Saturday, 29 June 2019

राजकीय गोंधळ : पत्रकार हेमंत जोशी

राजकीय गोंधळ : पत्रकार हेमंत जोशी 

साऱ्याच राजकीय परिघात पक्षात सध्या कमालीचा गोंधळ उडालेला आहे. जे जिंकलेत त्यांना स्वतःलाच कळत नाही अनपेक्षित प्रचंड यश कसे मिळाले ते, आणि जे पराभूत झाले त्यांची अवस्था तर थेट कोमात गेलेल्या पेशंटसारखी झालेली आहे , जे जिंकून आलेत त्यांना तर थेट जाह्नवी कपूरसंगे बेडसिन केल्याचा आनंद होतो आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व मानणाऱ्या नेत्यांना, पक्षाला मतदारांनी पसंती दिली आहे हे नक्की त्याचे खूपसे बरेचसे श्रेय रा. स्व. संघ आणि त्यांच्या जगभर पसरलेल्या विविध फांद्यांना जाते....देशातल्या राज्यातल्या नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर संघाचे कार्यकर्ते म्हणजे संघस्वयंसेवक विशेषतः सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह झाले आहेत, मोठ्या खुबीने त्यांचा संघ प्रसार संघ प्रचार सुरु आहे, त्यात  काही वावगे असेल तर हिंदुत्वाच्या जोडीला जो अलीकडे मोठ्या प्रमाणावर दांभिक धार्मिकतेला विशेषतः संघस्वयंसेवकांकडून रंग चढविल्या जातोय म्हणजे विविध देव देवतांचे पूजाअर्चा इत्यादींचे जे स्तोम माजविण्याचा प्रकार घडतोय, मुद्दाम केल्या जातोय ते खूप वाईट आहे. या देशातल्या किंवा आपल्या राज्यातल्या ब्राम्हण वर्गाचे महत्व, त्यांच्यापाशी असलेल्या विद्ववत्तेचे महत्व केव्हा कमी झाले जेव्हा त्यांनी त्यांच्या विद्ववत्तेला धार्मिकतेची फोडणी देऊन लोकांना कमकुवत बनविण्याचे काम सुरु केले होते. म्हणजे सत्यनारायण केला तर काय फायदे होतात हे सांगण्यापेक्षा जर त्यांनी सार्वजनिक सेवेचे महत्व सांगून त्यातून कसे स्वर्गात स्थान मिळते सांगितले असते तर ब्राम्हणांना गांधी वधानंतर जो प्रचंड त्रास झाला, सर्वोतपरी त्रास देण्यात आला, तो नक्की झाला नसता कदाचित हे असे काही काळानंतर हिंदू संघटनांचे हे असे ब्राम्हणांसारखे अचानक महत्व कमी होऊ शकते जर त्यांनी हिंदू या महान संकल्पनेला विनाकारण पाखंडी अशा धार्मिकतेची अति जोड दिली तर...

www.vikrantjoshi.com

देवदेवतांचे चमत्कार सांगून हिंदुराष्ट्र या संकल्पनेचे किंवा या संकल्पनेशी संबंधित नेत्यांचे राजकीय पक्षांचे महत्व नक्की वाढणार नाही किंवा टिकणार नाही किंवा जे महत्व अलीकडे अचानक वाढले आहे मोदी यांच्या निवृत्तीनंतर ते एका झटक्यात कमी होऊन त्याचा फायदा देशाला हानी पोहोचविलेल्या काँग्रेस व त्या विचारांच्या नेत्यांना नक्की होऊ शकतो त्यापेक्षा हिंदू धर्म किंवा हिंदू धर्माचे उत्तम संस्कार त्याचे महत्व जर सर्वसामान्य मतदारांमध्ये रुजविण्यात हिंदू संघटना यशस्वी ठरल्या त्याला संपूर्ण भ्रष्टाचारविरहित राष्ट्राची जोड दिली तर ते यश कायम टिकणारे असेल...बजेट सेशन मध्ये मी विधान भवनात कुठल्याशा कामानिमित्ते अलीकडे गेलो असता कुठल्याशा वाहिनीवर काम करणारा माझा मित्र हेमंत बिर्जे भेटला, त्याच्याशी गप्पा मारतांना समोरून मंत्री सदाभाऊ खोत आले, मला म्हणालेत, बरे झाले तुमची येथेच भेट झाली पुढे म्हणाले तुम्हाला ज्या वृत्तपत्रांच्या कात्रणांविषयी म्हणालो होतो ते मी आणले आहेत असे सांगून त्यांनी माझ्या हाती दोन कात्रणे सोपवलीत. क्षणभर खोत सदाभाऊ काय सांगताहेत माझ्या लक्षात आले नाही पण लगेच ट्यूब पेटली कि ते मला धाकटा भाऊ पत्रकार यदु जोशी समजताहेत. असे अनेकदा होते, मागेही एकदा शेगावला ट्रेन ने जातांना अख्ख्या प्रवासात दिसायला सुंदर असलेल्या एक बाई मला यदु समजून माझ्याशी मस्त गप्पा मारीत बसल्या होत्या. त्यांच्या आठवणी आणि त्यातून त्यांनी मारलेल्या रोमँटिक गपा प्लिज त्यावर मला विचारू नका. उद्या कोणी यदु समजून पैशांचे कोणी पाकीट आणून दिले तर मनाला आणखी बरे वाटेल. यदु व माझ्यात तब्बल दहा वर्षांचे अंतर आहे, अनेक मला जेव्हा यदु समजतात म्हणजे यदूच्या वयाचे समजतात तेव्हा तर आतून खूपच गुदगुदल्या होतात. नाते हे लग्नाआधी गर्भार राहणाऱ्या तरुणीसारखे असते म्हणजे ते नको असले तरी टाळणे शक्य नसते...

येथे यदु जोशी यांचे उदाहरण यासाठी तो खरोखरी महान मोठा मान्यवर पत्रकार आहे त्याच्यासमोर मी म्हणजे असे समजा कि शरद पवारांसमोर दिवंगत आर आर पाटील. तो मोठा पत्रकार त्याच्यासमोर मी अगदी सामान्य पत्रकार त्यामुळे तो मला चार हात कायम दूर ठेवत आलेला, किंवा जेव्हा आमचे संबंध चांगले होते तेव्हा रस्त्यात भेटणार्या मान्यवर मंडळींशी स्वाभाविक आहे, माझी ओळख करून देतांना त्याला लाज वाटायची, त्यात काही वावगे होते असे मला वाटायचे अजिबात कारण नाही. एखाद्याचे अमुक एखाद्या क्षेत्रातले मोठेपण त्याच्या सतत कष्टातून साध्य होत असते. पण बघा नियतीचा खेळ कसा असतो कि त्याने टाळून देखील रक्ताचे नाते असे तुटता तुटत नाही, संघ स्वयंसेवकांनी जर धार्मिकतेतील भोंदूगिरीला प्रोत्साहन दिले आणि हे जर एकदा सर्वसामान्य मतदारांच्या लक्षात आले तर त्यांच्या मनातून संघ आणि हिंदुराष्ट्र हि संकल्पना कायमची उतरू शकते,त्यानंतर मात्र संघाने कितीही सांगितले कि आम्ही दांभिकतेला जवळ करणारे नाहीत तरी त्याचा अजिबात उपयोग होणार नाही, माझ्या आणि यदूच्या नात्यासारखे ते होईल म्हणजे यदु माझ्यापासून कितीही दूर पळाला तरी देवाने आणि आई वडिलांनी निर्माण केलेले नाते जसे त्याला तोडता येत नाही तसे संघाचे होईल म्हणजे काहीही झाले तरी लागलेला डाग पुसल्या जाणार नाही. सोशल मीडियावर संघाचे गुणगान नक्की गावेत पण त्याला देवदेवतांच्या चमत्काराची जोड नसावी...

ज्या डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली त्यांना देखील कधी वाटले नव्हते कि संघाचे कार्य एवढे देशभर जगभर पसरून त्यातून सामाजिक बदल आणि क्रांती घडेल. त्यांच्यानंतर गोळवलकर गुरुजी यांनी संघ प्रचारात व प्रसारात मोठी आघाडी घेतली तरीही संघाकडे भटाबामणांची संघटना म्हणूनच बघितले जाई किंवा तसे चिडविले जाई, गोळवलकर गुरुजीनंतर बाळासाहेब देवरस आले त्यांच्या सरसंघचालक म्हणून कारकिर्दीत आलेली संघबंदी उठल्यानंतर त्यांनी जगभरात विविध क्षेत्रात जी भरारी घेतली, राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनेही जी पावले उचललित, त्याचे मोठे व मधुर फळ संघ आणि भारतीय जनता पक्षाला आज मिळालेले आहे. विद्यमान सरसंघचालक श्रीमान मोहन भागवत यांना तर राजकारणाचे आधुनिक रूप नेमके समजल्याने त्यात त्यांना नरेंद्र मोदी यांच्यासारखे तगड्या विचारांचे स्वयंसेवक मिळाल्याने खऱ्या अर्थाने आता हि हिंदुराष्ट्राची उद्याची झलक आहे, नांदी आहे, असे वारंवार वाटायला लागलेले आहे जरी तसे घडणे सोपे नसले तरी....
तूर्त एवढेच :
पत्रकार हेमंत जोशी  

No comments:

Post a comment