Sunday, 11 August 2019

महाजन महाविषेशांक : पत्रकार हेमंत जोशी


महाजन महाविषेशांक : पत्रकार हेमंत जोशी 

सध्या मी परदेशात आहे पण गिरीश महाजन यांच्याविषयी त्यांच्या सेल्फीवरून जे काय राजकारण सुरु आहे ते वाचण्यात आले राहवले नाही, मनात म्हटले, हीच ती वेळ गिरीश महाजन कोण व नेमके कसे लोकांना सांगायची नेमकी वेळ येऊन ठेपलेली आहे, वास्तविक संपूर्ण अंक मी एकाच व्यक्तीवर काढला असे फारसे कधी घडले नाही घडत नाही मात्र या मंत्र्यावर म्हणजे गिरीश महाजनांवर केवळ चार दोन लेख लिहून नक्की भागणार नाही, यादिवसात तर नाही हा नाही म्हणून अख्खा अंक त्यांच्यावर लिहायला घेतला आहे, गिरीश महाजन त्यात आत बाहेर कसे वाचकांना त्यांच्या मतदारांना राज्यातल्या जनतेला इतर नेत्यांना नेमके माहित व्हायलाच हवे म्हणून अख्खा अंक त्यांच्यावर काढण्याचा येथे मुद्दाम आगाऊपणा करतो आहे, महाजन वाचा इतरांनाही ते कसे नक्की सांगा...
१९८० मध्ये जळगावचे सुरेशदादा जैन पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले, त्यादरम्यान मुख्यमंत्री असलेल्या बॅरिस्टर अंतुले यांचे उजवे हात म्हणून येथे या राज्यात ओळखल्या जाऊ लागले त्याकाळी आमदार झाल्या झाल्या एवढे मोठे वलय तेही आमदाराभोवताली कधीही निर्माण होत नसे पण सुरेशदादांनी त्यांच्या अति धाडसी व उत्साही स्वभावातून ते प्रसिद्धीचे वलय सहज पटकन स्वभोवताली निर्माण केले, विशेष म्हणजे सुरेशदादा आमदार झाले व मी त्यांचा काही महिन्यात पीए म्हणून रुजू झालो त्यामुळे कोवळ्या वयात मला राज्याचे अंतर्गत राजकारण खूप जवळून बघायला मिळाले ज्याचा मोठा फायदा राजकीय पत्रकारितेत पडल्याने मला झाला....

याच ८० च्या दशकात अगदी सुरुवातीलाच माझी जामनेरच्या गिरीश महाजनांशी त्यांचे नेते एकनाथ खडसे यांनी एक दिवस करून दिली. महाजनांशी ओळख झाली नंतर बऱ्यापैकी मैत्री झाली ती आजतागायत टिकून आहे कारण आमदार किंवा मंत्री झाल्यानंतर जुने मित्र विसरण्याची बहुतेक नेत्यांची जी खोड असते ती तशी वाईट खोड गिरीश महाजन यांना नसल्याने हि मैत्री टिकलेली आहे पण मैत्री आहे म्हणजे पत्रकार असूनही समोरच्या नेत्याचे वाट्टेल तसे वागणे खपवून घ्यायचे हे माझ्या स्वभावात नसल्याने म्हणजे प्रसंगी घरातले जरी चुकले तरी ते चव्हाट्यावर आणणे माझ्या वृत्तीत असल्याने महाजन एक मित्र म्हणून आणि मंत्री म्हणून वाट्टेल तसे वागले असते वागत असतील तरी मी ते खपवून घ्यायचे शक्य नाही म्हणून हीच ती वेळ जेव्हा गिरीश महाजन नेमके कसे राज्यातल्या जनतेला आत भावर सत्य सांगणे गरजेचे वाटले...

www.vikrantjoshi.com

गिरीश महाजन भारतीय जनता पक्षात नेते म्हणून सक्रिय झाले जळगाव जिल्ह्यात ओळखल्या जाऊ लागले तेव्हा प्रतिभाताई पाटील, ईश्वरबाबू जैन, सुरेशदादा जैन, एकनाथ खडसे, जे. टी. महाजन आणि बाळासाहेब उर्फ मधुकरराव चौधरी या बड्या नेत्यांच्या पुढे एक दिवस निघून जातील त्याकाळी एखाद्याने हे असे भविष्य सांगितले असते तर लोकांनी त्यासी वेड्यात काढले असते. पण ते आज घडले आहे, असे कसे घडले तेही समजावून घ्यायलाच हवे आणि महाजन आतबाहेर कसे हेही मी येथे या विशेषांकातून सांगायलाच हवे, विशेषतः प्रसन्न जोशी, संजय आवटे मीडियातल्या या दोघांनी जे महाजन रेखाटले आहेत दाखवले आहेत ते तसेच आहेत कि त्यापेक्षा अधिक महाभयानक आहेत तुम्हाला सांगणे अत्यावश्यक वाटते आहे कारण महाजन त्यांच्या गुणदोषांसहित जेवढे मला माहित आहेत तेवढे हुबेहूब कदाचित त्यांच्या सौभाग्यवतीला देखील नक्की ठाऊक नसावेत, नसतील, अब आयोगा मजा...

नेता तोही जात पैसे बखोटीला नसतांना जेव्हा आजचे हे यश मिळवितो अशा नेत्यांच्या नशिबी संकटे आपत्ती चिंता पाचवीला पुजलेले असतात. येथे या राज्यात या देशात पुढे जाणे स्पर्धा असल्याने मोठे कठीण असते पण गिरीश महाजन यांनी यश आपला चेहरा सदैव हसतमुख ठेवूनच मिळविलेले आहे त्यामुळे अमुक एकाने त्यांचा जेव्हा बोटीवर फोटो घेतला किंवा सेल्फी काढल्या गेला असेल तेव्हा रडवलेल्या चेहऱ्याचे महाजन त्या फोटोमध्ये दिसणे नक्की अशक्य होते, एवढेच काय, बोलू नये ते बोलतो, तो फोटो काढतांना समजा तो गिरीश महाजन यांच्या आयुष्यातला अखेरचा फोटो आहे हे त्यांना स्वतःला जरी त्याठिकाणी माहित पडले असते तरी ते त्या फोटोमध्ये ते हसतांना म्हणजे हसतमुख चेहर्यानेच दिसले असते कारण संकट मग ते कितीही गहिरे असले तरी हसतमुख चेहर्यानेच ते पार करायचे, महाजन यांचा तो स्वभाव त्यामुळे मीडियाने जे त्यांच्या त्या सेल्फीचे कि काढलेल्या फोटोचे भांडवल केले ते कसे चुकीचे, पुढे त्यावर नक्की वाचावे...
क्रमश: हेमंत जोशी.


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment