Monday, 3 June 2019

धर्म आणि आपण : पत्रकार हेमंत जोशी


धर्म आणि आपण : पत्रकार हेमंत जोशी 
हिंदू संस्कारांपासून स्वतःची सुटका करवून घेणाऱ्या बिघडलेल्या भरकटलेल्या भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या अशोक चव्हाणांसारख्या नेत्यांच्या हाती हा देश आपले राज्य मतदारांनी वर्षानुवर्षे सोपविले आणि बंगला देश पाकिस्थांपेक्षा किंचित बरे असे या देशाचे झाले. रा. स्व. संघाने आपली निष्ठा जिद्द तळमळ सोडली नाही, विविध माध्यमातून संघ नेते आणि स्वयंसेवक जगभरात देशभरात राज्याच्या कानाकोपऱ्यात काम करीत राहिले आणि तो दिवस उजाडला जेव्हा हे हिंदुराष्ट्र आहे असे एकदाचे वाटायला लागले. या राज्याचा विचार करायचा झाल्यास युती मध्ये सारे काही आलबेल आहे असेही अजिबात नाही, यापुढला लढा नक्की युतीच्या भ्रष्ट मंडळींविरुद्धही लढावं लागणार आहेच...

सूक्ष्म निरीक्षणातून एक सांगतो, जेव्हा केव्हा मी अमेरिकेत जातो तेथल्या विविध,हिंदू असलेल्या भारतीयांशी माझे जेव्हा संभाषण होते, विशेषतः ज्यांचा जन्म अमेरिकेत झाला आहे अशा मंडळींशी बोलणे होते, माझ्या हे लक्षात आले आहे कि एकतर अमेरिकेत जन्मलेली पिढी अजिबात खोटे बोलत नाही आणि ते हिंदू असून देखील कधीही अमेरिकेविषयी वाईट बोलत नाहीत, अपशब्द वापरत नाहीत किंवा अमेरिकेची बदनामी होईल असे काहीही त्यांच्या तोंडून निघत नाही पण आपल्याकडे असलेले मुसलमान हे हिंदुस्थानचाच एक भाग असून देखील त्यांना आपल्या देशाविषयी आणि हिंदूंविषयी मनातून प्रचंड राग आहे, घृणा आहे, त्यांच्या मनात नेहमीच बदल्याची बदला घेण्याची भावना असते, हिंदूंना जेवढा अधिक त्रास होईल, दिल्या जाईल त्याकडे त्यांचा हमखास ओढा असतो. नेमके हे काँग्रेस ने किंवा संघ भाजपा विरोधी राजकीय संघटनांनी पक्षांनी वर्षानुवर्षे खपवून घेतले, ज्याचा फार मोठा मानसिक त्रास हिंदूंना सहन करावा लागला. यापुढे मुस्लिमांनी सकारात्मक भूमिकेतून हिंदुस्थानकडे बघावे, मला वाटते त्यांना तसे संस्कार विचार मौलवींनी द्यावेत म्हणजे मुस्लिमांना येथे अधिक मानाचे स्थान मिळेल, प्रगती साधण्या त्यांना खूप सोपे जाईल...

www.vikrantjoshi.com

परराज्यांशी माझा फारसा संबंध आलेला नाही पण आपल्या या राज्यात धर्मांतर केलेले ख्रिस्ती तसेच बौद्ध, मुसलमान आणि हिंदू असे विविध धर्मीय राहतात, मुस्लिम सोडले तर बौद्ध आणि मराठी ख्रिस्ती या दोन्हीही धर्मातले माझे मित्र त्यांच्या स्वतःच्या धर्माचा आदर तर नक्की करतातच पण त्यांच्या घरात हिंदू विचार हिंदू देवदेवता हिंदू सण, या तिन्हींचा मोठा पगडा असतो. हिंदू धर्मातले जे जे चांगले आहे ते ते त्यांच्या मुलांवर बिंबवण्याचा ते कायम प्रयत्न करतात. वास्तविक ख्रिस्ती आणि बौद्ध झालेले बहुतेक स्वतःला सवर्ण समजणाऱ्यांकडून हिणविल्या गेले, दुर्लक्षित केल्या गेले त्यातून बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली काहींनी बौद्ध धर्म स्वीकारला तर पाद्रींनी अनेकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. भलेही काही बौद्धांना ब्राम्हणांविषयी नक्की तिरस्कार होता त्यात चूक नक्की त्यावेळेच्या ब्राम्हणांची होती, आता तसे अजिबात राहिले नाही कारण काळ जसजसा पुढे गेला ब्राम्हणांनी देखील स्वतःला बदलवून घेतले...

थोडक्यात हिंदू, बौद्ध आणि ख्रिस्ती जसे या देशात आपल्या राज्यात गुण्यागोविंदाने राहतात ते तसे मुस्लिमांनी देखील वागावे, त्यासाठी त्यांच्यातल्या विचारवंतांनी त्यांच्या तरुण पिढीला पटवून देणे आवश्यक आहे कि हा आपलाच देश आहे, पाकिस्तानशी त्यांचे अजिबात देणे घेणे नाही. काश्मीर आणि मुस्लिम या दोघांना नेहरूंनी दिलेल्या फाजील सवलती जर काढण्यासाठी मुस्लिमांनीच पुढाकार घेतला तर नक्की सहिष्णू हिंदू आणि या देशातले मुस्लिम दोघातले सलोख्याचे वागणे, त्याने आनंदात मोठी भर पडेल. मुस्लिमांच्या सतत दडपणाखाली हिंदू हे जे चित्र सतत येथे बघायला मिळते, ते वीट आणणारे आहे त्या वैतागातूनच सारे हिंदू एकवटले आणि त्यांनी या देशातली काँग्रेस आणि काँग्रेसी विचारांना उलथवून टाकले...
तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment