Friday, 30 August 2019

पवारांचे योग आणि भोग : भाग २: पत्रकार हेमंत जोशीपवारांचे योग आणि भोग : भाग २: पत्रकार हेमंत जोशी 
सोशल मीडिया फेसबुक आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून जगातल्या लाखो वाचकांपर्यंत माझे लिखाण जेव्हा पोहोचते विविध बऱ्यावाईट प्रतिक्रिया त्यावर लगेच माझ्यापर्यंत पोहोचतात, ज्या मला डिलिट करणे आवडत नाही कारण माझ्या भूमिकेशी सारेच कसे सहमत असावेत त्यामुळे टीका मग ती कितीही तिखट जहाल असली तरी सहन करण्याची माझी तयारी असते. चेहरा आणि मुखवटा यापद्धतीने वास्तविक मीडियाने कधीही वागणे लिहिणे बोलणे योग्य नाही, नसते. सारे काही स्पष्ट असावे लागते पण तसे फार कमी घडते, मीडिया मध्ये ढोंग अधिक असते. माझी भूमिका कट्टर हिंदू अशी असल्याने फडणवीस सरकारला नक्की झुकते माप दिल्या जाते पण त्यांचे सारेच सहन करायचे असे अजिबात नाही, पुढल्या विधानसभेला ते तुमच्या लक्षात येईल. एक संधी त्यांना देणे माझे काम होते म्हणून अनेकदा फडणवीस मंत्रिमंडळाला गुणदोषांसहित स्वीकारले...

१९८० ते २०१९ एकही हिवाळी अधिवेशन मी सोडले नाही आणि मंत्रालयात देखील नियमित जाणेयेणे असल्याने तेथले सारेच बारकावे जसेच्या तसे लक्षात ठेवणे शक्य झाले. एवढेच खात्रीने सांगतो आजतागायत जे जे मंत्री मंडळ अस्तित्वात आले सर्वसामान्य जनतेची मंत्रालयातली जी गर्दी फडणवीस मंत्रिमंडळाने बघितली त्यात सातत्य दिसले तसे मी आजतागायत कधीही एकही मंत्रिमंडळादरम्यान बघितलेले नाही. त्या त्या मंत्रिमंडळात अमुक एखाद्या मंत्र्या कडे जमणारी गर्दी मी नक्की बघितलेली आहे म्हणजे रामदास आठवले गोपीनाथ मुंडे मनोहर नाईक गणेश नाईक बॅरिस्टर अंतुले विलासराव देशमुख शरद पवार इत्यादी त्या त्या वेळेच्या मंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे लोकांची मोठी गर्दी होत असे पण एकाचवेळी अख्ख्या मंत्र्यांसभोवताली जमणारी गर्दी हे मात्र पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मंत्र्यांकडे बघायला मिळाले येथेही काही मंत्री अपवाद आहेत पण प्रमाण अगदी कमी, माझे खुश होणे आपसूकच आहे कारण जेथे सर्वसामान्य खुश तेथे आपण खुश होतो, आनंद मिळतो...

काल परवा रयत शिक्षण संस्थेच्या कुठल्याशा कार्यक्रमासाठी शरद पवार श्रीरामपूर येथे गेले असतांना त्यांनी तेथे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत विचारलेल्या एका साध्या प्रश्नावरून त्यांचे आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधींशी वाजले. सदर प्रतिनिधीने त्या 
ठिकाणी पवारांनी वारंवार सांगूनही त्यांची माफी तर अजिबात मागितली नाहीच उलट त्याने न घाबरता पवारांशी वाद घालणे सुरु ठेवले. आता आणखी एक प्रसंग सांगतो, फार वर्षांपूर्वी याच शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नागपूरला अधिवेशन घेतले होते त्यावेळी तेथे थेट अधिवेशनादरम्यान आयोजित पत्रकारपरिषदेत मी देखील होतो,पत्रकारपरिषदेत योगायोगाने लोकमतच्याच राही भिडे यांनी कुठलासा खोचक प्रश्न त्यांना जेव्हा विचारला होता त्यावेळी पवार भिडे यांच्यावर असे काही भडकले कि भिडे यांना दरदरून घाम फुटला होता. श्रीरामपूरला ते घडले नाही कारण पवारांचे पूर्वीसारखेमहत्व आणि दरारा न राहिल्याने जो त्यांनी स्वतःच्या कर्मांनी घालविल्याने त्यांचे आता जाळ्यात अडकलेल्या सिंहासारखे झालेले आहे म्हणजे कोणीही यावे आणि सिंहाला तोंडावर खिजवून वाकुल्या दाखवून पुढे निघून जावे...

श्रीरामपूरच्या त्या पत्रकारपरिषदेत पवारांच्या शेजारी दिवंगत गोविंदराव आदिक यांचे चिरंजीव अविनाश आदिक बसलेले होते जे नक्कीच पवारांची हि फजिती अवस्था बघून मनातल्या मनात हसले असतील सुखावले असतील कारण ज्या कारणावरून एकदा गोविंदराव आदिक माझ्याकडे रडले होते ते दुःख ती सल त्यांनी बरोबरीला आलेल्या आपल्या या लाडक्या लेकाला नक्कीच सांगितलेली असेल. गोविंदराव मला म्हणाले, हेमंत, मी जर पवारांच्या मोहाला बळी पडून काँग्रेस सोडली नसती तर आज या राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे माझे स्वप्न शंभर टक्के पूर्ण झाले असते. पण मैत्रीला मी जागलो पण पवारांनी मात्र मित्राचाच गळा कापला, राजकारणात मला बाजूला सारून माझा अक्षरश: कचरा केला. पुढे गोविंदराव फार जगले नाहीत, लवकर गेले. पवार कधी फार काळ कोणाचे झाले नाहीत आता पवारांचे फार कोणी उरले असे वाटत नाही, दिसत नाही. असे अर्थात घडायला नको होते. पवारांच्या वाट्याला हे असे यायला नको होते, जे आज घडते आहे...

मित्राने पाठविलेल्या या चार ओळी हि चारोळी, खास तुमच्यासाठी, 
वाड्यावरील घड्याळाचे 
टोले आता पडत नाहीत,
आवारातील गर्दीच्या खुणा 
आता दिसत नाहीत, 
आतापर्यंत जवळ होते 
तेही दुरावून गेले...
जाणते पणी डावपेच केले 
सारे आता अंगलट आले...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Why EOW is now a settlement branch? The Real Story, OFF THE RECORD style!!

Why EOW is now a settlement branch? The Real Story, OFF THE RECORD style!!

First & foremost, Congratulations to the Commissioner of Police Mumbai IPS Sanjay Barve for getting an extension for 3 months after a gruelling battle with his contemporaries who fought tooth & nail till the last minute yesterday. Since last two weeks through my blog, I tried to expose the "Gangs of Wassepur" "Harry Kilo Net" gang who tried every trick in the book to oust the CP, but at the end, CM Devendra Fadnavis & Amit Shah stood behind Barve like a rock, and gave an extension "relaxing" all the rules in the book. Bravo, Barve!!

See, I'm not a 'supari' journalist. Neither I'm expecting Mr. Barve to give me truck loads of money nor do I hold anything against these "Bihari" IPS officers & their friends in the industry. But why my blogs get widely spread is because I always stand behind clean & honest officers, in this case Sanjay Barve. Clean, marginally clean, partially clean is allowed in my text book 😀😉...I have many friends in the IPS lobby of Maharashtra who are Bihari's or Hindi speaking one's--but even they called me and extended their support towards Barve. They are in fact the scared lots of new & old one's  combined, who don't want to be part of these Gang members just because they belong to the same home state or speak the same language. Now to the story...

Why EOW was called a settlement gang by the CP? The paper wrote a very vague story giving nothing as am sure the editor must be on the poor reporters head for not disclosing the "high profile case". Anyway, this case is about IP rights & it belonged to the Cyber department. Today it is registered there. Nowhere, means absolutely nowhere, the EOW could have got involved, but someone had something else in mind. If you are a regular TV watcher, a mega superstar promotes an E learning platform with a kid in his toe. Now this company through it's hard-work, patience & weathering all the storms, is a very big company today. It is estimated to be for few hundreds of crores in the market. A technocrat who knew the 'core' of the business suddenly decided to quit after his stint with the company for 5 years. he knew everything about the company. From the core to the business... He  then joined hands with a young 25 year old-- who is the son to one of the biggest hospital chains of our country. Young, brash 25 year old and the technocrat joined hands & formed another E learning company & introduced the same e learning company product and named it "A", a clear copy of his parent company's product. Things went smoothly for some time. But as it happens in movies, again this Technocrat and 25 year old had a major fight. They decided to split the company. 25 year old's father a big man himself and owner to one of the biggest hospital chain had few "Gangs of Wassepur" IPS friends. The technocrat & the 25 year old split!

www.vikrantjoshi.com

In the meanwhile, the technocrat went ahead & this time, all by himself introduced same product with same everything & called it  "B". The father & the gang members in the EOW registered cases against left, right & centre against  this technocrat for theft of technology and blah blah...

This 'crooked' officer in the EOW decided on his own to show the company of the 25 year old & technocrat a RS. 90 crore venture with a loss of Rs. 9 crore annually. The rigged the records & books, obviously. Since they all wanted to nail this Technocrat, EOW was the obvious choice. And since, no case within Rs. 6 crore per-view falls under EOW, the books and figures were rigged so much so that the loss was pegged to be Rs. 9 crore, turnover Rs. 90 crore. But what the EOW forgot is that every company which is "pegged" to be of a certain number, needs to be approved by hell lot of agencies & banks. For e.g. if any company's worth is suppose 1000 crores, how is their market value derived? There are special agencies who do the due diligence of the company and then their market value is determined. In many cases where huge numbers involved a mercantile bank will also do the due diligence.  So, some or the other agency needs to authenticate it, right? This officer at the EOW forgot to do that and on his own decided the worth of this company to be Rs. 90 crores. Game was over then!

This technocrat who was in doldrums after being held to ransom at the EOW approached the great IAS bureaucrat who exited the CMO to head a Corporation in Mumbai. This IAS immediately rung up the CP and Barve with his own style of investigation and finding facts took care of this technocrat and now the case is transferred to Cyber crime and out of EOW...Kya badmaashi thi nah? 

If these IPS gangs want, they can nail you & your family by doing anything. Best part is when the product A & B were launched in the market by the technocrat both the times, till now the original E learning brand who is endorsed by the mega superstar still does not know how come their technology and product is out in the market as a substitute...The day they find out,  EOW is surely under a lot of trouble.

Vikrant Hemant Joshi 

पवारांचे भोग : पत्रकार हेमंत जोशीपवारांचे भोग : पत्रकार हेमंत जोशी 
असे आहे वाचकांनो, सिंह जाळ्यात अडकला कि कोल्हा सुद्धा सिंहाला वाईट अर्थाने डोळा मारून मोकळा होतो. वाघीण खड्ड्यात पडली कि माकड देखील तिच्या ओठांची पप्पी घेऊन मोकळे होते. अस्वलास बांधून ठेवा अशावेळी बोका देखील त्यासी गुदगुदल्या करून मोकळा होईल. एखाद्या पहिलवानाला जख्खड म्हातारपण आले कि टपरीवर चहा देणारा पोऱ्या देखील त्याच्या ऑर्डरकडे दुर्लक्ष करून मोकळा होतो, साखळदंडाने जर गोरिला बांधून ठेवला तर माकडीण देखील त्याच्या ओठांची पप्पी घेऊन मोकळी होईल. तुमच्या ते लक्षात आलेच असेल कि हे वर्णन सध्या शरद पवारांना तंतोतंत लागू पडते. जेथे कट्टर मुस्लिम हसन मुश्रीफ भाजपाकडे निघाले आहेत तेथे कोण केव्हा येईल, भरवसा नाय....

आमचे मुख्यमंत्री जयंत पाटील असतील खुद्द पवारांनी सांगितल्याने जयंत पाटलांचे हिंदी सिनेमातल्या नायकासारखे झाले आहे म्हणजे नायकाचे प्रेम भलत्याच नायिके वर असते पण मुखिया मधेच येऊन जाहीर करतो कि त्याच्या मुलीचे लग्न नायका सांगे त्याला करवून द्यायचे आहे. जयंत पाटलांना हा असा जबरदस्तीचा राम राम करावा लागतो आहे, त्यांचे प्रेम तर फार आधीपासून भाजपा नावाच्या प्रेयसीवर जडलेले पण गावच्या मुखियाने चतुराईने हा गोंधळ घालून ठेवला आहे. पवारांची ती नेहमीची पद्धत आहे म्हणजे सुनील तटकरे राष्ट्रवादी सोडून जाताहेत पवारांच्या कानावर येताच त्यांनी थेट तटकरेंनाच प्रदेशाध्यक्षपदी बसविले होते नेमके हे असे जयंत पाटलांच्याही बाबतीत घडले आहे, सध्यातरी जयंतरावांच्या नशिबी मासिक पाळी गेलेल्या बाईंसंगे लग्न झाल्यासारखे घडले आहे...आपण सारे पवारांना सोडून शिवसेनेत किंवा भाजपामध्ये गेलेल्यांना दोष देतोय, ज्यांच्या भरवशावर श्रीमंत झाले, लुटून मोकळे झाले त्याच पवारांना सोडून जाणे योग्य नाही, नव्हते, मतलबी आहेत, स्वार्थी हलकट संधीसाधू आहेत म्हणून मोकळे होतो आहे पण जे पवारांना सोडून बाहेर पडले पडताहेत ते तसे का करताहेत कधी त्यावर काहीही वाचण्यात येत नाही, राष्ट्रवादी व पवारांना सोडून जाणाऱ्यांचीही भूमिका समजावून घेणे येथे आवश्यक ठरते. प्रसाद लाड यांचे अतिशय जवळचे स्नेही मला म्हणाले कि कालपरवापर्यंत पवारांचे लाडके असलेले प्रसाद लाड आज मुख्यमंत्र्यांना जवळचे म्हणून त्यांच्यावर सतत माघारी टीका करण्यात येते पण याच प्रसाद लाड यांनी विधान परिषद निवडणुकीत तब्बल १८ कोटी रुपये खर्च करूनही त्यावेळी शरद पवारांनी सचिन अहिर यांना हाताशी धरून केवळ ४-५ मतांनी अगदी ठरवून पाडले होते जेव्हा लाड यांच्या हाती नेमके पुरावे आले तेव्हाच त्यांनी ठरविले होते कि पवारांपासून दूर पाळायचे....

राष्ट्रवादीच्या महिला नेत्या चित्रा वाघ भाजपामध्ये गेल्या तेव्हाही त्यांच्या नावाने हि अशीच बोंबाबोंब करण्यात आली पण चित्रा यांचे एक महिला नेत्या म्हणून वाढत चाललेले महत्व किंवा सुप्रिया सुळे यांच्याही पेक्षा त्यांना दिली जाणारी प्रसिद्धी हे 
पवारांना सहन होणे नक्की शक्य नव्हते मग काय ' वाघ ' यांच्या पाठीशी काही ' कोल्ह्यांना ' म्हणजे चतुरांना मानसिक त्रास देण्या सोडण्यात आले त्यात फौजिया खान, विद्या चव्हाण आणि सुरेखा ठाकरे कशा व किती आघाडीवर होत्या हे नेमके चित्र वाघ यांना विचारल्यास आधी त्या हंबरडा फोडून रडतील नंतर एक एक प्रसंग जेव्हा सत्यनारायणाच्या कथेसारखा सांगतील, बाहेर पडतांना, चित्राजी तुमचा पक्ष सोडण्याचा निर्णय योग्य होता, तुम्ही त्यांना तोंडावर सांगून मोकळे व्हाल...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्र अजितदादा पवार हे देखील संघ दक्ष म्हणण्या केव्हाच तयार आहेत पण फडणवीसांनीच त्यांना सांगितले आहे, काळजी करू नका, तुमचे तुमच्या मनातले असे काहीही वाईट होणार नाही, थांबा, माझ्या निरोपाची वाट पहा. एकमेव नेता प्रफुल्ल पटेल ज्यांच्याविषयी ते गुजराथी असूनही शहा आणि मोदी यांना कवडीचीही आस्था नाही, प्रेम नाही आणि महाराष्ट्राचे असूनही थेट फडणवीसांना त्यांच्याविषयी आदर नाही त्यामुळे ते सोडून भाजपामध्ये उद्या दस्तुरखुद्द प्रतिभा पवार जरी आल्या तरी त्यांना लाल कार्पेट अंथरून स्वागत केले जाईल. शरद पवारांवर सर्वाधिक डिस्टरब आहेत, मनातून मनापासून खवळून चिडून संतापून आहेत श्री छगन भुजबळ. मी लुटले मी खाल्ले हे ते खाजगीत मान्य करतात पण मी एकट्यानेच खाल्ले का, राष्ट्रवादजींचे पवारांचे अवाढव्य आर्थिक गणित आम्ही कसे सांभाळले ते हेमंत टकले यांना विश्वासात घेऊन विचारावे, हादरवून सोडणारे असेल पण बरबाद तेही आम्ही सत्तेत असतांना आम्हालाच करण्यात आले, थेट तुरुंगात धाडले. मी यादी ती देखील पुराव्यांसहित देतो त्यांना का हो तुरुंगात टाकलेले नाही, त्यामुळे पवार गेले उडत, मला हिरवी झेंडी दाखविल्या गेली कि मी नक्की बाहेर पडतो आहे, विशेषतः रात्रीच्या वेळी व्यथित होऊन भुजबळ म्हणे डोळ्यात पाणी आणून सांगून मोकळे होतात, दुःख व्यक्त करून मोकळे होतात...

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Thursday, 29 August 2019

Mumbai CP Post--The battle has begun!Mumbai CP Post--The battle has begun!

Mumbai Commissioner of Police IPS Sanjay Barve is set to retire later this month. But, looking at the  forthcoming elections our state will undergo later this year, it is expected CM Fadnavis will grant  an extension to CP Barve for a minimum of three months, if not six, claim sources. Again clearly, Cm Fadnavis's decision hasn't gone down well with few, hence the battle to oust the current CP is top priority for people who are in the race for the post, currently two along with their peers & mentors, and now things have started to get a bit ugly! If you recollect last week, The Times of India had made it on the front page that Mumbai CP will change, and yesterday somewhere inside read a small paragraph that said, Barve might get extension!! When to believe these papers, is way out of my league folks!

Apparently today morning a contender for the top post along with her "guru" has embarked on a flight to Nagpur to plead in front of the RSS doors. But as per my information, the visit to Nagpur will not be fruitful one. Also in the meantime the "Harry Kilo Net" lobby (Ok for the unknown, Bihari bureaucrats entering Delhi are known as Harry Kilo Net, a term coined by Delhites) and the Wellington Gymkhana retired IPS members are hell bent on giving Barve a tough fight and have indeed begun to dream of not getting him an extension. They first approached a top political/crime Journalist from a reputed channel who also happens to hail from Bihar. Mind you, the caste/state lobby is very much active in bureaucracy too--The lobby approached the Journalist so that they can showcase an old story against Barve in Delhi as the extension file is lying on the tables there. Since Barve is an IPS it is mandatory to take extension/permission from Delhi. But when the Channel Editor refused to play any story against clean & disciplined Barve, what I hear the Journalist took it on "it"self to approach 7 other channels, but to "its" dismay, even they refused to telecast anything against Barve. Now here & there, this lobby is trying every possible bet to make Delhites listen/see to the case and anyhow convince babu's sitting in Delhi to not grant an extension...Desperation at its best. 

www.vikrantjoshi.com

Now the fun part. Two contenders are there for the top CP Post. One is Rashmi Shukla & the other one is PArambir Singh. Apparently, if I believe in the rumours in the corridors of Mantralaya, both of them have joined hands to oust Barve, but at the same time there is a thick competition even between Shukla & Parambir. So my news of Shukla being a sole candidate of this whole Kayasta gang was wrong. Parambir is on his own, if & when Barve is not given extension. Anyways, the main man behind creating all this ruckus is our own "Indian" IPS who has even come out clean from a CBI enquiry. Gosh, even I want my brother to become a lawyer😉😉

Isn't it fun as to what's happening for a post in IPS lobby? I can't wait to watch this episode which will 1000 times better than any Sacred Games/Gangs of Mirzapur/Blacklist. But at the end, I know if CM Fadnavis has recommended Sanjay Barve for extension of 3 months, I know he will get it...So  dear lobbyist stop wasting money on your air travels and wait for your chance till January 2020. 

Vikrant Hemant Joshi 

Monday, 26 August 2019

पवारांचे संस्कार : पत्रकार हेमंत जोशीपवारांचे संस्कार : पत्रकार हेमंत जोशी 
चांगले संस्कार झालेले फक्त भाजपा मधेच आहेत असे काहीही नसते पण उच्च संस्कार लाभलेले झालेले नेते भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत असे फारतर म्हणता येईल. दिवंगत सुसंस्कारी आर आर पाटील तर शरद पवारांचे उजवे हात होते तरीही किंवा शिवसेनेचे सुधीर जोशी त्यांच्या संस्कारांचा तर एखादा पाठ धडा शाळेत नाकी शिकविल्या जावा. विषय आठवला तो गाडगीळ दाम्पत्यावरून, मेधा गाडगीळ प्रशासकीय सेवेत उच्चपदस्थ आहेत, आता त्या निवृत्तीच्या अगदी उंबरठ्यावर आहेत त्यांचे पती आमदार आहेत बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांचे सुपुत्र आहेत या दोघांनी आडमार्गाने कमवायचे ठरविले असते तर त्यांची गणना आज अगदी शंभर टक्के पुण्यातल्या श्रीमंतामध्ये झाली असती. अलीकडे त्यांच्या मुलाच्या विवाहानिमित्ते झालेल्या साध्या स्वागत समारंभाला गेलो होतो बघून एवढेच लक्षात आले कि अनंत गाडगीळ काँग्रेसचे असूनही आणि मेधाताई प्रशासकीय सेवेत असूनही तेवढे उत्तम संस्कारांच्या बाबतीत करोडपती आहेत, पैसे त्यांनी जे मिळविले ते शंभर टक्के शुद्ध सोन्यासारखे उत्तमरीत्या कमावले जे राजकारणात आणि प्रशासकीय सेवेत सहसा घडत नाही. संस्कार व शरद पवार हा विषय पुढे असल्याने गाडगीळ दाम्पत्याचा उल्लेख केला...

जे शरद पवार अगदी अलीकडे नरेंद्र मोदींवर टीका करतांना जाहीर म्हणाले होते, सत्तेचा उपयोग एखाद्या धर्माच्या प्रसारासाठी करणारा असा पंतप्रधान भारताने याआधी कधी पहिला नाही. हे पंतप्रधान सर्व सहिष्णू तत्वांना तिलांजली देत असतांना भगवी वस्त्रे घालून, गुहेत जाऊन, तुम्ही देशाला कोणता संदेश देताय ? देवब्राम्हणांविषयी, भगव्याविषयी, संघ भाजपाविषयी मनातकायम द्वेष ठेऊन त्यापद्धतीने ज्यांनी कार्यकर्त्यांमध्ये संदेश पोहोचविले, मनात विष पेरले, बघा, नियतीचा खेळ, पुन्हा एकदा येनकेनप्रकारेण जनतेची, फक्त निवडणूक तोंडावर असल्याने सहानुभूती मिळविण्यासाठी हेच शरद पवार जाहीर भगवा झेंडा हाती घेऊन, रथावर चढवून मतांचा जोगवा मागत फिरताहेत. अत्यंत लाजिरवाणे म्हणजे ज्यांनी ताठ मानेने लोकांपुढे जाऊन मते मागवीत असे नेतेही त्यांच्याकडे नाहीत, नव्हते आणि नसतीलही त्यामुळे बाहेरच्या एकमेव अमोल कोल्हेंना पुढे केले जाते आहे....

www.vikrantjoshi.com

देशभक्ती वगैरे असे काहीही पवारांच्या आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून राजकारणाचा फक्त स्वतःच्या भल्यासाठी दुरुपयोग करणाऱ्या त्यांच्या चेल्यांच्या मनात नसते, दरोडे कसे टाकावेत दगाफटका कसा करावा देश राज्य कसे लुटावे, लाटावे, ओरबाडावे तेवढेच त्यांच्या मनात असते, तेच त्यांच्या शिष्यांना देखील शिकविले गेलेले असल्याने पवारांनी निर्माण केले ते प्रफुल्ल पटेल यांच्याचसारखे देशविके नेते. त्यापलीकडे आणखी असे म्हणता येईल कि चांगले संस्कार झालेले नेते त्यांनी न घडविल्याने कालपरवा शिवसेनेतून आलेले कडव्या भगव्या विचारांच्या कोल्हे यांना वापरल्या जाते आहे. वास्तविक वापरून एखाद्याचा कंडोम करणे हे तर शरद पवार यांच्या अंगवळणी पडलेले, जे मी पण स्वतः अनुभवले आहे मात्र यापुढे पवारांचे सत्तेत येणे दूरदूरपर्यंत दिसत नसल्याने निदान कंडोम होणे खासदार अमोल कोल्हे यांच्या ते नक्की नशिबी येणार नाही अन्यथा जे भुजबळ आडनावाच्या माळ्याचे पवारांनी ते सारे सत्तेत असतांना करून ठेवले होते तेच अगदी नक्की अमोल कोल्हे यांच्याही बाबतीत शंभर टक्के घडले असते कारण पुढे जाणाऱ्यांचा कंडोम करणे पवारांना अजिबात अजिबात नवीन नाही....

आज जे अमोल कोल्हे करताहेत तेच कधीकाळी समता परिषद स्थापन केलेल्या श्री छगन भुजबळ यांचे झालेले होते, समता परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या सभांना जेव्हा राज्यात व राष्ट्रांतही प्रचंड गर्दी व्हायला लागली त्यानंतर काहीच दिवसात भुजबळ यांचे राजकीय आयुष्य असे काही बेचव केल्या जाऊ लागले कि विचारू नका, पण राजू श्रीवास्तव च्या विनोदी भाषेत सांगायचे झाल्यास आता शरद पवारांचा म्हातारा गब्बर झाल्याने अगदी शंभर टक्के खासदार अमोल कोल्हे यांचा शोले मधला विजू खोटे होणार नाही त्यांचा क्षणार्धात यापुढे राजकीय खात्मा होणार नाही. पवार करूच शकणार नाही. मित्रहो, राज्य कसे लुटल्या जाते हे आमच्यासारख्या शोध पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना अगदी जवळून बघायला मिळत असते, तसे पुरावेही आमच्याकडे असतात, शरद पवार व त्यांच्या विचारांच्या नेते मंत्री अधिकारी झालेल्यांच्या हाती हे राज्य आले आणि आपली मराठीची येथील जनतेची, सामान्य लोकांची अक्षरश: विकासाच्या नावाने वाट लागली, एवढे खात्रीपूर्वक 
सांगतो, आर्थिकदृष्ट्या मोठे झालेत ते दलाल, मूठभर नेते आणि अधिकारी...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Wednesday, 21 August 2019

द्रौपदी बावनकुळे : पत्रकार हेमंत जोशीद्रौपदी बावनकुळे : पत्रकार हेमंत जोशी 
जसे समुद्रमंथन पुराणात घडले त्याची पुनरावृत्ती पुन्हा एकवार महाराष्ट्रात झाली आहे घडलेली आहे. दिवंगत प्रमोद महाजन दिवंगत गोपीनाथ मुंडे दिवंगत अटलबिहारी वाजपेयी शरद पवार नरेंद्र मोदी आणि अमित शाह नितीन गडकरी व मोहन भागवत सारे देवाने एका खलबत्त्यात कुटले त्याचे एक अद्भुत रसायन तयार केले रसायन तयार झाले त्या रसायनाचे नाव आहे देवेंद्र फडणवीस. त्यांना ज्यांनी जवळून बघितले आहे जवळून अनुभवले आहे त्या सर्वांना जर विचारले देवेंद्र फडणवीस कसे आहेत उत्तर हत्ती आणि चार आंधळे कथेपद्धतीने येईल, जे सांगणारे असतील, ते वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर देतील, कोणाला फडणवीसांमध्ये मुंडे दिसतील तर कोणाला महाजन कोणाला त्यांच्यात थेट शरद पवार दिसेल त्यांच्या पुढे ते बेरकी वाटतील तर काहींना ते भाषणप्रभू वाजपेयी वाटतील काहींना त्यांच्यात नरेंद्र मोदी संचारलाय वाटेल तर काही म्हणतील ते या राज्यातले अमित शाह आहेत. त्यांच्या कामाची पद्धत पाहून काहींना ते आजवरच्या सरसंघचालकांची नक्कल करताहेत वाटेल तर काहींना वाटेल फडणवीसांचा पार अमित शाह झाला आहे, त्यांना देशापुशे जणू भीती अशी कोणाची वाटतच नाही. फडणवीस म्हणजे राजकारणातले आजचे गोविंदा आहेत, गोविंदाने विविध मान्यवर नटांची बेमालूम नक्कल केली आणि सिनेमात प्रथम क्रमांकाची आघाडी घेतली. फडणवीस देखील हे असेच, त्यांनी वर उल्लेख केलेल्या नेत्यांचे गुण जणू अवगत केले काहींचे काही अवगुण बाजूला ठेवले मग तयार झाले एक हादरवून सोडणारे अजबगजब राजकीय रसायन नेते देवेंद्र....

नागपुरातले म्हणजे नागपुरात होते तोपर्यंतच देवेंद्र म्हणजे सार्या नागपूरकरांना आवडणारे ग्राईपवॉटर चे गुटगुटीत आनंदित बाळ जे बोलके होते कट्टर संघाचे होते सर्वांचे लाडके होते, देवेंद्र संघाचे कट्टर होते पण त्यांचे राजकीय संबंध नागपूर शहरात त्यावेळी सर्वांशी अत्यंत सलोख्याचे असल्याने फार लहान वयात नगरसेवक झाले, महापौर देखील झाले, पुढे आमदार झाले, प्रदेशाध्यक्ष झाले तोपर्यंत देखील फडणवीसांचे नेतृत्व हे असे एकदम उफाळून वर येईल इतरांचे सोडा त्यांच्या आईला किंवा पत्नीला देखील वाटलेले नसावे पण त्यांच्यातला अर्जुन ओळखला होता फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांनी म्हणून गोपीनाथ मुंडे अचानक गेल्यानंतर मला फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचे आहे त्यांनी संघ भाजपा वर्तुळात सांगून टाकले. नेमकी देश प्रेमी माणसे ओळखावीत ती मोदी यांनीच, फडणवीसांचा त्यानंतरचा फक्त पाच वर्षांचा राजकीय प्रवास व इतिहास कसा खतरनाक, आपण सारेच बघतो आहे, अनुभवतो आहे. शरद पवार देखील एखाद्याला घाम फोडायचे पण त्यात पाप असायचे व्यक्तिगत स्वार्थ असायचा, पवारांमध्ये शिवाजी महाराज कमी दाऊद अधिक डोकवायचा. हेही घाम फोडतात, पण त्यांचे एखाद्याला घाम फोडणे राज्य किंवा राष्ट्र हितासाठी असते. एक नक्की सांगतो, फडणवीसांचे एक बरे आहे कि त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक किंवा राजकीय तरतूद त्या शरद पवारांसारखी करून ठेवायची नसल्याने त्यांचा पवारांसारखा राजकीय कचरा किंवा राजकीय खात्मा कधीही होणार नाही...
www.vikrantjoshi.com

पांडवांवरून जसा तीक्ष्ण नजरेचा एकाग्र शूर पराक्रमी अर्जुन फडणवीसांवरून आठवला, लगेच पाच पांडवांची पत्नी द्रौपदी देखील नजरेसमोर तरळली. द्रौपदीला पाच पाच पती होते तरी तिने स्वतःची फजिती करवून घेतली कधी वाचण्यात आलेले नाही ती एकाचवेळी 
पाचही पांडवांचा आदर करायची त्यामुळे त्या पाचही पांडवांचे द्रौपदीवर अतोनात प्रेम होते. राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री, नागपूरचे पालक मंत्री, राज्याचे सर्वाधिक लाडके लोकप्रिय लोकमान्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे त्या द्रौपदीच्याच रांगेतले. पुरुषांमधले ते द्रौपदी यासाठी कि ते सांभाळत असलेली राजकीय कसरत सर्कस तुम्हाला एकाचवेळी पाचही बोटे तोंडात घालायला लावणारी. मी त्यांचे सखेसोबती विद्यावाचस्पती विश्वास पाठक यांना म्हणालो देखील कि बघा जेव्हा केव्हा देवेंद्र दिल्लीत निघून जातील येथे या राज्यात जसे मुख्यमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील किंवा गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा असेल त्यात चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव शंभर टक्के आघाडीवर असेल कारण बावनकुळे यांचे वागणे, आठवण करून देणे त्या द्रौपदीसारखे. ज्या तिघांच्या शब्दाला भाजपामध्ये मान आहे ज्यांच्या हाती आजची राज्यातली भाजपा आहे ते तिघेही म्हणजे मोहन भागवत, नितीन गडकरी आणि अर्थात देवेंद्र फडणवीस, मुका घ्या मुका असे त्यांना सांगितल्या गेले कि ते या बावनकुळेंना पटकन कडेवर उचलून घेतात आणि पटापट लाड करून मोकळे होतात...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असे असते कि एकदा का तुम्ही संघ वर्तुळातून सत्तेच्या म्हणजे भाजपा वर्तुळात सामील झालात कि संघाच्या अंतर्गत कामकाजात तुम्हाला काहीही करता येत नाही फक्त एक स्वयंसेवक म्हणून संघाने दिलेले आदेश कमालीची गुप्तता पाळून पार पाडायचे असतात. संघाबाहेर असे कधीही ऐकू येत नाही कि आजच मातोश्रीवर जाऊन आलो आणि दक्षिणा ठेवून आलो. सेनेत मात्र हे मोठ्या फुशारकीने दुर्दैवाने सांगितले जाते. तीन अति प्रचंड ताकदीचे पण एकमेकांच्या मांडीवर न बसलेले नेते. भागवत, फडणवीस व 
गडकरी. या तिघांचेही आदेश तर पाळावे लागतातच पण त्याचवेळी हे आदेश पाळतांना तिघातला एकही नाराज होणार नाही याची मोठी काळजी घ्यावी लागते. कमाल आहे बावनकुळे यांची, रिअली, त्या द्रौपदीनंतर हे एकमेव. बावनकुळे यांनाच हि कठीण सर्कस सांभाळता आली. अतिशय कठीण असे हे काम होते, आहे. पण चंद्रशेखर, असा आवाज द्यायचा अवकाश, बावनकुळे जेथे कुठे असतील तेथून धावत गेले नाहीत भेटले नाहीत त्यांनी टाळले असे कधीही घडले नाही आणि घडणार देखील नाही. विनम्रता त्यांच्यातला प्लस पॉईंट आहे. त्या तिघांत या कानाचे त्या कानाला कळू न देता तिघांची मर्जी संपादन केली, विश्वास संपादन केला मंत्री बावनकुळे यांनी. कमाल केली. पुराणात एकच रामभक्त' हनुमान ' होता, येथे मात्र एकाचवेळी तिघांनाही वाटते आमचा हनुमान चंद्रशेखर आहे. असे क्वचित खचित घडते, कधीकाळी अतिशय सामान्य वकूब असलेला गडकरींचा हा कार्यकर्ता, आज तीन तीन दिग्ग्जच्या गळ्यातला ताईत बनतो कारण बावनकुळेंना सकारात्मक पद्धतीने वागायचे आहे, काम करायचे आहे ज्याचे सुदैवाने भागवत, फडणवीस व गडकरी तिघांनाही वावडे नाही...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Monday, 19 August 2019

महाजन महाआरोग्याचे महामेरू : पत्रकार हेमंत जोशीमहाजन महाआरोग्याचे महामेरू : पत्रकार हेमंत जोशी 
अलीकडे आलेले प्रलय त्यामुळे बिघडलेले आरोग्य बिघडलेले मनःस्वास्थ्य, जीवाची शरीराची वयाची पदाची मृत्यूची आयुष्याची अपघाताची कशाचीही चिंता पर्वा काळजी न करता राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री श्री गिरीश महाजन यांनी थेट महापुरात उडी घेऊन अडकलेल्यांना केलेले सहकार्य ज्याचे थेट जाहीर कौतुक त्यांचे कट्टर राजकीय विरोधक एकनाथ खडसे यांनीही केले, त्या महा महाजनांची जबाबदारी आता अधिक वाढलेली आहे, राज्यात मराठवाडा वगळता आलेले महापूर, त्यातून लोकांचे बिघडलेले आरोग्य, काळजी करू नका, जेथे आर्थिक ऐपत नसलेल्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे, त्यांनी थेट गिरीश महाजन यांच्या बंगल्यात रामेश्वर नाईक जे महाआरोग्य शिबीरांचे तेथून अतिशय नियोजनपूर्वक कार्यालय थाटून आहेत, संपर्क साधावा, समाधान शंभर टक्के होईल, खात्रीने सांगतो...

अर्थात रामेश्वर नाईक म्हणाल तर महाजनांचा पीए म्हणाल तर सखा सोबती, अख्खे कुटुंब घेऊन महाजनांच्या महाकार्यात वाहून घेणारे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील सूक्ष निरीक्षण करून तोंडात बोटे घालावीत त्यापलीकडे गिरीश महाजन यांनी स्टेप बाय स्टेप महाआरोग्य शिबिराचे आणि रुग्णसेवेचे उभारलेले हे महाजाल महाजाळे जेथे ऐपत नसलेल्या रुग्णांनी थेट शिरावे आणि आपले आयुष्य वाचवावे असे हे आरोग्य निर्वाण महाकेंद्र, निदान महाजनांच्या कार्याला तरी देशाने सत्तेतील मंडळींनी असतील नसतील ते सारे अवॉर्ड्स रिवर्ड्स देऊन त्यांचे देशभर कौतुक करून मोकळे व्हावे, त्यापलीकडे जाऊन मी तर संघाला, भाजपाला हे सांगतो, त्यांनी महाजन राबवित असलेले हे महाआरोग्य शिबिराचे महाकार्य देशभरात कसे पसरेल ते बघावे, बिघडलेले आरोग्य हि आपल्यासमोर असलेली मोठी समस्या आहे, मोठी अडचण आहे, ती निदान सर्वसामान्यांच्या नजरेतून तरी या राज्यापुरती गिरीश महाजन आणि त्यांच्या टीमने सोडविलेली आहे पण हे ' महाआरोग्य शिबीर मिशन ' आणखी मोठे व्हायलाच हवे, देशभर पसरायलाच हवे, संघ भाजपाकडे वेळ नसेल तर त्यांनी कायमस्वरूपी हि जबाबदारी महाजन व त्यांच्या टीमवर सोपवावी, त्यांनी मोठे काम केले नक्की निश्चित म्हणता येईल...

www.vikrantjoshi.com

मंत्रालयासमोर जे आमदारांचे निवासस्थान आहे त्यातल्या जवळपास १७-१८ रूम्स राज्यातल्या विविध आमदारांनी प्रसंगी आपली आपल्या कार्यकर्त्यांची होणारी अडचण फजिती सहन करून तेही अतिशय उत्स्फूर्तपणे महाजन आणि त्यांच्या टीमकडे बहाल केल्या आहेत, आपल्या मतदारसंघातील सामान्य गरीब रुग्णांच्या कायम समस्या सोडविणार्या गिरीश महाजन यांच्यासाठी हे एवढे करणे आमचे एकप्रकारे कर्तव्य होते हे असे उदगार आपल्या खोल्या ज्यांच्या ताब्यात दिलेल्या आहेत त्या महाजन यांच्याविषयी अगदी जाहीर काढतात, या आमदारांच्या किंवा राज्यातल्या साऱ्याच आमदारांच्या सर्वसामान्य गंभीर रुग्णांना कायमस्वरूपी दिलासा मिळाल्याने हे असे घडले, असे म्हणता येईल. दररोज रामेश्वर नाईक त्याचे कुटुंब व टीम, राज्याच्या विविध भागातून त्यां १७-१८ रूम्स मध्ये जे रुग्ण वास्तव्याला उपचारांना आलेले असतात, त्यांच्या दोन्ही वेळेच्या जेवणाचे आणि उपचाराचे जे नियोजन करतात, सर्व समाजसेवकांनी देखील येथे नतमस्तक व्हावे, घरात जरी एखादा गंभीर रुग्ण असेल तरी नाक मुरडणारे आम्ही,काय हो देणे घेणे महाजन आणि त्यांच्या त्या चमूला, पण जाऊन तर बघा तेथे तुम्ही प्रत्यक्ष, तोंडात बोटे घालाल, कौतुकाने तुमचे नयन भरून येतील...

गिरीश महाजन यांच्या महाआरोग्य शिबिराला त्यातून येथे मुंबईत येणाऱ्या अनेक रुग्णांना बरे करून घरी पाठवायचे म्हणजे खर्च मोठा होतो पण त्यांना तुमचे पैसेही नकोत, फारतर शुभेच्छा द्या किंवा देणगीच्या स्वरूपात जीवनावश्यक वस्तू देऊन मोकळे व्हा, त्यांना तेवढे पुरेसे आहे कारण सारेकाही रुग्णांवरच खर्च व्हायचे आहे, आधीच्या सत्तेतल्या मंडळींसारखे त्यांचे नाही कि टाळूवरचे लोणी खाऊन मोकळे व्हायचे आहे. महाराष्ट्र शासन किंवा राज्यातले दानशूर उद्योजक महाजनांच्या पाठीशी अगदी उघड उभे आहेत कारण सारे काही क्रिस्टलक्लिअर आहे, फक्त व फक्त महाजनांचा त्यांच्या चमूचा हा संघर्ष सर्वसामान्य रुग्णांसाठी सुरु आहे, त्यात जात पात पक्ष असे काहीही नाही, जावे आणि रामेश्वर नाईक यांना महाजनांच्या मलबार हिलवरील बंगल्यावर थेट गाठावे तुमचे काम होते, रुग्णसेवेला लगेच प्रारंभ होतो. त्याशिवाय राज्याच्या विविध भागात ज्या पद्धतीने महाआरोग्य शिबिरे सतत कायम भरविण्यात येतात, एक शिबीर तर थेट अण्णा हजारे यांच्या अंगणातच नाईक व महाजन यांनी जेव्हा भरविले, उगाच नाही एरवी नेत्यांच्या बाबतीत अति काटेकोर सावध बोलणारे अण्णा हजारे या चमूच्या प्रेमात पडून जाहीर कौतुक करून मोकळे झाले. ते या महाआरोग्य शिबिराचे व महाजन टीमचे तेव्हापासून फॅनक्लब मेम्बर झाले 
आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांना आपल्या या मित्राला अगदी उघड सहकार्य करतांना, कशाचंही चिंता नसते, संशय येत नाही कारण सारेकाही राज्याच्या भल्यासाठी गिरीश महाजन करताहेत, त्यांचे हे कार्य जातीने बघायला हवे, आपण देखील त्यात सामील व्हायलाच हवे...

टीका करणे आम्हा पत्रकारांचे ते कर्तव्य आहे पण जेव्हा सामान्य जनतेविषयी राज्यात काही चांगले घडते तेव्हा त्यांच्यापर्यंत हे सारे पोहोचायलाच हवे. रामेश्वर मला म्हणाले, जेव्हा आपली मोठी कमाई, प्रॅक्टिस बाजूला ठेऊन प्रसंगी स्वतःच्या खर्चाने हेलिकॉप्टर घेऊनही जेव्हा राज्यातले मुंबईतले डॉ. पंड्यासारखे नामवंत तद्न्य डॉक्टर्स आमच्या या उपक्रमाला वाहून घेतात, डोळ्यात आनंदाश्रू तरळतात, माझे नशीब आहे कि मी आजारी पडलो, महाजनसाहेबांनी मला त्यातून बाहेर काढले आणि मी व माझे अख्खे मोठे कुटुंब महाजनमय व फडणवीसमय झाले. हेही सांगतो, फडणवीसाहेब हे मोठ्या मनाने विश्वास ठेवून आमच्या पाठीशी ज्यापद्धतीने उभे राहिले, आमचे काम अतिशय सोपे झाले....
क्रमश: हेमंत जोशी

Friday, 16 August 2019

विकृतांची मदत : पत्रकार हेमंत जोशी

OFF THE RECORD on just one headline...

1. Mumbai Commissioner of Police to change-Times of India.
I don't know from where does The Times of India gets this info, and how any news makes it to the front page? Yes, it is true that Sanjay Barve current CP is set to retire this month but as written by me time & again, CM till the last minute does not give information including to the ACS Home what he has in his mind. And yes, second clarification, the North Indian/Kayast/DG/ACS Home lobby's candidate is Rashmi Shukla. The candidate was never Parambir Singh. Parambir should be happy with what he has got..But I'm sure Barve is too strong to fight against all these odds and CM might  grant him extension for sure; not only him but also to CS Ajoy Mehta too. CM will not disturb current set up till elections are over. Rest, everyone is a smart reader. Don't believe in everything that appears in papers folks! Below in marathi, my father has written on how people are making a mockery of giving donations towards CM's relief fund, clicking a selfie with CM and making a living out of this! Read on...विकृतांची मदत : पत्रकार हेमंत जोशी 

मराठवाडा सोडून कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी म्हणजे एखाद्याला चार मुली, चार पैकी तिघींचे नवरे थेट साहेब मिळाले पण चौथीला चपराशी नवरा मिळाल्यासारखे, हे घडले आहे. जेथे जेथे विशेषतः अतिवृष्टीने अनेक असंख्य कुटुंब उध्वस्त झाली, तेथे लोकांनी नेत्यांनी सरकारने मदतीचा ओघ सुरु केला सुरु ठेवला आहे, पण आपले नेमके चुकते, आपण एखाद्याला केलेल्या मदतीचे या कानाचे त्या कानाला कळू न द्यायला हवे पण ते फार मोजक्या लोकांकडून घडते, केलेली मदत दिलेले सहकार्य याचे जाहीर भांडवल करण्याची अत्यंत वाईट सवय बहुतेकांमध्ये आहे. एकदा या विषयावरच मी दिवंगत भय्यू महाराजांना सुनावले होते, उठसुठ कसले हो किरकोळ मदतीचे फोटो टाकून भांडवल करून मोकळे होता तुम्ही ? जाऊ द्या गेलेत ते वर आणि तो अनिरुद्ध किंवा नाणिजचा नरेंद्र देखील बिळात लपून बसून असले उद्योग करताहेत, भामटे बुवा कुठले....

नेते, दान करणारे विविध फोटो वृत्तपत्रातून छापून आणताहेत. सोशल मीडियावर तर दरक्षणी हे मदत देणारे, फार मोठा दानधर्म केला, या अविर्भावात फोटो सेल्फी काढून मोकळे होताहेत, शोभते का हो या अशा निर्लज्जांन्ना? उद्या समजा तुमची देखणी मुलगी, पत्नी, बहीण पूरग्रस्त म्हणून एखाद्या स्त्रीलंपट करप्ट बदनाम नेत्याकडून मदत स्वीकारते आहे, असा फोटो जर छापून आला कींवा सोशल मीडियावर टाकण्यात आला तर कसे हो वाटेल त्यावेळी तुम्हाला? समजा..तुम्ही पूरग्रस्त आहात, आणि तुम्हाला सुरक्षित ठिकाणी हलवले आहे, लोकांनी तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातल्या मस्त मस्त दिसणाऱ्या बायकांना, पोरीबाळींना मदत म्हणून अन्न, वस्त्र दिले किंवा अन्य काही दिले आणि ते देतांनाचे फोटो काढून सोशल मीडियावर फिरवले, चालेल का, आवडेल का निर्लज्जांनो तुम्हाला ? जरा पुरात सापडलेल्या किंवा दुष्काळात होरपळलेल्या गावकऱ्यांचा कालपरवा पर्यंतचा इतिहास आठवा, त्यांच्या भूतकाळात शिरून बघा, अतिवृष्टीने घायाळ झालेला पश्चिम महाराष्ट्र असो कि दुष्काळाने होरपळलेला मराठवाडा असेल, अतिशय स्वाभिमानी किंवा त्यातले बहुसंख्य सुखवस्तू घरातले आहेत, होते, नैसर्गिक आपत्ती ओढवल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलेले आहे, त्यांना मदत करताहात त्याचे फोटो काढून कसले हो भांडवल करता आहेत तुम्ही थर्ड ग्रेड मंडळी ? देवाने तुमच्यावर देखील अशी आपत्ती आणायला हवी, मग कळेल, खाली मान घालून मदत स्वीकारणे मनाला कसे बोचत असते...
www.vikrantjoshi.com
ओढवलेल्या अचानक, उद्भवलेल्या अस्मानी संकटांमुळे हे स्वाभिमान शेतकरी गावकरी शहरवासी आपल्यावर पहिल्यांदा निर्भर झालेले आहेत, केलेल्या तुटपुंज्या मदतीचे सहकार्याचे विकृत मनोवृत्तीतून असे भांडवल करणे योग्य नाही, विविध पक्षाच्या बेशरम पुढाऱ्यांची तर आपापसात फोटो काढण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. केली मदत कि काढला फोटो नि टाकला सोशल मीडियावर. असंख्य नेत्यांना सोशल मीडियावर फोटोतून मिरवून आणण्याचे जणू घाणेरडे व्यसनच जडलेले आहे. काही ठिकाणी तर सरकारी निम सरकारी अधिकारी कर्मचारी देखील केलेल्या मदतीचे फोटो टाकण्यात आघाडीवर दिसले. कृपया आपल्या या स्वाभिमानी खानदानी भावंडांना अचानक उद्भवलेल्या अस्मानी गहिऱ्या परिस्थितीने झुकवले असले तरी तात्पुरते हतबल झालेल्या या जनतेला सोशल मीडियावरून फिरवून त्यांची क्रूर थट्टा करू नका, आयुष्यात एखाद्याला केलेल्या मदतीचे कृपया भांडवल करू नका. मदत करायची असेल तर मोठे मन ठेवून करा, कोत्या मानाने असे हलकट वागून आपल्याच बंधू भगिनींना खाली मान घालून मदत स्वीकारतानाचे फोटो प्लिज व्हायरल करू नका, ते अपमानित होतील असे वागू नका...

अत्यंत महत्वाचे म्हणजे घरातली अडगळ काढण्याची हि सुवर्णसंधी नव्हे म्हणजे जुने पुराणे काहीतरी नको असलेले दान करायचे, ग्रहणाच्या दिवशी दारावर येऊन ओरडून मागणाऱ्यांना देण्यासारखे हे असले विकृत मनोवृत्तीतून दान करून मोकळे होऊ नका. कमी द्या पण दर्जेदार द्या, विशेष म्हणजे जे प्रामाणिक सेवक आहेत त्यांच्या हाती, योग्य हाती वस्तू पैसे सोपवा अन्यथा गणपती उत्सवा दरम्यान वर्गण्या जमा करून मंडपाच्या मागे त्याच वर्गण्यांतून ऐश करणाऱ्या लोकांच्या हाती तुम्ही काहीही सोपवू नका, सावध राहा, उघडा डोळे करा सढळहस्ते 
मदत व सहकार्य...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Wednesday, 14 August 2019

महाजन महाविषेशांक ३ : पत्रकार हेमंत जोशीमहाजन महाविषेशांक ३ : पत्रकार हेमंत जोशी 
अतिवृष्टीच्या महातडाख्यात उभा महाराष्ट्र बुडलेला बुडालेला असतांना त्यातही बदनामीचे राजकारण करणाऱ्यांची किंवा येते. विकृत मनोवृत्तीची माणसे जशी मरणाच्या सरणावर पहुडलेल्या तरुणीकडेही धुंद कामांध वृत्तीने बघतात, हि अशी काहीशी नीच वृत्ती अलीकडे पुराचे राजकारण करणाऱ्यांची आहे असे येथे ठासून सांगावेसे वाटते. पूरग्रस्तांसाठी बारामतीच्या रहिवाश्यांनी शरद पवार यांच्या आवाहनाला तडफेने प्रतिसाद देऊन त्यांच्याकडे मदतीसाठी क्षणार्धात, विचार न करता एक कोटी रुपये जमा करून दिले अर्थात त्यातले ५० लाख हे पवारांच्या अधिपत्याखाली असलेल्या कुठल्याशा ट्रस्टने दिले. पैसे कसे जमा केले ते कौतुक करायचे सोडून, केवळ पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांचा सतत विचार आणि विकास करणाऱ्या शरद पवारांना याआधी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा विदर्भ मराठवाडा कधी दिसला नाही का, कायम सवतीची वागणूक विदर्भाला देणारे शरद पवार बघा कसे उघडे पडले, हि अशी त्यांच्यावर टीका सतत होते आहे. भलेहि तुम्ही म्हणता ते शंभर टक्के सत्य आहे कि शरद पवारांनी सत्ता हाती असूनही विदर्भ मराठवाड्याचे कधीही भले केले नाही पण हि ती वेळ नाही त्यांचे कान टोचण्याची, त्यांना यापद्धतीने बदनाम करण्याची कारण असे बदनाम होणे नशिबी येत असेल तर का म्हणून धावून जायचे हे मग ते संभाजी भिडे गुरुजी असोत, किंवा शरद पवार, गिरीश महाजन असोत, पुरग्रस्तांच्या मदतीला धावून जात असलेल्या नेत्यांच्या मनात हे असे येणे स्वाभाविक ठरू शकते त्यामुळे होईल काय तर आपत्तीग्रस्तांना बाहेर काढण्याचा वेग नक्की मंदावेल, हे असे अजिबात अजिबात घडू नये...

विशेषतः मीडियातल्या किंवा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या विकृत आणि रिकामटेकड्या नालायकांनी हे अमुक एखाद्याला मुद्दाम टार्गेट करून बदनाम करण्याचे, खाली खेचण्याचे या गंभीर पाईस्थितीत हे पाप करू नये. बघा, खासदार आणि अभिनेता अमोल कोल्हे महागडा गॉगल घालून पूरग्रस्त भागात केवळ दिखावा म्हणून फिरतो आहे, कृपया यापद्धतीने कोणीही लिहू नये. अमोल कोल्हे यांनी नागडे उघडे फिरावे असे या विकृतांना वाटते आहे कि काय? आमच्या टेरेटरीमध्ये घुसता काय केवळ या जेलसीतून त्या मंत्री गिरीश महाजनांना पश्चिम महाराष्ट्रातले काही विकृत विरोधक या अस्मानी संकटात देखील बदनाम करताहेत, मला मिळालेली माहिती अशी आहे, विकृत कुठले. आज आधी पूर व अतिवृष्टीच्या आपत्तीमध्ये बरबाद झालेल्यांना कोण कुठला कुठल्या जातीचा पार्टीचा न बघता मानवतेच्या नजरेतून बाहेर काढायचे आहे,बकऱ्यांच्या कुर्बानीचा खर्च वाचवून अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्यांना आर्थिक सहकार्य व विविध मदत करणाऱ्या त्या आदर्श मुसलमानांसारखे वागायला हवे. आणि त्यातली परफेक्ट कॅप्टनशिप करणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासारख्यांचे मनोबल कसे उंचावले जाईल, त्याकडे मग तो प्रसन्न जोशी असो अथवा संजय आवटे, साऱ्यांनीच त्याकडे मन केंद्रित करायला हवे...

www.vikrantjoshi.com 

आजपासून थेट पन्नास वर्षांपूर्वी जळगावचेच मधुकरराव उर्फ बाळासाहेब चौधरी शिक्षणमंत्री झाले आणि त्यांनी त्याकाळी आपले राजकीय स्पर्धक असलेल्या मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना विश्वासात घेऊन त्याकाळी काहीशा पुरातन ठरलेल्या शिक्षणाचा संपूर्ण पॅटर्न ढाचा बदलवून टाकला, शिक्षणात फार मोठे बदल घडवून आणले, क्रांती घडवून आणली, टेन प्लस टू हा नवाकोरा पॅटर्न आणला. कर्मधर्मसंयोगाने त्याच जळगाव जिल्ह्यातले गिरीश महाजन वैद्यकीय क्षेत्रात थेट आमदार असल्यापासून म्हणजे २००४ पासून जी क्रांती करताहेत हे बघूनच दूरदृष्टी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खाते मुद्दाम सोपविले, या संधींचे महाजन यांनी केलेले सोने, त्यावर अख्खी कादंबरी एखाद्याने लिहून काढावी, त्यावर सिनेमा काढावा. विशेष म्हणजे महाजन सत्तेत असतील किंवा नसतीलही पण त्यांचे हे मिशन त्या अण्णा हजारे यांच्यासारखे सतत सुरु 
आहे म्हणून आर आर पाटलानंतर मंत्री म्हणून गिरीश महाजन हे अण्णा हजारे यांचे दुसरे लाडके ठरलेले मंत्री आहेत...

गिरीश महाजन घेत असलेल्या महाआरोग्य शिबिराला जिल्ह्याजिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एवढी प्रचंड मागणी आहे कि जेव्हा मी महाजनांनवर लिहितोय, मराठवाड्यातल्या एका मंत्र्याने ते वाचले, मला निरोप आला, महाजन यांना सांगून आमचे तेवढे ते महाआरोग्य शिबिराचे काम करवून द्यावे, मला आवर्जून, आग्रहाने सांगितले. महाआरोग्य शिबीर हे आता केवळ शिबीर राहिलेले नसून ते ' महाजन मिशन ' नावाने आता या राज्यात नावारूपाला आले आहे, अत्यंत महत्वाचे म्हणजे २००४ दरम्यान रामेश्वर नाईक नावाचा एक महाजन यांचा अतिशय सामान्य कार्यकर्ता गंभीर आजाराने ग्रस्त होता, महाजन यांनी त्याला त्यावेळी त्या गंभीर आजारात मुंबईत स्वखर्चाने आणून वाचवल्यानंतर त्याने आपले शिक्षण सोडले आणि या रामेश्वर याने महाजन मिशन हाती घेऊन अतीव कष्टातून जे काम महाजन यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य क्षेत्रात उभे केले, ते पुढे वाचून तुम्ही म्हणाल हे असे रामेश्वर नव्हे साक्षात परमेश्वर प्रत्येक ठिकाणी जन्माला यावेत, प्रत्येक मंत्री कार्यालयात कार्यरत असावेत...
क्रमश: हेमंत जोशी

Sunday, 11 August 2019

महाजन महाविषेशांक २ : पत्रकार हेमंत जोशी


महाजन महाविषेशांक २ : पत्रकार हेमंत जोशी 
आपण मंत्री आहोत म्हणजे असामान्य आहोत हे मानायला गिरीश महाजन आजही पाच वर्षांनंतरही तयार नाहीत, त्यामुळे सामान्यांबरोबर त्यांची धमाल मस्ती सतत सुरु असते. सार्वजनिक समारंभ किंवा अमुक एखादी निवडणूक जिंकल्यानंतर व्यक्त करायचा आनंद, त्यांचे ढोल ताशावर मग खुलेआम सामान्य जनतेबरोबर ठेका घेत नाचणे नृत्य करणे सुरु होते, काही हलकट जेव्हा महाजनांचा ' नाच्या ' असा उल्लेख करतात तेव्हा महाजन नव्हे तर त्यांच्यावर टीका करणारे सामान्यांच्या मनातून कायम स्वरूपी उतरतात. आपण वेगळे आहोत हेच तर दाखवण्याच्या नादात काही मूतरे नेते सर्वसामान्यांच्या मनातून हृदयातून डोक्यातून कायमचे उतरले आहेत. महाआरोग्य शिबिराचे जनक गिरीश महाजन इतरांपेक्षा वेगळे कसे जेव्हा मी सपुरावा सिद्ध करेल, जो तो त्यांना १००% डोक्यावर घेऊन नाचेल, जयहो म्हणेल....

एक किस्सा येथे राष्ट्रवादीच्या जामनेर तालुक्यातल्या नेत्यांविषयी आवर्जून सांगतो. एकदा झाले काय, रात्रीचा एक वाजून गेला होता. ऐन मध्यरात्री जळगाव ते जामनेर या रस्त्यावर एका कारमधून ड्रायव्हर आणि एक महत्वाची व्यक्ती असे दोघेच प्रवास करीत होते. जामनेर पासून पुढे पंधरा किलोमीटर पुढे आल्यानंतर रस्त्यावर एक मोटार सायकल रस्त्याच्या कडेला पडलेली त्या व्यक्तीला दिसली, बाजूला कोणीतरी पुरुष अपघातग्रस्त अवस्थेत पडलेला होता. मध्यरात्रीची वेळ, एकांत, त्यात जोराचा पाऊस त्यामुळे आजूबाजूला कोणीही नव्हते अशावेळी गाडीतल्या त्या व्यक्तीने ड्रॉयव्हरला कार थांबवायला सांगितली. गाडीच्या खाली उतरून त्याने आजूबाजूचा अंदाज घेतला. मनामध्ये शंका आली कि रॉबरी करण्याचा तर प्रकार नाही, म्हणून आपल्या कमरेची रिव्हॉल्व्हर काढत हवेत दोन फायर केले, खात्री पटली कि अपघात आहे लगेच त्याकडे धाव घेतली. अपघात झालेल्या माणसाला उचलून पहिले, चेहरा ओळखीचा वाटला. पण संपूर्ण चेहरा रक्ताने माखला असल्याने नेमके कोण असावे, लक्षात येत मव्हते. मागला पुढला विचार न करता त्या माणसाला उचलून आपल्या कारमध्ये घेतले, पुन्हा 
मागे फिरले, जळगाव गाठले, जिल्हा रुग्णालयात स्वतः दाखल केले, रक्त दिले, रात्र इस्पितळातच जागून काढली, सकाळी सहा वाजता तो गावकरी शुद्धीवर आला, त्याचा जीव वाचला. पुढे त्याच्या घरातले वाचवणाऱ्याला थेट परमेश्वर म्हणाले. वाचवणारे अर्थात राज्याचे जलसंपदा मंत्री, जामनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार गिरीश महाजन होते, ज्यांच्या सेल्फीबद्दल अलीकडे वाट्टेल ते बोलल्या जाते. आणि ज्यांना वाचवले ते जामनेर तालुक्यातले राष्ट्रवादी पक्षाचे नेते होते....

माझ्या आयुष्यातले आता याठिकाणी सर्वाधिक महत्वाचे वाक्य लिहितो आहे. ज्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्याला गिरीश महाजनांनी त्या काळरात्री झालेल्या भीषण अपघातातून वाचविले, मित्रहो, आजही त्या नेत्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याक्षणापासून थेट देवघरात श्री गिरीश महाजन यांचा फोटो परमेश्वराशेजारी लावला आहे, तेथे त्यांना स्थान दिले आहे...घरातले, कुटुंबातले जरी कोणी आजारी असले तरी मान वाळवून बाहेर पडणारे, रोग्याला टाळणारे घरोघरी आहेत पण महाजन असे कि रंजले गांजले आणि आजारी कोणी दिसले कि ते मनातून मनापासून अस्वस्थ होतात आणि पदरचे सारे सोडून समोरच्याला आजारातून मुक्त करण्यासाठी मिशन राबवतात, महाजन आणि त्यांचे काही साथीदार अक्षरश: एखाद्या मिश्नर्यांसारखे जगतात म्हणून जो तो त्यांना डोक्यावर घेऊन मोकळा होतो. निवडणूक मग ती कोणतीही असो, ज्यात गिरीश महाजन यांचा सहभाग असतो तेथे पक्ष वगैरे सारे काही गौण असते महत्वाचे ठरते ते फक्त आणि फक्त गिरीश महाजन यांचे नेतृत्व. मतदार फक्त आपला लाडका नेता अशी मनाशी खूणगाठ बांधून मग घरचे खाऊन महाजन सांगतील तसे करतात म्हणून महाजनांचे सारे उमेदवार निवडून येतात निवडून आणले जातात. जेव्हा केव्हा काही बिकट कठीण राजकीय प्रसंग थेट फडणवीसांवर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मागल्या साडेचार पाच वर्षात ओढवले त्यांना त्या त्या वेळी हमखास ज्या काही मित्रांची सहकाऱ्यांची सवंगड्यांची प्रकर्षाने आठवण आली, झाली त्यात सर्वाधिक आघाडीवर होते जलसंपदा मंत्री, मुख्यमंत्र्यांचे म्हणाल तर विश्वासू सहकारी म्हणाल तर मित्र श्री गिरीश महाजन....

तुम्ही वाचकहो, मी सांगतो त्यावर विश्वास ठेवा. फार कमी वेळा असे घडते जेव्हा मनात स्वार्थ, राजकारण, हेतू, फायदे, आर्थिक मिळकत, भीती, दबाव इत्यादी बाबींचा विचार न करता विरोधकांना सत्ताधाऱ्यांकडून सहकार्य केले जाते. आघाडीच्या काळातले मंत्री आणि फार कमी असे मुख्यमंत्री होते जे विरोधकांना देखील विविध कामांच्या बाबतीत सहकार्य करायचे, त्यांनी आणलेल्या विकासाच्या किंवा वैयक्तिक खाजगी कामांना देखील प्राधान्य देऊन मोकळे व्हायचे. बहुतेक मंत्री मनात खुन्नस ठेवून जगायचे, आता त्यातलेच माजी मंत्री ज्या लाचारीने जगतांना बघतो, मनातल्या मनात हेच म्हणतो, सारे येथेच भोगायचे असते, मला आणि तुम्हालाही. युतीचे एक चांगले आहे, त्यांच्या मनात सत्तेतले आणि विरोधातले,असे काहीही नसते, तो बेरकी हलकट हेकट स्वभाव त्यांच्या ठायी अजिबात नाही कारण त्यांचे मुख्यमंत्रीच, फडणवीस असे वागत नाहीत...

सर्व श्री चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख, संजय कुटे, स्वतः देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार इत्यादी कितीतरी हे सत्तेतले, युतीतले, समोरचा कोण कोणत्या जातीचा पार्टीचा गटाचा इत्यादी अजिबात न बघता आलेल्यांना सहकार्य करून मोकळे होतात, गिरीश महाजन यांची अख्ख्या खान्देशात म्हणजे नाशिक,धुळे, जळगाव जिल्ह्यात किंवा उभ्या राज्यात जी राजकीय हुकमत लोकप्रियता वाढलेली दिसते त्याचे हेच प्रमुख कारण आहे त्यामुळे जेव्हा केव्हा मीडियातले काही, न घडलेल्या महाजनांच्या चुकीला वाढवून सांगतात, राग येतो आणि वाईटही वाटते. लोकप्रियतेच्या बाबतीत सहकारी मंत्र्यांना पुढे जातांना बघून पोटात न दुखणारे, कालवाकालव होऊ न देणारे आपले हे मुख्यमंत्री, हेही लक्षात घ्यायलाच हवे, त्यांचेही कौतुक वाटते...
क्रमश: हेमंत जोशी.

महाजन महाविषेशांक : पत्रकार हेमंत जोशी


महाजन महाविषेशांक : पत्रकार हेमंत जोशी 

सध्या मी परदेशात आहे पण गिरीश महाजन यांच्याविषयी त्यांच्या सेल्फीवरून जे काय राजकारण सुरु आहे ते वाचण्यात आले राहवले नाही, मनात म्हटले, हीच ती वेळ गिरीश महाजन कोण व नेमके कसे लोकांना सांगायची नेमकी वेळ येऊन ठेपलेली आहे, वास्तविक संपूर्ण अंक मी एकाच व्यक्तीवर काढला असे फारसे कधी घडले नाही घडत नाही मात्र या मंत्र्यावर म्हणजे गिरीश महाजनांवर केवळ चार दोन लेख लिहून नक्की भागणार नाही, यादिवसात तर नाही हा नाही म्हणून अख्खा अंक त्यांच्यावर लिहायला घेतला आहे, गिरीश महाजन त्यात आत बाहेर कसे वाचकांना त्यांच्या मतदारांना राज्यातल्या जनतेला इतर नेत्यांना नेमके माहित व्हायलाच हवे म्हणून अख्खा अंक त्यांच्यावर काढण्याचा येथे मुद्दाम आगाऊपणा करतो आहे, महाजन वाचा इतरांनाही ते कसे नक्की सांगा...
१९८० मध्ये जळगावचे सुरेशदादा जैन पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले, त्यादरम्यान मुख्यमंत्री असलेल्या बॅरिस्टर अंतुले यांचे उजवे हात म्हणून येथे या राज्यात ओळखल्या जाऊ लागले त्याकाळी आमदार झाल्या झाल्या एवढे मोठे वलय तेही आमदाराभोवताली कधीही निर्माण होत नसे पण सुरेशदादांनी त्यांच्या अति धाडसी व उत्साही स्वभावातून ते प्रसिद्धीचे वलय सहज पटकन स्वभोवताली निर्माण केले, विशेष म्हणजे सुरेशदादा आमदार झाले व मी त्यांचा काही महिन्यात पीए म्हणून रुजू झालो त्यामुळे कोवळ्या वयात मला राज्याचे अंतर्गत राजकारण खूप जवळून बघायला मिळाले ज्याचा मोठा फायदा राजकीय पत्रकारितेत पडल्याने मला झाला....

याच ८० च्या दशकात अगदी सुरुवातीलाच माझी जामनेरच्या गिरीश महाजनांशी त्यांचे नेते एकनाथ खडसे यांनी एक दिवस करून दिली. महाजनांशी ओळख झाली नंतर बऱ्यापैकी मैत्री झाली ती आजतागायत टिकून आहे कारण आमदार किंवा मंत्री झाल्यानंतर जुने मित्र विसरण्याची बहुतेक नेत्यांची जी खोड असते ती तशी वाईट खोड गिरीश महाजन यांना नसल्याने हि मैत्री टिकलेली आहे पण मैत्री आहे म्हणजे पत्रकार असूनही समोरच्या नेत्याचे वाट्टेल तसे वागणे खपवून घ्यायचे हे माझ्या स्वभावात नसल्याने म्हणजे प्रसंगी घरातले जरी चुकले तरी ते चव्हाट्यावर आणणे माझ्या वृत्तीत असल्याने महाजन एक मित्र म्हणून आणि मंत्री म्हणून वाट्टेल तसे वागले असते वागत असतील तरी मी ते खपवून घ्यायचे शक्य नाही म्हणून हीच ती वेळ जेव्हा गिरीश महाजन नेमके कसे राज्यातल्या जनतेला आत भावर सत्य सांगणे गरजेचे वाटले...

www.vikrantjoshi.com

गिरीश महाजन भारतीय जनता पक्षात नेते म्हणून सक्रिय झाले जळगाव जिल्ह्यात ओळखल्या जाऊ लागले तेव्हा प्रतिभाताई पाटील, ईश्वरबाबू जैन, सुरेशदादा जैन, एकनाथ खडसे, जे. टी. महाजन आणि बाळासाहेब उर्फ मधुकरराव चौधरी या बड्या नेत्यांच्या पुढे एक दिवस निघून जातील त्याकाळी एखाद्याने हे असे भविष्य सांगितले असते तर लोकांनी त्यासी वेड्यात काढले असते. पण ते आज घडले आहे, असे कसे घडले तेही समजावून घ्यायलाच हवे आणि महाजन आतबाहेर कसे हेही मी येथे या विशेषांकातून सांगायलाच हवे, विशेषतः प्रसन्न जोशी, संजय आवटे मीडियातल्या या दोघांनी जे महाजन रेखाटले आहेत दाखवले आहेत ते तसेच आहेत कि त्यापेक्षा अधिक महाभयानक आहेत तुम्हाला सांगणे अत्यावश्यक वाटते आहे कारण महाजन त्यांच्या गुणदोषांसहित जेवढे मला माहित आहेत तेवढे हुबेहूब कदाचित त्यांच्या सौभाग्यवतीला देखील नक्की ठाऊक नसावेत, नसतील, अब आयोगा मजा...

नेता तोही जात पैसे बखोटीला नसतांना जेव्हा आजचे हे यश मिळवितो अशा नेत्यांच्या नशिबी संकटे आपत्ती चिंता पाचवीला पुजलेले असतात. येथे या राज्यात या देशात पुढे जाणे स्पर्धा असल्याने मोठे कठीण असते पण गिरीश महाजन यांनी यश आपला चेहरा सदैव हसतमुख ठेवूनच मिळविलेले आहे त्यामुळे अमुक एकाने त्यांचा जेव्हा बोटीवर फोटो घेतला किंवा सेल्फी काढल्या गेला असेल तेव्हा रडवलेल्या चेहऱ्याचे महाजन त्या फोटोमध्ये दिसणे नक्की अशक्य होते, एवढेच काय, बोलू नये ते बोलतो, तो फोटो काढतांना समजा तो गिरीश महाजन यांच्या आयुष्यातला अखेरचा फोटो आहे हे त्यांना स्वतःला जरी त्याठिकाणी माहित पडले असते तरी ते त्या फोटोमध्ये ते हसतांना म्हणजे हसतमुख चेहर्यानेच दिसले असते कारण संकट मग ते कितीही गहिरे असले तरी हसतमुख चेहर्यानेच ते पार करायचे, महाजन यांचा तो स्वभाव त्यामुळे मीडियाने जे त्यांच्या त्या सेल्फीचे कि काढलेल्या फोटोचे भांडवल केले ते कसे चुकीचे, पुढे त्यावर नक्की वाचावे...
क्रमश: हेमंत जोशी.


पत्रकार हेमंत जोशी 

Friday, 9 August 2019

पाकिस्थानी वृत्ती आणि आम्ही हिंदू : पत्रकार हेमंत जोशी


पाकिस्थानी वृत्ती आणि आम्ही हिंदू : पत्रकार हेमंत जोशी 
घोळका मग तो पुरुषांचा असो कि स्त्रियांचा, तरुणांचा असो कि तरुणींचा आम्ही भारतीय, हिंदुस्थानी कायम वर्षानुवर्शे सेक्स सिनेमा व राजकारण केवळ तीनच विषयांवर भेटलो कि बोलतो, चर्चा करतो, स्वतःची जमेल तशी अक्कल पाजळतो. कामजीवनावर भारतीय पुरुष बढाया मारता मारता बोलतात पण हेच पुरुष पेटलेल्या स्त्रीसमोर क्षणार्धात धारातीर्थ पडून पाठ करून घोरायलाही लागतात, त्यांच्या सेक्स वर बढायायुक्त गप्पा थापा तेवढ्या ऐकण्यासारख्या नक्की असतात. असो, या तीन विषयांव्यतिरिक्त बोलण्याचे इतरही विषय ठरू असू शकतात जणू हे भारतीयांना ठाऊकच नाही जे देशाच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही. सांगितले ना सेक्स वर तर आम्ही भारतीय पुरुष असे बोलतो कि डॉ. राजन भोसले यांनी देखील तोंडात बोटे घालावीत किंवा सनी लिओनी दाम्पत्याने देखील आमचे कामजीवनावर बोलणे कान देऊन ऐकावे...

महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणावर आपले अर्धवट ऐकीव माहितीवर आधारित ज्ञान प्रसंगी शरद पवार यांना देखील चकित करून सोडते, मोठ्या नेत्यांनी नतमस्तक व्हावे, नेत्यांना तोंडाचा मोठ्ठा आ वासायला भाग पडणारे आम्हा मराठींचे राजकारणातले अति अर्धवट ज्ञान असते. आणि सिनेमा विषयावर तर वाट्टेल ते, ज्याला जसे समजेल, जसे जमेल तसे बोलत सुटतो. ज्यांना सेक्स सिनेमा व राजकारणातले नेमके, तंतोतंत कळत असते ते या अशा अर्धवटरावांचे बोलणे ऐकून वैतागत असतात. मला हे असे सकाळी फिरायला जातो तेव्हा हमखास भेटतात, त्यांना बघूनच, मी त्यांच्यापासून दूर पळून जातो किंवा त्यांना टाळून पुढे जातो. राज्याच्या राजकारणावर नेमकी माहिती हवी असेल तर त्यावर लिहिणारे अभिजित मुळ्ये योगेश नाईक यदु जोशी अभय देशपांडे भाऊ तोरसेकर योगेश त्रिवेदी विवेक भावसार मधुकर भावे साथी उदय तानपाठक उदय निरगुडकर किरण शेलार इत्यादींना जमले तर नक्की भेटावे, नेमके राजकारण त्यातून कळते...

आमची मानसिकता विशेषतः देशभक्तीच्या बाबतीत अति कमकुवत आहे म्हणजे अख्खे जग आम्हाला ' हिंदुस्थानी' म्हणते, आपण गांडू विचार डोक्यात घेऊन आपल्या तोंडात मात्र ' भारतीय ' असे येत राहते. मोगल व इंग्रज आमच्या बोकांडीवर वर्षानुवर्षे बसल्याने,मला वाटते आपली वृत्ती गुलामगिरीची अधिक झाली आहे, बघा, अनेकदा आपल्या तोंडून हेच निघते कि आपल्यापेक्षा इंग्रज चांगले होते. कधी बदलणार आपली मानसिकता कि आम्ही भारतीय आहोत पेक्षा आम्ही हिंदुस्थानी आहोत म्हणण्याची. शेजारचे आपले कट्टर दुश्मन ते पाकिस्थानी देखील आमचा उल्लेख कायम ' हिंदुस्थानी ' असाच करतात पण आम्हाला मात्र हिंदुस्थानी आहोत हिंदू आहोत असे सांगण्याची म्हणण्याची लाज वाटत असते किंवा भीती अधिक वाटत राहते....

मित्रहो, पत्रकार हा गाव न्हाव्यासारखा असतो म्हणजे लिखाण करतांना आमचे विचार कोणत्या पक्षाचे, हे बाजूला ठेवून वास्तविक आम्ही बॅलन्स लिखाण करायचे असते किंवा अमुक एखादी भूमिका घेऊन लिहायचे असेल तर तेही स्पष्ट सांगायचे असते जसे मी नेहमी लिहितो कि मी कट्टर हिंदुत्ववादी आहे पण मीडिया मध्ये हे फार कमी वेळा बघायला मिळते म्हणजे प्रताप आसबे यांना शरद पवार किंवा राष्ट्रवादीची तळी उचलायची असली तरी ते तसे भासवत नाहीत, लपवून ठेवतात, बहुतेक मीडियातल्या मंडळींचा चेहरा आणि मुखवटा वेगळा असतो. आसबे हे अगदी सहज उदाहरण दिले, आता खरे तर ते पत्रकारितेतून बाद झालेले आहेत. गावातल्या न्हाव्याला जसे सारे ग्राहक सारखेच तसे आम्हा पत्रकारांचे असायलाच हवे. वाचक मित्रहो, पहिल्यांदा, या पाच सात वर्षात या देशात या राज्यात पुन्हा एकदा इतर अनेक देशांसारखे देशभक्तीचे मिळालेल्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वारे वाहायला लागले आहे या भाजपा किंवा संघामुळे, फडणवीस मोदी शाह यासारख्या पोलादी नेत्यांमुळे आम्ही ' हिंदुस्थानी ' आहोत हे सांगतांना आता इतरांसारखी आमचीही छाती फुलून यायला लागलेली आहे त्यावर उत्तर हेच आहे कि त्या ' नायक ' या सिनेमातल्या नायकासारखे मुख्यमंत्री झालेल्या अनिल कपूरसारखे नेते सत्तेत आल्याने या देशात केवळ त्या सिनेमात नव्हे तर प्रत्यक्षात आमचे साऱ्यांचे स्वप्न उतरू लागल्याने म्हणजे गांडू मानसिकता दूर होऊन तुम्हा आम्हा सर्वांच्या विशेषतः हिंदुस्थानावर मनापासून प्रेम करणाऱ्या परत एकवार देशभक्तीचे वारे घुमायला लागले आहेत, प्लिज कंटिन्यू इट. 

मला आश्चर्य वाटते वाटले, स्वतःला समाजसेवक म्हणून पेश करणारे पुण्याचे विश्व्म्भर चौधरी जे काश्मीर प्रकरण घडल्यानंतर म्हणाले, बरळले कि मोदी शाह यांनी २०२४ ची लोकसभा जिंकून येण्यासाठी हे नाटक केले आहे, असे लिहिले. काय हे चौधरी असे गलिच्छ लिहिणे, मोदी शाह यांना हे नाटक करायचे असते तर ते त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी घडवून आणले असते, उचलली जीभ लावली टाळूला, पद्धतीने लिहू बोलू नये. एका निवृत्त शासकीय अधिकाऱ्याने विश्व्मभर चौधरी यांच्या विषयी म्हटले आहे कि, ' मुळात पुण्यातील हा कथित दीड शहाणा गृहस्थ, सुरुवातीला पर्यावरण तद्न्य म्हणून वावरत होता तोपर्यंत ठीक होते. मग एनजीओ कळपात पुरोगामी समाज सेवकाच्या वेशात वावरू लागला हेही परिवर्तन समजू शकतो. पण हळूहळू म्हणजे बेमालूमपणे राजकीय भाष्यकार म्हणून याला व्यासपीठ कोणी दिले त्या महाभागाचा शोध घ्यावा लागेल. थोडक्यात लोकांची भाबडी श्रद्धा पाहून बिलंदर माकड हनुमानाचा मुखवटा लावून वावरू लागले. ' वयाच्या १७ व्य वर्षांपासून मी देखील राजकीय वर्तुळात कायम वावरत आलोय पण कधीही बघितले नाही कि दुरदुरून चौधरी यांचा राजकारणासाठी काही संबंध होता पण वर सुरुवातीला सांगितले तेच खरे आहे, या देशातले अर्धवटराव राजकारणावर अधिक ज्ञान पाजळून मोकळे होतात...

मिस्टर विश्व्मभर चौधरी, हिंदुस्थानी हिंदुत्व हे नेमके शिकण्यासाठी तुम्हाला घराबाहेर देखील पडण्याची गरज नाही. पुण्यातले विश्वजीत देशपांडे तुमचे जवळचे नातेवाईक आहेत, त्यांची तुमची नेहमी भेट होते, त्यांच्याकडून जरी हिंदुत्व तुम्ही नेमके समजावून घेतले तरी वरून कीर्तन आतून तमाशा पद्धतीचे वर्तन तुमच्या हातून घडणार नाही आणि वरकरणी कीर्तन करतांना तुमची जीभ घसरणार नाही. अहो, आपण ब्राम्हण आहोत, आपल्या तोंडून चुकीचे काहीतरी बाहेर पडणे, इतर लगेच तोंडात शेण घालतात, असे काहीही बोलू नये. मला वाटते आपली वृत्ती अमेरिका इंग्लंड सारखी आहे म्हणजे आपल्या हिंदुस्थानात देखील आपण हिंदू सर्वांना मोठ्या मनाने कायम सांभाळून घेत आलो आहोत फक्त जे इंग्लंड मध्ये घडले किंवा आज घडते आहे, तेथे पाकिस्थानातले देशद्रोही मुसलमान एवढे घुसले आहेत कि मूळ इंग्लंडवासियांचेच अस्तित्व धोक्यात आले आहे, हे आपलीकडे न घडण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजकीय आणि सामाजिक फांद्यांनी फार मोठे काम करून ठेवले आहे अन्यथा या देशात देखील जे पाकविचारांचे मुसलमान आहेत त्यांनी मोठा धुडगूस घालायला सुरुवात केली होती. वास्तविक काश्मीर हा आमचा प्रांत पण मोदी यांच्या निर्णयावर पाकडे केवढे चिडलेले आहेत, त्यांचे थोबाड या देशातल्या मुसलमानांनी वास्तविक उत्तर देऊन बंद करायला हवे, दुर्दैवाने ते घडत नाही, देशातल्या अगदीच थोड्या मुसलमानांना पाक विरोधी भूमिका घ्यायला आवडते...

www.vikrantjoshi.com

मोदी शाह फडणवीस विचारांचे नेते सत्तेत आल्याने या देशातल्या हिंदूंना जी भीती आधी वाटत होती तसे आता यापुढे अजिबात घाबरण्याचे कारण नाही आणि ज्या मुस्लिमांची नाळ या देशाशी जुळलेली आहे त्यांनी अजिबात विचलित होण्याचे कारण नाही कारण हिंदू हाच मुळात सहिष्णू वृत्तीचा असल्याने तो आमच्यात मिसळणाऱ्या मुस्लिमांना कधीही अंतर देणे शक्य नाही. पण आता त्या पाकड्या विचारांचे मात्र यापुढे नक्की काहीही चालणार नाही,याआधी अशी वाईट परिस्थिती होती कि एखाद्या पाकड्या विचारांच्या मुसलमानाने आमची हिंदू मुलगी प्रेमप्रकरणातून थेट बाटवण्यासाठी त्याच्या मुस्लिम वस्तीत नेली कि ती मुलगी ओढून आणण्याची हिम्मत हिंदूंमध्ये तर फार दूर पोलिसांची देखील होत नसे. उभ्या आयुष्यात माझ्या डोळ्यादेखत हे असे दोनवेळा माझ्या मित्रांच्या बाबतीत घडले आहे. त्या मित्रांच्या मुली मुसलमान तरुणांबरोबर पळून गेल्यानंतर आईवडिलांना खूप वर्षांनीं भेटल्या, तोवर बाटलेल्या या मुलींचे आयुष्य मुलं पैदा करून उध्वस्त झालेले होते. निदान या राज्यात लव्ह जिहाद यापुढे घडणार नाही एवढी हिम्मत काँग्रेस विचार बाजू पडल्याने आता आमच्यात आलेली आहे. येथे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, तसा सतत विचार करून जगायला हवे...

मी तर एखाद्या प्रचारकासारखा सार्या हिंदूंना अगदी उघड सांगत असतो कि तरुण झालेली तुमची मुले विशेषतः मुली बाहेर पडल्यानंतर पाक विचारांच्या मुसलमान तरुणांच्या संपर्कात मैत्रीच्या माध्यमातून येत जात असतील तर त्यावर त्वरित कठोर पावले उचलणे गरजेचे असते,अन्यथा काही दिवसानंतर तुमच्या मुली घरातून पळून जाऊन पाक विचारांच्या मुस्लिमांशी लग्न करून मोकळ्या होतील आणि तुमची मुले थेट ड्रग्स च्या आहारी गेलेली असतील. जे मुस्लिम पाक विचारांचे नाहीत ते अतिशय चांगले असतात. असे सुविचारी मुसलमान माझे २५ वर्षे शेजारी होते, त्यांचा मला आणि माझा त्यांना कायम आधार वाटे. काश्मीरची जरब बसल्याने पुन्हा एकवार या देशावर प्रेम करणाऱ्या मुस्लिमांची संख्या नक्की वाढेल जे त्यांच्या आमच्या सार्या हिंदुस्थान्यांच्या दृष्टीने चांगले असेल. येथे या राज्यात आम्हाला यापुढे जागोजाग दिवंगत शाबीर शेख यांच्यासारखे मुस्लिम असणे घडणे आवश्यक वाटते. महत्वाचे म्हणजे येथले मुसलमान तरुण व तरुणी मुख्य प्रवाहात सामील होऊन कसे पुढे जातील त्यावर नेत्यांनी राज्यकर्त्यांनी लक्ष घालणे अत्यावश्यक आहे. देशभक्तीच्या बाबतीत ज्यादिवशी चीन जपानइस्रायल सारखे देश आमच्या देशभक्तीकडे बघून तोंडात बोटे घालतील तो दिवस खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस असेल...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी.