Tuesday, 23 July 2019

घडते आहे ते घडू नये : पत्रकार हेमंत जोशीघडते आहे ते घडू नये : पत्रकार हेमंत जोशी 
अलीकडे तो चुटका राज्यात सर्वदूर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. चुटकाअसा होता, मुलगा बापाला म्हणतो कि माझे काही शिक्षणात लक्ष लागत नाही, तुमचेही तेच होते म्हणजे शिक्षणाच्या नावाने तुम्ही ढ म्हणून राजकारणात पडले नि पुढे शिक्षण नसतांनाही म्हणजे लायकीपेक्षा कितीतरी अधिक पटीने तुम्ही खाल्ले, मिळविले. आता मीही राजकारणात जातो, भाजपा चे काम सुरु करतो,तिकीट मिळवतो, देशाची सेवा करतो आहे दाखवतो पुढे आणखी श्रीमंत होतो. त्यावर बेरकी अनुभवी पलटी बहाद्दर बाप त्याला म्हणतो : येडा कि खुळा तू, अर, आधी काँग्रेस नायतर राष्ट्रवादीत जा, तिथे नाव कमाव, नेता हो मंग बीजेपीवाले पेढे घेऊन तुला बोलावत्याल, तिकीट देत्याल, येड्या, थेट बीजेपी मध्ये जाणे काम करणे म्हणजे आयुष्यभर सतरंजा नाहीतर फक्त नमस्ते सदावत्सले...

अरे माणसाने भाजपा मध्ये प्रसाद लाड म्हणून जायचे असते, मुकुंद कुलकर्णी म्हणून नव्हे. पुढे मुलगा विचारतो, समजा मी शिवसेनेत गेलो तर, मग तर तुला काहीही करायची गरज नाही, तेथे निवडणूक लढवून चार चार वेळा निवडून येऊन वैताग करवून घ्यायचा नाही थेट तानाजी सावंत बनून मातोश्री गाठायची कि रस्ता मोकळा, आधी मंत्री करतील नंतर तू मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेस असेही ते सांगून मोकळे होतील. आदरणीय मुख्यमंत्री आयारामांचे स्वागत कौतुक जरी सध्या करीत सुटलेले असले तरी आयारामांचे, नियमित धंदा घेणाऱ्या मसाज पार्लरमध्ये जाणार्या ग्राहकांसारखे असते म्हणजे अशा ग्राहकांचे प्रेम निष्ठा आत्मीयता असे काहीही अजिबात नसते. आज जुलि चांगली वाटली म्हणून तिच्याकडून मसाज करून घ्यायची उद्या तिच्या शेजारी बसलेली लिंडा चांगली वाटली तर तिला घ्यायचे, हॅप्पी एंडिंग साठी, असे हे आयारामांचे असते....

विशेष म्हणजे भाजपा आणि शिवसेना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हे जेथे सारे संधीसाधू जमा झाले त्यांना शरद पवार हे त्यातले नामचीन म्हणून ओळखले जाणारे नेते म्हणून भेटले आणि केला पक्ष उभा. अशा राजकीय पक्षांना फारसे आयुष्य नसते 
कारण संस्कार देशभक्ती समाजसेवा असे तेथे काहीही नसते, सारेच बेरकी, ज्यांना इतरत्र संधी मिळत नाही, एकत्र येतात आणि राजकीय पार्टी उभी करून मोकळे होतात. असे नेते असे पक्ष ज्या वेगाने पुढे जातात असे पक्ष दुप्पट वेगाने खाली येतात. भाजपा आणि शिवसेना दोघांनाही आजचे मिळालेले राजकीय यश हे त्यांनी शून्यातून उभे केलेले विश्व् आहे. तेथे खरेतर ऐनवेळी आलेल्यांना प्रवेश करू दिला तरी त्यांना नको तेवढे महत्व किंवा पद अजिबात दिल्या जात कामा नये....

राजकारणात जे अनुभवी आहेत ते सेनेतले किंवा भाजपमधले दुर्लक्षित केल्या गेलेले स्वयंसेवक, कार्यकर्ते,नेते, सैनिक अगदी उघड म्हणू लागलेले आहेत कि ज्यांनी आमची आयुष्यभर कातडी सोलली त्या जयदत्त क्षीरसागर यांना मंत्री केले जाते जे काँग्रेसचे झाले नाहीत शरद पवारांचे राहिले नाहीत, सख्ख्या भावांचे झाले नाहीत ते जयदत्त क्षीरसागर सेनेत येणे म्हणजे केवळ सत्तेचे गणित समोर ठेवून आलेले हे नेते आहेत हे अगदी शेम्बड्या पोराला देखील कळते. बीड जिल्ह्यात शिवसेना फारशी प्रभावी नाही म्हणून क्षीरसागर यांना सेनेत घेऊन मंत्री केले असे समजते ज्याला अजिबात अर्थ नाही कारण क्षीरसागर यांच्या भरवशावर तेथे सेना कधीही बांधल्या जाणार नाही आणि ते स्वतः देखील सेना त्यांच्यापेक्षा मोठी होईल असे अजिबात करणार नाहीत कारण जयदत्त क्षीरसागर म्हणजे दिवाकर रावते नाहीत कि ज्यांना सेना आपल्यापेक्षा मोठी व्हावी असे सतत वाटत असते. दिवाकर रावते यांनी मातोश्रीच्या खांद्याला खांदा लावून या राज्यातल्या कानाकोपऱ्यात शिवसेना नेली, उभी केली. थोडक्यात सेना उभी करायला नेता आधी कडवा सैनिक असणे अत्यंत गरजेचे महत्वाचे असते. त्यातून सेना किंवा भाजपा नेत्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे कि जेव्हा केवळ सत्तेच्या लालसेपोटी, काही क्षणिक मिळविण्याच्या नादात बाहेरच्या नको त्या मंडळींना शिवसेना किंवा भाजपामध्ये मोठे स्थान दिले जाते सामान्य धडपडणारे जीवाला जीव देत आलेले नेते व कार्यकर्ते अक्षरश: नैराश्याच्या झटक्याला सामोरे जातात, सेना व भाजपाला जर स्वतःचा शरद पवार करवून घ्यायचा नसेल तर त्यांनी अमुक एखादी सत्ता हाती यायला थोडा उशीर जरी झाला तरी तानाजी सावंत, राधाकृष्ण विखे पाटील पद्धतीचे नेते इतर निष्ठावंतांना डावलून मोठे करायचे नसतात...

सत्ता राजकारण केवळ आपापली घरे भरण्यासाठी हा विचार ठेवून जगणारे हे नेते, देवेंद्र फडणवीस असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्या चाणाक्ष नजरेने टिपलेले असतात मग असे असतांनाही जर युती सत्तेत येण्यापूर्वी जे मजा मारत होते त्यांनाच पुन्हा आजही युतीच्या काळात महत्व दिले गेले असेल, महत्व दिल्या जात असेल. त्यांच्यातल्या दलालांनाच जर जवळ घेतले जात असेल तर युतीचे महत्व देखील घसरायला फार वेळ लागणार नाही. पाटील आडनावाचा मंत्र्यांना अधिकाऱ्यांना बायका पुरवून मोठा झालेला मूळ विदर्भातला एक दलाल जो सध्या स्वतःला बांधकाम व्यावसायिक म्हणवतो जो आघाडीच्या काळात अगदी ऐटीत मंत्र्यांच्या शेजारी बसून कमाईची कामें करवून घ्यायचा तोच दलाल मला अगदी सऱ्हास यावेळी युतीच्या मंत्र्यांकडे देखील ठाण मांडून रुबाबात बसलेला दिसतो. माझे काम सोपे होते, ज्यांच्या ज्यांच्याकडे हा टकल्या पाटील बसलेला दिसतो त्या त्या मंत्र्याला रांडांचा शौक आहे, माझ्या ते लगेच लक्षात येते...

शेवटी एकच सांगतो कि मी म्हणजे दिलीप कुमार नाही कि एखाद्याला अभिनय करायला शिकवावे, माझे आडनाव जाधव नाही कि मंत्रालयात दलाली कशी करावी ते इतरांना शिकवावे, तद्वत मी म्हणजे राजकीय गुरु नाही कि सेना भाजपा या यशस्वी पक्षातल्या टॉपच्या नेत्यांना शिकवावे, कोणाला घ्यावे आणि कोणाला घेऊ नये. पण एक सर्वसामान्य पत्रकार म्हणून अनुभवातून जे चांगले दिसते त्याचे कौतुक तोंडभरून करतो आणि कुठे ते चुकले तर फायदा नुकसानीचा विचार न करता थेट तोंडावरच सांगून मोकळा होतो. विरोधक टपलेले आहेत यापुढे सेना भाजपा नेत्यांना डोळ्यात तेल घालून सारे निर्णय घ्यायचे आहेत...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

No comments:

Post a comment