Thursday, 20 June 2019

आपला मराठी बिग बॉस : पत्रकार हेमंत जोशी

आपला मराठी बिग बॉस : पत्रकार हेमंत जोशी 

आयुष्यात नेहमी छान छान घडावे असे वाटत असेल तर आज ज्या पद्धतीने बहुतेक भारतीय वागताहेत ते तसे वागणे जरा सोडून बघा, आयुष्याकडे, विशेषतः इतरांकडे सतत निगेटिव्ह बघण्याने, प्रतिस्पर्ध्यांचे सतत वाईट कसे होईल या विचाराने आयुष्याकडे बघू नका अर्थात स्वतः मी हे फॉलो करतो,माझ्या कुटुंबात एखादया हिंदी मराठी मालिकेसारखे वातावरण तयार होणार नाही याची काळजी घेतो. इतरांकडे सकारात्मक नजरेतून बघण्याचे फायदे फार होतात. माझा एखादा मित्र किंवा नातेवाईक मी जवळून बघत असतो कि तो सतत डोक्यात निगेटिव्ह विचार ठेवून जगतो, माझ्या असे लक्षात येते कि त्यातून त्याच्या वाटेला आलेले सुख तो या डावपेच खेळण्याच्या वृत्तीतून उपभोगू शकत नाही, सतत चांगले विचार, तुमचे आयुष्य आपोआप सुंदर बनत जाईल मग ओढवलेल्या एखाद्या संकटात किंवा दुख्खात देखील जगण्याचे बळ तुमच्या शरीरात नक्की निर्माण होईल.हे मी तुम्हाला येथे यासाठी सांगतोय कि कलर वाहिनीवर सध्या सुरु असलेल्या बिग बॉस या कार्यक्रमात जो तो एकमेकांशी डावपेच लढवून खेळून हि स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करतोय, सकारात्मक पद्धतीने माणूस यशस्वी होऊच शकत नाही हा नेहमीचाभारतीय घराघरातला हलकट विचार जणू त्यात यशाचे गमक म्हणून दाखवल्या जातोय, जे अत्यंत हिडीस वाटते...

अलीकडे वर्षा दोन वर्षात मराठीत देखील बिग बॉस चे फॅड आले आहे, सध्या कलर वाहिनीवर आपण हा कार्यक्रम बघतोय. मी सहसा असले टुकार कार्यक्रम बघत नाही पण आधीच्या मराठी बिग बॉस मध्ये आमचे मित्र पत्रकार अनिल थत्ते होते आणि यावेळी माझी जवळची मैत्रीण अभिनेत्री मैथिली जावकर असल्याने मराठी बिग बॉसबघण्याचा मोह आवरला नाही. वाईट वाटले ते गायिका वैशाली माडे बद्दल. वास्तविक ती मोठ्या उंचीची मराठी आणि हिंदीतली व्यस्त आघाडीची गायिका. तिने बिग बॉस या मॅनेज केल्या जाणार्या कार्यक्रमात वास्तविक सहभागी व्हायला नको होते त्यातून तिने स्वतःची किंमत कमी करून घेतली. सुरेख पुणेकर यात सहभागी झाल्या आहेत, त्यांचे आणि दिवंगत वसंत डावखरे यांचे हटके संबंध असतांना एकदा अचानक त्या दोघांची आणि माझी कुठेतरी गाठ पडली मग डावखरे यांनीच नाईलाज झाल्याने माझी सुरेखापुणेकर यांच्याशी ओळख करून दिली होती...


www.vikrantjoshi.com

आधीच्या बिग बॉस मधली विनर अभिनेत्री मेधा धाडे आणि यावेळची स्पर्धक गायिका वैशाली माडे यांचे वैवाहिक आयुष्य तसे खूपच सेम सेम आहे म्हणजे ज्यांनी त्यांच्यावर शारीरिक अत्याचार बळजबरी केली त्याच तरुणांशी पुढे जाऊन त्यांना लग्न करावे लागले,विशेष म्हणजे त्यांना त्या प्रकारच्या नवऱ्यापासून दोघींनाही एक एक मुलगी आहे. पण या दोघांच्या त्या विवाहाकडे आणि मुलींना जन्म देण्याच्या एकंदर प्रोसेस कडे बघून हेच वाटते कि आपल्या या महाराष्ट्रात देखील बिहार सारखेच घडत असते फक्त वैशाली माडे आणि मेधा धाडे या दोघी भोवती ग्लॅमर असल्याने आपल्याला त्यांचे आयुष्य कळले पण अशा अनेक मेधा किंवा वैशाली या राज्यात असाव्यात ज्या आयुष्याच्या ऐन तरुण टप्प्यावर पुरुषांच्या वासनेला बळी पडलेल्या असतील, दुर्दैवाने ते बाहेर येत नाही पण या अशा तरुण स्त्रियांचे आयुष्य अंगावर शहारे आणणारे असते. अर्थात मेधा आणि वैशाली दोघींनीही पुढे स्वतःला सावरले आणि खंबीर मनाने कठीण परिस्थितीवर मात करीत त्या दोघीही प्रसिद्धीच्या झोतात आल्या. मेधा घाडगे यांनी सुपरस्टार नावाचा सिनेमा काढल्याचे मला आठवते ज्यात हिरो सिद्धार्थ जाधव होता, वास्तविक त्या सिनेमाशी संबधित एक व्यक्ती मला मेधा यांचे दुसरे पती असावेत वाटायचे पण बिग बॉस मध्ये तिसराच कोणीतरी समोर आला. जाऊ द्या चित्रपटसृष्टीत हे अतिशय कॉमन आहे, 
म्हणून तिकडे लिखाणासाठी वळावेसे वाटले नाही...

दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे कलर च्या या बिग बॉस कार्यक्रमात ज्यांना सहभागी करून घेतल्या जाते त्यांचा इतिहास फसवाफसवीचा आहे का हे कलर वाहिनी किंवा दस्तुरखुद्द महेश मांजरेकर इत्यादींनी आवर्जून तपासले पाहिजे पण ते तसे होतांना घडतांना तेथे आढळत नाही, आढळले नाही त्यामुळे लोकांशी गोड गोड बोलून त्यांना आर्थिक फसविणारे मागल्या वेळी आणि यावेळीही सहभागी झालेले काही महाभाग, काही स्पर्धक मी त्यात बघतो आहे, बघितले आहेत. विशेष म्हणजे यावेळच्या बिग बॉस मध्ये एक स्पर्धक तर असा आहे कि लोकांना फसवून लुबाडून चरितार्थ चालविणे हेच त्याच्या आयुष्याचे ध्येय आहे. विशेष म्हणजे नेमके यावेळी या अशा चीटर पुरुष स्पर्धकाला यशस्वी होतांना ते दाखवताहेत, बिग बॉस मधला हा भामटा आणि व्यसनांच्या अतिशय आहारी गेलेला स्पर्धक लोकांना,मुलींना जाळ्यात ओढून ' एखाद्या पुणेरी भामट्यासारखा ' नेमका कोण आहे हे लोकांनी,मुलींनी ओळखावे आणि त्याच्या या ग्लॅमर ला भुलून त्याने अमुक एखादी योजना तुमच्यासमोर भविष्यात मांडलीच तर त्याच्या फसविण्याला कृपया बळी पडू नये. तो जे बिग बॉस मध्ये स्वतःचे मोठेपण रंगवून कधी एखाद्या मुलीला जाळ्यात अडकवितोय किंवा स्पर्धेत हिरो म्हणून जिंकण्याचा प्रयत्न करतोय, गावभराची माहिती ठेवणार्या महेश मांजरेकर यांनी हेही बघितले पाहिजे. समाजाने ओवाळून टाकलेल्या मंडळींना मांजरेकर आणि कलर वाहिनीने उगाच मोठेपण देऊ नये, प्रवेश देखील देऊ नये...
पुढल्या भागात : तूर्त एवढेच.

No comments:

Post a comment