Sunday, 21 October 2018

चतुर फडणवीस : पत्रकार हेमंत जोशी


चतुर फडणवीस : पत्रकार हेमंत जोशी 
आपण सभोवताली नक्कीच बघत आलोय कि ज्यांचे चरित्र उदार असते त्यांना कोणीही परके नसते, अख्खी पृथ्वी किंवा ऍटलीस्ट त्यांना त्यांचा देश त्यांना त्यांच्या कुटुंबासारखा असतो जणू सारेच त्यांचे भाऊबंद असतात. असे नितीन गडकरी यांचे अजिबात नाही त्यांचे कुटुंब आणि त्यांचे व्यवसायिक मित्र हेच केवळ त्यांचे कुटुंब आणि भाऊबंद आहेत, आणि हो, असे मानणार्यातले नितीन गडकरी आहेत हे मला पुराव्यांसहित माहित आहे हे गडकरींना देखील ठाऊक असल्याने ते नक्की माझ्या वाटेला जाणार नाहीत...

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे म्हणजे फडणवीस यांचे तसे अजिबात नाही कारण त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी फार काही करून ठेवायचे नाही पण देवेंद्र फडणवीस चांगले म्हणून नितीन गडकरी वाईट असा निष्कर्ष तुम्ही अजिबात काढू नये. गडकरी आणि मी, आम्हा दोघात काही व्यावसायिक मित्र कॉमन असल्याने नेमके गडकरी कसे आणि फडणवीस देखील कसे हे नेमके माहित असते, माहित आहे....असे वाटले होते कि ही पंचवार्षिक योजना सुरु होण्यापूर्वी म्हणजे नितीन गडकरी हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतांना त्यांनी जे आर्थिक घोटाळे केले होते ज्यातून त्यांचे अध्यक्षपद गेले आणि पंतप्रधानपद हुकले ते गडकरी पुढे पुन्हा थेट केंद्रात गेल्यानंतर मागच्या चुका पुढे करणार नाहीत त्यामुळे त्यांच्या पश्चात त्यांचे फोटो अटलबिहारी किंवा दीनदयाळ उपाध्याय यांच्या शेजारी नक्की लागतील पण असे अजिबात घडलेले नाही, नितीन गडकरींचे कुत्र्याच्या शेपटासारखेच वागणे कृती करणे असते आणि तेच कायम दिसलेले आहे, दिसत आलेले आहे, त्यांचे ते तसेच पूर्वीसारखेच स्वतःच्या कुटुंबासाठी आणि व्यावसायिक मित्रांसाठी वाट्टेल ते करणे सुरु आहे. त्यांच्या भोवताली असलेले महेश बाल्दी यांच्यासारखे अनेक या पाच 
वर्षात अधिक आणखी खूप खूप श्रीमंत झालेले आहेत...

महाराष्ट्रातले नागपुरातले हे दोघेही म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस या दोघांमध्ये मोठा फरक असा आहे कि समजा उद्या वडीलकीच्या नात्याने नागपुरातल्या गांधींनी म्हणजे गिरीश गांधी यांनी नितीन गडकरी यांना अमुक एक चुकीचे काम करू नका असे जर सांगितले तर गडकरी चुकीचे काम करणे एकीकडे सुरु ठेवतीलच पण दुसरीकडे ते, आपल्यावर नजर ठेवून आहेत म्हणून गिरीश गांधी यांना कायमचे दूर करतील, असे कितीतरी माणसे मला माहित आहेत, तिकडे 
दिल्लीत शहा मोदींच्या पुढे त्यांचे काही चालत नाही म्हणून नाहीतर नितीन गडकरी यांनी त्यांचा पत्ता केव्हाच कट केला असता पण फडणवीस यांचे तसे अजिबात नाही समजा उद्या गिरीश गांधी यांनी देवेंद्र यांना जवळ बसवून तुझे अमुक चुकते,असे सांगितले तर देवेंद्र सांगितलेली चूक शंभर टक्के पुन्हा करणार नाहीत महत्वाचे म्हणजे ते जर मुख्यमंत्री म्हणून गिरीश गांधी यांना महिन्यातून एकदा भेटत असतील त्याऐवजी अधिकाधिक गांधी यांना कसे भेटता येईल याचा विचार करून पुढे जातील...

गडकरींचे त्यांच्या कर्मातून पंतप्रधानपद हुकले असे जरी असले तरी लोकांना काय वाटते मला ठाऊक नाही पण गडकरी हे अधिक नशीबवान असल्यानेच अधिक पुढे गेले असे मला कायम राहून राहून वाटते. ज्यांनी चुका काढल्या त्यांच्याविषयी मनात डुख, राग धरून दुर्लक्षित करायचे आणि केवळ आर्थिक दृष्टिकोन समोर ठेवून त्यांना आणि स्वतःला श्रीमंत करणाऱ्या हुजऱ्यांना 
बिलगून राहायचे, गडकरी यांचे हे असे वागणे आहे किंवा नाही हे नागपूरकरांना नक्की विचारा, त्यांचे ' होय ' उत्तर आले नाही तर मला वाट्टेल ते म्हणा म्हणजे गाढवपणा करतो, मधु चव्हाणांसारखा वागतो, अशी माझ्यावर टीका करून मोकळे व्हा....

राजकारणात हि अशीच माणसे खूप आहेत जे जुन्या सिनेमातल्या डाकुंसारखी वागतात म्हणजे जुन्या हिंदी चित्रपटातले खलनायक डाकू कसे लुटालूट करून आणलेल्या १०० पोत्यांपैकी पाचपंचवीस पोती गरीबांमध्ये वाटून त्यांचे मसीहा म्हणून दाखविले जायचे, आपल्या या देशात, राज्यात जवळपास सारेच नेते किंवा जे सत्तेत असतात, सत्तेच्या जवळ विविध पदांवर असतात, काम करतात हुबेहूब हे असेच आहेत म्हणजे जे लुटले त्यातले थोडेसे वाटून टाकले कि पुन्हा आमदार म्हणून निवडून यायचे किंवा वाहवा मिळवायची आणि लुटपाट करून वरून जनतेच्या डोळ्यात धूळ झोकून अधिकाधिक मोठे होत राहायचे, म्हणजे साऱ्याच क्षेत्रात हे असेच सुरु आहे त्यामुळे माझ्या गावातल्या आमदाराने माझे गाव विकसित करायचे ठरविले तरी आधी माझ्या अंगावर काटा उभा राहतो कि आमदार संजय कुटे यांना आणखी श्रीमंत व्हायचे आहे कि अगदी मनापासून माझे गाव पुढे न्यायचे आहे कारण बहुतेक सारे याच विचारांचे, वाहत्या गंगेत हात धुवून घेणारे. संजय कुटे हे नाव सहज सुचले म्हणून उदाहरण दिले, त्यांना जवळून ओळखणाऱ्यांनी त्यांच्याविषयी गैरसमज आताच करवून घेऊ नये...
क्रमश:

 पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment