Wednesday, 28 November 2018

आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत : पत्रकार हेमंत जोशी


आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत : पत्रकार हेमंत जोशी 
दोन प्रकारचे नेते असतात, टोप्या बदलणारे म्हणजे कपडे बदलतो तसे आणि टोप्या न बदलणारे म्हणजे कधीही पक्षांतर न करणारे. सुखी कोण टोप्या बदलणारे कि टोप्या न बदलणारे त्यावर उत्तर सोपे आहे, ज्यांना पैशांसाठी किंवा व्यापारी वृत्तीने राजकारणात आयुष्य घालायचे आहे त्यांना टोप्या बदलण्याच्या नक्की फायदा होतो, केवळ राजकारणाला सर्वस्वी मानणाऱ्यांनी शक्यतो टोपी टोप्या बदलवू नयेत. जेव्हा विधान परिषदेला आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत यांच्या नावाचा विचार झाला नाही तेव्हाच हेही फायनल झाले कि पुढले केवळ सहा महिने फारतर डॉ. सावंत या राज्याचे मंत्री असतील...

आणि जेव्हा विधान परिषदेला डॉ. सावंत जाणार नाहीत ठरले तेव्हा, त्यादिवसात ते आणि त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे खाजगी सचिव महल्ले खूपच अस्वस्थ नाराज डिस्टरब होते, साहजिकच विधान परिषदेवर रिपीट न होणे डॉ सावंत एकप्रकारे अपमानित झाले होते, निराश झाले होते, एवढे कि ते मागल्या वर्षी नागपुरात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात दांड्या मारायला लागले होते, एक दिवस ते कसेबसे भेटले, महल्ले पण होते त्यांना त्या दोघांना एवढेच म्हणालो, आयुष्यात राजकारणात चढउतार येतच असतात, नैराश्य आणायचे नसते, महत्वाचे म्हणजे यापुढे काही नेते तुमच्यासमोर प्रस्ताव आणतील कि शिवसेना सोडून आमच्याकडे या, तसे अजिबात करू नका, डॉ सावंत देखील हेच म्हणाले कि मी निराश नक्की आहे पण शिवसेना सोडणे किंवा मातोश्री विरोधात शब्दाचीही नाराजी व्यक्त करणे माझ्या रक्तात नाही, पुढे तेच सर्वांसमोर आले, डॉ. सावंत मंत्री म्हणून पुन्हा जोमाने कामाला लागलेले आहेत त्यांची मंत्रिपदाची मुदत संपेपर्यंत....

प्रोफेशनली राजकारणाचा वापर आणि विचार करणाऱ्यांचे काही खरे नसते, त्यांचे विचार तिरळ्या डोळ्यांच्या स्त्रीसारखे असतात म्हणजे तिरळे डोळे असलेली स्त्री नेमके कोणाकडे बघते आहे हे जसे कळत नाही तसे या नेत्यांचे असते म्हणजे कालपर्यंत शरद पवारांशी, राष्ट्र्वादीतल्या छगन भुजबळ किंवा जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या अनेक विविध नेत्यांशी कधी राजकीय तर कधी व्यावसायिक जवळीक आहे, दाखविणारे प्रसाद लाड आज मी कसा मुख्यमंत्र्यांना सर्वाधिक जवळचा हे दाखविण्यात यासाठी अधिक तत्पर असतात, वातावरणनिर्मिती करतात कारण त्यांना खर्या अर्थाने राजकीय दुकान जोरात जोमात चालवायचे असते किंवा कालपर्यंत अजित पवारांशी केवढे माझे सख्ह्य हे भासविणारे पुण्यातले संजय काकडे अचानक अजितदादांविरुद्ध एक दिवस बंड करून मोकळे झाले, पुढे ते असे काही भाजपामय झाले कि बघणार्यांना वाटायचे, भाजपाच्या जडणघडणीत सर्वाधिक वाटा बहुदा संजय काकडे यांचाच असावा, आता तेथेही त्यांचे मन 
रमत नाही, ते का रमत नाही, हे मला माहित आहे पण त्यावर येथे चर्चा नको, पण आता याच संजय काकडे यांची पावले म्हणे इंदिरा काँग्रेसच्या नेत्यांच्या घराबाहेर उमटू लागलेली आहेत, अर्थात असे कितीतरी संजय काकडे किंवा प्रसाद लाड या राज्यात या राज्यातल्या राजकारणात आहेत. कधी आर्थिक तर कधी राजकीय प्रसंगी नुकसान झाले तरी पक्षांतर करायचे नाही, निष्ठा जपायच्या असे मानणारे फार कमी आहेत. एखाद्या वेश्येसारखी गिर्हाईके बदलणारे नेते केव्हाही राज्याच्या राष्ट्राच्या दृष्टीने घातक ठरतात, असतात. 

अत्यंत महत्वाचे म्हणजे माझ्या देशाला मी काय देणार आहे त्यापेक्षा माझ्या कुटुंबाला मी काय देणार आहे हाच विचार जवळपास साऱ्याच नेत्यांच्या डोक्यात सतत घोंघावत असल्याने आपला देश आपले राज्य कायम सतत 
अधिकाधिक खड्ड्यात जातांना दिसते आहे...दीपावली निमित्ते थेट या राज्याच्या आरोग्य मंत्र्याने म्हणजे डॉ. दीपक सावंत यांनी संग्राह्य असा, वाचावासा असा दिवाळी अंक काढला आहे, ' महाराष्ट्र आरोग्यदीप ' हे त्या दिवाळी अंकाचे नाव, अख्खा अंक, लठ्ठपणा का वाढतो लठ्ठपणाचे तोटे आणि त्यावर उपाय या विषयाला वाहिलेला आहे. राज्यातल्या डॉ. रेखा दिवेकरांसारख्या नामवंत डॉकटरांच्या अभ्यासपूर्ण वाचनीय लेखांनी परिपूर्ण असा हा जपून ठेवावा हा अंक, आरोग्य मंत्र्याने केलेले हे एक चांगले काम, असे त्यावर नक्की म्हणता येईल. डॉ. रमाकांत पंड्या यांच्यासारख्या मोस्ट बिझी डॉक्टरांनी तज्ज्ञांनी लिखाण करणे केवळ दीपक सावंत यांचे त्यांच्याशी मंत्री होण्यापूर्वी असलेले वैयक्तिक संबंध, त्यातून हे घडले, अशी माझी माहिती आहे, बघा अंक वाचायला मिळाला तर...
तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment