Tuesday, 18 September 2018

शुद्ध बिजा पोटी ४ : पत्रकार हेमंत जोशी

शुद्ध बिजा पोटी ४ : पत्रकार हेमंत जोशी 

चार दशकांपैकी जवळपास साडेतीन दशके माझी राजकीय पत्रकारितेतील कारकीर्द मंत्रालयात पार पडलेली आहे. कितीतरी प्रतिभावान विद्वान वार्ताहर मी याठिकाणी विविध वृत्तपत्रातून आलेले केवळ ' मंत्रालय प्रतिनिधी ' म्हणून काम करणारे वार्ताहर बघितलेले आहेत त्यातून ज्यांना संधी मिळाली ते खूप मोठे झाले त्यातल्या काहींना फारशी चांगली लेखणी आणि अक्कल नसतांनाही असे काही मोठमोठ्या वृत्तपत्रांची चाटूगिरी करून संपादक देखील झाले कपिल पाटील, अंबरीश मिश्रा असे काही तर फार मोठे झालेले मी बघितले आहेत पण मंत्रालयात वार्ताहारकी करणाऱ्या अनेकांची थेट संपादक होण्याची लायकीअसतांना देखील यदु जोशी यांच्यासारख्यांनी वयाची पन्नाशी उलटली तरी येथे येऊन बातम्या जमा करण्यात त्यांनी धन्यता मानली. मंत्रालयाचे मायाजाल असे आहे कि आज उद्या लोकमत मधले यदु जोशी किंवा अतुल कुलकर्णी यांच्यासारखे काही वार्ताहर भलेही संपादक किंवा तत्सम जबाबदारीच्या पदावर पदोन्नती घेऊन मोकळे होतील पण मंत्रालयातच वार्ताहारकी करतांना दिसतील, नेमके हेच मनाला खटकते कि हि अशी लिखाणात मोठी होऊ शकण्याची प्रचंड क्षमता असलेली माणसे,जेव्हा थेट अमुक एखाद्या वार्ताहर परिषदेत त्या मंत्रालयात दलाली करणाऱ्या आणि कवडीचीही अक्कल नसलेल्या बहुसंख्य वार्ताहरांच्या शेजारी बसून आपली इज्जत घालवून बसतात त्यावर मनाला पडलेला प्रश्न असा कि वृत्तपत्रांच्या मालकांना हे स्वतःच्या स्वार्थासाठी कामे करवून घेण्यासाठी या मंडळींना मंत्रालयात सडवायचे असते कि भल्याभल्या विद्वान वार्ताहरांनाच घाणीत लोळणे आवडलेले असते...

www.vikrantjoshi.com

लोकमत दैनिकात तर असे आहे कि युनियन आणि जातपात जेथे अनेकदा विविध वार्ताहरांच्या बाबतीत प्रभावी ठरल्याने मागून आलेले अनेक पदोन्नत्या घेऊन मोकळे झाले आहेत आणि यदु जोशी यांच्यासारखे जात आणि युनियन या दोन घाणेरड्या स्तरावर निष्प्रभ ठरल्याने त्यांना आयुष्यभर केवळ वार्ताहर म्हणून समाधान मानावे लागलेले आहे, निदान लोकमत भलेही त्यांची पद्धत चुकीची वादग्रस्त ठरलेली असेल ते पदोन्नत्या देऊन मोकळे तरी होतात पण पुढारी देशोन्नती सारखे असे कितीतरी नामवंत दैनिके जेथे पदोन्नती किंवा नियमानुसार वेतन देणे जणू त्या त्या मालकांना तसे करणे पाप वाटते म्हणजे यदु जोशी आज ना उद्या लोकमत मध्ये असल्याने निदान आज ना उद्या संपादक होऊन निवृत्त तर होतील पण यदु यांच्या तोडीचे उदय तानपाठक यांच्यासारखे अन्य असे कितीतरी कि जे पुढारी किंवा तत्सम वृत्तपत्रात फक्त आणि फक्त मंत्रालय बातमीदार किंवा केवळ वार्ताहर म्हणून निवृत्त होणार आहेत. ते दृश्य बघणे अतिशय लज्जास्पद असते जेव्हा प्रचंड अनुभव लेखणीत ताकद असलेले पत्रकार जेव्हा केवळ दलाल म्हणून जगणाऱ्या वार्ताहरांशेजारी बसून पत्रकार परिषद अटेंड करतांना दिसतात, त्यावेळी बघणार्यांना असे वाटते कि घरंदाज स्त्रीच्या शेजारी रस्त्यावर उभे राहून रात्रीच्या अंधारात धंदा घेणारी एड्स झालेली रांड बसलेली आहे...

शुद्ध बीजापोटी ची समाप्ती करतांना पुन्हा एक सत्य कथन येथे मला करायचे आहे. आयुष्याची अनेक वर्षे विविध मंत्र्यांच्या आस्थापनेवर काम करून रग्गड प्रचंड पैसे मिळविलेल्या आता ते गृहस्थ हयात नसलेल्याची सून आणि मुलगा माझ्याकडे अलीकडे यासाठी आले होते कि त्यांची दोन्ही मुले गेली दोन तीन वर्षे शाळेत यासाठी गेलेली नाहीत कारण त्यांच्याकडे छगन भुजबळ यांच्या वांद्र्यातील शाळेचे शुल्क भरायला पैसे नाहीत, ठीक आहे, मी त्यावर लवकर मार्ग काढून त्यांची मुले पुन्हा शाळेत जातील हे नक्की बघेल पण पुन्हा तेच सांगायचे आहे कि सत्तेत असतांना गरिबांचे पैसे ओरबाडून श्रीमंत झालेले या राज्यातले सारेच, कि अशांचा वक्त चांगला होता म्हणून त्यांनी काळे धन जमा केले पण अशा मंडळींचा अंत चांगला असूच शकत नाही, गरज नसतांना अमाप समाप पैसे खाणाऱ्यांच्या घरात चांगले घडणे नक्की अशक्य असते, ज्या पुढल्या पिढीसाठी इतरांच्या पिढीचा विचार न करता सत्तेतले सारेच काळा पैसा जमा करणारे त्यांना येथेच सारे भोगून वर जायचे आहे. ज्यांचा मी सत्य किस्सा याठिकाणी सांगितला त्या गृहस्थाचा एक मुलगा त्यांच्यासमोरच गेला आणि इतर दोन्ही मुले नालायक निघाल्याने तिसर्या एका मुलाच्या तरुण पत्नीवर आज अक्षरश: चार घरी जाऊन स्वयंपाक करण्याची वेळ आलेली आहे दुर्दैव म्हणजे त्यांना मुलांसाठी फी भरायला देखील पैसे नाहीत आणि हे सारे त्या पैसे खाऊन वर गेलेल्या सरकारी अधिकाऱ्यासमोरच त्याच्या जिवंतपणी घडत होते. गरिबांचे लुटल्या गेलेल्यांचे लागलेले शाप खतरनाक असतात हे वाममार्गाने दरदिवशी पैसे खाणार्या मंडळींनी ध्यानात ठेवणे अत्यावश्यक आहे, आपण सारे स्वतः बदललो तरच हे राज्य हा देश बदलेल अन्यथा या देशाचा अंत नक्की वाईट आहे कारण आपण सारेच थर्ड ग्रेड स्वभावाचे आहोत राज्याला लुटायला बसलेलो आहोत, राज्य बरबाद करून मोकळे होणार आहोत...
असो, फार टेन्शन घेऊ नका, चांगले वर्तन ठेवण्याचा मनापासून प्रयत्न करूया.
 एक चुटका सांगतो, 
प्रसंग लग्नातला, सदाशिवपेठी होस्ट एका अनोळखी माणसाला विचारतो,
आपल्याला कुठे कधी बघितलेले नाही आपण नेमके कोणाकडले म्हणजे...
तेवढ्यात होस्टला मध्येच तोडत तो अनोळखी म्हणतो, 
अहो, मी मुलीकडून आलेलो आहे..
त्यावर सदाशिवपेठी उसळून म्हणतो, 
हरामखोरा, मुलगा आणि मुलगी असे हे लग्न नाही, 
दोन्हीकडले मुलगेच आहेत...
तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment