Friday, 15 February 2019

होय ! फडणवीसांनी बुडविला महाराष्ट्र माझा ५ : पत्रकार हेमंत जोशी


होय ! फडणवीसांनी बुडविला महाराष्ट्र माझा ५ : पत्रकार हेमंत जोशी 
ज्यांनी भाजपा संघ उभा केला पुढे नेला सत्तेत आणला दिनरात विनापेक्षा काबाडकष्ट करून घडविला वाढविला त्या बुजुर्ग नेत्यांकडे कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही, नरेंद्र मोदी असोत अथवा त्यांच्यासारखे येथेही या राज्यातले नेते असोत, ज्यांनी पाया उभा केला त्यांना लाथाडणे म्हणजे ज्या प्राचीन हिंदू संस्कृतीचे तुम्ही गोडवे गात आलेला आहेत त्या महान हिंदू संस्कृतीला तिलांजली देण्यासारखे, झपाट्याने पुढे जाणाऱ्या कोणत्याही पक्षातल्या नेत्याने स्वतःचा ' अजित पवार ' कधीही करवून घ्यायचा नसतो, कार्यकर्त्यांची नेत्यांची दुसरी फळी नक्की उभी करावी पण ज्यांनी तुम्हाला पुढे नेले, तुमच्यातले नेतृत्व जन्माला घातले त्यांना कधीही कोणीही विसरता कामा नये, हे एक प्रकारे खाल्या मिठाला न जागण्यासारखे असते...

श्रीमान उद्धव ठाकरे यांना मात्र त्यावर १०० टक्के गूण कारण फडणवीस मंत्री मंडळात त्यांनी बहुसंख्य बुजुर्ग शिवसेना नेत्यांचा आदर करून मंत्रिमंडळात स्थान दिले, असे दोन मंत्री मला आणि उद्धवजींना माहित आहेत कि त्या दोन मंत्र्यांनी आजतागायत आणि आजही पोटच्या नालायक मुलांना हाताशी धरून कित्येक भानगडी केल्या, करताहेत, प्रचंड त्यांनी पैसे मिळविले, मिळविताहेत तरीही उद्धवजींनी मंत्रिमंडळ बदल आणि विस्तार होऊ दिला नाही...विशेष म्हणजे त्या बुजुर्ग मंत्र्यांना देखील घरचा रास्ता दाखविला नाही पण त्यांना आणि मंत्रिमंडळातील साऱ्याच बुजुर्ग मंत्र्यांना उद्धवजींनी अगदी बोलावून सांगितले कि यावेळी जे काय करायचे आहे तेवढे लुटून न्या, भानगडी तर तुम्ही करता आहातच पण या पुढे तुम्हाला मंत्रिमंडळात स्थान नसेल. ज्येष्ठ नेत्यांचा मानसन्मान राखताना सेनेचे मोठे नुकसान झालेले आहे विस्तार आणि बदल न घडल्याने थेट मतदारातून निवडून आलेले येणारे असंख्य आमदार उद्धवजींवर प्रचंड नाराज आहेत. कोणाच्याही नाराजीचा अजिबात विचार न करता अलिकडल्या काळातले हे पहिले उदाहरण असे आहे कि ज्या मंत्रिमंडळाचा ते अस्तित्वात आल्यानंतर विस्तार किंवा फेरबदल झालेला नाही, असे निदान मी पत्रकारितेत आल्यानंतर कधीही घडलेले नाही. मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदल करण्याचे मुख्यमंत्र्यांच्या मनात होते पण उद्धवजींना मात्र फेरबदल आणि विस्तार करणे डोकेदुखीचे ठरेल, वाटले असावे, त्यांनी त्यामुळे कदाचित त्यावर कधीही हिरवी झेंडी दाखविली नाही, मला माहित नव्हते कि कडव्या उद्धवजींना हिरव्या रंगाचा मनातून एवढा राग आहे...

मच्छरांचे चुंबन घेणे जसे शक्य नाही, गाढवाला थोपटून आपलेसे करणे जसे शक्य नाही, प्रयत्न करून बघा ते लगेच दूर पळते, माशीच्या तोंडात ताप बघण्यासाठी थर्मामीटर देणे जसे शक्य नाही, घोड्याच्या ढुंगणाला जसे झंडू बाम चोळणे शक्य नाही, जंगलात जाऊन सिंहिणीला कुशीत घेऊन झोपणे जसे कोणालाही शक्य नाही, पत्रकार राजन पारकर यासी याजन्मी जशी लग्नासाठी मुलगी पसंत पडणे शक्य नाही, पत्रकार उदय तानपाठक यांनी माझ्यासहित चार लोकांना पंचतारांकित हॉटेल मध्ये नेऊन जेऊ घालणे जसे शक्य नाही, माकडाच्या मागून फुंकर मारून वरून त्याला, आता कसे वाटते, असे विचारणे जसे शक्य नाही तसे अमुक एखाद्या नेत्याला तुम्ही अमुकच केले पाहिजे सांगून उपयोगाचे नसते. शिवसेनेत डॉ. सुजित मिणचेकर यांच्यासारखे मंत्री होण्यासाठी इच्छुक असेलेले असे कितीतरी पण उद्धवजींच्या मनात नसल्याने या साऱ्या इच्छुकांचे ' लावून न आणलेल्या सांडासारखे ' झालेले आहे, ते जागच्या जागी मनातल्या मनात अस्वस्थपणे चरफडताहेत, Sad सॉंग्स गाऊन गाऊन कसेतरी दिवस काढताहेत...
क्रमश:

भाग १ ते ४ वाचावे असल्यास कृपया www.virkantjoshi.com वर क्लिक करावे ... धन्यवाद 


 पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment