Wednesday, 22 August 2018

ब्राम्हणांना त्रास पाटलांना सासुरवास २ : पत्रकार हेमंत जोशी


ब्राम्हणांना त्रास पाटलांना सासुरवास २ : पत्रकार हेमंत जोशी 
आरक्षणासाठी, विविध मागण्यांसाठी आपल्या राज्यात आजतागायत विविध अनेक बहुसंख्य जाती जमातीच्या लोकांनी मोर्चे काढले आहेत आंदोलने केली आहेत सभा घेतल्या आहेत, बैठका घेतलेल्या आहेत निवेदने दिलेली आहेत, भाषणातून भावना व्यक्त केलेल्या आहेत, एक ना अनेक प्रयोग आपल्या जातीला न्याय मिळवून देण्यासाठी हक्क मिळवून देण्यासाठी कितीतरी व्यक्ती आणि नेते हे करीत आलेले आहेत पण मराठा आंदोलनातून जे घडले आहे किंवा घडते आहे ते आजतागायत कधीही घडले नव्हते मग ते गोवारींचे नागपुरातले किंवा मराठवाड्यातले नामांतराचे जरी पेटलेले आंदोलन आठवले तरी...

तुम्ही तुमचे आंदोलन चालू द्या चालू ठेवा पण इतर जातीपातीच्या लोकांना त्याचा त्रास होता काम नये अशी सारी झालेली आंदोलने त्यामुळे जाती जातींमध्ये कधी त्यातून तेढ निर्माण झालेली नाही, नव्हती इतरांना कधी या अशा मेळाव्याचा मोर्चांचा आंदोलनाचा सभांचा त्रास झाला असे फारसे कधी घडले नाही, नव्हते पण यावेळी जे घडते आहे, मराठा आरक्षण आंदोलनातून जे घडलेले आहे ते इतर जातींच्या आणि मराठ्यांमधल्याही अनेकांच्या जिव्हारी यासाठी लागलेले आहे कि शिवाजी महाराजांपासून तर आजतागायत या राज्यातले मराठेतर हे कायम मराठ्यांकडे ' आपले राजे किंवा आपले राज्यकर्ते म्हणूनच बघत आलेले आहेत आणि राजानेच हे आंदोलन छेडल्यामुळे केवळ ब्राम्हणच नव्हे इतर साऱ्याच जातीजमातीचे अस्वस्थ अस्थिर झालेले आहेत, अस्वस्थ झालेले आहेत, ब्राम्हणांनी खेडी तर केव्हाच सोडलेली आहेत, आता या देशात उरलेल्या ब्राम्हणांनी हे राज्य किंवा हा देश सोडून जावे कि काय,असेही त्यांच्या मनाला वाटते आहे, त्यांचे तसे आपापसात बोलणे सुरु असते...

www.vikrantjoshi.com

मूठभर नेत्यांनी केवळ सत्तेच्या इर्षेतून तरुणांची माथी भडकावू नयेत असे मराठेतर मंडळींचे विशिष्ट हेतू आणि स्वार्थ मनात ठेवून मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांना भडकाविणार्या नेत्यांना हात जोडून सांगणे आहे कारण आम्हा सर्वांचे असे अजिबात नाही, तुम्ही मूठभर भंगार नेते सोडलेत तर बाकी सारे म्हणजे मराठे आणि मराठेतर आणि ब्राम्हण देखील आपापसात एकमेकांशी अत्यंत गुण्यागोविंदाने राहतात, आमचे आपापसात अजिबात मतभेद नाहीत, नसतात, आम्ही सारेच एकमेकांचे फ्रेंड्स आहोत, सखे आहोत, सोबती आहोत, मित्र आहोत, हे सिद्ध करणारा अगदी काल परवाचा एक प्रसंग त्यानिमीत्ते पुढे सांगतो...

माझे एक अतिशय जवळचे मित्र आहेत ते सरकारी नोकरीत फार मोठ्या हुद्दयावर आहेत, ते नागपूरच्या आसपास नोकरीला आहेत, जातीने मराठा आहेत, आपल्या जातीवर प्रेम करणारे पण हे उच्चशिक्षित मित्र इतरांचा अजिबात दुस्वास करणारे नाहीत, आम्ही एकमेकांना बऱ्या वाईट प्रसंगात धरून असतो, एकमेकांसाठी नेहमी धावून जातो. त्यांचा एकुलता एक मुलगा, त्यांना नक्कीच जीव कि प्राण तो पुण्यात असतो, तोही नोकरी करतो. मुलगा हुशार आहे, स्मार्ट आहे श्रीमंत आहे, उच्चशिक्षित आहे श्रीमंत आहे, त्यांचे मूळ विदर्भ आहे आणि हे त्या मुलाविषयी येथे यासाठी सांगतो आहे कि मुलगा लग्नाचा आहे, इच्छुकांनी माझ्याशी नक्की संपर्क साधावा. नागपूरवरून मला मित्राचा फोन आला कि त्यांच्या ह्या मुलाला दोन तीन दिवस ताप येत होता म्हणून त्याने टेस्ट करवून घेतल्यानंतर असे आढळून आलेले आहे कि त्याला डेंग्यू झालेला आहे, आम्ही दोघे येथे, तो एकटाच तेथे, आम्ही आणि तोही घाबरले आहोत, त्याला पुण्याच्या दीनानाथ मध्ये ऍडमिट करायचे आहे, तुम्ही काहीतरी करा. मी त्यांना म्हणालो, तुम्ही निश्चिन्त होऊन माझ्यावर सारे सोडून द्या, मी त्याला तेथे दाखल करवून घेण्याची व्यवस्था करतो...

आता आणखी विस्ताराने सांगतो, जगप्रसिद्ध आर्किटेक्त्त शशी प्रभू यांचे धाकटे चिरंजीव अतुल, सह्याद्री वाहिनीवर बातम्या देणारे शैलेश पेठे आणि लता मंगेशकर यांचे सख्खे भाचे योगेश खडीकर हे तिघेही एकमेकांचे जिवलग मित्र आहेत आणि ते माझेही चांगले मित्र आहेत. मी एकाचवेळी चार वेगवेगळ्या मित्रांना फोन केला जे ब्राम्हण होते, दीनानाथ मध्ये दाखल करवून घेणे कठीण असे काम असते म्हणून सर्वात आधी मी थेट योगेश खडीकर आणि मंत्री गिरीश बापट यांचे खाजगी सचिव चिंतामणी जोशी यांना फोन केला पुढल्या दहा मिनिटात त्या दोघांचेही मला फोन आले, बेड खाली नाहीत तरीही त्याची ऍडमिट करवून घेण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे, त्याने नाव सांगितले कि सारे काही व्यवस्थित होईल, येथे मी अर्धा निश्चिन्त झालो त्यानंतर मुला सोबत कोणीतरी असावे राहावे म्हणून ब्राम्हणांचे या राज्यातले नेतृत्व करणाऱ्या पुण्यातले एक व्यवसायिक मित्र विश्व्जीत देशपांडे आणि बुलडाणा अर्बन बँकेचे बॉस शिरीष देशपांडे या दोघांना फोन केला, शिरीष म्हणाले, अर्ध्या रात्री सांगा, काय करायचे आहे, सारे काही व्यवस्थित होईल तिकडे विश्व्जीत देशपांडे सारी कामे बाजूला ठेवून उठले आणि त्यांनी थेट त्या मुलास दीनानाथ मध्ये जाऊन गाठले, ज्या मुलाचे किंवा त्याच्या वडिलांचे तोंड देखील तत्पूर्वी विश्व्जीत देशपांडे यांनी बघितलेले नव्हते ते सतत त्याच्या संगतीने आहेत, होते, आता त्याची प्रकृती स्थिर आहे, आणि विश्व्जीत कंटिन्यू लक्ष ठेवून आहेत, त्याच्या संगे कायम उभे आहेत, पुण्यातल्या ब्राम्हणांना आम्ही पुणेतर ब्राम्हण देखील कायम चिडवत आलेलो आहे तेच हे पुण्यातले ब्राम्हण चिंतामणी जोशी, शिरीष देशपांडे आणि विश्व्जीत देशपांडे. महत्वाचे म्हणजे माझ्या मित्राच्या मुलास अडचण असतांनाही दीनानाथ मध्ये ऍडमिट करवून घेणारे डॉक्टर देखील योगायोगाने ब्राम्हणच 
होते. आणि हो, योगेश चे मनापासून आभार, एवढ्या मोठ्या घराण्याची त्याची परंपरा, त्याने मला या संदर्भात वेळोवेळी आपणहून फोन करणे, न विसरता येणारे, प्रसंग तसा लहान पण आठवणी मोठ्या आहेत, हृदयात कोरून ठेवाव्यात अशा...

आई शपथ घेऊन सांगतो, येथे मला ब्राम्हणांची लाल करायची नाही म्हणजे त्याक्षणी जर एखादा ब्राम्हणाचा मुलगा आजारी असता तर माझे पुण्यातले मराठे मित्र देखील नेमके याच पद्धतीने धावून आले असते, म्हणून राग त्या मूठभर नेत्यांचा येतो ज्यांना हातची सत्ता गेली म्हणून अस्वस्थ व्हायला होते आहे, त्यातून ते मराठा तरुणांची माथी भडकविण्याचे मोठे पाप करताहेत, आपापसात आमचे असे काहीही नसते, पुन्हा मी नेहमीचे वाक्य सांगतो, मराठा माझ्या पाठीशी नसते तर मला फार मोठे कधीही होता आले नसते, आंदोलन नक्की करावे पण इतरांना त्रास न देता...
क्रमश:


 पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment