Friday, 26 October 2018

इकडले तिकडले राजकारणातले ३ : पत्रकार हेमंत जोशी


इकडले तिकडले राजकारणातले ३ : पत्रकार हेमंत जोशी 
आमच्या एका लांबच्या पण गावातल्या नातेवाईकाच्या देखण्या उफाड्या चिकण्या उच्चशिक्षित शोभा नावाच्या मुलीचे लग्न करायचे ठरले, तिच्या आई वडिलांनी तिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली. प्फार कमी पुरुषांच्या नशिबी प्रेक्षणीय स्थळ असते बहुतेकांच्या नशिबात सोसाट्याचा वारा अंगावर यावा तसे स्थळ असते. असे वाटते आयुष्यभर टर्कीमधल्या जणू पुरातन भग्न अवस्थेतल्या इमारती आपल्या नशिबी आल्या आहेत. हिंदू रिवाजानुसार आपल्याकडे साधारणतः दिवाळी नंतर किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत लग्नाचे मुहूर्त असतात, दर दिवाळी नंतर किंवा दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हाला उगाचच वाटायचे कि यावेळी शोभाच्या लग्नाचे लाडू नक्की पण दिवस मागून दिवस गेले, ऋतू मागून ऋतू गेले तरी शोभाला स्थळ पसंत पडेना शेवटी अगदी मासिक पाळी संपता संपता तिने कुठलीशी धोंड गळ्यात पडून घेतली जेव्हा उफाडि शोभा अगदीच चिपाडी दिसायला लागली होती...

फडणवीस सरकारात अपेक्षित असलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदल यात व त्या शोभाच्या उशिरा झालेल्या लग्नात मोठे साम्य आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना सोडून इतर सारे अशा अविर्भावात बातम्या छापून किंवा चर्चा करून मोकळे होतात कि तेच जणू या राज्याचे राज्यपाल किंवा मुख्यमंत्री आहेत. ऑकटोबर च्या पहिल्या आठवड्यात किंवा सप्टेंबर च्या शेवटच्या आठवड्यात नेहमीप्रमाणे वाहिन्या आणि वृत्तपत्रांना जणू एकमेव काम उरले होते, मंत्री मंडळ बदल आणि विस्ताराचे, त्यातून आम्ही तेवढे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांना जवळचे, या अविर्भावात असलेल्या प्रतिनिधींनी जेवढ्या म्हणून शक्य होत्या तेवढ्या थापा ते मारून मोकळे झाले नेमके तेच घडले बातम्यांचे ओएव्ही निर्माण करणारे सारे ढुंगणावर आपटले, सारे त्याला आम्ही तोंडावर पडणे असेही म्हणतो....

मंत्री मंडळ फेरबदल आणि विस्ताराच्या बाबतीत या मंडळींचे मात्र शोले सिनेमात तुरुंगात दाढी करणाऱ्या केश्तो मुखर्जी सारखे कायम होत आलेले आहे, कोणीतरी काहीतरी मुद्दाम यांच्यासमोर बोलून जातात आणि हे पत्रकार किंवा प्रतिनिधी दुसरे दिवशी छापून मोकळे होतात, शोले मध्ये केश्तो मुखर्जीला मस्त बेवकूफ बनविण्याचे काम अमिताभ आणि धर्मेंद्र करतात, मंत्रिमंडळ फेरबदल, विस्ताराच्या बातम्या सोडण्याच्या बाबतीत माझा संशय थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आहे, तेच ह्या अशा बातम्या त्यांच्यासमोर पत्रकारितेतले केश्तो मुखर्जी आले रे आले कि पुडीसारख्या मुद्दाम ओडून मोकळे होत असावेत....

एक धमाल प्रसंग तसा जुना आहे. शरद पवारांचे लाडके असलेले बुलढाणा जिल्ह्यातले एक नेते त्यांच्याच मंत्रिमंडळात होते. हे मंत्री महोदय त्यांच्या कंजूष वृत्तीसाठी जिल्ह्यात नव्हे तर राज्यात देखील नावाजलेले होते म्हणजे ते एवढे कंजूष होते कि एकच अंडरवेअर उलट सुलट करून दोन दिवस घालायचे, साबण वाचतो म्हणून. एका दिवाळीदरम्यान मी मंत्रालय प्रेस रूम मध्ये येऊन मुद्दाम पुडी सोडली कि त्यांच्याकडून दिवाळी गिफ्ट घेऊन आलोय, वास्तविक मी मंत्र्यांचे दिवाळी गिफ्ट कधीही स्वीकारत नाही पण सोडली पुडी, हेही सांगितले कि मंत्रिमहोदयांनी २० हजार रुपये किमतीचे घड्याळ गिफ्ट केले आहे, त्यानंतर पुढले आठ दिवस तो मंत्री वेडा व्हायचा तेवढा बाकी होता, पत्रकारांना बघितले रे बघितले कि तो मनोजकुमार सारखा संपूर्ण हात तोंडावर ठेवून पुढे निघून जायचा. वृत्तपत्रांच्या बाबतीत विशेषतः फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आजतागायत 
मंत्रीमंडळ फेरबदल आणि विस्ताराच्या बाबतीत हेच त्या मंत्र्याच्या किस्स्यासारखे घडते आहे, मीडियातला जो तो काहीतरी ऐकतो, वरून तिखट मीठ लावून बातमी लिहून छापून मोकळा होता, विस्तार किंवा बदल अद्याप झालेला नाही पण मीडिया मात्र तोंडावर पडून ढुंगणावर आपटून मोकळा झाला आहे. गम्मत म्हणजे मंत्रिमंडळात समावेश होण्याची सुतराम शक्यता नसतांना लोकमत च्या विशेष प्रतिनिधींनी केवळ मित्रप्रेमापोटी थेट परिणय फुके यांचे नाव छापून सर्वांचे छान मनोरंजन केले आहे, दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीसांना तर हि बातमी वाचल्यानंतर खूप वेळ हसू आवरत नव्हते...

एक नक्की मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल देवेंद्रजींना निश्चित करायचा आहे, त्यावर दुमत नाही पण जे त्यांच्याही हातीनाही, वास्तविक वरून आदेश येईपर्यंत, राज्यपालांची परवानगी घेईपर्यंत त्यावर विनाकारण तेही तिखट मीठ लावून पुड्या सोडणार्या बातम्या छापणे म्हणजे राजकीय वर्तुळात खळबळ माजविण्याचा हा प्रकार असतो असे मला वाटते, विधानसभा निवडणुकीला जेमतेम १२-१३ महिने शिल्लक असतांना बदल आणि विस्तार घडवून आणणे अत्यावश्यक होते पण त्यावर शिवसेना आणि भाजपा दोघांचेही चुकलेले आहे, त्यांना त्याचा नक्की येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत मोठा त्रास होणार आहे, बघूया मुहूर्त कधी निघतो ते, हे खरे तर उदाहरण दिलेल्या शोभाच्या लग्नासारखे झालेले आहे....
क्रमश:

 पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment