Tuesday, 14 August 2018

महत्वाकांक्षी महाजन : पत्रकार हेमंत जोशी

महत्वाकांक्षी महाजन : पत्रकार हेमंत जोशी 
सध्या आटोपते घेतल्या गेलेले मराठा आरक्षण आंदोलन, त्याविषयी नक्की इतरत्र तुम्ही न वाचलेले मला लिहायचे आहे, थोडा वेळ द्या. पण जे झाले ते बरे झाले म्हणजे अतिशय चिघळलेले आंदोलन मागे घेतल्या गेले अन्यथा या राज्यातल्या मराठ्यांचे त्या ब्राम्हणांसारखेच 
झाले असते, इतिहासातले ब्राम्हण जसे त्यांनी केलेल्या अनेक चुकांतून पुढे पन्नास वर्षे ब्राम्हणेतर मंडळींच्या मनातून उतरले होते, ज्याची झळ आज देखील आम्हा ब्राम्हणांना सोसावी लागते आहे तेच नक्की समस्त मराठ्यांचे झाले असते, सारेच मराठेतर सतत वर्षभर विविध प्रकारच्या केलेल्या आंदोलनातून मराठेतर मंडळींना वेठीस धरत होते, सुरुवातीला त्यांच्या एकत्र येण्याचे साऱ्यांना कौतुक वाटले पण नंतर नंतर अति त्रास झाल्याने सारेच मराठेतर मराठ्यांच्या या आंदोलनाला खूप कंटाळले होते, नेमके हेच सांगायचे आहे, मराठे मराठेतरांच्या मनातून उतरण्याची उघड चिन्हे दिसू लागलेली होती, त्याचा बसलेला फटका सांगली आणि जळगाव महापालिका निवडणूकातून दिसून आला. शक्यतो नेते हे मराठेच असावेत असे आमचे मत आहे पण वर्षानुवर्षे हे राज्य हाकटणारे मराठेच त्रास द्यायला निघाल्यानंतर इतर त्रासले, म्हणून वर सांगितले कि ते देखील इतिहासातल्या ब्राम्हणांसारखे पुढे खूप वर्षे मराठेतरच नव्हे तर सामान्य मराठ्यांच्या देखील मनातून उतरले असते. आता नेमक्या विषयाला हात घालतो, नको तेथे हात घालायला मला देखील मनापासून आवडते...

जळगाव खान्देश ची म्हणाल तर हि राजकीय परंपरा आहे म्हणजे आधी बोट पकडून चालायचे, एखाद्याचा आधार घ्यायचा पुढे त्याचा हात अलगद पकडायचा, हळू हळू पकडलेला हात मुरगाळून टाकायचा, ज्याने हात पकडू दिला त्यालाच असे अपंग करून स्वतः पुढे निघून जायचे, अगदी प्रतिभा पाटलांपासून हि परंपरा आहे, ज्यांनी बोट धरून प्रतिभा पाटलांना राजकारणात आणले, पुढे त्याच बाळासाहेबांना राजकीय पंगू करून ताई आधी राज्यात मंत्री पुढे त्या चक्क राष्ट्रपती झाल्या वास्तवात जे मधुकरराव चौधरी यांना व्हायचे 
होते ते काम बाळासाहेबांचे बोट पकडून आलेल्या प्रतिभाताईंनी पूर्ण केले...भुसावळ चे संतोष चौधरी आमदार होते, आमचे मित्र होते, अर्थात आजही आहेत, त्यांना भेटायला गेलो कि गप्पा मारता मारता ते त्यांच्या पीए ला म्हणजे संजय सावकारेला सांगायचे, जोशी आले आहेत, अमुक खायला सांगा, तमुक सांगा, मितभाषी संजय त्याच्या अत्यंत विश्वासातले, लाडके देखील, पुढे हेच संजय थेट भुसावळ मधून आमदार झाले आणि नामदार देखील, संतोष चौधरी हात चोळत घरी बसले, राजकारणातून जवळपास निदान आजमितीला तरी नोव्हेअर झालेले आहेत. एक पीए त्यांच्या कितीतरी पुढे निघून गेला आहे...

हि जी दोन उदाहरणे दिलेली आहेत त्यातले प्रतिभा पाटील किंवा संजय सावकारे, तेवढे मतलबी आणि दोन्ही चौधरी म्हणजे साक्षात कर्णाचे अवतार होते, असे अजिबात नाही, नसते. मोठ्यांच्या राजकीय चुका होतात, घेतलेले त्या त्या वेळेचे राजकीय निर्णय चुकतात त्यातून मग पर्याय कोण, असा जेव्हा समोर प्रश्न उभा ठाकतो, त्याचा फायदा राजकारणात नेहमीच वटवृक्षाच्या छायेत वाढलेल्या त्या वेळेच्या झुडुपांना मिळतो मग ते या आधीच्या वटवृक्षाची जागा घेतात, गुरूपेक्षा मग शिष्यच अधिक बलवान आणि भाग्यवान ठरतो, राजकारणात हे असे नेहमी घडते, घडत असते...
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment