Saturday, 8 June 2019

संघ आणि शरद पवार : पत्रकार हेमंत जोशीसंघ आणि शरद पवार : पत्रकार हेमंत जोशी 
भाजपाला मतदान करणाऱ्या अनेक मतदारांचे खासदार पत्रकार कुमार केतकर यांच्यासारखे आहे अर्थात प्राण्यांचेही तसेच असते म्हणजे लग्न न करता एकत्र राहण्यासारखे. प्रत्येक संघ स्वयंसेवक हा भाजपाचा कार्यकर्ता आणि मतदारही असतो पण भाजपाचा कार्यकर्ता किंबहुना नेते मंत्री देखील संघ स्वयंसेवक असावेत असे आवश्यक नाही, नसते. सक्तीही नसते. त्यामुळे या देशात, केंद्रात किंवा अन्यत्र राज्यात जेथे जेथे भाजपाची सत्ता आली त्यावरून उठसुठ संघाला जे क्रेडिट देणे सुरु आहे ते काही अंशी योग्य नाही त्यामुळे कधीही संघाशी संबंध न आलेल्या पण भाजपाला मतदान करणाऱ्या मतदाराला, भाजपाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना नक्की वाईट वाटेल...

पण भाजपामध्ये काम करणाऱ्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संघाचे विचार नक्की समजावून घ्यावेत त्यामुळे भाजपामध्ये अशांना काम करणे कार्यरत राहणे खूप सोपे जाऊ शकते. हे नक्की आहे कि भाजपा किंवा आधीचा जनसंघ किंवा अन्य कितीतरी संघटना केवळ संघाच्या मुशीतूनच तयार झाल्या आहेत, जन्माला आले आहेत पण संघाच्या अन्य कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्यांनी संघात स्वयंसवक म्हणून काम करायलाच हवे असे अजिबात नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये कार्यरत असलेले असणारे कितीतरी सदस्य आहेत ज्यांनी संघाचे कधी साधे तोंड बघितलेले नाही, नसते. त्यामुळे आजकाल विशेषतः मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर संघावर मीडिया, सोशल मीडियावरून जे वाट्टेल ते लिहिणे सुरु आहे, ते अनेकदा चुकीचे वाटते. अत्यंत महत्वाचे म्हणजे आधी संघात नियमित जाणारे पण काळाच्या ओघात भाजपामध्ये पूर्णवेळ गुंतलेले असे कितीतरी आहेत कि ज्यांचा पुढे पुढे संघाशी संबंध कमी होत गेलेला आहे...

www.vikrantjoshi.com

एक मात्र नक्की आहे कि संघाने अटलजींसारखे या देशाला दिलेले किमती हिरे त्यांची किंमत न मोजता येणारी. देशाचे राष्ट्रपती असोत कि पंतप्रधान किंवा सुमित्रा महाजन, गृहमंत्री, उपराष्ट्रपती किंवा देशातले १८ मुख्यमंत्री २९ राज्यपाल एकेकाळी संघाचे स्वयंसेवक म्हणून काम केलेले थोडक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्यागाने जगलेल्यांना त्यांच्या कष्टाचे आणि निष्ठेचे नक्की फळ मिळालेले आहे पण संघ त्यासाठी आधी समजावून घ्यावा लागतो त्याचे इतर काही बाजारू राजकीय पक्षांसारखे नाही कि जा संघात आणि घ्या सत्ता हातात, संघाच्या कडक शिस्तीत तयार झाल्यानंतरच काहीतरी पदरात पडण्याची तेही शक्यता असते. येथे साऱ्याच स्वयंसेवकांना सारे काही मिळते असे अजिबात नाही, एक मात्र नक्की, देशसेवा करण्याचे शंभर टक्के समाधान मात्र मिळते...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे हिंदूंच्या उत्तमोत्तम संस्कारांची सुविचारांची संघटना. गाव तेथे गुंड तसे संघातही काही वाईट विचारांचे स्वयंसेवक घुसलेले दिसतात पण या देशाचे फार वाईट व्हावे असे त्यांनाही वाटत नसल्याने असे सडके आंबे संघाला देखील खपवून घ्यावे लागतात. संघ नेमका कसा हे शरद पवारांसहित आता सर्वांना समजावून घ्यावासा वाटतो यातच संघाचे आणि संघातल्या अनेकांच्या आजवरच्या बलिदानाचे यश दडलेले आहे. शरद पवार यांनी त्यांचे मत उघड व्यक्त केले इतरांना तसे वाटते पण बोलण्याची हिम्मत होत नाही. त्यामुळे शरद पवारांच्या वक्तव्यावर जी उघड टीका केली जाते आहे, त्यांची खिल्ली उडविली जाते आहे ते अतिशय लाजिरवाणे आहे. अनेक हिंदी मराठी चित्रपटातून जसे त्यातले खलनायक अगदी शेवटी आपली चूक सर्वासमोर मान्य करतात ते तसे शरद पवारांच्या बाबतीत घडले समजून पुढे जावे उगाच त्यांना हिणवू नये. येथे शरद पवार देखील खलनायक आहेत असा कृपया अर्थ काढू नये...

कुठेतरी वाचलेला एक चुटका खास तुमच्यासाठी : 
सत्यनारायणाच्या आरतीचे तबक माझ्यासमोर आले आणि हळूच मी खिशातली दहा रुपयांची फाटकी नोट तबकात टाकून त्यातले नऊ रुपये काढून घेतले. फाटकी नोट खपली वरून नऊ रुपये काढून घेतल्याच्या आनंदात मी पटकन मागे वळलो. मागे वळून बघतो तर काय, शेजारच्या काकूंनी माझ्या हाती दोन हजाराची नोट दिली. मी लगेच ती नोट तबकात टाकली पण माझीच मला लाज वाटली कि काकूंनी तब्बल दोन हजार रुपये टाकायला दिले आणि मी केवढा हलकट, फाटकी नोट टाकून थेट देवाला फसविले...
दरवाजा बाहेर पडलो नि शूज घालायला लागलो तर काय त्या काकू देखील पुन्हा शेजारीच आल्या चपला घालायला. रागावून मला म्हणतात कशा, पैशांची किंमत ठेवा रे, समजा तुझ्या खिशातून पडलेल्या दोन हजाराच्या त्या नोटेकडे माझे लक्ष गेले नसते तर...
तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment