Thursday, 25 October 2018

इकडले तिकडले राजकारणातले २ : पत्रकार हेमंत जोशी

इकडले तिकडले राजकारणातले २ : पत्रकार हेमंत जोशी 

भारतात इंग्रजांचे राज्य असतांना विविध प्रांतात थेट इंग्लडहुन व्हॉईसरॉय नेमल्या गेले पण त्यातल्या एकाही व्हॉईसरॉयने आपले स्वतःचे साम्राज्य उभे केले नाही त्यांनी अखेरपर्यंत इंग्लडच्या राणीचाच झेंडा येथे रोवून तिचे नेतृत्व फॉलो केले, आपल्याकडं दुर्दैवाने तसे घडले नाही नेमलेल्या सरदारांनी आपले स्वतःचेच साम्राज्य निर्माण केले आणि देशाचे मोठे नुकसान त्यातून घडले, शरद पवारांवरून हा संदर्भ आठवला, पवारांनी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात जे सरदार निर्माण केले एकतर त्यातल्या बहुतेकांचे कॅरेक्टर गुंड लबाड भ्रष्ट असेच होते ज्यांनी पुढे स्वतःचेच साम्राज्य निर्माण केले जे आता पवारांना डोकेदुखी होऊन बसले आहे. पवारांनी उभे केलेले मोठे केलेले सरदार आता पवारांचेच ऐकेनासे झाले आहेत. चुकीचे माणसे मोठी केलीत कि असे हमखास घडते त्यावर मी अनेकदा जळगाव च्या सुरेशदादा जैन यांचे उदाहरण दिलेले आहे. त्यांनी देखील तेच केले जे पुढे त्यांनाच भोवले, जैन बाजूला पडले आणि त्यांनी उभे केलेले सरदार मोठे झाले...

शरद पवारांचा अगदीच सुरेशदादा जैन नक्की होणार नाही पण त्यांनी चांगले योग्य सरदार उभे केले असते तर आज त्यांना होणार त्रास झाला नसता शिवाय पवारांनी ओवाळून टाकलेल्या नेत्यांना मोठे केले , मोठे करतांना त्या त्या सरदारांच्या वाईट प्रवृत्तीला प्रोटेक्ट केले, हा जो आज त्यांच्यावर आरोप होतो किंवा त्यादृष्टीने त्यांच्याकडे बघितल्या जाते त्या ऐवजी यशवंतराव चव्हाणांचे खऱ्या अर्थाने वारसदार अशी शरद पवारांची इतिहासाने कायम नोंद घेतली असती, आता सारे हेच म्हणतात कि पवारांनी स्वतःच स्वतःचा इतिहास रचला जो त्यांना लांच्छन लावून गेला...

www.vikrantjoshi.com

पुढले पंतप्रधान होण्यासाठी पवारांना महाराष्ट्रातून २२-२३ खासदार निवडून न्यायचे होते, न्यायचे आहेत, हमखास निवडून येऊ शकतात राज्यातल्या मतदारसंघ निहाय अशा संभाव्य उमेदवारांची यादी पवारांनी आधी तयार केली नंतर त्यांनी त्या त्या संभाव्य उमेदवाराला वैयक्तिक बोलावून मनीची इच्छा सांगितली, खासदारकीची निवडणूक लढविण्याबाबत, सुरुवात अर्थात 
छगन भुजबळ यांच्यापासून झाली पण सुरुवातच खराब झाली, लोकसभा निवडणूक लढविण्यास भुजबळांनी चक्क नकार दिला, अशी माझी माहिती आहे. असे म्हणतात, इतरही संभाव्य उमेदवार या नकारघंटेत सामील झाले. वास्तविक शरद पवार यांनी या राज्यातल्या दुसर्या फळीतल्या नेत्यांना सत्तेत बसवून केवढे श्रीमंत केले, नाव सत्ता पैसे सारे मिळवून दिले. या नेत्यांनी वास्तविक पवारांसाठी प्रसंगी स्वतःचा जीव देखील देण्याची तयारी ठेवली पाहिजे पण तसे पवारांच्या बाबतीत फारसे कधी घडतांना दिसले नाही त्यामुळे त्यांची अवस्था अनेकदा पुराणातल्या वाल्यासारखी होते त्यातून अनेकदा हेच वाटते कि पवार आधी ज्या सरदारांना मोठे करतात पुढे ते त्यांच्याच हातांनी या निर्माण केलेल्या सरदारांचा राजकीय बळी घेतात आणि त्यात पवारांचे फारसे चुकते असे अजिबात वाटत नाही कारण आपल्यावर अजिबात अन्याय होऊ नये असे सत्तेतून माजलेल्या उन्मत्त झालेल्या त्यांच्या सरदारांना वाटते आणि ते थेट पवारांशीच मग पंगा घ्यायला सरसावतात, तो प्रकार असतो बापाला सेक्स कसा करायचा हे शिकविणाऱ्या पोटच्या पोरासारखा, त्यातून हे कलमाडी सारखे पवारांनी उभे केलेले मोठे केलेले सरदार अति दंगा कराया लागले कि पवार नाईलाजाने स्वतःच मग अशा पंगा घेणाऱ्याचा राजकीय सरदारांचे राजकीय गळे आवळून त्यांचे राजकीय अस्तित्व संपवून मोकळे होतात, पण आता काळ बदललेला आहे राजकीय वातावरण देखील संपूर्ण बदलेले असतांना पवारांशी पंगा घेणारे त्यांचे सरदार भविष्यात ' कलमाडी ' होतील का, त्याविषयी नक्की शंका वाटते...

ज्यांनी आपल्याला राजकारणात आणले वाढविले मोठे केले ज्यांचे मीठ खाऊन आपण मोठे झालो, लायकी नसतांना नेते म्हणून प्रतिष्ठितांच्या रांगेत येऊन बसलो असे सरदार मग ते कोणत्याही राजकीय पक्षात असोत त्यांनी धीर धरणे प्रसंगी आपल्या नेत्यासाठी त्यागाची भूमिका घेणे अत्यावश्यक असते आवश्यक ठरते पण असे क्वचित घडते, पुढे या मंडळींचे काय होते, त्यांचेहे उध्वस्त राजकीय जीवन, हे आपण कित्येक वेळा शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नेत्यांचे बघितलेले आहे, त्यांचे पुढे फार चांगले झाले, असे कधी दिसले नाही....

इतरांसाठी, वीरोधकांसाठी शरद पवार कितीही वाईट असोत म्हणजे ते इतरांसाठी सिनेमातल्या ललिता पवार सारखे असतील पण त्या त्या मोठ्या झालेल्या सरदारांसाठी ते नक्की सुलोचना दीदी पद्धतीने वागलेले असतात. दगाबाजी कोणालाही परवडणारी नसते. मी मुंबईत आलो तेव्हा पवारांनी जवळ घेतले म्हणून मला येथपर्यंत येता आले, पुढे त्यांनी माझ्याविषयी काहीतरी गैरसमज करवून घेतला तो आजपर्यंत, त्यांनी मला भलेहि दूर केले असेल पण त्यांची त्यावेळेची एक फादर फिगर म्हणून आठवण आजही दररोज होते, शरद पवारांची आठवण आली नाही असा माझा एकही दिवस जात नाही. मर्यादा राखून त्यांच्यावर टीका करतो, वास्तवाचे,गत आयुष्याचे भान ठेवतो. सहसा पत्रकारांचे असे नसते, डकारही न देता ते ज्यांचे खातात त्यांनाच अडचणीत आणतात, विशेष म्हणजे कृतद्न्यता व्यक्त करणे त्यांच्या स्वभावात नसते...
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment