Wednesday, 27 February 2019

तोंडात बोटे ढुंगणाला काटे : पत्रकार हेमंत जोशी
तोंडात बोटे ढुंगणाला काटे : पत्रकार हेमंत जोशी 
काही माणसे फार मोठ्या मनाची असतात. मला याठिकाणी एक प्रसंग आठवला, डोळ्यासमोर उभा राहिला ( प्रसंग डोळ्यासमोरच उभा राहतो ढुंगणासमोर नव्हे )आजही आमच्या विदर्भातले सारे पुरुष त्यांच्या त्यांच्या बायकांच्या बाबतीत, आपली ठेवतात झाकून आणि दुसऱ्याची बघतात अगदी वाकून वाकून म्हणजे घरातल्या तरुण स्त्रियांच्या बाबतीत त्यांचे खुजे संशयी मागासलेले अतिशय आणि बुरसटलेले विचार आहेत, म्हणजे एकाचवेळी त्यांना स्वतःचा माल कोरकारकरीत हवा असतो आणि दुसऱ्याची कशी वापरायची याकडे त्यांचा कल असतो. पण तब्बल ४०-४५ वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा आमच्याकडे पुरुषांचे खूपच जुनाट विचार स्त्रियांच्या बाबतीत होते, जेव्हा विदर्भातही अप्रत्यक्ष खुबीने कौमार्य तपासून तरुणींशी विवाह केल्या जात असे त्याकाळी घडलेला एक किस्सा असा कि आमच्याच जिल्ह्यातल्या एका स्त्री डॉक्टरला गावातल्या गुंडांनी पळवून नेले होते तिच्यावर बलात्कारही देखील करण्यात आला होता...

पुढे पोलिसांनी तिला शोधले, घरी नवर्याकडे आणून सोडल्यानंतर आता तिचे काही खरे नाही असे तिच्या गावातल्यांना वाटले, केवळ आत्महत्या करणे तिच्या हातात आहे असेच जेव्हा सारे कुजबुजायचे तेव्हा ' घर ' सिनेमातल्या विनोद मेहरासारखे तिला नवऱ्याने सन्मानाने घरात घेतले, पुढे व्यवस्थित म्हणजे जणू काही घडलेच नाही पद्धतीने मानसन्मान दिला आणि आनंदाने संसार केला. वास्तविक हे असे विदर्भात घडायला हवे, संकुचित विचारसरणी सोडून स्त्रियांना व्यभिचारी होण्या नव्हे तर क्रांतिकारी म्हणून पुढे येण्यासाठी नक्की सहकार्य करायला हवे. हा प्रसंग येथे मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीतून आठवला. आघाडी आणि युती मध्ये केवढी मोठी तफावत, त्यातून जाणवले, एकाचवेळी तोंडात बोटे व ढुंगणाला आश्चर्याने काटे आले. थोडक्यात, जे युतीने केले ते आघाडीकडून घडत नाही, युतीचे नेते पुरावे हाती आले कि अधिकाऱ्यांना किंवा आघाडीच्या मंत्र्यांना अक्षरश: रस्त्यावर फरफटत आणायचे त्याच्या नेमके उलटे, आघाडीच्या नेत्यांकडे जे अधिकारी युतीशी लॉयल आहेत किंवा जे युतीचे मंत्री आहेत, त्यांचे पुरावे दिले तरी आघाडीचे नेते काहीही करायला तयार नाहीत, मूग गिळून बसलेले आहेत, जणू काही आघाडीच्या नेत्यांची युतीबाबत भूमिका उदाहरणातल्या डॉक्टरसारखी असते, त्यामुळे युतीचे सुभाष देसाई यांच्यासारखे भ्रष्ट मंत्री आजही मोकाट आहेत. अपवाद धनंजय मुंडे यांचा, ते मात्र त्यांच्याकडे माहिती दिल्यानंतर त्यावर सभागृहात आणि बाहेरही पोटतिडकीने बोलतात पण अनेकदा त्यांच्या नावाचा आणि त्यांच्याकडे आलेल्या पुराव्यांचा काही दलाल काही पत्रकार गैरफायदा घेतात, पैसे मिळवितात, त्यावर आमचे लाडके मुंडे,त्यांनी सतत सावध असणे अत्यावश्यक ठरते...

www.vikrantjoshi.com

भ्रष्टाचाराचे काही गंभीर पुरावे आम्हा पत्रकारांकडे आले म्हणजे त्यावर लिहून अनेकदा फारसे काही घडत नसते, तेवढ्यापुरते वाचल्या जाते आणि दुसरे दिवशी तेच वृत्तपत्र घरा घरातून लहान मुलांच्या शी साठी वापरल्या जाते म्हणून पुरावे आमच्याकडे आलेत कि ते आम्ही एकतर तोडपाणी न करणाऱ्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना सभागृहात आवाज उठविण्यासाठी आणि योग्य ठिकाणी तक्रारी करून भ्रष्ट नेत्यांना अधिकाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी पोहोचते करतो, याचा अतिशय चांगला वापर विशेषतः विरोधात असतांना देवेंद्र फडणवीसांसारख्या नेत्यांनी केला आणि त्यांना त्यातून सत्तेत येण्यासाठी फार मोठी मदत झाली. माझ्यासारखा शोधपत्रकारिता करणारा देवेंद्र फडणवीस, माधव भंडारी इत्यादींकडे आजही आदराने याचसाठी बघतो कि या चार दोन नेत्यांकडे त्यांच्या विरोधकांचे अति करप्ट अधिकाऱ्यांचे पुरावे दिल्यानंतर हे असे नेते ते पुरावे प्रभावीपणे जनतेसमोर आणायचे, सभागृहात मांडायचे, विरोधकांना चारी बाजूंनी अडचणीत आणायचे, विरोधातले भले भले मंत्री नेते किंवा बदमाश सरकारी अधिकारी थेट लोटांगण घालून, आम्हाला वाचवा, सांगतांना मी माझ्या डोळ्यांनी बघितले आहेत, लाचार होऊन गयावया करतांना बघितलेले आहेत त्यातूनच माझी भीती या मंडळींविषयी निघून गेलेली आहे. थोडेसे विषयांतर करतो, पण माधव भंडारी यांचे लढाऊ वागणे त्यातून माझ्या हे लक्षात आलेले आहे कि सतत पायपीट करणाऱ्या माधव भंडारी 
यांना भाजपाने अजिबात विधान परिषदेवर घेऊ नये याउलट त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातून कोणत्याही, एखाद्या मतदार संघात उभे करावे ते नक्की निवडून येतील, रत्नागिरीकरांचे ते कसे आणि किती लाडके, मी त्यावर किमान शंभर उदाहरणे तोंडपाठ सांगू शकतो. अर्थात माझ्या सांगण्याने काही घडले असते तर आमच्या राजन पारकरचे केव्हाच जमले असते आणि पत्रकार मामा काकिर्डे यांचे दोन तीन वेळा तरी झाले असते. म्हणजे माझी शिफारस इनोसंटली पण ती भंडारी यांना अडचणीची ठरू शकते. उगाचच त्यांच्यावर चार चांगल्या ओळी लिहिणे त्यांना अडचणीचे ठरू शकते..

माझ्या या व्यक्तिमत्वाचा वापर मंत्रालय वार्ताहर संघात चांगल्या पद्धतीने त्यांच्या निवडणुकीत केल्या जातो. म्हणजे जो निवडून येऊ शकतो त्याला मतदान करण्यासाठी आवाहन करण्याची जबाबदारी माझ्याकडे असते त्यामुळे निवडून येणारा हमखास पडतो आणि मित्रवर्य दिलीप सपाटे अध्यक्ष होतो कारण प्रचार त्याच्या विरोधकांचा मी केलेला असतो. सेना भाजप युतीचा असा एकही मंत्री नाही ज्याचे त्यांना गंभीर अडचणीत आणणारे पुरावे माझ्याकडे नाहीत, पंकजा सारख्या महिलांचे भ्रष्टाचारातले धैर्य बघून तर अतिशय किळस येते पण त्यावर आघाडीचे आवाज उठवतील खात्री नाही, बघूया या मंत्र्यांच्या बाबतीत माझी कधी सटकते ते...
तूर्त एवढेच.


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment