Monday, 25 June 2018

माझे हे लिखाण केवळ वयस्कोके लिये: पत्रकार हेमंत जोशी

माझे हे लिखाण केवळ 
वयस्कोके लिये, १८ 
वर्षांखालील मुलांनी 
आणि स्त्रियांनी पुढले 
लिखाण वाचू नये : पत्रकार हेमंत जोशी 

लहानपणी गावातले एकमेव मनोरंजनाचे ठिकाण म्हणजे सिनेमा टॉकीज, खिशात पैसे नसायचे आणि सिनेमा पाहणे आमचे सर्वात मोठे स्वप्न असे, त्यासाठी काय काय करावे लागे हे आज आठवले तरी हसून हसून मुरकुंडी वळते. ३ वर्षांखालील मुलांना त्याकाळी तिकीट लागत नसे म्हणून मी एकदा चक्क ६-७ वर्षांचा असतांनाही आमच्या ओळखीच्या एका थोराड मुलीच्या चक्क पदराखाली कडेवर बसून आत घुसायचा प्रयत्न केला होता पण पकडल्या गेलो आणि धूम पळत सुटलो, माझ्या मागे गेटकिपर, कितीतरी वेळ ती पळापळी गावातल्यांनी बघितली होती...

केवल वयस्को के लिये, असणारे सिनेमे बघणे तर आमचे वयाच्या १५-१६ व्या वर्षी स्वप्न असे, त्यासाठी अनेक मित्रांना झुबकेदार नकली मिशा लावून जाणे अत्यावश्यक ठरे. प्यासी जवानी, जंगली कबुत्तर, अशी काहीशी विचित्र टायटल्स त्या सिनेमांची असायची. बाळू नावाचा एक वात्रट मित्र होता, त्याच्या घराशेजारी लायब्ररी होती, तेथून तो चावट पुस्तके आणून वाचत असे. वर एखादे धार्मिक पुस्तक किंवा शाळेचे पुस्तक आणि पुस्तकाच्या आत हि अशी अश्लील पुस्तके वाचणे त्याचे पॅशन असायचे, त्याचे वडील प्रचंड मारकुटे तरीही हा अशी पुस्तके अगदी त्यांच्या पुढ्यात बिनधास्त वाचून पूर्ण करीत असे. एकदा मात्र भलतेच घडले त्याने अश्लील पुस्तक आत ठेवायच्या ऐवजी त्याच्याकडून ते वर ठेवल्या गेले आणि आतल्या बाजूने ' शिवाजी महाराजांचे बालपण ' हे पुस्तक ठेवल्या गेले आणि घात झाला, बाप पुढ्यातच होता, त्याचे बिंग फुटले आणि त्याच्या बापाने एकाचवेळी त्याला व लायब्ररी चालवणाऱ्याला बेदम चोपले...

हे सारे अलीकडे ज्या देशात जाऊन आलो आफ्रिकेतल्या इथिओपियामुळे आठवले. आजचा इथिओपिया आणि ९०-९५ दरम्यानचे थायलंड यात अजिबात फरक नाही, दोन्हीही देश स्त्रीप्रधान, पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या मोठी त्यामुळे स्त्रिया आपल्या देशातल्या पुरुषांसारखे काम करतात आणि पुरुष मंडळी आराम करतात, टाइम पास करतात, सतत कॉफी पितांना दिसतात. जसे थायलंड वेश्या व्यवसायात मोठे झाले आज तेच इथिओपिया मध्ये आहे. पूर्वी थायलंड मध्ये फिरतांना अमुक एखादी स्त्री आवडल्यास ती सहज उपलब्ध होत असे आज तेच या देशात अगदी साहस घडते. थायलंड ने याच व्यवसायामुळे आर्थिक बस्तान बसविले आणि ते पुढे गेले, आता थायलंड मध्ये पूर्वीचे ते वातावरण नाही कि जी स्त्री बरी वाटली तिला हॉटेल मध्ये नेली, इथिओपिया मध्ये मात्र अतिशय मोठ्या प्रमाणात गरिबी आहे आणि हे असे प्रकार अगदी उघड आणि सर्हास आहेत...

कॉफी बीन्सचा दर्जा आणि कॉफी चे विविध प्रकार, यासाठी माझे जगभरातल्या विविध देशांमध्ये फिरणे होते, एवढेच सांगतो, इथिओपियाची बरोबरी करणारा देश अद्याप मी बघितलेला नाही पण त्यांना या व्यवसायाचे नेमके मार्केटिंग करता न आल्याने ते इतरांच्या तुलनेत खूप मागे आहेत. आपल्याकडे जेवढ्या पानाच्या आणि चहाच्या टपऱ्या नाहीत तेवढ्या अधिक प्रमाणावर तेथे कॉफी प्यायला मिळते. पावसचे आंबे खाल्यांनांतर किंवा इंदोरचे पोहे खाल्यानंतर किंवा कलकात्याचे मिशतो दोही खाल्यानंतर किंवा औरंगाबादचे तारा पण खाल्यानंतर इतरत्र ठिकाणचे ते ते पदार्थ जसे तुच्छ वाटतात तेच माझ्यासारख्या कॉफी वेड्याचे झाले आहे. एवढे दर्जेदार कॉफी बीन्स मी खचित बघितलेले आहेत...

विशेष म्हणजे तेथल्या भाज्या असोत कि इतर अन्न पदार्थ आणि कॉफी बीन्स देखील, त्यावर कोणत्याही रासायनिक प्रक्रिया अद्याप त्यावर न झाल्याने, जे खऱ्या अर्थाने ओरिजनल असते ते येथे सतत खायला मिळाले. वाईट मात्र नक्की तेथल्या तरुण होणाऱ्या मुलींचे, स्त्रियांचे वाटते. ऐन तारुण्यात पदार्पण केल्या केल्या त्यांना नको त्या घाणेरड्या व्यवसायाला जवळ करावे लागते. अर्थात आयुष्यात ड्रग्स घायचे नाहीत, नशा करायची नाही आणि वेश्यागमन काहीही झाले तरी करायचे नाही हे मी ठरविलेले असल्याने कदाचित मला वाईट वाटले असेल, त्याची आवड असणाऱ्या पुरुषांना मात्र ती पर्वणी वाटते...

अत्यंत महत्वाचे म्हणजे आम्हा भारतीयांची आजही फॉरेन पॉलिसी अगदीच भुक्कड त्यामुळे इथिओपिया सारख्या आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या देशांवर देखील आजतागायत कधीही आम्हाला राज्य करता आले नाही, चायना मात्र त्यात आपल्या कितीतरी पुढे असल्याने हा संपूर्ण देश चायनाच्या अधीन गेलेला आहे, असे वाटते इथिओपिअन्स जणू चायना चे गुलाम आहेत, वाईट वाटते. जेथे तेथे चीनचे साम्राज्य तेथे बघायला मिळते, चीन सांगेल तेच तेथे घडते, एकमेव चीन ला तेथे वेगळे आणि सोयीचे नियम आहेत...

माझ्या या लिखाणानंतर मला ठाऊक आहे, चावट पुरुषांचे तेथे जाणे येणे वाढणार आहे सांगली जिल्ह्यातल्या त्या चावट नेत्यासारखे, तो नेता व्हाया इथोपिया कायम केनियाला जातो...
तूर्त एवढेच.
पत्रकार हेमंत जोशी 
 

No comments:

Post a comment