Thursday, 30 May 2019

पवारांचा पार्थ : पत्रकार हेमंत जोशीपवारांचा पार्थ : पत्रकार हेमंत जोशी 
आम्ही भारतीय नेमके कसे त्यावर अलीकडे माझ्या अमेरिकेतल्या पाठक आडनावाच्या मैत्रिणीने पाठवलेला छान किस्सा सांगतो. नंतर पुढल्या महत्वाच्या विषयाला हात घालतो...कॅनडा देश पर्यटनासाठी फार प्रसिद्ध आहे. ( माझा धाकटा मुलगा विनीत तेथे शिकायला होता. मी खूप वेळ कॅनडा बघितले, निसर्गरम्य देश आहे. नायगरा धबधबा अमेरिकेतून नव्हे आर कॅनडातून अधिक सुंदर दिसतो, डोळ्याचे पारणे फेडतो) तिकडच्या नागरी सुधारणा कशा उत्तम त्यावर मिसेस पाठक यांनी पाठवलेला हा किस्सा...अलीकडे एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत जामनगरहून एक गुजराथी कुटुंब कॅनडा फिरायला निघाले होते. त्यात पती पत्नी, त्यांची दोन मुले आणि एक वृद्ध जोडप्याचा समावेश होता. एकदा ते आपल्या कार मधून फिरत असतांना त्यांच्या मागे एका कॅनडियन स्त्रीची गाडी होती. अचानक त्या स्त्रीने पाहिले कि पुढील गाडीतील त्या गुजराथी आजोबांनी बाहेर तोंड काढून रक्ताची उलटी केली. लगेच त्या स्त्रीने ९११ क्रमांकावर फोन केला. बघितले ते सांगितले...काही क्षणातच तेथे ऍम्ब्युलन्स हेलिकॉप्टर हजर झाले. आजोबांना त्यात टाकून त्वरित ऑक्सिजन लावून इस्पितळात हलविण्यात आले. डॉक्तरांनी अत्यंत लक्ष ठेवून आजोबांच्या जीवाचा धोका टाळला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्या जागृत स्त्रीचे आभार मानण्यात आले. नंतर इस्पितळाने लगेच आजोबांच्या मुलाकडे कॅनेडियन डॉलर ४५०० असे बिलही दिले. पण या अनपेक्षित बिलाने मुलगा बिथरला आणि बापावर खेकसून म्हणाला, पान खाऊन बाहेर पिचकारी मारायची काय गरज होती...? 
आता नेमक्या विषयाकडे वळतो, 

देवाने माझे अनेक हट्ट आयुष्यात पूर्ण केले. एखादी नटी तेही अतिशय तोकड्या कपड्यांनिशी जवळून बघायची होती. थेट आलिया भट आणि मी कित्येक महिने जुहूच्या सन अँड सॅण्ड मध्ये एकत्र स्विमिंग करीत असू फरक एवढाच त्यावेळी तिचे अवघे वयोमान वय वर्षे चार होते. हेही वाटायचे कि एखाद्या नटीशी एकांत चार घटका गप्पा माराव्यात. अलीकडे कुठल्याशा कामानिमित्ते उषा नाडकर्णी माझ्या ऑफिस मध्ये येऊन बसल्या होत्या. छान गप्पा झाल्या. २९ मे ला माझा आणखी एक हट्ट देवाने पूर्ण केला. कुटुंबवत्सल तेही थेट अजित पवार मला बघायचे होते, देवाने माझे तेही स्वप्न पूर्ण केले. अजितदादा आणि पार्थ पवार दोघेही एकत्र खूप प्रसन्न मूड मध्ये मुंबईत आंतरराष्ट्रीय विमान तळावरील बिझिनेस लाउंज मध्ये भेटले आणि डोळ्याचे पारणे फिटले...

आता देवाने आणखी एक इच्छा पूर्ण करावी. माझ्या ओळखीच्या एखाद्या तरुणीशी आमचा अविवाहित पत्रकार मित्र राजन पारकर याचे लग्न व्हावे मग त्याने संसाराची सारी जबाबदारी माझ्यावर सोपवावी. त्यावर तो म्हणतो, मी अविवाहित राहीन पण तुमच्या ओळखीच्या तरुणीशी लग्न करणार नाही. नको रे राजन असा हट्ट धरून बसू. मोठ्यांचे ऐकावे. २९ तारखेला मी न्यू यॉर्कला निघालो आणि हि अशी अचानक भल्या पहाटे अजितदादा आणि पार्थ शी म्हणाल तर भेट झाली म्हणाल तर गाठ पडली. मनाशी लगेच म्हणालो, चला एक विषय मिळाला लिहायला कि इकडे राज्यात जनता दुष्काळाशी सामना करते आहे आणि तिकडे अजितदादा निघालेत फडणवीस मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांसारखे बेशरम होऊन निवडणूक संपताच परदेशात सहलीला पण ते तसे 
नव्हते, अजितदादा असे निर्लज्ज नाहीत....

तिकडे दुबईत अजितदादांचा धाकटा जय उत्तम व्यवसाय करतो आहे, लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत त्याच्याशी भेट नाही, फारसे बोलणे झाले नव्हते म्हणून दादा आणि पार्थ त्याला केवळ दोन दिवस भेटायला गेले होते. मला नेमके जे अपेक्षित आहे होते ते त्यादिवशी मनासारखे घडले. तरुण मुलांशी गप्पा मारणारे त्यांच्या नेमक्या अडचणी त्यांचे स्वप्न समजावून घेणारा बाप मला अजितदादांमध्ये बघायचा होता तो बघितला. पार्थ आणि दादा दोघे ज्यापद्धतीने दहा पंधरा मिनिटे माझ्याशी गप्पा मारल्या. त्यादरम्यान त्या दोघांचे एखाद्या मित्रांसारखे ट्युनिंग बघून मी मनोमन सुखावलो. अतिशय हळुवार स्वभावाच्या म्हणजे काका शरद पवारांच्या घराण्यात अजिबात न शोभणाऱ्या पार्थ पवार नामक भावनाप्रधान तरुण नेत्याला जे वाटायचे कि त्याच्या बाबांनी त्याला समजावून घ्यावे, तो देखील राजकारणात किंवा व्यवसायात पुढे जाऊ शकतो, हे लोकसभा निवडणुकीनिमित्ते दिसून आले. अजितदादा आणि पार्थ सतत तीन महिने प्रचारानिमित्ते जे एकत्र फिरले, बसले उठले, त्याने आता नजीकच्या काळात नक्की फरक पडणार आहे, त्यातून त्याचे एकटेपण नक्की दूर झाले आहे, पार्थ मनापासून शंभर टक्के खुश आहे...

निवडणूक हरलो, पराभूत झालो, थोडा डिस्टरब झालोय, पार्थ म्हणाला. डिस्टरब का, कशासाठी, तुला जी लाखो मते मिळालेली आहेत ते सारे मतदार तुझे आणि तुझ्या बाबांचे, आजोबांचे फॉलोअर्स आहेत, पराभूत झाल्याने त्यांना वाऱ्यावर सोडून जाणार आहेस का, तसे असेल तर ते अजिबात योग्य नाही. हारजीत होतच असते, त्याने अजिबात खचून जायचे नसते, जिद्दीने आणखी पुढे जायचे असते, मी त्याला म्हणालो. नम्र पार्थला ते मनापासून पटले असावे. तेवढ्यात विमानाची वेळ झाली म्हणून त्यांना बोलावणे आले, दादा निघाले, पार्थचा पाय निघत नव्हता. अरे आज तुझ्यासोबत प्रॉम्प्ट बाप आहे, दादा आहेत, पळ लवकर मग तो निघाला. मी जे अजितदादांना म्हणालो कि पार्थ माझा आणि विक्रांत चा अतिशय लाडका आहे, तेच खरे आहे, पार्थ अतिशय वेगळा हळुवार तरुण नेता आहे...

शरद पवारांनी नेहमीप्रमाणे घरातही शक्यतो भेदभाव करू नये. त्यांनी अलीकडे रोहित पवारला जवळ घेतले आहे, नक्की चांगले घडले आहे पण आजोबांना दोन्ही नातू सारखे असावेत जसा त्यांनी रोहित पवारांवर विश्वास टाकला आहे ती भूमिका त्यांनी पार्थबाबत पण घ्यावी. वर्गातली सारी मुले अभ्यासाच्या बाबतीत सारखी नसतात पण जे अस्सल गुरु गुरुजी असतात ते अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांकडे देखील लक्ष पुरवतात, लक्ष ठेवून असतात. शरदरावांनी गुरुजींच्या भूमिकेत शिरावे आणि उजव्या खांद्यावर रोहितला घेतले आहे, डाव्या खांद्यावर पार्थ ला देखील उचलून घ्यावे, त्यालाही नेमके राजकारण समजावून सांगून पुढली त्याची राजकीय दिशा त्याला ठरवून द्यावी, पार्थ नक्की ऐकेल. या लोकसभा पराभवाच्या निमित्ताने बाबा आणि आबा दोघांचे ऐकणे कसे आवश्यक आहे, असते हे एव्हाना त्याच्या नक्की लक्षात आले आहे. पार्थ देखील पुढे जाणारा आहे...
तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

Monday, 27 May 2019

जरा सांभाळून : पत्रकार हेमंत जोशी


जरा सांभाळून : पत्रकार हेमंत जोशी 
जसे पूर आलेल्या नदीत पोहायला उतरायचे नसते, धूर सोडणाऱ्या ढुंगणासमोर तोंड करून बसायचे नसते, मूड कोणताही असो अधिक वजन असलेल्या बायकोला अंगाखांद्यावर घेऊन काहीही करायचे नसते, पिसाळलेल्या कुत्र्याच्या पाठीवर कुरवाळायचे नसते, सेक्स करायचा मूड आल्यानंतर पिसाळणाऱ्या हत्तीसमोर हत्तीण सोडून अन्य कोणीही जावयाचे नसते, माकड होऊन माणसाने कधीही या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारायच्या नसतात, तेच ते पाचकळ विनोद करून माणसाने स्वतःचा मेहमूद लक्ष्मीकांत बेर्डे, जगदीप, डॉ. साबळे करून घ्यायचा नसतो तद्वत अपयश समोर दिसल्यानंतर पेटून उठलेल्या शरद पवार यांच्या नादी भल्याभल्यांनी लागायचे नसते. अक्कलहुशारीने त्यांना सामोरे जायचे असते. आकांडतांडव करणारे पवार भयंकर डेंजरस असतात, ठरतात, हा इतिहास सर्वांनाच माहित आहे, पाठ आहे. दाऊद युगाचा अस्त झाल्यानंतर पवार तसे बऱ्यापैकी शांत राहून राज्याचे राजकारण स्वतःसाठी खेळत होते पण त्यावेळेचे भाजपाला मिळालेले यश आणि त्यांना मिळणारे अपयश, पवार यांचे पित्त अतिशय खवळलेले आहे. डोळ्यात तेल घालून या राज्यातल्या युतीने विशेषतः फडणवीसांनी पवारांना सामोरे जायचे आहे कारण चिडलेले पवार कोणत्याही थराला जातांना मागलापुढला विचार करतांना दिसणार नाहीत, अशावेळी पाकिस्थान परवडला म्हणायची वेळ आपल्यावर येते...

नवनीत राणा विदर्भातल्या अमरावती मधून निवडून आल्या म्हणून फारसा आनंद झाला असे अजिबात नाही कारण प्रोफेशनली मतदारांचा वापर करवून घेणारे नेते विदर्भातल्या मतदारांच्या कधी लक्षात आलेच नाहीत त्यामुळे आम्हाला कायम विदर्भातल्या स्थानिक व्यापारी वृत्तीच्या नेत्यांनी वापरून घेतलेले आहे, नवनीत किंवा त्यांचा नवरा त्यातलेच एक त्यामुळे त्यांच्या निवडून येण्याने मनाला आनंद झाला असे अजिबात नाही पण आनंदराव अडसुळांना विदर्भातल्या मतदारांनी मोदी लाट असतानाही पराभूत केले, बरे झाले. फार पूर्वी एक डॉक्टर दाम्पत्य मंत्रालयात दलाली करीत असे त्यासाठी हा डॉक्टर आपल्या देखण्या तरुण सेक्सी बायकोचा तिला शौकीन मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर पाठवून तिचा वाईट पद्धतीने उपयोग करवून घेत असे. त्यावर डी वाय पाटील, सुशीलकुमार शिंदे, अनंतराव थोपटे, दिनेश अफजलपूरकर इत्यादी नेते अधिकारी विस्ताराने तुम्हाला सांगू शकतील. हा डॉक्टर बाहेर चतुर्थ कर्मचाऱ्यांशी गप्पा मारीत बसायचा आणि त्याची पत्नी शौकिनांकडे जाऊन फाईल्स क्लिअर करवून घ्यायची, त्यांची ती नेहमीची पद्धत होती...

आम्हा विदर्भातल्या मतदारांची अवस्था वर्षानुवर्षे त्या डॉक्टर दाम्पत्यासारखी हलकट लाळघोट्या नेत्यांनी मजबूर करून ठेवली आहे, बाहेरचा उमेदवार आमच्यावर वेळोवेळी लादायचा मग ते दिवंगत नरसिंह राव असतील, गुलाम नबी आझाद असतील, आनंदराव अडसूळ असतील, वासनिक बापबेटे असतील, असे कितीतरी. विदर्भातल्या भोळ्या मतदारांना गृहीत धरून या नालायक संधीसाधू नेत्यांनी कायम आमचा त्या डॉक्टरने जसा बायकोचा वापर करून घेतला, आमचे हे असे झालेले होते त्यामुळे अडसूळ पडले बरे झाले निदान यापुढे तरी सहसा बाहेरचा उमेदवार लादण्याची विविध राजकीय पक्षातल्या श्रेष्ठींची हिम्मत होणार नाही. डॉक्टर दाम्पत्याचे उदाहरण दिले, अशा अनेक बायका या मंत्रालयात आपले शरीर विकून पैसे मिळवतात आणि सुंदर शरीराची चाळण करवून घेतात, त्यावर १९९० च्या दरम्यान कांताला वापरून घेणारे निंबाळकर आणि निंबाळकरांच्या भरवशावर मुलगी जावयाला जोडलेले दोन दोन फ्लॅट घेणाऱ्या कांता तुम्हाला व्यापक सांगतील...

शिवसेनेचे यावेळीही १८ खासदार निवडून आले पण यावेळची संख्या १८ वरून अगदी सहज २२ वर गेली असती. केवळ फडणवीसांच्या आग्रहाला उद्धव ठाकरे बळी पडले आणि ऐनवेळी नरेंद्र पाटलांना उमेदवारी देऊन, उदयनराजे भोसले यांना निवडून आणण्यात अप्रत्यक्ष जणू मदतच केली कारण राजे यांच्या समोर बाहेरचे तसेच युतीला अपरिचित नरेंद्र पाटील उभे करण्यात काहीही अर्थ नव्हता. पचका झाला. तेथून डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणूक लढवावी अशी ठाकरे यांची इच्छा होती पण अमोल कोल्हे अगदी सुरुवातीपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाचा हट्ट करून बसले होते. कोल्हे जर साताऱ्यामधून उभे असते तर शिवसेनेच्या एकाचवेळी दोन जागा अगदी सहज वाढल्या असत्या. साताऱ्यामधून डॉ. अमोल कोल्हे व शिरूर मधून पुन्हा एकदा आढळराव पाटील शंभर टक्के निवडून आले असते. उद्धवजी विनाकारण यावेळी आढळराव पाटील यांच्या प्रेमाला बळी पडले आणि कोल्हे थेट राष्ट्रवादीत जाऊन निवडून आले. येथे उद्धवजी आणि डॉ अमोल दोघांनीही स्वतःचे मोठे राजकीय नुकसान करवून घेतले. उद्धव ठाकरे यांनी आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील अनंत गीते इत्यादी त्याच त्या उमेदवारांना रिपीट केले नसते तर नक्की चित्र वेगळे दिसले असते. या राज्यात युतीमध्ये आणि शिवसेनेत त्यातून आनंदाला नक्की उधाण आले असते, दुर्दैवाने तसे घडले नाही...
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व : पत्रकार हेमंत जोशी


हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व : पत्रकार हेमंत जोशी 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात भलेही पहेलवान तयार होत नसतील पण शुद्ध हेतूचे कणखर मनाचे उत्तम बुद्धीचे जाज्व्ल्य हिंदुत्व ठायी ठायी रोमारोमात भिनलेले मनाने मजबूत असे शिस्तप्रिय स्वयंसेवक नक्की तयार होत असतात. आज मी नक्की संघस्वयंसेवक नाही पण त्या संस्कारातूनच घडल्याने वाढल्याने संघ नेमका काय असतो काय करतो काय घडवून आणतो हे मात्र मला नेमके ठाऊक आहे पाठ आहे माहित आहे ज्ञात आहे. नरेंद्र मोदी कोण आहेत, कोणीही नाहीत ते तर एक सामान्य कुटुंबातले होते पण संघस्वयंसेवकाला गरीब श्रीमंत असे वावडे असल्याने तेथे जे संपूर्ण जगात एकसारखे एकसारख्या संचाचे विचारांचे स्वयंसेवक तयार होत असतात त्यातलेच एक आहेत नरेंद्र मोदी. या अशाच संघ स्वयंसेवकांनी सतत ७०-७५ वर्षे एक दिलाने एक विचाराने पाऊल टाकले आणि आधी २०१४ आणि आता २०१९ मध्ये हिंदू राष्ट्राचे अप्रत्यक्ष स्वप्न साकारले, सत्यात उतरले. होय, मोदी नावाच्या संघ स्वयंसेवकाने हे काम केले...

जे तिकडे नरेंद्र मोदी यांनी केले तेच येथे या राज्यात देवेंद्र फडणवीस नामक संघ स्वयंसेवकाने उद्धव ठाकरे यांच्यासारख्या समविचारी लोकमान्य मित्रांना आधी विश्वासात नंतर हाताशी घेऊन करून दाखवले. जे मी सतत सांगत आलो आहे तेच खरे ठरले आहे म्हणजे इतरांचे भय फारसे बाळगण्याचे कारण नाही पण जोपर्यंत या राज्याचे या देशाचे राजकीय वर्तुळ शरद पवार सोडायला तयार नाहीत तोपर्यंत मग ते नरेंद्र मोदी असोत अथवा देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे किंवा तत्सम कोणीही, पवारांच्या रस्त्यात मार्गात आडवे येणाऱ्या प्रत्येकाने समोरचा विरोधक अतिशय स्ट्रॉंग आहे हे मनाशी विचार करूनच पाऊल टाकणे तेवढेच गरजेचे आहे. भलेही लोकसभेला पवारांना हवे तेवढे मनासारखे यश मिळाले नसेल पण राज ठाकरे नावाचा झंझावात विशेषतः शिवसेनेला पर्याय किंवा पवार विरोधकांना नाकात दम आणणारा नेता जनतेसमोर योग्य वेळी उभा केला तो दूरदर्शी चतुर शरद पवार यांनी, आणि राज ठाकरे हा धोकाअद्याप अजिबात टळला नाही याउलट तो विधानसभेला अधिक वाढलेला तुम्हाला दिसेल....

जेव्हा मोठे यश मिळते तेव्हा अधिक जबाबदारी वाढते हे जे निवडणूक निकालाच्या दिवशी फडणवीस म्हणालेत त्यामागे दडलेली शरद पवार राज ठाकरे यांच्यासारखी अचानक उद्भवणारी मोठी शक्ती नजरेसमोर आणूनच फडणवीसांनी ते वक्तव्य केलेलेआहे कारण पवार जेव्हा खवळतात तेव्हा ते अतिशय धोकादायक असतात आणि यश प्राप्त करवून घेण्या कीवा त्यांना जे मनात असते प्रत्यक्ष उतरविण्यासाठी ते अशावेळी वाट्टेल त्या, थोडक्यात कोणत्याही थराला जातात, जाऊ शकतात, हा इतिहास आहे, त्यामुळे पवार थोडेफार शरीराने थकले असतील पण त्यांची जिद्द आणि वृत्ती आजही जशीच्या तशी शाबूत आहे आणि ते प्रसंगी कसे डेंजरस त्यांनी आपल्या घरीच यावेळी दाखवून दिले आहे त्यांनी या लोकसभा निवडणुकीनिमित्ते काहीशा बेभान झालेल्या अजित पवार यांचाच राजकीय खिमा आणि जवळपास खात्मा केला आहे....

याची जाणीव मी आधीच्या माझ्या एका लेखात रोहित पवार यांच्याविषयी उल्लेख करतांना वाचकांना करवून दिलेली आहे. अजित पवारांना लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान मावळ या दादांच्या लाडक्या लोकसभा मतदारसंघात अडकवून ठेवले, पुत्रप्रेमाने आंधळे झालेल्या अजितदादांना त्यांनी इतरत्र कोठेही बरोबर घेतले नाही, सुप्रिया सुळे यांना संगतीला घेण्याची त्यांना गरज नव्हती पण भविष्यात पवारांच्या घराण्याचा पुरुष जातींमधला वारसदार म्हणून शरदरावांनी सतत रोहित यांना बरोबर घेणे होते आणि आज देखील तेच घडते आहे. अजितदादा यांचे महत्व कमी केले आहे किंवा कमी झाले आहे रोहित पवार यांचे थेट सुप्रिया सुळे यांच्यासारखे राजकीय इम्पॉर्टन्स शरदरावांनी वाढवून ठेवले आहे. त्यामुळे पुढल्या काही वर्षात अजित पवार जर राष्ट्रवादीतून बाहेर पडले तर अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नये कारण अजितदादांनी तशी तयारी सुरु केल्याची माझी खात्रीलायक माहिती आहे....

तर असे हे अतिशय धूर्त कोणत्याही क्षणी बेसावध विरोधकांना चारी मुंड्या चीत आणि चिट करू शकणारे, करणारे शरद पवार. त्यांच्याशी यापुढे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना युतीचे नंबर वन नेते म्हणून सामना करायचा आहे. विधानसभा निवडणूक अगदीच तोंडावर आहे आणि देशात जवळपास सर्वत्र मोदी लाट असतांना ज्या शरद पवार यांनी येथे या राज्यात युतीच्या नाकात दम आणून आणि नाकावर टिच्चून पाच खासदार निवडून आणले. ते अजिबात लेचेपेचे नसलेले, न झालेले शरद पवार येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत आघाडीची सूत्रे नक्की स्वतःकडे घेऊन फार मोठे आव्हान युतीसमोर उभे 
करतील हि आता काळ्या दगडावरची रेघ आहे. जे एकेकाळच्या त्यांच्या राजकीय वंशाला, अजितदादा पवार या पुतण्याला राजकारणातून नो व्हेअर करू शकतात ते शरद पवार कधी जातीचे तर कधी विविध क्लुप्त्यांचे जाळे युतीसमोर पसरवून विशेषतः त्यात देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि युती कसे अलगद अडकतील याची काळजी घेतील. लोकसभेपेक्षा विधान सभा निवडणूक युतीला अधिक जड जाणार आहे त्यास्तव मोठी तयारी करणे युतीला अतिशय गरजेचे आहे, आवश्यक आहे...
तूर्त एवढेच.


 पत्रकार हेमंत जोशी 

Friday, 24 May 2019

Loksabha 2019--Maharashtra


Loksabha 2019--Maharshtra

Current BMC commissioner Pravin Pardeshi had the most accurate reading of all the pundits, journalists I know as to what would be the results of the Loksabha 2019...He had told me, a lot depends on how Delhi fares in the Loksabha. If there is even a slight change in say 2 or even 3 seats of total 7 in Delhi, the whole equation in the rest of the country changes for the current ruling party i.e the BJP....But as we all know all 7 seats were grabbed by the BJP which in turn was replicated across many states...It was BJP who had a landslide across the nation. Another one-- Bhau Torsekar, a veteran journalist, was shouting on top of his voice via his blogs since last 2 years that Modi will come to power once again. "पुन्हा मोदीच का?" a book written by him has all the necessary, technical information as to why only Modi would regain power. And the third one--PA to MLA Rajendra Patni, Dinesh Upadhya had called and told me, "Bhau, BJP-Sena will win with more than 40 seats".... Apart from these three, I felt no one even got close to the reality.

A top source in the Urban Development Department tells me, that such is Modi's working style, that the Ministry of Housing & Urban Affairs Department in Delhi under which our state's UD department comes, on the very next day of result declaration, the department is already working on the the road map as to how the department will perform for the next 5 years... So no break, no holidays....such is the thought process of the Government. So, this source of mine, a bureaucrat, says such attitude towards the department is initiated by the man himself PM Modi. Why wouldn't we bureaucrats be attracted to work towards the goal, if we have such strong support from Delhi? it quips...

Also, now post the BJP-SS wave again in the state too, the immediate attention moves to the upcomingVidhan Sabha elections. Sharad Pawar in the press conference has declared that he has already asked his karyakartas to get ready for the state polls slated in Sep/October later this year. My gut feel says, Sharad Pawar will now pose a much serious threat to the Devendra Fadnavis Government along with the Vanchit Agadhi of Prakash Ambedkar & the MIM. But it will all depend on PM Modi and his tactics as to how they will contain Pawar and also the not so minuscule the Raj Thackrey factor too. Don't be surprised if in the upcoming months you see both Raj Thackrey & Sharad Pawar's team members or they themselves be in trouble through Press. It has to happen..Modi does not leave his haters. Pawar will have to chalk out plans to curb Modi and his actions on his otherwise very corrupt leaders led party. Of all, Pawar did manage to do one thing very swiftly--Finish off Ajit Pawar...Tell me, on the results day, did any of the Marathi channel even mention the name Ajit Pawar? He was on purpose kept at bay by the senior one. Parth also had to face the ire of his grandfather for being Ajit Pawar's son. Slowly Rohit Pawar has now grabbed attention of the veteran Pawar and seen accompanying him everywhere. Sad, but Sharad Pawar plays politics even at home!

Don't know about others, but the Loksabha results were a bit shocker to me. All said & done, BJP always had the upper hand but let me tell you many state's after their recent wins in State Elections, Congress in no way could have suffered defeat this way. They had put right efforts and had created the right atmosphere (at least that was shown in their party meetings) to battle out the BJP. Where what went wrong is a long and difficult task, the Congress Working Committee will have to do. If Priya Dutt was not supported by the Kripashankar Singh Gang, the same goes to Poonam Mahajan too or an Arvind Sawant too...Neither Poonam was supported by Ashish Shelar nor Mangal Prabhat Lodha supported candidate Arvind Sawant.

www.vikrantjoshi.com

There in Nagpur too, when the giant himself Nitin Gadkari was to win by a huge margin, which did not happen, there also a small game was played... Now insiders in the BJP & RSS tell me that the core BJP team had a figure of 207 alone for the BJP and the "satta" market itself put their monies nothing above 253 for the BJP. So obviously BJP would have needed the NDA support to form the government. Now insiders say, that their obvious choice of the PM was not Narendra Modi. All of them would have settled with Nitin Gadkari as their PM candidate. So the core BJP team with the help of some state players were behind Gadkari's downfall, which obvioulsy did not happen. Look by how much margin did Gadkari win....and compare it with his claims he made and also with the margin with he won in 2014....Some foul play did happen....Anyways, everything in the past now....

Dr. Amol Kolhe was sure to win the Shirur constituency owing to the caste politics. The "Mali Samaj" helped him but the same samaaj did not help their own Samir Bhujbal at Nashik. What went wrong there? Shiv-Sena too lost some of their crucial names in the results just because of their old formula, giving tickets to the tried & tested. When will Sena come above this and give others a chance is a big question mark...Nilesh Rane getting defeated was another shocker as all the power was used by his father to support him. I think Uday Samant who is the most influential character there played a big part against Rane. Suresh 'Balu' Dhanorkar was a lottery. Sena must be cursing at their luck as at the 11th hour Dhanorkar quit Sena and joined Congress to give them the only win in the state. Similary Raju Shetti was defeated only because of the joint efforts of Mla Sujit Minchekar & Sadabhau Khot. In Jalgaon, heard Eknath Khadse did not even shell out a single rupee of the party fund received (Rs. 5 crores I hear).. Unmesh Patil won because A T Patil (current MP) was replaced with Unmesh at the 11th hour. Only set back was Hansraj Ahir MoS GOI. His downfall was due to his animosity with Sudhir Mungantiwar. Mungantiwar did not support Ahir. Everyone was against Bhavana Gawali too, but in the end it was CM Fadnavis who had trust in her and once you have Devendra Fadnavis supporting you, there is no looking back.

Now, the whole BJP-Sena victory can be attributed to only one man--CM Devendra Fadnavis. I hear wherever his rallies were held, everything from the minutest detail to further was planned from Mumbai. Yes, everything was handled from Mumbai... the karyakarta's of BJYM traveled from their luxury city to the interiors of Latur & Gadchiroli for months together... Every individual was given a particular set of responsibility by the team headed by CM. And to make matters best for the BJP, Congress & NCP's in fighting also helped them in places like Parbhani & Konkan. But saying this, Fadnavis now has an uphill task which am sure will be handled more efficiently the Vidhan Sabha 2019. As we all wanted Modi as the next PM, I certainly want this young, non-corrupt, efficient, hardworking, sincere, honest, visionary Devendra Fadnavis again as my next Chief Minister of Maharashtra!!!
Amen!!

Vikrant Joshi

Wednesday, 22 May 2019

रावते यांना जमते : पत्रकार हेमंत जोशी


रावते यांना जमते : पत्रकार हेमंत जोशी 
जेथे कमी तेथे आम्ही, शिवसेनेत हि म्हण परिवहन खात्याचे मंत्री दिवाकर रावते यांना तंतोतंत लागू पडते. अमुक एखाद्या भागात छडी हाती घेऊन काम करायची शिवसेनापक्षप्रमुखांना आवश्यकता गरज भासली पडली कि पक्षात नजरेसमोर हमखास नाव झळकते ते दिवाकर रावते यांचे. व्यसनांपासून कोसो दूर त्यामुळे सत्तरीच्या उंबरठ्यावर देखील ते विदर्भातल्या काटक शेतकऱ्यासारखे आजही राज्यात कोठेही पायपीट करून सेनेत नवचैतन्य आणून मोकळे होतात. असा काटक धाडसी मेहनती नेता क्वचित आढळतो. हाती काही लागो अथवा न लागो, श्वासाच्या अखेरपर्यंत लॉयल्टी केवळ मातोश्रीवर आणि हो, पत्नी असो वा पोटची दोन्ही मुले किंवा अन्य नातलग, कुटुंबसदस्य. माझी गादी यापुढे हा सांभाळेल हे असे त्यांच्या रक्तात नाही. अनेकदा तसे त्यांना सुचविल्या किंवा सांगितल्या गेले पण रावतेंनी कुटुंबसदस्यांना कायम राजकारणापासून दूर ठेवणे पसंत केले...

विदर्भ आणि मराठवाड्यात रणरणत्या उन्हात शेतांच्या बांध्यावर आरोळी ठोकून किंवा गावकऱ्यांना खेड्यापाड्यात जाऊन शिवसेना तुमच्या हिताची कशी हे समजावून सांगून आकर्षित करणारे दिवाकर रावते हे मला वाटते शिवसेनेतले पहिले आणि शेवटचेही ठरावेत कारण यापुढे सेनेला कानाकोपऱ्यात जाऊन प्रचार आणि प्रसार करण्याची गरज उरलेली नाही दिवंगत बाळासाहेबांच्या भाषणांनी विचारांनी राज्यातले कानाकोपऱ्यातले केव्हाच भारावून शिवसैनिक होऊन मोकळे झालेले आहेत. बाळासाहेबांचे बोलणे भाषणे वागणे सारेकाही ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या पलीकडे, पुढे होते. ज्याच्या कानावर बाळासाहेब पडले तो सेनेकडे आकर्षित झाला, बाळासाहेबमय हाच इतिहास आहे. रावतेंच्या बाबतीत मला कायम खटकले ते त्यांचे वेळोवेळी काढून घेतलेले अधिकार. म्हणजे आधी त्यांनी विदर्भ बांधला मग तो त्यांच्या हातून काढून घेतला नंतर त्यांनी मराठवाड्यात सर्वत्र शिवसेना नेली, हेमंत पाटलांसारखे कितीतरी नेते आणि पट्टीचे शिवसैनिक तयार केले तेथेही तेच, रावतेंनी तदनंतर मुंबईत बोलावून घेतल्या गेले, याला कदाचित रावते यांचे शब्द आणि कडक हेडमास्तर सारखे वागणे, काहींना झोंबत असावे. दिवाकर रावते यांनी कधीही नाराजी व्यक्त केली नाही कोणताही वाईट विचार त्यांच्या मनात न आल्याने शिवसेना हेच आयुष्य त्यांचे हे कायम सांगणे खरे ठरले आहे...
www.vikrantjoshi.com

विदर्भ आणि मराठवाड्यात रावतेंनी शिवसेनेत जान आणली, ताकद वाढवली. आता त्यांना पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आलेली दिसते. जे तिकडे घडले तेच रावते इकडेही करून मोकळे होतील. पश्चिम महाराष्ट्र देखील ते भगवामय करून मोकळे होतील. बालपणी गरीब घरातला माझा एक मित्र सुट्टीत त्याच्या मामाकडे गेला कि गुटगुटीत होऊन यायचा. रावते म्हणजे शिवसेनेत त्या मित्राच्या मामासारखे. अमुक एखादा भाग त्यांच्याकडे सोपविला कि तेथे सेना स्ट्रॉंग, गुटगुटीत झाली नाही असे कधीही घडले नाही. अगदी अलीकडे कोल्हापुरात लोकसभानिवडणुकीनिमित्ते उद्धवजींना जाहीर सभा घ्यायची होती. निवडणुकांचे दिवस, अफाट मैदानावर सभा घेऊ नये असे चंद्रकांत पाटलांपासून तर सुभाष देसाई पर्यंत सर्वाना वाटत होते. पण बाळासाहेब असोत कि उद्धव ठाकरे सभांच्या गर्दीचे विक्रम राज्यातल्या कानाकोपऱ्यात मुंबईसह मोडल्या गेलेत ते रावते यांच्याच नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली. रावते म्हणालेत कोल्हापुरात थेट जेल समोर असलेल्या अतिप्रचंड मैदानावर उद्धवजींची प्रचार सभा घेऊ या, त्यांच्या या म्हणण्याला सारे हसले आणि उद्धवजी देखील चिंतेत पडले पण ऐकतील ते रावते कसले. त्यांनी तेथेच सभा घेतली आणि हि सभा गर्दीचे अनेक विक्रम मोडून मोकळी झाली. रावते कसे त्यांनी पुन्हा नेहमीप्रमाणे दाखवून दिले...
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Sunday, 19 May 2019

राज आज काल : पत्रकार हेमंत जोशी

राज आज काल : पत्रकार हेमंत जोशी 


लोकसभा निवडणुका दरम्यान जेवढे विनोद राज ठाकरेंवर करण्यात आले मला वाटते तेवढे त्या राहुल गांधी यांच्यावर देखील केल्या गेले नसतील. पक्षाध्यक्षा सकट पक्ष भाड्याने देणारे या देशातले पहिले नेते राज ठाकरे म्हणाल तर हा विनोद म्हणाल तर टीका अधिक बोचरी होती पण राज ठाकरे यांनी त्याकडे कानाडोळा करून आपले काम सुरु ठेवले म्हणून राज हे एकमेव या राज्यातले युतीविरोधी गटातले एकमेव सुपर हिरो ठरले. सारेच त्यांच्यासमोर फिके ठरले, निष्प्रभ ठरले हीच वस्तुस्थिती आहे. स्वतःचा एकही उमेदवार उभा न करता दिन रात राज्य पिंजून काढणारे, डोळ्यात न मावणाऱ्या सभा घेणारे राज हे वेडे किंवा वेड्याचे नेते आहेत असे का वाटते आहे, जर तसे वाटत असेल तर वेडे तुम्ही आहात, राज यावेळी अतिशय धूर्त राजकीय खेळी खेळून गेले आहेत...

राज ठाकरे यांचा आजवरचा मनसे स्थापनेपासूनचा अनुभव असा कि बोटावर मोजता येतील निवडून येणारे असे संख्येने तुटपुंजे नगरसेवक, आमदार, खासदार कोणत्याही क्षणी मनसे सोडून म्हणजे पक्षांतर करून मोकळे झाल्याने वेळोवेळी मनसे आणि राज ठाकरे हिणविल्या गेले आहेत जे अतिशय जिव्हारी लागणारे असते, होते. राज किंवा त्यांच्या समर्थकांचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. जे नेहमी घडले तेच या लोकसभेला जर राज यांनी उमेदवार उभे केले असते तर पुन्हा घडले असते म्हणजे नाही म्हणायला मनसेचे चार दोन खासदार नक्की निवडून आले असते पण पुन्हा तेच, नेहमीसारखे अपमानित होणे, ज्यांना खासदारांची गरज त्यांनी मनसे खासदार फोडून राज यांना खजील केले असते ज्याचा मोठा दुष्परिणाम येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत दिसून आला असता...नेहमीप्रमाणे मग राज ठाकरे यांनी लोकप्रियता पुन्हा हासील करूनही त्यांना मोठे राजकीय नुकसान झाले असते, परिणाम पाच वर्षांसाठी भोगावे लागले असते. आता मात्र राज यांच्या लोकसभा निवडणुकीतील चतुर खेळीमुळे त्यांचे भविष्यातले होणारे नुकसान तर टाळणार आहेच पण मनसे विरोधी पक्षांना त्यांचे आमदार निवडून आणतांना मोठी कसरत करावी लागणार आहे. माझे वाक्य लक्षात ठेवा, पुढल्या विधानसभेला राष्ट्रवादी किंवा काँग्रेस आघाडीची या राज्यात पीछेहाट होईल पण राज फॅक्टर येत्या विधानसभा निवडणुकीनंतर फार महत्वाचा ठरणार आहे. पुन्हा तेच, राज यांच्याकडे उमेदवारी मागणाऱ्यांची मोठी रीघ रांग असेल आणि त्यांचे निवडून येणारे आमदार राज यांचे राजकीय भवितव्य पुन्हा एकदा उज्वल करून सोडतील. लोकसभेचे निकाल आल्यानंतर राज यांचे महत्व वाढलेले असेल. यापुढे राज यांना अमुक तमुक सोडून गेलेत असे फारसे घडणार नाही...

www.vikrantjoshi.com
आता अत्यंत महत्वाचे म्हणजे राज ठाकरे आणि कुटुंबियांचे आर्थिक गणिते. तुम्हाला काय वाटते, मोदी आणि शाह यांच्यावर लोकसभा निवडणुकांपूर्वी कायम तुटून पडणारे उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरी असेच का शांत झालेत. अजिबात नाही. सीबीआय, गृह, आयकर खाते, ईडी इत्यादी शासकीय खाते वरकमाई मोठ्या प्रमाणात येणाऱ्यांना क्षणार्धात वठणीवर आणतात. मला थेट आरोप करायचे नाहीत पण माझी जी माहिती आहे, त्यानुसार केंद्रात भाजपा सरकार आल्यानंतर अमापसमाप उत्पन्न असलेल्यांना वरून भाजपाशी पंगा घेणाऱ्यांना कसे सरळ करायचे, हे यावेळी मस्त जमून आलेले आहे आणि हे असच सुरु राहिले तर राज ठाकरे आणि शरद पवार या दोघांनीही आर्थिक व्यवहार व्यवस्थित ठेवल्या जातील याची डोळ्यात तेल घालून काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, राज यांची त्यावर अधिक काळजी यासाठी वाटते कि त्यांना एखादा बादरायण संबंध लावून अडकविल्या गेले तर...? 

ज्यापद्धतीने वर्षानुवर्षे या राज्यात शरद पवार विरोधकांना किंवा विरोधात जाणाऱ्यांना विविध क्लुप्त्या वापरून नाक घासायला लावायचे, सरळ करायचे, आधी मारायचे मग गोंजारायचे, उध्वस्त करायचे, घरी बसवायचे त्यापध्दतीची सुप्त दहशत यावेळी भाजपाच्या काही नेत्यांनी अमलात आणल्याने मी पहिल्यांदाच बघतोय. शरद पवार एवढे अस्वस्थ झालेले, अस्वस्थ होऊन इकडून तिकडे येरझार्या मारणारे, मानसिक दृष्ट्या काहीसे खचलेले, हिम्मत हरलेले मी पहिल्यांदाच बघतोय. ज्या महाराष्ट्रात किंवा ज्या देशात आम्ही हिंदू आहोत हे सांगायला देखील भीती वाटायची, जणू या देशात हिंदू हेच उपरे, असे वाटायला लागले होते ते भाजपा आणि मोदी सत्तेवर आल्याने शिवाय या राज्यात, या मुंबईत शिवसेना भाजपासंगे बसल्याने, आम्ही हिंदू बऱ्यापैकी मान वर करून सांगू लागलो आहोत कि होय, आम्ही हिंदू आहोत. म्हणून नरेंद्र मोदी यांच्यासारख्या बाजीगर नेत्यांना अभिमानाने हिंदू आहोत सांगणाऱ्यांनी शंभर गुन्हे माफ करायला हवेत. आणखी एक सांगतो, मोदी शाह यांची भलेही दहशत असेल पण देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी विरोधकांना आदरयुक्त दरारा आहे जो जनतेला अधिक भावतो, मनापासून आवडतो. बाळासाहेब ठाकरे यांचे वागणे हे असेच होते त्या देवेंद्र फडणवीसांसारखे. आदरयुक्त भीती आणि दराराही....
तूर्त एवढेच


पत्रकार हेमंत जोशी 

नार्वेकर बिलेटेड...पत्रकार हेमंत जोशीनार्वेकर बिलेटेड...पत्रकार हेमंत जोशी 

काही अनामिक भितींनी मी ग्रासलेलो आहे. जसे परदेशात जातांना जेव्हा तुमचे आणि तुमच्याकडल्या सामानाचे चेकिंग होते त्यावेळी बेल्ट देखील काढायला सांगितल्यानंतर मला कायम भीती वाटत आलेली आहे कि पॅन्ट घसरून खाली पडेल, माझी फजिती होईल. आपले मुख्यमंत्री त्यांचे बरेचसे संभाषण भ्रमण ध्वनीवर एसेमेस पाठवून उरकतात. भीती वाटते, त्यांनी पाठविलेल्या एखाद्या एसेमेसचा कोणी दुरुपयोग करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्या गेला तर. विनाकारण रिस्क घेऊ नये. फार पूर्वी माझ्या एका मित्राने पितांबर नेसून लग्न केले. आम्हा ब्राम्हणांमध्ये ते कॉमन आहे पण त्याने पीतांबराच्या आत पुन्हा पीतांबराचीच अंडरवेअर घालायला काय हरकत होती, त्याने ते केले नाही आणि वधूच्या गळ्यात हार घालण्याची आणि त्याचे पितांबर सुटण्याची एकच वेळ झाली. अख्या मांडवात गोंधळ. हा नेमका जेथे आडोशाला लपला तेथेच मुलीकडल्या बायकाही लपायला आल्या. शेवटी गुरुजींनी त्याच्या अंगावर अंतरपाट भिरकावला तेव्हा कुठे वातावरण निवळले.

 मला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सचिव श्री मिलिंद नार्वेकर यांच्या बिनधास्त बोलण्याची भीती वाटते. एकदा का अमुक एखाद्यावर त्यांचा विश्वास बसला कि त्यांचे ते बेधडक बिनधास्त बोलणे, असे खरेच वाटते, कोणी लावालाव्या केल्या तर...१८ मे, मिलिंद नार्वेकरांचा वाढदिवस. बिलेटेड हॅपी बर्थ डे मिलिंदजी. तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. वय ५२ सरले खरे पण तुमचा उत्साह वय वर्षे २५ असलेल्या तरुणाला देखील लाजविणारा आणि प्रेरणाही देणारा. रात्री उशिराने तेही मानसिक शारीरिक थकल्यानंतर अंथरुणावर पहुडणे पण जवळच्या माणसांना भल्या पहाटे तेही ब्रेकफास्ट घेतांना फोन करून सविस्तर बोलणे हि तुमची खासियत, कंटाळा हा तुमचा नंबर एकचा शत्रू. तसे तुम्ही अनेकांचे शत्रू पण तुमचे त्याकडे फारसे कधी लक्ष नसते, तुमचे त्या अर्जुनासारखे. बारीक लक्ष त्या उद्धवजींकडे त्यामुळे ठाकरेंच्या घरातलेही बिनधास्त असतात, तुम्ही असता कि त्यांची मनापासून काळजी घ्यायला. आजपर्यंत अनेक मोठ्या खुबीने मातोश्रीवर आधी बस्तान बांधून मोकळे झाले नंतर पदे हाती पडलीत कि फायदा गैरफायदा घेऊन मोकळे झाले. तुम्ही जे मागितले असते ते अगदी सहज तुम्हाला मिळाले असते. पण आज वयाची पन्नाशी उलटली तरी उद्धवजींचे पीए एवढ्यावरच तुम्ही समाधान मानले. हे आजकाल क्वचित घडते...

www.vikrantjoshi.com

शिवसेनेत तुमचे पद तुमचे अधिकार कोणते हे फारसे कोणाला माहित नाही, जाणून देखील घ्यायचे नसते. उद्धवजींचे सचिव म्हटले कि सारे संपते. तुम्हाला भेटणाऱ्याला थेट उद्धव किंवा आदित्य यांना भेटल्यासारखे होते. काही महत्वाचे बोलायचे असले किंवा निरोप द्यायचा असला कि समोर तुम्हालाच केल्या जात असल्याने थेट बाळासाहेब माँसाहेब होते अगदी तेव्हापासून त्यांच्या घरातले जबाबदार प्रतिनिधी म्हणूनच तुमच्याकडे बघितल्या जाते. ठाकरे कुटुंबीय किंवा मातोश्रीसाठी सर्वाधिक शिव्या खाणारा माणूस म्हणून तुमची गिनीज बुक मध्ये नोंद होणार आहे. तुम्ही सांगितलेले ते अखेरचे असते, इतरांना ठाकरेंकडून पुन्हा खात्री करून घ्यावी लागत नाही. अनेकांचे पीए कालांतराने मोठे झाले पण पीए असतांना एवढे मोठे, तुम्ही एकमेव आणि अद्वितीय. यश सातत्याने पचविणे येथे आपल्याकडे मोठे कठीण असे काम कारण यशाची मस्ती डोक्यात लगेच शिरते तेथेच मग बहुतेकांचे पानिपत होते. तुमचे ते तसे नाही. मी मातोश्री पेक्षा मोठा असे ज्यांना ज्यांना वाटले ते सारे कसे संपले आपल्याला तो इतिहास सर्वांना तोंडपाठ आहे. तुमचे तसे झाले नाही, होणारही नाही....

नदीचे दोन काठ त्यांना जोडणार्या पुलासारखे तुमचे काम आहे म्हणजे अनेकदा कार्यव्यस्ततेमुळे अनेकांचे, नेत्यांचे, उद्योगपतींचे, आमदारांचे, शिवसेना नेत्यांचे, मंत्र्यांचे, खासदारांचे, पदाधिकाऱ्यांचे, मान्यवरांचे, विरोधकांचे थेट शिवसेना पक्ष प्रमुखांशी बोलणे होत नाही अशावेळी त्यांना हमखास तुमची आठवण होते आणि भाव न खाता तुम्ही मध्यस्थाचे काम प्रामाणिकपणे बजावून केवळ दुवा घेऊन मोकळे होता. उद्धव ठाकरे यांच्या वतीने वेळ निभावून टाळणे किंवा थापा मारून समोरच्या माणसाला उगाचच खुश करणे तुमच्या ते म्हणाल तर रक्तात म्हणाल तर स्वभावात नसल्याने, नार्वेकर तोंडावर पडले, असे कधी घडले नाही. एकवेळ एखाद्या इच्छुकाला आमदार किंवा नामदार होण्याची थेट मातोश्रीवरून सांगितले तरी खात्री नसते पण तुमचे काम होईल, हे शब्द त्यांच्या कानावर पडलेत कि असे बिनधास्त होऊन बाहेर पडतात. तुमच्या भोवताली निर्माण झालेले तेजोवलय असेच टिकावे, सतत वाढावे त्यासाठी तुम्हा मनापासून शुभेच्छा आणि आशीर्वाद...
तूर्त एवढेच.


पत्रकार हेमंत जोशी 

Wednesday, 15 May 2019

OFF THE RECORD review on some of the news....

OFF THE RECORD review on some of the news....

1. I am not Amay Joshi, but yes, some of my predictions are coming true. 
I'm not any Amay Joshi who predicts future of politicians and bureaucrats these days. But yes, what I write is surely turning out to be true. Don't worry unlike predictions, my writings are based on information which are fact-based, correct, genuine & most of the times from the horses mouth.. So on 6th April 2019 I had written that Ajoy Mehta will become the CS of our state & It happened! Now, next information what I have received is that come June, in the first week, we will have Cabinet expansion in Maharashtra.  Some new faces will be inducted in the cabinet and few will be dropped. Watch out for this space to get the new names soon...

Also next prediction is that the CM will make changes in bureaucracy (top most) after the 23rd May, and it surely has to be the last one before our state goes into election mode. No major changes though, but yes some surely. In this Tug of War to become the Chief Secretary my heart goes out for UPS Madan. A genuine humble bureaucrat who has been dealth severely after Medha Gadgil. First he was convinced that MPSC will be his option, but don't know how, he changed his mind then. Finally he was appointed at the CMO as an advisor, to keep his respect. But all said and done, Madan was, is and will be disappointed....

I smelt the rat that the BMC chief will be given to Pravin Pardeshi when Pardeshi preponed his leave by 10 days. Hope God has some mercy on the new BMC chief as at mantralaya Pardeshi always dealth with the polish crowd, and here at the BMC, visitors either ties a saffron ribbon or has a grown beard and owns a illegal restaurant or bar. For Pardeshi, it is like coming from the ocean to the lake. But it's OK, with his positive temperament and workaholic nature (yes he can work for 20 hours in a day) he will do justice with us, the Mumbaikars! Pardeshi Saheb, Ajoy Mehta was the only Commissioner in the BMC who managed to keep class and also at the same time could get work done. Time for forget old things and here is to the new times between you two...Kuch ho nah ho sir, please get the DP implemented asap!

2. MSRTC--Time for paying some attention
A leading daily few days ago published a story on the corrupt practices going on in the MSRTC headed by MD Ranjit Singh Deol and Minister Diwakar Raote. Anyways, the story goes that MSRTC had floated a tender in order to appoint franchisee's for Pradhan Mantri's Jan Aushadhi Kendras at various bus depots in maharashtra. Now the best part-- the company who has been allotted this tender to appoint 10, 000 (Ten Thousand) franchise across the state is facing an inquiry by the ACB in regard to corruption charges in supplies in the Social Welfare department years ago. Apparently same Mr. Ranjit Singh Deol was the Commissioner then and the company was Gunina Commercial Pvt Ltd headed by Prashant Maheswari, a regular at NCP's office. Anyway, if you read the article (please don't ask me the link, google it) there is clear indication of malpractices happening everywhere to award the tender. And this Gunina Commercial has collected Rs. 2,540 from per applicant as Application fees from all the 10,000 applications, and yes nothing was mentioned in the advertisement in regard to this collection. And yes, before you blink, some few months ago same MSRTC had given same Gunina Commercial another contract worth crores to start ST Jalad parcel Seva (courier). Best part is, Gunina does not have any experience in either Pharmacy nor Courier industry. Fir Itni Meherbani kyuon???? I have put an RTI let's see what the government has to say....

Tuesday, 14 May 2019

धक्कादायक धोकादायक : पत्रकार हेमंत जोशी


धक्कादायक धोकादायक : पत्रकार हेमंत जोशी 
मला कायम वाटत आले आहे कि चला हवा येऊ द्या कार्यक्रमातल्या नेहमीच्या कलावंतांनी कार्यक्रमातून बाहेर पडावे अन्यथा अभिनयात तोच तो पांचटपणा,पुढे भविष्यात या कलावंतांना अन्यत्र कोणी कामच देणार नाही. मला हेही वाटत आलेले आहे कि पत्रकार यदु जोशी यांनी दैनिक लोकमत मधून आणि पत्रकार उदय तानपाठक यांनी दैनिक पुढारी मधून बाहेर पडावे ते दोघेही आणखी मोठे होतील. ते तेथून बाहेर पडले कि त्यांनी माझे म्हणणे सांगणे ऐकले असा त्यातून तुम्ही अर्थ काढून मोकळे व्हावे. जसे मला नेहमी नेहमी हेच वाटायचे कि राज ठाकरे यांनी घराबाहेर पडावे महाराष्ट्रात फिरावे सामान्यांना भेटावे त्यांना भेटून आपल्या मनातले त्यांना सांगावे आणि त्यांचेही ऐकून घ्यावे. ते घडले, सध्याच्या घटकेला राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या रांगेत अलगद येऊन बसले आहेत याच रांगेत एक दिवस दिवंगत आप्पासाहेब पवारांचे नातू रोहित येऊन बसल्यास फारसे आश्चर्य वाटून घेऊ नये. पवारांच्या घराण्यात शरद पवार यांच्यानंतर नेतृत्व म्हणून क्रमवारी अशीअसेल, रोहित पवार, सुप्रिया पवार शेवटी अजित पवार...

मुंबईत मसाज पार्लर मध्ये जाऊन हॅपी एंडिंग करवुन घेणाऱ्या शौकीन पुरुषांची संख्या फार मोठी आहे. पार्लर मध्ये मसाज करणारी त्यांची नेहमीची चिनी नाकाची ठरलेली असते पण समजा अधून मधून ती मणिपूर दार्जिलिंग भूतान थायलंड इत्यादी ज्या भागातून ती आलेली आहे, काही दिवसांसाठी निघून गेली कि या शौकीन पुरुषांचे फारसे अडत नाही त्यांनी दुसरा पर्याय आधीच निवडून ठेवलेला असतो. यावेळच्या विधान सभा निवडणुकीत देखील नेमके हेच घडणार आहे. शिवसेना किंवा भाजपमधून निवडून येऊ शकणार्या अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळेलच याची खात्री नाही म्हणून या अशा सावध मंडळींनी आधीच मनसे हा पर्याय निवडून ठेवलेला आहे. सेना भाजपा मधून अनेक बाहेर पडले आणि मनसे च्या रांगेत उभे राहिले हे दृश्य तुम्हाला विधानसभा निवडणुकी दरम्यान या राज्यात मोठ्या प्रमाणावर दिसेल हे आजच माझे वाक्य तुमच्या डायरीत नोंदवून ठेवा...

शिवाय शरद पवारांची ती नेहमीची स्टाईल आहेच म्हणजे ते आपली अनेक माणसे दुसरी कडून उभे करण्यात तरबेज आहेत ज्याला आम्ही पवारांची सरोगसी स्टाईल असे नेहमीच गमतीने म्हणतो. थोडक्यात पवारांचे समर्थक यावेळी मनसे मधून निवडणूक लढवतील. या सार्या प्रकाराचा फायदा राज ठाकरे आणि मनसेला नक्की होईल, पुढल्या विधान सभेत त्यांच्या आमदारांचे संख्याबळ नजरेत भरणारे असेल, ठरेल. मनसे आणि राज ठाकरे दोघांना चांगले दिवस आले म्हणून शिवसेना आणि उद्धव ठाकरे मागे पडले असे बोंबलायला काही मंडळी तयार होतील पण त्यालाही फारसा अर्थ नाही. मनसे हे तर किरकोळ राजकीय संकट सेना व उद्धव ठाकरेंवर आहे पण जेव्हा केव्हा फार मोठ्या नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरे, गणेश नाईक, भास्कर जाधव, गुलाबराव गावंडे, इत्यादी प्रभावी नेते मोठ्या प्रमाणावर नेते सेनेतून बाहेर पडले तेव्हा देखील असे काही घडले नाही उलट शिवसेना होती त्यापेक्षा दुप्पट वेगाने मान वर करून वर आली पुढे गेली हे असे शिवसेनेच्याबाबतीत अनेकदा घडलेले आहे आणि पुढेही घडणार आहे त्यामुळे शिवसेना आता संपली पुढले दिवस राज ठाकरे यांचे असाही बिनडोक बिचार डोक्यात घालून नेते मंडळींनी स्वतःचा शिशिर शिंदे करवून घेऊ नये. राज्यातली काँग्रेस आणि शिवसेना नक्की सहजासहजी संपणारी नाही...

अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी आणि मनसे मध्ये सध्या जर काही वेगाने घडणारे असेल तर ते आहे फडणवीस मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांनी केलेल्या भानगडींची जंत्री यादी पुराव्यांसहित जमा करणे. अगदी अलीकडे राष्ट्र्वादीतल्या एका ज्येष्ठ नेत्याने मला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना हाताशी धरून त्यांचा थेट धृतराष्ट्र करून त्यांच्या भूषण नावाच्या मुलाने व गिरीश पवार नावाच्या साथीदाराने उद्योग खात्यात जे विविध उद्योग करून ठेवले आहेत ते जे कारनामे वाचून दाखविले, ते वाचून मी जागच्या जागी अक्षरश: थबकलो. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे ज्यांना आपण लाडाने ' अण्णासाहेब ' म्हणावे अशा कितीतरी अधिकाऱ्यांनीच राष्ट्रवादीकडे आणि मुख्यमंत्र्यांकडेही सुभाष देसाई आणि कंपूचे कारनामे सोपविलेले असल्याने त्यात काहीही खोटे नाही याची मनोमन खात्री पटली. विशेष म्हणजे गिरीश पवार यांची उद्योग खात्यात असलेली दहशत डोक्याला झिणझिण्या आणणारी आहे. गिरीश पवार यांचे अतिशय बारकाईने टिपलेले किस्से मला वाटते, पुढल्या काही दिवसात निदान मिलिंद नार्वेकर यांच्या तरी कानावर घालावेत, सारखे वाटायला लागले आहे अन्यथा उद्धव यांचीच विधानसभा निवडणुकीत मोठी बदनामी होऊ शकते, जे योग्य नाही...
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

भाग ४ : गडकरी बावनकुळे व फडणवीस तिघेही एकमेकांसाठी कासावीस ---पत्रकार हेमंत जोशीभाग ४ : 
गडकरी बावनकुळे व फडणवीस 
तिघेही एकमेकांसाठी कासावीस 

---पत्रकार हेमंत जोशी 


फडणवीस मंत्रिमंडळातील चंद्रशेखर बावनकुळे असे एकमेव मंत्री ज्यांच्यासाठी एकाचवेळी फडणवीस आणि गडकरी या दोघांनीही त्यांना मंत्री करण्यासाठी नरेंद्र मोदी अमित शाह मोहन भागवत आणि भाजपाच्या श्रेष्ठींकडे म्हणाल तर शब्द टाकला होता म्हणाल तर आग्रह धरला होता. गडकरी आणि फडणवीस या दोघात सुरुवातीला फक्त एका वाक्यावर मतभिन्नता होती म्हणजे कोणेएकेकाळी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम बघितलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री करण्याचे गडकरींच्या अधिक मनात होते ते तेवढे त्यांचे सांगणे बाजूला पडले हे मात्र खरे आहे पण तदनंतर गडकरी आणि फडणवीस यादोघांनाही एकमेकांविषयी मने कलुषित ठेवणे परवडणारे नव्हते, दोघांचे देखील त्यातून पुढे मोठे राजकीय नुकसान झाले असते, दोघेही नेहमीप्रमाणे एकमेकांशी सलोख्याने वागले, वागताहेत, बरे झाले. गडकरींचे त्यांच्या तरुण वयापासून आणि देवेंद्र फडणवीस प्राथमिक शाळेत होते तेव्हापासून त्या दोघांमधील एकमेकांशी असलेले आंतरिक नाते भावनिक आणि सख्य्या लहानमोठ्या भावाप्रमाणे असल्याने त्यांचे संबंध फारसे ताणल्या गेले नाहीत आणि दुरावा देखील त्यांच्या कधी निर्माण झाला नाही...

www.vikrantjoshi.com

चंद्रशेखर बावनकुळे स्वतःच नेहमी सांगतात कि मी गडकरींचा हनुमान आहे आणि फडणवीसांचा सुदाम आहे. गडकरींनी मला थेट सामान्य घरातून उचलून आणले आणि राजकारणात मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले. गडकरी आणि फडणवीस या दोघांचेही नाव खराब होईल असे काहीही बावनकुळेंना करायचे नसते त्यामुळे सतत स्वतःला राज्याच्या हितकार्यात झोकून देणे तेवढे त्यांना माहित आहे. गडकरी तर गमतीने म्हणतात कि, चंद्रशेखर कडे कुठलेही काम सोपविले कि तो हमखास करतो. त्याला आपण म्हटले कि दोन तासात बाईचा माणूस करून आण तर तो तसा चमत्कार देखील करून दाखवतो....आश्चर्य म्हणजे हेच बावनकुळे गडकरींना जेवढे प्रिय आहेत, तेवढेच फडणवीसांना देखील हवेहवेसे वाटतात याचे कारण असे कि, दोन नेत्यांमध्ये ते भांडणे लावत नाहीत. बावनकुळे यांचा तास स्वभाव नाही. व्यक्तिगत फायद्यासाठी ते असे काहीही करणे अशक्य आहे. सतत स्वतःला कामाला जुंपून घेणे आणि कोणत्याही गटातटाच्या राजकारणात गुंतवून न घेणे बावनकुळेंना आवडते त्यामुळे त्यांचे एक मंत्री म्हणून आलीया भट सारखे झाले आहे, ज्याला त्याला हि राजकारणातली मंत्रिमंडळातली बावनकुळेरुपी आलीया भट हवीहवीशी असते, वाटते....

वाचकमित्रहो, माझे आमच्या आजपर्यंत राजकीयदृष्ट्या शरद पवारांसारख्या धूर्त अति चतुर नेत्यांनी सावत्र मुलासारखी ट्रीटमेंट दिलेल्या विदर्भावर मनापासून प्रेम आहे आणि या पाच वर्षात गडकरी बावनकुळे फडणवीस या तिघांनी जे नागपूर व विदर्भासाठी केले त्यांना इतर चुटपुट गुन्हे माफ आहेत. हेच ते हनुमान बावनकुळे ज्यांनी गडकरींच्या निवडणुकीत पदयात्रा व प्रचारार्थ एवढी पायपीट केली त्यांच्या पायाला अक्षरश: फोड आले होते. माझी माहिती अशी कि त्यांना त्यावर त्या दोघांनीही आडवे तिडवे घेतले होते. बावनकुळे जेवढे नागपूरकर या नात्याने नागपुरात हिरिरीने भाग घेतात तेवढाच रस ते पालकमंत्री म्हणून भंडाऱ्यात आणि मंत्री म्हणून राज्याच्या हिताकडे न थकता न थांबता लक्ष देतात म्हणून फडणवीस त्यांच्याबाबतीत एक उत्तम सहकारी म्हणून फडणवीस निश्चिन्त असतात. सहज म्हणून सांगतो हेच ते बावनकुळे जेव्हा फडणवीसांच्या हेलिकॉप्टरला लातूर येथे अपघात झाला तेव्हा त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या कोराडीच्या देवीच्या मंदिरात त्यांनी डबडबलेल्या डोळ्यांनी प्रार्थना केली होती आणि गडकरी यांना जेव्हा राहुरीला थेट भाषण देतांना भोवळ आली होती संध्याकाळी नितीन गडकरी जेव्हानागपुरात पोहोचले त्यांना हे बावनकुळे आडनावाचे अजब रसायन बिलगून ढसाढसा रडले...चंद्रशेखर बावनकुळे यांचे उजवे हात म्हणून ओळखल्या जाणारे विश्वास पाठक बावनकुळे यांना एवढे का बिलगून चिटकून असतात याचा उलगडा आता होऊ लागला आहे. पाठक डॉ. दीक्षित यांचे डाएट फॉलो करतात कारण त्यांना आपण स्लिम ट्रिम तरुण असावे दिसावे असे कायम वाटत आलेले आहे. बावनकुळे हे गडकरींच्या म्हणण्यानुसार प्रसंगी बाईचा माणूस करू शकतात त्यातून बावनकुळेंच्या सान्निध्यात आपण कोणत्याही क्षणी थेट तिशीतले दिसू शकतो असा काहीसा कदाचित समज झाल्यानेच पाठक त्यांची पाठ सोडायला तयार नाहीत,नसावेत...
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 
मुंबई 

भाग ३ : गडकरी बावनकुळे व फडणवीस तिघेही एकमेकांसाठी कासावीस ---पत्रकार हेमंत जोशी
भाग ३ : 
गडकरी बावनकुळे व फडणवीस 
तिघेही एकमेकांसाठी कासावीस 

---पत्रकार हेमंत जोशी 


प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणजे आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांचे स्वतःचे एक वेगळेच जग असते. थेट निवडलेल्या गेलेले प्रशासकीय अधिकारी थोडेसे माणूस घाणे असतात पण एकदा त्यांच्या अतिशय चतुर डोक्याने मनात साठवले कि ज्याला आपण जवळ करतोय तो विश्वासू आहे कि मग प्रश्न संपतो ते अतिशय मोकळेपणाने मनातले सांगतात. पदोन्नती होत होत निवडल्या गेलेले प्रशासकीय अधिकारी सर्वसामानातूनच वावरून पुढे गेलेले असल्याने असे प्रशासकीय अधिकारी वागायला बोलायला मोकळे ढाकळे असतात. अगदी अलीकडे प्रशासकीय अधिकारी आबासाहेब जराडांशी बोलणे झाले, सर्वांना भावणारे त्यांचे व्यक्तिमत्व. सध्या तरी ते मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. कारण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अजिबात भरवसा नसतो त्यावर अश्विनी जोशी तुम्हाला थेट निबंध वाचून दाखवतील एवढ्या त्या कधी कधी या बदल्यांना वैतागतात. नोकरीत हळूहळू मोठे होत गेलेले आबासाहेब जराड त्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा आहे माणूस म्हणून अतिशय सकारात्मक पद्धतीने या समाजाकडे बघणारे आबासाहेब त्यांच्या मिठ्ठास बोलण्यातून व सर्वांना सहकार्य या स्वभावातून, कायम हवेहवेसे वाटणारे, वाटत आलेले...

www.vikrantjoshi.com

आता तुम्हीच सांगा आबासाहेब यांचा विचार डोक्यात ठेवून जगायला मी काय त्यांची प्रेयसी आहे काय पण उगाचच डोक्यात अनेकदा वाटत राहते कि त्यांच्या पत्नीला आजपर्यंत किंवा यापुढेही किती वेगवेगळ्या पद्धतीने तोंड द्यावे लागत असेल. म्हणजे त्यांची पत्नी एकमेव अशी तिला मुलाशी नव्हे बापाशी नव्हे तर थेट तेही आबाशी लग्न करावे लागले. त्यांना म्हणे वारंवार सांगावे लागते कि होय, माझे थेट आबांशीच लग्न झालेले आहे. काही माणसे कसे अकाली उगाचच प्रौढ असल्यासारखे वागतात किंवा बोलतात देखील. वंदना गुप्तेंना मात्र विनाकारण वाटत राहते कि त्या आजही तिशीच्या दितात म्हणून पण आबा जराड वागायला बोलायला देखील अगदी सुरुवातीपासून एखाद्या पोक्त वयाच्या आबासारखेच त्यामुळे मिसेस जराड यांनी खऱ्या अर्थाने आबाशी लग्न केले आहे अशी आमची खात्री झाली आहे. तुम्हीच सांगा जेव्हा त्यांनी लग्न झाल्या नंतर मैत्रिणींना सांगितले असेल कि त्या आबांसंगे मधुचंद्र साजरा करायला निघाल्यात,काय वाटले असेल ऐकणाऱ्यांना. एक मात्र नक्की थेट आबाशी लग्न करणाऱ्या त्या या राज्यातल्या एकमेव, अगदी तरुण वयात त्यांनी थेट आबांशी लग्न केले. कृपया वाचकांनी गमतीने घ्यावे...

नितीन गडकरी हे देवेंद्र फडणवीस यांना म्हणाल तर धाकट्या भावासारखे मानतात म्हणाल तर पुत्रवत प्रेम करतात. उद्या सत्तेच्या कोणत्याही वाट्यावरून त्या दोघात वाद होणार नाहीत एकमेकांवर ते तुटून पडणार नाहीत त्यांचा अनिल देशमुख रणजित देशमुख होणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान फडणवीसांना हे शंभर टक्के माहित होते कि या देशातल्या प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या निवडणुकांपैकी एक, गडकरी यांची निवडणूक असेल आणि त्यात त्यांना महत्वाची भूमिका निभवावी लागणार आहे त्यामुळे संपूर्ण राज्याच्या लोकसभा निवडणुकीची सोलो हिरो म्हणून जबाबदारी असतांनाही स्टार प्रचारक म्हणून ते व्यस्त असतांनाही सतत नागपूरशी संपर्क ठेवून होते, दररोज नागपूर लोकसभा मतदारसंघात येऊन जाऊन होते, अगदी गडकरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळीही फडणवीस गडकरींच्या आधी महालात घरी गेले त्यांना सर्वातआधी वाकून नमस्कार करून शुभेच्छा दिल्या त्यानंतर देखील पूर्णवेळ ते गडकरींसमवेत होते...

नितीनजी आमचे नेते आहे असे जाहीर सतत उल्लेख करणारे फडणवीस त्यामुळे गडकरी यांचा त्यांच्या उभ्या आयुष्यात फडणवीसांकडून कधीही ' यशवंतराव चव्हाण ' होणार नाही, वास्तविक दोघांचा स्वभाव पूर्णतः भिन्न म्हणजे जेथे गडकरी कोलांट्या उड्या मारत मारत पोहोचतील तेथे फडणवीस यांचे चालणे एखाद्या नववा लागलेल्या गर्भार बाईसारखे संथ आणि शांत असेल पण विकासाचा वेग मात्र त्या दोघांचाही कमालीचा असल्याने त्यांनी मनाशी ठरविलेले आयुष्यात पूर्ण केलेले असते. दोघेही राजकारणी आहेत पण कारस्थानी नाहीत त्यामुळे सतत याला संपवा त्याला खतम करा, असे टिपिकल विकृत खलनायकी विचार त्यांच्या डोक्यातही नसतात. उत्तम लोकांच्या संस्कारात वाढले कि हे असे सरळमार्गी वागणे आणि थेट सांगून पंगा घेणे सहज शक्य होत असते. पुन्हा एकवार सांगतो गडकरी हे फडणवीसांना पाण्यात पाहत नाहीत आणि फडणवीस देखील मिथुन चक्रवर्ती होऊन कधीही गडकरींकडे खाऊ का गिळू किंवा गडकरी म्हणजे प्रेम चोप्रा आहेत, गडकरी गुलशन ग्रोवर आहेत, पद्धतीने बघत नाहीत...
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Wednesday, 8 May 2019

गडकरी बावनकुळे व फडणवीस तिघेही एकमेकांसाठी कासावीस भाग २ :---पत्रकार हेमंत जोशी


गडकरी बावनकुळे व फडणवीस 
तिघेही एकमेकांसाठी कासावीस 
भाग २ : ----पत्रकार हेमंत जोशी 


राम और श्याम चित्रपटात खलनायक प्राण समोर सहिष्णू राम म्हणजे नायक दिलीपकुमार घाबरून थरथर कापताना दाखविलेला आहे, आम्हा हिंदूंचेही तेच पाच वर्षांपूर्वी इतरांसमोर, आम्ही हिंदू आहोत हे सांगतांना आमची प्रत्येकाची फाटायची एवढे लाचार आम्हाला या देशातल्या सत्ते वर असलेल्या प्रत्येकाने करून ठेवले होते बाकी काहीही असो पण मोदी आणि शहा आले आणि काय घडले माहित नाही पण हिंदूंमध्ये देखील, अगदी उघड, आम्ही हिंदू आहोत हे ठणकावून सांगण्याचे बळ आले हे मात्र त्रिवार सत्य आहे. वास्तविक आम्हा पत्रकारांचे कसले हो कोणत्या राजकीय पक्षावर प्रेम, आमची भूमिका न्हाव्यासारखी असते म्हणजे सर्वांचीच आम्ही भादरून ठेवतो समोर कोण आहे मान वर करून न बघता,हिंदूंनी देखील कसे दादागिरीने जगायचे असते हे या दोघांनी आणि या राज्यात, एकमेव फडणवीसांनी सर्वांना दाखवून दिल्याने फडणवीसांवर जळफळाट करणारे भले भले आहेत त्यातल्या त्यात निदान उद्धव ठाकरे यांनी जरी फडणवीसांना न भांडता पाठिंबा दिला कि मनाला बरे वाटते. अनेक दरदिवशी सांगतात, तुम्ही फडणवीसांचा फायदा करवून घ्या, काय फायदा करवून घ्यायचा अशा नेत्याचा, मुख्यमंत्र्यांचा जो तळहातावर शीर घेऊन २४ तास या राज्यातल्या हिंदूंना ताठ मानेने कसे जगता येईल, मराठी माणसाचे कसे भले साधल्या जाईल त्यावर मेहनत घेत असतो. मी नक्की आनंदी आहे कारण या राज्यातले मराठी आणि हिंदू हे ताठ मानेने आम्ही नेमके कोण आता सांगू शकतात. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची उद्धव आणि देवेंद्रमुळे कमी भासत नाही हेही नसे थोडके...

मूळ मुद्द्याकडे वळतो. फडणवीस बावनकुळे गडकरी या तिघा नेत्यांचे आपापसातले संबंध त्यावर नेमके सांगतो. तुम्हाला हे कदाचित ठाऊक नसेल, जेवढी धावपळ लोकसभा निवडणुकांदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी केली तेवढी अन्य कोणत्याही नेत्याने केलेली नाही. त्यांनी नेमकी कशी मेहनत घेतली त्याचे पुरावे ऑफ द रेकॉर्ड च्या ताज्या अंकांत आकडेवारीसहित वाचा, थक्क व्हाल, एकाचवेळी पाचही बोटे तोंडात घालाल. अत्यंत महत्वाचे म्हणजे नागपूरकर पत्रकारांना बातमी न दिसल्याने त्यांनी एका गोष्टीला प्रसिद्धी दिली नाही, तुम्हाला म्हणून सांगतो वाचकहो, या लोकसभा निवडणुकादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या नात्यातील हळुवारपणा ओलावा अनेकांनी अनुभवला, जवळून बघितला. हे कोणाला फारसे माहित नाही कि लोकसभा प्रचारादरम्यान फडणवीस हे दरदिवशी तेथे नागपुरात सकाळी सकाळी यायचे प्रचाराचे नियोजन करून लगेचच राज्यात प्रचार करण्यासाठी सभा घेण्यासाठी कानाकोपऱ्यात वणवण भटकायचे आणि रात्री पुन्हा नागपूरला परतायचे कारण बावनकुळे आणि फडणवीसांना गडकरी यांच्या तोळामासा तब्बेतीची कदाचित कल्पना आलेली होती म्हणून गडकरींवर प्रचाराचा फारसा ताण न पडण्याची फडणवीस बावनकुळे काळजी घ्यायचे. हेच फडणवीस गडकरींच्या लांबलचक लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत स्थानिक नेत्यांना बरोबर घेऊन बैठका घेऊन रात्री उशिरा गडकरींसंगे अंतिम बातचीत करायचे आणि कोणताही गाजवजा न करता फडणवीस पुढल्या कामाला लागायचे. एरवी फारतर चार पाच तास रात्री झोप काढणारे हेच फडणवीस त्यादिवसात तर सलग ३-४ तास देखील झोपले नाहीत, नव्हते, विरोधक सत्तेविना अस्वस्थ त्यामुळे त्यावेळेचे विरोधक अक्षरश: तुटून पडल्यासारखे आणि पातळी सोडून ओरछार करतांना दिसले...

www.vikrantjoshi.com

तिकडे दिल्ली विषयीच्या राजकारणावर मला ठाऊक नाही पण येथे या राज्याचे भले साधतांना नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवत या तिघांत थोडेसेही आपापसात मतभेद, राज्याला अजिबात परवडणारे नाहीत. यापुढे सत्तेत कदाचित युती आणि आघाडी आलटूनपालटून येत राहील, ते महत्वाचे नाही पण अधूनमधून जेव्हा केव्हा युती सत्तेत असेल, तेव्हा तेव्हा जर या तिघांत समन्वय सलोखा स्नेह नसेल तर त्याचे वाईट परिणाम थेट राज्याला भोगावे लागतील. एक नक्की कि देशाच्या राजकारणात मोदी आणि गडकरी या स्पर्धेत मोहन भागवत यांचे कायम गडकरींच्या बाजूने पारडे झुकत आलेले आहे पण जेव्हा केव्हा गडकरी आणि फडणवीस यांच्यातला एखादा मुद्दा उपस्थित होतो त्या त्या वेळी भागवत यांची बॅलन्स भूमिका आपोआप पुढले प्रश्न क्षणार्धात निकालात निघतात, हे मला संघाच्या मोठ्या पदाधिकाऱ्याने विविध वेळोवेळीची उदाहरणे देऊन सांगितले आहे.या तिघांत आपापसातले नाते अतिशय भावुक आहे त्या नात्याला तोड नाही. ते तिघे जणू एकाच कुटुंबातले सदस्य आहेत पद्धतीने त्यांचे वागणे असते..
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी