Saturday, 30 March 2019

नावापुरते संभाजी : पत्रकार हेमंत जोशी


नावापुरते संभाजी : पत्रकार हेमंत जोशी 

कोणीही सत्तेत आल्याने आम्हा सर्वसामान्य माणसांना कवडीचाही काडीचाही फरक पडत नसतो, जवळपास सारेच सत्ताधीश लुच्चे लफंगे आणि भ्रष्ट त्यातल्या त्यात नरेंद्र मोदी बरे म्हणून ते पुन्हा पंतप्रधान व्हावेत बहुतेकांना वाटते पण ज्यांना ते पुन्हा पंतप्रधान व्हावेत असे वाटते, ते या देशातले मध्यमवर्गीय फारसे कधीही मतदानाला बाहेर पडत नाहीत, सुट्टी एन्जॉय करतात. महत्वाचे म्हणजे ममता बॅनर्जी असोत कि शरद पवार, मायावती किंवा अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव आणि राज ठाकरे इत्यादींना विशेषतः नरेंद्र मोदी आणि भाजपाला पराभूत करायचे आहे पण ह्यांच्यासारखे जवळपास सारे लोकसभेचे उमेदवार म्हणून कोसो दूर आहेत, कोणीही लोकसभा लढवतांना दिसत नाही याचा अर्थ असा हे असे नेते आणि आम्ही मध्यमवर्गीय मतदार, आम्हा साऱ्यांना स्वर्गात नक्की जावेसे वाटते पण मरायला आमच्यातला एकही तयार नसतो. विशेष म्हणजे उद्या जर या देशातले सारे मुस्लिम आणि दलित मतदार नेहमीसारखे एकवटले आणि त्यांनी खरोखरी मध्यमवर्गीय मतदारांना तोंडावर पाडून काँग्रेसला किंवा अन्यत्र एकगठ्ठा मतदान केले तर बोंबा मारू नका, त्यानंतर उगाच शहाणपणा शिकवू नका...

सुनील गायकवाड यांच्यासारखा उच्चशिक्षित, डॉक्ट्रेट मिळविलेला विशेष म्हणजे देशातील उत्कृष्ट पहिल्या तेरा खासदारांमध्ये संसद भवनाकडून गौरविल्या गेलेला उमेदवार, थोडक्यात भाजपाच्याच मंत्र्याला सुनील गायकवाड हा भाजपाचा लॉयल उमेदवार नको होता, त्याऐवजी संभाजी निलंगेकर यांनी केवळ सातवी पास, श्री सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी मिळवून दिली. एक फोटो माझ्या पाहण्यात आला.ते एक पोस्टर आहे त्यात साऱ्यांचे फोटोज आहेत केवळ सुनील गायकवाडांना स्थान नाही, माजी खासदार मातोश्री रूपाताई निलंगेकर किंवा धाकले बंधू अरविंद निलंगेकर यांनाही त्या होर्डिंग वर स्थान आहे पण ज्या गायकवाड यांनी संभाजी निलंगेकर तुरुंगात खितपत पडू नयेत म्हणून आजोबा शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे यशस्वी शिष्टाई केली त्या डॉ. सुनील गायकवाड यांचाच संभाजी निलंगेकर पाटलांनी राजकीय खात्मा केला. विशेष म्हणजे उमेदवारी जाहीर होण्याच्या काही दिवस आधी, नाही म्हणायला शासकीय सेवेतून वादग्रस्त भ्रष्ट म्हणून बाहेर पडल्यानंतर ' हाके च्या अंतरावर ' मोठ्या खुबीने उभे राहून दलाली हाच जन्मसिद्ध हक्क मानणार्या एका स्त्रीलंपट नेत्याने का प्रवक्त्याने, तिकीट हवे असेल, पुन्हा उमेदवारी हवी असेल तर काही कोटींची रक्कम तयार ठेवावी लागेल, काहींना सांगितले होते पण ' गणेशाच्या नावाने ' हा मस्करी करतोय असे सुनील गायकवाडांना वाटले, कदाचित सुधाकर शृंगार यांना मात्र तसे वाटले नसावे कारण पुढे जेव्हा गायकवाडांचे तिकीट कापल्या गेले तेव्हा विद्यमान उमेदवाराने ' हाकेच्या अंतरावरउभे राहून ' दलाली करणाऱ्या या नेत्याच्या मागणीची पूर्तता तर केली नाही असा संशय अलीकडे सुधाकर शृंगारे यांच्याबाबतीत घेतल्या जाऊ लागला आहे. भाजपाच्या मुख्य कार्यालयात वर्षानुवर्षे ठाण बसलेले आणि हाकेच्या अंतरावर उभे राहून चमचेगिरी करणारे काही नेते किती करप्ट आहेत हे भाजपाच्या श्रेष्ठींनी तपासणे आवश्यक ठरते आहे. भाजपा श्रेष्ठी स्थानिक चांडाळचौकडीच्या दिशाभूल करणाऱ्या माहितीला बळी पडले त्यात सुनील गायकवाडांचा राजकीय बळी गेला...

www.vikrantjoshi.com

ज्या डॉ. सुनील गायकवाड यांनी सोळाव्या लोकसभेत अतिउत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना थेट दिल्लीच्या संसद भवनातून अभिनंदन करणारे पत्र येते त्यात संसद नमूद करते कि आपण सोळाव्या लोकसभेत विविध प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले आहे त्यामुळे देशभरातील अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत विशेष म्हणजे पाच वर्षात झालेल्या विविध अधिवेशनांमध्ये आपली उपस्थिती जवळपास ९८ टक्के राहिलेली आहे, तुमच्या कामगिरीचे स्वरूप अतिउत्कृष्ट राहिलेले आहे त्याच सुनील गायकवाडांना थेट लोकसभेचे तिकिटाचा नाकारल्या जाते त्यावर विशेषतः लातूर निलंगा लोकसभा मतदार संघातले दलित आणि भाजपातले सर्वसामान्य कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत, अस्वस्थ आहेत. विशेष म्हणजे केवळ दगाफटका झाल्यानेच १५ व्या लोकसभेला हेच डॉ. सुनील गायकवाड थेट त्यावेळेचे मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना आव्हान देत केवळ दोन अडीच हजार मतांनी तेही लोकसभेला पराभूत झाले होते, विलासरावांच्या गढीत खर्या अर्थाने भाजपा वाढविण्यात पुढे नेण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा त्याच दलित समाजाच्या डॉ. सुनील गायकवाडांना तेही भाजपा स्थानिक नेत्यांनी देशोधडीला लावणे, सारेच संतापजनक आणि खेदजनक वाटते. याच जिल्ह्यातले दलित मतदार संघ भाजपापासून कोसो दूर असायचे आणि शिवाजीराव निलंगेकर किंवा विलासराव देशमुखांच्या काँग्रेस ला घट्ट बिलगून असायचे, त्या काळात हे असे गायकवाडांसारखे संघ भाजपाचे तुटपुंजे दलित कार्यकर्ते स्वयंसेवक पायाला भिंगरी लागल्यागत प्रचार करण्यात धन्यता मानायचे, बोलता बोलता डॉ सुनील गायकवाड यांच्या डोळ्यातले अश्रू बरेच काही सांगून जातात...



क्रमश:


 पत्रकार हेमंत जोशी

No comments:

Post a comment