Monday, 15 April 2019

पॉवर कम पवार : पत्रकार हेमंत जोशीपॉवर कम पवार : पत्रकार हेमंत जोशी 
ज्याच्या जवळ धीर आहे त्यालाच यश मिळते आणि पचविताही येते, धैर्यवान माणूस संकटात सापडत नाही आणि सापडला तरी डगमगून जात नाही. जो धैर्याने संकटांशी सामना करतो तोच यशस्वी ठरतो. धैर्याच्या मदतीनेच शत्रूला युद्धात जिंकता येते. ज्याच्याजवळ धैर्य आहे तोच नेता म्हणून शोभतो. नेता होण्यास योग्य असतो. डगमगून न जाणारे अनेक धैर्यवान नेते मी बघितले पण तेही काही संकटांमध्ये डगमगले. शरद पवार मात्र फारसे कधी डगमगतांना मी बघितले नाहीत. तोंडाला कर्क रोग झालेला असतांना देखील जो नेता पक्षाचानिवडणुकीत प्रचार करतो त्याला भीती ती कसली ? पण हेही पवार दोन पावले मागे आलेले मी दोनवेळा बघितलेले आहेत. एकदा मुख्यमंत्री असतांना सुधाकरराव नाईक यांनीच त्यांना थेट आव्हान दिले होते तेव्हा, त्या दिवसातले शरद पवार फार अस्वस्थ होते, ते नाईकांच्या त्यांच्या विरोधातल्या बंडाने एवढे डिस्टरब झाले कि त्यांनी मागला पुढला विचार न करता दिल्ली सोडली, केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला तेथून ते थेट मुंबईत आले आणि येथले मुख्यमंत्रीपद त्यांनी स्वीकारले, जेव्हा सुधाकरराव नाईक यांना येनकेनप्रकारेण त्यांनी पुढे राजकारणातून नोव्हेअर केले तेव्हाच पवारांचा घाबरलेला बिथरलेला चवताळलेला आत्मा शांत झाला. दुर्दैवाने पुढल्या काही महिन्यात अति तणावामुळे सुधाकरराव नाईक यांचा मधुमेह उफाळून वर आला आणि त्यातच त्यांचा अंत झाला अन्यथा पुढे याच पवारांना उघड विरोध करणाऱ्या सुधाकरराव नाईकांना नक्की चांगले दिवस आले असते...

चवताळलेल्या अस्सल नेत्यांचे रोमँटिक मूड मध्ये आलेल्या हत्तीसारखे असते अशावेळी जर त्याला त्याची आवडती हत्तीण भेटली मिळाली नाही तर तो हत्ती समोर दिसेल ते उपटून फेकतो किंवा प्राण्यांना ठार मारतो. मी बघतोय, गेली चार वर्षे मोठ्या धैर्याने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अशा हत्तीसमान चवताळलेल्या अनेक विरोधकांना तोंड देऊन मोकळे झाले वरून त्यांनी अनेक आव्हानात्मक निर्णय घेतले, घेतलेले निर्णय पूर्णत्वाला नेले. गेली चार वर्षे देवेंद्र फडणवीस आणि युतीचे सरकार धोक्यात यावे म्हणून शरद पवार यांनी नको नको ते फासे फेकले पण एकही टाकलेल्या फाश्यात त्यांना यश न आल्याने अलीकडे मी बघतो जे नाईकांच्या वेळी घडले होते तेच यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीतही घडले आहे, घडते आहे, पवार अस्वस्थ आहेत, आपले, आपल्या पवार घराण्याचे आणि आपल्या राष्ट्रवादी पक्षच नेमके काय होईल या चिंतेने पवार ग्रासले आहेत, काहीसे घाबरले आहेत, नाराज आहेत, निराश आहेत, खूपसे अस्वस्थ आहेत...

एकाचवेळी कामुक झालेल्या अनेक हततींनी एखाद्या एकट्या एकमेव हत्तीणीच्या मागे लागावे तसे फडणवीस आणि त्यांच्या विरोधकांचे या राज्यात झाले आहे, जो तो अगदी पवारांसहित त्यांना पाण्यात पाहतो आहे पण फडणवीसांजवळ धैर्य आहे धीर आहे हिम्मत आहे त्यामुळे खचून न जाता ते लढले, लढताहेत, विरोधकांना पुरून उरताहेत, विरोधकांवर तेही तुटून पडताहेत, हजार हत्तीचे बळ अंगात शिरल्यासारखे ते विरोधकांवर न डगमगता चाल करताहेत, यशस्वी होताहेत. जेथे फडणवीस संपले असे अनेकांना वाटते तेथे ते पुन्हा पूर्वीच्या उत्साहात पुन्हा उठून उभे राहतात आणि कामाला लागतात, म्हणून शरद पवार काहीसे बावरले आहेत, कधीकाळी गोपीनाथ मुंडे यांच्या आरोपांवर व्यथित झालेले किंवा सुधाकरराव नाईकांच्या बंडावर अस्वस्थ झालेले हेच शरद पवार त्या दोघांना बऱ्यापैकी पुरून उरले पण येथे फडणवीसांच्या बाबतीत मात्र फडणवीसांना संपविण्याचे गणित अद्याप त्यांना न सुटल्याने याउलट पवार यांचेच राजकीय भवितव्य धोक्यात आल्याने म्हणाल तर पवार अस्वस्थ आहेत म्हणाल तर यावेळी काहीसे घाबरले बावचळले आहेत...
तूर्त एवढेच.


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment