Thursday, 21 February 2019

ढासळलेला आमदारांचा मनोरा : पत्रकार हेमंत जोशी


ढासळलेला आमदारांचा मनोरा : पत्रकार हेमंत जोशी 
मुंबईतील आमदारांच्या निवास स्थानांपैकी एक नरिमन पॉईंट परिसरातील मनोरा आमदार निवास, १९९० च्या दशकात, दरम्यान मनोरा आमदार निवासाच्या साऱ्या विंग्स बांधून पूर्ण झाल्या अवघ्या २५ मनोरा वर्षात पाडण्यातही आले. श्री निलेश मदाने हे विधान भवनात शासकीय सेवेत नोकरीला आहेत ते येथे रुजू होण्यापूर्वी पत्रकार होते, काही काळ याच मनोरा आमदार निवासात राहायला असल्याने त्यांनी अलीकडे मनोऱ्याच्या आठवणी अप्रतिम शब्दात रेखाटल्या आहेत. तुम्ही याठिकाणी तो लेख वाचला आहेच. अत्यंत महत्वाचे म्हणजे जे मनोरा केवळ २७-२८ वर्षांपूर्वी बांधल्या गेले ते पाडावे लागले कारण इमारती धोकादायक झालेल्या होत्या...

नित्कृष्ट बांधलेले मनोरा व त्यानंतर देखभाल केल्या गेलेले मनोरा, दोन्हींची देखभाल जबाबदारी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे होती, राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते कसे व किती नालायक याचे हे ज्वलंत उदाहरण, टुकार पद्धतीने बांधल्या गेलेले मनोरा आणि भिक्कार पद्धतीने देखभाल केल्या गेलेले मनोरा. पैसे कशा वाईट पद्धतीने अधिकारी, अभियंते, मंत्री आणि कंत्राटदार अभद्र युती करून खातात आणि एवढे गंभीर गुन्हे कारणही मोकाट फिरतात त्यावर पाडण्यात आलेले मनोरा आमदार निवास हे बोलके उदाहरण. विशेष म्हणजे राज्याच्या विविध भागातून याठिकाणी वास्तव्याला असलेल्या ज्या ज्या आमदारांनी या इमारतीच्या बांधकामावर देखभालीवर पुरावे दिले, तक्रारी केल्या, सभागृहात प्रश्न मांडले म्हणजे थेट आमदारांच्या जीविताचा गंभीर प्रश्न अनेकदा पुढे येऊन देखील एखादा दुसरा आमदार सोडला बहुतेक तक्रार करणाऱ्या आमदारांचे केवळ पैसे खाऊ घालून वेळोवेळी तोंडे बंद करण्यात आलीकिंवा बंब, वाघमारे या अशा आवाज उठविणाऱ्या आमदारांना आणि राजू खरे सारख्या कंत्राटदारांना या रॅकेट ने ब्लॅकमेल करणारे म्हणून विनाकारण बदनाम केले...

शासनाला पर्यायाने जनतेला लुटणारे हे बांधकाम खाते, करोडो रुपये खर्च होऊन देखील ना कोणाला सजा ना कोणाला शिक्षा, यापुढे कोणत्याही इमारतीचे बांधकाम करतांना किंवा देखभाल करतांना आपले काहीही वाकडे होत नाही याची संबंधित मंडळींना आता खात्री पटलेली असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधलेल्या प्रत्येक इमारतीत प्रचंड गोंधळ असतो हे समजूनच जनतेने पुढे जावे. पुढे जाऊन आणखी एक महत्वाचे सांगतो, जसे अलिकडल्या काळात म्हणजे अगदी काही वर्षांपूर्वीचे मनोरा आमदार निवास योग्य बांधकाम न केल्या गेल्यामुळे वरून या इमारतीच्या देखभालीवर केवळ करोडो रुपयांचे खर्च दाखवून प्रत्यक्षात अजिबात या इमारतींची देखभाल न केल्या गेल्याने जसे मनोरा हे आमदारांचे निवासस्थान पाडण्यात आले तसे पुढल्या केवळ काही वर्षात याच दरम्यान बांधल्या गेलेले विधान भवन आणि थेट मंत्रालयासमोरील प्रशासकीय इमारत नक्की पाडावे लागणार आहेत....

मुंबईतील याच नरिमन पॉईंट परिसरातील विधान भवन आणि प्रशासकीय इमारत या दोन्ही इमारतींची अवस्था म्हणजे हळदी कुंकवाला जमलेल्या खानदानी स्त्रियांमध्ये चुकून जर फुटपाथवर उभ्या राहून विद्रुप आणि रोगट शरीरयष्टीच्या दोन वेश्या बसल्या घुसल्या तर जसे दिसेल, दृश्य असेल ते मनोरा पाठोपाठ या दोन इमारतींचेही झालेले आहे. जगात सुप्रसिद्ध नामवंत देखणा श्रीमंत परिसर म्हणून ओळखल्या जाणारा हा उंचच उंच इमारती असलेला आणि विविध आघाडीच्या उद्योगपतींच्या कार्यालयांनी नटलेला हा परिसर. येथे स्वतःच्या मालकीचे कार्यालय असणे प्रतिष्ठेचे मानले जाते. मी अजिबात प्रतिष्ठित नाही पण माझ्याही मालकीचे, वृत्तपत्राचे येथेच मुख्य कार्यालय आहे. या अशा देखण्या रुबाबदार परिसरात फुटपाथवरच्या वेश्येन्सारख्या विधान भवन आणि प्रशासकीय भवन या दोन इमारती. या दोन्हीचाही बाबतीत नेमके तेच, एकतर केल्या गेलेले बांधकाम बऱ्यापैकी नित्कृष्ट वरून वर्षानुवर्षे देखभालीवर थातुरमातुर खर्च करून, मोठी रक्कम हडपणारे बांधकाम खात्याचे फार मोठे रॅकेट, त्यामुळे पुढल्या काही दिवसात हेच ऐकायला मिळेल कि या दोन्ही इमारती पाडायला घेतल्या आहेत...

जाऊद्या, वाईट तेवढे मांडण्यासाठी पुढे मी आहेच, मनोरा आमदार निवासाच्या नेमक्या भानगडी नक्की मी मांडणार आहेच तत्पूर्वी निलेश मदाने यांनी जागवलेल्या मनोरा आमदार निवासाच्या आठवणी वाचल्या नसतील तर पुन्हा वाचा, लेखाची भट्टी छान जमलेली आहे. मी तर नेहमीच सांगत आलेलो आहे कि जेवढे काय या राज्यातले वाईट बघायचे असेल, त्यासाठी इतरत्र कुठेही जायची गरज नाही, कोणत्याही आमदार निवासात मुक्काम करा. तुमच्या तोंडून नक्की हेच बाहेर पडेल कि यापेक्षा तर रस्त्यावर धंदा घेणाऱ्या वेश्यांचा परिसर अधिक चांगला असतो, नरक एकदा का होईना येथे राहून तुम्ही अनुभवायला हवा. किळसवाणे लाजिरवाणे वातावरण बघायलाच हवे....
तूर्त एवढेच.


 पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment