Sunday, 30 June 2019

फ्रॉड पॅनकार्ड क्लब १ : पत्रकार हेमंत जोशी

फ्रॉड पॅनकार्ड क्लब १ : पत्रकार हेमंत जोशी 
सिनेमातल्या नायकासारखे वागता येत नाही नका वागू पण त्यातल्या खलनायका सारखे तरी वागून दाखवा, हिंदी सिनेमातल्या निदान डाकूंची तरी नक्कल करा, श्रीमंतांना कोणत्याही प्रकारे लुटा आणि त्यातले काही निदान गरिबांवर तरी लुटा.आपल्यातले नेहमी नेमके उलटे करत आले आहेत म्हणजे गरिबांना लुटायचे आणि श्रीमंतांना काढून द्यायचे. आपण केवळ या राज्याचा जरी अभ्यास केला तरी असे दिसेल दिसते कि जेथे जेथे या राज्यातले गोरगरीब पैसे ठेवतात, पुंजी टाकतात, तेथेच नेमकी त्यांची फसवणूक होते. मोठ्या रकमेचे व्याज देणाऱ्या चिटफंड कंपनीज आणि खाजगी बॅंक्स किंवा पतपेढ्या हे गरिबांना लुटण्याचे हमखास कुरण आहे, ते लुटून पळून मोकळे झालेत कि त्यांना येथे सरकारी अधिकारी, पोलीस आणि नेते हमखास प्रोटेकट करतात, गरीब रस्त्यावर येतात आणि बदमाश श्रीमंत अधिक श्रीमंत होतात...

सुधीर मोरावेकर आणि त्याच्या कुटुंबाने उभी केलेली पॅनकार्ड क्लबज लिमिटेड हा असाच सर्वसामान्य आणि गोरगरिबांशी खेळल्या गेलेला महाभयानक प्रकार आहे. मला आठवते, दिवंगत विजय लोके हा दिवंगत गजानन लोके यांचा मुलगा पुढे तो आमदार झाला. गजानन लोके देखील केव्हातरी काँग्रेस चे आमदार होते,सुरुवातीला विजय देखील युवक काँग्रेस मध्ये बऱ्यापैकी ऍक्टिव्ह होता पण पुढे तो त्यावेळी एकत्र असलेल्या उद्धव व राज ठाकरे या दोघांच्याही संपर्कात आला, त्यांचा त्यावेळचा ' मिलिंद नार्वेकर ' म्हणून काम बघू लागला. म्हणजे उजवा हात म्हणून प्रसिद्धीला आला, अर्थात विजय आणि मिलिंद दोघांच्या आचारविचारांत मला प्रचंड तफावत दिसली...पुढे लवकरच उद्धवजींच्या आग्रहावरून विजय लोके या सामान्य मित्राला म्हणाल तर शिवसैनिकाला आमदार करण्यात आले, विधान परिषदेवर घेण्यात आले, विजय आणखी मोठा झाला असता पण दारूच्या आहारी गेल्याने त्याचे लवकर निधन झाले. अधून मधून विजय लोके त्यावेळेच्या म्हणजे १९९०-९५ दरम्यान असलेल्या राजा बढे चौकातल्या माझ्या कार्यालयात स्कुटरवरून गप्पा मारायला येत असे, त्याच्या सोबतीने त्याचा ' मावसभाऊ सुधीर मोरावेकर '  पण हमखास येत असे. सुधीर त्याचा मावसभाऊ होता किंवा नाही हे कधी समजले नाही पण विजय त्याची तशीच ओळख करून द्यायचा. पुढे केवळ सर्वसामान्यांना फसवून श्रीमंत करोडपती झालेल्या सुधीर मोरावेकर याचे त्याकाळी स्वतःच्या मालकीचे कोणते वाहनही नव्हते हे विशेष....

Www.vikrantjoshi.com


माझ्या थेट कार्यालयासमोर माजी शिक्षण मंत्री सुधीरभाऊ जोशी यांची शिवसेना शाखा होती मग तेथे आम्ही गप्पा मारायला जात असू, भाऊ असायचे, नगरसेवक पंडित आणि दिवाकर दळवी असायचे, छान गप्पा व्हायच्या. त्यानंतर युतीची सत्ता आली, सुधीरभाऊ मंत्री झाले, पुढे विजयला देखील विधानपरिषदेवर घेण्यात आले. शिवसेनेचा खऱ्या अर्थाने तेथून सुवर्णकाळ सुरु झाला. येथे अत्यंत महत्वाचे सांगतो, कि ज्यांनी ज्यांनी केवळ इगो हर्ट झाला म्हणून शिवसेना सोडली त्यांचे सर्वांचे वेगवेगळ्या पद्धतीने वाटोळे झाले, नुकसान झाले जणू त्यांना बाळासाहेब नावाच्या ऋषींचे शाप लागले पण शिवसेना मात्र वाढत गेली, मनातले सांगतो, उद्धवजी सेनात्यांच्या पित्यापेक्षा यशस्वी पद्धतीने चालवू शकतील हे स्वप्नात देखील कधीच कोणालाही थेट बाळासाहेबांनाही वाटले नव्हते त्यातूनच शिवसेना फुटत गेली दिग्गज नेते बाहेर पडत गेले पण नशीब कसे बघा, बाहेर पडलेलेच संपले, मागे पडले...

ज्यांनी राजकीय नफानुकसानचा कोणताही विचार न करता बाळासाहेबांवर, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर विश्वास ठेवला अशा नेत्यांना मात्र नाव सत्ता आणि हो, पैसा देखील मिळत गेला. लॉयल्टी त्यांना फायद्याची ठरली, सारेच रामदास कदम एकनाथ शिंदे पद्धतीने सर्वार्थाने मोठे झाले. १९९५ नंतर सुधीर मोरावेकर याच्या डोक्यात चिटफंड कंपनीची म्हणजे सर्वसामान्यांना चिट करून श्रीमंत होण्याची कल्पना आली आणि त्याने पॅनकार्ड क्लब नावाची कंपनी काढली त्यानिमीत्ते एक जंगी पार्टी त्याने आणि विजयने आयोजित केली होती, उदघाटनाला अर्थात उद्धव ठाकरे स्वतः आले होते, मला देखील बोलाविले होते. उद्धव ठाकरे पॅनकार्ड क्लब कंपनीच्या पाठीशी आहेत असे वातावरण निर्माण करण्यात आले. सुरुवातीला काही वर्षे सुधीर मोरावेकर यांच्या पॅनकार्ड क्लब चे कार्यालय माहीमच्या दर्गा गल्लीतील एका लहानशा खोलीत पहिल्या माळ्यावर होते पण तदनंतर सुधीरची मोठ्या झपाट्याने आर्थिक क्रांती, प्रगती झाली, गोरगरिबांना लुबाडून सुधीर झपाट्याने नवश्रीमंत झाला...

दिवंगत चीटर सुधीर मोरावेकर याचा उद्धव किंवा ठाकरे कटुंबीयांशी थेट परिचय अजिबात नव्हता. राज आणि उद्धव यांचा विजय लोके लाडका होता. येथे अत्यंत महत्वाचे सांगतो उद्धव यांनी कधीही सुधीर मोरावेकरला जवळ घेतले नाही किंवा पॅनकार्ड क्लब कंपनीला प्रोटेकट केले नाही, पुढे तर विजय लोके देखील लवकर वारला त्यामुळे पॅनकार्ड क्लब च्या पापात फक्त आणि खरा सहभाग केवळ त्याचा, त्याच्या दोन्ही मुलांचा, पत्नीचा आणि सुनेचा सहभाग होता. आता सुधीरचा धाकटा मुलगा केवळ मुंबईत असतो, जे या पापाचे लाभार्थी आहेत ते सारे सिंगापूरला स्थायिक झाले आहेत, जगभरात त्यांच्या मालमत्ता आहेत. पोलिसांचा नेमका कोणत्या पद्धतीने तपस सुरु आहे, कळत नाही पण गोरगरिबांचे त्यांना फार काही पडले असावे, वाटत नाही. फ्रॉड सुधीर मोरावेकर यांचे धाकटे चिरंजीव ज्ञानराज अगदी खुलेआम मुंबईत फिरताहेत आणि ज्येष्ठ चिरंजीव सिद्धार्थ मोरावेकर हे कुटुंबियांसमवेत सिंगापूरला तळ ठोकून आहेत...
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Saturday, 29 June 2019

राजकीय गोंधळ : पत्रकार हेमंत जोशी

राजकीय गोंधळ : पत्रकार हेमंत जोशी 

साऱ्याच राजकीय परिघात पक्षात सध्या कमालीचा गोंधळ उडालेला आहे. जे जिंकलेत त्यांना स्वतःलाच कळत नाही अनपेक्षित प्रचंड यश कसे मिळाले ते, आणि जे पराभूत झाले त्यांची अवस्था तर थेट कोमात गेलेल्या पेशंटसारखी झालेली आहे , जे जिंकून आलेत त्यांना तर थेट जाह्नवी कपूरसंगे बेडसिन केल्याचा आनंद होतो आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व मानणाऱ्या नेत्यांना, पक्षाला मतदारांनी पसंती दिली आहे हे नक्की त्याचे खूपसे बरेचसे श्रेय रा. स्व. संघ आणि त्यांच्या जगभर पसरलेल्या विविध फांद्यांना जाते....देशातल्या राज्यातल्या नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर संघाचे कार्यकर्ते म्हणजे संघस्वयंसेवक विशेषतः सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह झाले आहेत, मोठ्या खुबीने त्यांचा संघ प्रसार संघ प्रचार सुरु आहे, त्यात  काही वावगे असेल तर हिंदुत्वाच्या जोडीला जो अलीकडे मोठ्या प्रमाणावर दांभिक धार्मिकतेला विशेषतः संघस्वयंसेवकांकडून रंग चढविल्या जातोय म्हणजे विविध देव देवतांचे पूजाअर्चा इत्यादींचे जे स्तोम माजविण्याचा प्रकार घडतोय, मुद्दाम केल्या जातोय ते खूप वाईट आहे. या देशातल्या किंवा आपल्या राज्यातल्या ब्राम्हण वर्गाचे महत्व, त्यांच्यापाशी असलेल्या विद्ववत्तेचे महत्व केव्हा कमी झाले जेव्हा त्यांनी त्यांच्या विद्ववत्तेला धार्मिकतेची फोडणी देऊन लोकांना कमकुवत बनविण्याचे काम सुरु केले होते. म्हणजे सत्यनारायण केला तर काय फायदे होतात हे सांगण्यापेक्षा जर त्यांनी सार्वजनिक सेवेचे महत्व सांगून त्यातून कसे स्वर्गात स्थान मिळते सांगितले असते तर ब्राम्हणांना गांधी वधानंतर जो प्रचंड त्रास झाला, सर्वोतपरी त्रास देण्यात आला, तो नक्की झाला नसता कदाचित हे असे काही काळानंतर हिंदू संघटनांचे हे असे ब्राम्हणांसारखे अचानक महत्व कमी होऊ शकते जर त्यांनी हिंदू या महान संकल्पनेला विनाकारण पाखंडी अशा धार्मिकतेची अति जोड दिली तर...

www.vikrantjoshi.com

देवदेवतांचे चमत्कार सांगून हिंदुराष्ट्र या संकल्पनेचे किंवा या संकल्पनेशी संबंधित नेत्यांचे राजकीय पक्षांचे महत्व नक्की वाढणार नाही किंवा टिकणार नाही किंवा जे महत्व अलीकडे अचानक वाढले आहे मोदी यांच्या निवृत्तीनंतर ते एका झटक्यात कमी होऊन त्याचा फायदा देशाला हानी पोहोचविलेल्या काँग्रेस व त्या विचारांच्या नेत्यांना नक्की होऊ शकतो त्यापेक्षा हिंदू धर्म किंवा हिंदू धर्माचे उत्तम संस्कार त्याचे महत्व जर सर्वसामान्य मतदारांमध्ये रुजविण्यात हिंदू संघटना यशस्वी ठरल्या त्याला संपूर्ण भ्रष्टाचारविरहित राष्ट्राची जोड दिली तर ते यश कायम टिकणारे असेल...बजेट सेशन मध्ये मी विधान भवनात कुठल्याशा कामानिमित्ते अलीकडे गेलो असता कुठल्याशा वाहिनीवर काम करणारा माझा मित्र हेमंत बिर्जे भेटला, त्याच्याशी गप्पा मारतांना समोरून मंत्री सदाभाऊ खोत आले, मला म्हणालेत, बरे झाले तुमची येथेच भेट झाली पुढे म्हणाले तुम्हाला ज्या वृत्तपत्रांच्या कात्रणांविषयी म्हणालो होतो ते मी आणले आहेत असे सांगून त्यांनी माझ्या हाती दोन कात्रणे सोपवलीत. क्षणभर खोत सदाभाऊ काय सांगताहेत माझ्या लक्षात आले नाही पण लगेच ट्यूब पेटली कि ते मला धाकटा भाऊ पत्रकार यदु जोशी समजताहेत. असे अनेकदा होते, मागेही एकदा शेगावला ट्रेन ने जातांना अख्ख्या प्रवासात दिसायला सुंदर असलेल्या एक बाई मला यदु समजून माझ्याशी मस्त गप्पा मारीत बसल्या होत्या. त्यांच्या आठवणी आणि त्यातून त्यांनी मारलेल्या रोमँटिक गपा प्लिज त्यावर मला विचारू नका. उद्या कोणी यदु समजून पैशांचे कोणी पाकीट आणून दिले तर मनाला आणखी बरे वाटेल. यदु व माझ्यात तब्बल दहा वर्षांचे अंतर आहे, अनेक मला जेव्हा यदु समजतात म्हणजे यदूच्या वयाचे समजतात तेव्हा तर आतून खूपच गुदगुदल्या होतात. नाते हे लग्नाआधी गर्भार राहणाऱ्या तरुणीसारखे असते म्हणजे ते नको असले तरी टाळणे शक्य नसते...

येथे यदु जोशी यांचे उदाहरण यासाठी तो खरोखरी महान मोठा मान्यवर पत्रकार आहे त्याच्यासमोर मी म्हणजे असे समजा कि शरद पवारांसमोर दिवंगत आर आर पाटील. तो मोठा पत्रकार त्याच्यासमोर मी अगदी सामान्य पत्रकार त्यामुळे तो मला चार हात कायम दूर ठेवत आलेला, किंवा जेव्हा आमचे संबंध चांगले होते तेव्हा रस्त्यात भेटणार्या मान्यवर मंडळींशी स्वाभाविक आहे, माझी ओळख करून देतांना त्याला लाज वाटायची, त्यात काही वावगे होते असे मला वाटायचे अजिबात कारण नाही. एखाद्याचे अमुक एखाद्या क्षेत्रातले मोठेपण त्याच्या सतत कष्टातून साध्य होत असते. पण बघा नियतीचा खेळ कसा असतो कि त्याने टाळून देखील रक्ताचे नाते असे तुटता तुटत नाही, संघ स्वयंसेवकांनी जर धार्मिकतेतील भोंदूगिरीला प्रोत्साहन दिले आणि हे जर एकदा सर्वसामान्य मतदारांच्या लक्षात आले तर त्यांच्या मनातून संघ आणि हिंदुराष्ट्र हि संकल्पना कायमची उतरू शकते,त्यानंतर मात्र संघाने कितीही सांगितले कि आम्ही दांभिकतेला जवळ करणारे नाहीत तरी त्याचा अजिबात उपयोग होणार नाही, माझ्या आणि यदूच्या नात्यासारखे ते होईल म्हणजे यदु माझ्यापासून कितीही दूर पळाला तरी देवाने आणि आई वडिलांनी निर्माण केलेले नाते जसे त्याला तोडता येत नाही तसे संघाचे होईल म्हणजे काहीही झाले तरी लागलेला डाग पुसल्या जाणार नाही. सोशल मीडियावर संघाचे गुणगान नक्की गावेत पण त्याला देवदेवतांच्या चमत्काराची जोड नसावी...

ज्या डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली त्यांना देखील कधी वाटले नव्हते कि संघाचे कार्य एवढे देशभर जगभर पसरून त्यातून सामाजिक बदल आणि क्रांती घडेल. त्यांच्यानंतर गोळवलकर गुरुजी यांनी संघ प्रचारात व प्रसारात मोठी आघाडी घेतली तरीही संघाकडे भटाबामणांची संघटना म्हणूनच बघितले जाई किंवा तसे चिडविले जाई, गोळवलकर गुरुजीनंतर बाळासाहेब देवरस आले त्यांच्या सरसंघचालक म्हणून कारकिर्दीत आलेली संघबंदी उठल्यानंतर त्यांनी जगभरात विविध क्षेत्रात जी भरारी घेतली, राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनेही जी पावले उचललित, त्याचे मोठे व मधुर फळ संघ आणि भारतीय जनता पक्षाला आज मिळालेले आहे. विद्यमान सरसंघचालक श्रीमान मोहन भागवत यांना तर राजकारणाचे आधुनिक रूप नेमके समजल्याने त्यात त्यांना नरेंद्र मोदी यांच्यासारखे तगड्या विचारांचे स्वयंसेवक मिळाल्याने खऱ्या अर्थाने आता हि हिंदुराष्ट्राची उद्याची झलक आहे, नांदी आहे, असे वारंवार वाटायला लागलेले आहे जरी तसे घडणे सोपे नसले तरी....
तूर्त एवढेच :
पत्रकार हेमंत जोशी  

Thursday, 27 June 2019

फडणवीसांची समृद्धी : पत्रकार हेमंत जोशी

फडणवीसांची समृद्धी : पत्रकार हेमंत जोशी 

विधान भवनातील प्रांगणात एकमेकांच्या शेजारी दोन आदरणीय महापुरुषांचे पुतळे आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा. आम्ही महापुरुषांचे पुतळे उभे तर करतो नंतर मात्र मान वर करून देखील अशा पुतळ्याकडे आपण बघत देखील नाही. विशेष म्हणजे त्यातल्या नेमक्या कोणत्या पुतळ्याची विटंबना केली तर सजा होऊ शकते, ऍट्रॉसिटी लागू शकते अलीकडे हे त्या प्रांगणात येणाऱ्या पक्षांना देखील कळायला लागलेले आहे कारण बाबासाहेबआंबेडकरांच्या डोक्यावर म्हणजे पुतळ्यावर एकही पक्षी घाण करून ठेवत नाही पण अगदी शेजारी असलेल्या फुले यांच्या पुतळ्यावर मात्र पक्षांनी बदाबदा घाण करून ठेवलेली असते. मंत्रीमहोदय रावते साहेबांच्या केबिन मधून दोन्ही पुतळे थेट समोर दिसतात, त्यांनीच माझ्या हे नजरेस आणून दिले...

याला म्हणतात कायद्याची भीती म्हणजे देशांतर्गत कायदे एवढ्या कडक पद्धतीने राबविल्या जायला हवेत कि माणसांचे सोडा, पशुपक्षी किंवा प्राण्यांना देखील त्या कायद्यांची भीती वाटायला हवी. बघूया काय वाढून ठेवले आहे आपल्या पानात कारण दिल्लीतल्या नरेंद्रने आणि मुंबईतल्या देवेंद्रने स्वप्ने तर सुवर्णयुगाची दाखवली आहेत, हे दोघे बिघडलेल्यांना घडविणार आहेत कि स्वतःच बिघडून मोकळे होणार आहेत हे काळच ठरवेल. पण देवेंद्र यांनी अगदी अलीकडे जे स्वप्न बघितले होते ते सर्वांना अशक्य वाटत होते, सहज किंवा तत्परतेने स्वप्न प्रत्यक्षात उतरेल असे अजिबात वाटत नव्हते, ते स्वप्न होते थेट तब्बल ७०० किलोमीटर लांबीच्या अगडबंब मुंबई ते थेट नागपूर समृद्धी महामार्गाचे. जेव्हा या अवाढव्य महामार्गाची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली तेव्हा अनेकांनी त्यांची खेचली, खिल्ली उडवली होती. एकाच पंचवार्षिक योजनेत एवढा मोठा भव्य महामार्ग, सहज शक्य नव्हते म्हणून त्यांच्या घोषणेवर सारेच सुरवातीला हसले होते...

मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई तोही अष्टपदरी महामार्ग केवळ एकाच पंचवार्षिक योजनेत मार्गी लावणे म्हणजे हरिभाऊ बागडे यांना अमिताभ ऐवजी प्रमुख भूमिका देण्या सारखे किंवा अलिबागच्या जयंत पाटलांना तुमची सारी संपत्ती दान करून टाका सांगण्या सारखे किंवा आर आर पाटलांना थेट स्वर्गातून खाली आणण्यासारखे किंवा आदर्श घोटाळ्यातील प्रत्येकाला येथून नरकात पाठवण्यासारखे किंवा पत्रकार उदय तानपाठक यांना पत्रकार यदु जोशी यांनी कथक्कली नृत्य शिकविण्यासारखे हे कठीण असे काम सर्वांना वाटले होते पण देवेंद्र फडणवीस यांच्यात सर्वांना राजकारणातला सलमान खान दिसला म्हणजे त्यांनी जी कमिटमेंट दिली ती पूर्ण करवून दाखवली, भाकड गायीला जणू चार चार पिले झाली, वांझोटीची जणू कुंती झाली...

                                                            www.vikrantjoshi.com

तसे समृद्धी मार्गी लावण्याचे श्रेय जसे देवेंद्र फडणवीस यांना तसे ते अनेकांना पण समृद्धी महामार्ग मार्गी लावण्याचे मोठे श्रेय प्रशासकीय अधिकारी राधेश्याम मोपलवार आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता अनिल गायकवाड या दोघांना प्रामुख्याने. सुरुवातीला फडणवीसांनी जेव्हा मोपलवार आणि गायकवाड या दोघांवर विश्वास टाकून त्यांना समृद्धी पूर्ण करण्याचे आव्हान केले जबाबदारी टाकली तेव्हा अनेकांनी पुन्हा एकदा फडणवीसांच्या नावाने बोटे मोडली आणि चुकीची माणसे निवडलीत अशीही अनेकांनी त्या दोघांवर टीका केली. जसे मी अतिशय जवळून मोपलवार आणि गायकवाड या दोघांना बघत आलोय तसे जे कोणी त्यांना जवळून ओळखत बघत होते त्या सर्वांना मात्र शंभर टक्के खात्री होते, हे वर्कोहोलिक, कामाला राक्षस अधिकारी समृद्धी महामार्गाचे स्वप्न पूर्ण करतील, नक्की प्रत्यक्षात उतारवतील...

फडणवीसांची, युतीची या राज्याला मोठी देणगी, गिफ्ट म्हणजे समृद्धी महामार्ग, तब्बल १६ भागात या महामार्गाची अतिशय नियोजनबद्ध विभागणी करून म्हणजे सोळा टप्प्यात हे काम विभागून प्रत्यक्ष महामार्ग बनविण्यास केव्हाच सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या महामार्गावर कितीतरी वृक्ष होते ते तोडण्याची आणि विल्हेवाट लावण्याची जबाबदारी फॉरेस्ट डेव्हलपमेंट कारपोरेशन कडे सोपविल्याने हे महत्वाचे काम सोपे आणि बिनबोभाट झाले. समृद्धी महामार्ग ज्या पद्धतीने तयार होतो आहे त्याची क्लिप मला अलीकडे जेव्हा गायकवाड यांनी दाखवली, ती बघून माझी पाचही बोटे आश्चर्याने एकाचवेळी तोंडात गेली. केवळ एकाच पंचवार्षिक योजनेत शेतकऱ्यांच्या जमिनी योग्य मोबदला देऊन ताब्यात घ्यायच्या, साऱ्या परवानग्या मिळवायच्या, मुख्य म्हणजे आर्थिक नियोजन करायचे, सारे कसे अशक्यप्राय वाटत होते पण फडणवीसांनी त्यांच्या टीमने कमाल केली, शक्य न वाटणारे असे शक्य करून दाखवले. समृद्धी महामार्ग झपाट्याने पूर्ण होतोय. जेव्हा तो पूर्ण होईल त्यानंतर जसे एक्स्प्रेस वे मुळे पुण्याचे महत्व वाढले तसे महत्व या समृद्धी महामार्गावरील आजपर्यंत दुर्लक्षित झालेल्या विदर्भ मराठवाडा किंवा तत्सम परिसराचे वाढेल, समृद्धी हि फडणवीसांची देणगी म्हणजे सुवर्णयुगाची एक नांदी असेल हे नक्की...
तूर्त एवढेच.

पत्रकार हेमंत जोशी 

जमलेली गर्दी : पत्रकार हेमंत जोशी

जमलेली गर्दी : पत्रकार हेमंत जोशी 

मेधाताई आणि अनंत गाडगीळ या जोडप्याविषयी आम्हाला अगदी सुरुवातीपासून आदर आहे उत्कंठा आहे कौतुक आहे आणि अभिमानही आहे. मेधाताई अलीकडे प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्या आणि अनंत विठ्ठलराव गाडगीळ यांच्या तर नसानसात घराण्यात कुटुंबात केवळ काँग्रेस भिनलेली आहे, त्यांच्या घराण्याला देशभक्तीची मोठी परंपरा आहे हे मराठींना सांगणे म्हणजे अमृता फडणवीस उत्तम गायिका आहेत हे नागपूरकरांना सांगण्यासारखे. मेधाताई आणि अनंतराव दोघांनी दाम्पत्याने ठरविले असते आणि केंद्रीय मंत्री म्हणून कित्येक वर्षे कार्यरत राहिलेल्या दिवंगत विठ्ठलराव यांनी ठरविले असते तर आज पुण्यातले श्रीमंत म्हणून शरद पवार यांच्याकडे नव्हे काँग्रेस मधले नवश्रीमंत म्हणून सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे नव्हे तर गाडगीळ कुटुंबाकडे पुणेकरांनी बघितले असते पण सुसंस्कारांनी मढलेल्या देशभक्त गाडगीळ कुटुंबाला खाण्याची लबाडी कधीच रुचली नाही म्हणून अनंतराव काँग्रेस नेते असूनही स्पष्टवक्ते आहेत, प्रसंगी ते आपल्या नेत्यांना देखील त्यांची जागा दाखवून देतात. येथे अनंतरावांचा विषय त्यांनी अलीकडे लोकमत दैनिकात २५ जुन रोजी १९ लिहिलेल्या बेधडक लेखानिमित्ते काढावा लागतो आहे, संग्राह्य असा हा लेख, प्रत्येकाने वाचावा असा...
Www.vikrantjoshi.com

अनंतराव लिहितात, ' पूर्वीच्या आणि आताच्या काँग्रेस मध्ये आणखी एक मोठा फरक म्हणजे पक्षात ' अकाउंटीबिलिटी ' च राहिलेली नाही. पूर्वी नेता कितीही मोठा असू दे, त्याच्या राज्यात वा जिल्ह्यात काँग्रेस चा पराभव झाल्यास राजीनामा घेतल्या तरी जायचा किंवा नैतिकतेच्या मुद्द्यावर दिल्या तरी जायचा. २०१४ नंतर लोकसभा, बिधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद व तत्सममध्ये काँग्रेसचा पराभव होऊनसुद्धा राज्याराज्यातून कुणी राजीनामा दिल्याची फारशी उदाहरणेच दिसत नाहीत. ' अनंतरावांचा हा टोला सर्वात आधी थेट या राज्यात नेतृत्व म्हणून बदनाम झालेल्या अशोक चव्हाण यांना मारल्या गेला असावा असे येथे वारंवार वाटते किंवा ते एक सत्य आहे. जे कमावले ते चव्हाणांसाठी खूप आहे त्यात काँग्रेसची या राज्यातली पीछेहाट दयनीय निंदनीय आहे त्यामुळे खरेतर अशोक चव्हाण यांनी राजकीय निवृत्ती पत्करणे पक्षाच्या भल्यासाठी योग्य ठरेल....

कोणतीही व्यक्ती नेमकी कशी हे अतिशय सोप्या पद्धतीने ओळखायचे असेल तर त्याने सभोवताली जमा केलेले नातेवाईक, मित्र, माणसे, कुटुंब सदस्य नेमके कसे आहेत कोण आहेत काय आहेत हे बारकाईने पडताळले कि अमुक एक व्यक्ती वास्तवात कसा लगेच लक्षात येते. अशोक चव्हाण आधी मंत्री असतांना नंतर मुख्यमंत्री असतांना मी त्यांना तोंडावर सांगितले होते कि निवतकर, सावंत सारखे भ्रष्ट संधीसाधू कर्मचारी अधिकारी जर सभोवताली असतील तर तुमचा नेता म्हणून राजकीय सत्यानाश नक्की ठरलेला आहे, पुढे तेच झाले, अशोक हे राजकीय ऋषितुल्य शंकरराव चव्हाण यांच्या पोटी जन्माला येऊन देखील त्यांना कधीही राजकारणातले अनंत गाडगीळ म्हणजे एक सुसंस्कृत नेते म्हणून त्यांच्या कडे कोणीही बघितले नाही. अतिशय पडतीच्या काळात काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी अशोक चव्हाण यांना जेव्हा थेट प्रदेशाध्यक्ष केले तेव्हाच माझ्या लक्षात आले यापुढे काँग्रेसचे या राज्यातले उरले सुरले अस्तित्व महत्व नक्की गोत्यात येणार आहे, उरल्या सुरल्या काँग्रेस चे वाटोळे  होणार आहे...

उद्या समजा रा. स्व. संघाने मोहन भागवत यांच्या ऐवजी गाव तेथे कुटुंब ठेवणाऱ्या एखाद्या विवाहित स्त्रीलंपट भ्रष्ट स्वयंसेवकाला जर सरसंघचालक म्हणून नेमले तर संघाचे महत्व संपायला आणि संपवायला त्यापुढलें काही महिने पुरेसे ठरतील.कोणताही पक्षप्रमुख, त्याची प्रतिमा जर डागाळलेली असेल तर असे पक्ष किंवा संघटना संपायला फारसा अवधी लागत नाही. नेमके हेच गांधी घराण्याच्या का लक्षात येत नाही, कळत नाही. रावसाहेब दानवे थेट केंद्रात मंत्री झाल्याने यापुढे राज्यातल्या भाजपाला देखील फडणवीस यांच्या तोडीस तोड प्रदेशाध्यक्ष नेमणे अत्यावश्यक आहे. राम शिंदे, सुभाष देशमुख, आशिष शेलार, गिरीश महाजन, गिरीश व्यास, संभाजी पाटील निलंगेकर इत्यादी नावे चर्चेत आहेत पण प्रदेश अध्यक्ष नेमण्याची भाजपाला घाई असेल असे अजिबात वाटत नाही, आधी अमित शाह यांच्या जागी कोण हा प्रश्न निकाली काढल्यानंतरच मोर्चा या राज्याकडे वळेल असे दिसते. जसे शरद पवारांच्या राजवटीत सारे काही पश्चिम महाराष्ट्राला, असे जे सतत घडायचे तसे अलीकडे थोडेफार आमच्या विदर्भाबाबत भाजपामध्ये झाल्याने घडल्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष विदर्भातला तोही ब्राम्हण असेल असे अजिबात वाटत नाही.त्यामुळे गिरीश व्यास यांचे नाव जेव्हा पुढे आले आम्हाला हसू आले....

विशेष म्हणजे पडत्या काळात काँग्रेसने थेट चव्हाणांसारख्या बदनाम नेत्याला प्रदेशाध्यक्ष केल्याने या राज्यातली उरलीसुरली काँग्रेस रसातळाला नेण्याचे मोठे काम अशोक चव्हाणांनी करून ठेवले. पृथ्वीराज चव्हाण किंवा अनंत गाडगीळ इत्यादी बोटावर मोजण्याइतके काँग्रेस मधले चांगले नेते मात्र स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी स्वतःच धडपडतांना दिसतात. बाळासाहेब थोरातांचे देखील विखे पाटलांसमोर नेमके पृथ्वीराज चव्हाणांसारखेच होत असे म्हणजे बिना भरवशाचे राधाकृष्ण हे गांधी घराण्याला अधिक विश्वासू आणि राजकीय दृष्ट्या ताकदवान वाटायचे पण एक बरे झाले कि पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान थेट राहुल गांधी यांना नगर जिल्ह्यातल्या मुक्कामातून धोकेबाज आणि धोकादायक विखे पाटील आणि लॉयल बाळासाहेब थोरात या दोघातला नेमका फरक केल्याने ओळखल्याने अलीकडे एकमेकांचे जिवलग मित्र असलेले पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या दोघांनाही गांधी कुटुंबाने लाडाने कडेवर उचलून घेतले आहे, यापुढे पुन्हा एकदा या दोघांच्या शब्दांना अशोक चव्हाण यांच्यापेक्षा त्यांच्या श्रेष्ठींकडे अधिक मान असेल, त्यांचा तो सन्मान असेल...

श्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरातांच्या शब्दाला दिल्लीत नक्की किंमत असेल. विशेष म्हणजे यापुढे या देशातली सत्ता मतदार कायम हिंदुत्व मानणार्या, हिंदूंना प्राधान्य देणाऱ्या आणि भ्रष्टाचाराची बऱ्यापैकी चीड असलेल्या राजकीय पक्षाच्याच हाती सोपवून मोकळे होतील, राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या नेतेमंडळींनी आत्मचिंतन करणे यापुढे नक्की अत्यावश्यक आहे...
तूर्त एवढेच :

पत्रकार हेमंत जोशी 


Monday, 24 June 2019

अति म्हणून युतीची माती : पत्रकार हेमंत जोशी

अति म्हणून युतीची माती : पत्रकार हेमंत जोशी 
एखाद्या हॉटेलचे असे असते कि तेथे केव्हाही जा, प्रचंड गर्दी असते, वाट पाहावी लागते. मग ग्राहक पर्याय शोधायला लागतात, येथे गर्दी आहे, या हॉटेलच्या तुलनेत दुसरे कोणते हॉटेल बरे, असा विचार करून ते दुसऱ्या हॉटेलचा पर्याय निर्माण करतात. दिसायला नेटनेटक्या पोरीच्या मागे लागणारी अनेक टाळकी असतात, हि मिळणे शक्य नाही मग आम्ही पुरुष पर्याय शोधतो. आणखी एक उदाहरण, बायको सोडून मैत्रीण पाळणारे अनेक, बहुतेक, पण पुढे पुढे होते काय आमच्यातल्या बहुतेकांना असे वाटायला लागते कि मैत्रिणीपेक्षा बायकोच बरी मग त्यांची पावले आपोआप घराकडे वळतात. आणि मैत्रिणींना देखील तेच वाटते कि मित्रापेक्षा नवराच सोयीस्कर, थोडक्यात वाट विसरलेल्या स्त्रिया देखील काही काळानंतर नवर्याकडे, घराकडे वळतात...

सध्या या राज्यातल्या कमांडेड आणि डिमाण्डेड शिवसेना भाजपा युतीकडे बघून मला हि उदाहरणे आठवलीत. जो उठतो तो एकतर शिवसेनेत जातो किंवा भाजपा मध्ये तरी, अर्थात भाजपाला देखण्या तरुणीसारखी अधिक डिमांड आहे. भाजपाचे मंत्रालयात दलाली करणाऱ्या विविध देखण्या तरुणींसारखे सध्या झालेले आहे. मंत्रालयात दलाली करणाऱ्या सुंदर आणि उफाड्या तरुणींना प्रचंड डिमांड आणि मागणी असते. अनेक अधिकारी आणि मंत्री मग या दलाली करणाऱ्या तरुणींचा बहुतेकवेळा फुटबॉल सारखा उपयोग करवून घेतांना नेहमीच दिसतात म्हणजे आपला कार्यभाग उरकल्यानंतर दुसऱ्याकडे हा चेंडू ढकलायचा असे त्यांच्यात सतत सऱ्हास सुरु असते. मंत्रालयात येणाऱ्या ज्या तरुणींनी आपले शरीर विकले नाही त्यांनाच काही अंशी राजकीय भवितव्य असते अन्यथा त्यांचे काही खरे नसते, थोडाफार पैसा त्यांना त्यातून मिळतो देखील पण असे वैभव कायम टिकणारे नसते, हेही मी जवळून बघत आलो आहे. विशेष म्हणजे मंत्रालयात स्वतःचे शरीर गहाण ठेवून कामे करवून घेणाऱ्या तरुणींच्या नवऱ्यांची पण त्यांना साथ असते...

विषय भरकटला. वर जी उदाहरणे दिलेली आहेत ती युतीसंदर्भात येथे सांगायची आहेत. अलीकडे या राज्यात आधी काँग्रेसशी किंवा काँग्रेस विचारांशी कित्येक पिढ्या सलगी ठेवणार्या अनेकांना बहुतेकांना अचानक शिवसेना, भाजपा किंवा युती आवडायला लागलेली आहे पण या नेत्यांचे हे बायको सोडून मैत्रिणीच्या प्रेमात क्षणिक पडलेल्या नवऱ्यासारखे आहे हे जर उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि अन्य सेना भाजपा नेत्यांच्या लक्षात आले नाही आणि वेळीच त्यांनी या येणाऱ्यांना निदान काही काळासाठी वेटिंग वर ठेवले नाही तर अचानक आलेली हि सूज म्हणजे पिळदार शरीर आहे असे समजून जे वर्षानुवर्षे जवळ आहेत त्यांना दूर करणे म्हणजे स्वतःच्या पायावर युती धोंडा मारून घेते आहे हेच शंभर टक्के माझे सत्य विधान आहे ज्याची नजीकच्या भविष्यात युतीच्या नेत्यांना खात्री पटल्याशिवाय राहणार नाही...
www.vikrantjoshi.com

अत्यंत महत्वाचे म्हणजे येऊ घातलेल्या विधान सभा निवडणुकीत सेना भाजपा आणि मित्रपक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत हे उद्धवजी आणि माननीय मुख्यमंत्री या दोघांच्याही बोलण्यातून आणि देहबोलीतून ते सिद्ध झालेले आहे. पण गेल्या पाच वर्षात सेना, भाजपा आणि मित्रपक्षांमध्ये आमदारकी लढविण्याची अनेक कित्येक नेत्यांनी तयारी केलेली असल्याने आणि तयारी केलेल्या प्रत्येक नेत्याला इच्छुकाला युतीला उमेदवारी देणे शक्य नसल्याने जमा झालेले पुन्हा एकवार मोठ्या संख्यने फुटून त्यांनी पूर्वीच्या त्यांच्या राजकीय पार्टीला जवळ केल्यास मला 
त्यात वावगे आणि आश्चर्य वाटणार नाही. त्यापेक्षा सेना किंवा भाजपाने त्यांच्याच पक्षातल्या इच्छुकांना ताकद दिली असती तर मैत्रिणीला सोडून पुन्हा बायकोकडे, या पद्धतीचे वातावरण युती मध्ये निर्माण झाले नसते...ज्यांना अजिबात चारित्र्य नाही, केवळ पैसे लुटायचे आणि आपला तेवढा मतदार संघ सांभाळून या राज्याला खड्ड्यात ढकलायचे या नीच हलकट थर्डग्रेड विचारांच्या नेत्यांना जवळ घेऊन प्रसंगी आपल्या पक्षात घेऊन त्यांचे जे लाड युतीने चालविले आहेत ती तात्पुरती सूज आहे ज्याचा फायदा पुन्हा एकवार बारीक नजर ठेवून असलेल्या शरद पवार यांनाच होणार आहे. बाहेरच्या काही भामट्या प्रस्थापितांना आपल्या पक्षात संधी देऊन येणाऱ्या विधान सभा निवडणुका एकहाती जिंकायच्या, २२० संख्याबळ कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायचे हे उद्धव आणि देवेंद्र यांचे स्वप्न या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपुरते कदाचित पूर्ण होईलही पण भामट्या प्रस्थापितांना बाहेरच्या नेत्यांना जवळ न करताही, युतीमध्ये त्यांना न घेता देखील मेरिटवर युतीला येणारी विधानसभा अगदी सहज जिंकता आली असती हि काळ्या दगडावरची रेघ आहे, तेच सत्य आहे...

जेव्हा एखादया निवडणुकीत होते तेव्हा युतीमध्ये असलेल्या कोणत्याही पक्षाला त्यांच्यातल्या प्रत्येक इच्छुकाला उमेदवारी देणे अजिबात शक्य नसते, उमेदवारीच्या संख्येला मर्यादा आहेत, असतात, यावेळी तर इच्छुकांची फार मोठी संख्या आहे. एक उदाहरण देतो. परभणी जिल्ह्यातले मोठे राजकीय प्रस्थ म्हणजे रामप्रसाद बोर्डीकर. ते ज्यांच्या बाजूने त्यांना निवडणूक मग कोणत्याही असोत, जिंकणे सहज शक्य असते असे हे परभणी जिल्ह्यातले लोकमान्य नेतृत्व. रामप्रसाद जेवढे परभणी जिल्ह्यात लोकप्रिय, त्यांच्या तोडीस तोड त्यांची विवाहित कन्या, मेघना साकोरे. याच मेघनाताईंनी या जिल्ह्यातून आमदारकीची निवडणूक लढविण्याची भाजपातर्फे मोठी तयारी केलेली आहे. आता त्या जेथून निवडणूक लढविणार म्हणतात, ती जागा जर सेनेकडे गेली तर गेल्या अनेक वर्षांपासून मतदार संघ बांधण्यासाठी कष्ट घेणाऱ्या भाजपाच्या या प्रभावी महिला नेत्याने काय करावे? या राज्यात आघाडीकडे उमेदवार नाहीत आणि युतीमध्ये उमेदवारांची नेत्यांची इच्छुकांची भाऊगर्दी झालेली आहे ज्याचे दुष्परिणाम सेनाभाजपा युतीला भोगावे लागू शकतात असे निदान आज तरी वाटते. त्यावर तोडगा असा, निदान यापुढे तरी युतीबाहेरच्या नेत्यांना थारा न देणे आणि दिलाच तर वाट पाहावी लागेल, असे 
त्यांना स्पष्ट शब्दात सांगणे तरच युतीचे काही खरे आहे अन्यथा आज जे आघाडीचे  झाले तेथे एक दिवस युती देखील असू शकते. सावध असावे...
तूर्त एवढेच :

पत्रकार हेमंत जोशी 

Thursday, 20 June 2019

पवार वार : पत्रकार हेमंत जोशी

पवार वार : पत्रकार हेमंत जोशी 

प्रात: शाखेची प्रार्थना आटोपताच गण्या देशपांडेने तडक पोराची घुश्यातच सोमलवार शाळा गाठली. रागाचे कारण देखील तसेच होते, सोमलवार शाळा संघाची नसूनही वरून अत्यंत नामवंत असूनही स्विमिंग आटोपल्यानंतर गण्याच्या मुलाचा टॉवेल वर्गातल्या कुठल्याशा मुलाने ढापला होता. वर्गात येताच तावातावाने गण्या पोराच्या क्लासटीचर ला म्हणाला, हेच का तुमच्या शाळेचे संस्कार...खुशाल चोऱ्या होताहेत, शाळेचे लक्ष नाही....अशाने पुढली पिढी कशी घडेल....? बाईंनी आधी गाण्याचे शांतपणे ऐकून घेतले मग विचारले, कोणत्या रंगाचा टॉवेल होता तुमच्या मुलाचा ? पांढऱ्या रंगाचा, गण्या म्हणाला. अहो, पांढऱ्या रंगाचे टॉवेल्स अनेकांचे असतात कसे ओळखायचे मी, बाई म्हणाल्या. त्यांचे वाक्य संपत नाहीच तोच गण्या त्यांना म्हणाला, अहो, त्याचा टॉवेल ओळखणे अगदी सोपे आहे, त्यावर ' इंडियन रेल्वे ' असे मोठ्या अक्षरात लिहिलेले आहे...

दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान, पद्धतीने वागणारे आम्ही जवळपास सारेच भारतीय, आपली खरकटी असतांना दुसऱ्याला स्वच्छ धुवून ये सांगणारे आम्ही, त्यामुळे वर वर चढणाऱ्या अप्रामाणिक भारतीयांचा ज्यावेळी प्रगतीचा आलेख उंचावत असतो त्याचवेळी त्याच्या अधोगतीच आलेख देखील नकळत झपाट्याने तयार होत असतो. वास्तविक शरद पवारांच्या हातात हात घेऊन एरवी प्रचंड खडूस असलेले नरेंद्र मोदी थेट बारामती दौरा करून आल्याचे तुम्हाला आठवत असेलच. म्हणजे पवारांना त्यांनी राजकीय गुरूच्या जागी ठेवून त्यांना आपलेसे करण्याची तयारी मोदी यांनी दाखवली होती..विशेष म्हणजे एरवी थेट भाजपा खासदाराने जरी मोदी यांना एखादे काम सांगितले तरीही काहीसे कधीकधी वेळकाढू धोरण राबवणारे मोदी त्या सुप्रिया सुळे यांना मात्र साक्षात लेक मानून तिने आणलेल्या कामांवर पटकन निर्णय घेऊन मोकळे व्हायचे पण जे पवार कधीही कोणाचे झाले नाहीत त्यांनी का म्हणून मोदी यांच्याशी म्हणाल तर मैत्रीची लॉयल्टी ठेवावी आणि येथेच पुन्हा एकवार शरद पवारांनी स्वतःचे एकवार मोठे राजकीय नुकसान करवून घेतले. त्यांना लोकसभा निवडणूकी आधी अनेक सामान्य मतदारांना जे वाटायचे ते तसेच वाटले होते कि पुन्हा मोदी येणे मोदी पंतप्रधान होणे शक्य नाही याउलट मोदी आणि सोनिया वादाचा राजकीय फायदा आपल्याला उचलता येईल आणि तिसर्या आघाडीच्या कुबड्यांवर किंवा मोठ्या प्रमाणात खासदार निवडून आणून आपल्याला नक्की पंतप्रधान होणे सहज शक्य होईल...

www.vikrantjoshi.com

त्यातून लोकसभा निवडणूक प्रचारा दरम्यान ज्या नेत्यांनी मोदी आणि भाजपाला नामोहरम केले त्यात शरद पवार सर्वाधिक आघाडीवर होते. पवारांचे चिन्ह घड्याळ, निकालानंतर त्यांचे खरेच बारा वाजले. आपण मोदी यांना धोका देऊन मोठी चूक केलेली आहे हे पवारांना कळून चुकलेले आहे पण मारलेला दगड एखाद्याच्या वर्मी लागल्यानंतर त्याने त्यानंतर का म्हणून तुम्हाला प्रेमाची झप्पी द्यावी, मोदी आणि भाजपा आता पवारांपासून कायमचे मनापासून दूर गेले आहेत. पवार यांनी जर मोदी यांना आपले मानले असते तर आज फार वेगळे चित्र बघायला मिळाले असते, आता ती वेळ निघून गेलेली आहे, पुन्हा एकवार सवयीप्रमाणे पवारांनी मोदी नामक मित्राला देखील ऐन मोक्याच्या वेळी धोका दिला, दगा दिला. पवार संपूर्ण देशात आणि या राज्यातही आता एकाकी पडले आहेत. येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत देखील त्यांच्या पक्षाचे चित्र फार पॉझेटिव्ह असेल असे निदान आज तरी दिसत नाही, पवारांच्या वृत्तीने पवारांचेच मोठे राजकीय नुकसान होत आलेले आहे...

ध्यानी मनी नसतांना एखाद्या रूपवतीने मागून पटकन यावे आणि एखाद्याच्या ओठांचे दीर्घ चुंबन घेऊन त्यालासुखदधक्का द्यावा तसे राज्यमंत्री म्हणून अलीकडे शपथ घेतलेल्या परिणय रमेश फुके यांचे झाले आहे. परिणयवर जळफळाट करणारे उगाच कुजबुज करायचे कि फडणवीसांनी आपल्या या दोस्ताला आता दूर केले आहे, त्यांचे पूर्वीसारखे फारसे सलोख्याचे संबंध राहिलेले नाहीत पण ती केवळ एक अफवा ठरली. नागपुरात तसे देवेंद्र यांना अनेक मित्र अतिशय जवळचे त्या संदीप जोशी यांच्यासारखे, पण त्यांनी डान्स करायचा चान्स परिणय रमेश फुके यांना दिला. त्यांना थेट राज्यमंत्री केले. परिणय नाव एकदम रोमँटिक पण ते तसे फारसे नावाला शोभणारे नाहीत म्हणजे आजही जर परिणय यांना हाल्फ चड्डी सदरा घालून धरमपेठ शाळेत सोडले तर थेट शिक्षकांच्या देखील ते लक्षात येणार नाही कि चाळिशीतले परिणय वर्गात येऊन बसले आहेत. एखाद्या गुटगुटीत बाळासारखी त्यांची शरीरयष्टी पण माणूस लाई भारी...

मी जसा परिणय यांना ओळखतो तसा त्यांच्या बापाला देखील मी अतिशय जवळून बघितले आहे. रमेश फुके हे नागपुरातले मोठे शासकीय कंत्राटदार आणि जेव्हा डॉ. श्रीकांत जिचकार एकदम जोमात होते त्यादरम्यान ते डॉ. जिचकार यांचे जवळचे  विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जायचे, त्यामुळे रमेश फुके यांचा शासकीय कंत्राटदाराचा व्यवसाय देखील पटापट वाढत गेला. पुढे वयाच्या २६ व्य वर्षी परिणय हे अवघ्या २४ मतांनी अपक्ष नगरसेवक म्हणून पहिल्यांदा महापालिकेत निवडून गेले आणि त्यानंतर सतत आजतागायत देवेंद्र फडणवीस यांचे ' हनुमान ' म्हणून नागपुरात नावाजले, राज्यात गाजले. मैत्रीची परिणीती अशी झाली कि अलीकडे केवळ देवेंद्र फडणवीसांच्या आग्रहातून परिणीती परिणय फुके यांना देखील भाजपातर्फे उमेदवारी देण्यात आली, सध्या त्या देखील नागपूर महापालिकेत नगरसेविका आहेत. सुदैवाने आता तर परिणय फुके यांच्याकडे  सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आली. परिणय यांना हे खाते तोंडपाठ आहे त्यांनी अवघ्या तीन साडेतीन महिन्यात या खात्यात वेगळे काहीतरी असे करवून दाखवावे कि राज्याला वाटावे बांधकाम खात्याला पुन्हा एकदा नितीन गडकरी यांच्यासारखा बाप माणूस मिळालेला आहे. बघूया, परिणय यांचे कौतुक करावे लागणार आहे कि त्यांनाही शाब्दिक हासडणे आमच्या नशिबी येणार आहे...

जे उद्धव ठाकरे यांना यावेळी अजिबात जमले नाही ते देवेंद्र फडणवीसांना अतिशय छान जमले आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल करतांना खऱ्या अर्थाने भाजपाने बाजी मारली आणि शिवसेनेने मोठे नुकसान करवून घेतले. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा फडणवीसांनी केलेला फायदा आणि इतरांचे ऐकून उद्धव ठाकरे यांनी सेनेचे करवून घेतलेले नुकसान त्यावर पुढे मी व्यापक नक्की लिहिणार आहे. लोकसभा निवडणुकीत नागपुरात बाहेरचे उमेदवार आघाडीचे नाना पटोले आणि त्यांच्या नागपुरातील मराठा कुणबी समाजाने खऱ्या अर्थाने गडकरी आणि थेट फडणवीस दोघांच्याही नाकात दम आणला, गडकरी हे देशात सर्वाधिक मतांधक्याने निवडून येतील असे जे सुरुवातीला वाटायचे ते गडकरी कुणबी मराठा समाजातील ऐक्यामुळे कसेबसे निवडणुकीत पास झाले आहेत. या समाजाचा एकत्रित असणायचा फायदा निदान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा सेना युतीला मोठ्या प्रमाणात व्हावा त्याचसाठी फडणवीसांनी या समाजात त्या त्या भागात ज्या नेत्यांचा आमदारांचा समाजावर प्रभाव आणि प्रभुत्व आहे त्यांना विस्तार करतांना मंत्रिमंडळात स्थान देऊन राजकीय कौशल्याची जणू चुणूक दाखवली आहे. त्यांनी बुलढाणा अकोला भागातून डॉ. संजय कुटे, अमरावती भागातून डॉ. अनिल बोन्डे आणि नागपुरातून परिणय फुके यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन, येणाऱ्या विधानसभेची बेगमी आजच करून ठेवली आहे. वास्तविक डॉ. संजय कुटे अगदी सुरुवातीलाच मंत्री झाले असते पण फडणवीसांच्या एका लाडक्या पत्रकाराने संजय कुटे यांच्या ऐवजी पांडुरंग फुंडकर यांनाच मंत्रीपद देण्यात यावे असा सतत आग्रह धरल्याने पुढे कुटे यांचे राजकीय वाटोळे झाले आणि फुंडकर मात्र लगेचच मंत्री झाले. फुंडकर यांचे देहावसान झाले नसते तर कुटे निदान या पंचवार्षिक योजनेत नक्कीच मंत्री झाले नसते. जवळचा मित्र धोका देतो तेव्हा माणूस कोलमडून पडतो. असे म्हणतात, फुंडकर मंत्री कसे झाले हे कळल्यानंतर कुटे अनिल गावंडे नामक मित्राच्या खांद्यावर डोके ठेवून मुलगी सासरला जातांना बाप जसा 
ढसाढसा रडतो तसे म्हणे रडले होते. आता मात्र कुटे स्वतःवर जाम खुश आहेत....
तूर्त एवढेच :

आपला मराठी बिग बॉस २ : पत्रकार हेमंत जोशी

आपला मराठी बिग बॉस २ : पत्रकार हेमंत जोशी 
बिग बॉस या सुरु असलेल्या कलर वाहिनीवरील कार्यक्रमात अभिनेत्री मैथिली जावकरवर अन्याय झाला तिच्यावरअन्याय केल्या गेला असे वारंवार जाणवते. जेवढे १५ दिवस ती बिग बॉस मध्ये सहभागी झाली तिच्यावर कॅमेरा एवढा कमी फोकस केल्या गेला कि ती या कार्यक्रमात सहभागी आहे किंवा नाही त्यादरम्यान दर्शकांना जाणवायला लागले होते, हा तिच्यावर सारासार अन्याय झाला वाटायला लागले आहे याठिकाणी समजा वैशाली माडे वर अन्याय झाला असता तर मनसेची कार्यकर्ती म्हणून लगेच राजगडावरून कलर ला धमकावले गेले असते किंवा त्या बिचुकलेवर अन्याय झाला असता तर थेट साताऱ्यातून उदयन राजे भोसले यांनी कलर वाहिनीच्या संबंधित प्रमुखांना भोसडले असते, आमच्या माणसांवर अन्याय होतोय...

तसे मात्र भाजपाकडून मैथिली जावकरच्या बाबतीत घडले नाही म्हणजे भाजपामधल्या अत्यंत प्रभावी विनोद तावडे किंवा आशिष शेलार यांनी कलर वाहिनीला साधा जाब देखील बिचारलेला नाही कि एकमेव मैथिली जावकर वर, आमच्या या प्रामाणिक कार्यकर्तीवर तुम्ही अन्याय का केलाय, तिला वाईल्ड कार्ड एंट्री तुम्ही द्यायलाच हवी, हे असे विविध वाहिन्यांवर राजकीय दबाव आणून सऱ्हास अनेक स्पर्धकांना पुढे केले जाते, पुढे नेले जाते जाते. आज तुम्हाला मी येथे मुद्दाम सांगू इच्छितो आहे जसे एखादया शाळेत लाडक्या विद्यार्थ्याला वेगळ्या फॅसिलिटीज असतात माझी माहिती अशी कि वाहिन्यांवरील स्पर्धांमध्ये रिऍलिटी शोज मध्ये असे अनेकदा, वारंवार घडत असते त्यामुळे सर्वसामान्य लागा नसलेल्यांवर त्यातून हमखास अन्याय होतो, केल्या जातो...

उद्या समजा मला हे समजले कि बिग बॉस मध्ये भाग घेणारे जे स्पर्धक, आम्हाला दररोज दिल्या जाणारे तुमचे मानधन नको फक्त आमचे तेवढे अस्तित्व कायम ठेवा, असे जर त्यातल्या काही स्पर्धकांनी स्वतःची फुकाची जगभर जाहिरात करवून घेण्या साठी सांगितले आणि कलर ने ते ऐकले तर मला त्यात अजिबात यापुढे आश्चर्य वाटणार नाही किंवा कदाचित असे घडलेले देखील असेल, घडत असेल. विशेष म्हणजे जेवढे महेश मांजरेकर मी जवळून ओळखतो त्या मांजरेकर यांचे वैशिष्ट्य असे कि ते त्यांच्या मित्रपरिवाराला कायम संधी देण्यात आघाडीवर असतात. त्यांचा बंद पडलेला मिफ्ता अवॉर्ड शो मी जवळून अनुभवला असल्याने, मांजरेकर नेमके कसे तेथे मी थेट जवळून बघितलेले आहेत, येथेही ते दिसले आहेच, तो कोण बाप्पा किंवा केळकर किंवा हीना पांचाळ इत्यादींकडे बघून आणि त्यांचे खास असलेले जर उद्या मोठ्या खुबीने शेवटपर्यंत टिकून ठेवण्यात आले तरी देखील त्यामुळे आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नसेल. महेश मांजरेकर यांचा हा मनमानी खाजगी शो असे बिग बॉस चे वर्णन करणे येथे अधिक सोयीस्कर वाटते...

मीडिया च्या विरुद्ध मीडिया सहसा जात नाही, व्हेस्टेड इंटरेस्ट मार खाल्ले तरच ते एकमेकांच्या विरोधात जाहीरपणे जातात ज्याप्रकारे गेल्या अनेक वर्षात दैनिक लोकमत त्या देशोन्नती, सकाळ, नागपूर पत्रिका इत्यादींशी पंगा घेऊन मोकळे झाले आहे त्यावरून सांगतो. पण येथे आमच्याबाबतीत असे अजिबात नसतांना आम्ही असे केवळ मूठभर त्या भाऊ तोरसेकर यांच्यासारखे पत्रकार आहोत कि कोणत्याही प्रभावी असलेल्या मीडिया क्षेत्राची अजिबात पर्वा न करता ते जेथे जेथे चुकलेत, चुकतात, त्यांना तेथे तेथे ठोकून काढतो. कारण भानगडी करणाऱ्या मीडिया क्षेत्रातील मंडळींना वठणीवर आणण्याचे काम फक्त मीडिया करू शकते, इतरांनी तसा प्रयत्न जरी केला तरी त्यांना सारे एकत्र येऊन उध्वस्त करतील, आयुष्यातून उठवतील. यांच्याशी पंगा घ्यायचा म्हणजे सर पे कफन बांधके लिखना पडता है...
तूर्त एवढेच :

पत्रकार हेमंत जोशी 

आपला मराठी बिग बॉस : पत्रकार हेमंत जोशी

आपला मराठी बिग बॉस : पत्रकार हेमंत जोशी 

आयुष्यात नेहमी छान छान घडावे असे वाटत असेल तर आज ज्या पद्धतीने बहुतेक भारतीय वागताहेत ते तसे वागणे जरा सोडून बघा, आयुष्याकडे, विशेषतः इतरांकडे सतत निगेटिव्ह बघण्याने, प्रतिस्पर्ध्यांचे सतत वाईट कसे होईल या विचाराने आयुष्याकडे बघू नका अर्थात स्वतः मी हे फॉलो करतो,माझ्या कुटुंबात एखादया हिंदी मराठी मालिकेसारखे वातावरण तयार होणार नाही याची काळजी घेतो. इतरांकडे सकारात्मक नजरेतून बघण्याचे फायदे फार होतात. माझा एखादा मित्र किंवा नातेवाईक मी जवळून बघत असतो कि तो सतत डोक्यात निगेटिव्ह विचार ठेवून जगतो, माझ्या असे लक्षात येते कि त्यातून त्याच्या वाटेला आलेले सुख तो या डावपेच खेळण्याच्या वृत्तीतून उपभोगू शकत नाही, सतत चांगले विचार, तुमचे आयुष्य आपोआप सुंदर बनत जाईल मग ओढवलेल्या एखाद्या संकटात किंवा दुख्खात देखील जगण्याचे बळ तुमच्या शरीरात नक्की निर्माण होईल.हे मी तुम्हाला येथे यासाठी सांगतोय कि कलर वाहिनीवर सध्या सुरु असलेल्या बिग बॉस या कार्यक्रमात जो तो एकमेकांशी डावपेच लढवून खेळून हि स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करतोय, सकारात्मक पद्धतीने माणूस यशस्वी होऊच शकत नाही हा नेहमीचाभारतीय घराघरातला हलकट विचार जणू त्यात यशाचे गमक म्हणून दाखवल्या जातोय, जे अत्यंत हिडीस वाटते...

अलीकडे वर्षा दोन वर्षात मराठीत देखील बिग बॉस चे फॅड आले आहे, सध्या कलर वाहिनीवर आपण हा कार्यक्रम बघतोय. मी सहसा असले टुकार कार्यक्रम बघत नाही पण आधीच्या मराठी बिग बॉस मध्ये आमचे मित्र पत्रकार अनिल थत्ते होते आणि यावेळी माझी जवळची मैत्रीण अभिनेत्री मैथिली जावकर असल्याने मराठी बिग बॉसबघण्याचा मोह आवरला नाही. वाईट वाटले ते गायिका वैशाली माडे बद्दल. वास्तविक ती मोठ्या उंचीची मराठी आणि हिंदीतली व्यस्त आघाडीची गायिका. तिने बिग बॉस या मॅनेज केल्या जाणार्या कार्यक्रमात वास्तविक सहभागी व्हायला नको होते त्यातून तिने स्वतःची किंमत कमी करून घेतली. सुरेख पुणेकर यात सहभागी झाल्या आहेत, त्यांचे आणि दिवंगत वसंत डावखरे यांचे हटके संबंध असतांना एकदा अचानक त्या दोघांची आणि माझी कुठेतरी गाठ पडली मग डावखरे यांनीच नाईलाज झाल्याने माझी सुरेखापुणेकर यांच्याशी ओळख करून दिली होती...


www.vikrantjoshi.com

आधीच्या बिग बॉस मधली विनर अभिनेत्री मेधा धाडे आणि यावेळची स्पर्धक गायिका वैशाली माडे यांचे वैवाहिक आयुष्य तसे खूपच सेम सेम आहे म्हणजे ज्यांनी त्यांच्यावर शारीरिक अत्याचार बळजबरी केली त्याच तरुणांशी पुढे जाऊन त्यांना लग्न करावे लागले,विशेष म्हणजे त्यांना त्या प्रकारच्या नवऱ्यापासून दोघींनाही एक एक मुलगी आहे. पण या दोघांच्या त्या विवाहाकडे आणि मुलींना जन्म देण्याच्या एकंदर प्रोसेस कडे बघून हेच वाटते कि आपल्या या महाराष्ट्रात देखील बिहार सारखेच घडत असते फक्त वैशाली माडे आणि मेधा धाडे या दोघी भोवती ग्लॅमर असल्याने आपल्याला त्यांचे आयुष्य कळले पण अशा अनेक मेधा किंवा वैशाली या राज्यात असाव्यात ज्या आयुष्याच्या ऐन तरुण टप्प्यावर पुरुषांच्या वासनेला बळी पडलेल्या असतील, दुर्दैवाने ते बाहेर येत नाही पण या अशा तरुण स्त्रियांचे आयुष्य अंगावर शहारे आणणारे असते. अर्थात मेधा आणि वैशाली दोघींनीही पुढे स्वतःला सावरले आणि खंबीर मनाने कठीण परिस्थितीवर मात करीत त्या दोघीही प्रसिद्धीच्या झोतात आल्या. मेधा घाडगे यांनी सुपरस्टार नावाचा सिनेमा काढल्याचे मला आठवते ज्यात हिरो सिद्धार्थ जाधव होता, वास्तविक त्या सिनेमाशी संबधित एक व्यक्ती मला मेधा यांचे दुसरे पती असावेत वाटायचे पण बिग बॉस मध्ये तिसराच कोणीतरी समोर आला. जाऊ द्या चित्रपटसृष्टीत हे अतिशय कॉमन आहे, 
म्हणून तिकडे लिखाणासाठी वळावेसे वाटले नाही...

दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे कलर च्या या बिग बॉस कार्यक्रमात ज्यांना सहभागी करून घेतल्या जाते त्यांचा इतिहास फसवाफसवीचा आहे का हे कलर वाहिनी किंवा दस्तुरखुद्द महेश मांजरेकर इत्यादींनी आवर्जून तपासले पाहिजे पण ते तसे होतांना घडतांना तेथे आढळत नाही, आढळले नाही त्यामुळे लोकांशी गोड गोड बोलून त्यांना आर्थिक फसविणारे मागल्या वेळी आणि यावेळीही सहभागी झालेले काही महाभाग, काही स्पर्धक मी त्यात बघतो आहे, बघितले आहेत. विशेष म्हणजे यावेळच्या बिग बॉस मध्ये एक स्पर्धक तर असा आहे कि लोकांना फसवून लुबाडून चरितार्थ चालविणे हेच त्याच्या आयुष्याचे ध्येय आहे. विशेष म्हणजे नेमके यावेळी या अशा चीटर पुरुष स्पर्धकाला यशस्वी होतांना ते दाखवताहेत, बिग बॉस मधला हा भामटा आणि व्यसनांच्या अतिशय आहारी गेलेला स्पर्धक लोकांना,मुलींना जाळ्यात ओढून ' एखाद्या पुणेरी भामट्यासारखा ' नेमका कोण आहे हे लोकांनी,मुलींनी ओळखावे आणि त्याच्या या ग्लॅमर ला भुलून त्याने अमुक एखादी योजना तुमच्यासमोर भविष्यात मांडलीच तर त्याच्या फसविण्याला कृपया बळी पडू नये. तो जे बिग बॉस मध्ये स्वतःचे मोठेपण रंगवून कधी एखाद्या मुलीला जाळ्यात अडकवितोय किंवा स्पर्धेत हिरो म्हणून जिंकण्याचा प्रयत्न करतोय, गावभराची माहिती ठेवणार्या महेश मांजरेकर यांनी हेही बघितले पाहिजे. समाजाने ओवाळून टाकलेल्या मंडळींना मांजरेकर आणि कलर वाहिनीने उगाच मोठेपण देऊ नये, प्रवेश देखील देऊ नये...
पुढल्या भागात : तूर्त एवढेच.

मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल : पत्रकार हेमंत जोशी

मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल : पत्रकार हेमंत जोशी 
होणार होणार असे गेली चार वर्षे मंत्रिमंडळ विस्तार आणि बदलाचे चालले होते पण त्याचे सतत चोरी चोरी चुपके चुपके मधल्या राणी मुखर्जी सारखे सुरु होते. त्या सिनेमात राणीला बाळ होणार असेच साऱ्यांना दिसत असते पण तसे नसते तिने पोटाला उशी बांधलेली असते. मंत्रिमंडळ आणि विस्तारविषयी सतत साडेतीन चार वर्षे मुख्यमंत्र्यांनी हे असेच करून ठेवले होते,म्हणजे मीडिया बातम्या सोडून मोकळे व्हायचे कि अमुक दिवशी मंत्रिमंडळ बदल तसेच विस्ताराचा मुहूर्त ठरलेला आहे पण ते प्रत्यक्षात कधीही घडले नाही, राणी मुखर्जी सारखे सतत घडले मीडिया कायम तोंडावर पडली...

पण एकदाचे गंगेत घोडे न्हाले. मंत्रिमंडळ विस्तार आणि बदलही झाला पण नव्याने झालेल्या मंत्र्यांचे औट घटकेच्या सवाष्णीसारखे झाले आहे म्हणजे काही तरुणींचे लग्न होत नाहीत तोच त्या विधवा होतात पण त्याकाळात त्यांच्या हाती जे पडते तेवढ्या आठवणींवर त्यांना जगायचे असते, काहींचा फक्त हनिमून साजरा होतो काहींना दिवस जातात आणि लगेच नवरा मारतो. नव्याने झालेले मंत्री, त्यांना तर माहित आहे कि पुढल्या काही हा दिवसात आम्हाला वैधव्य येणार आहे त्यामुळे त्यांच्यातल्या बहुतेकांची भूमिका जेवढा सरकारी तिजोरीवर, जनतेच्या पैशांवर अधिक दरोडा घालता येईल डल्ला मारल्या जाईल तोच आपला प्रॉफिट शिवाय कायम कुमारी म्हणून मेल्यापेक्षा एखाद्याच्या नावाने विधवा म्हणून तर जगता येईल तसे ' माजी मंत्री ' हि मरेपर्यंत कायम बिरुदावली तर चिटकून राहील यातच ते समाधान मानणार आहेत...

www.vikrantjoshi.com

जयदत्त क्षीरसागर त्यांच्यासारखेच बहुतेक मंत्री किंवा राज्यमंत्री अनुभवातून दरोडे टाकण्यात वाकबगार आहेत त्यामुळे कमी वेळात अधिक फायदा कसा उचलायचा त्यांना ते नेमके माहित आहे. खातेवाटप जाहीर होताच त्यादृष्टीने त्यातले अनुभवी मंत्री राज्यमंत्री त्यादृष्टीने कामाला देखील लागले आहेत. असा एकही फडणवीस मंत्रिमंडळातला आजी माजी मंत्री नाही ज्यांचे इत्यंभूत पुरावे माझ्याकडे नव्हते किंवा नाहीत मग मी ते उघड का केलेले नाहीत हा तुमचा सवाल ऐकण्याआधी मला माझी एक चूक कबूल करायची आहे ती अशी कि अनेक वर्षांनी या राज्याला चांगले मुख्यमंत्री लागोपाठ दोन वेळा मिळाले, श्री पृथ्वीराज चव्हाण आणि आताचे देवेंद्र फडणवीस. कोणत्याही मंत्र्यांचे पुरावे बाहेर काढले तर त्यात अधिक बदनामी देवेंद्र फडणवीसांची होते. दुसरे अत्यंत महत्वाचे म्हणजे आधीचे आघाडीतले सारेच मंत्री हे दरोडेखोर असायचे, युतीचे दोन तीन मंत्री दरोडेखोर होते आहेत बाकीचे बहुतेक पाकीटमार पद्धतीचे वागणारे असल्याने त्यांना आताच पुरावे मांडून शब्दांतून झोडपून काढणे आवश्यक वाटले नाही. तशी गरज वाटली नाही...

आता फार महत्वाचे सांगतो, मंत्री किंवा अधिकारी मग तो कितीही स्वतःला ताकदवान समजत असेल पण जेव्हाकेव्हा यांच्यातले काही अति करतात आई शपथ सांगतो त्यांच्या केबिन मध्ये जाऊन मी त्यांची आईबहीण घेतो, त्यांना सांगतो, खबरदार हे असे वागून फडणवीस सरकारला अडचणीत आणले तर. एकदा प्रयोग करून पहा, चारित्र्य घालवून बसलेला माणूस जगातला सर्वाधिक गांडू माणूस असतो. अर्थात त्यांना ते माझे मनापासूनचे कळकळीचे सांगणे पटते, त्यातले काही सावध झाले, काहींनी मनावर फारसे घेतलेले नाही, हरकत नाही, फारशी वेळ गेलेली नाही. फडणवीसांनी एक फार चांगले केले त्यांनी माझ्या वडिलांच्या विद्यार्थ्याला माझ्या गावातल्या आमदाराला माझ्या मित्राला, डॉ. संजय कुटे या त्यांच्याही मित्राला पूर्णवेळ मंत्री केले पण आमच्या जळगाव जामोद या बुलढाणा जिल्ह्यातील गावाला ज्या खात्याचे दूरदूरपर्यंत काम पडणार नाही अशा कामगार खात्याचे त्यांना मंत्री केले...

फडणवीसांनी सध्या मी ज्या गावात राहतो त्या गावातल्या आमदाराला देखील मंत्री केले. आमच्या परिसराचे आमदार भाजपातले शरद पवार ( चांगल्या अर्थाने ) आशिष शेलार आणि संजय कुटे या दोघांनाही एकाचवेळी मंत्री केले पण त्यांना मंत्री करायचेच होते तर फार आधी संधी दिली असती खूप वर्षे माथ्याला वैधव्य न आलेल्या स्त्रीसारखे ते मनाला वाटले असते पण हे औट घटकेचे सौभाग्य या दोघांच्याही वाटेला निदान सध्या तरी आलेले आहे, बघूया येणाऱ्या विधान सभा निवडणुकीनंतर नेमके काय घडते ते म्हणजे सत्ता युतीची आली तर हे दोघेही पुन्हा मंत्री म्हणून शपथ घेतील तेवढे नक्की आहे. बापरे, समजा भाजपाचे अतुल भातखळकर मंत्री झाले असते तर, फार काहीं घडले नसते फक्त आजूबाजूला सतत शिवराळ आणि अश्लील शब्द ऐकायला मिळाले असते...
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Wednesday, 19 June 2019

भामटे, पटेल आणि पवार : पत्रकार हेमंत जोशी

भामटे, पटेल आणि पवार : पत्रकार हेमंत जोशी 
एखाद्यावर तेही लिखाणातून राग व्यक्त करतांना फार खालच्या पातळीवरजाऊन मी सहसा शब्द वापरत नाही पण या आधीच्या लिखाणात माजीकेंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी लिहितांना त्यांची ' गांड फाटली 'आहे हा शब्दप्रयोग अनेकांनाच्या भुवया उंचावणारा ठरला पण राजकीय पत्रकारितेत वावरतांना काही माणसे अतिशय मस्तकात जातात त्यातले हे महाशय, ज्यांना मी अतिशय जवळून राजकीयदृष्ट्या ओळखतो त्यामुळे त्यांचे नाव जरी नजरेसमोर आले तरी आपली सटकते. पण हे असे क्वचित घडते. अमुक एखाद्याविषयी राग किंवा लोभ त्या त्या लिखाणापुरते संबंधित असतात, कधीही कायम टिकणारे नसतात....

अलीकडे विमानतळावर माझे आणि अजित पवार यांचे तब्बल दहा वर्षानंतर तोंडावर तोंड पडले, बोलणे झाले पण त्याआधी कधीही विनाकारण त्यांचे कौतुक केले नाही किंवा विनाकारण त्यांच्यावर घसरलो नाही. जेथे जेथे दादा योग्य वाटले मनापासून कौतुक केले आणि जेथे जेथे ते अयोग्य वागले वाटले तेथे तेथे ते अगदी सत्तेत आक्रमक नेते असतांनाही त्यांना शब्दांतून लिखाणातून ठोकून काढले. काही नेत्यांनी काही अधिकाऱ्यांनी हे राज्य बुडविण्यात फार मोठी भूमिका बजावलेली असते अशावेळी मग मनापासून सटकते, पुरावे हाती पडले रे पडले कि मग माझे शाब्दिक झोडपणे सुरु होते त्यातून भले भले पत्रकार देखील अशावेळी सुटत नाहीत...

प्रफुल्ल पटेल यांनी ते केंद्रात मंत्री असतांना थेट सोनिया गांधी आणि शरद पवार या दोघांनाही एकाचवेळी उल्लू बनवून मोठा आर्थिक गैरफायदा करवून घेतला. ईडी सारख्या शासकीय यंत्रणा तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाच्या कधी चौकशा करतील का, नाय नो नेव्हर. या प्रफुल्ल पटेलांनी घोळ घातले म्हणून ईडी त्यांच्या मागे लागली तोवर खरे तर फार उशीर होऊन गेला आहे पण जे काय ईडी च्या हाती लागेल तेही नसेल थोडके त्यामुळे बघूया पुढे पुढे काय होते ते. मी अनेकदा लिखाणातून पवारांना फार पूर्वी सांगितले, वारंवार सांगितले कि प्रफुल्ल पटेल आमच्या विदर्भात तुम्ही वाढविलेल्या राष्ट्रवादी पक्षाचे वाटोळे करतो आहे, एक दिवस असा येईल कि याच  प्रफुल पटेलांमुळे तुमची राष्ट्रवादी माझ्या विदर्भात औषधाला देखील सापडणार नाही, नेमके आज तेच घडले....

राजकारणातून निवृत्त होऊ पण प्रफुल पटेल यांच्या लबाड नेतृत्वाखाली अजिबात काम करणे नको असे दत्ता मेघे गिरीश गांधी संजय खोडके अजय पाटलांसारख्या विदर्भात राष्ट्रवादी पक्षात एकेकाळी भरीव कार्य करणाऱ्या नेत्यांना वाटले आणि त्यांनी थेट राष्ट्रवादीतून बाहेर पडणे पसंत केले. ज्यांनी तसे केले नाही त्यांचा अनिल देशमुख झाला, प्रफुल्ल पटेलांची हुजरेगिरी करणाऱ्या अनिल देशमुखांनी भलेही पैसे अमाप मिळविले असतील पण केवळ बख्खळ पैसा असणे म्हणजे सुखी आयुष्य जगणे नसते त्यांच्या ते लक्षात आले तोवर उशीर झाला होता, अनिल देशमुख तसा प्रचंड राजकीय ताकदीचा नेता पण काही काळासाठी नोव्हेअर झाला, आता अनिलबाबू राजकारणात पुन्हा एसट्याब्लिश होण्यासाठी झगडताहेत, प्रयत्न करताहेत. पण मी जे बेंबीच्या देठापासून शरद पवारांना सांगत होतो कि तुमच्या या अशा बेधुंद वागण्याने विदर्भातली तुम्ही उभी केलेली नेत्यांची फळी आणि राष्ट्रवादी रसातळाला जाईल, माझे ते सांगणे पवारांना आज पटले असेल, आता विदर्भात राष्ट्रवादी अस्ताला गेलेल्या माकडांच्या काही प्रजातींसारखी शोधावी लागते कारण पवारांनी पटेलांसारख्या मधुर फळांचा नाश करणाऱ्या माकडांना जवळ केले आणि मेघेसारखे सहकारी अपमानित केले...
क्रमश :
 पत्रकार हेमंत जोशी 

भाकड गायीला वासरू : पत्रकार हेमंत जोशी

भाकड गायीला वासरू : पत्रकार हेमंत जोशी 
योग्य वयात लग्न उरकल्यानंतर वैवाहिक जीवन लुटण्याचा आनंद मिळतो. मासिक पाळी गेल्यानंतर हनिमून साजरा करणे म्हणजे बत्तीशी पडलेल्या जक्खड म्हाताऱ्याला चुंबन घेण्याची संधी चालून आल्यासारखे. योग्य वेळी योग्य संधी चालून आली तर आयुष्याचे सोने झाल्यासारखे वाटते पण नको त्यावेळी चालून आलेली सुवर्ण संधी हि अंथरुणावर शेवटच्या घटका मोजणाऱ्या व्यक्तीला तरुण नर्सने लग्नाचे अमिश दाखवल्यासारखे असते. फडणवीसांनी विधान सभा निवडणुकीला केवळ ८०-९० दिवस शिल्लक असतांना मंत्रिमंडळ विस्तार आणि बदलाचे जे घोडे दामटले त्यावरून हे असे सारे आठवले....

कोणत्याही पंचवार्षिक योजनेत अलीकडे नव्याने अस्तित्वात आलेल्या मंत्री मंडळाचा विस्तार लवकरच केल्या जाईल असे हमखास सांगितले जाते आणि आज उद्या करता करता नाही म्हणायला शेवटच्या वर्षात तरी मंत्रिमंडळ बदल आणि विस्तार हमखास केल्या जातो. असा विस्तार आणि बदल वास्तविक देवेंद्र फडणवीस यांनीही करणे अति अति आवश्यक होते, काही नालायक मंत्र्यांना राज्यमंत्र्यांना डच्चू देऊन काही लायक आमदारांना संधी देणे त्यांचे ते महत्वाचे असे काम होते पण यात फडणवीसांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले असे नाही त्यांना त्यांच्या विरोधकांनी आणि शिवसेनेने देखील मोठा मानसिक त्रास दिला त्यामुळे खरे तर मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल रखडला...

तेच ते चेहरे कायम मंत्रिमंडळात त्यामुळे या राज्यातली आघाडी म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस रसातळाला गेली. पवारांचे आजपर्यंत अनेकदा फिनिक्स पक्ष्यासारखे घडले म्हणजे अनेकदा वाटायचे कि पवार आता राजकारणातून संपले किंवा त्यांच्या आयुष्यातून उठले पण लोकांचे साऱ्यांचे अंदाज चुकीचे ठरायचे आणि शरद पवार पुन्हा नव्या दमाने नव्या जोमाने सत्तेत भरारी आघाडी घ्यायचे. यावेळीही पवार तसे राज्याच्या आणि देशाच्याही राजकारणातून संपले आहेत बाजूला पडले आहेत त्यांचे महत्व जवळपास संपुष्टात आले आहे पण पवार पुन्हा एकदा फिनिक्स पक्षासारखी  भरारी घेऊन नव्याने जोमाने सत्तेत येतील का तर त्यावर माझं उत्तर ' नाही ' असे आहे कारण दरवेळी पवारांना जी भरारी घ्यावी लगे ती त्यांच्याच विचारांच्या नेत्यांमधून घ्यावी लागे, यावेळी तसे अजिबात नाही कारण त्यावेळेचे त्यांचे राजकीय विरोधक अजिबात लेचेपेचे नाहीत....

जे या राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे झाले ते तसे यापुढे शिवसेना आणि भाजपाचे होऊ नये असे जर या राज्याच्या मोदींना म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल तर यापुढे त्यांनी योग्य वेळी भाकरी परतवणे आवश्यक आहे म्हणजे त्यांचा या राज्याचा नेता म्हणून त्यांच्या युतीमध्ये बऱ्यापैकी वचक असेल, वचक बसेल. मंत्रिमंडळात बदल आणि विस्तार न करणे हि त्यांच्या हातून घडलेली मोठी चूक आहे आणि या चुकीचे खापर उद्धव ठाकरे यांच्यावर देखील फोडणे तेवढेच आवश्यक आहे कारण त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यानेच एवढा विलंब झाला आहे हेही नाकारून चालणार नाही. एक मात्र बरे झाले मोदी पंतप्रधान पदी विराजमान झाल्यानंतर लगेचच लबाड प्रफुल पटेल यांची ईडी ने चौकशी सुरु केली आहे. गॉड गॉड बोलून माझे सारे पाप खपून जाते हा जो हलकट प्रफुल्ल पटेल यांना अति आत्मविश्वास होता, आम्ही तुझे बाप आहोत हे मात्र मोदी यांनी दाखवून दिल्याने पटेलांची यावेळी बऱ्यापैकी गांड फाटली आहे. पटेलांना अतिशय जवळचा असलेला एक सहकारी मला म्हणाला, एवढे घाबरलेले प्रफुल्ल पटेल मी आजवर कधीही बघितलेले नव्हते, पण त्यांचे सारे पैसे परदेशात गुंतविल्या गेले असल्याने प्रफुल्ल फार अडचणीत येतील असे वाटत नाही, असेही तो बोलण्याच्या ओघात म्हणाला...
क्रमश :

पत्रकार हेमंत जोशी 

Tuesday, 11 June 2019

अमेरिकन्स आणि आपण : पत्रकार हेमंत जोशी


अमेरिकन्स आणि आपण : पत्रकार हेमंत जोशी 
जे जे म्हणून चांगले आहे पाश्चिमात्यांचे अनुकरण करणे वावगे नाही पण जे जे आपले सर्वोत्कृष्ट आहे ते ते सोडून त्यांचे वाईट तेवढे घेणे नक्की चुकीचे. त्यांना देखील हिंदूंचे जे चांगले आहे ते उशिरा कळले यावेळी मला ते अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणावर जाणवले. योगासने आणि भारतीय शाकाहार याकडे अमेरिकन्स झुकलेले दिसले. जिकडे नजर टाकावी तिकडे योगासनांचा प्रभाव, उर भरून आले. बाबा रामदेव आणि नरेंद्र मोदी या दोघांच्या प्रभावाखाली अमेरिकन्स झुकल्याचे त्यांच्या बोलण्यातून तसे जाणवले. मी तर नेहमीच सांगत आलोय, लबाड भामट्या लुटारू बुवा बाबांना डोक्यावर घेतल्यापेक्षा जणू आधुनिक परमेश्वरी अवतार रामदेव बाबा केव्हाही या देशाचे, आपले भले करणारा, अशांना पुजण्यास किंवा त्यांचे अनुकरण केव्हाही फायद्याचे ठरणारे....

न्यू जर्सीला एका भारतीय मित्राकडे जेवायला गेलो. त्याचा स्वतःचा उत्तम व्यवसाय, वास्तविक एकुलत्या एक मुलाने तो सांभाळावा त्या दाम्पत्याची इच्छा पण अमेरिकेत वाढलेली मुले स्वतंत्र विचारांची असतात. मुलगा ऐकायला तयार नाही, तो फुटकळ नोकरी करतो, चाळिशीला आलाय पण लग्न करायला तयार नाही, गेल्या तीन चार वर्षांपासून गोऱ्या मैत्रिणीसंगे लग्न न करता घरातच तळ ठोकून आहे. आमचे छान जमले पटले तर दोन तीन वर्षांनी लग्न करू, मूल तर त्या दोघांनाही नको आहे, दोघेही ड्रग्स च्या अमलाखाली, अनेक घरातून हे असेच बेधुंद वागणे, मुलाच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता सतत जाणवत होती. हेच आता आपल्याकडे सर्हास घडायला लागलेले आहे. ज्यांच्या घरी काळा हरामाचा पैसा मोठ्या प्रमाणावर येतो आहे असे एकही कुटुंब नाही जेथे मुले आणि मायबाप देखील संस्कारांना धरून आहेत...

मुले अतिशय खुबीने आईवडिलांच्या वाईट सवयी आत्मसात करीत असतात. मायबापांना वाटते कि आपले चोरून व्यसनाधीन होणे मुलांच्या लक्षात येत नाही पण हि पिढी अनेक पटींनी चतुर हुशार आहे, काही वर्षांनी अशा संस्कारात वाढलेली मुले बिघडलेल्या माय बापाच्या कितीतरी पटीने पुढे निघून जातात म्हणून पाश्चिमात्यांचे पेज थ्री अनुकरण हि आता आपल्या समाजाला लागलेली मोठी कीड आहे. मी तर आगाऊपणाने असे म्हणेन कि फडणवीसांनी जसे शाळेतून मराठी सक्तीचे केले तसे त्यांनी संघशाखेसारखे प्रत्येक शाळेतून असे काहीतरी घडवून आणावे जेणेकरून संघ शाखेवर केल्या जाणारे उत्तमोत्तम हिंदू संस्कार मुलांच्या, शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर होतील, केल्या जातील. इतर धर्मात देखील उत्तम कसे वागावे सांगितले आहेच पण कुराणातले अत्युत्तम विचार बाजूला ठेवून नको ते हिंसक पाकिस्थानी वागणे काही मुसलमानांच्या डोक्यात शिरते तेव्हा मात्र फार वाईट वाटते. मला खात्री आहे जसे हिंदू नसलेल्यांनी देखील म्हणजे थेट काही मुस्लिमांनी देखील जसे योगासने गरजेचे मानले तसे संघ संस्कार देखील त्यांच्याही मुलांवर व्हावेत असे त्यांनाही एक दिवस नक्की वाटेल...
www.vikrantjoshi.com
अलीकडे शरद पवारांनी संघाचे केलेले समर्थन, बहुतेकांनी ते मोठ्या थट्टेने घेतले जे नक्की रुचण्यासारखे नव्हते. विशेषतः पवारांच्या त्या वाक्यांवर संघ आणि भाजपा समर्थकांनीच अधिक तीव्र खालच्या पातळीवर येऊन थट्टा केली म्हणजे पवारांचे कौतुक स्वागत करायचे सोडून, आता कशी जिरली, पद्धतीने तोंडे वाकडी करून ज्या मंडळींनी पवारांवर तोंडसुख घेतले ते नालायक आहेत होते म्हणणे अधिक योग्य ठरेल. शेवटी मोठ्या प्रमाणावर आलेला काळा पैसा त्यातून घडणारे घडलेले दुष्परिणाम, पवारांनी स्वतः त्यांच्या कदाचित घराण्यात किंवा काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्यांच्या खानदानात जवळून अनुभवले बघितले म्हणून त्यांनाही हे कुठेतरी वाटले कि उत्तम हिंदू संस्कारापासून दूर गेले तर जे घडते ते नक्की वाईट असते. आणखी एक अतिशय महत्वाचे सांगतो कि संघात किंवा संघाशी संबंधित क्षेत्रात पक्षात काम करणारे जर मुंडे महाजन पद्धतीने वागत गेलेत तर केवळ उशाशी संघ संस्कृती ठेवून भागत नसते, विचार आचरणातही आणावे लागतात....
तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

Saturday, 8 June 2019

संघ आणि शरद पवार : पत्रकार हेमंत जोशीसंघ आणि शरद पवार : पत्रकार हेमंत जोशी 
भाजपाला मतदान करणाऱ्या अनेक मतदारांचे खासदार पत्रकार कुमार केतकर यांच्यासारखे आहे अर्थात प्राण्यांचेही तसेच असते म्हणजे लग्न न करता एकत्र राहण्यासारखे. प्रत्येक संघ स्वयंसेवक हा भाजपाचा कार्यकर्ता आणि मतदारही असतो पण भाजपाचा कार्यकर्ता किंबहुना नेते मंत्री देखील संघ स्वयंसेवक असावेत असे आवश्यक नाही, नसते. सक्तीही नसते. त्यामुळे या देशात, केंद्रात किंवा अन्यत्र राज्यात जेथे जेथे भाजपाची सत्ता आली त्यावरून उठसुठ संघाला जे क्रेडिट देणे सुरु आहे ते काही अंशी योग्य नाही त्यामुळे कधीही संघाशी संबंध न आलेल्या पण भाजपाला मतदान करणाऱ्या मतदाराला, भाजपाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना नक्की वाईट वाटेल...

पण भाजपामध्ये काम करणाऱ्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संघाचे विचार नक्की समजावून घ्यावेत त्यामुळे भाजपामध्ये अशांना काम करणे कार्यरत राहणे खूप सोपे जाऊ शकते. हे नक्की आहे कि भाजपा किंवा आधीचा जनसंघ किंवा अन्य कितीतरी संघटना केवळ संघाच्या मुशीतूनच तयार झाल्या आहेत, जन्माला आले आहेत पण संघाच्या अन्य कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्यांनी संघात स्वयंसवक म्हणून काम करायलाच हवे असे अजिबात नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये कार्यरत असलेले असणारे कितीतरी सदस्य आहेत ज्यांनी संघाचे कधी साधे तोंड बघितलेले नाही, नसते. त्यामुळे आजकाल विशेषतः मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर संघावर मीडिया, सोशल मीडियावरून जे वाट्टेल ते लिहिणे सुरु आहे, ते अनेकदा चुकीचे वाटते. अत्यंत महत्वाचे म्हणजे आधी संघात नियमित जाणारे पण काळाच्या ओघात भाजपामध्ये पूर्णवेळ गुंतलेले असे कितीतरी आहेत कि ज्यांचा पुढे पुढे संघाशी संबंध कमी होत गेलेला आहे...

www.vikrantjoshi.com

एक मात्र नक्की आहे कि संघाने अटलजींसारखे या देशाला दिलेले किमती हिरे त्यांची किंमत न मोजता येणारी. देशाचे राष्ट्रपती असोत कि पंतप्रधान किंवा सुमित्रा महाजन, गृहमंत्री, उपराष्ट्रपती किंवा देशातले १८ मुख्यमंत्री २९ राज्यपाल एकेकाळी संघाचे स्वयंसेवक म्हणून काम केलेले थोडक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्यागाने जगलेल्यांना त्यांच्या कष्टाचे आणि निष्ठेचे नक्की फळ मिळालेले आहे पण संघ त्यासाठी आधी समजावून घ्यावा लागतो त्याचे इतर काही बाजारू राजकीय पक्षांसारखे नाही कि जा संघात आणि घ्या सत्ता हातात, संघाच्या कडक शिस्तीत तयार झाल्यानंतरच काहीतरी पदरात पडण्याची तेही शक्यता असते. येथे साऱ्याच स्वयंसेवकांना सारे काही मिळते असे अजिबात नाही, एक मात्र नक्की, देशसेवा करण्याचे शंभर टक्के समाधान मात्र मिळते...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे हिंदूंच्या उत्तमोत्तम संस्कारांची सुविचारांची संघटना. गाव तेथे गुंड तसे संघातही काही वाईट विचारांचे स्वयंसेवक घुसलेले दिसतात पण या देशाचे फार वाईट व्हावे असे त्यांनाही वाटत नसल्याने असे सडके आंबे संघाला देखील खपवून घ्यावे लागतात. संघ नेमका कसा हे शरद पवारांसहित आता सर्वांना समजावून घ्यावासा वाटतो यातच संघाचे आणि संघातल्या अनेकांच्या आजवरच्या बलिदानाचे यश दडलेले आहे. शरद पवार यांनी त्यांचे मत उघड व्यक्त केले इतरांना तसे वाटते पण बोलण्याची हिम्मत होत नाही. त्यामुळे शरद पवारांच्या वक्तव्यावर जी उघड टीका केली जाते आहे, त्यांची खिल्ली उडविली जाते आहे ते अतिशय लाजिरवाणे आहे. अनेक हिंदी मराठी चित्रपटातून जसे त्यातले खलनायक अगदी शेवटी आपली चूक सर्वासमोर मान्य करतात ते तसे शरद पवारांच्या बाबतीत घडले समजून पुढे जावे उगाच त्यांना हिणवू नये. येथे शरद पवार देखील खलनायक आहेत असा कृपया अर्थ काढू नये...

कुठेतरी वाचलेला एक चुटका खास तुमच्यासाठी : 
सत्यनारायणाच्या आरतीचे तबक माझ्यासमोर आले आणि हळूच मी खिशातली दहा रुपयांची फाटकी नोट तबकात टाकून त्यातले नऊ रुपये काढून घेतले. फाटकी नोट खपली वरून नऊ रुपये काढून घेतल्याच्या आनंदात मी पटकन मागे वळलो. मागे वळून बघतो तर काय, शेजारच्या काकूंनी माझ्या हाती दोन हजाराची नोट दिली. मी लगेच ती नोट तबकात टाकली पण माझीच मला लाज वाटली कि काकूंनी तब्बल दोन हजार रुपये टाकायला दिले आणि मी केवढा हलकट, फाटकी नोट टाकून थेट देवाला फसविले...
दरवाजा बाहेर पडलो नि शूज घालायला लागलो तर काय त्या काकू देखील पुन्हा शेजारीच आल्या चपला घालायला. रागावून मला म्हणतात कशा, पैशांची किंमत ठेवा रे, समजा तुझ्या खिशातून पडलेल्या दोन हजाराच्या त्या नोटेकडे माझे लक्ष गेले नसते तर...
तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

भ्रष्टाचार मुक्त राष्ट्र राज्य २ : पत्रकार हेमंत जोशीभ्रष्टाचार मुक्त राष्ट्र राज्य २ : पत्रकार हेमंत जोशी 
महाराष्ट्रात वाममार्गाने अलिकडल्या ३० वर्षात ज्यांनी अमापसमाप संपत्ती जमा केली असे एकही कुटुंब नाही ज्यांच्या घरी पुढली पिढी आणि ते स्वतः सुखा समाधानाने आयुष्य जगताहेत. बहुतेकांची मुले मुली वाया गेलेली त्या अपत्यांचे दररोजचा खर्च किमान एक लाख रुपये कारण ड्रग्स च्या आहारी गेलेल्या तरुण पिढीचा खर्च मोठा असतो. महिन्याकाठी २५-३० लाख रुपये उडविणे त्यांना त्याचे काहीही वाटत नाही. पेज थ्री च्या आहारी गेलेली तरुण पिढी, त्यांच्याकडे बघून त्यांचे मायबाप, त्यांची अवस्था येथेच नर्क भोगायला भाग पाडणारी असते. माझ्या कडे तर या राज्यातल्या तमाम बिघडलेल्या पिढीचे तंतोतंत पुरावेच आहेत. त्यामुळे काळ्या कमाईतून जेमतेम एखादी दुसरी पिढी ऐश करू शकते, फार काळ देशाला खड्ड्यात घालणारे सुखासमाधानाने जगणे अशक्य ठरते....

मिसाळ आडनावाचे अधिकारी आहेत, कोणत्याही फाईलवर पैसे दिसल्याशिवाय ते काम पुढे रेटतच नाहीत, अर्थात या राज्यातले नेते आणि अधिकारी सारेच मिसाळ, अशांना साथ देणारे आम्ही सारेच म्हणजे त्यात दलाल व्यापारी मीडिया कंत्राटदार मंत्री, आमदार, खासदार, सारेच्या सारे आलेत. कोकणात नाणार प्रकल्प जाहीर झाल्यानंतर त्या प्रकल्पाची इत्यंभूत माहिती असणाऱ्या साऱ्यांनीच नाणार प्रकल्प परिसरात कोट्यवधी रुपयांच्या जमिनी खरेदी केल्या कारण नाणार प्रकल्प सुरु होताच जमिनींचे भाव नक्की गगनाला भिडणारे होते पण प्रकल्प रद्द झाला आणि मिसाळ सहित अनेक शासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले, मिसाळ तर फक्त वेडे व्हायचे तेवढे बाकी आहेत कारण या शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विविध लोकांच्या नावे करोडो रुपये गुंतवून जमिनी खरेदी केल्या आहेत. यापुढे नाणार प्रकल्प जर सुरु होणार नसेल तर खरेदी केलेल्या जमिनींचे भाव कवडी मोल ठरणारे आहेत. वाचकहो, हा प्रकृतीचा नियमच आहे कि केलेले सारे येथेच फेडून वर जावे लागते, मी पण अनुभव घेतलाय, घेतोय...
www.vikrantjoshi.com

पुढल्या वेळी फडणवीसांनी गुणवत्ता पारखून आणि दमात घेऊन जर अधिकाऱ्यांना पोस्टिंग दिले आणि मंत्रिमंडळ सदस्यांना देखील भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्या तर घरचा रास्ता दाखवेल, सांगितले तर येथे या राज्यात बऱ्यापैकी कामाचा दर्जा राखून प्रगती साधने शक्य होईल. विशेषतः पदोन्नती होत होत जे मराठी अधिकारी या राज्यात पुढे प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्त केल्या जातात त्या सर्वांना माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांच्यासारखे उत्तम काम करून आयुष्याचे सार्थ नियोजन का करावेसे वाटत नाही. सुरेश साळवी नावाचे एक सनदी अधिकारी मला वाटते निवृत्त होऊन १७-१८ उलटली असावीत. आजही त्यांची अधूनमधून भेट होते, ते केवळ पेन्शनच्या भरवशावर जगतात, एवढे नोकरीत असतांना प्रामाणिक होते, त्यामुळे बस ने प्रवास करतात, तुम्ही अगदी सुरेश साळवी म्हणून बनून नोकरी करावी असेही नाही पण घरातल्या पैशांना आणि पुढल्या पिढीला कीड लागेल निदान असेही आडवेतिडवे मिळवू नये. १९८० ते आजतागायत, या राज्याची घडी जी विस्कटली ती पुन्हा बसेल वाटत नाही....

सरकार मग ते कोणाचेही असो, विशेषतः संघ संस्कारातून आणि प्रबोधनकारांच्या विचारातून जन्माला आलेल्या युतीकडून तरी स्वच्छ सरकारची हमी अपेक्षित आहे. शासकीय व प्रशासकीय अधिकारी मोक्याच्या पदावर नेमत्तांना गुणवत्तेच्या तत्वांचा अंगीकार स्वीकार करणे महत्वाचे ठरते याचे अधिक भान पृथ्वीराज चव्हाण ते या राज्याचे मुख्यमंत्री असतांना त्यांना होते. देवेंद्र फडणवीसांची हि पाच वर्षे त्यांना या राज्यातल्या भामट्या नेत्यांशी सामना करण्यात गेली त्यामुळे त्यांना मनातून तीव्र इच्छा असून देखील थेट पृथ्वीराज चव्हाण होता आले नाही पण त्यांच्या मनातली अस्वस्थता कायम जाणवत असते आणि मला शंभर टक्के खात्री आहे, पुढले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र हे चव्हाणांपेक्षा अधिक आक्रमक होऊन काम करतील. उत्तम प्रशासनाची खात्री जेथे असते तेथे राज्य नक्की झपाट्याने प्रगती करते. आधी गुणवत्तेच्या आधारावर मोठ्या प्रमाणात पोस्टिंग होत असे पण शरद पवार, अशोक चव्हाणांसारखे सत्तेत मुख्य पदी विराजमान झाले आणि महाराष्ट्र हे महाभ्रष्टराष्ट्र म्हणून देशात ओळखल्या जाऊ लागले....
तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी