Wednesday, 18 July 2018

मंत्री मंडळाची पोलखोल : पत्रकार हेमंत जोशी


मंत्री मंडळाची पोलखोल : पत्रकार हेमंत जोशी 
एकदा विद्येला तिच्या आईने विचारले, 
तुला हॉरर फिल्म्स ची भीती वाटते का, 
तिने चक्क नाही सांगितले..
पुढे आईने विचारले, 
जयप्रकाशला गं...?
हो, खूप खूप खूपच भीती वाटते, 
विद्या म्हणाली..
त्यावर तिची आई एवढेच म्हणाली, 
लग्नानंतरही..
आणि लग्नानंतर एवढ्या 
वर्षांनंतरही...!! 😀

मुलगा किंवा मुलगी उपवधू किंवा उपवर झालेत आणि त्यांचे कुठे काही नसले कि आई वडील साऱ्यांना, ओळखीच्यांना सांगून 
ठेवतात, आमच्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न करायचे आहे, पत्रकार राजन पारकरला आम्ही सर्वांनी दत्तक घेतलेले आहे म्हणून आम्हाला सांगत सुटावे लागते, आमचा राजन लग्नाचा आहे, त्याच्यासाठी एखाद्या बाईचे स्थळ असेल तर सांगा..फक्त असे सांगण्याची जबाबदारी उद्या देवेंद्र फडणवीसांवर येऊन पडू नये कि आमच्या दिलीप कांबळेचे आणखी एक लग्न करवून द्यायचे आहे, एखादे त्यांना खपवून घेणारे स्थळ असेल तर सांगा..होप सो..अशी दुर्दैवी वेळ येऊ नये..निदान मला तरी वाटते, कांबळेंवर उत्तम संस्कार झाले असावेत, त्यांचा सदाशिव खोत अद्याप झालेला नसावा..मंत्रालयाचे, आमदार निवासाचे आणि नागपुरात अधिवेशन सुरु असतांना नागपुरातल्या हॉटेलांचे अनेक नेते, अधिकारी, मंत्र्यांचे कर्मचारी, अनेक आमदार आणि दलाल वेश्यालय करून ठेवतात. विशेषतः कामे करवून घेण्यासाठी काही पुरुष मंडळी जेव्हा देखण्या महिलांना मंत्रालयात सोडतात, तळपायाची आग मस्तकात पोहोचते...

या लेखाचा विषय तसा अतिशय साधा सोपा सरळ आहे, गुंतागुंतीचा अजिबात नाही, मंत्री मंडळाचा नेमका परिचय मला करवून द्यायचा आहे. सुरुवात करतो..तुम्हाला फारसे वेगळे सांगण्याची गरज नाही कि देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, फडणवीस किंवा असे चार दोनच मंत्री आणि राज्यमंत्री असे आहेत कि ज्यांची या राज्याला ओळख आहे, बहुतेक सारे जनतेला अपरिचित आहेत, दलललनां तेवढे ते माहित आहेत...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सर्वश्री चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, गिरीश बापट, दिवाकर रावते, संभाजी निलंगेकर सुभाष देशमुख हे मंत्री आहेत आणि डॉ. रणजीत पाटील, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, सदाशिव खोत हे राज्यमंत्री आहेत. तुम्हाला हे एवढेच मंत्री फडणवीस यांच्याव्यतिरिक्त ठाऊक आहेत, मला माहित आहे पण फडणवीसांचे एवढे लहान मंत्रिमंडळ नाही आणि सार्वजनिक बांधकाम व उपक्रम खात्याचे मंत्री राधेश्याम मोपलवार नाहीत ते केवळ प्रशासकीय अधिकारी आहेत या खात्याचे मंत्री ठाण्यातले एकनाथ शिंदे हे आहेत, असे अलीकडे उद्धव ठाकरे यांनी एका कंत्राटदाराला सुनावल्याचे माझी माहिती आहे. 

तसेच यवतमाळचे मदन येरावार हे देखील फडणवीसांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे राज्यमंत्री म्हणून ऊर्जा, अन्न व औषध प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, सामान्य प्रशासन हि अतिशय महत्वाची खाती आहेत, थोडक्यात येरावार हे सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयातले कर्मचारी नसून ते राज्यमंत्री आहेत आणि यवतमाळचेच एक सच्छितानंद उर्फ सच्चू ललवाणी हे देखील सुधीर मुनगंटीवार यांचे कर्मचारी नसून ते तेथे बसून काही उलटी सुलटी कामे करवून घेतात, नियमितपणे दरबार भरवून घेतही असतील पण हि केवळ मोठी चर्चा असावी. असे नेमके घडो, पण आजकाल कॅमेरे आपली नेमकी कामे मोठ्या चोखपणे पार पाडतात ना...

संचितानंद ललवाणी हे नेमके कोण म्हणजे मंत्रालयातले दलाल कि कंत्राटदार हे मात्र तुम्हाला माहित नसावे, थोडे थांबा, नेमके वास्तव नक्की मांडतो. त्यांचा आधीच्या काही मंत्रिमंडळातील इतिहास देखील सांगतो. अनेक पुरावे देतो, ते पैसे जमा करतात का आणि कोणासाठी, तेही व्यापक सांगतो. विशेष म्हणजे कामे करवून घेण्यासाठी कोणत्या मंत्र्याकडे तरुण बाईला नेले कि पटकन कामे होतात, कोणत्या मंत्र्याकडे त्याच्या भावाला भेटले कि कामे होतात किंवा विनोद तावडे यांच्यासारख्या मंत्र्यांकडे कामे करवून घ्यायची असतील तर नेमके कोणाला गाठावे लागते, कोणाला पैसे द्यावे लागतात, अमुक एखादे काम करवून घेण्यासाठी थेट पैसे मागणारे किंवा घेणारे मंत्री कोण, अगदी विस्तृत आणि नेमकी माहिती मला नक्की तुम्हाला सांगून तुमचे काम सोपे करायचे आहे. फक्त थोडा धीर धरा..
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment