Thursday, 20 June 2019

मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल : पत्रकार हेमंत जोशी

मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल : पत्रकार हेमंत जोशी 
होणार होणार असे गेली चार वर्षे मंत्रिमंडळ विस्तार आणि बदलाचे चालले होते पण त्याचे सतत चोरी चोरी चुपके चुपके मधल्या राणी मुखर्जी सारखे सुरु होते. त्या सिनेमात राणीला बाळ होणार असेच साऱ्यांना दिसत असते पण तसे नसते तिने पोटाला उशी बांधलेली असते. मंत्रिमंडळ आणि विस्तारविषयी सतत साडेतीन चार वर्षे मुख्यमंत्र्यांनी हे असेच करून ठेवले होते,म्हणजे मीडिया बातम्या सोडून मोकळे व्हायचे कि अमुक दिवशी मंत्रिमंडळ बदल तसेच विस्ताराचा मुहूर्त ठरलेला आहे पण ते प्रत्यक्षात कधीही घडले नाही, राणी मुखर्जी सारखे सतत घडले मीडिया कायम तोंडावर पडली...

पण एकदाचे गंगेत घोडे न्हाले. मंत्रिमंडळ विस्तार आणि बदलही झाला पण नव्याने झालेल्या मंत्र्यांचे औट घटकेच्या सवाष्णीसारखे झाले आहे म्हणजे काही तरुणींचे लग्न होत नाहीत तोच त्या विधवा होतात पण त्याकाळात त्यांच्या हाती जे पडते तेवढ्या आठवणींवर त्यांना जगायचे असते, काहींचा फक्त हनिमून साजरा होतो काहींना दिवस जातात आणि लगेच नवरा मारतो. नव्याने झालेले मंत्री, त्यांना तर माहित आहे कि पुढल्या काही हा दिवसात आम्हाला वैधव्य येणार आहे त्यामुळे त्यांच्यातल्या बहुतेकांची भूमिका जेवढा सरकारी तिजोरीवर, जनतेच्या पैशांवर अधिक दरोडा घालता येईल डल्ला मारल्या जाईल तोच आपला प्रॉफिट शिवाय कायम कुमारी म्हणून मेल्यापेक्षा एखाद्याच्या नावाने विधवा म्हणून तर जगता येईल तसे ' माजी मंत्री ' हि मरेपर्यंत कायम बिरुदावली तर चिटकून राहील यातच ते समाधान मानणार आहेत...

www.vikrantjoshi.com

जयदत्त क्षीरसागर त्यांच्यासारखेच बहुतेक मंत्री किंवा राज्यमंत्री अनुभवातून दरोडे टाकण्यात वाकबगार आहेत त्यामुळे कमी वेळात अधिक फायदा कसा उचलायचा त्यांना ते नेमके माहित आहे. खातेवाटप जाहीर होताच त्यादृष्टीने त्यातले अनुभवी मंत्री राज्यमंत्री त्यादृष्टीने कामाला देखील लागले आहेत. असा एकही फडणवीस मंत्रिमंडळातला आजी माजी मंत्री नाही ज्यांचे इत्यंभूत पुरावे माझ्याकडे नव्हते किंवा नाहीत मग मी ते उघड का केलेले नाहीत हा तुमचा सवाल ऐकण्याआधी मला माझी एक चूक कबूल करायची आहे ती अशी कि अनेक वर्षांनी या राज्याला चांगले मुख्यमंत्री लागोपाठ दोन वेळा मिळाले, श्री पृथ्वीराज चव्हाण आणि आताचे देवेंद्र फडणवीस. कोणत्याही मंत्र्यांचे पुरावे बाहेर काढले तर त्यात अधिक बदनामी देवेंद्र फडणवीसांची होते. दुसरे अत्यंत महत्वाचे म्हणजे आधीचे आघाडीतले सारेच मंत्री हे दरोडेखोर असायचे, युतीचे दोन तीन मंत्री दरोडेखोर होते आहेत बाकीचे बहुतेक पाकीटमार पद्धतीचे वागणारे असल्याने त्यांना आताच पुरावे मांडून शब्दांतून झोडपून काढणे आवश्यक वाटले नाही. तशी गरज वाटली नाही...

आता फार महत्वाचे सांगतो, मंत्री किंवा अधिकारी मग तो कितीही स्वतःला ताकदवान समजत असेल पण जेव्हाकेव्हा यांच्यातले काही अति करतात आई शपथ सांगतो त्यांच्या केबिन मध्ये जाऊन मी त्यांची आईबहीण घेतो, त्यांना सांगतो, खबरदार हे असे वागून फडणवीस सरकारला अडचणीत आणले तर. एकदा प्रयोग करून पहा, चारित्र्य घालवून बसलेला माणूस जगातला सर्वाधिक गांडू माणूस असतो. अर्थात त्यांना ते माझे मनापासूनचे कळकळीचे सांगणे पटते, त्यातले काही सावध झाले, काहींनी मनावर फारसे घेतलेले नाही, हरकत नाही, फारशी वेळ गेलेली नाही. फडणवीसांनी एक फार चांगले केले त्यांनी माझ्या वडिलांच्या विद्यार्थ्याला माझ्या गावातल्या आमदाराला माझ्या मित्राला, डॉ. संजय कुटे या त्यांच्याही मित्राला पूर्णवेळ मंत्री केले पण आमच्या जळगाव जामोद या बुलढाणा जिल्ह्यातील गावाला ज्या खात्याचे दूरदूरपर्यंत काम पडणार नाही अशा कामगार खात्याचे त्यांना मंत्री केले...

फडणवीसांनी सध्या मी ज्या गावात राहतो त्या गावातल्या आमदाराला देखील मंत्री केले. आमच्या परिसराचे आमदार भाजपातले शरद पवार ( चांगल्या अर्थाने ) आशिष शेलार आणि संजय कुटे या दोघांनाही एकाचवेळी मंत्री केले पण त्यांना मंत्री करायचेच होते तर फार आधी संधी दिली असती खूप वर्षे माथ्याला वैधव्य न आलेल्या स्त्रीसारखे ते मनाला वाटले असते पण हे औट घटकेचे सौभाग्य या दोघांच्याही वाटेला निदान सध्या तरी आलेले आहे, बघूया येणाऱ्या विधान सभा निवडणुकीनंतर नेमके काय घडते ते म्हणजे सत्ता युतीची आली तर हे दोघेही पुन्हा मंत्री म्हणून शपथ घेतील तेवढे नक्की आहे. बापरे, समजा भाजपाचे अतुल भातखळकर मंत्री झाले असते तर, फार काहीं घडले नसते फक्त आजूबाजूला सतत शिवराळ आणि अश्लील शब्द ऐकायला मिळाले असते...
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment