Sunday, 7 April 2019

सुमार केतकर २ : पत्रकार हेमंत जोशी
सुमार केतकर २ : पत्रकार हेमंत जोशी 
कुमार केतकर अभ्यासू पत्रकार आहेत, काँग्रेसचे खासदार आहेत त्यांचा जागतिक अनुभव दांडगा आहे ते स्वतः ब्राम्हण आहेत हिंदू आहेत असे असतांना वाटल्यास त्यांनी पाक विचारांच्या या देशातल्या मुसलमानांचे खुषाल उदात्तीकरण करावे पण त्याचवेळी काही ओढूनताणून उदाहरणे एकत्र करून त्यांनी भाषणातून जी टीका हिंदूंवर करणे सुरु केलेले आहे त्यात अधिक नुकसान नक्की काँग्रेसचे होईल, हिंदूंची सिम्पथी याउलट भाजपाला मिळेल, ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हिंदू मतदारांचा अधिकाधिक फायदा नक्की भाजपाला होईल....

केतकर त्या व्हायरल झालेल्या आपल्या भाषणात म्हणतात, मुहं मे राम बगल मे नथुराम असे मानणार्या शाह मोदी आणि भाजपाला गांधी घराणे नष्ट करायचे आहे आणि याची सुरुवात आज नाही १९४८ मध्येच झाली आहे. महात्मा गांधी यांची हत्या एका हिंदू माणसाने केली, इंदिरा गांधींचीहत्या शीख माणसाने केली, राजीव गांधींची हत्या तामिळ हिंदूंनी केली, आणि या तिन्ही हत्यांमागे कोठेही मुस्लिम दहशतवादी नव्हते. परंतु आपल्या तमाम समाजावरती तुमच्या आमच्या डोक्यावर अशी प्रतिमा 
लादून ठेवलेली आहे कि तमाम मुस्लिम दहशतवादाचे समर्थक आहेत किंवा स्वतः दहशतवादी आणि हिंदू बिचारे सहिष्णू आहेत, ते याला बळी पडतात त्यामुळे मुस्लिमांना धडा शिकवायला पाहिजे. मुस्लिमांना धडा शिकवायचा म्हणजे पाकिस्थानला धडा शिकवायचा म्हणजे दंगे करायचे. वस्तुतः आपल्या देशातल्या झालेल्या सर्व हत्यांची जबाबदारी मुस्लिमांकडे जात नाही....

वर दिलेला अख्खा परिच्छेद स्वतः काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे खास सल्लागार पत्रकार कुमार केतकर बरळले आहेत. हा माणूस वेडा आहे कि नशेत बोलून मोकळा झाला आहे. बोलतांना स्वतः हिंदू असलेल्या केतकरांनी किमान काही तारतम्य तर पाळायला हवे. तुम्ही या देशातल्या दिवंगत राष्ट्रपती कलामांसारख्या मूठभर चांगल्या मुसलमानांचे नक्की समर्थन करायला हवे त्यांची बाजू घ्यायला हवी ती आम्ही पण घेतो पण केतकरांचे हे काय, भाजपाशी कसलाबादरायण संबंध जोडून त्यांनी ऐन निवडणुकांच्या तोंडावर मुस्लिमांची मते केवळ काँग्रेसकडे वाळविण्यासाठी अशी चुकीची भूमिका घेतलेली आहे...

या देशातले जे पाक धार्जिणे मुसलमान आहेत ते कोणाचेही नसतात मग काँग्रेस चे तरी ते कसे होतील पण अशा पाकड्या विचारांच्या मुसलमानांचे लांगुलचालन करतांना त्यांनी थेट आरोप केलेत ते हिंदू, शीख आणि तामिळांवर त्यामुळे होईल असे कि भरवसा नसलेले पाक विचारांचे मुसलमान त्यांचे तर होणार नाहीतच वरून कुमार केतकर यांनी जे एखाद्या ठार वेडा झालेल्या माणसासारखे वक्तव्य केलेले आहे त्यातून त्यांनी म्हणजे काँग्रेसने एकाचवेळी हिंदू, शीख आणि तामिळ लोकांची सहानुभूती गमावलेली आहे. केतकरांनी हे असे प्रसिद्धीचे स्टंट्स करून स्वतःचा निखिल वागले करवून घेऊ नये. जवळपास त्यांचा वागले झालाच आहे कारण केतकर यांचे हे असले भाषण कानावर पडणारे मराठी अक्कल नसलेल्या माणसाचे भरकटलेपण असे मानून सोडून देतात...

हा जणू आपला देशच नाही असे मानणारा मुस्लिम येथे फार मोठ्या प्रमाणावर आहे ज्याकडे कुमार केतकर यांचे जाणूनबुजून दुर्लक्ष आहे, जेथे मराठी पोलीस देखील कायम हतबल ठरले आहेत ते मुंबईतले मुस्लिम कसे बेदरकार वागतात त्यास्तव कुमार केतकर यांनी वेळ काढावा आणि माझ्यासंगे मुंबईच्या रस्त्यांवर फिरावे, मी जे जे दाखवतो ते ते बघावे विशेष म्हणजे मुंबईतल्या प्रत्येक पोलीस ठाण्यातल्या निदान गेल्या काही वर्षातील गुन्ह्यांची नोंद वाचावी. केतकर हे सारे केल्यानंतर तुमच्या नक्की लक्षात येईल कि आपण किती बेजबाबदारपणे वक्तव्य करून हिंदूंचे खच्चीकरण आणि पाक विचारांच्या मुसलमानांचे उदात्तीकरणं केले आहे. जर डोक्याला झेपत नसेल तर आराम करा अन्यथा मराठी माणसेच तुम्हाला त्या निखिल यांच्यासारखा कंपलसरी आराम करायला भाग पाडतील, काहीही बरळू नका, जीभ सांभाळा...

www.vikrantjoshi.com

अत्यंत महत्वाचे म्हणजे भाषणाच्या ओघात तुम्ही जी तामिळ, शीख आणि हिंदू यांच्याकडून घडलेल्या हत्यांचे संदर्भ दिले त्याचा कोठेही भाजपा किंवा संघाशी संबंध नाही पण तुमचा त्यामागे असलेला उघड हेतू मोदी शाह आणि भाजपा यांना बदनाम करून मुस्लिमांचे समर्थन मिळविणे हा अगदी उघड उघड दिसतो. बोलण्याच्या ओघात ज्या तरुणीचे लग्नाआधी एखादे अफेअर असावे आणि तिला एखाद्याने थेट रस्त्यावर उभी राहून धंदा घेणारी वेश्या ठरवावे त्याचवेळी रस्त्यावर उभी राहून धंदा घेणाऱ्या वेश्येला कुलीन स्त्री ठरवून मोकळे व्हावे तसे तुमचे झालेले आहे. ज्यांनी गुन्हे केलेले आहेत, करताहेत त्यांचे तुम्ही उदात्तीकरण करताहात आणि खऱ्या अर्थाने सहिष्णू असलेल्या हिंदूंना जेव्हा तुम्ही दहशतवादी ठरवून मोकळे झाला आहेत आता हेच वाटायला लागलेले आहे कि केतकर एक पागल वेडा थर्डग्रेड माणूस कम खासदार कम पत्रकार आहे...

पुन्हा एकवार सांगतो, या देशाच्या मुख्य प्रवाहात सामील झालेले अनेक मुसलमान तसे आमच्याही आवडीचे पण ते प्रमाण अत्यल्प आहे आणि तुम्ही चुकीचे समर्थन करताहात, असे करू नका, सहिष्णू, सहनशील, श्रेष्ठ हिंदूंना असे विनाकारण बदनाम करण्याचा यापुढे तरी नालायकपणा करू नका, कळकळीची विनंती...
तूर्त एवढेच :


 पत्रकार हेमंत जोशी 

1 comment:

 1. नमस्कार हेमंत जोशी!

  काँग्रेसने भारतवादी मुस्लिमांचा नेहमी विश्वासघात केला आहे. ज्वलंत उदाहरण म्हणजे सरहद्द गांधी ज्यांना म्हणायचे ते खान अब्दुल गफारखान! फाळणीच्या वेळेस वायव्य सीमा प्रांतातल्या पठाणांना आजिबात पाकिस्तानात जायचं नव्हतं. पण गांधीनेहरूंनी त्यांना जबरदस्तीने ढकललं. 'तुम्ही आम्हाला लांडग्यांच्या तोंडी देत आहात', असे खानसाहेब अतिशय उद्विग्नपणे उद्गारले. पण नेहरूंना सत्ताप्राप्तीची घाई झाली होती ना.

  साधारण १९४५ च्या आसपास ब्रिटिशांनी भारत सोडून जायचं ठरवलं. तेव्हा जे काँग्रेसी स्वत:ला सेक्युलर म्हणवून घ्यायचे तेच फाळणीच्या वेळेस हिंदूंचं प्रतिनिधित्व करायला पुढे सरसावले. कारण सत्ता मिळंत होती ना. मग भारतवादी मुस्लिमांना द्या वाऱ्यावर सोडून.

  कुमार केतकरांचे बोलाविते धनी परत हाच गलिच्छ खेळ खेळंत आहेत.

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  ReplyDelete