Wednesday, 19 June 2019

भाकड गायीला वासरू : पत्रकार हेमंत जोशी

भाकड गायीला वासरू : पत्रकार हेमंत जोशी 
योग्य वयात लग्न उरकल्यानंतर वैवाहिक जीवन लुटण्याचा आनंद मिळतो. मासिक पाळी गेल्यानंतर हनिमून साजरा करणे म्हणजे बत्तीशी पडलेल्या जक्खड म्हाताऱ्याला चुंबन घेण्याची संधी चालून आल्यासारखे. योग्य वेळी योग्य संधी चालून आली तर आयुष्याचे सोने झाल्यासारखे वाटते पण नको त्यावेळी चालून आलेली सुवर्ण संधी हि अंथरुणावर शेवटच्या घटका मोजणाऱ्या व्यक्तीला तरुण नर्सने लग्नाचे अमिश दाखवल्यासारखे असते. फडणवीसांनी विधान सभा निवडणुकीला केवळ ८०-९० दिवस शिल्लक असतांना मंत्रिमंडळ विस्तार आणि बदलाचे जे घोडे दामटले त्यावरून हे असे सारे आठवले....

कोणत्याही पंचवार्षिक योजनेत अलीकडे नव्याने अस्तित्वात आलेल्या मंत्री मंडळाचा विस्तार लवकरच केल्या जाईल असे हमखास सांगितले जाते आणि आज उद्या करता करता नाही म्हणायला शेवटच्या वर्षात तरी मंत्रिमंडळ बदल आणि विस्तार हमखास केल्या जातो. असा विस्तार आणि बदल वास्तविक देवेंद्र फडणवीस यांनीही करणे अति अति आवश्यक होते, काही नालायक मंत्र्यांना राज्यमंत्र्यांना डच्चू देऊन काही लायक आमदारांना संधी देणे त्यांचे ते महत्वाचे असे काम होते पण यात फडणवीसांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले असे नाही त्यांना त्यांच्या विरोधकांनी आणि शिवसेनेने देखील मोठा मानसिक त्रास दिला त्यामुळे खरे तर मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल रखडला...

तेच ते चेहरे कायम मंत्रिमंडळात त्यामुळे या राज्यातली आघाडी म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस रसातळाला गेली. पवारांचे आजपर्यंत अनेकदा फिनिक्स पक्ष्यासारखे घडले म्हणजे अनेकदा वाटायचे कि पवार आता राजकारणातून संपले किंवा त्यांच्या आयुष्यातून उठले पण लोकांचे साऱ्यांचे अंदाज चुकीचे ठरायचे आणि शरद पवार पुन्हा नव्या दमाने नव्या जोमाने सत्तेत भरारी आघाडी घ्यायचे. यावेळीही पवार तसे राज्याच्या आणि देशाच्याही राजकारणातून संपले आहेत बाजूला पडले आहेत त्यांचे महत्व जवळपास संपुष्टात आले आहे पण पवार पुन्हा एकदा फिनिक्स पक्षासारखी  भरारी घेऊन नव्याने जोमाने सत्तेत येतील का तर त्यावर माझं उत्तर ' नाही ' असे आहे कारण दरवेळी पवारांना जी भरारी घ्यावी लगे ती त्यांच्याच विचारांच्या नेत्यांमधून घ्यावी लागे, यावेळी तसे अजिबात नाही कारण त्यावेळेचे त्यांचे राजकीय विरोधक अजिबात लेचेपेचे नाहीत....

जे या राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे झाले ते तसे यापुढे शिवसेना आणि भाजपाचे होऊ नये असे जर या राज्याच्या मोदींना म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल तर यापुढे त्यांनी योग्य वेळी भाकरी परतवणे आवश्यक आहे म्हणजे त्यांचा या राज्याचा नेता म्हणून त्यांच्या युतीमध्ये बऱ्यापैकी वचक असेल, वचक बसेल. मंत्रिमंडळात बदल आणि विस्तार न करणे हि त्यांच्या हातून घडलेली मोठी चूक आहे आणि या चुकीचे खापर उद्धव ठाकरे यांच्यावर देखील फोडणे तेवढेच आवश्यक आहे कारण त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यानेच एवढा विलंब झाला आहे हेही नाकारून चालणार नाही. एक मात्र बरे झाले मोदी पंतप्रधान पदी विराजमान झाल्यानंतर लगेचच लबाड प्रफुल पटेल यांची ईडी ने चौकशी सुरु केली आहे. गॉड गॉड बोलून माझे सारे पाप खपून जाते हा जो हलकट प्रफुल्ल पटेल यांना अति आत्मविश्वास होता, आम्ही तुझे बाप आहोत हे मात्र मोदी यांनी दाखवून दिल्याने पटेलांची यावेळी बऱ्यापैकी गांड फाटली आहे. पटेलांना अतिशय जवळचा असलेला एक सहकारी मला म्हणाला, एवढे घाबरलेले प्रफुल्ल पटेल मी आजवर कधीही बघितलेले नव्हते, पण त्यांचे सारे पैसे परदेशात गुंतविल्या गेले असल्याने प्रफुल्ल फार अडचणीत येतील असे वाटत नाही, असेही तो बोलण्याच्या ओघात म्हणाला...
क्रमश :

पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment