Saturday, 30 March 2019

नावापुरते संभाजी : पत्रकार हेमंत जोशी


नावापुरते संभाजी : पत्रकार हेमंत जोशी 

कोणीही सत्तेत आल्याने आम्हा सर्वसामान्य माणसांना कवडीचाही काडीचाही फरक पडत नसतो, जवळपास सारेच सत्ताधीश लुच्चे लफंगे आणि भ्रष्ट त्यातल्या त्यात नरेंद्र मोदी बरे म्हणून ते पुन्हा पंतप्रधान व्हावेत बहुतेकांना वाटते पण ज्यांना ते पुन्हा पंतप्रधान व्हावेत असे वाटते, ते या देशातले मध्यमवर्गीय फारसे कधीही मतदानाला बाहेर पडत नाहीत, सुट्टी एन्जॉय करतात. महत्वाचे म्हणजे ममता बॅनर्जी असोत कि शरद पवार, मायावती किंवा अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव आणि राज ठाकरे इत्यादींना विशेषतः नरेंद्र मोदी आणि भाजपाला पराभूत करायचे आहे पण ह्यांच्यासारखे जवळपास सारे लोकसभेचे उमेदवार म्हणून कोसो दूर आहेत, कोणीही लोकसभा लढवतांना दिसत नाही याचा अर्थ असा हे असे नेते आणि आम्ही मध्यमवर्गीय मतदार, आम्हा साऱ्यांना स्वर्गात नक्की जावेसे वाटते पण मरायला आमच्यातला एकही तयार नसतो. विशेष म्हणजे उद्या जर या देशातले सारे मुस्लिम आणि दलित मतदार नेहमीसारखे एकवटले आणि त्यांनी खरोखरी मध्यमवर्गीय मतदारांना तोंडावर पाडून काँग्रेसला किंवा अन्यत्र एकगठ्ठा मतदान केले तर बोंबा मारू नका, त्यानंतर उगाच शहाणपणा शिकवू नका...

सुनील गायकवाड यांच्यासारखा उच्चशिक्षित, डॉक्ट्रेट मिळविलेला विशेष म्हणजे देशातील उत्कृष्ट पहिल्या तेरा खासदारांमध्ये संसद भवनाकडून गौरविल्या गेलेला उमेदवार, थोडक्यात भाजपाच्याच मंत्र्याला सुनील गायकवाड हा भाजपाचा लॉयल उमेदवार नको होता, त्याऐवजी संभाजी निलंगेकर यांनी केवळ सातवी पास, श्री सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी मिळवून दिली. एक फोटो माझ्या पाहण्यात आला.ते एक पोस्टर आहे त्यात साऱ्यांचे फोटोज आहेत केवळ सुनील गायकवाडांना स्थान नाही, माजी खासदार मातोश्री रूपाताई निलंगेकर किंवा धाकले बंधू अरविंद निलंगेकर यांनाही त्या होर्डिंग वर स्थान आहे पण ज्या गायकवाड यांनी संभाजी निलंगेकर तुरुंगात खितपत पडू नयेत म्हणून आजोबा शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे यशस्वी शिष्टाई केली त्या डॉ. सुनील गायकवाड यांचाच संभाजी निलंगेकर पाटलांनी राजकीय खात्मा केला. विशेष म्हणजे उमेदवारी जाहीर होण्याच्या काही दिवस आधी, नाही म्हणायला शासकीय सेवेतून वादग्रस्त भ्रष्ट म्हणून बाहेर पडल्यानंतर ' हाके च्या अंतरावर ' मोठ्या खुबीने उभे राहून दलाली हाच जन्मसिद्ध हक्क मानणार्या एका स्त्रीलंपट नेत्याने का प्रवक्त्याने, तिकीट हवे असेल, पुन्हा उमेदवारी हवी असेल तर काही कोटींची रक्कम तयार ठेवावी लागेल, काहींना सांगितले होते पण ' गणेशाच्या नावाने ' हा मस्करी करतोय असे सुनील गायकवाडांना वाटले, कदाचित सुधाकर शृंगार यांना मात्र तसे वाटले नसावे कारण पुढे जेव्हा गायकवाडांचे तिकीट कापल्या गेले तेव्हा विद्यमान उमेदवाराने ' हाकेच्या अंतरावरउभे राहून ' दलाली करणाऱ्या या नेत्याच्या मागणीची पूर्तता तर केली नाही असा संशय अलीकडे सुधाकर शृंगारे यांच्याबाबतीत घेतल्या जाऊ लागला आहे. भाजपाच्या मुख्य कार्यालयात वर्षानुवर्षे ठाण बसलेले आणि हाकेच्या अंतरावर उभे राहून चमचेगिरी करणारे काही नेते किती करप्ट आहेत हे भाजपाच्या श्रेष्ठींनी तपासणे आवश्यक ठरते आहे. भाजपा श्रेष्ठी स्थानिक चांडाळचौकडीच्या दिशाभूल करणाऱ्या माहितीला बळी पडले त्यात सुनील गायकवाडांचा राजकीय बळी गेला...

www.vikrantjoshi.com

ज्या डॉ. सुनील गायकवाड यांनी सोळाव्या लोकसभेत अतिउत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना थेट दिल्लीच्या संसद भवनातून अभिनंदन करणारे पत्र येते त्यात संसद नमूद करते कि आपण सोळाव्या लोकसभेत विविध प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले आहे त्यामुळे देशभरातील अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत विशेष म्हणजे पाच वर्षात झालेल्या विविध अधिवेशनांमध्ये आपली उपस्थिती जवळपास ९८ टक्के राहिलेली आहे, तुमच्या कामगिरीचे स्वरूप अतिउत्कृष्ट राहिलेले आहे त्याच सुनील गायकवाडांना थेट लोकसभेचे तिकिटाचा नाकारल्या जाते त्यावर विशेषतः लातूर निलंगा लोकसभा मतदार संघातले दलित आणि भाजपातले सर्वसामान्य कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत, अस्वस्थ आहेत. विशेष म्हणजे केवळ दगाफटका झाल्यानेच १५ व्या लोकसभेला हेच डॉ. सुनील गायकवाड थेट त्यावेळेचे मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना आव्हान देत केवळ दोन अडीच हजार मतांनी तेही लोकसभेला पराभूत झाले होते, विलासरावांच्या गढीत खर्या अर्थाने भाजपा वाढविण्यात पुढे नेण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा त्याच दलित समाजाच्या डॉ. सुनील गायकवाडांना तेही भाजपा स्थानिक नेत्यांनी देशोधडीला लावणे, सारेच संतापजनक आणि खेदजनक वाटते. याच जिल्ह्यातले दलित मतदार संघ भाजपापासून कोसो दूर असायचे आणि शिवाजीराव निलंगेकर किंवा विलासराव देशमुखांच्या काँग्रेस ला घट्ट बिलगून असायचे, त्या काळात हे असे गायकवाडांसारखे संघ भाजपाचे तुटपुंजे दलित कार्यकर्ते स्वयंसेवक पायाला भिंगरी लागल्यागत प्रचार करण्यात धन्यता मानायचे, बोलता बोलता डॉ सुनील गायकवाड यांच्या डोळ्यातले अश्रू बरेच काही सांगून जातात...क्रमश:


 पत्रकार हेमंत जोशी

Thursday, 28 March 2019

लोकसभा आखाडा : पत्रकार हेमंत जोशी


लोकसभा आखाडा : पत्रकार हेमंत जोशी 

जवळपास महिन्याभराच्या गॅपनंतर लिखाणाला सुरुवात करतोय. वास्तविक एखाद्या राजकीय परिघात पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराने ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत धामधुमीत अधिकाधिक लिहायचे सोडून आहे त्या नियमित लिखाणापासून दूर पळणे म्हणजे एखाद्याने मधुचंद्राच्या राती नववधूला पलंगावर एकटीलाच सोडून एखाद्या मंदिरात देवाच्या मूर्तीसमोर बसून २१ व्या अध्यायाचे पारायण करीत बसल्यासारखे किंवा पायलटने विमान कृ मेम्बरच्या हाती सोपवून सिनेमा टॉकीज मध्ये पाठीमागच्या सीट वर बसून लैंगिक अश्लील प्रकार करणाऱ्या जोडप्यासारखे विमानात अन्यत्र जाऊन बसण्यासारखे आणि आमचे हे खरेच असे आले कारण आमच्या घरी माझ्या तीन नातवांपैकी दोन नातवांचे उपनयन शुभकार्य होते, जे करायचे ते मनापासून त्यात व्यस्त होतो, लिखाणाकडे नको त्यावेळी दुर्लक्ष झाले म्हणजे ज्यावेळी पुत्रप्राप्तीसाठी संभोग आवश्यक असतो त्यादरम्यान हाती ' ब्रम्हचार्याचे फायदे ' हे पुस्तक हाती घेऊन वाचत बसलेल्या बावळट तरुणासारखे आमचे हे असे दुर्लक्ष झाले...

एखाद्याचा गेम आपल्याच माणसांनी कसा करायचा असतो हे फडणवीस मंत्री मंडळातील संभाजीराव पाटील निलंगेकरांकडून शिकण्यासारखे, मला तर त्यांच्यात अनेकदा थेट मराठवाड्यातले शरद पवार दिसतात म्हणजे संभाजी निलंगेकर एकदा का त्यांची सटकली कि ते कोणाचा राजकीय खात्मा खिमा गेम करतील नेम नसतो, त्यांच्या अगदी घरातले उदाहरणे मला देतील, नाव सांगत नाही पण आडनाव सांगतो, मिसेस राणे आडनावाच्या एक सोशल वर्कर आहेत, माझ्या जवळून परिचयाच्या आहेत, विशेष म्हणजे त्या संभाजी यांच्या सख्ह्या मावशी आहेत, त्यांना मी फार पूर्वी सांगितले होते कि गाढवाच्या मागून आणि संभाजी यांच्या पुढून म्हणजे पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका, त्यांनी ऐकले नाही, आता त्या घरीच असतात, पापड लाटतात आणि वाळत घालतात....

जो नेता ऐन तारुण्यात हिंदी सिनेमाच्या हिरोसारखा पेटून उठतो आणि थेट मुख्यमंत्री म्हणून एकेकाळी विराजमान असलेल्या घरातल्याच शिवाजीराव यांचा राजकीय ' अफजल खान ' करतो त्यांचा राजकीय कोथळा बाहेर काढून ज्यांच्या नेतृत्वाचा कायमस्वरूपी काटा काढतो, शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना राजकारणातून कायमचे नेस्तनाबुत करतो ते तरुण नेते, भाजपाचे संभाजी रस्त्यात आडवे येणाऱ्या कोणत्याही नेत्याचे अगदी ठरवून ' यशवंतराव चव्हाण ' करून मराठवाड्यातले किंवा भाजपामधले आधुनिक शरद पवार म्हणून कारकीर्द गाजवून सोडतात, त्यांचा हा राजकीय इतिहास यापुढे कायम ध्यानात ठेवूनच राजकारणाशी संबंधित त्यांच्या सभोवताली, स्पर्धेत असणाऱ्या अभिमन्यू पवारांसारख्या पॉवरफुल नेत्यांनी स्पर्धकांनी ध्यानात ठेवायलाच पाहिजे, समोरचा नेता मग तो थेट विलासराव देशमुखांच्या किंवा निलंगेकरांच्या जरी घराण्यातला घरातला असला तरी एकदा का संभाजी यांची सटकली कि आजोबा असोत का सख्खी मावशी, थेट घरचा रस्ता दाखवून मोकळे होतात...

मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे राजकीय महत्वाकांक्षी आहेत ते मंत्री आहेत पुढे त्यांना त्यांच्या घरातल्या शिवाजीराव पाटील निलंगेकर किंवा त्यांच्या लातूर जिल्ह्यातल्या दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पावलावर पाऊल टाकायचे आहे, त्यांना मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा आहे त्यासाठी त्यांना लातूर जिल्ह्यात नेतृत्वात नंबर वनवर यायचे आहे आणि हे करतांना समोरचा मग कोणीही असो, थेट देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात अभिमन्यू पवार जरी असलेत तरी संभाजी प्रसंगी अशा प्रभावी नेत्याला देखील पुरून उरतात, अभिमन्यू पवार यांची खडान्खडा माहिती जर आजही याक्षणी हवी असेल तर एकटे संभाजी पाटील निलंगेकर त्यासाठी पुरेसे आहेत. आर्थिक देउष्टया मंत्री झाल्यापासून त्यांनी सारे सुविचार बाजूला ठेवल्याने ते किंवा त्यांचे धाकले बंधू अरविंद, यापुढे थेट अमित देशमुख यांना सुद्धा एक दिवस सांगून मोकळे होतील कि आम्हीही श्रीमंत आहोत. लातूरमधून विधान सभा लढविण्याची तयारी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यकाला, भाजपा घराण्यातून आलेल्या अभिमन्यू पवार यांना, मला खात्री आहे, सर्वाधिक राजकीय दडपण असते ते फक्त आणि फक्त संभाजी पाटील निलंगेकर यांचे, हे निलंगेकर प्रसंगी आजोबाचा राजकीय खात्मा करतांना अकबराच्या भूमिकेत शिरून भल्याभल्यांना नोव्हेअर करणारे, अभिमन्यू पवार त्यास्तव तुम्हला कायम दडपणाखाली वावरतांना दिसतात, प्रियकराशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर पाळी टाळून गेलेल्या तरुणीसारखा, बघा, अभिमन्यू यांचा कायम सतत चिंताक्रांत चेहरा असतो....

आता अत्यंत महत्वाचा मुद्दा, लोकसभा निवडणुकीतला, नेमके संभाजी पाटील कसे आणि किती डेंजरस हे ठाऊक असतांना देखील लातूरचे विद्यमान खासदार सुनील गायकवाड गाफील राहिले, विशेष म्हणजे त्यांचे मतदार संघाकडे झालेले दुर्लक्ष कायम मुंबई आणि दिल्लीतले वास्तव्य किंवा त्यांनी संभाजी पाटलांवर चुकून ठेवल्या गेलेला अति विश्वासच त्यांना नडला आणि सावध संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी त्यांचे आर्थिक सल्लागार उद्योगपती नवश्रीमंत शृंगारे यांना भाजपाची थेट लोकसभेसाठी उमेदवारी मिळवून दिली. जेव्हा जग जिंकायचे असते जेव्हा लढाई लढून जिंकायची असते आणि थेट रणांगणात आपला ' अर्जुन ' होणार नाही याची काळजी घ्यायची असते जी संभाजी पाटील निलंगेकर कायम घेत आले आहेत त्यातून रस्त्यात आडवा येणारा स्पर्धक मग तो प्रसंगी उद्या सख्खा भाऊ जाती असला भाजपाचे नेते, घरातले किंवा सुनील गायकवाड असोत कि शिवाजीराव पाटील निलंगेकर किंवा अभिमन्यू पवार, समोरचा राजकारणातून कायमस्वरूपी संपविण्याचे मोठे कारस्थान संभाजी निलंगेकर घडवून आणतात आणि लातूरातल्या देशमुखांसारख्या राजकीयदृष्ट्या एस्टॅब्लिश घराण्याला देखील अडगळीत टाकून मोकळे होतात, त्यामुळेच मला अनेकदा भीती वाटते ती भाजपाशी अतिशय एकनिष्ठ असलेल्या आणि आमदार होऊ पाहणाऱ्या अभिमन्यू पवार यांची, आज मोठे होऊ पाहणारे किंवा मोठे झालेले थेट मुख्यमंत्र्यांचे जवळचे साथीदार अभिमन्यू पवार यांचा डायरेकट सुनील गायकवाड करायला वेळ आल्यानंतर निलंगेकर संधी घालविणाऱ्यातले नाहीत, लै डेंजर माणूस प्लस त्यांना यश देखील मिळते म्हणजे शृंगारे यांना निलंगेकर नक्की निवडून आणणार्यातले, राजकारणातली त्यानिमीत्ते एक पायरी वर चढून लोकसभेनंतर ते भाजपामधले मोठ्या पदाचे दावेदार कसे, त्यांच्या श्रेष्ठींना सांगून मोकळे होतील....
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Sunday, 24 March 2019

Bura Na Mano Holi Hai....

Bura Na Maano Holi Hai....

1. Whom do our state's topmost bureaucrats don't want in their cabin anytime?
A. Their spouses
B. Ravi Rana/Prasad Lad/Bhai Girkar
C. Insurance selling representatives
D. The Yakub brothers

2. Minister Vinod Tawde's mood uplifts when he...
A.  Gets invited for any program at any Mahila Mandal.
B. His OSD Charudutt Shinde get's him his favourite chicken dish
C. When he see's Shardul Bayas, his unofficial only "male" partner.
D. When his wife comes to the rented flat near Oval Maidan.

3. The petrol pump right next to Mantralaya has been "grabbed" and "managed" by...
A. Anna Hazare
B. Trust of Mother Teresa
C. Baba Ramdev
D. MLC Pravin Darekar

4. When Pratap Sarnaik's son got engaged to Minister Ranjit Patil's daughter recently who was the happiest at the engagement ceremony.
A. Pratap Sarnaik himself
B. Dr Ranjit Patil Himself
C. The to be bride and groom OR
D. A close friend of Pratap Sarnaik, actress Divya Dutta

5. IAS Ashwini Joshi was immediately shunted out as Excise Commissioner due to...
A. Her strict nature.
B. Vishwanath Indise proved to a be thorn which she couldn't get rid off.
C. Her "Panga" with Sudhir Mungantiwar (God, that's the reason now all bureaucrats have started investing in their parents name now...No more property in spouse's name)
D. Heavy Weight Nitin Gadkari's one bogus friend was not helped by Ashwini Joshi.

6. What is Hope?
A. IPS Paramvir Singh--One day I will become the Commissioner of Mumbai by hook or by crook.
B. Bumrah--I will bat better than Virat Kohli
C. Devendra Fadnavis--I will get rid of telephone calls from Delhi.
D. Girish Mahajan-I will come home when everyone at home is awake.

7. Who according to you is closest to the Chief Minister?
A. Parinay Fuke, Pravin Datke, Sandip Joshi, Munna Yadav, the Nagpur Gang
B. Sumit Wankhede
C. Uddhav Thackrey
D. MP Kapil Patil (every alternate day he is at Varsha bloody asking for signatures on files like a beggar)

8. Father-Son combination who loot people promising to do the work and never return the advances?
A. Straguhna Sinha & Luv Sinha
B. Amitabh Bachchan & Abhishek Bachchan
C. Ramesh Deo & Ajinkya Deo
D. Suresh Oberoi & Vivek Oberoi

9. In the near future who is entering BJP?
A. Rohit Pawar
B. Pranitee Shinde
C. Radhakrishna Vikhe Patil
D. Jayant Patil

10. Recently Additional Charge holder Vinita Singhal's one 'game' went wrong...What was it?
A. Rs. 7,000 crore tender got scrapped by the Supreme Court
B. She proposes one thing at MTDC, but Minister Jaykumar Raval scraps it.
C. A game of Chess
D. None of the above

11. In the Corporations mentioned below, who is sitting on the throne with full of serpents around?
A. MiLind Mhaiskar (Mhada)
B. Deepak Kapoor (SRA)
C. Lokesh Chandra (Cidco)
D. All fo them.

12. Who has amazing oratory skills?
A. Parth Pawar
B. CS--D.K. Jain
C. Ram Kadam
D. MLA Capt. Tamil Selvan

13. Which male MP of BJP should not get re-elected due to "his" fraud nature?
A. Gopal Shetty
B. Heena Gavit
C. Raksha Khadse
D. Poonam Mahajan

14. Best negotiator these days for CM Fadnavis is...
A. Prasad Lad
B. Girish Mahajan
C. Girish Bapat
D. Chandrashekhar Bawankule

15. For continuous 4.5 years who stitched new clothes every time there was news of Cabinet expansion?
A. Sanjay Kute
B. Sujit Minchekar
C. Uday Samant
D. Mangal Prabhat Lodha

16. Who in the CMO is avoided by the CM himself when there are secretive talks, as this person cannot stop telling it to others?
A. Sumit Wankhede
B. Abhimanyu Pawar
C. Ravikiran Deshmukh
D. Ketan Pathak

17. Sudhir Mungantiwar's best friend is...
A. Sachitanand Lalwani also known as Sacchu
B. Minister Prakash Mehta
C. Minister & Old pal Madan Yerawar
D. IAS Rajiv Jalota

18. If BJP/ShivSena come in power again, who will be the next Chief Minister ?
A. Devendra Fadnavis
B. Rashmi Thackrey
C. Aditya Thackrey
D. Sudhir Mungantiwar

19. Who is singing the most loved song, "Aane wala Pal Jaane Wala Hai"
A. Manukumar Shrivastav
B. Eknath Khadse
C. Sharad Pawar
D. Raj Thackrey

20. Navneet Kaur got ticket from NCP due to...
A. Her husbands (MLA Ravi Rana) hard work running everywhere with Sudhakar Shetty
B. Ajit Pawar stayed at Amravati for 8 days and took ground realities in consideration
C. Ajay Nawandar backed off
D. She promised she will stay with NCP even if her husband is close to the BJP.

Monday, 11 March 2019

पार्थ पवार : पत्रकार हेमंत जोशीपार्थ पवार : पत्रकार हेमंत जोशी 
आपले स्वतःचे तारुण्य शाबूत राखणे अजिबात वाईट नाही. पण पोटची मुले देखील मोठी झालेली आहेत, केव्हाच वयात येऊन त्यांचे वयात येण्याचे वय देखील उलटून गेलेले असतांना जर आई वडिलांचेच तारुण्यातले नको ते छंद जोपासणे सुरु असेल तर अशा घरातली मुले कायम बंड करण्याच्या अवस्थेत असतात किंवा मायबापाचेच तारुण्यातले धंदे जर संपत नसतील तर पुढली पिढी व्यसनेच्या आहारी जाते. उद्या समजा राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांची मुले लग्नाची असतील आणि जयंतरावांचेच येथे तेथे तोंड मारणे सुरु असेल तर अशा घरातल्या मुलांना नैराश्य फ्रस्ट्रेशन येते त्यातून त्यांच्या विविध समस्या पुढे निर्माण होतात, अशी पिढी स्वतःचे मोठे नुकसान करवून घेते. घरात बापाचे लक्ष नसलेली पैसे खाणाऱ्यांची ऐय्याशी करणाऱ्यांची पुढली पिढी मोठ्या विचित्र मानसिक अवस्थेत जगते, व्यसनांकडे अनेकदा हमखास वळते...

जयंत पाटील तसे आहेत असे येथे मला म्हणायचे नाही सहजच उदाहरण दिले. पार्थ पवार यांच्या मनातली अस्वस्थता हि अशाच पद्धितीची होती काय, त्यावर जाणून घेणे अत्यावश्यक ठरते. होय, पार्थ किंवा त्यांचे बंधू, नेमके आयुष्यात काय करावे या दबलेल्या अवस्थेत असावेत कारण अजित पवारांचे स्वतःवरच एवढे प्रेम कि मुलांचे नेमके काय करावे त्यावर त्यांनी फारसे लक्ष दिले असावे वाटत नाही, विशेष म्हणजे मुलांमध्ये राजकारणात अजितदादांच्या पुढे जाण्याची क्षमता असतांना सुद्धा हे असे घडत होते. आता एक बरे झाले, पार्थ अजित पवार राजकारणात आले. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे यावेळी स्वतः अजित पवारांनाच याची जाणीव झाली कि काहीतरी वेगळे करवून दाखविण्याचे त्यांच्या मुलांचे वय झालेले आहे त्यातून या लोकसभा निवडणुका दरम्यान अजितदादा पार्थ यांच्याबाबतीत त्यांच्या राजकीय करिअरच्या बाबतीत खूपच सिरीयस आहेत हे अलीकडे पदोपदी जाणवते, अजित पवार यांच्या स्वभावातला, घरातला हा बदल नक्की कौतुकास्पद आहे. देर आये दादा लेकिन दुरुस्त आये. उद्या पार्थ अजित पवार निवडणुकीला उभे राहिलेत तर निवडूनही येतील खासदारही होतील याचे मुख्य कारण पार्थ यांचे वागणे कोठेही विचित्र उर्मट वात्रट नाही ते कार्यकर्त्यांना, विशेषतः वडीलधाऱ्यांना अतिशय मानसन्मान देऊन बोलतात, वागतात, समोरच्या माणसाला एका क्षणात आपलेसे करतात आणि निर्माण केलेले संबंध जपण्याची वाढवण्याची त्यांची स्वतःची अशी खास आणि चांगली पद्धत आहे..

www.vikrantjoshi.com

शरद पवार आज राजकारणात आहेत, अजित पवार देखील राजकारणात आहेत पण उद्या हे दोघे जरी निवृत्त झाले तरी पार्थ पवार यांचे इतर नेत्यांच्या अनेक मुलांसारखे होणार नाही कि बापाचे आजोबांचे राजकीय अस्तित्व संपल्याने आता पार्थ यांचा देखील ' राहुल महाजन ' झालेला आहे. अजिबात तसे होणार नाही, त्यांची काम करण्याची स्वतःची अशी वेगळी पद्धत ते डेव्हलप करताहेत त्यात ते यशस्वी होऊन आदित्य ठाकरे पद्धतीने ते पुढल्या पिढीवर नक्की छाप मारून वेगळे होतील. त्यांनी आता लग्नाच्या बेडीतही अडकायला हरकत नाही अर्थात आदल्या पिढीची हौस मिटली कि पुढल्या पिढीच्या लग्नाचा विचार नक्की होतो. अन्यथा पुढल्या पिढीने देखील डावखर्यांच्या मुलांसारखे निर्णय घ्यावेत, स्वतःच स्वतःचे उरकून घ्यावे...

अचानक आलेला प्रचंड काळा पैसा, लहानपणी किंवा ऐन तारुण्यात दाबल्या गेलेल्या भावना त्यातून आमच्या पिढीने मोठा धुमाकूळ घातला, घालताहेत. स्वतःचे शौक पूर्ण करता करता आम्हाला घरी द्यायला वेळ उरलाच नाही त्यामुळे आम्ही मजा मारतोय पुढल्या पिढीकडे होणारे दुर्लक्ष हे लॉटरीच्या तिकिटासारखे झालेले आहे म्हणजे मुले चांगली निघालेत तरी ती ऐय्याशी करणाऱ्या मायबापांची लॉटरी समजावी पण लॉटरी हजारात एखाद्यालाच लागते, बहुतेक नवश्रीमंत झालेल्या घरातली मुले देखील व्यसनाधीन झालेली भरकटलेली आढळतात त्यामुळे आपण हे आपल्या आयुष्याचे काय करून घेतले, याचे मायबापांना पुढे वाईट वाटते, तोवर वेळ निघून गेलेली असते. म्हणून एकच सांगणे, स्वतः नक्की मजा मारा पण पैदा केलेल्या मुलांची त्यांना निदान घडविण्याची आपलीच जबाबदारी असते हे बेधुंद जगणार्या मायबापांनी विसरता कामा नये. बहुतेक घरात पाश्चिमात्य वातावरण घुसल्याने मोठी विचित्र अवस्था राज्यात सर्वत्र, घराघरात आहे, काळजी वाटते. मला आवडलेली माणसे सहसा समाजालाही मनापासून आवडतात जसे देवेंद्र, उद्धव तसे पार्थ देखील सर्वांचे आवडते नेते असतील...
तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

Wednesday, 6 March 2019

उद्धवनीती : पत्रकार हेमंत जोशीउद्धवनीती : पत्रकार हेमंत जोशी 

अनेकांनी अनेक प्रयत्न केले तरीही त्या दोघांना उद्धव ठाकरे यांनी कधीही दूर केले नाही, सर्वाधिक शिव्याशाप त्यांनाच झेलावे सोसावे लागतात, नेते शिवसेनेतले असोत अथवा बाहेरचे काड्या करणारे स्वतः उद्धव ठाकरे हेच असतात पण बदनाम ते दोघे होतात, शिव्या आणि शाप त्या दोघांनाच सहन कराव्या लागतात. त्या दोघांच्या रांगेत बसण्याचा उद्धव यांचे जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान किंवा अभिनेते कम नेते आदेश बांदेकर यांच्यासारख्या अनेकांनी प्रयत्न केले, पण त्यांचे स्थान कोणालाही मिळविता पटकविता आले नाही. इतर ते स्थान मिळविण्यासाठी जे डावपेच आखतात त्यावर त्या दोघांनी कधीही त्रागा केला नाही, बदला घेतला नाही, ते मनाशी नक्की हेच म्हणत असतील, हत्ती चले बजार तो कुत्ते भुके हजार...

मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत दोघेही शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबियांचे उजवे व डावे हात आहेत, त्या दोघात उजवा कोण आणि डावा कोण, हे मात्र सांगणे तेवढे सोपे नाही. संजय राऊत यांना नक्की राजकीय महत्वाकांक्षा आहे, त्यातून ते स्वतः राज्यसभेवर गेले, भाऊ सुनील राऊत यांनाही त्यांनी आमदार केले. मिलिंद नार्वेकर यांना राजकीय महत्वाकांक्षा आहे किंवा नाही हे ते स्वतः बोलायला वागायला अतिशय फटकळ, मनमोकळे असूनही अगदी त्यांच्या जवळच्याही मंडळींच्या मित्रांच्या मिलिंद नार्वेकर यांच्याविषयी लक्षात येत नाही कि त्यांना राजकीय महत्वाकांक्षा आहे किंवा नाही, मला वाटते ती असती तर ते याआधीच आमदारकी खासदारकी मिळवून मोकळे झाले असते...

संजय राऊत किंवा मिलिंद नार्वेकर यांच्या मागच्या रांगेतल्या बांदेकर, यांच्यासारख्या जवळपास साऱ्याच मंडळींना राजकीय महत्वाकांक्षा नक्की आहे पण मिलिंद नार्वेकर यांच्या मनातले अद्याप त्यांच्या ओठावर आल्याचे कधी कानावर आलेले नाही. वास्तविक शिव्या आणि शाप द्यायचे तर त्या उद्धवजींना द्यायले हवेत पण ते घडत नाही याउलट भाजप असो वा सेनेतून राज ठाकरे किंवा नारायण राणे यांच्यासारखे कितीतरी नेते किंवा राजकीय दृष्ट्या महत्व कमी झालेले मनोहर जोशी यांच्यासारखे सेनेतले देखील सारे, शिव्या आणि श्याप या दोघांनाच सहन करावे लागतात. वास्तविक हे किती साधे राजकीय गणित आहे कि ज्या उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत १९९९- २००० च्या दरम्यान मातोश्रीवर आणि शिवसेनेत किंवा ठाकरे कुटुंबावर दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्यावर देखील पूर्णपणे पकड घेतल्यानंतर त्यांनी जे काय बदल घडवून आणलेत ते सारे निर्णय फक्त आणि फक्त त्यांचे स्वतःचे होते फारतर बाळासाहेब ठाकरे त्यांना तेवढ्यापुरते मार्गदर्शन करायचे पण अंतिम निर्णय घेणारे उद्धव ठाकरे हेच असतांना साऱ्यांचे वाट्टेल ते ऐकून घ्यावे लागते, घ्यावे लागले ते फक्त आणि फक्त संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांना, रश्मी ठाकरे यांच्याकडे देखील फारसे बोट दाखविल्या गेले नाही..

www.vikrantjoshi.com

नार्वेकर आणि राऊत हे हिरो कमी लोकांचे आहेत पण त्यांच्याकडे शक्ती कपूर, अमरीश पुरी, ललिता पवार, शशिकला, मदन पुरी, प्राण, कादर खान, के. एन. सिंह, बिंदू म्हणजे थेट खलनायक, दुष्ट पुरुष, सिनेमातल्या जीवन सारखे काडी लावणारे म्हणून बघणारेच खूप आहेत, असंख्य आहेत, अनेक आहेत, लाखो आहेत, बहुसंख्य आहेत, ते अनेकांच्या मनातले खलनायक आहेत, असे ऐकले आहे कि ज्या दिवशी त्यांच्या विरोधात उद्धव यांच्याकडे काहीतरी वाईट बोलल्या सांगितल्या जात नाही त्यादिवशी उद्धव ठाकरे यांना करमत नाही, चुकल्या चुकल्या सारखे वाटते. विशेष म्हणजे संजय राऊत मिलिंद नार्वेकर यांच्याविषयी जेव्हा केव्हा एखादा थेट उद्धव यांच्या कानात फुसफुस करतो, उद्धव ती निंदा आधी शांतपणे ऐकून घेतात नंतर सांगणाराला ते म्हंतातही कि तुमचे सांगणे कसे तंतोतंत योग्य आहे नंतर हळूच उद्धवजी आतल्या हवाबंद खोलीत जातात जेथे बाहेरच्या माणसाला काहीही ऐकू येत नाही, तेथे एका कोपऱ्यात उभे राहतात आणि जोरजोराने लाफ्टर क्लब चे सदस्य असल्यासारखे स्वतःशीच हसायला लागतात, तणावमुक्त होऊनच ते बाहेर येतात...

पुन्हा एकवार तेच अतिशय साधे गणित सांगतो कि अनेकांचे विरोध पत्करून देखील आल्या दिवसापासून राऊत आणि नार्वेकर यांचे महत्व कमी न होता झपाट्याने वाढलेले आहे याचा सरळ अर्थ असा त्यांचे बोलविते धनी उद्धव ठाकरे हेच आहेत त्यामुळे उद्धव यांच्याकडे त्या दोघांविषयी त्रागा व्यक्त करून काहीही साध्य होत नसते याउलट सांगणाऱ्याचे, राऊत किंवा नार्वेकर यांच्या विरोधात सांगणाऱ्यांचे महत्व कमी कमी होत जाऊन एक दिवस विरोधात बोलणारा थेट नारायण राणे यांच्या सारखा प्रभावी नेता जरी असला तरी फार मोठे राजकीय नुकसान त्या नेत्याचे होते, या दोघांचे वाकडे झाले, महत्व कमी झाले असे कधी झाले नाही, होणार नाही, याउलट जेवढा अधिक विरोध त्यांचे महत्व वाढत गेल्याचे दिसते. मला वाटते संजय राऊत व मिलिंद नार्वेकर या दोघांशी जुळवून घेणे त्यांनाच विश्वासात घेणे केव्हाही उत्तम थोडक्यात डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून सामना या वृत्तपत्राकडे तसेच नार्वेकर, राऊत या जोडगळीकडे बघणे अधिक चांगले.जर शिवसेनेत राहूनकाही मिळवायचे असेल किंवा विरोधकांना, भाजपा नेत्यांना जर उद्धव आणि सेनेकडून काही पदरात पाडून घ्यायचे असेल तर नार्वेकर राऊत यांच्याशी मैत्री ठेवणे केव्हाही डोक्यास तापदायक नाही उलट लाभदायक असते...
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

मराठवाड्यातले लायक आणि नालायक ४ : पत्रकार हेमंत जोशी


मराठवाड्यातले लायक आणि नालायक ४ : पत्रकार हेमंत जोशी 
मराठवाड्यातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकी आहे, युती आहे, आघाडी आहे पण ती अभद्र विषयांवर आहे, मराठवाड्यातल्या बहुतांश अधिकाऱ्यांचा किंवा कर्मचाऱ्यांचा कल अतिरिक्त पैसे मिळविण्याकडे अधिक असल्याने त्यांना त्यांच्या एकीचा युतीचा फायदा फक्त चांगले पोस्टिंग मिळविण्यासाठी होतो त्यानंतर त्यांना मिळणारी अतिरिक्त मिळकत केवळ स्वश्रीमंतीकडे वळविल्या जाते, मराठवाड्यातल्या स्थानिक नेत्यांना अधिकाऱ्यांना गोविंदभाई श्रॉफ व्हायचे नसते त्यामुळे जसे विदर्भातले मागासलेले तेच मागासलेपण मराठवाड्यातल्या सामान्य जनतेचाही नशिबी आलेले, दारिद्र्य बेकारी त्यांच्या पाचवीला पुजलेली...

नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची पुढली पिढी उच्चशिक्षित आहे, नशिबाने त्यांच्या बापाने त्यांच्यासाठी करोडो रुपयांची काळी कामे करून ठेवलेली आहे म्हणजे अमित देशमुख यांनी यापुढे काहीही केले नाही तरी त्यांच्या दहा पिढ्या आरामात घरी बसून खाऊ शकतील, अशावेळी मात्र अमित किंवा पंकजा जर बापाचेच अनुकरण करून राजकारण सत्ता केवळ पैसे मिळविण्याचे साधन म्हणून त्याकडे बघत असतील तर राज्य कोणत्याही पक्षाचे असो, मराठवाड्यातले शंकरराव चव्हाण किंवा तुकाराम मुंडे कोण, शोधणे अवघड ठरेल, अडचणीचे असेल. प्रत्येकाला अशोक चव्हाण व्हावेसे वाटते, शंकरराव व्हावे असे तीन चार हजार कोटी रुपयांची मालमत्ता जमा केल्यानंतर देखील जयदत्त क्षीरसागर यांना वाटत नाही आणि या अशा काळ्या पैशांच्या भरवशावर मोठी झालेली नेत्यांची अधिकाऱ्यांची पुढली पिढी कशी महाभयंकर असते हेही क्षीरसागर सारख्या नेत्यांनी आरसा समोर ठेऊन स्वतःला विचारायला हवे, त्यावर आत्मचिंतनही करायला हवे...

विशेषतः मराठवाडा विदर्भातल्या नेत्यांना अधिकाऱ्यांना आता अगदी उघड एवढेच सांगायचे बाकी आहे कि तुम्ही सारे पैसे मिळवा अधिकाधिक श्रीमंत व्हा पण ते करतांना अधिकाऱ्यांनी टी. चंद्रशेखर आणि नेत्यांनी मंत्र्यांनी नितीन गडकरी पॅटर्न राबवावा म्हणजे स्वतःसाठी पैसे नक्की मिळवायचे पण जराशी वेगळी पद्धत अवलंबून, त्यामुळे आपणही श्रीमंत तर होतोच पण देशाचा देखील विकास साधल्या जातो, वाटल्यास पैसे खाणार्या अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी गडकरी आणि चंद्रशेखर यांचे मार्गदर्शन घ्यावे म्हणजे नावही होते आणि माणूस श्रीमंत देखील होत जातो. या दोघांची पद्धत एकदम मस्त आहे, होती म्हणजे कामाचा दर्जा राखून त्यांचे वरकमाई करणे असते, ज्याचे जनतेला वाईट वाटत नसते. इतर नेते किंवा अधिकाऱ्यांना मात्र कामाच्या दर्जाचे काहीही घेणे देणे नसते, पाच रुपयाची चादर पाचशे रुपयांना खरेदी करणारे अधिकारी आणि सत्तेतले नेते, येथे या राज्यात मोठ्या प्रमाणावर फोफावले आहेत, त्यांना या राज्यातल्या व्यापाऱ्यांनी आणि दलालांनी रंडी करून सोडलेले आहे, राज्य हे लुटण्यासाठीच असते हाच रस्त्यावरच्या रंडीसारखा त्यांच्या डोक्यात कायम विचार असतो आणि आचरणात आणल्या जातो...

अलीकडे ' उद्याचा मराठवाडा ' या दैनिकाचा वर्धापनदिन विशेषांक वाचण्यात आला. त्यात मी किती आणि कसा चांगला समाजसुधारक त्यावर नांदेड जिल्ह्यातल्या साऱ्या आमदारांच्या मुलाखती वाचतांना मनाशी हसू येत होते कारण त्या साऱ्यांनी ज्यापद्धतीने त्यांनी केलेल्या विकासकामांची जंत्री सांगितलेली आहे ते वाचल्यानंतर मनाला वाटते, अरे, नांदेड जिल्ह्याचा या आमदारांनी कॅलिफोर्निया करून सोडलेला आहे कि काय, प्रत्यक्षात केलेल्या कामाचा दर्जा बघून हेच म्हणता येते कि विकासकामांवर जेवढे खर्च झाले तेवढेच अधिकाऱ्यांच्या ठेकेदारांच्या आणि नेत्यांच्या खिशात गेलेले आहेत. कंधार लोहा मतदार संघाचे आमदार प्रताप चिखलीकर म्हणतात कि अशोक चव्हाण सोडलेत तर एकही नेता माझ्या विरोधात बोलणारा नाही, एक मात्र चिखलीकरांचे चांगले आहे, पूर्वी त्यांची लॉयल्टी अगदी उघड विलासराव देशमुखांशी होती आणि ते म्हणतात, अखेरच्या श्वासापर्यंत माझी लॉयल्टी केवळ देवेंद्र फडणवीसांशी असेल, त्यांचे हे वाक्य मनाला पटते, अलीकडे असे नेते अभावाने आढळतात अन्यथा जवळपास सारेच कुंपणावर बसलेले जयदत्त क्षीरसागर असतात. स्वतःला अजातशत्रू म्हणवून घेणारे प्रताप चिखलीकर यावेळी अविरोध निवडून येतात कि काय...
www.vikrantjoshi.com

अशोक चव्हाण यांच्या आमदार पत्नीला आजतागायत कधी भेटणे झालेले नाही पण त्या वैयक्तिक आयुष्यात खूप विनोदी असाव्यात असे त्यांनी ज्या पद्धतीने अशोक चव्हाण यांना द ग्रेट लीडर म्हटलेले आहे, त्यावरून वाटते, त्या नेमक्या विनोदी कशा हे त्यांनी मानलेल्या त्यांच्या दिरांना म्हणजे आमदार अमर राजूरकर किंवा बिल्डर जयंतभाई शाह यांना विचारणे योग्य ठरेल. पण केवळ नांदेड शहराचा किंवा नांदेड जिल्ह्याचा राजकीय अभ्यास करतांना, अशोक चव्हाण यांना आम्ही हीन लेखणे नक्की योग्य ठरणारे नाही कारण त्यांची नक्की नांदेड शहरावर आणि जिल्ह्यावर देखील राजकीय पकड आहे आणि हे मी नेहमीच सांगत आलेलो आहे कि राज्यातले नेते हे हिंदी सिनेमातल्या डाकू सारखे असतात म्हणजे बडनेरा मतदार संघात थोडेफार टाकायचे आणि इतरत्र लुटपाट करून थोडेफार त्यातले खर्च करायचे त्यामुळे हिंदी सिनेमातले डाकू जसे अमुक एखाद्या गावात मसीहा म्हणून नावाजलेले पण इतर ठिकाणी लुटारू म्हणून गाजलेले असतात, बदनाम झालेले दरोडेखोर असतात तेच या राज्यातल्या बहुसंख्य नेत्यांचे, साऱ्याच राजकीय पक्षातल्या नेत्यांचे विशेषतः सत्ताधाऱ्यांचे, होऊन जाऊ द्या जेवढे वाटोळे या राज्याचे करायचे तेवढे, ना लाज ना लज्जा, बेशरम मंडळींच्या ढुंगणावर झाड उगवले तरी ते म्हणतात, सावली झाली सावली झाली...

नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार डी. पी. सावंत, विधान परिषदेवर निवडून गेलेले राम पाटील रातोळीकर किंवा अमरनाथ राजूरकर, नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार आणि आमचे मित्र हेमंत पाटील, देगलूर बिलोली विधान सभेचे आमदार सुभाष साबणे, किनवट विधान सभेचे प्रदीप नाईक, कंधार लोहा विधानसभेचे प्रताप चिखलीकर, मुखेड विधानसभेचे आमदार डॉ. तुषार राठोड, हदगाव विधान सभा मतदार संघाचे नागेश पाटील आष्टीकर, नायगाव विधान सभा मतदार संघाचे वसंतराव चव्हाण किंवा भोकर विधान सभा मतदार संघाच्या अमिता अशोक चव्हाण या सर्वांच्या मुलाखती वाचल्यानंतर असे वाटते जेव्हा केव्हा एखादा नांदेड जिल्ह्याचा फेर फटका मारायला निघेल, त्याला वाटेल आपण महाराष्ट्रातल्या आत्महत्या करणाऱ्या मराठवाड्यात नव्हे तर अमेरिकेतल्या एखाद्या प्रगत राज्यातून फिरतो आहे कि काय, पण जे कागदावर असते तसे प्रत्यक्षात अजिबात नसते हेही येथल्या मतदारांना चांगले ठाऊक आहे त्यामुळे त्यातल्या त्यात बरा कोण, मतदारांना जो वाटतो तो आमदार होतो, काही अमरनाथ राजूरकर यांच्यासारखे भाग्यवान असतात जे मागच्या दाराने अगदी अलगद विधान भवनात प्रवेश करून मोकळे होतात...
तूर्त एवढेच :


 पत्रकार हेमंत जोशी 

Saturday, 2 March 2019

मराठवाड्यातले लायक नालायक २ : पत्रकार हेमंत जोशी
मराठवाड्यातले लायक नालायक २ : पत्रकार हेमंत जोशी 
शेजारी राहणाऱ्या तरुणीने अचानक मागून येऊन तुम्हाला ह्ग केले तुम्ही रागावणार आहात का, पंक्तीला वाकून लाडू वाढणाऱ्या शेवंताला तू नको येऊ वाढायला, त्या तात्यांना पाठव म्हणण्याचा आगाऊपणा तुम्ही स्वप्नात तरी कराल का, ऐन दिवाळीत तुम्ही एकटेच घरी आहात नि कॉलेजातल्या मैत्रिणीने तुम्हाला म्हटले कि मी येऊन लावून देईन तुझ्या अंगाला उटणे, तुम्ही तिला चक्क नकार देऊन तुझ्या आईला पाठवून दे म्हणाल का, हो म्हणाल समजा कॉलेजातल्या मैत्रिणीची आई माधुरी दीक्षित असेल तर, बायकोच्या बहिणीने तुम्हाला एकांतात असतांना डोळा मारला, नेमकी भाऊबीज दुसरे दिवशी आहे, अशावेळी तुम्ही तिच्याकडून ओवाळून घ्याल का, नाही, याउलट तुम्ही तिला प्रेमाने विचाराल कि पाडवा कधी आहे तद्वत माझ्याकडे जर आपणहून दरदिवशी माननीय मुख्यमंत्री फडणवीसांविषयी चांगली माहिती आपणहून आणून दिली तर त्यावर 
मी न लिहिता, त्यांच्याविषयीच्या भानगडीची माहिती केव्हा येते, वाट पाहावी का, हो, वाट पाहतो आहे, गेली चार वर्षे, पण हाती काही येत नाही मग जे काय चांगले येते त्यावर लिहून मोकळा होतो, त्यांच्याविषयी वस्तुस्थिती सांगतो...

अलीकडे जालन्याला पशुसंवर्धन राज्यमंत्री हरहुन्नरी हसतमुख उत्साही लोकमान्य, लोकप्रिय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांनी भव्य दिव्य, अभूतपूर्व, अतिप्रचंड, आगळा वेगळा असा पशुधन महाकुंभ मेळावा मराठवाड्यातल्या जालन्याला भरविला होता, याठिकाणी मुख्यमंत्र्यांची आठवण यासाठी कि असा पशुधन कुंभ मेळा भरविल्या जावा हे सर्वप्रथम प्रगत उत्तम शेतकरी, सरकारी अधिकारी आणि अर्जुन खोतकरांचे खाजगी सचिव कल्याण औताडे यांच्या डोक्यात आले त्यांनी त्यावर प्लांनिंग केले आणि थेट आपल्या मंत्र्याकडे ते मांडले, खोतकरांना पशुधन मेळाव्याची हि भव्य दिव्य कल्पना अतिशय आवडली, ते उठले त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना गाठले, पशुधन मेळाव्याची संकल्पना त्यांनी सादर केली...

www.vikrantjoshi.com

कदाचित सांगून तुम्हाला खोटे वाटेल किंवा ऐकल्यानंतर तुम्ही एक उंच उडी घ्याल, एकही क्षणाचा विचार न करता, बऱ्या वाईट परिणामांचा अजिबात विचार न करता कारण सेनेचे खोतकर आणि भाजपाचे प्रभावी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात विस्तव देखील जात नाही हे तुम्हाला सांगणे म्हणजे आजही सामना चे संजय राऊत लग्नाचे वाटतात, एवढे तरुण दिसतात हे त्यांच्या पत्नीला सांगण्यासारखे, थोडक्यात खोतकर करताहेत ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे पाऊल आहे, विशेषतः दुखकाळग्रस्त विदर्भ मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी पशुधन मेळावा म्हणजे उत्पन्नाचे साधन ठरणार आहे हे चाणाक्ष अभ्यासू मुख्यमंत्र्यांच्याएका क्षणात लक्षात आले, अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे आहे त्यामुळे याचे क्रेडिट सेनेला जाऊ शकते असा कोणताही संकुचित विचार न करता किंवा खोतकरांना या मेळाव्याची परवानगी दिल्यानंतर रावसाहेब दानवे यांना नेमके किती वाईट वाटेल त्यावर न विचलित होता पवारांच्या भाषेत शेतकरी नसलेल्या पण शेतकऱ्यांसाठी वाट्टेल ते करण्याची मानसिकता असलेल्या मुख्यमंत्र्यांनी, फडणवीसांनी तेथल्या तेथे अर्जुन खोतकरांना परवानगी तर दिलीच पण निधीही उपलब्ध करून दिला, हि इज ग्रेट, एका राज्यमंत्र्याने आणि त्याच्या खाजगी सचिवाने, विशेष म्हणजे दोघेही मराठवाड्यातले, उत्पन्न वाढीचे मिरॅकल घडवून आणले, देशभरातले तब्बल सात लाख शेतकरी या बहुमोल अनमोल पशु मेळाव्याला भेट देऊन मोकळे झाले, पशुपालन कसे वाढवायचे आणि त्यातून कसे उत्पन्न मिळवायचे विशेषतः अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या मेळ्यानिमित्ते नेमके कळले आणि ते कामाला लागले, बघा यापुढे या राज्यात पशुपालन पशुसंवर्धनातही आम्ही कशी झेप घेतो ते, सलाम अर्जुन खोतकरांना ज्यांनी केवळ एक राज्यमंत्री असूनही हि क्रांती घडवून आणली...

मागला विषय पुढे नेतो, मराठवाड्यातल्याच परभणीच्या मेघना बोर्डीकर यांच्याविषयी नेमके येथे सांगायचे झाल्यास सध्या त्या आणि त्यांचे लाडके पप्पा भाजपामध्ये आहेत जेथे नेमका भाजपाचा अजिबात फारसा प्रभाव नाही, रावसाहेब दानवे किंवा मंत्री बबनराव लोणीकर यांना कधी असे का वाटले नाही कि परभणी जिल्ह्यात भाजपाचे काम विस्तारायला हवे, असे त्यांना कधी वाटले नाही त्यामुळे शिवसेनेने तेथे कधी भाजपाचे महत्व वाढूच दिलेले नाही, थोडेफार राष्ट्रवादीला या जिल्ह्यात स्थान आहे पण मेघना यांनी यावेळी खासदारकीची निवडणूक येथून लढवावी पण अपक्ष म्हणून नव्हे तर त्यांनी रीतसर शिवसेनेचे तिकीट घ्यावे आणि जिंकून यावे कारण विद्यमान शिवसेनेच्या खासदारांवर सेनेचे नेते आणि मतदार प्रचंड नाराज असल्याने 
मेघना यांनी या नाराजीचा फायदा घ्यावा, भाजपमधून शिवसेनेत यावे आणि सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवून मोकळे व्हावे, मला वाटते हे असेच घडेल, सेनेचा खासदार मेघना बोर्डीकर यांच्या स्वरूपात नक्की एकाने वाढेल....
क्रमश:


 पत्रकार हेमंत जोशी