Wednesday, 8 May 2019

गडकरी बावनकुळे व फडणवीस तिघेही एकमेकांसाठी कासावीस भाग २ :---पत्रकार हेमंत जोशी


गडकरी बावनकुळे व फडणवीस 
तिघेही एकमेकांसाठी कासावीस 
भाग २ : ----पत्रकार हेमंत जोशी 


राम और श्याम चित्रपटात खलनायक प्राण समोर सहिष्णू राम म्हणजे नायक दिलीपकुमार घाबरून थरथर कापताना दाखविलेला आहे, आम्हा हिंदूंचेही तेच पाच वर्षांपूर्वी इतरांसमोर, आम्ही हिंदू आहोत हे सांगतांना आमची प्रत्येकाची फाटायची एवढे लाचार आम्हाला या देशातल्या सत्ते वर असलेल्या प्रत्येकाने करून ठेवले होते बाकी काहीही असो पण मोदी आणि शहा आले आणि काय घडले माहित नाही पण हिंदूंमध्ये देखील, अगदी उघड, आम्ही हिंदू आहोत हे ठणकावून सांगण्याचे बळ आले हे मात्र त्रिवार सत्य आहे. वास्तविक आम्हा पत्रकारांचे कसले हो कोणत्या राजकीय पक्षावर प्रेम, आमची भूमिका न्हाव्यासारखी असते म्हणजे सर्वांचीच आम्ही भादरून ठेवतो समोर कोण आहे मान वर करून न बघता,हिंदूंनी देखील कसे दादागिरीने जगायचे असते हे या दोघांनी आणि या राज्यात, एकमेव फडणवीसांनी सर्वांना दाखवून दिल्याने फडणवीसांवर जळफळाट करणारे भले भले आहेत त्यातल्या त्यात निदान उद्धव ठाकरे यांनी जरी फडणवीसांना न भांडता पाठिंबा दिला कि मनाला बरे वाटते. अनेक दरदिवशी सांगतात, तुम्ही फडणवीसांचा फायदा करवून घ्या, काय फायदा करवून घ्यायचा अशा नेत्याचा, मुख्यमंत्र्यांचा जो तळहातावर शीर घेऊन २४ तास या राज्यातल्या हिंदूंना ताठ मानेने कसे जगता येईल, मराठी माणसाचे कसे भले साधल्या जाईल त्यावर मेहनत घेत असतो. मी नक्की आनंदी आहे कारण या राज्यातले मराठी आणि हिंदू हे ताठ मानेने आम्ही नेमके कोण आता सांगू शकतात. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची उद्धव आणि देवेंद्रमुळे कमी भासत नाही हेही नसे थोडके...

मूळ मुद्द्याकडे वळतो. फडणवीस बावनकुळे गडकरी या तिघा नेत्यांचे आपापसातले संबंध त्यावर नेमके सांगतो. तुम्हाला हे कदाचित ठाऊक नसेल, जेवढी धावपळ लोकसभा निवडणुकांदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी केली तेवढी अन्य कोणत्याही नेत्याने केलेली नाही. त्यांनी नेमकी कशी मेहनत घेतली त्याचे पुरावे ऑफ द रेकॉर्ड च्या ताज्या अंकांत आकडेवारीसहित वाचा, थक्क व्हाल, एकाचवेळी पाचही बोटे तोंडात घालाल. अत्यंत महत्वाचे म्हणजे नागपूरकर पत्रकारांना बातमी न दिसल्याने त्यांनी एका गोष्टीला प्रसिद्धी दिली नाही, तुम्हाला म्हणून सांगतो वाचकहो, या लोकसभा निवडणुकादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या नात्यातील हळुवारपणा ओलावा अनेकांनी अनुभवला, जवळून बघितला. हे कोणाला फारसे माहित नाही कि लोकसभा प्रचारादरम्यान फडणवीस हे दरदिवशी तेथे नागपुरात सकाळी सकाळी यायचे प्रचाराचे नियोजन करून लगेचच राज्यात प्रचार करण्यासाठी सभा घेण्यासाठी कानाकोपऱ्यात वणवण भटकायचे आणि रात्री पुन्हा नागपूरला परतायचे कारण बावनकुळे आणि फडणवीसांना गडकरी यांच्या तोळामासा तब्बेतीची कदाचित कल्पना आलेली होती म्हणून गडकरींवर प्रचाराचा फारसा ताण न पडण्याची फडणवीस बावनकुळे काळजी घ्यायचे. हेच फडणवीस गडकरींच्या लांबलचक लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत स्थानिक नेत्यांना बरोबर घेऊन बैठका घेऊन रात्री उशिरा गडकरींसंगे अंतिम बातचीत करायचे आणि कोणताही गाजवजा न करता फडणवीस पुढल्या कामाला लागायचे. एरवी फारतर चार पाच तास रात्री झोप काढणारे हेच फडणवीस त्यादिवसात तर सलग ३-४ तास देखील झोपले नाहीत, नव्हते, विरोधक सत्तेविना अस्वस्थ त्यामुळे त्यावेळेचे विरोधक अक्षरश: तुटून पडल्यासारखे आणि पातळी सोडून ओरछार करतांना दिसले...

www.vikrantjoshi.com

तिकडे दिल्ली विषयीच्या राजकारणावर मला ठाऊक नाही पण येथे या राज्याचे भले साधतांना नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवत या तिघांत थोडेसेही आपापसात मतभेद, राज्याला अजिबात परवडणारे नाहीत. यापुढे सत्तेत कदाचित युती आणि आघाडी आलटूनपालटून येत राहील, ते महत्वाचे नाही पण अधूनमधून जेव्हा केव्हा युती सत्तेत असेल, तेव्हा तेव्हा जर या तिघांत समन्वय सलोखा स्नेह नसेल तर त्याचे वाईट परिणाम थेट राज्याला भोगावे लागतील. एक नक्की कि देशाच्या राजकारणात मोदी आणि गडकरी या स्पर्धेत मोहन भागवत यांचे कायम गडकरींच्या बाजूने पारडे झुकत आलेले आहे पण जेव्हा केव्हा गडकरी आणि फडणवीस यांच्यातला एखादा मुद्दा उपस्थित होतो त्या त्या वेळी भागवत यांची बॅलन्स भूमिका आपोआप पुढले प्रश्न क्षणार्धात निकालात निघतात, हे मला संघाच्या मोठ्या पदाधिकाऱ्याने विविध वेळोवेळीची उदाहरणे देऊन सांगितले आहे.या तिघांत आपापसातले नाते अतिशय भावुक आहे त्या नात्याला तोड नाही. ते तिघे जणू एकाच कुटुंबातले सदस्य आहेत पद्धतीने त्यांचे वागणे असते..
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment