Friday, 31 August 2018

फडणवीस आडनावाची मिसळ : पत्रकार हेमंत जोशी


फडणवीस आडनावाची मिसळ : पत्रकार हेमंत जोशी 
अनेक उत्कृष्ट गायक गायिकांमधून एकच महागायक किंवा महागायिका निवडल्या जाते, सौंदर्य स्पर्धा तर मोठी कठीण, जगातल्या अनेक सुंदर तरुणींमधून मिस वर्ल्ड निवडल्या जाते, मुख्यमंत्री होणे हेही तसे अतिशय कठीण काम, अनेक महाभाग मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असतात पण त्यातल्या एकाचीच निवड होते. मला आठवते विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे या दोघांचे कायम लग्नानंतर दहा बारा वर्षांनी मुलं होणाऱ्या स्त्रीसारखे व्हायचे म्हणजे जरासे फुगलेले पोट दिसले कि आजू बाजूच्या बायका जशा दिवस गेले वाटते, पद्धतीने कुजबुज करून मोकळ्या होतात आणि नंतर त्यांना कळते कि गॅस पोटात साचल्याने अमुक एका बाईचे पोट फुगलेले दिसत होते ते तसे जिवंत सुशीलकुमार शिंदे आणि दिवंगत विलासराव देशमुख यां दोघांच्याही बाबतीत व्हायचे म्हणजे यावेळी फक्त आणि फक्त सुशीलकुमार किंवा फक्त आणि फक्त विलासराव अशी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अगदी बेट लावून चर्चा रंगायची पण ऐनवेळी भलतेच नाव पुढे यायचे, माझ्या ओळखीच्या एका बाईंना लग्नानंतर तब्बल पंधरा वर्षांनी मुलं झाले जेव्हा त्या बाईचा नवरा वर्षभर तिच्यापासून दूर गेला तेव्हा. 
मला तर कधीकधी असे वाटायचे काँग्रेस हायकमांड प्रसंगी संजय जोग प्रकाश अकोलकर संजीव खांडेकर नाना मोने मधुकर भावे प्रताप आसबे भारतकुमार राऊत वैजयंती आपटे इत्यादींपैकी एखाद्याला मुख्यमंत्री करून मोकळे होतात कि काय पण ते घडले नाही, अगदीच त्यांनी राज्याचे वाटोळे केले नाही. अधून मधून तर शिवाजीराव निलंगेकरांना मांडीवर घेऊन बसणाऱ्या चाळीसगावच्या शांतिलालबापू जैनांना देखील मुख्यमंत्री झाल्याचे स्वप्न पडायचे...

माझे एक ठरलेले आहे जो कोणी मुख्यमंत्री होईल त्याचे त्याच्या कामांचे त्याने घेतलेल्या निर्णयांचे शक्यतो तोंडभरून कौतुक करायचे अपवाद एखादाच त्या अशोक चव्हाण यांच्यासारख्या अति वादग्रस्त मुख्यमंत्र्यांचा, नाही कधी यांच्यावर चार वाक्ये चांगली लिहावीत माझ्या मनाला वाटले. उद्या जर या राज्याचे मुख्यमंत्रीपद प्रसंगी एखाद्या नालायक पत्रकाराला किंवा एखाद्या भ्रष्ट मीडिया पर्सनला जरी चालून आले तरी मी त्याचे तोंड भरभरून कौतुक करेल, सांगता येत नाही या राज्याचे मुख्यमंत्रीपद कोणाच्या नशिबात मांडून ठेवलेले आहे, उद्या अमुक एखादा सजा भोगून तुरुंगातून सुटून आलेला देखील मुख्यमंत्री होऊ शकतो, भुजबळांना तर अद्याप तशीही सजा लागलेली नाही...अनेकांच्या मते फडणवीस ब्राम्हण नसते आणि मराठा असते तर त्यांना आज जो त्रास होतो तो झाला नसता, माझे नेमके याउलट मत आहे, एकतर फडणवीस यांना त्यांच्या जातीमध्ये मुख्यमंत्री होतांना फारशी स्पर्धा नव्हती एक गडकरी सोडले तर याउलट फडणवीसांच्या ऐवजी एखाद्या पाटलाचे नाव पुढे आले असते तर क्षणार्धात त्याला पाटलांमधूनच असंख्य प्रतिस्पर्धी निर्माण झाले असते, नेमके विलासरावांच्या बाबतीत हेच घडायचे, प्रत्येकवेळी भलत्याच पाटलाचे मराठ्यांचे नाव पुढे यायचे आणि त्यांना मुख्यमंत्रीपद हुलकावणी द्यायचे. देवेंद्र फडणवीस नेमके कसे हा अनेकांना पडलेला प्रश्न त्यावर मी अनेकांना म्हणतोही जेथे हे महाशय त्या अमृता यांना नीटसे कळलेले नाहीत तेथे तुम्ही कोण हो सांगणारे कि फडणवीस नेमके कसे. एक मात्र नक्की जसे पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असतांना केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे सरकार पुढे पुढे सरकवत न्यायचे कारण त्यांनी पंतप्रधान कार्यालयात काम केलेले असल्याने आणि त्यांच्या आयुष्यातली अनेक वर्षे त्यांनी दिल्लीत घालविली असल्याने त्यांना नेमके समजायचे हे लक्षात यायचे कि केंद्राला साजेशे सरकार कसे हाकायचे त्यामुळे खुद्द शरद पवार देखील पृथ्वीराज चव्हाण यांना टरकून असायचे. मात्र फडणवीसांच्या बाबतीत मला नेमके हे कळत नाही हे महोदय हुबेहूब पृथ्वीराज चव्हाणांच्या पावलावर पाऊल ठेवून कसे काय केंद्र सरकारशी आणि थेट पंतप्रधानांशी जुळवून घेत त्या सर्वांच्या गळ्यातले ताईत बनून वावरताहेत आणि वस्तुस्थिती अशी कि याच फडणवीसांनी कधीही दिल्लीत बसून राजकारण केले आहे किंवा भाजपा पदाधिकारी म्हणून काम केलेले आहे, मला वाटते सततचा राजकारणावरला अभ्यास, दिल्लीतला मित्रांचा गोतावळा, बोलका स्वभाव आणि अफाट वाचन त्यातून हे असे व्यवस्थित घडून आले असावे, घडून येत असावे, घडून आले असावे...
क्रमश :


पत्रकार हेमंत जोशी 

Thursday, 30 August 2018

भाकरी करपली ५ : पत्रकार हेमंत जोशी

भाकरी करपली ५ : पत्रकार हेमंत जोशी 

बारा पैकी एकही मंत्री कामाचा असेल तर राजीनामा देईन, एकही मंत्री कामाचा नाही, आमची कामे करीत नाही फक्त वैयक्तिक कामे करवून घेण्यात बाराही मंत्र्यांना रस आहे, शिवसेना मंत्र्यांचे भाजपाशी संधान,शिवसेना नियोजनशून्य म्हणून अधोगतीला जातेय, शिवसेनेचा एकही मंत्री कामाचा नाही, मंत्र्यांना कार्यक्रमाला बोलाविले तर त्यांना यायला वेळ नसतो, स्थानिक निवडणुकांना एकही मंत्री प्रचाराला येत नाही, शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे, युती झाली तर मी निवडणूक लढणार नाही, नागपूर अधिवशेषणाच्या दरम्यान विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी या असे आम्ही आमदार मंत्र्यांना विचारतो ते येत नाहीत, वेळ देऊनही येत नाहीत, पाठीशी एकही मंत्री उभा राहत नाही, विदर्भातल्या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देतात,
आपले मंत्री वैयक्तित कामांसाठी विविध मतदार संघात येतात पण भाजपा विरोधी प्रचार करणे ते टाळतात, वैक्तिक कामे आपले मंत्री शासन दरबारी किंवा मुख्यमंत्री फडणवीसांकडून करवून घेतात पण आमदारांचे सामान्य शिवसैनिकांचे काम होत नाही उलट त्यांना सामान्य शिवसैनिक किंवा पदाधिकारी भेटायला गेले तर अपमानित करून म्हणतात, कोणाला विचारून येथे 
आलास, का आलास, साधी विचारपूस करणे दूर, वरून थकून भागून आलेला, पदरमोड करून आलेला सेनेचा पदाधिकारी डोळ्यात पाणी आणून आल्या पावली निघून जातो..

असे एक ना अनेक आरोप जे आमदार बाळू धानोरकरांनी शिवसेनेच्या मंत्र्यांवर केले, तेव्हापासून मी सेनेच्या अनेक आमदारांशी जेव्हा या संदर्भात बोललो, नावे न सांगण्याच्या अटीवर त्यांनी आणखी अनेक पुरावे या मंत्र्यांच्या संदर्भात मला सांगितले. बाळू धानोरकर तर म्हणाले, महसूल राज्यमंत्री संजय राठोड माझ्या शेजारच्या जिल्ह्यातले पण त्यांना नगरपालिका निवडणुका प्रचारादरम्यान किंवा अन्य कुठल्याही कार्यक्रमांसाठी बोलवावे तर ते यायलाच तयार नाही, काही महाभाग तर असे आहेत, कार्यक्रमासाठी येतो म्हणून सांगतात, आम्ही कार्यक्रम घडवून आणतो, जनता जमलेली असते आणि मंत्री येताच नाहीत, आमचा आमच्या मतदारांसमोर जाहीर अपमान होतो, विरोधकांना आयते कोलीत मिळते...

www.vikrantjoshi.com

कोल्हापूरचे एक आमदार मला म्हणाले कि माझ्या एका जवळच्या महत्वाच्या कार्यकर्त्याचे म्हणजे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे एक काम आमच्या त्या वयस्क तापट फटकल मोस्ट व्हिमजिकल मंत्र्याकडे होते, काम साताऱ्यातले होते, पदाधिकाऱ्याला आमच्या या नेत्याकडे कम मंत्र्याकडे मुद्दाम कौतुकाने घेऊन गेलो, आधी स्वतःच्याच मूड मध्ये, माझ्याकडे साधे बघायलाही तयार नाहीत, एखाद्या मारक्या म्हशीसारखे माझ्याकडे काही वेळाने बघून त्यांनी विचारले काय काम आहे, मी काम सांगताच एकदम भडकले, म्हणाले तुम्ही तिकडे कोल्हापूर जिल्ह्यातले आमदार, साताऱ्याशी तुमचे काय देणे घेणे, मंत्र्याच्या बोलण्याचा सूर असा होता कि जणू मी त्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेऊन काम करतोय, नंतर क्षणार्धात त्यांना भेटायला आलेल्या एका सरकारी अधिकाऱ्याशी हेच मंत्री एवढ्या गोड गोड गप्पा मारीत बसले कि विचारू नका, मी आणि माझा सहकारी खजील होत, अपमानित होत एकमेकांकडे बघत बाहेर पडलो...

अभि नही तो इसके बाद कभी नाही, माझे हे लिखाण संपता संपता जर मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल झाले तरच काही प्रमाणात सेना किंवा भाजपामधली अस्वस्थता दूर होऊन सारे काही शांत होऊन मला वाटते त्याचा फायदा येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होईल अन्यथा शरद पवार दबा धरून बसलेले आहेतच, त्यांचे एखाद्या भूमिगत राहून मोठे काम करणाऱ्या संघटनेसारखे शिस्तबद्ध पक्षाचेप्रचार कार्य सुरु आहे, आगामी निवडणुकांच्या ते केव्हाच तयारीला लागलेले आहेत, सेना भाजपाची ग्रामीण भागावर ढिली होत असलेली पकड आणि त्याचवेळी खुबीने शक्तीने युक्तीने पवारांचा पक्ष प्रचार, मोठा धोका ऐन निवडणुकांदरम्यान युतीला होण्याची अधिक शक्यता आहे. भाकरी परतवणे अतिशय आवश्यक आहे. प्रत्येक विधान परिषद सदस्याला दूर ठेवून जे जनतेतून काबाडकष्ट करून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत केवळ त्यांच्याकडे महामंडळे आणि मंत्रीपदे सोपविणे अधिक सोयीचे ठरेल असे माझा अनुभव सांगतो...
समाप्त :


पत्रकार हेमंत जोशी 

भाकरी करपली ४ : पत्रकार हेमंत जोशी


भाकरी करपली ४ : पत्रकार हेमंत जोशी 
या राज्यातल्या विधान परिषदा निवडणुकांनी आणि राष्ट्रवादी तसेच भाजपा सारख्या नवश्रीमंत झालेल्या पक्षातल्या उमेदवारांनी प्रत्येक निवडणूक खर्चिक करून ठेवलेली आहे. कोट्यवधी रुपये गाठीशी असल्याशिवाय मोठा खर्च करण्याची ताकद असल्याशिवाय कोणीही कोणतीही निवडणूक लढविणे शक्य नाही. आधी निवडणुकांवर मोठा खर्च करायचा, होऊन जाऊ द्या खर्च म्हणायचे नंतर झालेला खर्च विविध योजनांसाठी सरकार जो निधी उपलब्ध करून देते त्यातून किंवा अन्य वाईट कामें करून खर्च केलेले पैसे कितीतरी अधिक पट वसूल करायचे, नेत्यांकडे हे दृश्य बघणे असणे मला वाटते आता हे फारच कॉमन झालेले आहे. पण भाजपाचे मंत्री किंवा मुख्यमंत्री सहकार्य करीत नाहीत कारण शिवसेना नेते त्यांची वेळोवेळी दरदिवशी माय बहीण घेतात, काढतात आणि हाती एखादे पद नाही, सत्ता नाही, मंत्री किंवा किमान राज्यमंत्री देखील केल्या गेलेले नाही, म्हणजे शिवसेनेत थेट लोकांमधून निवडून आलेल्यांना अडगळीत टाकलेले आहे आणि विधान परिषद सदस्यांना मंत्री करून मोकळे झाले आहेत त्यामुळे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल सेनेच्या ६३ आमदारांपैकी जवळपास ४० आमदारांची आर्थिक अवस्था एवढी बिकट आहे कि त्यांना आगामी विधान सभा कशी लढवावी याची फार मोठी काळजी त्यांना लागून राहिलेली आहे...

अत्यंत महत्वाचे म्हणजे निवडणूक मग ती कोणतीही असो शिवसेनेत त्या त्या निवडणुकीतल्या उमेदवारांना खर्चासाठी खर्च करण्यासाठी एकही छदाम पाठविल्या जात नाही ज्याला त्याला स्वतःच्या पदरचे पैसे काढून किंवा स्थानिक मंडळींच्या भरवशावर निवडणुकीतले आर्थिक निकष भागवावे लागतात त्यामुळे येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत अन्य राजकीय पक्षात जे घडते ते शिवसेनेत कधीही घडत नाही, खुदके जेबसे खर्च करो, तोंडावर सांगितल्या जाते. सार्वजनिक कामांची वानवा आणि हाती सत्ता नाही, रात्री झोपण्यापूर्वी डोक्याचे केस उपटण्यापलीकडे बहुतेक आमदारांच्या हाती काहीही शिल्लक नाही. आमदार बाळू धानोकर यांनी जरी कीर्तिकारांच्या उपस्थितीत पूर्व विदर्भाचे गार्हाणे साऱ्या मंत्र्यांच्या बाबतीत मांडलेले असले तरी त्यांनी केलेले आरोप या बाराही मंत्र्यांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतात असेच इतरही ठिकाणच्या आमदारांनी मनातल्या व्यथा व्यक्त करतांना मला सांगितले. असा एखादाच रत्नागिरीच्या त्या उदय सामंत यांच्यासारख्या आमदाराला जमते कि ते प्रसंगी रेड्याचेही दूध काढू शकतात, थेट एखाद्या हत्तीणीला देखील गाम्हण ठेवू शकतात, दिवाकर रावते यांना देखील खदाखदा हसवू शकतात एकाचवेळी एका हाताने सुभाष देसाईंना तर दुसर्या हाताने मिलिंद नार्वेकरांना गुदगुल्या करू शकतात फडणवीसांच्या मांडीवर बसून अजितदादांना वाकुल्या दाखवून हसवू शकतात एकीकडे सुनील तटकरेंना डोळा मारू शकतात तर दुसरीकडे कधीकाळी पत्रकार नाना जोशी यांच्याकडे टेम्पो चालविणाऱ्या आणि राजकारणात आल्यानंतर नवश्रीमंत झालेल्या भास्कर जाधवांना फ्लायिंग किस देऊन मोकळे होतात, थोडक्यात सांगायचे झाल्यास उदय सामंत किंवा प्रसाद लाड यांच्यासारखे फार कमी नेते असे असतात कि सत्ता कोणाची त्यांना फारसा फरक पडत नाही कारण ते मोठ्या खुबीने सत्तेत बसलेल्यांशी जुळवून घेतात, आपापली कामें पद्धतशीर करवून घेतात, सर्वांना हे असे जमत नसते म्हणून सत्तेपासून दूर असलेले सेनेतले बहुतेक आमदार या काळजीत पडलेले आहेत कि निवडणुका लढवायच्या तरी कशा...

इतरत्र नेमके आमदार बाळू धानोरकर कोण हे फारसे किंवा अजिबात माहित नाही केवळ ते वरोरा भद्रावती विधान सभा मतदार संघांचे प्रतिनिधित्व करतात हे असे फार तर काहींना माहित असेल पण इतरांसाठी म्हणून सांगतो कि बाळू आणि त्यांचे बंधू अनिल दोघेही या मतदारसंघाला राम लक्ष्मणाची जोडी असे सुपरिचित आहेत, अनिल तर थेट तिसऱ्यांदा नगराध्यक्ष म्हणून अलीकडे विराजमान झालेले आहेत तत्पूर्वीही अनिल उपनगराध्यक्ष होते जेव्हा नगराध्यक्ष पद हे महिलांसाठी राखीव होते अन्यथा तेव्हाही अनिल हेच नगराध्यक्ष झाले असते. थोडक्यात अनिल धानोरकर यांची शहरी भागावर चांगली पकड आहे आणि त्यांच्या सहकार्याला मदतीला थेट आमदार २४ तास उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे बाळू आणि अनिल धानोरकर यांना समजायला लागले आणि त्यांनी जेव्हा समाजकार्य करायचे किंवा राजकारणात उतरायचे ठरविले तेव्हापासून तर आजतागायत म्हणजे वयाच्या २० व्या वर्षांपासून बाळू १९९५ पासून तर आजतागायत कट्टर शिवसैनिक आहेत त्यामुळे जेव्हा केव्हा बाळू यांच्या बाबतीत अफवा पसरविल्या जाते कि ते काँग्रेस मध्ये चालले आहेत, त्यांना या अशा अफवांचा प्रचंड मानसिक त्रास होतो, मनस्ताप होतो. ते हाडाचे शिवसैनिक आहेत पण सार्वजनिक कामें अकार्यक्षम मंत्र्यांमुळे होऊ न लागल्याने त्यांनी पक्षांतर्गत बंड पुकारले, कोणाचा तरी बळी द्यावा लागणारच होता, तो बाळूचा दिल्या गेला, त्यांनी त्यांच्या मंत्र्यांवर थेट आणि 
जाहीर आरोप केल्याने सेनेंतर्गत वातावरण अस्वस्थ झालेले आहे पण एक चांगले त्यातून असे घडले आहे कि खुद्द उद्धव ठाकरे यांनी अगदी नक्की काही मंत्र्यांना डच्चू देण्याचे ठरविले आहे. बघूया कोण कोण पायउतार होतात आणि कोणा कोणाचा शपथविधी होतो...
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Sunday, 26 August 2018

भाकरी करपली ३ : पत्रकार हेमंत जोशी

भाकरी करपली ३ : पत्रकार हेमंत जोशी 

या राज्यात हिंदुत्वाची धग आणि मराठी माणसांचा स्वाभिमान कायम राहावा कायम टिकून राहावा त्यासाठी आम्ही भाऊ तोरसेकरांसारखे काही पत्रकार तोडफोड स्वभावाचे असून देखील शक्यतो काही ठिकाणी म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या तिघा तरुण तडफदार नेत्यांच्या बाबतीत किंवा तत्सम नेत्यांच्या बाबतीत गप बसतो टीका करणे टाळतो, मी तर एकेकाळचा अगदीच जेमतेम शैक्षणिक पात्रता असलेला सामान्य खेडूत, नक्की अतिशय भाग्यवान आहे कारण ज्या भाऊ तोरसेकर यांचे अख्य्या जगात एक कोटी फॉलोअर्स आहेत त्या भाऊ तोरसेकर किंवा तत्सम मंडळींच्या सान्निध्यात माझे आयुष्य चालले आहे, थोर मंडळींना तर सारेच ओळखतात पण हि थोर माणसे जेव्हा मला व्यक्तिगत ओळखतात माझ्याशी संबंध ठेवून असतात, काय वर्णावे असे भाग्य, फार कमी लोकांच्या वाटेला येते...

मनात काही ठेवले नाही, उघड कबुली आज येथे दिलेली आहे कि होय, पृथ्वीराज चव्हाणांसारख्या काही मंडळींच्या चुकांकडे आम्ही अनेकदा कानाडोळा करतो कारण अशा मंडळींच्या दीर्घकाळ नेतृत्वाची राज्याला गरज असते. अनेकदा मनात विचार येतो कि या मंडळींच्या आसपास वावरणारे राजकारणातले जे बहुसंख्य दलालरूपी किंवा नेत्यांच्या रूपात घाऊक व्यापारी वृत्तीची माणसे आहेत ज्यांचे अनेक पुरावे माझ्याकडे असतात अशांची चड्डी सोडून मोकळे व्हावे पण लिहून मोकळे होता येत नाही, या बदमाशांच्या चांगल्या नेत्यांना प्रोटेक्ट करणे आवश्यक असते. जसे दारू पिणे वाईट आहे तरीही सीमेवर काम करणाऱ्या मंडळींना दारू प्या सांगितले जाते आणि वाजवी दरात किंवा फुकटात दारू पाजली जाते कारण तेथल्या अतिशय वाईट हवामानाशी आणि शत्रूंशी दोन हात करतांना अनेकदा काही प्रमाणात जवानांच्या पोटात औषध म्हणून दारू जाणे आवश्यक असते हे असेच आमचे कि काही गोष्टी वाईट आहेत माहित असते पण कानाडोळा करावालागतो हे मराठी राज्य अमराठीच्या हाती जाऊ नये त्यासाठी. भारतीय लष्करावरून आठवले, एकदा मी एकटाच रशियाच्या सीमेजवळ असलेल्या युरोपातल्या लाथविया वरून बसने थेट लीजवानीयाला निघालो होतो, बाहेर कडाक्याची थंडी, लीजवानीयाच्या राजधानीत जसा बसमधून खाली उतरलो, थंडीने पार गारठलो, वाटले आता येथेच आपला मृत्यू होईल, कसेबसे फक्त आणि फक्त वीस पावले समोरच्या डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये गेलो, रम विकत घेतली, पोटात ओतली आणि जीव वाचवला. कधीतरी दोन तीन महिन्यातून एखादा पेग मी नक्की घेतो पण त्यादिवशी अर्धी बाटली रिचवली होती, सीमेवर काम करणाऱ्या सैनिकांवरून सहजच हे उदाहरण आठवले...

सर्वश्री दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, एकनाथ शिंदे, डॉ. दीपक सावंत, हे मंत्री आणि संजय राठोड, दादाजी भुसे, विजय शिवतारे, दीपक केसरकर, रवींद्र वायकर, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर हेच ते राज्यमंत्री ज्यांच्यावर अलीकडे अगदी उघड जाहीर आणि जहरी टीका आमदार बाळू धानोरकर यांनी केलेली आहे, टीका रास्त आणि योग्य नक्की होती, आहे. मी मनात आणले तर या सार्या मंत्र्यांचे कितीतरी पुरावे माझ्याकडे आहेत पण बदनाम मंत्र्यांचे नेते होतील जर मी उद्या अगदी पुराव्यानिशी सांगितले कि परिवहन खात्यात काय चालले आहे किंवा एकनाथ शिंदे यांची मालमत्ता सर्वाधिक कुठे आहे म्हणजे साताऱ्यात कि ठाण्यात कि पुण्यात पण असेही नाही कि कधीही पुरावे उघड करणारच नाही जर पाणी डोक्यावरून वाहून जायला लागले तर कोणतीही भीती मनात न बाळगता जे धाडसी पत्रकार करतो तेच करून मी मोकळा होईल म्हणजे सांगून मोकळा होईल कि महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी नस्त्यांची सुनावणी घेतांना नेमके कोणते व का वादग्रस्त निर्णय घेतलेले आहेत किंवा सुभाष देसाई यांनी उद्योग खात्यात नसते कोणकोणते उद्योग करून ठेवलेले आहेत, त्यापेक्षा योग्यवेळी मातोश्रीवरून भाकरी परतविल्या गेली असती तर आज हे असे अस्वस्थ आणि अशांत वातावरण शिवसेना किंवा भाजपा आमदारांच्या गोटात निर्माण झाले नसते अर्थात ज्यादा अस्वस्थता शिवसेनेत आहे भाजपाकडे चाबूक हाती घेतलेले आणि निर्णय घेण्याचे अधिकार स्वतःकडे राखून ठेवलेले हेडमास्तर मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या आमदारांच्या नाराजीचे प्रमाण अगदीच कमी आहे हि झळ शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर बसते आहे, त्यावर दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांनीच योग्य मार्ग काढून त्वरित आणि तडफेने निर्णय घेणे अत्यावश्यक आहे, गरजेचे आहे...

जाऊ द्या, फार डोके खराब करून घेऊ नका, चला हसू या, एक चुटका सांगतो, पावसाळी अधिवेशनात अमरावतीचे संजय खोडके दिसले, ते भ्रमणध्वनी सतत, जवळपास अर्धा तास कानाला लावून होते, मला राहवले नाही, मी विचारलेच, लोकांना दाखवता आहे काय कि तुम्ही कसा नवीन आणि महागडा भ्रमणध्वनी संच विकत घेतलाय ते, मी बघतोय एकही शब्द तुमच्या तोंडून निघालेला नाही.जरा गप बसाल का, क्षणभर भ्रमणध्वनी बाजूला सारत खोडके म्हणाले, पुढे ते असेही म्हणाले, अहो, पलीकडून बायको बोलते आहे...
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

भाकरी करपली २ : पत्रकार हेमंत जोशी

भाकरी करपली २ : पत्रकार हेमंत जोशी 

अलीकडे भद्रावती वरोरा विधानसभा परिक्षेत्राचे आमदार बाळू धानोरकर यांनी त्यांच्या नेत्यांवर टीका केलेली नाही, त्यांनी उद्धव किंवा आदित्य ठाकरे वाईट आहेत त्यांचे नेतृत्व कुचकामी आहे असे कुठेही म्हटलेले नाही आणि बाळासाहेबांच्या पश्चात कुठेही कमी न पडलेली शिवसेना, बापसे बेटा आणि नातू सवाई निघाले, तुम्हा आम्हा सर्वांना ते अगदी उघड दिसते आहे. बाळू धानोरकर यांनी सेनेच्या अख्ख्या मंत्र्यावर टीका केलेली आहे, ज्या दिवाकर रावते यांच्या कार्यालयात त्यांची उठबैस असते त्या दिवाकर रावते यांना देखील त्यांनी कुचकामी बिकामाचे ठरविलेले आहे आणि ते यासाठी खरे आहे कि त्यावेळेचे मंत्री दिवाकर रावते १९९५ सारखे राहिलेले नाहीत कारण अगदी उघड आहे त्यांनी सभोवताली जमविलेली अधिकारी मंडळी, त्यातले बहुतेक अतिशय भ्रष्ट आणि दुष्ट आहेत, ज्या राजेंद्र जवंजाळ यांना सार्वजनिक बांधकाम खाते थेट तुरुंगात पाठवायला निघाले होते ते थर्डग्रेड मोस्ट करप्ट राजेंद्र जवंजाळ नामें सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता दिवाकर रावते यांनी थेट परिवहन महामंडळात मागून घेतले, आता तुम्हीच सांगा, एखादी रांड नांदत्या घरात सून म्हणून आणल्यानंतर किंवा आल्यानंतर कशी अपेक्षा ठेवावी कि ती संध्याकाळी देवासमोर उदबत्ती दिवा लावून शुभम करोति म्हणेल, याउलट संध्याकाळ झाल्यानंतर मी केव्हा एकदा डान्स बार मध्ये जाऊन नाचते आणि केव्हा नाही असे तिला होईल. आणि असे कितीतरी राजेंद्र जवंजाळ त्या दिवाकर रावतेंनी जवळ बाळगल्यानंतर, कसे ते अख्खे परिवहन खाते किंवा परिवहन महामंडळ थेट रावतेंना १९९५ पद्धतीने एक मंत्री म्हणून जगू देईल, आमचे अगदी सुरुवातीपासून दिवाकर रावते यांच्यावर अगदी उघड प्रेम आहे, कडवा शिवसैनिक कसा असावा त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे फक्त आणि फक्त दिवाकर रावते, उद्या समजा शिवसेनेचा प्रतिनिधी मुख्यमंत्री होणार असेल तर कसे रावते यांचे नाव पुढे येईल जर हेच रावते सुभाष देसाई किंवा रामदास कदम यांच्या पावलावर पाऊल ठेवून एक मंत्री म्हणून घसरणार असतील, देव करो आणि परिवहन खात्याचे वाभाडे न काढण्याची सुबुद्धी परमेश्वर मला देवो, शक्यतो मला रावते यांना दुखवायचे नाही पण खानदानी रावते यांनी त्यांच्या खात्यात घरंदाज मंडळींना महत्वाच्या पदावर नेमणे जेथे आवश्यक होते त्यांनी थेट फोर्ह्स रोडवरच्या रांडांना तेथे आणून ठेवलेले आहे, जे अत्यंत चुकीचे घडले आहे...

www.vikrantjoshi.com

आमदार बाळू धानोरकर हे कडवे सच्चे झुंजार धडाकेबाज गावठी शिवसैनिक आहेत, आधीच्या मंडळींना हुसकावून लावत भद्रावती वरोरा विधान सभा मतदार संघावर भगवा फडकविणे अतिशय कठीण असे ते काम होते पण धानोरकर यांनी ती कामगिरी यशस्वी पार पडली ते थेट आमदार झाले. कीर्तिकर यांच्या उपस्थितीत त्यांचा रोख जरी पूर्व विदर्भावर बाराही मंत्र्यांनी आणि राज्यमंत्र्यांनी अन्याय केला असा होता तरी त्यांनी भाषणातून व्यक्त केलेली खदखद या मंत्र्यांच्या बाबतीत उभ्या महाराष्ट्राला लागू पडते. ज्या कोल्हापुरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने थैमान घातले होते, वर्षानुवर्षे तेच ते आणि तेच ते नेते घराणेशाहीतून सत्तेचा उपभोग घेत होते त्या सर्वांना थेट आस्मान दाखवून आणि तेही मोदी लाट असतांना याच कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे एक दोन नव्हे तर थेट सहा आमदार निवडून आलेले असतांना आता हिंपंचवार्षिक योजना संपत आली असतांना त्या सहातल्या एकालाही मंत्री करणे तर सोडा पण साधे एखादे महामंडळ मिळू नये केवढे हे चुकीचे वागणे किंवा दुर्लक्ष...

कोल्हापूर जिल्ह्यातुन शिवसेनेचा एकही मंत्री नाही आणि नेक्स्ट टू मुख्यमंत्री भाजपाचे श्रीमान चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरातले, महत्वाची खाती सांभाळणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी भाजपाची पाळेमुळे या पंचवार्षिक योजनेत खोलवर रुजवून घेतलेली असतांना तिकडे शिवसेनेचे आमदार कसाबसा आपला खर्च काढून स्वतःला आणि शिवसेनेला जिवंत ठेवण्यात धन्य 
समजताहेत, कोल्हापूरचे असूनही चंद्रकांत पाटील या सार्या आमदारांना सवतीची लेकरे म्हणून जवळ घ्यायला तयार नाहीत आणि त्या बाराही मंत्र्यांना आपल्या मतदार संघाशिवाय आणि आपल्या कुटुंबाशिवाय जग असते ठाऊक नाही त्यामुळे हसावे कि रडावे अशी त्या सहाही आमदारांची किंवा उभ्या महाराष्ट्रातल्या साऱ्याच सेनेच्या आमदारांची आणि इतर मान्यवर जिल्हा निहाय नेत्यांची एरंडेल तेल प्यायल्यासारखी किंवा हागवणीचा त्रास मागे लागल्यासारखी बिकट आणि चिकट अवस्था आहे. आमदार धानोरकर म्हणाले ते शंभर टक्के सत्य आहे कि सेनेच्या मंत्र्यांना राज्यातल्या त्यांच्या मंडळींनी गाठले कि हे मंत्री अंगावर धावून येतात आणि विचारतात तुम्ही येथे कोणाला विचारून आलात, समोरचा मग मनातल्या मनात दात ओठ खात आल्या पावली परत जातो...

अत्यंत अत्यंत महत्वाचे असे कि राज्यातल्या कोणत्याही आमदाराची ना मंत्र्यांसमोर ना मातोश्रीवर मनातले सांगण्याची सत्य सांगण्याची हिम्मत आहे, समोर गेल्यानंतर म्हाताऱ्या बैलासारखी अवस्था झालेल्या सुभाष देसाई यांच्यासारख्ये मंत्री असोत कि ठाकरे बाप बेटे फक्त खाली मान घालून ऐकून घ्यायचे, आदेश घ्यायचे आणि पुढल्या कामाला लागायचे एवढे या सार्या आमदारांना राज्यातल्या लोकांमधून निवडून आलेल्या प्रतिनिधींना माहित आहे ते मजबूर आहेत, नाक दाबून वरून बुक्क्यांचा 
मार खाणे एवढेच काय सध्या त्यांच्या नशिबात असल्याने ते आमच्या सारख्या मित्रांच्या खांद्यावर डोके ठेवून याला अपवाद फक्त रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, नाही म्हणायला त्यांच्याकडे मान खांदयावर ठेवायला काही छान छान व्यक्ती आहेत पण इतर लोकप्रतिनिधी मात्र आमच्यासारख्या मित्रांच्या खांद्यावर मान ठेवून अक्षरश: डोळ्यात पाणी आणून आपल्या मनातली खदखद व्यक्त करून मोकळे होतात कारण त्यांना नेमके ठाऊक आहे माहित आहे प्रसंगी किंमत मोजावी लागली तरी 
पत्रकार हेमंत जोशी आपल्या मनातला उद्रेक नक्की व्यक्त करून मोकळे होतील, थेट उद्धव किंवा आदित्य यांना नेमकी माहिती लिहून किंवा देऊन मोकळे होतील, हरकत नाही म्हणून मी स्वतः बळीचा बकरा होण्याचे ठरविले आहे, शिवसेना आमदारांच्या मनातले सांगून मोकळा झालो आहे. खरेतर आता सेनेत देखील सारवा सारव करण्याची वेळ निघून गेलेली आहे, एखाद्या मुलीच्या लग्नाला एवढा विलंब व्हावा कि तिच्या नशिबी मंथली पिरियड्स निघून गेल्यानंतर हनिमून साजरा करण्याची वेळ यावी हुबेहूब सेनेतल्या आमदारांचे झाले आहे मधुमेह झाल्यानंतर जणू पंधरा वर्षांनी त्यांचे लग्न लावून दिल्यासारखे आता होणार आहे म्हणजे काही बदलघडलेत तरी, फार फार उशीर झाला आहे...
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Saturday, 25 August 2018

भाकरी करपली : पत्रकार हेमंत जोशी


भाकरी करपली : पत्रकार हेमंत जोशी 

शिवसेना भाजपा युतीने भाकरी परतवली फिरवली नाही म्हणून करपली, मी मला वाटते एकमेव कि सेना आणि भाजपा युतीने भाकरी फिरविणे कसे गरजेचे आहे, आवश्यक आहे, अत्यावश्यक आहे गेल्या तीन वर्षां पासून बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होतो, इतर सारी वृत्तपत्रे मंत्री मंडळ विस्तार आणि बदल यावर फेक बातम्या लिहून मोकळे होत होते तेव्हा मी एकमेव, विस्तार होत नाही, होणार नाही, हे देखील तुम्हाला सांगत होतो. हा त्याच्याकडे बघत होता आणि तो यांच्याकडे बघत होता म्हणजे फडणवीस उद्धवजींकडे रोखून बघत होते आणि उद्धवजी फडणवीसांकडे संशयाने पाहत होते, त्यांच्या या एकमेकांकडे पाहण्यात वेळ निघून गेली, दोघांनीही भाकरी परतवली नाही परिणामी भाकरी जळली, करपली...

विदर्भातल्या वरोऱ्याचे आमदार बाळू धानोरकरांनी थेट शिवसैनिकांसमोर आणि संपर्क नेते गजानन कीर्तिकर यांच्या साक्षीने, उपस्स्थितीत मनात साचलेल्या रागाला अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिली, शिवसेनेचे इतर आमदार अद्याप रस्त्यावर उतरलेले नाहीत एवढाच काय तो फरक, पण जी अस्वस्थता आमदार धानोरकरांच्या मनात होती त्यापेक्षा कदाचित कितीतरी अधिक पटीने मनातून अस्वस्थ शिवसेनेचे इतर आमदार आहेत, थेट निवडून न आलेल्या आमदारांना म्हणजे विधान परिषद सदस्यांना उद्धवजींनी मंत्री केले याचे तर प्रचंड अडचणींनवर लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांना अतिशय वावगे आहेत, या मुद्दयांवर निवडून आलेले बोलतांना भान सोडून माय बहीण घेतात, हीच वस्तुस्थिती आहे कि मंत्री न करण्यात आलेले पण लोकांमधून थेट निवडून आलेले सेनेतले सारेच आमदार गेल्या तीन वर्षांपासून चिडून आहेत, केवळ राजकीय करिअरची वाट लावणे नको म्हणून विशेषतः शिवसेनेतले आमदार थेट मंचावर येऊन बोलत नाहीत, फक्त आमदार धानोरकरांनी ती काळजी ती चिंता न करता भावनांना वाट मोकळी करून दिली एवढाच काय तो फरक...

www.vikrantjoshi.com

मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्तार तसेच विविध महामंडळाच्या घोषणा न केल्याने जेवढे शिवसेनेतले आमदार अस्वस्थ आहेत चिडून आहेत डूख धरून आहेत रागावलेले आहेत अशांत आहेत तेवढी गंभीर मनस्थिती भाजपाच्या आमदारांची यासाठी नाही कि एकतर जवळपास सारी महत्वाची खाती भाजपाकडे आहे, जेवढे शिवसेनेचे मंत्री फक्त आपल्या मतदारसंघाचा आणि आपल्या स्वतःचा विचार करून मोकळे होतात तेवढी खालची पातळी भाजपाच्या मंत्र्यांनी न गाठल्याने भाजपा आमदारांची बऱ्यापैकी खाजगी आणि लोकोपयोगी कामे होत आलेली आहेत, हमखास होतात, अत्यंत महत्वाचे म्हणजे जर एखादे काम 
होत नसेल तर भाजपाचे मंत्री त्यांच्या पक्षातल्या अत्यंत प्रभावी ठरलेल्या मुख्यमंत्र्यांकडे थेट आपली कैफियत मांडून मोकळे होतात आणि फडणवीस या आमदारांसाठी सदैव काहीही करायला तयार असतात अर्थात जे राज्याच्या किंवा त्या आमदारांच्या मतदारसंघाच्या हिताचे फायद्याचे असते...

अत्यंत महत्वाचे म्हणजे कामे करवून घेण्यासाठी भाजपाच्या आमदारांना अनेक पर्याय उपलब्ध असल्याने त्यांचे मंत्री मंडळ विस्तार विना फारसे काही अडकलेले किंवा अडलेले नसल्याने त्यांनाही मंत्री मंडळ विस्तार आणि बदल हवा आहे पण अगदी रस्त्यावर उतरून बंड करावे किंवा बाळू धानोरकर होऊन आपल्या भावनांना वाट मोकळी करून द्यावी एवढे गंभीर वातावरण भाजपामध्ये नाही पण असेही नाही कि त्यांना बदल नको आहेत, त्यांच्यातल्या देखील अनेक पुरुष आमदारांनी सफारी शिवून ठेवलेल्या आहेत आणि महिला आमदारांनी पैठण्या घेऊन ठेवलेल्या आहेत, जळगाव जामोद च्या आमदाराची सफारी शिवून एवढे दिवस झालेत कि अलीकडे त्यांनी म्हणे ती सफारी किडकिडीत शरीरयष्टी असलेल्या आपल्या अग्रवाल आडनावाच्या ' खास ' मित्राला देऊन टाकली आहे, म्हणाले तूच ठेव, मी दिल्लीत गेलो कि पुढल्यावेळी तुझ्या शपथविधी साठी ती कामात येईल...

ज्यांना पुढल्या विधान सभा निवडणुकीत शिवसेना सोडायची आहे म्हणजे भाजपा मध्ये प्रवेश करून मोकळे व्हायचे आहे किंवा अन्यत्र कुठल्यातरी पार्टीत निघून जायचे आहे सेनेतले असे काही आमदार थेट देवेंद्र फडणवीसांना भेटून आपली कामे करवून घेतात, मोकळे होतात पण जे आमदार सेनेचे कट्टर आहेत, कडवे शिवसैनिक आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांकडे, भाजपाच्या इतरही मंत्र्यांकडे सार्वजनिक कामे घेऊन जातांना यासाठी अवघडल्यासारखे होते कि थेट उद्धवजी किंवा सामना दैनिकाने दरदिवशी भाजपाची माय बहीण, आय माय काढून ठेवलेली असते, आपल्या नेत्यांनी ज्यांची उतरवून ठेवलेली आहे त्यांच्याचकडे कसे काम घेऊन जायचे असे त्या कट्टर आमदारांना वाटणे स्वाभाविक असल्याने आणि कामे होत नसल्याने शिवसेनेतल्याबहुतेकांचा ' बाळू धानोरकर ' झालेला आहे, आपणही बोलून बंड करून मोकळे व्हावे, शिवसेनेतल्या अनेकांना ते तसे वाटते आहे...
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Wednesday, 22 August 2018

ब्राम्हणांना त्रास पाटलांना सासुरवास २ : पत्रकार हेमंत जोशी


ब्राम्हणांना त्रास पाटलांना सासुरवास २ : पत्रकार हेमंत जोशी 
आरक्षणासाठी, विविध मागण्यांसाठी आपल्या राज्यात आजतागायत विविध अनेक बहुसंख्य जाती जमातीच्या लोकांनी मोर्चे काढले आहेत आंदोलने केली आहेत सभा घेतल्या आहेत, बैठका घेतलेल्या आहेत निवेदने दिलेली आहेत, भाषणातून भावना व्यक्त केलेल्या आहेत, एक ना अनेक प्रयोग आपल्या जातीला न्याय मिळवून देण्यासाठी हक्क मिळवून देण्यासाठी कितीतरी व्यक्ती आणि नेते हे करीत आलेले आहेत पण मराठा आंदोलनातून जे घडले आहे किंवा घडते आहे ते आजतागायत कधीही घडले नव्हते मग ते गोवारींचे नागपुरातले किंवा मराठवाड्यातले नामांतराचे जरी पेटलेले आंदोलन आठवले तरी...

तुम्ही तुमचे आंदोलन चालू द्या चालू ठेवा पण इतर जातीपातीच्या लोकांना त्याचा त्रास होता काम नये अशी सारी झालेली आंदोलने त्यामुळे जाती जातींमध्ये कधी त्यातून तेढ निर्माण झालेली नाही, नव्हती इतरांना कधी या अशा मेळाव्याचा मोर्चांचा आंदोलनाचा सभांचा त्रास झाला असे फारसे कधी घडले नाही, नव्हते पण यावेळी जे घडते आहे, मराठा आरक्षण आंदोलनातून जे घडलेले आहे ते इतर जातींच्या आणि मराठ्यांमधल्याही अनेकांच्या जिव्हारी यासाठी लागलेले आहे कि शिवाजी महाराजांपासून तर आजतागायत या राज्यातले मराठेतर हे कायम मराठ्यांकडे ' आपले राजे किंवा आपले राज्यकर्ते म्हणूनच बघत आलेले आहेत आणि राजानेच हे आंदोलन छेडल्यामुळे केवळ ब्राम्हणच नव्हे इतर साऱ्याच जातीजमातीचे अस्वस्थ अस्थिर झालेले आहेत, अस्वस्थ झालेले आहेत, ब्राम्हणांनी खेडी तर केव्हाच सोडलेली आहेत, आता या देशात उरलेल्या ब्राम्हणांनी हे राज्य किंवा हा देश सोडून जावे कि काय,असेही त्यांच्या मनाला वाटते आहे, त्यांचे तसे आपापसात बोलणे सुरु असते...

www.vikrantjoshi.com

मूठभर नेत्यांनी केवळ सत्तेच्या इर्षेतून तरुणांची माथी भडकावू नयेत असे मराठेतर मंडळींचे विशिष्ट हेतू आणि स्वार्थ मनात ठेवून मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांना भडकाविणार्या नेत्यांना हात जोडून सांगणे आहे कारण आम्हा सर्वांचे असे अजिबात नाही, तुम्ही मूठभर भंगार नेते सोडलेत तर बाकी सारे म्हणजे मराठे आणि मराठेतर आणि ब्राम्हण देखील आपापसात एकमेकांशी अत्यंत गुण्यागोविंदाने राहतात, आमचे आपापसात अजिबात मतभेद नाहीत, नसतात, आम्ही सारेच एकमेकांचे फ्रेंड्स आहोत, सखे आहोत, सोबती आहोत, मित्र आहोत, हे सिद्ध करणारा अगदी काल परवाचा एक प्रसंग त्यानिमीत्ते पुढे सांगतो...

माझे एक अतिशय जवळचे मित्र आहेत ते सरकारी नोकरीत फार मोठ्या हुद्दयावर आहेत, ते नागपूरच्या आसपास नोकरीला आहेत, जातीने मराठा आहेत, आपल्या जातीवर प्रेम करणारे पण हे उच्चशिक्षित मित्र इतरांचा अजिबात दुस्वास करणारे नाहीत, आम्ही एकमेकांना बऱ्या वाईट प्रसंगात धरून असतो, एकमेकांसाठी नेहमी धावून जातो. त्यांचा एकुलता एक मुलगा, त्यांना नक्कीच जीव कि प्राण तो पुण्यात असतो, तोही नोकरी करतो. मुलगा हुशार आहे, स्मार्ट आहे श्रीमंत आहे, उच्चशिक्षित आहे श्रीमंत आहे, त्यांचे मूळ विदर्भ आहे आणि हे त्या मुलाविषयी येथे यासाठी सांगतो आहे कि मुलगा लग्नाचा आहे, इच्छुकांनी माझ्याशी नक्की संपर्क साधावा. नागपूरवरून मला मित्राचा फोन आला कि त्यांच्या ह्या मुलाला दोन तीन दिवस ताप येत होता म्हणून त्याने टेस्ट करवून घेतल्यानंतर असे आढळून आलेले आहे कि त्याला डेंग्यू झालेला आहे, आम्ही दोघे येथे, तो एकटाच तेथे, आम्ही आणि तोही घाबरले आहोत, त्याला पुण्याच्या दीनानाथ मध्ये ऍडमिट करायचे आहे, तुम्ही काहीतरी करा. मी त्यांना म्हणालो, तुम्ही निश्चिन्त होऊन माझ्यावर सारे सोडून द्या, मी त्याला तेथे दाखल करवून घेण्याची व्यवस्था करतो...

आता आणखी विस्ताराने सांगतो, जगप्रसिद्ध आर्किटेक्त्त शशी प्रभू यांचे धाकटे चिरंजीव अतुल, सह्याद्री वाहिनीवर बातम्या देणारे शैलेश पेठे आणि लता मंगेशकर यांचे सख्खे भाचे योगेश खडीकर हे तिघेही एकमेकांचे जिवलग मित्र आहेत आणि ते माझेही चांगले मित्र आहेत. मी एकाचवेळी चार वेगवेगळ्या मित्रांना फोन केला जे ब्राम्हण होते, दीनानाथ मध्ये दाखल करवून घेणे कठीण असे काम असते म्हणून सर्वात आधी मी थेट योगेश खडीकर आणि मंत्री गिरीश बापट यांचे खाजगी सचिव चिंतामणी जोशी यांना फोन केला पुढल्या दहा मिनिटात त्या दोघांचेही मला फोन आले, बेड खाली नाहीत तरीही त्याची ऍडमिट करवून घेण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे, त्याने नाव सांगितले कि सारे काही व्यवस्थित होईल, येथे मी अर्धा निश्चिन्त झालो त्यानंतर मुला सोबत कोणीतरी असावे राहावे म्हणून ब्राम्हणांचे या राज्यातले नेतृत्व करणाऱ्या पुण्यातले एक व्यवसायिक मित्र विश्व्जीत देशपांडे आणि बुलडाणा अर्बन बँकेचे बॉस शिरीष देशपांडे या दोघांना फोन केला, शिरीष म्हणाले, अर्ध्या रात्री सांगा, काय करायचे आहे, सारे काही व्यवस्थित होईल तिकडे विश्व्जीत देशपांडे सारी कामे बाजूला ठेवून उठले आणि त्यांनी थेट त्या मुलास दीनानाथ मध्ये जाऊन गाठले, ज्या मुलाचे किंवा त्याच्या वडिलांचे तोंड देखील तत्पूर्वी विश्व्जीत देशपांडे यांनी बघितलेले नव्हते ते सतत त्याच्या संगतीने आहेत, होते, आता त्याची प्रकृती स्थिर आहे, आणि विश्व्जीत कंटिन्यू लक्ष ठेवून आहेत, त्याच्या संगे कायम उभे आहेत, पुण्यातल्या ब्राम्हणांना आम्ही पुणेतर ब्राम्हण देखील कायम चिडवत आलेलो आहे तेच हे पुण्यातले ब्राम्हण चिंतामणी जोशी, शिरीष देशपांडे आणि विश्व्जीत देशपांडे. महत्वाचे म्हणजे माझ्या मित्राच्या मुलास अडचण असतांनाही दीनानाथ मध्ये ऍडमिट करवून घेणारे डॉक्टर देखील योगायोगाने ब्राम्हणच 
होते. आणि हो, योगेश चे मनापासून आभार, एवढ्या मोठ्या घराण्याची त्याची परंपरा, त्याने मला या संदर्भात वेळोवेळी आपणहून फोन करणे, न विसरता येणारे, प्रसंग तसा लहान पण आठवणी मोठ्या आहेत, हृदयात कोरून ठेवाव्यात अशा...

आई शपथ घेऊन सांगतो, येथे मला ब्राम्हणांची लाल करायची नाही म्हणजे त्याक्षणी जर एखादा ब्राम्हणाचा मुलगा आजारी असता तर माझे पुण्यातले मराठे मित्र देखील नेमके याच पद्धतीने धावून आले असते, म्हणून राग त्या मूठभर नेत्यांचा येतो ज्यांना हातची सत्ता गेली म्हणून अस्वस्थ व्हायला होते आहे, त्यातून ते मराठा तरुणांची माथी भडकविण्याचे मोठे पाप करताहेत, आपापसात आमचे असे काहीही नसते, पुन्हा मी नेहमीचे वाक्य सांगतो, मराठा माझ्या पाठीशी नसते तर मला फार मोठे कधीही होता आले नसते, आंदोलन नक्की करावे पण इतरांना त्रास न देता...
क्रमश:


 पत्रकार हेमंत जोशी 

Tuesday, 21 August 2018

ब्राम्हणांना त्रास पाटलांना सासुरवास १ : पत्रकार हेमंत जोशी

ब्राम्हणांना त्रास पाटलांना सासुरवास १ : पत्रकार हेमंत जोशी 
राज्यातल्या तमाम ब्राम्हणांना माझे एक कडवा ब्राम्हण म्हणून आवाहन आहे कि त्यांनी सांगावे या राज्यातल्या कोणत्याही ब्राम्हणेतर विशेषतः मराठ्यांकडून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास दिल्या जातो का किंवा जाच सहन करावा लागतो, मला शंभर टक्के खात्री आहे कि ब्राम्हणाचे या राज्यातले एकही असे घर नसेल कि जे सांगून मोकळे होईल, हो, आम्हाला मराठ्यांचा, ब्राम्हणेतर मंडळींचा, दलितांचा, मुसलमानांचा त्रास होतो किंवा प्रचंड मानसिक जाच सहन करावा लागतो...

अस्वस्थ ते आहेत कि ज्या मूठभर पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना हे राज्य भाजपाच्या गोटात शिरावे वाटत नव्हते केवळ त्यातून त्यांचे हे पाद मारणे सुरु असते कि भाजपा ब्राम्हणांची आहे आणि ब्राम्हण वाईट आहेत. या मूठभर मंडळींना डोळ्यात खुपताहेत ते ब्राम्हण आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचेच एक सहकारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील. आणखी पुढे जाऊन हेही सांगतो कि दस्तुरखुद्द फडणवीस सरकारमधले देखील काही मंत्री असे आहेत कि जे या दोघांवर दुःख धरून आहेत, बदनामी मोहिमेत अप्रत्यक्ष सहभागी आहेत. मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री पाटील हे दोघे मराठा मोर्च्याच्या विरोधात नाहीत हे आरक्षणाचे मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या गावकऱ्यांना, तरुणांना, सरकारी अधिकाऱ्यांना अन्य सर्व मंडळींना समस्त मराठा विचारवंतांना, मराठ्यांची कायम कडवी बाजू घेणाऱ्या पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासारख्या दिग्ग्जना फार चांगले ठाऊक आहेत विशेष म्हणजे या राज्यातला एक विशिष्ट राजकीय पक्ष सोडला तर इतर कोणत्याही पक्षात फडणवीस विरोधी भूमिका नाही, त्या सर्व राजकीय पक्षांचा स्वतःवर प्रचंड विश्वास आहे फक्त जळते एकाच पक्षातल्या तेही मूठभर नेत्यांचे कारण अगदी उघड आहे पश्चिम महाराष्ट्रातील जी सत्ताधीश घराणी आहेत त्यांना भाजपाच्या सत्तेत येण्याने मोठी चपराक बसलेली आहे आणि त्या भाजपाचे बेधडक नेतृत्व चंद्रकांत पाटील तसेच देवेंद्र फडणवीस हे दोघे अगदी समोर येऊन करीत असल्याने त्या मूठभर मंडळींच्या मनात अस्वस्थता आहे, त्यातून ते असे व्यक्तीविरोधी वातावरण ते तयार करताहेत, चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची कशी हुर्यो उडविली जाईल त्यावर त्या जेलस मंडळींचे तेवढे लक्ष असते, अन्य कोणीही ब्राम्हणांना त्रास देत नाही आणि त्रास देतात जर असे ब्राम्हणांनी म्हटले तर ते खोटे सांगताहेत मी म्हणेल प्रसंगी चुकून असे घडत असेल तर निधड्या छातीने त्यांच्यासाठी प्रसंगी धावून जाईल, त्यांना अगदी उघड सहकार्य करेल. मी कडवा ब्राम्हण आहे, ब्राम्हणी संस्कार मानतो बऱ्यापैकी पाळतो देखील पण या राज्यातल्या ब्राम्हणांनी मला सहकार्य केलेले नाही मला घडविण्यात वाढविण्यात ब्राम्हणेतर मंडळींचा विशेषतः मराठ्यांचा मोठा हातभार आहे त्यामुळे ब्राम्हणेतर मंडळींवर वाट्टेल ते आरोप करून ब्राम्हण केवळ कसे श्रेष्ठ हे सांगण्याचा आगाऊपणा मी नक्कीच करणार नाही, खाल्ल्या मिठाला जगायचे असते असे मी आमच्या कुटुंबात नेहमीच सांगत आलेलो आहे, काही मग ऐकतात, काही ऐकून न ऐकल्यासारखे करतात...

www.vikrantjoshi.com

चंद्रकांत पाटील नेमके कसे आहेत आणि ब्राम्हणांनी मूठभर मंडळींना घाबरून तणावाखाली या राज्यात विनाकारण वावरू नये हे नेमके सांगण्यासाठी कोणीतरी पुढे येणे गरजेचे होते आणि ते आव्हान मी स्वीकारलेले आहे, यथावकाश क्रमाक्रमाने मनातले सारे मुद्दे नेमक्या पुराव्यांनिशी तुमच्यासमोर बेधडकपणे मांडणार आहे, कृपया माझे हे लिखाण सोशल मीडिया वरून जगातल्या जास्तीत जास्त ब्राम्हण मंडळींसमोर न्यावे अशी तुम्हाला विनंती आहे कारण जगातले मराठी ब्राम्हण सध्या दडपणाखाली किंवा तणावाखाली यासाठी आहेत कि त्यांना वारंवार अलीकडे असे वाटते कि गांधी वधानंतर पुढले अनेक वर्षे जो त्रास अन्याय अत्याचार जाच मानहानी मराठी ब्राम्हणांना या राज्यातल्या ब्राम्हणांना सहन करावे लागले होते ती परिस्थिती पुन्हा निर्माण झालेली आहे, मित्रहो, असे अजिबात नाही म्हणून वस्तुस्थिती तुमच्यासमोर विशद करणार आहे...

अत्यंत महत्वाचा मुद्दा असा कि ज्या ब्राम्हणेतर मंडळींच्या जीवावर भरवशावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांचे राजकीय भवितव्य मतदान अवलंबून असते त्या नारायण राणे यांना जर या राज्यातले देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि ब्राम्हण मंडळी चुकताहेत, विनाकारण मराठा आरक्षणाच्या बाबतीत डावपेच खेळताहेत, वाटले असते तर प्रसंगी राणे यांची भाजपमधून हकालपट्टी जरी झाली असती तरी त्यांनी फडणवीसांची भाजपाची बाजू घेऊन बऱ्यापैकी हे आंदोलन शांत करण्यात उघड सहभाग घेतला नसता पण त्यांनी अगदी समोर येऊन जो पाठिंबा सत्तेतल्या मंडळींना दिलेला आहे त्याचे कारण हेच आहे, राणे यांना फडणवीस किंवा अन्य सखोल समजलेले आहेत...
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Sunday, 19 August 2018

महत्वाकांक्षी महाजन : शेवटचा भाग : पत्रकार हेमंत जोशी


महत्वाकांक्षी महाजन : शेवटचा भाग : पत्रकार हेमंत जोशी 
जळगाव जिल्ह्याचे राजकारण राजकीय पक्ष्याभोवती नव्हे तर एखाद्या नेत्याभोवती फिरत असते थोडक्यात जळगाव जिल्ह्याचे मतदार हे पक्षपुजक नव्हे तर व्यक्तिपूजक आहेत, सुरुवातीला या जिल्ह्यातले मतदार दिवंगत मधुकरराव उर्फ बाळासाहेब चौधरी यांना फॉलो करणारे होते त्यांच्या लेवा एके लेवा पद्धतीच्या नेतृत्वाला उबगल्यानंतर मतदारांनी मग मुक्ताई नगरच्या प्रतिभाताई पाटलांची तरुण आणि नव नेतृत्व म्हणून गोडवे गेला सुरुवात केली, आरती करायला सुरुवात केली. सुरूवातीला प्रतिभाताई पाटलांनी बाळासाहेबांचे महत्व बरेचसे कमी केले त्यांचे महत्व कमी करण्यात दिवंगत माजी गृहराज्य मंत्री जी. तू. महाजन यांचाही मोठा सहभाग होता पण ८० च्या दशकात सुरेशदादा जैन नामें झंझावाताने खऱ्या अर्थाने बाळासाहेब चौधरी यांना खिरोद्याला त्यांच्या घरी पाठवून दिले, ज्याकाळी म्हणजे यशवंतराव चव्हाण किंवा वसंतराव नाईक यांच्या काळात सतत २२-२३ वर्षे विविध महत्वाची खाती सांभाळणारे मंत्री, आणि मुख्यमंत्री होण्याच्या स्पर्धेतले हेच बाळासाहेब सुरेशदादांसमोर जनतेला, मतदारांना आठवेनासे झाले होते, त्यांनी ज्या लेवा पाटलांवर म्हणजे आपल्या जातीच्या लोकांवर प्रेम केले होते तेही बाळासाहेबांना सुरेशदादांच्या झंझावातासमोर विसरले होते, नंतर १९९० दरम्यान म्हणजे तब्बल दहा बारा वर्षांनंतर बाळासाहेब हे विधानसभेला निवडून आले आणि शरद पवार यांनी त्यांना विधान सभेचे अध्यक्ष केले, थोडक्यात प्रदीर्घ वनवासानंतर बाळासाहेब सत्तेत आले तोपर्यंत त्यांना जी. तू महाजन, प्रतिभाताई पाटील विशेषतः सुरेशदादा जैन यांनी राज्याच्या जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात नोव्हेअर केले होते...

मात्र १९८० पूर्वी जळगाव जिल्ह्याच्या राजकीय पटलावर जो अतिप्रचंड राजकीय प्रभाव बाळासाहेब चौधरी यांचा होता ते १९९० दरम्यान विधान सभेचे अध्यक्ष सतत पाच वर्षे राहून देखील त्यांना तो प्रभाव पुन्हा पाडता आला नाही, त्यांची विधान सभेची मुदत सम्पल्यानांतर ते पुन्हा राजकीय वनवासात गेल्याचे जवळपास दृश्य होते त्यानंतर त्यांचे चिरंजीव, शिरीष चौधरी नाही म्हणायला आमदार झाले पण त्यांना बापासारखे फार पुढे जाता आले नाही, नशिबाने शिरीष निवडून आले, एवढेच म्हणता येईल. पण बाळासाहेबांना पर्याय म्हणून सुरेशदादा जैन यांचे वाढलेले राजकीय प्रस्थ आणि महत्व कमी करण्यासाठी त्यानंतर एकनाथ खडसे यांना सुरेश दादांच्या विरोधकांनी म्हणजे दस्तुरखुद्द शरद पवार, दिवंगत जी. तू. महाजन, बाळासाहेब चौधरी इत्यादी नेत्यांनी पूर्ण ताकद देऊन संपविले, विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांनी त्याकाळी एकाचवेळी अनेकांना घायाळ केले, त्यांनी सुरेशदादा जैन यांना जिल्ह्याच्या राजकारणातून हद्दपार केले, प्रतिभाताई पाटलांना मुक्ताई नगर आणि जिल्हा काँग्रेस मधून थेट अमरावतीला पाठवून दिले, त्यांनी जिल्ह्यातली काँग्रेस संपविली, दिग्गज नेते बाजूला सारले आणि स्वतःला त्याचवेळी नेता म्हणून प्रस्थापित केले...

सुरेशदादा जैन यांचे राजकीय महत्व कमी करण्यासाठी राज्यमंत्री म्हणून जी. तू महाजन आणि विधान सभाध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी आपल्या या तिसर्या लेवा बंधूला त्याकाळी जे सहकार्य केले ते बघून वाटायचे खडसे भाजपामध्ये आहेत कि काँग्रेस मध्ये, पण खडसे यांनी सारा राजकीय फायदा तोपर्यंत नावापुरत्या असलेल्या भाजपाला करून दिला आणि स्वतः देखील ते जिल्ह्याचे टॉपचे नेते झाले. आज जळगाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात दिसणारी भारतीय जनता पार्टी, हे श्रेय केवळ एकनाथ खडसे यांचे, तोपर्यंत गिरीश महाजन केवळ एका मतदार संघाचे म्हणजे जामनेरचे हिरो होते...

जळगाव जिल्हा, वर सांगितले त्याप्रमाणे व्यक्तिपूजक आहे त्यामुळे या जिल्ह्याचे राजकारण आजतागायत कोणत्याही एका नेत्याभोवताली फिरत आलेले आहे, कधी ते जी. तू. महाजन असतील, कधी प्रतिभाताई तर कधी बाळासाहेब चौधरी तर कधी सुरेशदादा जैन, या जिल्ह्यातले मतदार एकाला कंटाळले कि दुसऱ्याला जवळ घेतात मग त्या नेत्याचे लाड प्यार करतात, त्याला डोक्यावर बसवतात, कडेवर घेतात, मांडीवर झोपवून थोपटतात, नंतर वाटल्यास धो धो धोपटतात, अंगाखांद्यावर घेतात, पप्प्या घेतात, त्या नेत्या सभोवताली झिम्मा फुगडी खेळतात, प्रसंगी देवाला देखील विसरून त्याची आरती करतात, त्याला नित्य नियमाने भेटतात, अगदी त्याच्या घरी जाऊन त्याची आरती करतात, नंदुरबारच्या नवख्या तरुणाला प्रसंगी अमळनेर मध्ये आमंत्रित करून त्याला आमदार म्हणते निवडून आणतात मात्र अमुक एखादा खांद्यावर चढवून घेतलेला नेता त्यांच्याच कानात मुतायला लागला रे लागला कि आधी खान्देशी मतदार कठोर होऊन त्याच्याकडे पाठ फिरवतात नंतर जिल्ह्याच्या राजकारणातून अक्षरश: नोव्हेअर करतात मग तो कोणीही असो, आज याच जळगाव जिल्ह्याने, जळगाव शहराने विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांना प्रचंड डोक्यावर घेतलेले आहे, एकेकाळी ज्या एकनाथ खडसे किंवा सुरेशदादा जैन यांच्या समोर चिक्की लो भाई चिक्की म्हणून ओरडणारे तेच गिरीश महाजन सत्तेला चिटकून बसले आहेत आणि दादा व नाथा राजकीय परिघाबाहेर फेकल्या गेलेले आहे त्यात महाजन यांची मेहनत आणि त्या दोघांच्या गंभीर राजकीय आणि आर्थिक चुका, त्यातून महाजन पुढे गेले आहेत आणि नाथा व दादा यांच्या हाती केवळ टाळ्या पिटण्या पलीकडे काहीही उरलेले नाही, महत्वाचे म्हणजे अनेक शारीरिक व्याधींनी व्यापलेले सुरेशदादा जैन आणि एकनाथ खडसे राजकीय दृष्ट्या महाविद्यालयीन तरुणांसारखे दुडूदुडू धावणाऱ्या चॉक्लेल्टी गिरीश महाजन यांच्यासमोर कसे टिकतील, त्यावर घ्यावी तेवढी शंका कमी आहे...

पण खांदेश ची ती राजकीय परंपरा आहे म्हणजे प्रत्येक दहा वर्षांच्या काल खंडानंतर आधीच्या प्रभावी नेत्याला पर्याय तयार होत असतो, अर्थात हा पर्याय दुर्दैवाने खडसे किंवा जैन यांच्या घरी जन्माला आलेला आहे असे कोणतेही लक्षण दिसत नाही त्यामुळे महाजन यांच्यासमोर तयार होणारा पर्याय अद्याप समोर आलेला दिसत नाही पण अमुक एखादा जातीयवादी न ठरणारा आणि शुद्ध चारित्र्याला जवळ बाळगणारा नेता गिरीश महाजन यांना लगेचच पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो. एक मात्र नक्की, गिरीश महाजन यांचे समर्थक आता अगदी उघड उघड म्हणू लागलेले आहेत कि गिरीशभाऊंनी सुरेशदादा जैन असोत कि एकनाथ खडसे, ईश्वरबाबू जैन असोत कि बापाच्या पुण्याईवर जेमतेम पुढे आलेले रवींद्र प्रल्हादराव पाटील आणि अन्य कोणतेही जिल्ह्यातले नेते, त्या साऱ्यांना झुकवून नमवून हरवून बाजी मारलेली आहे आता आमचे पुढील टार्गेट आहे, फडणवीसांची जागा घेणे...
तूर्त एवढेच :


 पत्रकार हेमंत जोशी 

महत्वाकांक्षी महाजन ५ : पत्रकार हेमंत जोशी


महत्वाकांक्षी महाजन ५ : पत्रकार हेमंत जोशी
आम्ही सारे जेव्हा जळगाव जामोद या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्याच्या गावी शिकायला होतो, शाळेत होतो तेव्हा आमची आर्थिक मानसिक स्थिती पार बिघडलेली होती, गरिबीने पिचलो होतो कारण आई फार लवकर देवाघरी गेलेली, वडील शिक्षक त्यांना जेमतेम पगार तूट ते आणि आम्ही सहा भावंडे, मोठा बिकट असा तो काळ होता, आईविना मुलांना कोणी जवळ घेईना, एखाद्या अनाथासारखे ते आयुष्य होते पण त्याही व्यथित दिवसांमध्ये ज्यांनी आम्हाला न तिटकारा करता जवळ घेतले ते सदैव स्मरणात राहील आजतागायत त्यात त्यावेळेचे दुबे सर, कपले सर, पुराणिक सर असे बोटावर मोजण्याएवढे, अलीकडे श्रीमती सुधा पिंगळे देवाघरी गेल्या, त्यांचे पती आणि त्या, दोघेही अनुक्रमे प्राध्यापक आणि शिक्षक होते, जेव्हा श्रीमंत सुखवस्तू सुशिक्षित घरातली माणसे आम्हा सर्व भावंडांना हाडतूड करण्यात धन्य समजायचे त्यावेळी पिंगळे मामा आणि मामी त्यांच्या मुलामुलींना आमच्याशी मैत्रीचे संबंध ठेवतांना त्यांनी कधी आडकाठी घेतली नाही, साहजिकच अशी माणसे कायम स्मरणात कोरल्या गेलेली आहेत, अशांचे उपकार न फिटणारे....

हा आयुष्याचा खतरनाक इतिहास मला त्या धृपत सावळे यांच्यामुळे येथे आठवला. धृपत सावळे हे बुलढाणा जिल्ह्यातून काँग्रेसच्या तिकिटावर तीन तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले, त्यांचे राजकारणातले आगमन मला आजही जसेच्या तसे आठवते म्हणजे जेव्हापासून ते युथ काँग्रेस मध्ये प्रवेश करते झाले तेव्हापासून. जेव्हा बुलढाणा जिल्ह्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या संघ किंवा भाजपाला राजकीय किंवा आर्थिक ताकदीची गरज होती तेव्हा हे असे धृपतराव सारखे नेते संघ भाजपाच्या आसपास देखील नव्हते याउलट संघ किंवा भाजपाचे वाटोळे करण्यात, त्यांना तीव्र तिखट विरोध करण्यात मग्न 
होते, संघ भाजपाला भग्न करण्यात गुंतलेले होते...

येथे नेमके तेच मला सांगायचे आहे कि आपल्या वाईट काळात जी माणसे धावून येतात, आपल्याला जवळ घेतात ती खऱ्या अर्थाने आपल्यावर प्रेम करणारी, असे धृपत सावळे किंवा राज्यातले जे अनेक अलीकडे भाजपा मध्ये वाट अडवून बसलेले आहेत, बाहेरून येऊन, ज्यांनी संघ भाजपाची सेवा वाईट काळात केली त्यांना दूर सारून दूरवर ढकलून हे संधीसाधू ज्या वाईट पद्धतीने मूळ पुरुषांना मानसिक अस्वस्थ करून सोडताहेत ते मोठे वाईट असे काम आहे आणि चूक भाजपा नेत्यांची आहे जे धृपत सावळे सारख्या संधी साधू मंडळींना मांडीवर बसवून घेण्याचे पाप करून मोकळे होताहेत, असे घडायला नको होते....

काँग्रेस किंवा राष्ट्रवादी म्हणजे तीन चाकांची सायकल, जशी तीन चाकांची सायकल शिकावी लागत नाही किंवा बाथरूम सिंगर्स ला शास्त्रोक्त गायन शिकून गायक व्हावे लागत नाही तेच काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे आहे तेथे काम करण्यापूर्वी फार काही अभ्यास करून सुरुवात करावी लागत नाही, पण संघ किंवा भाजपाचे अजिबात ते तसे नाही, भाजपामध्ये काम करण्या पूर्वी संघ आणि भाजपाची नेमकी विचारसरणी त्यांचे विचार आचार आधी समजून घ्यावे लागतात, प्रचंड मेहनत घेऊन अभ्यास करून ते साध्य होते, सहजासहजी संघ आणि भाजपा कळत नाही, त्यामुळे कोणताही मागला पुढला विचार न करता रावसाहेब दानवे यांच्यासारखे प्रदेशाध्यक्ष जेव्हा केवळ नात्यागोत्याचा विचार करून आयत्यावेळी तेही अजिबात गरज नसतांना धृपत साळवे सारख्या ज्यांना संघ भाजपामधले कवडीची ज्ञान नाही अशा नेत्यांना थेट बाहेरून आयात करून जिल्हाध्यक्ष म्हणून साधना करून संघ आणि भाजपामध्ये स्थान निर्माण केलेल्या कार्यकर्त्यांच्या, स्वयंसेवकांच्या, नेत्यांच्या डोक्यावर हे असे बाहेरचे नेते लादून मोकळे होतात, स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेणे नेमके यालाच म्हणतात. एखाद्या राजकीय पक्षाचे वाटोळे त्यामुळेच होते...
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Friday, 17 August 2018

महत्वाकांक्षी महाजन ४ : पत्रकार हेमंत जोशी


महत्वाकांक्षी महाजन ४ : पत्रकार हेमंत जोशी 
अटलजी शरीराने तसे १६ तारखेला गेले पण तुमच्या आमच्या विस्मृतीत ते १४ वर्षांपूर्वीच गेलेले होते, आपण भारतीय जन्मदात्यांना किंवा ज्यांचे मीठ खाऊन घडलो, मोठे झालो त्यांना विसरतो, मग अटलजी तर फार दूरचे होते.आपल्याकडे अगदी भाजपावाल्यांनाही वेळ कुठे होता त्यांची आठवण काढायला, ते शरीराने जिवंत आहेत तेवढे मात्र सर्वांना माहित होते पण त्यांचे विचार तर केव्हाच आपल्या दृष्टीने मेलेले होते. एखादा तरी मंत्री या मंत्री मंडळात आहे का जो त्यांच्या विचाराने चालतो, बहुतेकांवर मुंडे महाजन यांच्या विचारांचा पगडा आहे, ज्याला त्याला अटलजी नव्हे फक्त पैशांनी झटपट श्रीमंत व्हायचे आहे. अटलजी तर असे होते ज्यांच्या विचारांनी प्रसंगी प्रत्येक राजकीय नेत्यांनी प्रभावित होऊन काम करायला हवे होते, प्रखर देशभक्ती आणि मोहापासून कोसो दूर. जो तो सांगतोय, मी त्यांना असे जवळून बघितले, तसे जवळून बघितले पण कोणीही हे सांगायला तयार नाही कि आम्ही त्यांचे विचार आचरणात आणले. सारेच सारखे, सत्तेतले आणि सत्तेबाहेरचे देखील...

मी माझ्या देशासाठी दिवसभरात कोणते चांगले काम केले, रात्री अंथरुणावर पडल्यानंतर, झोपण्याआधी तुम्ही हे असे कधी आपल्या मनाला विचारलेले आहे का, मी विचारतो आणि तसे वागतोही, म्हणून येथे ज्ञान पाजळतोय. अनेक भेटल्यानंतर मला विचारतात, समोरचा मग कोणीही असो, तुम्ही पंगा घेऊन मोकळे होता, भीती वाटत नाही...मी नाही सांगतो, समाजातले बदमाश वठणीवर आणणे हे अजिबात चुकीचे नाही, जीव काय आजही जाईल किंवा उद्याही...अगदी काल पर्वा तुर्की ला जाऊन आलो. मला जग बघायचे आहे, जवळपास अर्धे बघून झाले, बघूया राहिलेले कसे पूर्ण होते ते. नियोजन करतो मग प्रवासाला निघतो,त्यामुळे फार खर्च येत नाही, शॉपिंग करायचेच नसते. दिवसभरात माझा शक्यतो एकही रुपया खर्च होत नाही, दररोज एक कॉफी घेतो, ती देखील फुकटात प्यायची सोय माझ्या धाकट्या मुलाने करून ठेवलेली आहे, पैसे खर्च होत नाहीत मग न खर्च झालेले पैसे जमा करतो आणि विदेश प्रवासावर खर्च करतो. आपल्याकडे फक्त थोर विचार तेवढे आहेत, आचरणात कोणतेही चांगले विचार आणल्या जात नाहीत. टर्की मध्ये अगदी नागपूर सारखे ऊन असते पण ज्यादा वायफळ वीज खर्च होऊ नये म्हणून त्या देशात कुठेही शक्यतो वातानुकूलित यंत्रणा नाही, विशेष म्हणजे पंखे देखील नाहीत पण त्या लोकांनी हवामानाशी एवढे छान जुळवून घेतले आहे कि त्यांना या ऐषोआरामाची आठवण देखील येत नाही. मी ठिकठिकाणी पंचतारांकित हॉटेल मध्ये उतरलो होतो पण तेथल्या खोल्यांमध्ये देखील सेन्ट्रली वातानुकूलित यंत्रणा फारशी आढळली नाही फारतर भिंतींवर एसी मशिन्स बसविलेले आहेत, आपल्याकडे हे असे कधी घडेल, जो तो स्वतःच्या कुटुंबाचा नव्हे तर देशाचा विचार कधी करतांना दिसेल, कि हे कधी घडणारच नाही, चालायचेच, राजकीय पक्ष मग तो कोणताही असो, त्यांचे आदर्श गणपतराव देशमुख नव्हे जयंत पाटील असतात...

एक काळ असा होता जेव्हा एकनाथ खडसे नेते होते आणि त्यांच्या कार्यकर्त्यातले एक गिरीश महाजन होते, बघता बघता सारे बदलले, उद्या हेच गिरीश महाजन राज्याचे प्रमुख झालेत तर एकेकाळी महाजन खडसेंच्या भेटीसाठी रांगेत उभे असायचे, कदाचित आता ते खडसेंच्या बाबतीत घडेल, मुख्यमंत्र्यांनी बोलाविले कि आत जाईन, बाहेर बसलेले खडसे असे शेजारच्यांना सांगू शकतील. महाजनांनी आलेल्या सुवर्ण संधीचा स्वभावाप्रमाणे फायदा घेतला, खडसे पुरावे सोडतात, महाजन चतुर आहेत, त्यांचे पुरावे मिळविणे तसे कठीण काम असते म्हणून ते वेगाने पुढे जाताहेत, आता त्यांनी खडसेंना किंवा सुरेशदादा जैन यांना मागे टाकलेले आहे, उद्या हे असे मागे टाकणे आपल्याबाबतीतही घडू शकते का, कुठेतरी मनात हा विचार फडणवीसांनी 
कोरून ठेवायला हवा...

विविध आरोग्ये शिबिरे भरवून राज्यातल्या लोकांची वाहवा मिळविणाऱ्या गिरीश महाजन यांनी गेल्या चार वर्षात सिंचनासाठी नेमके काय केले, ते त्यांनी जनतेला ऐकवले तर बरे होईल. निर्णय घेणे किंवा घेतलेले निर्णय सांगणे सोपे असते पण निर्णय अमलात आणणे महा कठीण असे काम असते अर्थात हे मी राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देखील म्हणतो आहे कि झाडे लावून तुम्ही चांगले काम केलेले आहे पण ते जगलेत किंवा नाही हे आम्हा पत्रकारांना बघायचे आहे,थोडक्यात रोपट्यांना पाणी घालतांनाचे पत्रकार आम्हाला बघणे तेवढे रुचणार नाही जेवढे वाढलेल्या वृक्षांचे फळे चाखणारे पत्रकार बघतांना आनंद होईल, कारण फार सोपे आहे, वन खात्यातील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना वृक्ष तोडून ते खाण्याची म्हणजे गु तेवढा खाण्याची वाईट सवय पुरातन काळापासून लागलेली आहे, वृक्ष जागवून फळे चाखणारे वन कर्मचारी अधिकारी अद्याप 
जन्माला यायचे असल्याने ते मुनगंटीवार यांना देखील चुना लावून केव्हा मोकळे होतील सांगा येत नाही, म्हणून भीती वाटते. मध्यंतरी तसे पश्चिम महाराष्ट्रात घडलेही आहे म्हणजे मुनगंटीवार यांनी लावलेले वृक्ष पाणी न दिल्याने जळून खाक झाले होते, पुढे त्या प्रकरणाचे नेमके काय झाले अद्याप कळले नाही..
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

महत्वाकांक्षी महाजन ३ : पत्रकार हेमंत जोशी


महत्वाकांक्षी महाजन ३ : पत्रकार हेमंत जोशी 
भाजपाच्या प्रत्येकाला या राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे आहे, पुढल्यावेळी त्यांची सत्ता आली तर सर्वश्री एकनाथ खडसे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील आणि आता गिरीश महाजन यांनाही मुख्यमंत्री व्हायचे आहे. आधी महाजन या स्पर्धेत नव्हते आता ते साऱ्या इच्छुकांच्या पुढे निघून गेलेले आहेत, खडसे तर नेमके हेच म्हणत असतील, ज्या पोर्याले खांद्यांवर घेतलं त्यानंच कानात मुतून ठेवलं, हे म्हणण्याची वेळ भविष्यात फडणवीसांवर देखील येऊन ठेपेल....

कोण कोण पुढले मुख्यमंत्री होऊ शकतात, हे आमच्या ध्यानात येते म्हणजे काँग्रेस सत्तेत आली तर हा मान नगर जिल्ह्यातल्या, या राज्यातल्या माजी महसूल मंत्र्याला बाळासाहेब थोरातांना मिळण्याची दाट शक्यता आहे, दिल्लीत अलीकडे या राज्यातल्या ज्या दोघांचे बऱ्यापैकी महत्व वाढलेले आहे ते आहेत अर्थात बाळासाहेब थोरात आणि अमरावती जिल्ह्यातल्या भाषाप्रभू धाडसी बुद्धिमान महिला आमदार श्रीमती यशोमती ठाकूर, अद्याप महिला मुख्यमंत्री होण्याचा मान या राज्याला मिळालेला नाही, बघूया...

ज्यांच्या शब्दाला काँग्रेस श्रेष्ठींकडे मान आहे, ज्यांचे दिल्ली दरबारी वजन आहे त्या सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक यांच्यापेक्षा कितीतरी पुढे या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ते गांधी परिवाराला फार फार जवळचे आहे, चव्हाण सांगतात आणि गांधींच्या घरातले त्यावर हमखास हो म्हणतात. तेच येथे राज्यातही म्हणजे बाळासाहेब थोरात जे सांगायचे त्याला मुख्यमंत्री असतांना खडूस ठरलेले पृथ्वीराज नेहमी हो म्हणायचे, चव्हाण आणि थोरात एकमेकांच्या क्लोज आहेत, म्हणजे त्यांचे ते तसे मुंबईतल्या पत्रकारांसारखे नाही, जे सांगत सुटले आहेत कि आम्ही फडणवीसांच्या खूप खूप क्लोज आहोत, अर्थात ते फडणवीसांनी देखील म्हणायला हवे, पण ते घडतांना दिसत नाही, फडणवीसांना फार तर तिरळे बघणार्या तरुणीची उपमा द्या, त्यांचे ते तसे सुरुवातीपासूनच तसे आहे, अनेकांना वाटते, फडणवीस फक्त आपल्याकडे बघून हसताहेत. एक बरे झाले फडणवीसांचे अमृता एके अमृता वागणे आहे ते जर सुशीलकुमारांच्या रांगेतले असते तर दरदिवशी घायाळ होणाऱ्या तरुणींची संख्या झपाट्याने वाढते आहे, आम्हाला आढळले असते..

पार पडलेले नागपूर पावसाळी अधिवेशन संपवून आम्ही मुंबईला परत येत असतांना विमानात एकाचवेळी शेजारी एकमेकांना बिलगून घट्ट पकडून बसलेल्या बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलणे झाले, गप्पा छान रंगल्या, एरवी फारसे न हसणारे पृथ्वीराज माझ्या त्या नेहमीच्या वाक्यावर दिलखुलास हसले, मी त्यांना म्हणालो, मागल्यावेळी तुम्ही मुख्यमंत्री नसते तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी, गेट वे ऑफ इंडिया, आमच्याच मालकीचा आहे, सांगून तोही विकून टाकला असता. थोरात म्हणाले तुम्हाला माहित नसेल यदु जोशी यांचे सख्खे भाऊ आहेत, त्यावर पृथ्वीराज म्हणाले, यदु कधी बोलले नाहीत त्यावर मी त्यांना म्हणालो, पत्रकारितेत आमची त्यांच्यासमोर उंची ठेंगणी आहे असे त्यांना सतत वाटत असल्याने हे घडते, तुमच्याही बाबतीत तेच घडले असावे...जर पुढल्यावेळी तुमची सत्ता आली तर या राज्याला पुन्हा तुम्हीच हवेत, तुमचे ते कडक हेड मास्तरसारखे वागणे, जे स्वाभिमानी मराठी आहेत त्यांना आवडणारे आहे, त्यावर ते म्हणाले, मी नाही, पुढले मुख्यमंत्री हे असतील, बाळासाहेब थोरातांच्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले. त्यांच्या बोलण्याला नक्की अर्थ आहे असे सध्या तरी दिसते आहे. पण हा सारा जर तर चा प्रश्न आहे, देवेंद्र फडणवीस पुढल्यावेळी सहजा सहजी इतरांचे राज्य येऊ देतील, वाटत नाही. पण आपल्या वाटण्याला अनेकदा अर्थ नसतो, मला अनेकदा वाटायचे कि पत्रकार राजन पारकरचे लग्न एखाद्या मराठी नटीशी 
व्हावे म्हणजे आमची त्याच्या घरी उठ बैस वाढेल, पण अजून तरी ते घडलेले नाही, घडण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण राजन हा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हाताला हात लावून झाडांना पाणी घालतोय, विविध होर्डिंग्स वर त्यांचे हे फोटो बघून, अनेकांना वाटू लागलेले आहे, नवरा असावा तर असा..

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना पुन्हा एकदा दिल्लीचे वेध लागलेले दिसताहेत म्हणून त्यांनी आपल्या या मित्राचे म्हणजे बाळासाहेब थोरातांचे नाव पुढे केले असावे. चॉईस इज नॉट बॅड, थोरात मितभाषी आहेत, कमी बोलणारे पण योग्य बोलणारे आहेत विशेष म्हणजे प्रसंगी कठोर निर्णय घेणारे आहेत, बघूया वर्षभरानंतर नेमके काय घडते, आम्ही उगाचच आज येथे त्यावर चर्चा करतोय, हे म्हणजे असे झाले कि पाळण्यात नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाचे आपण धुमधडाक्यात लग्न करू, सांगण्यासारखे.नेमक्या विषयाला हात घालतो, गिरीश महाजनांचे नेमके काय, पुरावे देऊन तुम्हाला सांगतो...
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी