Sunday, 23 December 2018

पुन्हा भय्यू महाराज : पत्रकार हेमंत जोशी
पुन्हा भय्यू महाराज : पत्रकार हेमंत जोशी 

ज्यांच्या मृत्यू पश्चातही भक्तांची संख्या वाढत जाते ते खरे संत जसे शेवगावचे गजानन शिर्डीचे साईबाबा अगदी अलिकडल्या बेळगावच्या कलावती देवी किंवा स्वामी समर्थांसारखे असे कितीतरी. भामट्या लबाड लुबाडू लुच्चा लफंग्या बाबांना गजाआड होण्याची करण्याची एक अप्रतिम लाट या देशात अलीकडे आली पसरली त्यामुळे एक बरे झाले अनिरुद्ध किंवा नरेंद्र सारखे पेव फुटलेले बुवा अचानक दिसेनासे झाले आहेत अगदी गंमतीने सांगायचे झाल्यास, मुंबईत अतिक्रमण विरोधी पथकाच्या महापालिकेच्या गाड्या दुरून जरी दिलेल्या कि फेरीवाले जसे मिळेल त्या वाटेने आणि हातात येईल ते घेऊन पळत सुटतात तसे या बुवांचे निदान या राज्यात तरी झालेले आहे....

या असल्या भंपक बुवांनी हवी तेवढी देवभोळ्या मजबूर भक्तांची लूट केली आहे, हि मात्र वस्तुस्थिती आहे. खऱ्या संतांचे नाव अलिकडल्या या आधुनिक बुवांनी खराब केले आहे कारण या अशा थर्डग्रेड बुवांना फक्त पैसे तेवढे मिळवायचे असतात आणि अडचणीत सापडलेल्या तरुण महिला भक्तांना शारीरिक जुलूम करून त्यांना ओरबाडायचे लुटायचे असते. बहुतेक सारेच आसाराम असतात पण पैसा मिळविणे हा तर नक्की या बुवांचा प्रमुख उद्देश असतो. भय्यू महाराज फार काही वेगळे होते असे नाहीच म्हणजे पैसे आणि ऐय्याशी हेच त्यांचेही ध्येय होते, त्यात त्यांचाही आसाराम झाला, आसाराम तुरुंगात गेले, भय्यू महाराज मात्र तुरुंगात जाण्याआधीच आत्महत्या करून मोकळे झाले....

मुंबईच्या मैत्रेयी ग्रुपच्या सर्वेसर्वा श्रीमती वर्षा सत्पाळकर यांना तर सर्वात आधी पोलिसांनी न्याय मिळवून यासाठी द्यावा कि त्यातून त्या भय्यू महाराज आणि विनायक सारख्या कंपूने त्यांना जे खुबीने करोडो रुपयांनी लुटले, त्यांना किंवा त्यांच्याकडे लोकांच्या असलेल्या पैशांना चुना लावला ते कोट्यवधी रुपये जे महाराजांकडे जमा आहेत किंवा महाराजांच्या माध्यमातून चुकीच्या ठिकाणी गुंतवलेले आहेत ते निदान परत मिळालेत तर वर्षा सत्पाळकर यांना लोकांच्या ठेवी परत करता येतील आणि त्यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेले आर्थिक गुन्हे मागे घेऊन उर्वरित आयुष्य त्यांना आणि त्यांच्या मुलांना सुखाने जगता येईल. अर्थात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या चांगल्या वृत्तीच्या पोलिसांनी त्यासाठी मनापासून लक्ष घालणे गरजेचे आहे....

सहा महिने आधी जेव्हा भय्यूजी यांनी आत्महत्या केली तेव्हा आणि त्याआधी काही महिने काही वर्षे मी जे भय्यू महाराज यांचा बुरखा फडात होतो हळूहळू तेच आता बाहेर येऊ लागले आहे, मी लिहीत असतांनाच जर भय्यूजी यांचीही आसाराम पद्धतीने चौकशी झाली असती तर सामान्यांची झालेली होणारी लूट आणि तरुणींची होणारी मोठी फसवणूक तेथेच थांबली असती. आपल्या येथे अनिरुद्ध किंवा नरेंद्र सारख्या बुवांची देखील वेळीच आर्थिक चौकशी होणे तेवढेच आवश्यक आहे, करोडो त्यांनीही जमा केले आहेत. दुर्दैवाने येथे तर राज्यकर्ते अधिकारी मंत्री किंवा त्या त्या वेळेचे मुख्यमंत्री देखील भय्यू भक्त झालेले असल्याने भय्यूजी यांचा किंवा राज्यातल्या तत्सम बुवांचा आसाराम झाला नाही मग हे काम वर जी अदृश्य शक्ती काम करते जसे त्या अदृश्य शक्तीनेच पुढे भय्यू महाराज प्रकरण हाती घेतले आणि नेमके भय्यू महाराज लोकांसमोर आणले, आले पण त्यांनी तर आधीच आत्महत्या करून घेतली.आता जे उरले आहेत निदान त्यांचे तरी वाभाडे पोलिसांनी बाहेर काढणे खूप गरजेचे आहे, आवश्यक आहे....

www.vikrantjoshi.com

पुन्हा एकदा तेच जे मी आधी अनेकदा सांगितले लिहिले कि भय्यू महाराज जे उठसुठ प्रत्येकाला सांगायचे कि मी कर्जबाजारी आहे ते तसे अजिबात नव्हते हे मी त्यावेळीही पोटतिडकीने सांगत असतांना त्याकडे दुर्लक्ष झाले, भय्यू तर गेले पण आर्थिक नुकसान वर्षा सत्पाळकर यांच्यासारख्या भक्तांचे झाले. भय्यू महाराज मोठे चतुर होते, ते उगाचच दरदिवशी भक्तांची सांगायचे कि मी कर्जबाजारी आहे त्यामुळे ज्या भक्तांना आर्थिक मदतीची महाराजांकडून अपेक्षा होती ते काढता पाय घ्यायचे आणि जे श्रीमंत भक्त होते ते दया येऊन चार पैसे अधिक पाठवून द्यायचे, आश्रमाला दान करायचे. एखादा सामान्य भक्त जर इंदोरच्या आश्रमात दोन वेळा अधिक जेवला तर त्याला जेथे अपमानित व्हावे लगे ते भय्यू महाराज जमा केलेले पैसे सामान्यांना काढून देणे कदापिही शक्य नव्हते. अनिरुद्ध देशपांडे यांच्यासारखा एखादा गळाला लागलेला श्रीमंत भक्त जर परस्पर एखादी योजना राबवत असेल ते तेवढे फक्त भय्यू महाराज आनंदाने स्वीकारायचे आणि हे दान माझ्याच खिशातून कसे इतरांना सांगत सुटायचे. महाराज जेव्हा स्वतः खूप श्रीमंत होत गेले हे बघूनच मग महाराजांच्या काही नातलगांची किंवा विनायक सारख्या उजव्या डाव्या हातांची नियत फिरली, हळूहळू त्यातून महाराजांना जडलेल्या विकृत वाईट सवयीतून त्यांना कसे ब्लॅकमेल केल्या जाईल त्याकडे विनायक सारख्या महाराजांच्या विश्वासू साथीदारांनी हेरले आणि त्यांनी फासे टाकायला सुरुवात केली, महाराज अडकत गेले त्यांनी मग आत्महत्या केली...

महाराजांना सतत घालून पडून बोलणारी त्यांची आधीची दिवंगत पत्नी किंवा दुसरी बायको आयुषी असे का वागत होत्या, मोठ्या खुबीने पोलिसांनी शोध घेतल्यास हेच लक्षात येईल कि महाराजांचे वादग्रस्त आयुष्य, त्या दोघींनाही असुरक्षित असल्याची भावना निर्माण झालेली होती पुढे दिवंगत पत्नी माधवी यांनी तर महाराजांपासून अलिप्त किंवा दूर राहणे पसंत केले, नको त्या कटकटी आणि नको त्या भानगडी उघड्या डोळ्यांनी बघणे त्यातून माधवी आणि कुहू कायमस्वरूपी इंदोर सोडून पुण्याला वास्तव्याला आल्या. विधवा वर्षा सत्पाळकर यांचे नेमके किती कोटी रुपये महाराजांकडे होते किंवा महाराजांच्या माध्यमातून त्यांनी चुकीच्या ठिकाणी गुंतविले ते १०० कि २०० कोटी, हे महाराजांच्या पाठी जे त्यांचे विनायक मनमित किंवा संजय यादव यांच्यासारखे डावे उजवे हात उजळ माथ्याने फिरताहेत त्यांना पॉलिसी खाक्या दाखवून विचारल्या गेले पाहिजे.नेमके हिडीस सत्य बाहेर पडेल....

आज भय्यू महाराजांच्या घरी त्यांच्या पाठी त्यांच्या कुटुंबाची मोठी वाईट अवस्था आहे. जागेवरूनही न उठू शकणारी त्यांची वयोवृद्ध आई, देखणी आणि तरुण पत्नी आयुषी, अतिशय देखणी केवळ १९ वर्षांची तरुण मुलगी कुहू आणि महाराजांपासून आयुषीला झालेली केवळ वर्षा दीड वर्षांची अपंग मुलगी, यापुढे या साऱ्यांच्या ताटात काय वाढून ठेवलेले आहे हे केवळ त्या अदृश्य शक्तीलाच माहित असेल. चुकीच्या मार्गाने अमापसमाप पैसे घरात आणले कि अशा मंडळींचे आज ना उद्या थोड्याफार फरकाने हे असेच होते मग ते घर प्रमोद महाजनांचे असो अथवा स्वतःला देव म्हणवून घेणाऱ्या भय्यू महाराजांचे....


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment