Friday, 22 June 2018

पुणेरी पगडी काढून: पत्रकार हेमंत जोशी

पुणेरी पगडी काढून:
फुल्यांची पगडी 
घालून..
पवारांनी केला 
खून ठरवून : पत्रकार हेमंत जोशी खोडसाळ शरद पवारांनी त्यादिवशी जेवढे राज्यातल्या ब्राम्हणांना दुखावले त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने त्यांनी या राज्यातल्या ब्राम्हणांवर मनापासून प्रेम करणाऱ्या ब्राम्हणेतर मंडळींना अधिक दुखावले, दुखावले होते, ब्राम्हणेतर मंडळींनी पवारांच्या या मुद्दाम आणि उद्दाम घडवून आणलेल्या कृतीतून पवारांच्या तोंडात जे अप्रत्यक्ष शेण कोंबले ते नक्की त्यांच्या कानावर आले, पुढे त्यांनी त्यावर सारवा सारव केली पण ठरवून केलेल्या खुनाला जशी माफी नसते तेच शरद पवार यांच्या त्या, नको त्या केलेल्या कृत्यातून घडले म्हणजे त्यांचे हे असे पोरकट हेकट हलकट वागणे ब्राम्हणेतर मंडळींना अधिक लागले, झोंबले असल्याने त्यांच्याही मनातून शरद पवार उतरले आणि हिच नेमकी वस्तुस्थिती आहे...

शरद पवारांच्या या ठरवून केलेल्या म्हणाल तर गुन्ह्यांवर म्हणाल तर त्यांच्या या पोरकटपणावर जगातले सारे मराठी ब्राम्हण विशेषतः पुण्यातले, राज्यातले ब्राम्हण तर रागावले, रुसले, नाराज झालेच पण ब्राम्हणेतर त्यांच्यावर अधिक नाराज झालेत त्यात अगदी मराठे देखील नक्की आलेत त्याचे कारण असे कि प्रत्येक बहुतांश ब्राम्हणेतर मंडळींचे म्हणजे जावई सुळे यांच्यासहित साऱ्यांचे किमान पाच तरी ब्राम्हण अतिशय आवडते असतात, जिवलग असतात मग त्यात त्यांचे कार्यालयातले बॉस असतील, ब्राम्हण शेजारी पाजारी असतील,बालमित्र मैत्रिणी असतील, आजचे मित्र मैत्रिणी सवंगडी असतील विशेष म्हणजे शाळेतले शिक्षक, शिक्षिका, महाविद्यालयातले प्राध्यापक किंवा प्राध्यापिका तर हमखास असतील, पूजा सांगायला येणारे गुरुजी असतील, गुरु आणि सद्गुरू असतील, फॅमिली डॉक्टर्स असतील, ब्राम्हणेतरांच्या घरात आलेल्या सुना किंवा जावई असतील, अर्थात असे कितीतरी विविध प्रांतातले विविध ब्राम्हण असतील जे ब्राम्हणेतरांचे अतिशय जवळचे असतील त्यामुळे शरद पवार जेव्हा पुणेरी किंवा ज्याला टिळकांची पगडी काढून तेही वादग्रस्त भुजबळांना फुल्यांची पगडी घालत होते, ब्राम्हणांचा जाहीर अपमान करीत होते तेव्हा जगातल्या ब्राम्हणेतर मंडळींच्या डोळ्यासमोर त्यांनी ज्या ज्या ब्राम्हणांवर मनापासून, अगदी लहानपणापासून प्रेम केले किंवा आजही करताहेत ते ते ब्राम्हण त्यांना आठवत होते, ब्राम्हणेतरांच्या नजरेसमोर येत होते आणि त्या त्या, त्यांना प्रिय असलेल्या ब्राम्हणांचा पवारांनी केलेला जाहीर अपमान बघून जगातल्या साऱ्या ब्राम्हणेतर मंडळींना ते दृश्य म्हणाल तर मनस्वी राग आणत होते, मनस्वी चीड आणत होते म्हणाल तर त्यांना वाईटही वाटत होते, त्यातून ब्राम्हणांचे नाही तर पवारांचे नुकसान झाले, मनातून ब्राम्हण नव्हे तर शरद पवार उतरले...

आणि हो, हा शरद पवारांनी अगदी ठरवून केलेल्या खुनासारख्या अक्ख्या ब्राम्हणांचा ठरवून केलेला तो जगजाहीर अपमान होता आणि हा असा अपमान शरद पवार आजच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील ' हल्लाबोल ' आंदोलनाच्या सांगता सभेत करणार आहेत हे जसे आयोजकांना माहित होते तसे छगन भुजबळ यांना देखील माहित होते त्यामुळे त्यांनी, त्या सर्वांनी शरद पवार यांना स्पष्ट शब्दात सांगायला हवे होते कि, असे ब्राम्हणांना अगदी जाहीर एवढे अपमानित करू नका वाटल्यास यापुढे टिळकांची नव्हे तर फुल्यांची पगडी घालून आम्ही एकमेकांचे सत्कार करू, हे जाहीर करून भुजबळांच्या डोक्यावर फुल्यांची पगडी घालून मोकळे व्हा, पण अनेकांना हे माहित असतानाही त्यांनी ते शरद पवारांना सांगितले नाही, उलट बरे होईल पवार साऱ्यांच्या मनातून उतरतील, हेच त्या छगन भुजबळांसारख्या माहित असणाऱ्यांना वाटले असावे..जेव्हा हे नको ते कृत्य पवारांच्या हातून घडले तेव्हा त्यांचेच एक लाडके नेते, दिवंगत वसंत चव्हाणांचा मला स्वर्गातून फोन आला होता, म्हणाले, माझी आई जेव्हा डोक्यावरून विष्ठा, मैला वाहून नेत असे तेव्हा याच पुण्यातल्या एका उच्चशिक्षित ब्राम्हण तरुणीने माझ्याशी लग्न तर केलेच पण माझ्यासारख्या फाटक्या नेत्याचा संसार देखील रेटून नेला, घरातल्या सर्वांना तिने उत्तम घडविले देखील आणि ठाण्यातले ' खानदानी मराठे ' डॉ गजानन देसाई देखील फोन करून हेच म्हणाले, शरदरावांनी माझ्या सासरच्या मंडळींना असे अपमानित करायला नको होते...

www.vikrantjoshi.com

मी येथे पवारांनी ठरवून केलेला खून म्हणजे ठरवून केलेली चूक यासाठी म्हणालो कि हे सारे अगदी ठरवून झाले म्हणजे आधी टिळकांची म्हणजे पुणेकरांची मानाची पगडी भुजबळांच्या डोक्यावर चढवायची त्यानंतर तयारच ठेवलेली फुल्यांची पगडी जातीने पवारांनी पुणेरी पगडी काढून तदनंतर भुजबळ यांच्या डोक्यावर चढवायची, अर्थात पवार काहीही करू शकतात त्यांनी भुजबळांना, गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या भुजबळ यांना तुरुंगाबाहेर येताच मतांच्या राजकारणासाठी महात्मा फुल्यांच्या रांगेत आणून बसविले उद्या हेच शरद पवार समीर भुजबळ यांचा उल्लेख ' युवाराष्ट्र संत ' असा करून त्यांना थेट तुकडोजी महाराजांच्या रांगेत आणून ठेवतील...शरदरावजी, तुमच्या हातून हि नक्की मोठी चूक घडलेली आहे आणि ह्या तुमच्या नको त्या कृत्याचे ब्राम्हणेतर मंडळींना अगदी मराठ्यांना किंवा तुमच्या पक्षातल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देखील मनापासून खटकले आहे, आवडलेले नाही, फक्त त्यांची तुमच्यासमोर बोलण्याची हिम्मत नसल्याने त्यांनी तुम्हाला खडे बोल सुनावले नाहीत एवढाच काय तो फरक, लहान तोंडी मोठा घास घेऊन सांगतो, असे निदान तुमच्यासारख्या नेत्यांनी तरी वागू नये...

शेवटी अत्यंत महत्वाचा मुद्दा या राज्यातील विविध पद्धतीच्या मीडिया मध्ये काम करणाऱ्या ब्राम्हण प्रतिनिधींचा, वाहिन्यांवर मोठ्या हुद्द्यांवर कार्यरत असलेल्या ब्राम्हण मंडळींचा, विविध वृत्तपत्रांमध्ये विविध मनाच्या पदावर काम करणाऱ्या पत्रकारांचा किंवा ज्या ब्राम्हण मंडळींकडे वृत्तपत्रांची मालकी आहे त्या मालकांचा,थोडक्यात प्रत्येक मीडिया पर्सनचा मला त्या घटनेनंतर जेवढा अधिक राग पवारांचा आला नाही त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने या मंडळींचा यासाठी राग आला कि हे स्वतःला कायम अतिशय ग्रेट समजणारे ब्राम्हण मीडिया पर्सन, यापैकी एकाचाही स्वाभिमानी जागृत होऊन त्यांनी पवारांना आडवे तिडवे घेतले नाही, एवढे का तुम्ही पवारांना घाबरून आहात म्हणजे थेट गांडू आहात हेच म्हणणे अधिक योग्य ठरावे. तळहातावर शीर घेऊन जर आम्हा मीडियातल्या मंडळींचे जगणे वागणे बोलणे आणि लिहिणे नसेल तर आज पवारांनी अपमान केला उद्या रस्त्याच्या कडेला बसणारे भिकारी देखील ब्राम्हणांची माय बहीण काढून मोकळे होतील. खूप वाईट वाटले ज्यांनी एकेकाळी मला येथे मुंबईत स्थिर केले त्या शरद पवारांचे ज्यांनी कायम मित्र म्हणून मला सहकार्य केले त्या छगन भुजबळांचे आणि त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने मीडियातल्या ब्राम्हणांचे...
तूर्त एवढेच.

पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment