाराष्ट्रातले काही विकृत विरोधक या अस्मानी संकटात देखील बदनाम करताहेत, मला मिळालेली माहिती अशी आहे, विकृत कुठले. आज आधी पूर व अतिवृष्टीच्या आपत्तीमध्ये बरबाद झालेल्यांना कोण कुठला कुठल्या जातीचा पार्टीचा न बघता मानवतेच्या नजरेतून बाहेर काढायचे आहे,बकऱ्यांच्या कुर्बानीचा खर्च वाचवून अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्यांना आर्थिक सहकार्य व विविध मदत करणाऱ्या त्या आदर्श मुसलमानांसारखे वागायला हवे. आणि त्यातली परफेक्ट कॅप्टनशिप करणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासारख्यांचे मनोबल कसे उंचावले जाईल, त्याकडे मग तो प्रसन्न जोशी असो अथवा संजय आवटे, साऱ्यांनीच त्याकडे मन केंद्रित करायला हवे...

www.vikrantjoshi.com 

आजपासून थेट पन्नास वर्षांपूर्वी जळगावचेच मधुकरराव उर्फ बाळासाहेब चौधरी शिक्षणमंत्री झाले आणि त्यांनी त्याकाळी आपले राजकीय स्पर्धक असलेल्या मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना विश्वासात घेऊन त्याकाळी काहीशा पुरातन ठरलेल्या शिक्षणाचा संपूर्ण पॅटर्न ढाचा बदलवून टाकला, शिक्षणात फार मोठे बदल घडवून आणले, क्रांती घडवून आणली, टेन प्लस टू हा नवाकोरा पॅटर्न आणला. कर्मधर्मसंयोगाने त्याच जळगाव जिल्ह्यातले गिरीश महाजन वैद्यकीय क्षेत्रात थेट आमदार असल्यापासून म्हणजे २००४ पासून जी क्रांती करताहेत हे बघूनच दूरदृष्टी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खाते मुद्दाम सोपविले, या संधींचे महाजन यांनी केलेले सोने, त्यावर अख्खी कादंबरी एखाद्याने लिहून काढावी, त्यावर सिनेमा काढावा. विशेष म्हणजे महाजन सत्तेत असतील किंवा नसतीलही पण त्यांचे हे मिशन त्या अण्णा हजारे यांच्यासारखे सतत सुरु 
आहे म्हणून आर आर पाटलानंतर मंत्री म्हणून गिरीश महाजन हे अण्णा हजारे यांचे दुसरे लाडके ठरलेले मंत्री आहेत...

गिरीश महाजन घेत असलेल्या महाआरोग्य शिबिराला जिल्ह्याजिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एवढी प्रचंड मागणी आहे कि जेव्हा मी महाजनांनवर लिहितोय, मराठवाड्यातल्या एका मंत्र्याने ते वाचले, मला निरोप आला, महाजन यांना सांगून आमचे तेवढे ते महाआरोग्य शिबिराचे काम करवून द्यावे, मला आवर्जून, आग्रहाने सांगितले. महाआरोग्य शिबीर हे आता केवळ शिबीर राहिलेले नसून ते ' महाजन मिशन ' नावाने आता या राज्यात नावारूपाला आले आहे, अत्यंत महत्वाचे म्हणजे २००४ दरम्यान रामेश्वर नाईक नावाचा एक महाजन यांचा अतिशय सामान्य कार्यकर्ता गंभीर आजाराने ग्रस्त होता, महाजन यांनी त्याला त्यावेळी त्या गंभीर आजारात मुंबईत स्वखर्चाने आणून वाचवल्यानंतर त्याने आपले शिक्षण सोडले आणि या रामेश्वर याने महाजन मिशन हाती घेऊन अतीव कष्टातून जे काम महाजन यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य क्षेत्रात उभे केले, ते पुढे वाचून तुम्ही म्हणाल हे असे रामेश्वर नव्हे साक्षात परमेश्वर प्रत्येक ठिकाणी जन्माला यावेत, प्रत्येक मंत्री कार्यालयात कार्यरत असावेत...
क्रमश: हेमंत जोशी

No comments:

Post a comment