Wednesday, 7 November 2018

उत्सवी आणि उत्साही ३ : पत्रकार हेमंत जोशी


उत्सवी आणि उत्साही ३ : पत्रकार हेमंत जोशी 
माझ्या साऱ्याच वाचकांना माहित आहे कि मी सकाळी लवकर उठून लिखाण करतो मग अनेक मुद्दाम विचारातही कि मला सकाळी लवकर उठण्याची प्रेरणा कशातून मिळते, मी त्यांना त्यावर म्हणतो, फार गंभीर उत्तराची अपेक्षा माझ्याकडून ठेवू नका, कसली आली प्रेरणा बोडख्याची, जोराची लघवी लागते, अगदीच चड्डीत होण्याची वेळ येते तेव्हा उठावेच लागते, नंतर झोप येत नाही, आणि सकाळचे पाच वाजलेले असतात, लिहायला घेतो..
आणखी एक : 
हा किस्सा अगदी अलीकडला, हल्ली ठाण्यात राहणाऱ्या पत्रकाराचा. हा पत्रकार उदय तानपाठक नाही, हे खरे आहे कि तो अनेकदा ठाण्यात असतो पण शेजारी मुलुंडला राहतो. अभय देशपांडेवर शंका घेऊ नका, तो मी टू अस्तित्वात येण्यापूर्वीपासून त्या प्रकाराला यासाठी घाबरतो कि त्याच्या अगदी लहानपणीच त्याच्याविरुद्ध म्हणे मुख्याध्यापकांनी घरी तक्रार केली होती कि हा मधल्या सुट्टीत वर्गातच दवाखाना थाटून डॉक्टर...

जाऊद्या पुढले सांगायला नको. तर ठाण्यातला हा पत्रकार अचानक घरी परतलेल्या त्याच्या बायकोसमोर शेवंता या उफाड्या मोलकर्णीसंगे नको त्या अवस्थेत रंगेहात पकडल्या गेला, एवढा रंगेहात कि याने घाबरून तिची घातली, तिनेही तेच केले पण घसरून पडली, पत्रकार पकडल्या गेला पण अजिबात न घाबरता न डगमगता म्हणाला, तुला माहिती आहे, अलीकडे मी बापूंचे, सत्याचे प्रयोग,हे पुस्तक वाचून काढले, म्हणून मी पण बापू होऊ शकतो का, त्यासाठी हा प्रयोग केला, पण बरे झाले तू लवकर आली, आणखी दहा मिनिटे उशिरा आली असतीस तर पुढे आणखी रंगात जाणारा प्रयोग तुला बघावा लागला असता कारण शेजारी मेहतांकडे काम करणारी जस्सू पण आमच्यात सामील होणार होती...बायकोने शांतपणे ऐकून घेतले आणि हळूच विचारले, माझ्या समोर, संगतीने तर तुम्ही नेहमीच बापू असता, शेवंताच्या बाबतीतही असेच वाटले का कि तुम्ही खरोखरी बापू आहेत, पत्रकार म्हणाला, हो, बापू आहोत तेच वाटले, फक्त ' आसारामबापू ' आहोत, असे वाटले, नंतर शांतारामबापू आहोत असेही कदाचित वाटले असते, जस्सू आल्यानंतर...
आणखी एक, 
कालच एका पोलीस असलेल्या मित्राने एसेमेस केला, लहानपणी दिवाळीत बंदुकीची रडायचो, आता बंदूक असून दिवाळीसाठी रडतोय...
आणखी एक, 
या उतारवयात आप्पासाहेब लोणीकर अलीकडे मुंबईत एकटेच राहायला आले, पोराबाळांना आणि बायकोलाही तिकडे गावाकडे सोडून. येथे त्यांना एकटे राहवले नाही म्हणून त्यांनी वय वर्षे केवळ २५ असलेल्या एका तरुण मुलीशी लग्न केले. मुंबईतल्या मित्रांनी त्यांना चिडवायला सुरुवात केली, अहो, बायको एकदमच तरुण आहे तुमच्यासमोर, तिलाही कंपनी हवी कि,तुमच्या नको त्या अवयवाची अवस्था आता ख्रिसमस ट्री सारखी झालेली असावी म्हणजे अख्खे झाड डेड, त्यावर लावलेले लाईट म्हणजे केवळ देखाव्यासाठी तेव्हा तिला कंपनी हवीच, लोणीकर, कंपनी आणतो म्हणाले.काही महिन्यानंतर मित्रांनी पुन्हा एकदा उगाचच डिवचण्यासाठी लोणीकरांना विचारले, कसे सुरु आहे तुमच्या बायकोचे, लाजत लोणीकर म्हणाले, आता ती गर्भवती आहे. मित्र आणखी चिडवत म्हणाले, अरे व्वा, तिला आणलेली कंपनी त्यामुळे भारी खुश असेल...? आणखी लाजत लोणीकर म्हणाले, हो, कंपनी देखील प्रेग्नन्ट आहे...
तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment