Tuesday, 30 July 2019

फडणवीसांची युक्ती वाढली शक्ती : पत्रकार हेमंत जोशी


फडणवीसांची युक्ती वाढली शक्ती : पत्रकार हेमंत जोशी 

एखाद्याला कमी लेखणे, टोमणे मारणे, खाली बघणे, अपमानित करणे, किस झाड कि पत्ती समजणे अत्यंत वाईट कारण कोण केव्हा कोणती उंची गाठेल कधीही सांगता येत नाही. म्हणून संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाशी गोडीगुलाबीने राहावे असे मला वाटते. विरोध तात्विक असावा जेलसीतून असूयेतून नसावा. मातोश्रीप्रमुख किंवा ठाकरे कुटुंबियांचे म्हणाल तर उजवे हात म्हणाल तर जीव कि प्राण मिलिंद नार्वेकरांना ज्यांनी ज्यांनी नोव्हेअर करण्याचा मातोश्रीवरून बाहेर घालविण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न करणारेच उलट संपले, मातोश्रीवरून बाहेर पडले, शिवसेनेतले स्थान घालवून बसले, अनेकांना शिवसेना सोडावी लागली तशी वेळ नार्वेकरांच्या विरोधकांवरच आली वरून अधिकाधिक महत्व वाढत गेले ते मिलिंद नार्वेकर यांचे...

मुख्यमंत्री फडणवीसांच्या आधी शिवसेनेतर्फे राज्यातल्या कानाकोपऱ्यात आदित्य ठाकरे जनसंपर्क अभियान राबवताहेत त्यावरूनच मला नार्वेकर यांची प्रकर्षाने आठवण झाली. माझी माहिती अशी कि जेव्हा हे संपर्क अभियान काढायचे ठरले तेव्हा नार्वेकर सहकुटुंब युरोप वारीवर होते ते जर येथे असते तर त्यांनी नक्की आदित्य यांना समजावून सांगितले असते कि हे असे एवढ्या घाईने आणि तुमच्या वयाच्या नेत्याने करू नये पण काही अति हुशार नेत्यांच्या सल्ल्याला लहानगे आदित्य बळी पडले आणि नको त्या वयात नको ते करून बसले. कम्पेअर टू फडणवीस आम्हीही कमी नाही किंवा आम्ही देखील पुढल्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कदाचित हे दाखविण्याच्या नादात आदित्य यांच्याकडून हि संपर्क मोहिमेची चूक मुद्दाम राबविल्या गेली...

आदित्य ठाकरे यांची ती चांगली सवय आहे कि ते अधूनमधून राज्याचा फेरफटका मारून मोकळे होतात पण सभा किंवा एकाचवेळी हजारो माणसांचा घोळका जिंकण्याएवढे अद्याप त्यांचे वय नाही अनुभव नाही वक्तृत्व नाही, त्यासाठी आणखी काही काळ जाऊ देणे योग्य ठरेल. हे म्हणजे असे झाले एखादी लहान मुलगी अमुक एखाद्या स्पर्धेत आईची साडी नेसून नृत्य करते आणि ओंग्यापेक्षा बोन्गा मोठा झाल्याने धपकन जमिनीवर पडते. शाळेत असतांना माझा एक मित्र त्याच्या मोठ्या भावाची हौशेने पॅन्ट घालून आला आणि पिटी करतांना कमरेचा बेल्ट अचानक तुटल्याने त्याची घसरून पडलेली पॅन्ट आणि आत घातलेली अंडरपँट, ओंगळ दर्शन साऱ्यांना झाले. हे असे आदित्य यांच्या जनसंपर्क यात्रेचे झाले आहे, त्यांना चुकीचे सल्ले दिल्या जाऊ नये असे मनापासून वाटते. आदित्य यांच्या कानात ' तुम्हीच पुढले मुख्यमंत्री ' हे भरवून दिल्या जाणे म्हणजे आदित्य यांचे राजकीय नुकसान जाणूनबुजून करण्यासारखे...

www.vikrantjoshi.com
शिवसेनेच्या बाबतीत आणखी एका मुद्द्यावर यायचे झाल्यास, गणेश नाईक यांचे शिवसेनेऐवजी भाजपामध्ये जाणे, सेनेच्या दृष्टीने चुकीचे झाले असे म्हणता येईल. गणेश नाईक मंत्री असतांना एक दिवस माझ्यासमोरच त्यांना कुठल्याशा कामासाठी थेट बाळासाहेबांचा फोन आला. त्या दोघांचे त्यावेळेचे झालेले संभाषण एवढे चांगले, पोटतिडकीने होते कि क्षणार्धात माझ्या लक्षात आले, बाळासाहेबांच्या मनातला राग ओसरलेला आहे त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याही मनात फारशी कटुता नाही खुद्द गणेश नाईक मला त्यावेळी म्हणाले होते. असे असतांना शंभर टक्के नाईकांचा सेनेकडे ओढा असतांना त्यांना भाजपामध्ये जाऊ देणे म्हणजे ठाणे जिल्ह्यातली मोठी ताकद सेनेने कमी करवून घेण्यासारखे. आपल्याला पक्षात स्पर्धक नको म्हणून एकनाथ शिंदे यांनी खुबीने मोडता घातला असे काहींचे म्हणणे, योग्य असावे हेही मला येथे वाटते....

मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार गेली चार वर्षे गणेश नाईक हे राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा अतिशय गांभीर्याने प्रयत्न करीत होते, होय, त्यांना शिवसेनेतच जायचे होते, असे घडले असते तर ते नाईक व शिवसेना दोघांनाही राजकीय ताकद वाढण्यात नाईकांचे सेनेत जाणे अधिक फायद्याचे ठरले असते, दोघांचीही मोठी राजकीय ताकद वाढली असती. दुरदैवाने ते 
घडले नाही , घडू दिले नाही. आणि हे असे घडणार नाही जेव्हा गणेश नाईक आणि कुटुंबियांच्या लक्षात आले, आमदार म्हणून संदीप गणेश नाईक यांनी थेट देवेंद्र फडणवीस या समवयस्क मित्र नेत्याशी जवळीक वाढवायला सुरुवात केली. त्या दोघांचे आपापसातले संबंध बघून मला तर कित्येकदा हेच वाटायचे कि संदीप नाईक भाजपाचे अधिकृत आमदार आहेत. संदीप नाईक यांचा भाजपा वर्तुळात असलेला सहज वावर, त्यांना भाजपामध्ये येण्याचे वेध लागले आहेत, जाणकारांच्या ते सहज लक्षात यायचे....

नवी मुंबईतील नाईक आणि कंपनीचे भाजपामध्ये येणे, त्यातून गणेश नाईकांची, देवेंद्र फडणवीसांची, भाजपाची ताकद एकीकडे वाढलेली असतांना तिकडे शरद पवार आणि राष्ट्रवादीचे भरून न येणारे नुकसान तर झाले आहेच पण एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यात नाईकांच्या रूपाने तगडा स्पर्धक निर्माण झाला आहे हेही नक्की. यापुढे थेट प्रभावी भाजपाची ताकद नाईकांच्या पाठीशी उभी राहिल्याने गणेश नाईक पूर्वीच्या उत्साहात ठाणे पालघर रायगड या बेल्ट मध्ये भाजपा अधिक प्रभावी करण्यात मोलाची कामगिरी पार पाडतील. महत्वाचे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासमोर भाजपातर्फे तगडा नेता ठाणे जिल्ह्यात नाही हे जे शल्य भाजपाला बोचायचे ते भाजपावाले मनातल्या मनात नाचायला आणि बागडायला लागले आहेत. सेनेची मोठी ताकद नाईकांच्या येण्याने वाढली असती, संधी फडणवीसांनी साधली, शिवसेनेने केवळ एकनाथ शिंदे यांच्या हट्टापायी गमावली, एक नक्की, भाजपाची ताकद ठाणे जिल्ह्यात वाढली....

तूर्त एवढेच : हेमंत जोशी.

Sunday, 28 July 2019

स्मार्ट स्टाईलिश फ्रेश गिरीश : पत्रकार हेमंत जोशी


स्मार्ट स्टाईलिश फ्रेश गिरीश : पत्रकार हेमंत जोशी 
तुम्हाला सांगू कि नको सांगू कि नको याचा विचार करत होतो, एकदाचे ठरवले कि सांगूनच टाकावे. अलीकडे बांद्र्यातील एमटीएनएल इमारतीला आग लागल्यानंतर जो रोबो वापरण्यात आला त्याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी यासाठी करावी कि एकतर तो रोबो चायना बनावटीचा आहे आणि वास्तवात त्याची किंमत केवळ आठ लाख रुपये असतांना तब्बल एक कोटी रुपये देऊन मुंबई महापालिकेने तो विकत घेतला आहे. केवढी मोठी हि जनतेच्या पैशांची उधळपट्टी नाही का, ज्या कारणांनी आघाडी जनतेच्या मनातून उतरली ते तसे युतीचे होऊ नये असे जर त्यांच्या नेत्यांना वाटत असेल तर जरा लाज शरम ठेवून त्यांनीही पैसे खावेत. आता मुख्य विषयाला हात घालतो....

मंत्री म्हणून या पाच वर्षात गिरीश महाजन यांना कितींनी बघितले हा प्रश्न तुम्हाला विचारायचा अवकाश जळगाव धुळे जिल्ह्यातल्या प्रत्येकाचा हात क्षणार्धात वर जाईल आणि राज्यातले इतरही हात दुखेपर्यंत ताणून वर धरतील, हो, आम्ही बघितलंय, एकाचवेळी या राज्यातले करोडो आवाज एकसाथ म्हणतील, पायाला भिंगरी लागल्यागत ते या राज्यात फिरले आणि धुळे जळगाव जिल्ह्यात तर सतत वावरले, मुख्यमंत्र्यांचे एक बरे आहे त्यांना अमुक एखादा मंत्री सामाजिक हित समोर ठेऊन काम करत असेल तर ते त्याला मागे न खेचता उलट प्रोत्साहित करून मोकळे होतात पण अमुक एखादा मंत्री गडबड घोटाळे करणारा असेल तर ते एकतर त्याला थेट घरचा रस्ता दाखवतात किंवा मंत्रिपद कायम ठेवले तरी त्याचे पंख छाटून ठेवतात...

मला आठवते, पंकजा मुंडे यांनी चिक्की खरेदी करतांना घोटाळे करून ठेवले, पुढे काय घडले कदाचित तुम्हाला माहित नसेल पण मुख्यमंत्र्यांनी थेट खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळे होतात म्हणून थेट खरेदी प्रक्रियाच त्यानंतर बंद केली. सतीश मुंडे यांच्यासारख्या दलालांचे त्यामुळे बऱ्यापैकी बारा वाजले. ज्यांचा हेतू प्रामाणिक आहे त्यांना पुढे जातोय म्हणून मागे खेचणे फडणवीसांना माहित नाही, त्यावर तुम्हाला चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, संजय कुटे इत्यादी मंत्री छातीठोकपणे भर चौकात माईक हाती घेऊन सांगतील, तोंडभरून फडणवीसांचे कौतुक करतील. महाजनांवर यावेळी एक मंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू सहकारी म्हणून मोठी जबाबदारी होती. पण एक बरे आहे त्यांना नियमित व्यायाम करण्याची, आपण तरुण असावे तरुण दिसावे, त्यात आवड असल्याने ते स्वतःला मस्त मेंटेन करून आहेत. फारसा ताण न घेता पडलेली जबाबदारी आनंदाने पार पडायची, त्यात यश मिळवायचे हे गिरीशजींचे स्वभाववैशिट्य, मी कित्येक वर्षांपासून अगदी जवळून बघत आलोय, त्यामुळे ते २४ तास फ्रेश असतात,त्यांना फ्रेश असण्याचा आणि तरुण दिसण्याचा, होणार मोठा फायदा, नको त्यावर येथे काही बोलूया, उगाच तुम्ही जेलस व्हाल...

चंद्रकांत पाटलांचे स्वतःकडे कधीही फारसे लक्ष नसते. हाती येतील ते कपडे घालून व पायात चप्पल घालून ते बाहेर पडतात. उद्या वेळेवर शर्ट पॅन्ट सापडली नाही तर ते आहे त्या कपड्यांवर बाहेर पडतील पण महाजनांचे तसे नाही. एकदम स्टाईलिश मंत्री. त्यांना पाठमोरे बघा, कोलॅजेतल्या मुली तर त्यांच्या वर्गातला एखादा हँडसम समजून भराभर पावले टाकून त्यांना गाठतील आणि स्माईल देऊन मोकळ्या होतील. आपण तरुण असावे आणि तरुण दिसावे याकडे महाजनांचे लक्ष असते त्यातून ते नियमित व्यायाम करतात आणि मिसेस महाजनांना अस्वस्थ करून सोडतात. नवरा पत्नीपेक्षा लहान दिसतो अशा कमेंट्स आल्या कि घरी केवढी बोलणी खावी लागतात, मी जातो आहे कि त्या संकटातून. महाजांनी होणार त्रास, रामेश्वर कडून नेमकी माहिती घेतो. फडणवीसांना जॅकेट छान दिसते हे जे त्यांच्या मनात कोणीतरी भरून ठेवले आहे त्या व्यक्तीला मी शोधतोय, भांडण्यासाठी. छान छान सूट्स घालायचे सोडून एकाचवेळी अनेक डझन विकत घेतलेले जॅकेट्स घालण्यात त्यांना आनंद होतो, आम्हाला वाईट वाटते. कधीकाळी हे महाशय मॉडेलिंग करायचे, त्यांनी सुटाबुटातच वावरावे....


पत्रकार हेमंत जोशी 

नरेंद्र पुन्हा कल्याणकर : पत्रकार हेमंत जोशीनरेंद्र पुन्हा कल्याणकर २: पत्रकार हेमंत जोशी 
काहींच्या बाबतीत हमखास अंदाज बांधले जातात पुढे ते खरेही ठरतात. मी दहावीची परीक्षा दिल्यानंतर पास होईल हा अंदाज साऱ्यांना आला होता पण मी प्रथम श्रेणीत पास झालो तर कर्ज काढेल पण हत्तीवरून गावात साखर वाटू वडील मला म्हणाले होते अर्थात त्यांना पुढे कर्ज काढण्याची वेळ आली नाही. पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि आता तिसऱ्यांदाही कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातून नरेंद्र पवार हेच आमदारकीची निवडणूक लढवतील आणि तेच निवडून येतील हे त्यांच्या मतदारांनी आजच ठरविलेले आहे अगदी पवारांच्या थेट विरोधात सनी लिओनीला जरी उभे केले तरी, लिओनीला उभे केले तर काही चावट मतदारांच्या भलेली तोंडाला पाणी सुटेल पण त्यांचेही हेच ठरलेले असेल कि नरेंद्र पवार यांनाच उभे करायचे आणि निवडूनही आणायचे...

अलीकडे भाजपा संघाच्या मुशीत तयार होणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत नेमके कसे वातावरण आहे मला फारसे माहित नाही पण जेव्हा मी विद्यार्थी नेता म्हणून खूप ऍक्टिव्ह होतो तेव्हा आमचे प्रतिस्पर्धी म्हणून मी त्यांच्याकडे बारकाईने बघत असे त्यातून त्यांच्या अनेक पद्धतींचा अभ्यास करणे मला शक्य झाले. राज्याचे एक मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विद्यार्थी परिषद या राज्यात उंचीवर नेण्यात फार मोठे योगदान आहे किंबहुना संघटना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही कशी बांधावी उभी 
करावी पुढे न्यावी हे जेवढे चंद्रकांतदादा यांना पाठ आहे मला नाही वाटत अलीकडच्या काळात संघटना पक्ष बंधू शकणारा असा त्यांच्या तोडीचा नेता भाजपा काय अन्यत्रही असेल, आढळेल...

www.vikrantjoshi.com

चंद्रकांत पाटलांना जेव्हा भाजपाने प्रदेशाध्यक्ष केले तेव्हा वरकरणी साधे बावळे वेंधळे दिसणारे चंद्रकांत, अनेक त्यांची थट्टा करून मोकळे झाले. पण मी सांगतो चंद्रकांत हे त्यांच्या पक्षातले आजवरचे सर्वाधिक यशस्वी प्रदेशाध्यक्ष ठरतील, भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढवतील. पाटलांना अध्यक्ष करणे म्हणजे त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी उद्या देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत बोलावून घेतल्यानंतर या राज्याचा पुढला मुख्यमंत्री कोण असेल, त्यावर उत्तर दिलेले आहे आणि तेच सत्य आहे फक्त पाटलांनी व्यवहारात फियास्को करवून घेऊ नये, चांगली माणसे सतत सभोवताली ठेवावीत. नरेंद्र पवार, विनोद तावडे, आशिष शेलार, जळगावचे भरत अमळकर, वर्षा विनोद तावडे असे शेकडो विद्यार्थी दशेपासून भावी नेते म्हणून जे तयार झालेत त्यांना वाढविण्यात घडविण्यात ज्या चंद्रकांत पाटलांचा सिंहाचा वाटा आहे त्यांना भाजपा पुढे नेण्यात अपयश येईल, अजिबात शक्य नाही...

मीच माझे सहकारी शिवसेनेत किंवा भाजपा मध्ये पाठवतो आहे अशी जी शरद पवार यांच्या गटातून कायम पुडी सोडल्या जाते त्याला अजिबात अर्थ नाही, अर्थ नसतो. हे पवारांचे पाप आहे म्हणून त्यांना त्यांच्यासमोरच अपयश येते आहे, अपयश आले आहे. चंद्रकांत पाटलांचे आणखी एक वैशिष्ट्य सांगतो ते असे कि फडणवीसांचा ज्युनियर असूनही ते कधीही अपमान करीत नाहीत पण अमुक एखादा मुद्दा रुचला पटला नाही तर तो खोडून काढण्याची ते हिम्मत ठेवतात पण त्याचवेळी फडणवीस एक नेते व मुख्यमंत्री म्हणून अपमानित होणार नाहीत याचीही ते काळजी घेतात पण प्रसंगी त्यांना जे हवे असते ते मनासारखे करवून घेतात म्हणून चंद्रकांत पाटील हे फडणवीसांची म्हणाल तर असेट आहेत, आधारस्तंभही आहेत. नेमके हे असे एकनाथ खडसे चंद्रकांत पद्धतीने म्हणजे खुबीने युक्तीने वागले असते तर ते आज चंद्रकांतदादांच्या पुढे निघून गेले असते, फडणवीसांच्या तसे नक्की मनात होते पण खडसेंनी बोलून घालविले, दुर्दैवी ठरले....

विद्यार्थी परिषदेत जे घडले वाढले मोठे झाले नेते झाले त्यांनी एक एक मूल दत्तक घ्यायचे ठरविले होते आणि ते तसे करवून दाखविले. किरीट सोमय्या यांच्यासारखे कितीतरी नेते भाजपा मध्ये आहेत ज्यांनी मुले दत्तक तर घेतलीच पण जातपात न बघता त्यांनी विद्यार्थी परिषदेत काम करणाऱ्या तरुणींशी म्हणजे समविचारी मंडळींशी विवाह केले त्यातलेच एक आमदार नरेंद्र पवार, त्यांच्या पत्नीने कधी मनातही आणले नाही कि मी मराठा आहे आणि नरेंद्र हे मराठ्यांच्या तुलनेत दुर्लक्षित जातीतले आहेत. दोघेही विवाहबद्ध झालेत, व्यवस्थित संसार करताहेत कारण त्यांच्या विचारांची नाळ जुळलेली आहे त्या चंद्रकांत पाटलांसारखी, पाटलांच्या पत्नी अंजली खरे कोकणस्थ ब्राम्हण, अत्यंत यशस्वी चार्टरड अकाउंटंट, वास्तविक दादांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांना पुन्हा लग्न करायचे नव्हते पण अंजली खरे या देखील समविचारी, विद्यार्थी परिषदेतून घडलेल्या वाढलेल्या, त्यातून दोघे विवाहबद्ध झाले, आजही त्या दोघांकडे बघून असे वाटते, त्यांचे लग्न कालच झालेले आहे. दादांचे ते तसेच आज देखील अंजलीताईंकडे प्रथमच बघितल्यासारखे पाहणे, लाजून बोलणे, हसून वागणे...

क्रमश: हेमंत जोशी.


पत्रकार हेमंत जोशी 

Friday, 26 July 2019

A New Maharashtra!

A New Maharashtra!

My PWD contractor friend Manoj Madgulkar tweeted "Those who want to get rid of their past deeds, come out safe, and yet bloom in their remaining political career, just move to the BJP or Shiv Sena". I fully endorse this. Yes, this is the new Maharashtra even we millennial journalists are experiencing for the first time. Extremely disturbing and extremely demotivating. But well, thats politics for you. Situation changes, people change. A veteran Journalist pointed out that this "shifting loyalties" was indeed brainchild of Sharad Pawar, and today it will be safe to say that the veteran is getting a taste of his own medicine. But my question remains,  why are the BJP & ShivSena doing this when everything is going their way? The "imports" (Now the list is beyond remembrance) should understand--the motivation the Government is providing or promising to you has its own time period and it expires either in December 2019 or June 2020. Write it down somewhere all of your leaving your parent brand--Those who know Devendra Fadnavis close enough, will vouch for my the statement to follow which is a dialogue from the Bollywood movie "Company" which starred Ajay Devgan--- it perfectly suits CM Fadnavis's ongoing strategy too--Kaam Khatam, Aadmi Khatam!!

Let's analyse Devendra Fadnavis here. We all know he is a smiling assassin. With composure & smile on his face he finishes career's-Eknath Khadse & few IAS officers (transfers every 3 to 6 months from one post to other is as good as finished for me) are fitting examples of this. Those in love with Fadnavis (Believe me, #Metoo) will agree to this..But we needed such a CM, don't you agree? Bureaucrats including those serving opposition tell me, yes the previous Congress/NCP government had actually brought the situation which would have resulted in civil outcry very soon had they not been rejected in 2014. Every inch of our city and state was owned by them, all sectors right from Housing, Education to the Tribal worked on kickbacks. It still does, but friends, we all know the government needs to run right? Hence we needed someone with an iron hand. In fact, I wouldn't be saying anything more if I say, even Shiv Sena & Uddhav Thackrey needed such a backbone after the demise of Balasaheb. Backbone, means moral support & maturity here.

Let us try to understand what Devendra Fadnavis is all about. So, Fadnavis has a set of formulas he follows. It remains the same for everyone be it his brother Ashish, aunt Shobhatai Fadnavis or even a Sumit Wankhede who is with him 24/7. You cannot force Fadnavis to do anything. He has his own intelligence, his own people from where he comes to know everything, means absolutely everything.  Fadnavis is close to say 100 people which include everyone from every sphere of life. Politicians, Bureaucrats, Journalist's Businessmen & even Liasioner's. Apart from his best friend from Nagpur, for no one till date Fadnavis has made an exception to his set of rules. With this rule, again I mention here, no one means no one goes empty handed from his Varsha Bungalow too, be it the person who has troubled him the most (Tawde, Pankaja, Kapil patil & so on...). Rule is simple...Try & help everyone...The minute Fadnavis is convinced that I have helped this X person so much, he will immediately withdraw his attention from that person. Very tactical move he plays, and yes, that too with a smile-- he will conveniently distance that person from himself. I have many examples of such people who were helped and sidelined, and yet they continue to monetise this "sidelined" relationship, and Fadnavis is aware of even that!!

Another example that can be cited is that of Prasad Lad. Here in Mumbai when Ashish Shelar was becoming the next big thing slowly Fadnavis got Lad (who was equally powerful monetarily) and clipped Shelar's wings. He made Lad an MLC and also with his "sweet talks only" Lad was able to spread his Krystal Securities right from Mantralaya's 6th floor to the Airport. (By the way, Mr. Lad, when I enter the 6th floor CMO, please make sure you up your services. The corridor smells a lot. It is the CMO, let me remind you.) But I think now Lad entering IT sector is not gone down well with CM, I hear. Lad is a mentor to Arceus Infotect Pvt ltd(run by Anup Dhanuka, but promoters are in MP) where Lad's young daughter works hard enough...Lad just introduces them to the IT secretary and concerned departments. The contracts are bagged only on merit😒. Holding Talathi exams was the latest tender they bagged. So those who thought Lad was the closest MLA/MLC, in the coming days, you will see the change.

The reason to analyse Fadnavis is simple--all this party jumping does not mean these imports have bright chances of whom we all REJECTED in 2014. Elections are around the corner-Even if BJP is very well equipped in all possible ways to reach the last man of this state, Fadnavis & to a certain extend Uddhav Thackrey too wants success at Vidhan Sabha..This imports are just to guarantee this. But one piece of advice for those coming with big promises made and hopes high, don't let yourself become another Sanjay Savkare. But I don't understand people like Sachin Ahir. I mean, what not Sharad Pawar & Ajit Pawar did not do for him? Right from letting him earn some 100's of crores to venturing in Bollywood Ahir was everywhere. In fact if you all recollect Sachin Ahir & Prasad Lad were originally Chagan Bhujbal's men, but forget Bhujbal, these opportunists ditched Pawar  too for their personal gains...

Again making Vikhe a Minister along with Kshirsagar was one strategy even I failed to understand of Fadnavis. As I said, no one understands Fadnavis right, fully? Vikhe was sold to Fadnavis day 1 when Fadnavis appointed Zende as CEO Mhada when he became the CM. Him coming to the BJP was a mere formality. Similarily heard about Jayant Patil of the NCP. I think apart from the Pawar's, the old timers like Walse Patil, Praful Patel, Madan Bafna & Bhujbal will be with the NCP, and yes, Jitendra Ahwad whom NCP can bank on...Rest all, let it remain a mystery.

But what happens to the karyakarta's now of all these imports? The real karyakarta's once who fought with the BJP & Sena with all his might will now be working in toe with them. Humiliation will be at its peak. And as of now a current BJP veteran karyakarta tells me, little did we imagine our party will come in power. Now that it is in power, we will have a good time, but looking at the imports, again we are back to picking up bags and mattresses. I reminded them with an example of a spokesperson of BJP from Thane. Forget TV, he is busy with files from one chamber to another. It is not wrong, right to do so? The karyakarta smiled & said, Vikrant, we still have RSS to answer too...

Indeed it is a new Maharashtra for a "millennial journalist" like me....

Vikrant Hemant Joshi  

Thursday, 25 July 2019

नरेंद्र पॉवर : कल्याणकर कल्याणकर : पत्रकार हेमंत जोशीनरेंद्र पॉवर : कल्याणकर कल्याणकर : पत्रकार हेमंत जोशी 
आमदार त्यातले काही विधान परिषद सदस्य असतील किंवा विधानसभा सदस्य, फक्त आणि फक्त राजकीय पत्रकारितेच्या माध्यमातून गेल्या ३९ वर्षातले बहुतेक सारे आजी माजी आमदार एकतर मित्र होते किंवा ओळखीचे तर नक्की झाले, होते. काही आठवतील काही आठवणारही नाहीत पण या साऱ्यांमध्ये मिसळताना मजा येते मजा आली. अनेक आमदार पुढे खूप मोठे झाले, मोठे झाले तरीही मित्र राहिले,त्यांचा ते सत्तेत असतांना फायदा किंवा गैरफायदा घ्यावा कधीही मनात आले नाही, कारण दलाली करण्यात आनंद मानणारी पत्रकारिता करून मला माझा स्वाभिमान कधी गहाण ठेवायचा नव्हता. आमदारांपेक्षा तर शासकीय व प्रशासकीय अधिकारी कितीतरी अधिकपटीने कामें करवून देऊ शकतात पण त्यांचा आधार घेतल्यापेक्षा उलट त्यांनाच आपण मोठ्या भावासारखा आधार द्यावा मनाशी अगदी सुरुवातीलाच ठरविले होते आणि तसेच घडत गेले...

साऱ्या बाबी केवळ पैशातून मोजायच्या नसतात त्यातून आपोआप प्रेम मिळत जाते. काही छोट्या छोट्या गोष्टीतून ते दिसतेही जसे अलीकडे एका शासकीय अधिकारी मित्राने अगदी आठवणीने त्याच्या घरी बनवलेले मला आवडते म्हणून कैरीचे लोणचे पाठवले किंवा एकदा एका अधिकाऱ्याने थेट घरी बोलावून स्वतःच्या हाताने मला आवडणारी चविष्ट खान्देशी शेवेची भाजी करून खाऊ घातली किंबहुना त्यादिवशी काही अन्य अधिकारी आणि मी, जमून आलेली ती शेवेच्या भाजीची पार्टी, मनातले सांगतो, खूप वर्षांनी बॅचलर्स पार्टीची आठवण झाली. माझे असे मत आहे कि ओळखी नक्की खूप असाव्यात पण एकदा का अमुक एखाद्याशी मैत्री झाली कि त्याला त्याच्या गुण दोषांसहित स्वीकारायचे असते...

नेत्यांना, अधिकाऱ्यांना, अन्य कोणीही, त्यांनी त्यांच्या घरात घेतल्यानंतर कधीही वाटता कामा नये कि हा आपल्या घरातली माहिती घेऊन लिहून मोकळा होईल. नाते मग कोठेही निर्माण झाले तरी अत्यंत विश्वासाचे असावे व्हावे लागते. गम्मत म्हणून सांगतो, सत्तेभोवती जे सतत फिरणारे असतात ते अतिशय प्रोफेशनल असतात म्हणजे गरज सरो नि वैद्य मरो,पद्धतीचे वागणारे असतात पण आम्ही ते तसे कधीही वागत आलेलो नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास प्रमोद बोरसे आणि गजानन गिरी हे विविध मंत्र्यांचे खाजगी सचिव होते किंवा सतीश भिडे तर मोठे प्रशासकीय अधिकारी होते पुढे त्यांनी थेट नोकरी सोडली, खाजगी क्षेत्रात ऑन मेरिट पुढे जायचे त्यांनी ठरविले, आश्चर्य वाटेल, आजही मी या अशा मंडळींशी मैत्री जवळीक ठेवून आहे. एकदा का अमुक एक सत्तेतून बाहेर पडला कि तो जवळून जरी गेला तरी ओळख न देणारे बहुतेक असतात पण असे वागू नये, मैत्री कायमस्वरूपी असावी, टिकावी. अर्थात हा सारा भावभावनांचा खेळ आहे जो खेळणे फार कमी लोकांना जमते...

काही आमदार दुरून जरी दिसले तरी आनंद होतो, वाटते जागच्या जागी गोल गोल नाचावे, बागडावे. पुण्याच्या मेधा कुलकर्णी, मंदाताई म्हात्रे, राजेंद्र पटणी, निलय नाईक, डॉ सुजित मिणचेकर, जितेंद्र आव्हाड, पराग आळवणी, गोपीकिसन बाजोरिया, श्रीकांत देशपांडे, हेमंत टकले, संजय सावकारे, चंद्रकांत सोनवणे, शिरीष चौधरी, के. सी. पाडवी, अनिल गोटे, उदय सामंत, भास्करराव जाधव, एकनाथजी खडसे, आकाश फुंडकर, प्रकाश भारसाखळे, कप्तान तामिळ सेल्वन, गणपत गायकवाड, राम कदम, अमर काळे, सुनील केदार, समीर मेघे, दिलीप सोपल, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार असे आजवरचे शेकडो, कितीतरी, बहुसंख्य आणि त्यातलेच एक कल्याण पश्चिमचे आमदार भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत असूनही मंत्री म्हणून डावलल्या गेलेले, भाजपाचे त्या भागातले आधारस्तंभ श्रीयुत नरेंद्र पवार. थकलेल्या आणि चिडलेल्या नेत्यांशी साधे बोलणेही नकोसे वाटते, नरेंद्र पवार कायम उत्साही आणि हसतमुख म्हणून ते मंत्रालयातही सर्वांना हवेहवेसे असतात, वाटतात...

एकाचवेळी जो लोकप्रतिनिधी थेट मंत्रालय आणि स्वतःचा मतदारसंघ सांभाळून असतो तो राजकारणात पुढे खूप वर्षे टिकतो आणि आमदार म्हणून वारंवार निवडूनही येतो, त्यातलेच एक नरेंद्र पवार. अर्थात असे फार कमी असतात जे मतदारांच्या समस्यांना थेट सामोरे जातात आणि मंत्रालयातल्या झगमगटासमोर दिग्ग्ज मंडळींसमोर न घाबरता उभे राहून कामें करवून घेतात. मला तर नेहमीच असे वाटते, ज्यांनी आमदार व्हायचे ठरविलेले असते त्यांनी आमदार होण्याआधी मुंबईचे राजकीय वातावरण आणि वर्तुळ समजावून घेतलेच पाहिजे, हे असे नरेंद्र पवार यांनी केले त्यामुळे त्यांना येथे वावरणे अगदी सहज वाटते. मंत्री किंवा अधिकारी मग तो कोणत्याही विचारांचा असला तरी पवारांची कामे अत्यंत आवडीने करवून देतो कारण पवारांचे वागणे बोलणे एवढे आश्वासक सुसंस्कृत असते कि ते जे करताहेत ते लोकांच्या भल्यासाठी असे सतत वाटत राहते. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तर अगदी जाहीर सभेत म्हणालेत कि माझ्याकडे लोकांची सर्वाधिक समस्या कामें घेऊन येणारे आमदार म्हणजे आपले नरेंद्र पवार...

पुढे मी जे काही लिहिणार आहे ते वाचून नरेंद्र पवार यांचे चाहते मतदार जागच्या जागी गिरक्या घेऊन आधी नाच नाच नाचतील नंतर नक्की नरेंद्र यांना तोंडात पेढे भरवून येतील. आणि जे मी सांगणार आहे ते थेट कार्यसम्राट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पब्लिकसमोर सांगितले आहे, ते म्हणाले, माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या राज्यातील २८८ आमदारांच्या सर्व्हेमध्ये नरेंद पवार हे टॉप टेन मध्ये आले आहेत. केलेले काम कधीही लपत नसते, त्याची दखल थेट पक्षश्रेष्ठी तर घेतातच पण मतदारांना देखील अशा काम करणाऱ्या आमदाराचे मनापासून कौतुक असते, मग ते अशा आमदारांना वारंवार विधानसभेत तेही निवडणून पाठवतात. नरेंद पवार यांचे पुन्हा विधान सभेत निवडून जाणे हे जणू आजच ठरलेले आहे कारण पक्षश्रेष्ठी आणि मतदार दोघेही त्यांच्यावर जाम खुश आहेत...

साऱ्यांनी नरेंद्र यासाठी व्हावे कि तसे बघितले तर विधानसभेत जाण्याची त्यांची जेव्हा पहिली वेळ होती तेव्हा विधानसभेत जाण्याआधी सतत एक कार्यकर्ता म्हणून पवारांनी मंत्रालयाचा आणि मतदारसंघाचा तसेच संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा अभ्यास केला, एखाद्या आमदाराने नेमके काय करायचे असते, कसे बोलायचे वागायचे असते त्यांनी ते जाणून घेतले म्हणून नरेंद्र थेट आमदारातून पहिल्या दहा मध्ये म्हणजे मेरिट मध्ये आले. त्यांना विविध प्रश्नाची उत्कृष्ट जाणआहे म्हणजे आधी ते अमुक एखादा प्रश्न काळजीपूर्वक समजावून घेतात मग तो प्रश्न सोडविण्यासाठी जीवाचे रान करतात. बावनकुळे म्हणालेत तेच खरे आहे कि राज्यातील २८८ आमदारांच्या कामगिरीचा सर्व्हे फडणवीसांनी जेव्हा केला तेव्हा मतदारसंघातील प्रश्न, सभा गृहातील भाषणे आणि आक्रमकपणा, लोकांमध्ये असलेली प्रतिमा आणि थेट जनतेतून घेतल्या गेलेल्या प्रतिक्रिया, त्यातून नरेंद्र पहिल्या दहा मध्ये पास झाले मेरिट मध्ये आले...

शेवटी एकच सांगता येईल कि त्यांच्या बोलण्या वागण्यातला साधेपणा त्यातून ते कल्याण पश्चिम मध्ये म्हणजे त्यांच्या विधान सभा मतदार संघातील प्रत्येक मतदाराला आपल्या घरातले एक सुसंस्कृत सदस्य आहेत असे सतत वाटत राहते. मतदारांना ते थेट मोठ्या भावासारखे वाटतात कारण नरेंद्र त्याचपद्धतीने म्हणजे आपुलकीने सर्वांशी वागतात. अमुक एका मतदाराने काम सांगितल्यानंतर त्याची पाठ वळली कि कागदाचा चिटोरा थेट कोपऱ्यात भिरकावणारे ते लोकप्रतिनिधी नाहीत. ते प्रत्येक कामाचा पाठपुरावा करतात आणि अमुक एखाद्याचे काम झाले कि त्याला तसे जातीने कळवून मोकळे होतात म्हणून त्यांची लोकांत लोकप्रियता व प्रतिमा उंचावलेली सतत दिसते आहे. मतदारांच्या हक्काचा साधा सच्चा माणूस म्हणजे नरेंद्र पवार. ज्याला मतदारांत घरातले स्थान आहे आणि मोठ्या भावासारखा मानसन्मान लाभतो आहे. काम करणाऱ्यांचे मनापासून कौतुक झाले पाहिजे असे वाटले म्हणून नरेंद्र पवारांवर थेट चांगले लिखाण केले...
पत्रकार हेमंत जोशी 

Tuesday, 23 July 2019

घडते आहे ते घडू नये : पत्रकार हेमंत जोशीघडते आहे ते घडू नये : पत्रकार हेमंत जोशी 
अलीकडे तो चुटका राज्यात सर्वदूर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. चुटकाअसा होता, मुलगा बापाला म्हणतो कि माझे काही शिक्षणात लक्ष लागत नाही, तुमचेही तेच होते म्हणजे शिक्षणाच्या नावाने तुम्ही ढ म्हणून राजकारणात पडले नि पुढे शिक्षण नसतांनाही म्हणजे लायकीपेक्षा कितीतरी अधिक पटीने तुम्ही खाल्ले, मिळविले. आता मीही राजकारणात जातो, भाजपा चे काम सुरु करतो,तिकीट मिळवतो, देशाची सेवा करतो आहे दाखवतो पुढे आणखी श्रीमंत होतो. त्यावर बेरकी अनुभवी पलटी बहाद्दर बाप त्याला म्हणतो : येडा कि खुळा तू, अर, आधी काँग्रेस नायतर राष्ट्रवादीत जा, तिथे नाव कमाव, नेता हो मंग बीजेपीवाले पेढे घेऊन तुला बोलावत्याल, तिकीट देत्याल, येड्या, थेट बीजेपी मध्ये जाणे काम करणे म्हणजे आयुष्यभर सतरंजा नाहीतर फक्त नमस्ते सदावत्सले...

अरे माणसाने भाजपा मध्ये प्रसाद लाड म्हणून जायचे असते, मुकुंद कुलकर्णी म्हणून नव्हे. पुढे मुलगा विचारतो, समजा मी शिवसेनेत गेलो तर, मग तर तुला काहीही करायची गरज नाही, तेथे निवडणूक लढवून चार चार वेळा निवडून येऊन वैताग करवून घ्यायचा नाही थेट तानाजी सावंत बनून मातोश्री गाठायची कि रस्ता मोकळा, आधी मंत्री करतील नंतर तू मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेस असेही ते सांगून मोकळे होतील. आदरणीय मुख्यमंत्री आयारामांचे स्वागत कौतुक जरी सध्या करीत सुटलेले असले तरी आयारामांचे, नियमित धंदा घेणाऱ्या मसाज पार्लरमध्ये जाणार्या ग्राहकांसारखे असते म्हणजे अशा ग्राहकांचे प्रेम निष्ठा आत्मीयता असे काहीही अजिबात नसते. आज जुलि चांगली वाटली म्हणून तिच्याकडून मसाज करून घ्यायची उद्या तिच्या शेजारी बसलेली लिंडा चांगली वाटली तर तिला घ्यायचे, हॅप्पी एंडिंग साठी, असे हे आयारामांचे असते....

विशेष म्हणजे भाजपा आणि शिवसेना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हे जेथे सारे संधीसाधू जमा झाले त्यांना शरद पवार हे त्यातले नामचीन म्हणून ओळखले जाणारे नेते म्हणून भेटले आणि केला पक्ष उभा. अशा राजकीय पक्षांना फारसे आयुष्य नसते 
कारण संस्कार देशभक्ती समाजसेवा असे तेथे काहीही नसते, सारेच बेरकी, ज्यांना इतरत्र संधी मिळत नाही, एकत्र येतात आणि राजकीय पार्टी उभी करून मोकळे होतात. असे नेते असे पक्ष ज्या वेगाने पुढे जातात असे पक्ष दुप्पट वेगाने खाली येतात. भाजपा आणि शिवसेना दोघांनाही आजचे मिळालेले राजकीय यश हे त्यांनी शून्यातून उभे केलेले विश्व् आहे. तेथे खरेतर ऐनवेळी आलेल्यांना प्रवेश करू दिला तरी त्यांना नको तेवढे महत्व किंवा पद अजिबात दिल्या जात कामा नये....

राजकारणात जे अनुभवी आहेत ते सेनेतले किंवा भाजपमधले दुर्लक्षित केल्या गेलेले स्वयंसेवक, कार्यकर्ते,नेते, सैनिक अगदी उघड म्हणू लागलेले आहेत कि ज्यांनी आमची आयुष्यभर कातडी सोलली त्या जयदत्त क्षीरसागर यांना मंत्री केले जाते जे काँग्रेसचे झाले नाहीत शरद पवारांचे राहिले नाहीत, सख्ख्या भावांचे झाले नाहीत ते जयदत्त क्षीरसागर सेनेत येणे म्हणजे केवळ सत्तेचे गणित समोर ठेवून आलेले हे नेते आहेत हे अगदी शेम्बड्या पोराला देखील कळते. बीड जिल्ह्यात शिवसेना फारशी प्रभावी नाही म्हणून क्षीरसागर यांना सेनेत घेऊन मंत्री केले असे समजते ज्याला अजिबात अर्थ नाही कारण क्षीरसागर यांच्या भरवशावर तेथे सेना कधीही बांधल्या जाणार नाही आणि ते स्वतः देखील सेना त्यांच्यापेक्षा मोठी होईल असे अजिबात करणार नाहीत कारण जयदत्त क्षीरसागर म्हणजे दिवाकर रावते नाहीत कि ज्यांना सेना आपल्यापेक्षा मोठी व्हावी असे सतत वाटत असते. दिवाकर रावते यांनी मातोश्रीच्या खांद्याला खांदा लावून या राज्यातल्या कानाकोपऱ्यात शिवसेना नेली, उभी केली. थोडक्यात सेना उभी करायला नेता आधी कडवा सैनिक असणे अत्यंत गरजेचे महत्वाचे असते. त्यातून सेना किंवा भाजपा नेत्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे कि जेव्हा केवळ सत्तेच्या लालसेपोटी, काही क्षणिक मिळविण्याच्या नादात बाहेरच्या नको त्या मंडळींना शिवसेना किंवा भाजपामध्ये मोठे स्थान दिले जाते सामान्य धडपडणारे जीवाला जीव देत आलेले नेते व कार्यकर्ते अक्षरश: नैराश्याच्या झटक्याला सामोरे जातात, सेना व भाजपाला जर स्वतःचा शरद पवार करवून घ्यायचा नसेल तर त्यांनी अमुक एखादी सत्ता हाती यायला थोडा उशीर जरी झाला तरी तानाजी सावंत, राधाकृष्ण विखे पाटील पद्धतीचे नेते इतर निष्ठावंतांना डावलून मोठे करायचे नसतात...

सत्ता राजकारण केवळ आपापली घरे भरण्यासाठी हा विचार ठेवून जगणारे हे नेते, देवेंद्र फडणवीस असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्या चाणाक्ष नजरेने टिपलेले असतात मग असे असतांनाही जर युती सत्तेत येण्यापूर्वी जे मजा मारत होते त्यांनाच पुन्हा आजही युतीच्या काळात महत्व दिले गेले असेल, महत्व दिल्या जात असेल. त्यांच्यातल्या दलालांनाच जर जवळ घेतले जात असेल तर युतीचे महत्व देखील घसरायला फार वेळ लागणार नाही. पाटील आडनावाचा मंत्र्यांना अधिकाऱ्यांना बायका पुरवून मोठा झालेला मूळ विदर्भातला एक दलाल जो सध्या स्वतःला बांधकाम व्यावसायिक म्हणवतो जो आघाडीच्या काळात अगदी ऐटीत मंत्र्यांच्या शेजारी बसून कमाईची कामें करवून घ्यायचा तोच दलाल मला अगदी सऱ्हास यावेळी युतीच्या मंत्र्यांकडे देखील ठाण मांडून रुबाबात बसलेला दिसतो. माझे काम सोपे होते, ज्यांच्या ज्यांच्याकडे हा टकल्या पाटील बसलेला दिसतो त्या त्या मंत्र्याला रांडांचा शौक आहे, माझ्या ते लगेच लक्षात येते...

शेवटी एकच सांगतो कि मी म्हणजे दिलीप कुमार नाही कि एखाद्याला अभिनय करायला शिकवावे, माझे आडनाव जाधव नाही कि मंत्रालयात दलाली कशी करावी ते इतरांना शिकवावे, तद्वत मी म्हणजे राजकीय गुरु नाही कि सेना भाजपा या यशस्वी पक्षातल्या टॉपच्या नेत्यांना शिकवावे, कोणाला घ्यावे आणि कोणाला घेऊ नये. पण एक सर्वसामान्य पत्रकार म्हणून अनुभवातून जे चांगले दिसते त्याचे कौतुक तोंडभरून करतो आणि कुठे ते चुकले तर फायदा नुकसानीचा विचार न करता थेट तोंडावरच सांगून मोकळा होतो. विरोधक टपलेले आहेत यापुढे सेना भाजपा नेत्यांना डोळ्यात तेल घालून सारे निर्णय घ्यायचे आहेत...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Monday, 22 July 2019

संघाचे आर्थिक गणित : पत्रकार हेमंत जोशी


संघाचे आर्थिक गणित : पत्रकार हेमंत जोशी 
रा. स्व. संघ आणि पैसा याविषयी संघाबाहेरच्या मंडळींना मोठे कुतूहल असते, अनेक शंका कुशंका त्यांच्या मनात असतात त्यातून मग संघाबाहेरचे त्यावर टीकाटिप्पणी करतात ज्यात अजिबात अर्थ नसतो. अनेकांनी त्यांच्या पक्षात संघपद्धती रुजविण्याचा प्रयत्न केला म्हणजे दिवंगत कांशीराम यांनी अमुक एखाद्या राज्यात पक्षाचे प्राबल्य असले नसले तरी संघस्वयंसेवकांसारखी कार्यकर्त्यांची देशात जेथे तेथे फळी उभी केली, संघाचे तसेच असते ते सत्ता तेथे स्वयंसेवक असे न करता जगात पद्धतशीर स्वयंसेवकांची फळी उभी करतात, क्षणिक फायद्यासाठी असे त्यांचे काहीच नसते...

नागपूरच्या एका सिनियर संघ स्वयंसेवकाने, ज्यांना संघ पाठ आहे त्यांना मला जे लिहून पाठवले ते वाचल्यानंतर संघाचे आर्थिक राजकारण तुमच्या सहज लक्षात येईल, भगव्या ध्वजाला संघात गुरुचे स्थान आहे त्या पवित्र ध्वजासमोर गुरुपौर्णिमेला दरवर्षी गुप्त पद्धतीने प्रत्येक स्वयंसेवक त्याला जशी झेपेल तशी रक्कम, दक्षिणा म्हणून ठेवतो. स्वतः वर्षभर काटकसरीने जगतो आणि हिंदुराष्ट्रासाठी हा स्वयंसेवक ध्वजासमोर जेवढे शक्य ते ठेवून मोकळा होतो ज्याचा त्याला अभिमान असतो, त्याच्या परिवाराला त्याचे अजिबात दुःख नसते, वाईटही वाटत नसते...

मित्र असलेला संघ स्वयंसेवक म्हणतो, ' गुरु दक्षिणेतील समर्पण अन्यत्र वळविले जात नाही. त्याचा अन्यत्र अजिबात विनियोग होत नाही, केल्या जात नाही. जमा झालेली दक्षिणा प्रत्यक्ष संघकार्यात व संघप्रचारकांच्या व्यवस्थेत, प्रवास आदी साठी वापरली जाते. गुरुदक्षिणा एका ठिकाणी कधीही येत नसे व येत नाही. विभागश: एकत्र होते व व्यय होते. भाजपा मध्ये संघाने ४३ प्रचारक दिलेले आहेत. त्यांचा वैयक्तिक व्यय संघ पाहतो मात्र संघटनात्मक खर्च भाजपा करतो. संघाच्या सर्वच पारिवारिक संघटना आपापल्या पद्धतीने आर्थिक स्रोत उभा करतात. संघटन अगदी नव्याने उभे राहत असेल तर संघ मदतीचा हात पुढे करतो एवढाच अपवाद. हेडगेवार स्मारकसमितीचे भवन पुनर्निर्माण विदर्भातील स्वयंसेवकांनी स्वबळावर केले. मी सुद्धा एक लक्ष रुपयांचा खारीचा वाटा उचलला. असल्या कामात गुरुदक्षिणा उपयोगी आणली जात नाही. प्रसिद्धी नाही, केवळ वैयक्तिक संदर्भासाठी लिहिले आहे. गुरुदक्षिणा हा डेलिकेट विषय आहे, संघ भाजपाला आर्थिक सहाय्य करतो असा समज अनेकांचा होतो म्हणून हे मुद्दाम लिहून पाठविले. ' त्या संघाशी संबंधित मित्राचे यांचे वर दिलेले संदर्भ बारकाईने वाचल्यास संघ आणि आर्थिक राजकारण, तुमच्या सहज ते लक्षात येईल, संघाविषयीचे काही अपसमज दूर होतील...

www.vikrantjoshi.com

केवळ महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास आज या राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी दोघांनाही आर्थिक चणचण मोठ्या प्रमाणावर भेडसावते आहे. या पक्षात आर आर पाटील किंवा अनंत गाडगीळ यांच्यासारखे जेमतेम अपवाद सोडल्यास इतर सर्व 
नेत्यांनी सत्तेचा सऱ्हास दुरुपयोग करून, सत्तेचा स्वतःसाठी वापर करून स्वतःच्या कुटुंबासाठी फार मोठे आर्थिक स्रोत उभे केले, पुढे जाऊन अतिशय महत्वाचे सांगतो, जात व नात्यांचा गैरवापर करून या दोन्ही पक्षाशी संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी देखील न मोजता येणारे कमविले पण आज जेव्हा काँग्रेस आणि राष्टवादीला प्रचार व प्रसार करण्यासाठी आर्थिक मोठी गरज आहे, कोणीही खिशातले काढून द्यायला तयार नाहीत वरून त्यातले बहुतेक काँग्रेस व राष्ट्रवादीला वापरून आणि आता पक्षांतर करून मोकळे झाले आहेत...

आजपर्यंत मी शरद पवार आणि जळगावच्या सुरेशदादा जैन दोघांनाही लिखाणातून नेमके जे सांगत आलो आहे ते सर्वांनीच आपापल्या परीने ध्यानात ठेवावे. जे पेरले तेच उगवते. पवारांनी काँग्रेसला आणि सुरेशदादा यांनी त्यावेळेच्या म्हणजे ९० च्या दशकात जळगाव जिल्ह्यातील प्रतिस्पर्धी मधुकरराव चौधरी किंवा प्रतिभाताई पाटील इत्यादींना शह देण्यासाठी, नेता म्हणून स्वतःला स्थापित करण्यासाठी स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांना मोठी ताकद देऊन त्यांची देशसेवेसाठी अजिबात लायकी नसतांना त्यांना उंचीवर नेऊन ठेवले. आज अशी परिस्थिती आहे, ज्यांना ज्यांना पवार यांनी महाराष्ट्रात किंवा जैन यांनी जळगाव जिल्ह्यात मोठे केले एकतर ते यांनाच सोडून गेले किंवा यांच्या छातड्यावर बसून त्यांच्यावरच प्रहार करु लागले आहेत. याच मार्गावर भाजपा गेली तर त्यांचाही एक दिवस जैन किंवा पवार होईल यात तिळमात्र शंका वाटत नाही म्हणून माणसे मोठी करतांना सावध असावे लागते, स्वतःची काँग्रेस किंवा राष्ट्रवादी करवून घेऊ नये...

तूर्त एवढेच : हेमंत जोशी.

Wednesday, 17 July 2019

वेगळे सर्व देवेंद्र पर्व : पत्रकार हेमंत जोशीवेगळे सर्व देवेंद्र पर्व : पत्रकार हेमंत जोशी 

सांताक्रूझ पश्चिमेला आमच्या अगदी इमारतीजवळ जुहू गार्डन आहे जेथे मी अनेकदा सकाळी फिरायला जातो तेथे अलीकडे संघाची प्रभातशाखा भरते, भरायला लागली आहे. प्रार्थनेची वेळ झाली कि मी पण त्यात सहभागी होतो, आता पूर्णवेळ स्वयंसेवक नसलो तरी संघाचे झालेले अनेक उत्तम संस्कार संघशाखेवर प्रार्थना म्हणण्यास भाग पाडतात. अलीकडे नेमका सकाळी पाऊस पडतो त्यामुळे शाखेवर व फिरायला जाणे होत नाही, पण त्यातले दोन सिनियर स्वयंसेवक परवा अगदी ठरवून घरी आले आणि शाखेत न येण्याचे त्यांनी कारण विचारले, विशेष म्हणजे ते दोघेही साधे रिक्षा चालक आणि उत्तरप्रदेशी आहेत. आणि संघात हे असेच नेहमी घडते, तेथे कोणीही लहानमोठे नसते, सारे एकत्र आले जमले कि समसमान असतात हे विशेष....

नेमक्या त्याच संस्कारातून शिस्तीतून या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस घडलेले, जेथे कडवी देशभक्ती आणि राहणीतला साधेपणा आपोआप दररोजच्या विशेष संस्कारातून स्वयंसेवकाच्या रोमारोमात भिनत असतो म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ओळख नसलेल्यांना व ओळख असलेल्या प्रत्येकाला आपले वाटतात, ते आपल्या घरातलेच एक मोठे भाऊ असे साऱ्यांना या राज्यात वाटत राहते. त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असलेल्यांना देखील ते त्यांच्या कुटुंबातले ' दादा ' वाटतात, मोठे भाऊ आहे असे साऱ्यांना वाटते, राज्यातल्या जनतेला ते आपल्यातलेच एक आहेत, जणू आपले कुटुंब सदस्य आहे असे वाटत राहते. जेव्हा केव्हा अनेक राजकीय प्रतिस्पर्धीही फडणवीसांना मग ते त्यांच्या पक्षातले असोत किंवा बाहेरचे कामानिमित्ते भेटायला येतात तेव्हा मनात हेतू किंतु न ठेवता मुख्यमंत्री आम्हाला सहकार्य करीत आले आहेत हे त्यादिवशी अगदी विरोधकांनी देखील थेट सभागृहात फडणवीसांचे कौतुक करतांना अगदी जाहीरपणे सांगितले, त्यांचे मनापासून कौतुक केले....

www.vikrantjoshi.com

मागे केव्हातरी मी लिहिले आहे, श्रीकांत भारतीय हे मुख्यमंत्री कार्यालातले एक सदस्य आहेत, ज्या अनेकांची फडणवीसांच्या व्यस्ततेमुळे भेट होत नाही त्यांना संघ स्वयंसेवक श्रीकांत भारतीय आधार ठरले आहेत. हेच भारतीय दरवर्षी न चुकता पंढरपूर मार्गावर आषाढी एकादशीच्या काळात वारीत गुंतलेले असतात, लाखो वारकऱ्यांची ते संघाच्या माध्यमातून मनापासून काळजी घेतात, त्यादिवसात त्यांच्यातलेच एक होतात. वारी दरम्यान वारकऱ्यांना प्रामुख्याने मोठा त्रास असतो प्रचंड पडणाऱ्या पावसाचा, मागल्या वर्षी आषाढी एकादशी दरम्यान भारतीय मुख्यमंत्र्यांना म्हणाले, वारकऱ्यांना कायम वारीत सतावणारा पाऊस, त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे, आश्चर्य वाटेल, यावर्षी थेट वाऱ्या सुरु होण्याच्या सुरुवातीला लाखो तेही दर्जेदार मोफत रेनकोट्स वारकऱ्यांना देण्यात वाटण्यात आले पण कोठेही त्यावर फडणवीसांच्या नावाचा किंवा त्यांच्या पक्षाचा उल्लेख नव्हता, गाजावाजा न करता हे सारे घडायला हवे, मुख्यमंत्र्यांनी जणू अशी प्रेमाची तंबीच भारतीय यांना दिलेली होती, आणि हि अशी असते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीची वाटचाल, जगभर त्यांचे हे कार्य बिनबोभाट विशेष म्हणजे लोकांच्या खिशातून देणग्या जमा न करता सुरु असते. गुरुपौर्णिमेनिमित्त जो तो स्वयंसेवक भगव्या ध्वजासमोर त्यालाच गुरु मानून गुप्त दक्षिणा ठेवतो त्याभरवंशावर अतिशय काटकसरीने प्रसंगी पदरचे शक्य असेल तरच पैसे टाकून जगभरातले स्वयंसेवक विविध क्षेत्रात कार्य करण्यात, संघ प्रचार व प्रसार करण्यात गुंतलेले असतात...

या राज्यातल्या शरद पवारांसारख्या अत्यंत खतरनाक राजकीय विरोधकाला फडणवीस कसे काय पुरून उरताहेत त्यावर अनेकांना कुतूहल असते, फडणवीसांवर प्रेम करणाऱ्यांना तशी भीती काळजी देखील वाटते. पण तत्वांशी तडजोड करणाऱ्यांशी न घाबरता सामना करून अतिशय थंड डोक्याने यश प्राप्त करणे हे संघ स्वयंसेवकाच्या अंगवळणी पडलेले असते. स्वतःची तारीफ नाही पण न घाबरता भल्याभल्यांशी लिखाणातून पंगा घेणे मला जे जमते, नक्की तो झालेल्या संघ संस्कारांचाच एक भाग आहे हे टाळून चालणार नाही. मनातली भीती कायम निघून गेलेली असते. मृत्यूचे भय कदापिही आम्हा वाटत नाही. थेट पाच लाख वारकऱ्यांना तेही दर्जेदार रेनकोट्स वाटप तेही गाजावाजा न करता, देवेंद्र यांचे हे असे कायम वागणे आहे. मी अमुक साठी तमुक केले असे ते उपकाराच्या भावनेतून जो भेटेल त्याला दवंडी पिटल्यासारखे कधीही सांगतांना ते दिसणार नाहीत. त्यांच्या वाढ दिवसानिमीत्ते त्यांना काही तुम्हाला गिफ्ट द्यायचे असेल तर एक करा, येथे आवर्जून विशेषतः त्यांना भेटणाऱ्या किंवा त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नेत्यांना सांगावेसे वाटते कि अमुक एखादे काम झाले नाही किंवा केले नाही तर आधी केलेली कामें त्याचे उपकार विसरून तुमच्यातले बहुतेक नेते जी एखाद्याची बदनामी करीत सुटतात, ती पद्धत अतिशय चुकीची आहे. केवळ कामांच्या मोबदल्यात मैत्रीचा हात पुढे करणे, सध्याच्या कपटी हलकट राजकारणातले हे स्वार्थी गणित केव्हातरी कधीतरी चांगल्या मंडळींच्या बाबतीत बाजूला ठेवणे अत्यंत गरजेचे असते, आवशयक ठरते. देवेंद्र फडणवीस हे या राज्याला पडलेले अत्युत्तम स्वप्न आहे, त्याची सतत मनाला जाणीव ठेवायला हवी आणि हेच गिफ्ट त्यांना तुम्ही नेत्यांनी मोठ्या मनाने द्यायला हवे...
क्रमश: हेमंत जोशी.

देवेन्द्रजी अभिष्टचिंतन : पत्रकार हेमंत जोशी


देवेन्द्रजी अभिष्टचिंतन : पत्रकार हेमंत जोशी 
फडणवीसांचा २२ जुलै वाढदिवस, काळबादेवीला ठक्कर क्लब मध्ये भली मोठी अप्रतिम थाळी मिळते. थाळी समोर आली कि त्यातले काय काय खावे किती किती खावे असे खाणार्यांचे होते तसे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमीत्ते आमचे झाले आहे म्हणजे त्यांच्यावर काय काय लिहावे आणि कित्ती कित्ती लिहावे, अवघ्या साडेचार पाच वर्षात मुख्यमंत्री म्हणून अफाट कामगिरी त्यामुळे त्यांनी भल्याभल्यांना घाम फोडला आहे, विरोधकांच्या तर तोंडचे पाणी पळविले आहे. जे फडणवीसांच्या पार्टीत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते त्यांना तर देवेंद्र यांनी केव्हाच मागे टाकले, बघता बघता ते इतरांच्या तुलनेत खूप पुढे निघून गेले...

www.vikrantjoshi.com

फडणवीसांचे लोणीकरांसारखे नाही म्हणजे गाव तेथे कुटुंब किंवा त्यांना व्यसने नाहीत कि बसले चौफुल्याला जाऊन नगरवरून येता येता, ज्यामुळे फाजील वेळ खर्च व्हावा, दारू पिणे नाही सिगारेट ओढणे नाही, विदर्भातले असूनही ते आळशी नाहीत कि दुपारच्या वेळी घेतले घराचे दरवाजे लावून आणि झोपले नवरा बायको चार चार तास, आमच्या विदर्भात तर असे कितीतरी कि जे दुपारी सतत आठ दहा दिवस झोपले कि शेजारचे लगेच अंदाज बांधतात, बाळंतपण कोणत्या महिन्यात येईल ते. वरून देवेंद्रजींचे प्रचंड ज्ञान, अगदी लहान वयात महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातला विविध विषयांचा सखोल अभ्यास, त्यांच्याशी बोलतांना अनेकदा मला दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार आठवतात. त्यामुळे एकाचवेळी दहा दहा मुख्यमंत्री करतील एवढी कामें त्यांनी एकट्याने अल्पावधीत मुख्यमंत्री म्हणून उरकलीत, पद्धतशीर पूर्ण केली, करताहेत. झोप आवश्यक आहे तेवढी घेतात, फारतर ५-६ तास तेही कधी कधी झोपतात इतरवेळी फक्त आणि फक्त राज्याच्या विचारात गढलेले असतात. त्यामुळे पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी जे काव्य म्हणून दाखविले ते पुन्हा प्रत्यक्षात नक्की उतरणारे, काव्य असे, 
मी पुन्हा येईन, याच निर्धाराने, याच भूमिकेत, 
याच ठिकाणी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, 
मी पुन्हा येईन, गावांना जलयुक्त करण्यासाठी, 
शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, 
माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त 
करण्यासाठी, 
नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, 
मी पुन्हा येईन माझ्या युवा मित्रांना अधिक 
सक्षम बनविण्यासाठी, 
माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी, 
नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, 
मी पुन्हा येईन याच निर्धाराने याच भूमिकेत, 
याच ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची साथ घेत, 
त्याचा हात हातात घेत, 
माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देण्यासाठी, 
नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन...
केवळ शब्दांचे इमले बांधणारे देवेंद्र असते तर त्यांना याच ठिकाणी शब्दातून नक्की आडवेतिडवे मी घेतले असते पण त्यांना त्यांच्या लहानपणापासून मी बघत आलोय, शब्दाला खरे कालवून दाखविणारे आणि सांगितलेल्या वाक्यांना प्रत्यक्षात उतरविणारे हे व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी लिहिलेले याठिकाणी उल्लेख केलेले काव्य ते जसेच्या तसे खरे करवून दाखवतील असे मनाला वाटत राहते. ईव्हीएम मशीन मध्ये फेरबदल गडबड करून फडणवीस सत्तेत आले किंवा पुन्हा सत्तेत येतील याला नक्की अर्थ नाही. ते म्हणालेत तेच खरे आहे कि ईव्हीएम मशीन हे सन २००४ मध्ये होते व २००९ मध्ये होते, तरी देखील मनमोहनसिंग हे पंतप्रधान झाले. काही दिवसांपूर्वीच्या निवडणुकीत तीन राज्यात अन्य पक्षांची सत्ता आली. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीमती सुप्रिया सुळे निवडून आलेल्या आहेत. असे असतांना ईव्हीएममध्ये दोष आहे असे आपण कसे काय म्हणू शकतो ? फडणवीसांच्या या सभागृहातील म्हणजे जाहीर वक्तव्याला नक्की अर्थ आहे. मतदारांचे मत या राज्यातही आघाडीविषयी वाईट झालेले असल्याने किंवा प्रगती केवळ आपल्या कुटुंबाची हेच आघाडीतले धोरण होते त्यामुळे मतदार या महा भ्रष्ट राजवटीला कंटाळे त्यातून त्यांनी एकत्रितपणे युतीला मतदान केले, पुढल्या पंचवार्षिक योजनेत जर युती हि आघाडीच्या पावलावर पाऊल टाकून मोकळी झाली तर मतदार नक्की परिवर्तन पुन्हा घडवून आंतील...
अपूर्ण : हेमंत जोशी.

निवडणूक कि अडवणूक : पत्रकार हेमंत जोशी


निवडणूक कि अडवणूक : पत्रकार हेमंत जोशी 
जे प्रिंट आणि टीव्ही मीडियामध्ये नवीन आहेत त्यांच्यात चंचल वृत्ती अस्थिर स्वभाव असणे अपेक्षित आहे किंबहुना ते त्याच पद्धतीने बहुतेक ठिकाणी वृत्तपत्र किंवा बातम्यांच्या वाहिन्या सांभाळतांना दिसतात. मी अनेकदा मित्रांना गमतीने म्हणतोही कि विजय दर्डा किंवा सुभाष गोयल त्यांच्या मराठी स्टाफला काय वापरून घेतील, याउलट त्यांच्याकडे काम करणारे असे मी कितीतरी बघतो कि तेच गोयल जैन किंवा दर्डांसारख्या मंडळींना मोठ्या खुबीने वापरून घेतात. त्या झी मराठीवर किंवा अन्यत्र असे काही महाभाग आहेत कि ज्यांनी गोयल दर्डा जैन इत्यादींच्या मालकीच्या मीडियाचा वापर करून दहशत पसरवून स्वतःचे असे मोठे उद्योगाचे किंवा कंत्राटदार म्हणून जाळेच उभे केले आहे. त्यांना मिळणारे वेतन त्यांच्यासाठी चखण्यासारखे असते, म्हणजे मीडियाने अशा मंडळींना वेतन जरी दिले नाही तरीही त्यांचे काहीच अडणार नाही...

स्वतःला विकणे हे अलीकडे वृत्तपत्र, टीव्ही इत्यादी मीडियामध्ये अतिशय कॉमन झाले आहे. सऱ्हास तोच प्रकार आहे असेही म्हणणे चुकीचे आहे पण बहुतेकांनी लाज सोडली आहे हि वस्तुस्थिती आहे. मीडियावर विश्वास ठेवून सामान्य माणूस आपले मतदान ठरवतो ते बघून मात्र वाईट वाटते. अलीकडे हेमंत देसाई बाळासाहेब थोरातांना स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणालेत किंवा अशोक चव्हाण मोठ्या मनाने अध्यक्ष पदावरून बाजूला झाले असे सुकृत खांडेकर म्हणाले. देसाई किंवा खांडेकर यांच्या सारखे प्रदीर्घ अनुभवी पत्रकार जेव्हा पोरकट विधाने करून लोकांच्या डोळ्यात धूळफेक करतात तेव्हा तर मनापासून हसू येते. नेत्यांविषयी नेमकी वस्तुस्थिती माहित असतांना हे असले पोरकट मतप्रदर्शन तेही मीडियातल्या बुजुर्गांनी करणे चुकीचे वाटते. सामान्यांना न फसविणारी मीडिया असावी....

तिसरा मुद्दा तोंडावर आलेल्या विधान सभा निवडणुकीचा. त्याकडे बघितले तर असे लक्षात कि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या राज्यात काँग्रेस मनसे राष्ट्रवादी इत्यादी विरोधकांना काहीच गमवायचे नाही. जे काय गमवायचे होते ते त्यांनी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गमावलेले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत जे काय गमवायचे आहे ते भाजपा आणि सेना युती गमावणार आहे. वंचीत आघाडीचे बांगला देशाच्या क्रिकेट टीम सारखे असते म्हणजे हरण्याची त्यांना एवढी सवय झालेली आहे कि जर ते कधी कुठे अधून मधून जिंकले तर तोच त्यांचा परमोच्च आनंद असतो. आपल्यामुळे काय घडले पेक्षा आपल्यामुळे काय बिघडले हे बघून त्यांना अधिक आनंद होत असतो. प्रभावी एकखांबी नेतृत्व त्यांच्याकडे नसल्याने वंचित आघाडी राजकारणात लागणाऱ्या लॉटरीवर जगत असते.येत्या विधानसभा निवडणुकीत खऱ्या अर्थाने युती खूप काही गमावू शकते...

तिकीट वाटपावरून आधीच चार बाहेर पडले आहेत त्यात आणखी चार बाहेर पडले तरी त्याचे वाईट आणि आस्चर्य आघाडीला अजिबात वाटणार नाही, वाईट वाटेल ते युतीला, नुकसान होईल ते युतीचे कारण तेथे आमदारकीचे तिकीट मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा प्रत्येक मतदारसंघात आहे आणि तीच सेना भाजपा युतीची मोठी डोकेदुकी ठरणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ज्याला त्याला वाटते कि उमेदवारी आपल्याला मिळावी कारण युतीकडून यावेळी निवडून येणे सोपे आहे आणि निवडून आल्यानंतर आपल्याला मंत्री व्हायचे आहे. सारे इच्छुक या अशाच ध्येयातून विधान सभा निवडणुकीवर डोळा ठेऊन आहेत. महत्वाचे म्हणजे शिवसेनेने मंत्री करतांना किंवा अलीकडील मंत्रिमंडळ विस्तार करतांना जे मतदारातून निवडून आले होते त्यांची साधी दखलही न घेतल्याने तेथे नाराजांची मोठी संख्या आहे. हि विधानसभा निवडणूक उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांची कठीण अशी परीक्षा घेणारी निवडणूक आहे, त्यात ते जर नापास झाले तर त्यांना त्या अपयशाची मोठी किंमत मोजावी लागू शकते. अत्यंत स्वाभाविक आहे किंवा तेच अपेक्षित आहे कि युतीतल्या प्रत्येक इच्छुकाला उमेदवारी देणे अशक्य आहे त्यामुळे त्यांच्याकडे बंडाळी होऊन इच्छुक दुसरा पर्याय निवडण्यासाठी बाहेर पडतील, इतरांचे दरवाजे ठोठावून मोकळे होतील आणि याच बंडाळीवर शरद पवार नजर ठेऊन आहेत....

www.vikrantjoshi.com

यश अपयश अडीअडचणी इत्यादींची उद्धव ठाकरे यांना देखील बऱ्यापैकी सवय आहे, सवय नाही ती देवेंद्र फडणवीस यांना कारण सत्तेत आल्यापासून सारे काही त्यांच्या सतत त्यांच्या मनासारखे घडत आले आहे. या पंचवार्षिक योजनेत नशीब त्यांच्याबाजूने होते ते कायम तसेच त्यांच्याचबाजूने घडेल असे राजकारणात होत नसते त्यामुळे जशी त्यांनी यशाची सवय करवून घेतली तीच सवय त्यांना अपयश मिळाले तरी डगमगून न जाण्याची सवय लावून घ्यावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत जसे नागपुरातून आमदार म्हणून आशिष रणजित देशमुख किंवा खासदार म्हणून नाना पटोले आणि नेते म्हणून शरद पवार या तिघांचे अंदाज चुकले त्यातून त्यांनी स्वतःचे मोठे राजकीय नुकसान करवून घेतले ते तसे यावेळीही काहींचे होऊ शकते म्हणून क्षणिक राजकीय संधीला प्राधान्य दिल्यापेक्षा लॉयल्टी ठेवणार्या नेत्यांना राजकीय फायदे अनेक असतात हे ध्यानात ठेऊन ज्या त्या इच्छुकाने सावध निर्णय घ्यावेत म्हणजे फायदे होतात. नेते, बाळासाहेब थोरात होतात, मोठे होतात. संधी येण्यासाठी वाट पाहावी लागली तरी चालेल पण धरसोड करणे फायद्याचे नसते हे ज्याने त्याने ध्यानात ठेवावे...

शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांना, आशिष देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना आणि नाना पटोले यांनी एकंदर भाजपा व गडकरी फडणवीस यांना अंडरएस्टीमेट केले स्वतःचे मोठे तूर्त राजकीय नुकसान करवून घेतले. पवारांनी जर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या बाबतीत मवाळ आणि मैत्रीची भूमिका बजावली असती तर त्यांना ते अधिक फायद्याचे ठरले असते पण पवारांना सांगणे म्हणजे पेटत्या दिव्यावर हात ठेवण्यासारखे ते असते म्हणून कोणीही त्यांना काहीही सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. नुकसान पवारांचे होते त्यातून त्यांना नेहमीच्या प्रताप आसबे यांचा आधार घेऊन मुलाखतीततून वेगवेगळे पिल्लू सोडावे लागतात, गोंधळाचे वातावरण तयार करायचे असते. प्रताप आसबे यांच्या मुलाखतीमध्ये कोणताही दम नसतो पण वातावरण निर्माण करण्यासाठी पवार आसबेंचा नेहमीप्रमाणे उपयोग करवून घेतात, संपलेल्या आसबेंना त्यातून उगाचच आनंद होतो. मी आजही कसा पत्रकारितेत जिवंत आहे, जक्खड आसबेंना तेवढेच मनाला बरे वाटत असावे...
हेमंत जोशी.

Tuesday, 16 July 2019

OFF THE RECORD review on some of headlines...

OFF THE RECORD review on some of headlines...

1. Mallikarjun Kharge, Vishwajit Kadam & Brahmins...

Mallikarjun Kharge incharge of INC Maharashtra has proved once again why he is the big fish when it comes to taking decisions in Maharashtra Congress. It was after his green signal that Balasaheb Thorat got the nod to head Congress in the state. But now, lately it has been observed and heard in the corridors of power that Kharge is in no mood to uplift Brahmins of his party. In the recent reshuffle when Thorat was appointed as the President of Congress in Maharashtra, and others Working President posts were filled, Kharge did justice with the OBC's, Muslims,  Maratha's (Bhai Jagtap will soon be getting the good news) of the party. But he has avoided Brahmins to get elevated in the party. Kharge saab, I know Congress is a very secular party, but Brahmins in your party are gossiping of getting ill treatment from you. Also, forget Brahmin's, your one Maratha leader is thinking of shifting loyalties. Vishwajit Kadam, son of ex Minister Patangrao and son-in-law of Avinash Bhosale has often been cited in the company of MLC and Minister Parinay Fuke of the BJP and mostly they meet at Chandrakant Patil's bunglow and zoom in laters car nowadays. Everyone knows Avinash Bhosale enjoys good relations with CM Fadnavis too, but loosing Kadam at this juncture I think reached your ears and you made him the working president after skipping bigwigs like Harshvardhan Patil & Amit Deshmukh who are merely another loners at the Tialk Bhavan. From Deshmukh, I recollect, when Amit came up to you with a certain candidate to be chosen from the Latur consituteny you just insulted him and went ahead with your own choice who lost with a huge margin. All said & done, Mr. Kharge, Deshmukh's of Latur cannot be avoided, and yes, keep a check on your Brahmin leaders--nowadays, Devendra Fadnavis is on a shopping spree. 

2. Chandrakantdada Patil as State President & Mangal Prabhat Lodha as City President. 
This is what Devendra Fadnavis is all about. Clipping wings. Whilst Ranjit Patil was forefront in the race to become the Maharashtra President for the BJP, his daughters marriage to Pratap Sarnaik's son must have created some hustle bustle in CM's mind. Hence "patta" cut. But now appointing Chandrakant dada is a great move or again clipping wings? Chandrakant Patil has handled Revenue & the PWD (the most corrupt departments otherwise) and now with this new responsibility will the No 2 and Amit Shah "da ladlaa" resign and help the party gain more stronger base in the state? Or will this arrangement of being the Minister & handling the party continue? Also Chandrakant Patil has been the only Minister in the cabinet of Fadnavis who never TRIED to go ahead of Fadnavis. Don't ask me about corruption. Every Minister or a journalist climbing the stairs of Mantralaya are corrupt, the definition for many changes. Anyways, appointing Mangal Prabhat Lodha has to surely to do with clipping more wings of Sharad Pawar of the BJP_-Ashish Shelar. Now there are groups of MLA's who supported Shelar and who were against Shelar. One MLA from Mumbai since last two days is said to be in Delhi outside JP Nadda's office wanting to become the city chief, but in vain. With Lodha's money power the whole equation of Mumbai BJP changes. Lodha is the most neglected BJP member till date I assume. Never has anyone had any close equations with him in the BJP including sitting MLA's & Corporators. CM in this way by appointing Lodha has got his lost control of Mumbai in his own hands...Here Mohit Bhartiya is also doing a good job at the BJYM handling all the restaurants who were once troubled by a certain MLA in our suburbs. Impressed by this CM Fadnavis has given him the charge of the rallies slated to happen in August across Maharashtra. 

www.vikrantjoshi.com

3. 26 IAS transfers.
I'm done with this now. Forget Fadnavis, tomorrow even Indra bhagwan also walks down to Mantralaya and say's to one officer--My friend you do your job for 3 years, no political pressure and nothing can come in the middle of your performance till you are eligible of transfer--I still will not believe. Majority here transfers happen if the MLA complains. I don't know what to do with officers like Khushwah or Tuakram Mundhe's or such other "head strong" officers. Now at Mhada if gossip is to be believed Chairman Uday Samant rattled CM's brain to transfer Khushwah as the IAS refused to sign any file. But Uday ji, how can Navjivan School plot be transferred without verification just because a call came to you from Matoshri? Not done nah....But again look at the Channakya Fadnavis here. Uday Samant insisted on bringing Chandrakant Dange in place of Khushwah. CM has appointed another Khushwah namely Radhakrishnan B...See the changes in bureaucracy at the new Ministers. All new Ministers whom Fadnavis think have come for "3 month picnic" under everyone he has given Non-corrupt and straight forward officers. Forget "kamaai" these officers will not pass a single file without consulting apt people at the CSO & CMO. CSO, you heard it right...CM has brought power back to the CSO. He is making institutions strong...Governance will follow with institutions are backed up...