Saturday, 15 September 2018

शुद्ध बिजा पोटी १ : पत्रकार हेमंत जोशी


शुद्ध बिजा पोटी १ : पत्रकार हेमंत जोशी 

आपल्या आई किंवा वडिलांच्या ज्या वाईट वृत्तीमुळे विचित्र स्वभावामुळे किंवा जडलेल्या हलकट सवयींमुळे अथवा वाईट व्यसनांमुळे घरादाराचे नुकसान झाले राखरांगोळी झाली, कुटुंबाचे हाल हाल झाले, अवलंबून असलेल्यांचे अति नुकसान झाले, कुटुंब रस्त्यावर आले ती वृत्ती तो स्वभाव ती व्यसने आपल्यात येऊ रुजू नयेत याची काळजी पुढल्या पिढीने नक्की घ्यायला हवी.जसे अकोल्यात अजय नावाचा माझा एक मित्र आहे तो पिढीजात श्रीमंत होता, जमीनदार होता पण ऐन तारुण्यात त्याच्या वडिलांना दारूचे एवढे जबरी व्यसन लागले कि ते भर जवानीत वारले तरुण पत्नी आणि चार मुलांना वरून कर्जबाजारी झालेल्या या अख्य्या कुटुंबाला मागे सोडून, ते गेले तेव्हा अजय अगदी लहान होता पण आईचे होणारे हाल, तिने मुलांना वाढविताना त्याने बघितले होते. मग त्याने एक केले कधीही कोणत्याही व्यसनाला दारूला तो कधीही शिवला नाही याउलट अगदी लहान वयात घराची अतिशय सुस्वभावी, हसतमुख राहून जबाबदारी घेतली, नियोजन करून बापाचे कर्ज फेडले, आधीचे वैभव पुन्हा परत आणले आणि तिन्ही बहिणींचे मोठ्या घरी लग्न लावून दिले. समजा हाच अजय बापाच्या पावलावर पाऊल ठेवून जगला असता तर, त्याच्या आईच्या नशिबात आयुष्यभर केवळ नरकयातना भोगणे होते...

आणि हे असे घडलेले किंवा बिघडलेले तरुण आपण दरदिवशी सभोवताली बघत असतो, ज्यामुळे कुटुंबाला त्रास झाला ते लक्षण शरीराला दूरदूरपर्यंत शिवू न देणे हे खरे पुढल्या पिढीतले सुशिक्षितपणाचे लक्षण आहे. लहानपणी आमच्या घराच्या आसपास एक इस्त्रीवाला होता तो आपल्या कावळ्या वयाच्या मुलांना विडी चेतवून आणायला सांगत असे, पुढे त्याच्या दोन्ही मुलांना विडी-सिगारेट ओढण्याचे वाईट व्यसन लागले. आपल्या राज्यात गावागावातून कोल्हाटी समाज वास्तव्याला असतो या समाजातल्या स्त्रिया नाचगाणे लावण्या थोडक्यात तमाशातून कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यांच्या मुलांना आईचे नाव आणि आडनाव लावावे लागते कारण अशा स्त्रियांशी लग्न न करता ठेवून घेणे हि आपल्याकडे अनेक पिढ्यांपासून परंपरा आहे पण अलिकडल्या काही वर्षात या समाजातल्या स्त्रियांचे आणि त्यांच्या मुलामुलींचे कौतुक यासाठी वाटते कि या स्त्रिया पुढल्या पिढीतल्या पोटच्या मुलींना संगीतबारीमध्ये काम न करू न देता प्रसंगी उपाशीपोटी राहून शिकवून मोकळ्या होतात, आपली मुले वाया जाणार नाहीत, आई किंवा तरुण बायकोच्या जीवावर ऐतखाऊ होणार नाहीत याची त्या काळजी घेतात त्यामुळे अतिशय झपाट्याने हा समाज बदलतो आहे बदलला आहे त्यांच्या घरातली मुले आणि मुली रीतसर शिकून मोठ्या नोकऱ्यांमध्ये आहेत,रीतसर लग्न करून त्यांनी ठेऊन घेतलेल्या बाईची मुले हा डाग जवळपास मिटवून ते मोकळे होताहेत, त्यांच्यातले सरकारी खात्यातही मोठमोठ्या पदांवर रुजू होऊन मोकळे झाले आहेत, मला खात्री आहे पुढल्या काही वर्षांनंतर कोल्हाट्यांचे हे असे उपजीविकेचे घरातल्या तरुण देखण्या स्त्रिया साधन होते, ते या राज्याला नक्की शंभर टक्के विसरायला भाग पडतील, या समाजाचे सामुदायिक मनपरिवर्तन त्यावर कौतुक करायला शब्द कमी पडतात, विशेषतः दिवंगत डॉ. किशोर शांताबाई काळे यांचे ' कोल्हाट्याचे पोर ' हे पुस्तक कुठे मिळाले तर वाचून पाठ करून मोकळे व्हा, डॉ. काळे यांनी त्यांच्या समाजाचे अतिशय विदारक चित्र हुबेहूब त्यात उभे केलेले आहे, जे अंगावर काटा आणते...

एक बदल अलीकडे आणखी बघण्यात येतोय जरी त्या बदलाचे प्रमाण अत्यल्प असले तरी, बदल असा कि आधीच्या पिढीतले करप्ट मायबाप अशांची पुढली पिढी वाम मार्गाने नव्हे तर ऑन मेरिट पैसे मिळविण्यात आनंद मानते आहे पण हे अगदीच अल्प प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढायला हवे म्हणजे माझा बाप करप्ट होता त्याने या राज्याचे मोठे नुकसान केलेले आहे मी ते नुकसान करणार नाही असे जेव्हा प्रत्येक घरातून विशेषतः राजकारण्यांच्या नेत्यांच्या सरकारी नोकरीत काम करणाऱ्यांच्या घडेल किंवा हे घ्या माझ्या घरातले जमा काळे पैसे, सांगणारी तरुण पिढी पुढे येईल, देशाचे राष्ट्राचे राज्याचे परिवर्तन होणे प्रगती साधण्या मग खूप सोपे जाईल पण असे फारसे घडतांना दिसत नाही जसे डॉक्टर दाम्पत्याची मुले डॉक्टर होतात तसे करप्ट मायबापांची मुले देखील करप्ट निघून देशाचे वाटोळे करून मोकळे होतात याउलट देशभक्त आणि एखाद्या संतासारखे आपले उभे आयुष्य राष्ट्राला राज्याला समर्पित केलेल्या दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या सारख्या आदर्श पित्याच्या पोटी जेव्हा अशोक चव्हाणांसारखे हलकट जन्माला येतात, मनापासून हे असे बघून वाईट वाटते, दुर्दैवाने अनेक अशोक चव्हाण येथे घडतांना बिघडतांना बघावे लागते आहे. अति आश्चर्य म्हणजे जेव्हा या देशात या राज्यात भ्रष्टाचार विरोधी वातावरण तयार होत असतांना जेव्हा दिल्लीतले अतिशय बुद्धू काँग्रेस चे नेते पृथ्वीराज नव्हे तर अशोक चव्हाण यांच्या सारख्या मान खाली घालायला लावणाऱ्या नेत्यांच्या हाती पदे किंवा सत्ता सोपविणे महत्वाचे मानतात तळपायाची आग मस्तकात पोहोचते...

एका खेडूत तरुण स्त्रीवर बलात्कार झालेला असतो, खटला न्यायालयात सुरु असताना आरोपीचे वकील तिला विविध प्रश्न विचारून भंडावून सोडतात, शेवटी ते वकील जेव्हा तिला प्रश्न विचारतात कि बलात्कार होतांना किंवा झाला तेव्हा तिला कसे वाटले त्यावर वकिलाच्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन देऊन वैतागलेली ती तरुणी न्यायधीशांकडे बघून हातवारे करीत म्हणते कि साहेब, या वकिलाला काही अक्कल शिकवा, अहो, तोंडात कोणी जबरदस्तीने साखर कोंबली तर ती कडू का लागणार आहे ?

आम्हा साऱ्यांचे हे असे त्या खेडूत स्त्रीसारखे आहे कोणीतरी आपल्या तोंडात काळा पैसा नामें गु कोंबतो आहे आणि तो आपल्याला मधुर लागतो आहे. विशेष म्हणजे हि विष्ठा आपण सतत चघळतो आहे आणि पुढल्या पिढीच्या तोंडातही भरवतो आहे आपल्या स्वतःच्या हातांनी...
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment