राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ३ : पत्रकार हेमंत जोशी
मित्रहो, कमळाचे फुल जोपर्यंत देठावर असते आणि उमललेल्या स्थितीत असते, तोपर्यंत जल आणि सूर्य त्याचे मित्र असतात. पण देठापासून कमळाचे फुल तुटले किंवा आपल्या जागेवरून ढळले कि जल आणि सूर्य दोन्ही गोष्टी कमळाला त्रासदायकच ठरतात. येथे या राज्यात ज्यांचे चिन्ह कमळ आहे आणि कमळाशी संघाशी संबंधित किंवा तेथे मोठे झालेले जे सत्तेत बसलेले आहेत ते सारे भाजपावाले गरजू संघस्वयंसेवकांपासून चार हात कायम देय उभे असतात. काली टोपी घालून जर एखादा या सत्तेतल्या नेत्यांकडे काम घेऊन आला तर त्यांना त्या स्वयंसेवकांची लाज वाटते...
मंत्रालयात संघस्वयंसेवकांची कामें तत्परतेने व्हावीत म्हणून संघ मुख्यालयाने थेट मुख्यमंत्री कार्यालयात श्रीकांत भारतीय यांना बसवून ठेवलेले आहे, मला श्रीकांत भारतीय यांनी ते मुख्यमंत्री कार्यालयात ठाण मांडून बसल्यानंतर किती संघ स्वयंसेवकांना सहकार्य केले अत्यंत महत्वाचे म्हणजे त्यांना भेटायला येणारे संघस्वयंसेवक किती होते किंवा आहेत आणि दलाल किती होते, खाजगी, कमाईचे कामें घेऊन येणारे किती, जरा बसविलेले कॅमेरे पुरावा मानून दाखवून द्यावे. जे संघ स्वयंसेवक हिम्मत करून थेट मुख्यमंत्र्यांना भेटतात केवळ त्यांचीच कामें होतात तेही कोणतीही आर्थिक अपेक्षा न ठेवता, अशी माझी खरी माहिती आहे. सत्तेतल्या मंडळींना पापाचे छाती पैसे आज भाळेलही गोड वाटत असतील पण त्यांनी आपली अवस्था देठावरून दूर केलेल्या कमळासारखी स्वतःच करवून घेतली आहे कारण कमळाच्या माध्यमातून सत्तेत बसलेले सारे, कमळ येथे या राज्यात ज्यांच्यामुळे फुलले त्या देठरूपी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात उभे आयुष्य, सारी हयात घालविणार्या संघस्वयंसेवकांनाच विसरले आहेत, त्यांना मुद्दाम दूर ठेवले आहे. येथे ठळकपणे लक्षात यावे म्हणून श्रीकांत भारतीय हे उदाहरण दिले इतर सारे श्रीकांत भारतीय पद्धतीने संघात काम करणारे पण सत्तेत ऍक्टिव्ह असलेले असेच आहेत त्यांना जणू काळ्या आणि भगव्या टोप्यांची लाज वाटते...गडकरी असोत किंवा असे एकही सत्ताधीशाचे दालन दाखवा जेथे या राज्यात कमळाची सत्ता आहे आणि तेथे संघ माध्यमातून आलेल्यांचा वावर आहे किंवा त्यांची कामें केल्या जातात, अगदीच अपवादाने, फारतर हे म्हणता येईल आणि हे मी म्हणत नाही या राज्यातले सारेच स्वयंसेवक म्हणतात कि मंत्रालयात गेले किंवा कोणत्याही भाजपा आमदाराकडे खासदाराकडे गेले कि जे हवेत ते तेथे दिसतच नाहीत, मात्र संघेतर मंडळींचा दलालांचा त्यांच्या आसपास अक्षरश: सडा पडलेला असतो, भगव्या आणि काळ्या टोप्यांपेक्षा पांढर्या टोप्या घालणाऱ्या मंडळींचा वावर अधिक आहे आणि त्यांनाच थेट आत घेतल्या जाते. त्यांचीच कामें होतात, कामें केली जातात...
www.vikrantjoshi.com
कुणा एकाला अमुक नेत्याला येथे मला दोष द्यायचा नाही पण ज्यांच्या ज्यांच्या खांद्यावर बसून आपण मोठे झालो त्यांना बाजूला सारायचे आणि ज्यांना विरोध करून मोठे झालो त्यांना कवेत घ्यायचे, संघाचे संस्कार बहुदा येथे कमी पडले असावेत असे दिसते. फार दूर मी जात नाही आणि पुराव्यांशिवाय कधी बोलत नाही. या देशभरात मंत्री नितीन गडकरी यांच्या अगदी जवळचे महेश बाल्दी यांच्यासारखे अगदी मोजके पंचवीस माणसे आहेत, जे जवळपास सारेच दलाल म्हणून काम करतात, जसजसे गडकरी वाढले तसे हे पंचवीस आणि गडकरी कुटुंब अधिकाधिक खूप श्रीमंत होत गेले, आश्चर्य म्हणजे या पंचविसातला सोडा पण त्यानंतरचेही जे शंभर गडकरींना बऱ्यापैकी जवळचे आहेत त्या जयंत म्हैसकर यांच्यासारखा त्यातला एकही कधीही संघ शाखेत गेलेला नाही, संघाचा साधा तो स्वयंसेवक देखील नसतो किंवा त्याचा भाजपाशी देखील अनेकदा संबंध नसतो, त्यामुळे मला फक्त संघाने ज्यांना मोठे केले त्या नितीन गडकरींचे संघावरचे हे बेगडी प्रेम नेहमी अस्वस्थ करीत आले आहे. गडकरी हे केवळ कंत्राटदारांचेच मंत्री आहेत असे जे नेहमी दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी सांगतात ते त्यांचे बोलणे वायफळ नसते, हवेत सोडलेला बाण नसतो तर त्यांचे हे तंतोतंत खरे सांगणे पुराव्यातून बाहेर आलेले
असते...
माझी हि टीका संघ आणि भाजपाने सकारात्मक घ्यावी, प्रबोधन व्हावे आणि संघ भाजपामधले जे वास्तवातले स्वयंसेवक किंवा कार्यकर्ते आहेत त्यांची कामें व्हावीत ते आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मोठे करणे नेत्यांचे काम आहे. दलाल आणि रांडा यांच्यात अजिबात फरक नसतो. जे दलाल कालपर्यंत आघाडीला जवळचे होते आज तेच युतीला जवळचे आहेत, रांडांचा कोणी एक यार पर्मनंट नसतो, स्वयंसेवक किंवा कार्यकर्तेच शेवटी संकटात धावून येतात, पक्षबांधणी अपेक्षाविरहित मनाने करीत असतात...
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी
No comments:
Post a comment