Saturday, 30 June 2018

आमची बँक ४ : पत्रकार हेमंत जोशी


आमची बँक ४ : पत्रकार हेमंत जोशी 
अलीकडे पुण्यातले सुप्रसिद्ध इमारत बांधकाम व्यवसायिक ( कुप्रसिद्ध अजिबात नाहीत, ते मुंबईतले ' बाबुलाल ' नाहीत) अमर बुट्टेपाटील व त्यांचे याच व्यवसायातले परममित्र व्यंकट बिरादार या दोघांशीही भेट झाली, ओळख झाली, पत्रकारितेशिवाय माझ्या अन्य व्यवसायात मी गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वी आहे, त्यानिमीत्ते भेट झाली आणि ओळख झाली. बिरादार तसेही माझ्या लिखाणाचे गेली अनेक वर्षे नियमित वाचक होते पण त्यांना माझ्या एकंदर लाईफ स्टाईल आणि लिखाणावरून वाटायचे कि हेही पत्रकार महाशय मोठमोठ्या तोडपण्या करणारे आहेत पण अमुक एक व्यवसाय माझा आहे आहे त्यातही मला परमेश्वर कृपेने अभ्यास आणि यश आहे, ते बघून बिरादार आधी अवाक झाले आणि त्यांनी थेट मनातले सांगितले कि त्यांना नेमके माझ्याविषयी हेच वाटायचे कि, पैसे द्या नाहीतर छापतो, पद्धतीची माझी देखील पत्रकारिता आहे, अनेकांना ते वाटते कारण माझ्या पत्रकारितेतले काही हितचिंतक माझी हि अशी बदनामी करीत असतात आणि स्वतः मात्र भले भले पत्रकार तेच करतात, दलाली करतात आणि तोडपण्या करतात, मी, आम्ही सतत थेट आणि आक्रमक लिहितो त्यामुळे आमचीही पित पत्रकारिता असे अनेकांना नक्की वाटते, वाटू शकते पण जे आमच्या अगदी जवळ आहेत,पात्यांना माहित आहे आम्ही बाप बेटे वेगळे कसे. ब्लॅकमेलिंग न करणारे या पत्रकारितेत अभय देशपांडे, भाऊ तोरसेकर, उदय निरगुडकर फार कमी आहेत... 

इमारतीच्या बांधकाम व्यवसायात देखील अमर बुट्टेपाटील किंवा व्यंकट बिरादारांसारखे फारच थोडे न फसविणारे आहेत. अमर यांनी तर मुंबई आणि पुण्यात किमान ७०-७२ इमारती बांधल्या , त्यांचे काका, साहेबराव बुट्टेपाटील  ८० च्या दशकात राजगुरूनगर मधून निवडून आलेले आमदार होते पण ते देखील रामभाऊ म्हाळगींच्या संस्कारातले होते म्हणून त्यांना मुंबईत चार वेळा थेट वरळीला आमदार कोट्यातून सदनिका मिळून देखील त्यांनी ती कधीही घेतली नाही. अमर यांचे वडील नानासाहेब बुट्टेपाटील यांनी इमारती बांधकामाच्या व्यवसायात प्रामाणिक पाउल ठेवले आणि अमर यांचे देखील वडिलांच्या पावलावर पाऊल  म्हणजे व्यवसायात सचोटी, प्रामाणिकपणा. चुकीचे काम न करता देखील पैसे मिळविता येतात, फक्त पेशन्स हवेत आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे पैशांचे आणि आयुष्याचे उत्तम नियोजन हवे. मराठा ज्ञाती मध्ये व्यवसायात उतरलेल्या मंडळींची जी पुण्यात यशस्वी संघटना आहे त्यात व्यंकट बिरादार आणि अमर बुट्टेपाटील यांचे योगदान मोठे आहे, कौतुकास्पद आहे..

हा संदर्भ येथे यासाठी कि मी बुलडाणा अर्बन वर व्यापक लिहितोय म्हटल्यावर,अनेकांना तेच वाटले असावे, काहीतरी घबाड मिळाले असावे पण असे अजिबात नसते त्यामागे एकमेव उद्देश म्हणजे माझ्या गावातल्या आणि मागास जिल्ह्यातल्या तीन पराक्रमी पुरुषांनी जगप्रसिद्ध करून सोडलेली बुलडाणा अर्बन हि ' केवळ पतसंस्था ' अलीकडे थेट मुंबईत आणली म्हणून त्यांच्या नेमक्या भूमिकेवर माझे हे लिखाण, बुलडाणा अर्बन ला मुंबईकरांनी देखील उचलून धरावे हा प्रामाणिक हेतू व उद्देश. भाईजी उर्फ राधेश्याम चांडक आणि त्यांना अगदी सुरुवातीपासून बँक व बँकेच्या प्रत्येक यशस्वी सामाजिक उपक्रमात देखील जीवापाड सहकार्य करणारे शिरीष देशपांडे, डॉ. किशोर केला, या त्रिकुटामुळे मला राहवले नाही आणि बुलडाणा अर्बन नेमकी कशी, पुरावे घेऊन लिहायला सुरुवात केली. म्हणजे मी शिरीष देशपांडे यांना म्हणालो देखील कि आता तुम्हाला मोठे यश मिळलेले आहे, तोंडाला या उतरत्या वयात फेस येईपर्यंत बुलडाणा अर्बन साठी एवढी मेहनत, आता ती कमी करा, शिरीष हसले आणि पुन्हा धावपळीत लागले. असो, दलाली करूनच मोठे होता येते हा समज पत्रकारिता करणाऱ्या नियमित दलालांनी मनातून काढून टाकावा. पैसे नक्की मिळवावेत पण तेच मिळविण्यासाठी पत्रकारिता करू नये...

एक नक्की सांगता येईल, १९८६ दरम्यान लहानशा सहकारी चळवळीतून बुलडाणा अर्बन च्या समृद्धीचा प्रवास केवळ १२ हजार रुपयांच्या भरवशावर सुरु झाला, आज त्याच बुलडाणा अर्बन च्या नऊ राज्यातून ४२२ शाखा, ५८०० कोटींच्या ठेवी आणि १०हजार कोटींची उलाढाल असा विस्तार, विशेष म्हणजे असे एकही सामाजिक क्षेत्र नसावे त्यात भाईजींच्या बुलडाणा अर्बन चा सहभाग नाही असे सामाजिक क्षेत्र नाही मग ते कार्य विकलांगांसाठी असेल, वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठीचे असेल, बुलडाणा अर्बन घेत असलेली आरोग्य शिबिरे असतील, पारदर्शी सोने तारण योजना असेल किंवा अन्य असे कितीतरी सामाजिक उपक्रम, असा हा समृद्धीचा पारदर्शी मार्ग, व्यवहार आणि समाजकार्य, दोन्हीकडे नावाजलेले, नामवंत हे भारतात पसरलेले बुलडाणा अर्बन कुटुंबीय, कौतूक करतांना शब्द नक्की अपुरे पडतात, छाती अभिमानाने फुलून येते... 

जाता जाता : 
प्लास्टिक बंदी शिथिल झाली आणि राज ठाकरे यांनी या बंदीच्या संदर्भात केलेली नेमकी टीका जवळपास खरी ठरली. रामदास कदम आणि चांगले काम, अर्थात हेही अपेक्षित नव्हतेच त्यामुळे नजीकच्या काळात प्लास्टिक बंदी केवळ कागद पत्रांपुरती नेहमीसारखी उरेल आणि काहींना त्यातून लागणारे मोठे पैसे, आपोआप नियमित मिळत राहतील, जी सोय गुटखा बंदीने अनेकांची केली तशी हुबेहूब सुरुवात आता प्लास्टिक बंदी मध्ये देखील सुरु झालेली आहे. हे सारे बघून माझ्यातल्या 
पत्रकारितेचा नेमका सिंहासन मधला निळू फुले यांचा शेवट होतो, वेड लागते...
तूर्त एवढेच.


 पत्रकार हेमंत जोशी 

Friday, 29 June 2018

आमची बँक ३ : पत्रकार हेमंत जोशी


आमची बँक ३ : पत्रकार हेमंत जोशी 
चुका नक्की होतात मग टीकाही होते, पण न थांबता पुढे पुढे जायचे असते. संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात चांगले काही घडले असे क्वचित घडते, नेते फारसे कामाचे नाहीत, त्यांना काहीतरी उभे करून त्यातून काही खायचे, हे न पटणारे त्यामुळे योजनेसाठी पैसे आले कि आधीच फस्त, गिळंकृत केल्या जातात. अलीकडे नाही म्हणायला माझ्या मूळ गावी म्हणजे जळगाव जामोदला तेथल्या आमदाराने डॉ. संजय कुटे यांनी मुख्यमंत्री त्यांना खूपच जवळचे असल्याने गावातल्या विकास कामांसाठी मोठा निधी खेचून आणला, गावाचे सुशोभीकरण केले, म्हणजे गावावर तो निधी खर्च करून, चांगला आकार आमच्या गावाला देण्याचा माझ्या आठवणीत पहिल्यांदाच प्रयत्न झाला, त्यांनी चांगले काम केले, पण काहींना ते खुपले नसावे, त्यांनी डॉ. कुटे आणि कंपूने पैसे कसे खाल्ले, काही कागदपत्रे मला आणून दिली, मी ती अडगळीत ठेवून दिलीत, आधीचे नेते देखील निधी आणायचे पण श्रीमंत स्वतः व्हायचे, डॉ कुटे यांनी निदान ते तसे तर केले नाही, चुका होत असतात, डॉ. कुटे संत तुकाराम आहेत माझे म्हणणे नाही, तळे राखी तो पाणी चाखी, तळे तयार करून थोडेसे पाणी चाखले तर लोकांचे मतदारांचे काहीही म्हणणे नसते, म्हणून कुटे यांच्या ' असतीलच चुका ' तर त्याकडे दुर्लक्ष करणे आवश्यक होते. ते उत्साही असल्याने मंत्री मंडळ विस्तार 
झालाच तर फडणवीसांचे हे विश्वासू नक्की शपथ घेणार आहेत...

एखाद्या बाईला दिवस गेले आहेत असे उगाचच अनेकांना वाटत राहते पण तसे अजिबात नसते हवा भरल्याने म्हणजे वातामुळे ते तसे वाटत राहते, दिवस गेलेले नाहीत कळले कि कुजकी माणसे म्हणतातही, हिच्या नवऱ्याचे चाकात हवा भरायचे दुकान आहे वाटते. मंत्रिमंडळ विस्ताराचे देखील तसेच आहे, पॉट फुगलेल्या पण दिवस न गेलेल्या बाईसारखे, म्हणजे उगाचच सर्वांना विशेषतः मीडियाला प्रामुख्याने कायम वाटत राहते, पुढल्या काही दिवसात मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्तार आहे, पण गेले तीन वर्षे मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्ताराचे काहीही झालेले नाही, बातम्या मात्र अमाप, त्या पोट फुगलेल्या बाईसारख्या....

बुलडाणा अर्बन पतसंस्थेचे विविध क्षेत्रात मोठे योगदान आहे, मग कधी तरी नाही म्हणायला चुका हातून घडतातही पण त्यातून काही अघटित घडेल, पतसंस्थेची ' रुपी बँक ' होईल, असे अजिबात होणार नाही, ग्राहक खड्ड्यात जाणार नाही, फसविल्या जाणार नाही याची सारे संचालक व दस्तुरखुद्द भाईजी डोळ्यात तेल घालून काळजी घेतात. एखादी पतसंस्था सामाजिक उपक्रमात किती पुढे राहून काम करू शकते याचे या देशातलेसर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे बुलडाणा अर्बन, हि मंडळी नसती तर भाकड गाई सर्हास कापल्या गेल्या असत्या, त्यांनी केलेले गोरक्षण नक्की कौतुक करण्यासारखे आणि पहाडावर वसलेल्या बुलडाणा परिसरात त्यांचे वृक्ष रोपण व संवर्धन, वा रे वा...

भक्तीची श्रेष्ठ परंपरा लाभलेल्या हिंदुस्थानची आराध्य दैवते म्हणजे तिरुपती, माहूर, ओंकारेश्वर इत्यादी, अनेक राज्यातून हि दैवते वसलेली आहेत. महाराष्ट्रातील भाविक याठिकाणी अनेकदा दर्शनासाठी जातात. त्यांची राहण्याची उत्तम सोया व्हावी या हेतूने बुलडाणा अर्बन च्या माध्यमातून या सर्व ठिकाणी भक्त निवास उभारलेले आहेत. अत्यंत महत्वाचे म्हणजे भावी पिढीचा पाया भरभक्कम होतो तो अनौपचारिक आणि औपचारिक शिक्षणामुळे. अनौपचारिक शिक्षण तर जन्मापासून प्रत्येकाला लाभत असते. मात्र बुलडाणा अर्बन ने बुलडाणा जिल्ह्यातील मुलांच्या शिक्षणाची सोय केली आहे ती संस्थेच्या सहकार विद्यामंदिराच्या तब्बल १९ शाळांमधून. जागतिक स्तरावरचे नेमके ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीने या साऱ्या दर्जेदार शाळा इंग्रजी माध्यमातून चालविल्या जातात. हो, आता माझ्या मागास जिल्ह्यातही पश्चिमेकडची पहाट उजाडली आहे. भारतभरातून या शाळांमध्ये आलेले, ज्ञानदानाचे उत्तम काम करणारे शिक्षक, आणि त्यांचे भरीव कार्य, तोंडातून भाईजींसाठी नक्की दुवा बाहेर पडतात...
अपूर्ण :


आमची बँक ३ : पत्रकार हेमंत जोशी 

Thursday, 28 June 2018

आमची बँक २ : पत्रकार हेमन्त जोशी


आमची बँक २ : पत्रकार हेमन्त जोशी 
मे महिन्यातली दुपार, व्याजाने घेतलेले पैसे परत करायचे म्हणून जोशीकाका कसेबसे चालत चालत शंकरशेटच्या घरी आले होते, घामाघूम जोशीकाकांना शेटजींचा मुलगा मोहन तांब्या आणि पेला पुढे ठेवत म्हणाला, आधी तेवढी लस्सी पिऊन घ्या...
क्षणाचाही विलंब न लावता, आज लस्सी आणि तीही कंजूष शंकरशेटच्या घरी...जोशीकाकांनी अख्खा तांब्याच तोंडाला लावून फस्त करताच, लांब कानाच्या जोशीकाकांच्या कानावर शब्द पडले...आई, सकाळी उंदीर पडलेली लस्सी काकांनी अख्खी संपवली....मोहन सांगत होता...

इकडे जोशीकाका रागाने लालबुंद, त्यांनी पुन्हा तांब्या हाती घेतला आणि फरशीवर जोरात आदळला, तांब्या फुटल्याचे बघून, मोहन पुन्हा आईला म्हणाला, आई काकांनी रागाने तांब्या फोडला गं....आता सकाळी आपण दोन नंबरला जातांना काय वापरायचे..त्यावर आई म्हणाली, मेल्या तो ग्लास उचलून आण,तुझ्या बापाची लघवी आपण लॅब मध्ये त्यातच तपासायला नेतो...

हा चुटका तसा जुना आहे पण त्यातला मतितार्थ असा कि तुम्हाला जे नको ते लोकांना काढून देऊ नका तर जे तुम्हालाही हवे असे, हवे हवेसे वाटते ते लोकांना अगदी मनापासून काढून द्या, आणि हेच बुलडाणा अर्बन बँकेच्या, पतपेढीच्या भाईजी राधेश्याम चांडक यांनी केले, आजही किंवा ३२ वर्षांपूर्वीही आमच्या बुलडाणा जिल्ह्यातल्या समस्त मंडळींना ज्या पै पै पैशांची गरज आहे किंवा गरज होती ती त्यांनी हि पतसंस्था काढून बऱ्यापैकी पूर्ण केली, जेव्हा या राज्यातले समस्त बँकवाले मराठींकडे किंवा राज्यातल्या सामान्य जनतेकडे आधी हिडीस फिडीस करायचे नंतर बाहेर काढायचे तेव्हा राधेश्याम चांडकजींनी त्यांना पोटाशी धरले आणि बँकेतर्फे जेवढे शक्य होते ते ते केले, आजही मुक्तहस्ते करताहेत म्हणून बुलडाणा अर्बन मोठी झाली, चिकित्सक पुण्यात देखील बस्तान बांधून मोकळी झाली, आता तर थेट मुंबईत आली. शहरांमधल्या महाविद्यालयात शिकायला ग्रामीण भागातून आलेल्या गावरान मुलींना जशा शहरातल्या मुली जवळ येऊ देत नाहीत, नाकाला पदर लावून त्यांना एकाकी पडतात, तेच सुरुवातीला बुलडाणा अर्बन च्या बाबतीतही घडले, बुलडाण्यातली म्हणजे थेट खेड्यातली पतसंस्था म्हणून ती शहरात आल्यानंतर आधी डिवचल्या गेली, हिणवल्या गेली नंतर मात्र तिची झेप बघितली, भरारी पाहिली 
आणि स्पर्धकांच्या माना तदनंतर आपोआप खाली गेल्या, बुलडाणा अर्बनला मिळणारे यश बघून बँकांचाही मनात धडकी भरली. वा चांडकजी..

येथे एका व्यक्तीचा उल्लेख केला नाही तर तो अन्याय ठरेल. डॉ. सुकेश झंवर हे ते नाव, राधेश्यामजींचे ते जावई, ते साधेसुधे डॉक्टर नाहीत, उच्च शिक्षित डॉक्टर असूनही त्यांनी आपल्या यवतमाळ मधल्या प्रॅक्टिसकडे पाठ केली थेट बँक गाठली आणि ते या कटकटीचा क्षेत्रात उतरले. त्यांनी बुलडाणा अर्बनला आधुनिकतेकडे नेले. दोन्ही जावई हीच भाईजींची मुले, त्यांना दोन मुलीच आहेत, दुसरी मुलगी आणि जावई पुण्यात आपल्या व्यवसायात व्यस्त असल्याने भाईजी यांनी काढलेल्या शैक्षणिक संस्थांची आणि बँकेची जवळपास सारी जबाबदारी त्यांच्या या जावयावर आणि मुलीवर आहे, वानप्रस्थाश्रमाकडे निघालेले चांडकजी आज नक्की सुखी आणि समाधानी आहेत, सभासद म्हणतात, थँक यु डॉ. झंवर...

बुलडाणा अर्बन च्या बाबतीत हे म्हणता येईल, एका झपाटलेपणातून हि पतसंस्था स्थापन झाली, भल्या भल्या बँकांना या दुर्गम भागातून आलेल्या पतसंस्थेने मागे टाकले वरून कृतिशील सामाजिक बांधिलकीची कास धरत अर्थकारणाच्या क्षेत्रात देखील माणुसकीचा प्रसार करत राहिली. आज तिच्या जवळपास ४२२ शाखा आहेत आणि अमाप विश्वास संपादन केल्याने बुलडाणा अर्बन चक्क पतसंस्था असून देखील आणखी आणखी फोफावते आहे, सारे यश चक्रावून सोडणारे. मुख्य म्हणजे बुलडाणा अर्बन ने आर्थिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक क्षेत्रात देखील आपली मोहोर उठवली म्हणून त्या त्या परिसरात ती दुर्गम भागातून येऊनही पटकन झटकन लोकप्रिय झाली. पारदर्शक व्यवहार,तत्परता, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, कोअर बँकिंगच्या साहाय्याने अनेक शाखांची जोडणी, विशेष म्हणजे अगदी नोटबंदीच्या काळातही आणि नेहमी जनसामान्यांकरिता वेळेला आणि वेळेवर पैसे उपलब्ध करून देणे, मी जे बघितलंय, बघून वाटते, आपण आयसीआयसीआय सारख्या एखाद्या जागतिक स्तरावरल्या बँकेत आलोय, मला वाटते चांडकजींनी ३२ वर्षात घेतलेल्या मेहनतीचे, कष्टाचे, संपादन केलेल्या विश्वासाचे ते फळ आहे...
अपूर्ण:


पत्रकार हेमन्त जोशी 

आमची बँक : पत्रकार हेमंत जोशी


आमची बँक : पत्रकार हेमंत जोशी 
रामदेव बाबांना ढोपरापासून सलाम सॅल्यूट नमस्कार त्यांनी जगविख्यात कोलगेट टूथपेस्टला देखील नमवले झुकवले, रामदेवबाबांनी भारतीय योगा आधी जगाच्या कानाकोपऱ्यात नेला, थोडा कालावधी आणखी जाऊद्या, आयुर्वेदाला देखील ते जगाच्या कानाकोपऱ्यात योगविद्येच्या रांगेत आणून ठेवतील, आता तर थेट कोलगेट ने देखील आयुर्वेदिक टूथपेस्ट बाजारात आणली आहे, मला हे असे मर्द भारतीयांचे पराक्रम बघून अतिशय आनंद होतो, तुम्हालाही होत असेल...

भाईजी राधेश्याम चांडक यांनी स्थापन केलेल्या बुलडाणा अर्बन बँकेवरून हे रामदेवबाबा आठवले. वास्तविक ' बुलडाणा ' हा विदर्भातही एक अविकसित जिल्हा. ३२ वर्षांपूर्वी तर हा जिल्हा फारसा कुणाला परिचितही नव्हता, त्याकाळी वर्तमान पत्रे व रेडिओ वगळता प्रसिद्धीची फारशी माध्यमे देखील उपलब्ध नसल्याने कदाचित ते घडत असावे पण भाईजी उर्फ राधेश्याम चांडकजी यांनी १०० टक्के केवळ पतसंस्थेच्या भरवशावर या जिल्ह्याचे नाव उभ्या राज्यात किंबहुना देशाच्या विविध भागात देखील रोशन करून सोडले. बुलडाणा जिल्हा केवळ ' बुलडाणा अर्बन ' या भन्नाट पतसंस्थेमुळे नावारूपाला आला, असे म्हटल्यास त्यात वावगे ते कसले...काहींचे आयुष्याचे प्रवास त्यांना मिळालेल्या यशामुळे थक्क करणारे असते. मला एसएससीला मिळालेले ५२ टक्के गुण माझ्या शिक्षकांना असेच थक्क करणारे होते किंवा रामदास कदमांनी घेतलेला प्लास्टिक बंदीचा निर्णय देखील असाच थक्क करणारा होता, थक्क करणारा आहे, कदम देखील एखादे चांगले काम करू शकतात, त्यांना जवळून ओळखणाऱ्यांनी तोंडात बोटे घातली आहेत फक्त राज ठाकरे म्हणाले ते घडू नये म्हणजे येणाऱ्या निवडणुकांसाठी लागणाऱ्या फंडासाठी हे नाटक आहे, असे ते जे म्हणताहेत ते घडले नाही म्हणजे रामदास कदम जिंकले असे म्हणता येईल पण घेतलेला प्लास्टिक बंदीचा निर्णय बारगळला तर, जे अपेक्षित होते तसे कदम वागले, असे म्हणून या राज्यातले समस्त मराठी जन कपाळावर हात मारून घेतील...

बुलडाणा अर्बन बँकेचा कम पतसंस्थेचा, आणि या उपक्रमाला पुढे नेणाऱ्या श्री श्री राधेश्याम चांडक यांचा हा आजवरचा प्रवास असाच थक्क करणारा, म्हणजे महाराष्ट्राबरोबर गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गोवा, तेलंगणा, सीमांध्र तर थेट अंदमान निकोबार या सर्व राज्यात आर्थिक सेवा देण्यात बुलडाणा अर्बनला जे यश मिळालेले आहे किंवा देशातल्या प्रथम क्रमांकाची पतसंस्था असलेल्या चांडकजींच्या ' बुलडाणा अर्बन ' ची आशियातील अव्वल संस्थेच्या दृष्टीने जी वाटचाल सुरु आहे ती एकाचवेळी पाचही बोटे तोंडात घालायला लावणारी म्हणजे तोंडाचा ' आ ' वासायला लावणारी....

कदाचित सांगून खोटे वाटेल पण सुरुवातीला म्हणजे तब्बल ३२ वर्षांपूर्वी बुलडाणा अर्बन भाईजींनी १२ हजार रुपयांच्या भांडवललवार आणि फक्त ७२ सदस्यांच्या उपस्थितीत अत्यंत दुर्लक्षिलेल्या बुलडाणा जिल्ह्यातून, बुलडाणा शहरातून सुरु केली आणि एकेकाळीच्या शेम्बड्या, बावळट मुलीने पुढे मिस वर्ल्ड 'किताब मिळवावा तसे बुलडाणा अर्बन चे झाले, रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झाले, म्हणजे, ' आपला कृपाभिलाषी ' च्या वर सही करणार्याने एक दिवस शिक्षणमंत्री व्हावे तसे बुलडाणा अर्बन चे झाले, कारण ज्या तडफेने ३२ वर्षांपूर्वीचे भाईजी किंवा त्यावेळेचे त्यांचे शिरीष देशपांडे किंवा डॉ. किशोर केला यांच्या सारखे सहकारी ज्या तडफेने जिद्दीने तळमळीने हि पतसंस्था वाढविण्यात व घडविण्यात २४ तास जणू गढलेले असायचे, आजही त्यांचे तेच, सतत रामनामाचा जप करणार्यांसारखे ते ' बुलडाणा अर्बन, बुलडाणा अर्बन ' करीत असतात, घोकत असतात. अगदी अलीकडे देशात कौतुकाचा विषय ठरलेली हि पतसंस्था म्हणजे बुलडाणा अर्बन आत थेट मुंबईत देखील डेरे दाखल झालेली आहे, शिवाजी पार्कात, माँ साहेबांच्या पुतळ्याजवळ. जे इतरत्र कायम कटकटीचे वाटते ते सारे येथे अतिशय सोपे जाते असे बुलडाणा अर्बन चे ग्राहक हमखास सांगतात, अनुभव घ्यायला काय हरकत आहे...
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

OFF THE RECORD review on some of headlines....

OFF THE RECORD review on some of headlines......

Topics covered below:
1. Detailed Analysis as to why Darade won Nashik
2. Detailed Analysis as to why Niranjan Davkhare won from Kokan
3. Plane crashes in Ghatkoper 
4. Plastic Ban. 
5. Poll conducted on my Facebook page as to which is the richest political party in Maharashtra.
6. CM's PA Abhimanyu Pawar.


1. Darade wins in Nashik.
ShivSena cannot claim credit for the victory of Darade. One month ago, when brother Narendra Darade won his MLC seat from Nashik, it was assumed that the teachers constituency would be a cake walk for brother Kishore yesterday. Credit for both brothers been elected to the upper house entirely goes only to one man-Chagan Bhujbal. A month ago, Narendra Darade, MLC,  had openly declared that his 'caste' votes played an important role in his victory. This time too, Chagan Bhujbal made it a prestige issue and at any cost he had to defeat the number 2 competing yesterday Sandip Bedse. Not many know, but Sandip Bedse was PA to Bhujbal....and when all hell broke loose on Bhujbal, Bedse had conveniently turned his back to his mentor when the veteran was sent to jail. Anyway, It was payback time for Bhujbal. In 2014 too, it was said when Bedse fought for the Vidhansabha elections against now Minster Jaykumar Raval, Bhujbal had used all his might to defeat Bedse. Someone had told Bedse that in his destiny there is Raj-Yog--but I have my reservations--till  the time the original king of Nashik is alive, it is only BHOG for Bedse. By the way friends, our teachers whom we consider our first gurus yesterday had allegedly accepted Rs. 2100 in cash and a Paithani worth Rs. 1100/-  (cheap as it is originated from Yevla) as a token of appreciation for voting from the Darade's. Whereas it is alleged Sandeep had distributed Rs. 2000/- per vote. Mast hai, Bhujbal will remain in NCP and slap his party by supporting Shivsena, Congress & the BJP whenever required. 

2. Niranjan Davkhare wins. 
Kokan Graduate MLC elections Niranjan Davkhare won. But credit---to whom--entirely to CM Devendra Fadnavis and his team of Prashant Thakur Ravindra Chavan and Prasad Lad. Many had thought that after untimely death of senior Davkhare, Niranjan won't be able to withstand the animosity with Jitendra Ahwad and cold war with the Naik's. Niranjan quit the party and entered the BJP. It is said for yesterdays elections Sharad Pawar had made it personal. He had flexed all his muscles and had sworn to teach Niranjan a lesson. He left no stone unturned to defeat Niranjan and had personally called Hitendra Thakur (a friend of Davkhares), and Sunil Tatkare to make sure Niranjan's defeat. He had summoned nunnery uno enemy of Davkhare Jitendra Ahwad for the same. It was a mission to defeat Niranjan at any cost for the NCP. Had Niranjan been defeated, I'll tell you, many in queue to enter the BJP from other factions would have dried up; as they might have seen what happened to Narayan Rane and Niranjans defeat it would have been detrimental to enter the BJP for others. But fate had other plans. Niranjan came out as a winner with a lot of thinking for the NCP camp to do now...CM--you are a genius!! 

3. Plane crashes in Ghatkoper. 
Sad, extremely sad for the crew of the flight. Had heard, the pilot resisted to test because of the weather. But I guess, destiny had other plans for them. Anyway, for information--the site where the plane crash landed belonged to the Haresh Mehta, who is known to flout rules in his construction time & again. In this property too--I have heard the height sanctioned was not as per the DGCA rules and regulations. Nevertheless, RIP brave hearts!!

4. Plastic Ban
I'm so for it. The pseudo intellectuals have come up with a new funda, that the government should have made some alternative before banning plastics. Dear readers, in the previous generations were there any plastics in your villages when you bought stuff? Still life moved on right. The entire credit of this ban goes none other than Aditya Thackrey, CM Devendra Fadnavis, Minister Ramdas Kadam, bureaucrats especially   P. Anbalgan of the MPCB, and the BMC for it's strict implementation. But did you notice one thing, whenever Sena wants to get something done on a wider scale, it always falls on BJP for implementing the same. Be it plastic ban, be it 24 hour night life, or be it anything. But yet again, now ban on retail plastic has been lifted. This is the problem of the BJP overall. Their implementation of any scheme or policy is just wrong. Be it demonetisation, be it GST or now plastic ban. Why do they think after making a decision? 

5. Poll conducted.
Day before yesterday on my Facebook page, I conducted a small poll as to which political party is richest in Maharashtra? Is it NCP or the BJP? I had requested my approx 4500 friends on Facebook to vote which included a lot of bureaucrats, politicians, businessmen &  young brigade of our country (including me). Also for the poll, I had kept one condition--while voting for BJP or NCP the voter has to keep in mind the 'heard' black money any of the 5 contestants I had opted for the parties. For BJP I had options in the name of Nitin Gadkari, Devendra Fadnavis, Prasad Lad, Ashish Shelar & Vinod Tawde. Whereas for the NCP the list was of Pawars & Sule, Sunil Tatkare, Praful Patel, Chagan Bhujbal & Sachin Ahir. Friends, you would be surprised that I had thought NCP would take the cake. But to my surprise it was nearly 50-50. And to my srurpsie again, bureaucrats too voted for the BJP. That means, BJP is no less now than the NCP in terms of money--I'm not saying this...the voters are...So is it only because of Devendra Fadnavis this government is functioning. Lot's for observers to read out from this. Believe me, 2019 Vidhan Sabha elections will be the dirtiest, yuckiest and the most costliest election Maharashtra will see....

6. Abhimanyu Pawar gearing up for 2019. 
CM Fadnavis's PA and 'left hand' of his boss (right hand is Sumit Wankhede) Abhimanyu Pawar is gearing up for 2019 Vidhan Sabha elections from Latur. All he is waiting for an affirmation from his party bosses which am sure he will get it done. A hardcore RSS karyakarta very few from the Sangh were able to create a niche for themselves in the CMO. Pawar tops the list. By the way, is Bhartiya from the cadre? Just asking....

Vikrant Hemant Joshi 

Monday, 25 June 2018

माझे हे लिखाण केवळ वयस्कोके लिये: पत्रकार हेमंत जोशी

माझे हे लिखाण केवळ 
वयस्कोके लिये, १८ 
वर्षांखालील मुलांनी 
आणि स्त्रियांनी पुढले 
लिखाण वाचू नये : पत्रकार हेमंत जोशी 

लहानपणी गावातले एकमेव मनोरंजनाचे ठिकाण म्हणजे सिनेमा टॉकीज, खिशात पैसे नसायचे आणि सिनेमा पाहणे आमचे सर्वात मोठे स्वप्न असे, त्यासाठी काय काय करावे लागे हे आज आठवले तरी हसून हसून मुरकुंडी वळते. ३ वर्षांखालील मुलांना त्याकाळी तिकीट लागत नसे म्हणून मी एकदा चक्क ६-७ वर्षांचा असतांनाही आमच्या ओळखीच्या एका थोराड मुलीच्या चक्क पदराखाली कडेवर बसून आत घुसायचा प्रयत्न केला होता पण पकडल्या गेलो आणि धूम पळत सुटलो, माझ्या मागे गेटकिपर, कितीतरी वेळ ती पळापळी गावातल्यांनी बघितली होती...

केवल वयस्को के लिये, असणारे सिनेमे बघणे तर आमचे वयाच्या १५-१६ व्या वर्षी स्वप्न असे, त्यासाठी अनेक मित्रांना झुबकेदार नकली मिशा लावून जाणे अत्यावश्यक ठरे. प्यासी जवानी, जंगली कबुत्तर, अशी काहीशी विचित्र टायटल्स त्या सिनेमांची असायची. बाळू नावाचा एक वात्रट मित्र होता, त्याच्या घराशेजारी लायब्ररी होती, तेथून तो चावट पुस्तके आणून वाचत असे. वर एखादे धार्मिक पुस्तक किंवा शाळेचे पुस्तक आणि पुस्तकाच्या आत हि अशी अश्लील पुस्तके वाचणे त्याचे पॅशन असायचे, त्याचे वडील प्रचंड मारकुटे तरीही हा अशी पुस्तके अगदी त्यांच्या पुढ्यात बिनधास्त वाचून पूर्ण करीत असे. एकदा मात्र भलतेच घडले त्याने अश्लील पुस्तक आत ठेवायच्या ऐवजी त्याच्याकडून ते वर ठेवल्या गेले आणि आतल्या बाजूने ' शिवाजी महाराजांचे बालपण ' हे पुस्तक ठेवल्या गेले आणि घात झाला, बाप पुढ्यातच होता, त्याचे बिंग फुटले आणि त्याच्या बापाने एकाचवेळी त्याला व लायब्ररी चालवणाऱ्याला बेदम चोपले...

हे सारे अलीकडे ज्या देशात जाऊन आलो आफ्रिकेतल्या इथिओपियामुळे आठवले. आजचा इथिओपिया आणि ९०-९५ दरम्यानचे थायलंड यात अजिबात फरक नाही, दोन्हीही देश स्त्रीप्रधान, पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या मोठी त्यामुळे स्त्रिया आपल्या देशातल्या पुरुषांसारखे काम करतात आणि पुरुष मंडळी आराम करतात, टाइम पास करतात, सतत कॉफी पितांना दिसतात. जसे थायलंड वेश्या व्यवसायात मोठे झाले आज तेच इथिओपिया मध्ये आहे. पूर्वी थायलंड मध्ये फिरतांना अमुक एखादी स्त्री आवडल्यास ती सहज उपलब्ध होत असे आज तेच या देशात अगदी साहस घडते. थायलंड ने याच व्यवसायामुळे आर्थिक बस्तान बसविले आणि ते पुढे गेले, आता थायलंड मध्ये पूर्वीचे ते वातावरण नाही कि जी स्त्री बरी वाटली तिला हॉटेल मध्ये नेली, इथिओपिया मध्ये मात्र अतिशय मोठ्या प्रमाणात गरिबी आहे आणि हे असे प्रकार अगदी उघड आणि सर्हास आहेत...

कॉफी बीन्सचा दर्जा आणि कॉफी चे विविध प्रकार, यासाठी माझे जगभरातल्या विविध देशांमध्ये फिरणे होते, एवढेच सांगतो, इथिओपियाची बरोबरी करणारा देश अद्याप मी बघितलेला नाही पण त्यांना या व्यवसायाचे नेमके मार्केटिंग करता न आल्याने ते इतरांच्या तुलनेत खूप मागे आहेत. आपल्याकडे जेवढ्या पानाच्या आणि चहाच्या टपऱ्या नाहीत तेवढ्या अधिक प्रमाणावर तेथे कॉफी प्यायला मिळते. पावसचे आंबे खाल्यांनांतर किंवा इंदोरचे पोहे खाल्यानंतर किंवा कलकात्याचे मिशतो दोही खाल्यानंतर किंवा औरंगाबादचे तारा पण खाल्यानंतर इतरत्र ठिकाणचे ते ते पदार्थ जसे तुच्छ वाटतात तेच माझ्यासारख्या कॉफी वेड्याचे झाले आहे. एवढे दर्जेदार कॉफी बीन्स मी खचित बघितलेले आहेत...

विशेष म्हणजे तेथल्या भाज्या असोत कि इतर अन्न पदार्थ आणि कॉफी बीन्स देखील, त्यावर कोणत्याही रासायनिक प्रक्रिया अद्याप त्यावर न झाल्याने, जे खऱ्या अर्थाने ओरिजनल असते ते येथे सतत खायला मिळाले. वाईट मात्र नक्की तेथल्या तरुण होणाऱ्या मुलींचे, स्त्रियांचे वाटते. ऐन तारुण्यात पदार्पण केल्या केल्या त्यांना नको त्या घाणेरड्या व्यवसायाला जवळ करावे लागते. अर्थात आयुष्यात ड्रग्स घायचे नाहीत, नशा करायची नाही आणि वेश्यागमन काहीही झाले तरी करायचे नाही हे मी ठरविलेले असल्याने कदाचित मला वाईट वाटले असेल, त्याची आवड असणाऱ्या पुरुषांना मात्र ती पर्वणी वाटते...

अत्यंत महत्वाचे म्हणजे आम्हा भारतीयांची आजही फॉरेन पॉलिसी अगदीच भुक्कड त्यामुळे इथिओपिया सारख्या आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या देशांवर देखील आजतागायत कधीही आम्हाला राज्य करता आले नाही, चायना मात्र त्यात आपल्या कितीतरी पुढे असल्याने हा संपूर्ण देश चायनाच्या अधीन गेलेला आहे, असे वाटते इथिओपिअन्स जणू चायना चे गुलाम आहेत, वाईट वाटते. जेथे तेथे चीनचे साम्राज्य तेथे बघायला मिळते, चीन सांगेल तेच तेथे घडते, एकमेव चीन ला तेथे वेगळे आणि सोयीचे नियम आहेत...

माझ्या या लिखाणानंतर मला ठाऊक आहे, चावट पुरुषांचे तेथे जाणे येणे वाढणार आहे सांगली जिल्ह्यातल्या त्या चावट नेत्यासारखे, तो नेता व्हाया इथोपिया कायम केनियाला जातो...
तूर्त एवढेच.
पत्रकार हेमंत जोशी 
 

पुढले आमदार : पत्रकार हेमंत जोशी


पुढले आमदार : पत्रकार हेमंत जोशी 
सेक्स म्हणजे संभोग हि एकमेव स्थिती अशी आहे कि जेथे भारतातले सर्वाधिक, जवळपास सारेच पुरुष मागे पुढे होत असतात. उदाहरण देतो, जसे डॉ. नेने यांना जगसुन्दरी माधुरी दीक्षित पत्नी म्हणून लाभलेली असतांनाही, मला खात्री आहे अधून मधून त्यांचीही नको ती नजर घरी काम करायला येणाऱ्या त्यांच्या तरुण, उफाड्या, पदर सारून पाडून काम करणाऱ्या मोलकर्णींवर नक्की पडत असेल. आपला सचिन...हि इज नोन फॉर दॅट...घरी परी असतांनाही...आमच्यातले हे असे पुरुष, त्यांना विचारले तर म्हणतात देखील, मिठाई आहे म्हणून काय झाले अधून मधून पाणी पुरी देखील तोंडाला मस्त चव आणते...

इतर कोणत्याही क्षेत्रात मात्र आम्ही पुरुष तडजोड करायला तयार नसतो, आज मर्सिडीज वापरणाऱ्यांना जर सांगितले उद्यापासून पूर्वीची ती हॉर्न सोडून सारे वाजणारी, विना वातानुकूलित फियाट वापरायला काढा, मला खात्री आहे, हाती जोडा घेऊन तुम्ही सांगणार्याच्या अंगावर धावून जाल. हे सारे त्या अनिल गावंडे आणि राजू वानखेडे या दोन मर्द मराठे मित्रांमुळे आठवले. अनिल आणि राजू या दोन्ही तरुणांचे त्यांच्या व्यवसायात मुंबईत छान बस्तान बसलेले पण त्यांना राजकारणात उतरायचे असल्याने, आमदार व्हायचे असल्याने त्यांनी ऐन उन्हाळ्यात थेट त्यांचे गाव गाठले, अनिल हा अकोला जिल्ह्यातल्या अकोटला तर राजू वानखेडे हे अमरावती येथे जाऊन बसलेले आहेत, अधून मधून येथे त्यांचे येणे असते पण कौतुक यासाठी कि त्यांनी ग्रामीण भागात तेही आमच्या खडूस कंगाल विदर्भात पुन्हा बस्तान बसविले आणि आता तर ते येणाऱ्या विधान सभेची खडतर भागात सतत पायपीट करून, पदरचे पैसे खर्च करून तयारी करताहेत..

www.vikrantjoshi.com

आणि हे असे करणे अजिबात सोपे नाही त्यासाठी मनाची तयारी करावी लागते आणि येथल्या सर्वस्वाचा, सुखाचा त्याग करून तेथल्या राजकीय कटकटींना गरज नसतांना बिलगावे लागते जे गावंडे आणि वानखेडे यांनी केले. राजू वानखेडे हे तर अमरावती जिल्ह्यातल्या शिवसेनेत एवढे रमले रुजले कि शिवसेनेतल्या अडसूळांनी त्यांना एखाद्या लेकरासारखे पोटाशी धरून त्यांना जिल्हा प्रमुख पदी नेमूनही टाकले. आता माझे ते स्वप्न आहे, वानखेडे आणि गावंडे आमदार म्हणून शपथ घेतानाचे...

मी मागेही एकदा लिहिले होते कि, पत्रकारितेच्या या अति प्रदीर्घ प्रवासात समाधान याचे लाभले कि असे कितीतरी कि जे एकेकाळी माझ्यासमोर काहीही नव्हते आणि आज म्हणाल तर सरकारी नोकरीत म्हणाल तर आजी माजी मंत्री म्हणून किंवा आमदार खासदार म्हणून, काही त्यांच्या व्यवसायात खूप खूप मोठे झालेले आहेत जसे वर्सोव्याच्या आमदार भारती लव्हेकर किंवा राज्यमंत्री पदाचा दर्जा अलीकडे मिळवून मोकळे झालेले आदेश बांदेकर असतील, किंवा पत्रकार यदु जोशी असतील, हि अशी माझ्या वृत्तपत्रात मला मनापासून सहकार्य करणारी मंडळी, आज आर्थिक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या आभाळाला टेकलेली व्यक्तिमत्वे बघतो, आई शपथ सांगतो, डोळे आनंदाने भरून येतात कारण मला ओळखणाऱ्या प्रत्येकाला हे शंभर टक्के माहित आहे, असूयेने वागणे माझ्या स्वभावात आणि रक्तातही नाही, देवाने मलाही काही कमी केलेले नाही, उलट भरभरून दिलेले आहे आणि दिले नसते तरी माझे असूयेने वागणे कधीही ते माझ्या हातून घडले नसते...

आणखी एका तरुण नेत्याचा उल्लेख येथे करणे आवश्यक वाटते कारण तो देखील शंभर टक्के धारावीतून निवडून येणार आहे, उद्याचा आमदार आहे, आशिष मोरे हे ते नाव. आशिष ची पत्नी, माझ्या लेकीसारखी, तीचे आशिषशी लग्न झाले आणि केवळ त्यानंतर दीड महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणूक लागल्या, आशिष ने या राजकारणात नवख्या असलेल्या, अगदीच अल्लड तरुणीला, हर्षला यांना उभे केले आणि निवडूनही आणले. भाजपच्या मुंबई अध्यक्षांना म्हणजे धडाकेबाज आशिष शेलारांना प्रत्यक्ष भेटून म्हणालोही होतो कि आशिष मोरे यांच्या पत्नीला म्हणजे हर्षला यांना उमेदवारी द्या, त्या शंभर टक्के नगरसेविका म्हणून निवडून येणाऱ्या आहेत, त्यांनी ऐकले नाही, तरीही म्हणजे भाजपा आणि शिवसेनेच्या वावटळीत त्यावेळी त्या मनसेच्या तिकिटावर निवडून आल्या. नगरसेविका झाल्या. आज ते दोघे नवराबायको शिवसेनेत आहे, बघा आशिष मोरे कोणत्या पक्षाच्या गळाला लागतात ते कारण आशिष यांच्यासाठी पक्षाचे चिन्ह महत्वाचे नाही, त्यांचे समाजकार्य आणि लोकांसाठी धावून जाणे, बोलते, आशिष अपक्ष उभे राहिलेत तरी निवडून येतील, आजतरी असे दिसते, आशिष हे धारावीतून शिवसेनेचे उमेदवार असतील आणि पुढले आमदार असतील...
तूर्त एवढेच.


पत्रकार हेमंत जोशी 

Sunday, 24 June 2018

OFF THE RECORD review on some of todays headlines....

OFF THE RECORD review on some of todays headlines....

1. Deependra Singh Kushwah in trouble.
Not in trouble because Loksatta's 'dubious' reporter reported a story few days back that Mhada's Mumbai Board's chief officer Deependra Singh Kushwah holds every file for days and just refuses to sign on it. Even if everything is per law the report in Loksatta said that Kushwah holds the files and does not believe in moving it ahead. Nothing of this is true! But this is not the concern. Concern is 4 topmost builders of Mumbai & Nagpur which include Boman Irani of Rustomjee, Shahid Balwa, dance-bar owner cum laisioner cum agent cum builder cum media channel owner a certain Shetty and a close associate of CM from Nagpur has complained to the CM to immediately replace Kushwah with a more 'open' officer who would  pass the files without any hinderances. But haven't they heard if at all they cross and eliminate Kushwah from the system, it would be extremely difficult to pass your dubious projects from the straight forward Milind Mhaiskar? Anyway, if at all  the news is true that Kushwah is holding files, of what I know him, Kushwah will not sign any paper even if he has 1% doubt. Finally, after all these years, MHADA is in safe hands of Mhaiskar & people under him like Kushwah. But even if CM decides to shift Kushwah after listening to these builders (which he would), who can fill up this all important post, as MHADA is the next big thing now?  Rajesh Narvekar who is any which ways even after being an IAS is getting outshine by Pardeshi & Gagrani, would be the perfect choice. I think there is some destiny attached between Kushwah & Narvekar. When Kushwah was Collector, it was tipped that Narvekar would replace him, and now the post of Mhada, let's see....

2. Dinesh Waghmare, need your kind attention. 
A detailed proposal of construction of a Library Building in Milind College of Aurangabad that was presented & received a nod from the Chief Minister is still in limbo. The go ahead was communicated to the Social Justice Minister, good for nothing, Mr. Badole & his team, but till today nothing has moved ahead. There were several presentations made first to the Surendrakumar Bagde then Secretary of Social Justice Department & PWD Principal Secretary Ashish Kumar Singh. Also a detailed discussion was made with the Principal of Milind College Smt. Vaishali Pradhan. Finally on the 18th March 2017, Minister Badole was presented the proposal and on the 13th April 2017 to the  CM who after liking the concept and 'financials' gave this a go ahead. But still today nothing has been done. The said construction of library building at the college would be of 16,100 sq m and estimated cost of the project was Rs. 80 cr. Over to you Mr. Dinesh Waghmare. Let's see if you have intentions to  gives some social justice to the students of Aurangabad. 

3. Proud moment for Ajoy Mehta & a second time for Vijay Singhal. 
On the 23rd of this month the BMC received Cleanest State Capital Award from the hands of Prime Minister Narendra Modi. The award was received by the MC Ajoy Mehta accompanied by Vijay Singhal and our Mayor. Kudos to the team. But just to add, it is the second time Vijay Singhal has been facilitated by the hands of Prime Minister. In the year 2009 too, Singhal was awarded by then PM Manmohan Singh was his contribution towards the River Linking Project in Jalgaon district. I'm sure MC Ajoy Mehta with all his 4 capable AMC's is quite a content man. With an iron hand, not falling to the pressures of anyone, Ajoy Mehta and team has stormed many weathers. All the best!

4. Not all is well between the General Manager and the Principal Secretary of MTDC
When IAS Vijay Waghmare of the MTDC was transferred abruptly from the post of MD of MTDC few months ago, it seemed it was a victory for Minister Jaykumar Raval as nothing could stop the animosity between them. But then the post was taken over by Principal Secretary Vijay Kumar Gautam. Don't think this new appointment went well down with the general Manager of MTDC Swati Kale. She began bad mouthing about the same. Kale, who claims to be close to the CM, a Brahmin and a Nagpurian, is no where close even to the CMO. Yes, she has cordial relations with the Minister of State Madan Yerawar who does not even know A to B of MTDC, nor he is interested also...He is a big contractor. Anyway, the news of bad mouthing reached Gautam and now heard Kale  is certainly not amongst his favourite employee at the MTDC. I don't understand this Mrs. Kale. First Ashutosh Rathod & now Gautam...You seem to have a problem with your superiors. 

Friday, 22 June 2018

पुणेरी पगडी काढून: पत्रकार हेमंत जोशी

पुणेरी पगडी काढून:
फुल्यांची पगडी 
घालून..
पवारांनी केला 
खून ठरवून : पत्रकार हेमंत जोशी खोडसाळ शरद पवारांनी त्यादिवशी जेवढे राज्यातल्या ब्राम्हणांना दुखावले त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने त्यांनी या राज्यातल्या ब्राम्हणांवर मनापासून प्रेम करणाऱ्या ब्राम्हणेतर मंडळींना अधिक दुखावले, दुखावले होते, ब्राम्हणेतर मंडळींनी पवारांच्या या मुद्दाम आणि उद्दाम घडवून आणलेल्या कृतीतून पवारांच्या तोंडात जे अप्रत्यक्ष शेण कोंबले ते नक्की त्यांच्या कानावर आले, पुढे त्यांनी त्यावर सारवा सारव केली पण ठरवून केलेल्या खुनाला जशी माफी नसते तेच शरद पवार यांच्या त्या, नको त्या केलेल्या कृत्यातून घडले म्हणजे त्यांचे हे असे पोरकट हेकट हलकट वागणे ब्राम्हणेतर मंडळींना अधिक लागले, झोंबले असल्याने त्यांच्याही मनातून शरद पवार उतरले आणि हिच नेमकी वस्तुस्थिती आहे...

शरद पवारांच्या या ठरवून केलेल्या म्हणाल तर गुन्ह्यांवर म्हणाल तर त्यांच्या या पोरकटपणावर जगातले सारे मराठी ब्राम्हण विशेषतः पुण्यातले, राज्यातले ब्राम्हण तर रागावले, रुसले, नाराज झालेच पण ब्राम्हणेतर त्यांच्यावर अधिक नाराज झालेत त्यात अगदी मराठे देखील नक्की आलेत त्याचे कारण असे कि प्रत्येक बहुतांश ब्राम्हणेतर मंडळींचे म्हणजे जावई सुळे यांच्यासहित साऱ्यांचे किमान पाच तरी ब्राम्हण अतिशय आवडते असतात, जिवलग असतात मग त्यात त्यांचे कार्यालयातले बॉस असतील, ब्राम्हण शेजारी पाजारी असतील,बालमित्र मैत्रिणी असतील, आजचे मित्र मैत्रिणी सवंगडी असतील विशेष म्हणजे शाळेतले शिक्षक, शिक्षिका, महाविद्यालयातले प्राध्यापक किंवा प्राध्यापिका तर हमखास असतील, पूजा सांगायला येणारे गुरुजी असतील, गुरु आणि सद्गुरू असतील, फॅमिली डॉक्टर्स असतील, ब्राम्हणेतरांच्या घरात आलेल्या सुना किंवा जावई असतील, अर्थात असे कितीतरी विविध प्रांतातले विविध ब्राम्हण असतील जे ब्राम्हणेतरांचे अतिशय जवळचे असतील त्यामुळे शरद पवार जेव्हा पुणेरी किंवा ज्याला टिळकांची पगडी काढून तेही वादग्रस्त भुजबळांना फुल्यांची पगडी घालत होते, ब्राम्हणांचा जाहीर अपमान करीत होते तेव्हा जगातल्या ब्राम्हणेतर मंडळींच्या डोळ्यासमोर त्यांनी ज्या ज्या ब्राम्हणांवर मनापासून, अगदी लहानपणापासून प्रेम केले किंवा आजही करताहेत ते ते ब्राम्हण त्यांना आठवत होते, ब्राम्हणेतरांच्या नजरेसमोर येत होते आणि त्या त्या, त्यांना प्रिय असलेल्या ब्राम्हणांचा पवारांनी केलेला जाहीर अपमान बघून जगातल्या साऱ्या ब्राम्हणेतर मंडळींना ते दृश्य म्हणाल तर मनस्वी राग आणत होते, मनस्वी चीड आणत होते म्हणाल तर त्यांना वाईटही वाटत होते, त्यातून ब्राम्हणांचे नाही तर पवारांचे नुकसान झाले, मनातून ब्राम्हण नव्हे तर शरद पवार उतरले...

आणि हो, हा शरद पवारांनी अगदी ठरवून केलेल्या खुनासारख्या अक्ख्या ब्राम्हणांचा ठरवून केलेला तो जगजाहीर अपमान होता आणि हा असा अपमान शरद पवार आजच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील ' हल्लाबोल ' आंदोलनाच्या सांगता सभेत करणार आहेत हे जसे आयोजकांना माहित होते तसे छगन भुजबळ यांना देखील माहित होते त्यामुळे त्यांनी, त्या सर्वांनी शरद पवार यांना स्पष्ट शब्दात सांगायला हवे होते कि, असे ब्राम्हणांना अगदी जाहीर एवढे अपमानित करू नका वाटल्यास यापुढे टिळकांची नव्हे तर फुल्यांची पगडी घालून आम्ही एकमेकांचे सत्कार करू, हे जाहीर करून भुजबळांच्या डोक्यावर फुल्यांची पगडी घालून मोकळे व्हा, पण अनेकांना हे माहित असतानाही त्यांनी ते शरद पवारांना सांगितले नाही, उलट बरे होईल पवार साऱ्यांच्या मनातून उतरतील, हेच त्या छगन भुजबळांसारख्या माहित असणाऱ्यांना वाटले असावे..जेव्हा हे नको ते कृत्य पवारांच्या हातून घडले तेव्हा त्यांचेच एक लाडके नेते, दिवंगत वसंत चव्हाणांचा मला स्वर्गातून फोन आला होता, म्हणाले, माझी आई जेव्हा डोक्यावरून विष्ठा, मैला वाहून नेत असे तेव्हा याच पुण्यातल्या एका उच्चशिक्षित ब्राम्हण तरुणीने माझ्याशी लग्न तर केलेच पण माझ्यासारख्या फाटक्या नेत्याचा संसार देखील रेटून नेला, घरातल्या सर्वांना तिने उत्तम घडविले देखील आणि ठाण्यातले ' खानदानी मराठे ' डॉ गजानन देसाई देखील फोन करून हेच म्हणाले, शरदरावांनी माझ्या सासरच्या मंडळींना असे अपमानित करायला नको होते...

www.vikrantjoshi.com

मी येथे पवारांनी ठरवून केलेला खून म्हणजे ठरवून केलेली चूक यासाठी म्हणालो कि हे सारे अगदी ठरवून झाले म्हणजे आधी टिळकांची म्हणजे पुणेकरांची मानाची पगडी भुजबळांच्या डोक्यावर चढवायची त्यानंतर तयारच ठेवलेली फुल्यांची पगडी जातीने पवारांनी पुणेरी पगडी काढून तदनंतर भुजबळ यांच्या डोक्यावर चढवायची, अर्थात पवार काहीही करू शकतात त्यांनी भुजबळांना, गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या भुजबळ यांना तुरुंगाबाहेर येताच मतांच्या राजकारणासाठी महात्मा फुल्यांच्या रांगेत आणून बसविले उद्या हेच शरद पवार समीर भुजबळ यांचा उल्लेख ' युवाराष्ट्र संत ' असा करून त्यांना थेट तुकडोजी महाराजांच्या रांगेत आणून ठेवतील...शरदरावजी, तुमच्या हातून हि नक्की मोठी चूक घडलेली आहे आणि ह्या तुमच्या नको त्या कृत्याचे ब्राम्हणेतर मंडळींना अगदी मराठ्यांना किंवा तुमच्या पक्षातल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देखील मनापासून खटकले आहे, आवडलेले नाही, फक्त त्यांची तुमच्यासमोर बोलण्याची हिम्मत नसल्याने त्यांनी तुम्हाला खडे बोल सुनावले नाहीत एवढाच काय तो फरक, लहान तोंडी मोठा घास घेऊन सांगतो, असे निदान तुमच्यासारख्या नेत्यांनी तरी वागू नये...

शेवटी अत्यंत महत्वाचा मुद्दा या राज्यातील विविध पद्धतीच्या मीडिया मध्ये काम करणाऱ्या ब्राम्हण प्रतिनिधींचा, वाहिन्यांवर मोठ्या हुद्द्यांवर कार्यरत असलेल्या ब्राम्हण मंडळींचा, विविध वृत्तपत्रांमध्ये विविध मनाच्या पदावर काम करणाऱ्या पत्रकारांचा किंवा ज्या ब्राम्हण मंडळींकडे वृत्तपत्रांची मालकी आहे त्या मालकांचा,थोडक्यात प्रत्येक मीडिया पर्सनचा मला त्या घटनेनंतर जेवढा अधिक राग पवारांचा आला नाही त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने या मंडळींचा यासाठी राग आला कि हे स्वतःला कायम अतिशय ग्रेट समजणारे ब्राम्हण मीडिया पर्सन, यापैकी एकाचाही स्वाभिमानी जागृत होऊन त्यांनी पवारांना आडवे तिडवे घेतले नाही, एवढे का तुम्ही पवारांना घाबरून आहात म्हणजे थेट गांडू आहात हेच म्हणणे अधिक योग्य ठरावे. तळहातावर शीर घेऊन जर आम्हा मीडियातल्या मंडळींचे जगणे वागणे बोलणे आणि लिहिणे नसेल तर आज पवारांनी अपमान केला उद्या रस्त्याच्या कडेला बसणारे भिकारी देखील ब्राम्हणांची माय बहीण काढून मोकळे होतील. खूप वाईट वाटले ज्यांनी एकेकाळी मला येथे मुंबईत स्थिर केले त्या शरद पवारांचे ज्यांनी कायम मित्र म्हणून मला सहकार्य केले त्या छगन भुजबळांचे आणि त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने मीडियातल्या ब्राम्हणांचे...
तूर्त एवढेच.

पत्रकार हेमंत जोशी 

Friday, 15 June 2018

गुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी


गुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी 
११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला सहज चकवा दिला होता त्याच मृत्यूला त्यांनी आपणहून बोलाविले आणि अचानक ते वरच्या प्रवासाला निघून गेले, सर्वाधिक फोन त्या दोन दिवसात अनेकांचे मला आले आणि असे फोन अपेक्षितच होते, मी नेमके काय म्हणतो हे सर्वांना ऐकायचे असावे, ऐकायचे होते, कारण जे अगदीच बोटावर मोजण्या इतके अविनाश दुधे सारखे निरपेक्ष त्यांचे चार दोन क्रिटिक होते, मला वाटते त्यात मी सर्वाधिक आघाडीवर होतो...

पण ११ तारखेच्या आधी चार दोन दिवस जे घडले ते यापुढे मला न विसरता येणारे किंवा मनाला चटका लावून गेलेले, हे असे नक्की निघून जायचे याचा सरळ अर्थ आहे त्यांनी ते आधीच ठरविलेले होते, मला हे असं वाटते, कारण त्याचे असे झाले, ११ तारखेच्या केवळ दोन तीन दिवस आधी, मी नेहमीप्रमाणे माझे आयपॅड लिहायला उघडले, तत्पूर्वी फेसबुक ओपन केले आणि समोर बघतो तर भय्यू महाराज यांची फ्रेंड रिक्वेस्ट, ती नाकारणे मला स्वप्नातही शक्य नव्हते, क्षणार्धात आम्ही फेसबुक फ्रेंड देखील झालो... 

उदय निरगुडकरांसारख्या अनेक मान्यवरांना उगाचच वाटायचे कि ते केवळ त्यांनाच ' दादा ' म्हणायचे, असे अजिबात नव्हते, त्यांच्या तोंडात बसलेले ते टोपण नाव होते आणि चतुर महाराज हे तोंडात बसलेले टोपणनाव एखाद्याला आपलेसे करायचे झाल्यास हमखास वापरायचे, ते माझ्याशी देखील दादा याच टोपण नावाने बोलायचे, जाण्यापूर्वी त्यांनी जणू फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मला तेच सूचित होते कि, दादा मी निघतो आहे पुन्हा न भेटण्यासाठी तत्पूर्वी कट्टी संपवून आपली आता पक्की, मी अर्थात त्यांच्या समोर फार लहान असल्याने मैत्री नाकारण्याचा प्रश्न नव्हताच, मी ती रिक्वेस्ट लगेच स्वीकारली, आणि बातमी कानावर आल्यावर ' पुन्हा स्वीकारलेल्या या मित्राचे ' हे असे निघून जाणे, त्याक्षणी, म्हणजे पहिल्यांदा बातमी कानावर आली तेव्हा ढसा ढसा रडण्यापलीकडे माझ्या हातात काहीही उरलेले नव्हते...त्यांच्याविषयी कितीतरी कडू-गोड आठवणी आहेत पण जे मी झी २४ तास वर अजित चव्हाण आणि पडद्यामागे याच वाहिनीच्या प्रसाद काथे या अत्यंत आवडत्या तरुण मित्रांना म्हणालो तेच येथेही, गेलेल्या व्यक्तीविषयी कधीही वाईट बोलायचे नसते, मी ते यापुढे शक्यतो पाळणार आहे. मी, झी २४ तासच्या या मित्रांना किंवा अगदी टीव्ही ९ वर बोलावणे आले कि तेथल्याही सचिन परब सारख्या मित्रांना हेच सांगत आलोय, का रे मला बोलविता, अनेक तथाकथित मान्यवरांच्या त्यातून भुवया उंचावतात, तुम्ही पण निरगुडकरांसारखे सावध असलेले बरे...
www.vikrantjoshi.com 

अजित चव्हाण म्हणाले ते शंभर टक्के योग्य होते, मी महाराजांचा शत्रू होतो म्हणून नव्हे तर दरवेळी लोकांच्या अनेकांच्या भक्तांच्या देवाचे वागणे चुकू नये त्यांचे महत्व कमी होऊ नये म्हणून माझे ते अगदी कळवळून ते लिखाण असायचे, अगदी प्रत्यक्ष भेटीत देखील किंवा फोनवरून देखील ते जे चुकायचे, मी त्यांना कोणताही मुलाहिजा न ठेवता सांगून मोकळा होत असे, जसे एकदा मी त्यांना म्हणालो कि महाराज, भक्तांना आपला देव वारंवार आजारी पडतो हे न भावणारे असते त्यासाठी तुम्ही मला एक वचन द्यायचे आहे, यापुढे सतत स्वतः दोन दोन हजार किलोमीटर कार ड्राइव्ह करणे तुम्हाला थांबवायचे आहे, ते एकतर अतिशय रिस्की असते आणि त्या थकव्याने तुमचे विनाकारण नको ते आजारपण बळावते, त्यांनी ते तदनंतर बऱ्यापैकी पाळले होते..परवा नागपुरातले ' गांधी ' गिरीश गांधी फोनवरून मला जे महाराजांविषयी म्हणाले ते मनाला तंतोतंत पटले आणि त्यांना जे अतिशय जवळून बघणारे होते त्यांनाही ते पटणारे आहे कि महाराजांची अवस्था गाईड मधल्या देवानंद सारखी होती म्हणजे त्यांना कमालीचे ग्लॅमरस वागणे आवडायचे आणि लोकांनी तर त्यांना देव करून सोडलेले होते, शेवटपर्यंत ते याच द्विधा, काहीशा गोंधळलेल्या म्हणाला तर अवस्थेत आणि म्हणलं तर मनस्थितीत जगले, त्यांना त्यातले नेमके एक वागता आले नाही, त्यांना धड देव होता आले नाही किंवा एखाद्या फिल्मी हिरो सारखे भयमुक्त स्वच्छंद जगता आले नाही, शेवटी जे या अशा द्विधा स्वभावाच्या त्यातून अत्यंत अत्यंत हळव्या मनाच्या व्यक्तीचे घडते, तेच त्यांचे झाले, त्यांनी आत्महत्या करून घेतली, साधू संतांनी पदरी कधी रिव्हॉल्वर बाळगायची असते का, पण हे असे त्यांचे चंचल वागणे होते..

आणखी एक अतिशय महत्वाचे सांगतो, जेव्हा एखादे व्यक्तिमत्व मोठे होते, आभाळाला टेकते तेव्हा अशा व्यक्तीने मोठे होतांना आणि मोठे झाल्यावर देखील आपले कुटुंब आपले घर आधी सांभाळायचे असते आणि त्यापुढे जाऊन आणखी एक सांगतो, कुटुंब सदस्यांनी देखील अशा उत्तुंग व्यक्तीला त्याच्या गुण दोषांसहित स्वीकारून त्याला मनापासून साथ द्यायची असते जे मी माझ्या घरात देखील सांगत असतो आणि तेच अनेकदा माझ्या स्वतःच्या घरी देखील घडते म्हणजे त्यांचे अनेकदा मला नको तेवढा त्रास देणे विनाकारण सुरु असते. मोठ्या व्यक्तींच्या घरातल्या सदस्यांनी त्यांना अचानक चालून आलेले हे असे भव्य सुख पचवायचे असते अन्यथा सर्वांचे प्रमोद महाजन होणे अपरिहार्य असते, भय्यू महाराज किंवा प्रमोद महाजन यांच्या ते जीवावर बेतले, ते आणि त्यांचे कुटुंब उध्वस्त झाले, त्यांच्यासारखे असे कितीतरी माझ्या पाहण्यात आहेत त्यात अधिकारी आणि पुढारी तर मोठ्या प्रमाणावर आहेत, फक्त त्यांचा अद्याप भय्यू महाराज आणि प्रमोद महाजन झालेला नाही एवढाच काय तो फरक, फक्त त्यांनी आत्महत्या केलेली नाही किंवा त्यांची हत्या झालेली नाही एवढाच काय तो डिफरंस...

ते साधू संत बुवा होते त्यामुळे त्यांच्या भोवताली तरुण बायका जमा होणे स्वाभाविक असते हे विवाहाआधीच डॉ. आयुषी यांनी ध्यानात घेऊन लग्न करायचे होते पण जी व्यक्ती ज्या पद्धतीने बोलून आपल्याला गटविते पटविते तो नवरा इतरांशी देखील तसेच वागतो आणि तेच करणार आहे हे प्रेमविवाह करणाऱ्या बहुतेक साऱ्याच स्त्रियांना नेहमी वाटत असते आणि तेच दिवंगत माधवी वहिनींना आणि अलीकडे डॉ. आयुषी यांना देखील कायम भय्यू महाराज यांच्या बाबतीत वाटायचे त्यातून त्या दोघींचे त्यांच्याशी पटले नाही आणि हे घडले, त्यातले एकही सुखी झाले नाही, नुकसान मात्र त्यांच्या अपत्यांचे झाले...

महाराज तेथे तरी आता आराम करा, शांत चित्ताने रहा, तुमच्या जाण्याने माझे,आमच्या सर्वांचे मन अतिशय अस्वस्थ आहे, तुमचे जाणे यापुढे दरदिवशी मनाला छळणारे असेल, तुम्हाला मनापासून श्रद्धांजली...

पत्रकार हेमंत जोशी 

Tuesday, 12 June 2018

लाज वाटते मराठी मुंबईची : पत्रकार हेमंत जोशी

लाज वाटते मराठी मुंबईची : पत्रकार हेमंत जोशी 

ह्या लेखातला नेमका विषय सुरु करण्यापूर्वी एक आगळे आवाहन येथे करू इच्छितो, मनातली अस्वस्थता देखील सांगू इच्छितो. तसेही माझे वृत्तपत्र हे केवळ एक वर्तमान म्हणून त्याकडे बघू नये, ते तुमचे आमचे गप्पा मारण्याचे
एक व्यासपीठ आहे. अस्वस्थता अशी कि आपल्या या मुंबईत जगातले विविध पदार्थ खाद्य पदार्थ उपलब्ध असलेली अनेक रेस्टॉरंट्स आहेत म्हणजे दाक्षिणात्य पदार्थांसाठी माटुंगा पूर्व आहे, गुजराथी खाद्य पदार्थांसाठी काळबादेवीचे ठक्कर भोजनालय किंवा पार्ले पूर्व येथे ' तोशा ' सारखे हुबेहूब चवींचे हॉटेल्स आहेत, उत्कृष्ट भेळ पुरीसाठी आम्ही सांताक्रूझच्या राम श्याम भेळवाल्याकडे जातो किंवा चायनीज खाण्यासाठी ' स्प्रिंग ओनियन ' सारखे रेस्टॉरंट्स आहेत. झणझणीत मिसळ खाण्यासाठी थेट ठाण्यात मामलेदार कडे जावे लागते तर अत्योत्तम कॉफी साठी मुंबईतले २२-२५ ' कॉफी बाय डी बेला ' मुंबईतल्या मोक्याच्या ठिकाणी आहेत, थोडक्यात हुबेहूब चवीचे विविध देशातले, आपल्या देशातले कितीतरी रेस्टॉरंट्स या मुंबापुरीत आहेत पण आमच्या या मराठी मुंबईत ' आस्वाद ' सारखा अगदीच एखादा दुसरा अपवाद सोडल्यास राज्यातल्या विविध भागातल्या मराठी पदार्थांची जशीच्या तशी चव चाखायला मिळणारे एकही मराठी खानावळ किंवा मराठी उपहारगृह नाही, आम्हा मराठीची हि मोठी शोकांतिका आहे, गेल्या कित्येक वर्षांपासून मला ती खंत आहे. एकदा तर मी आस्वाद मित्रवर्य सरजोशी यांना म्हणालो देखील कि सुरुवातीला तुमचे उपहारगृह केवळ मराठी पदार्थांचे होते,


नंतर त्यात सारे जग घुसले त्यामुळे असे वाटते कि बायकोबरोबर सासर्याने आपल्या सोयीसाठी एखादी दाक्षिणात्य तरुणी देखील पाठवून दिली त्यावर सरजोशी म्हणाले, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हे बदल करावे लागले म्हणजे थेट पोह्यांशेजारी आम्हाला डोसे किंवा पिझा सारखे अर्थाअर्थी संबंध नसलेले पदार्थ ठेवावे लागले. माझा धाकटा मुलगा विनीत किंवा मुलासमान राहुल येथे मुंबईत हुबेहूब पाश्चिमात्य पद्धतीचे कॉफी शॉप्स उघडून पोटापाण्याचा व्यवस्थित लागले असतील पण कोणीही माझ्या टाहो फोडण्याकडे आजतागायत लक्ष दिलेले नाही म्हणून हे आव्हान येथे मला करावेसे वाटले, वाटते कि एखाद्याने पुढे येऊन मुंबईत मोक्याच्या जागी नव्हे तर फक्त मोक्याच्या परिसरात मग ती भलेही अगदी पहिल्या माळ्यावर असेल, पुढे यावे आणि जागा उपलब्ध करून द्यावी, मला येथे आमच्या मुंबईत जगातल्या लोकांसाठी राज्यातले जसेच्या तसे चवीचे मराठी खाद्यपदार्थ असलेली म्हणाल तर खानावळ किंवा म्हणाल तर चक्क आणि फक्त मराठी उपहारगृह उघडायचे आहे, आणि जे मुंबई किंवा पुण्यातले आम्हाला जवळून ओळखतात, त्यांना माहित आहे, याही व्यवसायात आमचा हातखंडा आहे, फक्त जागेचे तेवढे बघावे, ते कठीण जाते आहे...मुंबईकरांचे दुर्दैव असे कि त्यांना हुबेहूब मराठी पदार्थांची चव घेण्यासाठी उठसुठ पुण्याला जावे लागते. उद्या नेमक्या मराठी पदार्थांची चव घेण्यासाठी त्यावर म्हणाल तर हुकमत किंवा म्हणाल तर मोनोपली असलेले पुणेकर जेव्हा येथे मुंबईत अस्सल मराठी पदार्थांची चव घेण्यासाठी आमच्याकडे येतील तो दिवस निदान माझ्यासाठी तरी, अत्यानंदाचा ठरेल. आणि हो, ' मला शोभेल ' असे मी या मराठी खानावळीचे नेमके नाव देखील नोंदणीकृत करून घेतलेले आहे आणि नाव आहे, बनवाबनवी...


राज्यातल्या, महाराष्ट्रातल्या त्या त्या भागातल्या पदार्थांची चव घेण्यासाठी एकतर पुणे गाठावे लागते किंवा त्या त्या भागात जावे लागते म्हणजे अख्ख्या मुंबईत एकही ठिकाणी लुसलुशीत पुरणाची मिळत नसल्याने त्यासाठी नाशिक ते नागपूर दरम्यान कोणाला तरी गाठावे लागते किंवा नेमका चविष्ट सत्यनारायणाचा प्रसाद येथे मुंबईत एकही ठिकाणी तयार होत नसल्याने त्यासाठी मुंबईतल्या एखाद्या पाककलेत प्रवीण असलेले ब्राम्हणाचे घर गाठावे लागते किंवा नेमकी मिरच्यांची भाजी, शेवेची भाजी किंवा भरीत खाण्यासाठी येथे एखाद्या लेवा पाटलाचे घर गाठावे लागते कारण मराठी पदार्थांची नेमकी चव येथे जगप्रसिद्ध मुंबईत उपहारगृहातून अभावाने उपलब्ध
 आहे, जे काय मिळते ते बहुतेकवेळा बेचव असते किंवा मराठी स्त्रीने घरी हौस म्हणून जसे बनविलेले पाश्चिमात्य पदार्थ आम्हाला गिळावे लागतात तेच येथे उपहारगृहातून उपलब्ध असलेल्या बहुतेक मराठी पदार्थांच्या बाबतीत घडते. मराठीचे अत्यंत लाडके असे चविष्ट पिठले येथे मुंबईत आधी खूप खावे नंतर त्या भूषण कडू सारखे अमाप
पादावे एकही उपहारगृहातून मिळू नये यासारखे दुर्दैव नाही, मग त्यासाठी पुण्यात गेलो कि कामे बाजूला ठेवून नेमक्या चविष्ट मराठी पदार्थांचे उपहारगृह शोधात फिरावे लागते, मुंबईकरांचे हे मोठे दुर्दैव आहे...


कृपया माझ्या या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, ज्यांच्याकडे मोक्याच्या परिसरात जागा उपलब्ध आहे, त्यांनी अगदी दुडदुडत मजकडे यावे, विनंती. आपल्याला जगातून मुंबईत येणाऱ्या मंडळींना मराठी पदार्थांची नेमकी 'बनवाबनवी ' त्यांना दाखवून द्यायची आहे. आम्ही मराठी जेथे तेथे कमी पडतो. अलीकडे अमेरिकेतून परततांना बिझिनेस क्लास मध्ये मी एकटा मराठी होतो आणि सारेच्या सारे अमराठी, मोठ्या प्रमाणावर गुजराथी होते, हे प्रमाण उलटे व्हायला पाहिजे, परदेशातून येतांना जेव्हा बहुसंख्य मराठी बिझिनेस क्लास मधून उतरतील, आपण
खऱ्या अर्थाने यशस्वी झालो तेव्हा म्हणता येईल. चला व्यवसायात उतरूया..
तूर्त एवढेच!


पत्रकार हेमंत जोशी 

जय विदर्भ : पत्रकार हेमंत जोशी

जय विदर्भ : पत्रकार हेमंत जोशी 

माईंचा बाबासाहेबांसंगे संसार जेमतेम काही वर्षांचा, त्यांच्या विवाहानंतर बाबासाहेब लवकर गेले म्हणजे माई तर त्यामानाने अगदीच तरुण वयात विधवा झाल्या. १५ एप्रिल १९४८ रोजी माई बाबासाहेबांशी विवाहबद्ध झाल्या, लगेच ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे महानिर्वाण झाले देखील, त्यांचा संसार थोडक्यात जेमतेम थोड्याच वर्षांचा पण त्या ओळखल्या गेल्या या तपस्वीच्या पत्नी अर्धांगिनी म्हणूनच...थोडक्यात काही नाती हि अशी असतात, जेमतेम काही वर्षांची पण अशी नाती अशी माती एकदा का चिकटली कि ती काही केल्या निघता निघत
नाहीत. माझेही तेच झाले आहे म्हणजे माझा मूळ जिल्हा बुलढाणा पण त्या जिल्ह्यात जेवढे माझे राहणे झाले त्यदुप्पट वर्षे मी येथे मुंबईत काढतो आहे. जेमतेम दहावी पास होईपर्यंत कसेबसे आयुष्यतले ते सुरुवातीचे १६ वर्षे मी बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्क्याच्या गावी काढली आणि संधी मिळताच बुलढाणा जिल्हा आणि माझे गावही सोडले ते आजतागायत. आज नाही म्हणायला भली मोठी शेती याच जिल्ह्यातल्या खामगावला आहे पण तेथेही जाणे होत नाही....

बहुतेक स्त्री पुरुषांच्या आयुष्यात विविध प्रियकर प्रेयसी येतात आणि जातात पण पहिले प्रेम विसरणे कधीही कोणालाही शक्य झालेले नाही. खरेतर जर नवराबायकोचे एकमेकांवर नक्की प्रेम असेल तर त्यांनी एकमेकांना सांगून टाकायला हवे कि तू माझ्या आयुष्यातली किंवा तू माझ्या आयुष्यातल्या पहिला पुरुष नाहीस किंवा तू माझ्या आयुष्यातली पहिली स्त्री नाहीस पण शेवटचा पुरुष किंवा शेवटची स्त्री नक्की आहेस, आपल्याकडे हे नक्की घडत नाही, कारण आपल्या विवाहाच्या किंवा स्त्री पुरुष संबंधांच्या कल्पना फार वेगळ्या आहेत म्हणाल तर अति खुजा आणि बुरसटलेल्या आहेत..पहिल्या प्रेमासारखे माझे आजही अगदी दररोज होते म्हणजे आयुष्याच्या सुरुवातीला ज्या जिल्ह्यात किंवा ज्या गावात मी काढलीत त्या जिल्ह्याची आणि त्या गावाची अगदी मी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असतांना आठवण होत नाही किंवा झाली नाही असे आजतागायत कधीही घडलेले नाही. आणि तेच खरे आहे कि जे पहिल्यांदा वाट्याला येते ते कधीही विसरणे शक्य नसते. मी पहिली कार विकत घेतली तेव्हा माझे वय वर्षे २२ होते कि आमच्याकाळी वयाच्या २२ व्य वर्षी ब्राम्हण तरुणांकडे स्वतःच्या पायावर उभे राहून त्याला सायकल घेणे देखील शक्य नसते, नसायचे. ती सेकंड हॅन्ड फियाट म्हणजे हॉर्न सोडून सारे वाजणारी गाडी आजही दररोज आठवण करायला भाग पाडते आश्चर्य म्हणजे त्यानंतर मी उत्तमोत्तम आजतागायत ६९ कार्स विकत घेतल्या पण तिला विसरता आलेले नाही, इतर गाड्यांची आता तर नावे देखील
आठवत नाहीत. अगदी खरे सांगतो, मी एवढा उनाड होतो किंवा आजही असेल, म्हणजे ज्या दिवशी मी दहावी पास झालो, माझे खडूस पुराणिक सर अगदी जवळ येऊन मला म्हणाले, हेमंत तू पास झाला ना म्हणून आम्ही शिक्षकांनी एकमेकांचे एकमेकांना कडकडून मिठ्या मारून अभिनंदन केले. नशीब, मला दहावीला असतांना एखाद्या तरण्या शिक्षिका नव्हत्या अन्यथा त्या देखील नक्की आनंदोत्सवात सामील झाल्या असत्या..

माझ्या विदर्भात माझ्या बुलढाणा जिल्ह्यात किंवा माझ्या जळगाव जामोद या गावात काहीही आजही चांगले घडले कि मला थेट हृदयातून मनापासून मनातून आनंद होतो. अलीकडे अनेक दरदिवशी टीका करता कि सध्या हा देश किंवा हे राज्य भागवत, फडणवीस आणि गडकरी विदर्भातल्या या तीन बामणांच्या हाती आहे. अहो, बरे झाले त्यांच्या हातात आले म्हणून आमच्या विदर्भाचे नाव तरी इतरांना आठवायला लागले अन्यथा आजतागायत एखाद्या ठेवलेल्या बाईसारखे आम्हा विदर्भवासीयांचे जगणे होते...

येथे मुंबई किंवा पुण्यात किंवा राज्यात, देशात थेट अमेरिकेपर्यंत गाजलेली अथवा नावाजलेली कितीतरी माणसे आमच्या जिल्ह्यातली, माझ्या गावातली आहेत पण त्यांना माझ्या जिल्ह्याचे आणि आमच्या गावाचे नाव देखील सांगायला लाज वाटते, माझे गाव ' जळगाव ' असे सांगून किंवा फेसबुक वर लिहून ते बहुतेकवेळा मोकळे होतात, भलेही माझा जिल्हा किंवा गाव मागासलेले असेल पण आपल्या गावाचे किंवा जिल्ह्याचे नाव सांगतांना लाज ती का वाटावी, त्याने तुमचे काय लग्न होणार नाही कि इतर सारे तुम्हाला वाळीत टाकणार आहेत, असे अजिबात नसते. आता वय वाढले म्हणून आणि तिचे देखील लग्न झालेले आहे म्हणून अन्यथा, होय, मी अजिबात न लपविता जळगाव जामोदचा आहे, असे सांगून थेट माधुरी दीक्षित ला देखील माझ्या प्रेमात पडायला भाग पडले असते...

हे सारे येथे आठवले ते त्या बुलढाणा अर्बन बँकेमुळे म्हणजे जी बँक थेट ' बुलढाणा अर्बन सहकारी पत संस्था ' हे असे सामान्य नाव लिहूनही अगदी मुंबईपर्यंत ज्या पत संस्थेच्या भारतातल्या राज्यातल्या विविध ठिकाणी ४००-४२५ शाखा आहेत, होय, ती पत संस्था माझ्या बुलढाणा जिल्ह्यातली तर आहेच पण ज्यांनी बुलढाणा अर्बन सुरु केली ते राधेश्याम चांडक आमच्या बुलढाण्याचे आहेत, त्यांना साथ देणारे शिरीष देशपांडे देखील बुलढाण्याचे आहेत, देशपांडे यांचे आजोळ माझ्या गावातल्या प्रसिद्ध डिडोळकर कुटुंबातले आहे आणि...आणि चांडक तसेच देशपांडे यांच्या खांद्याला खांदा लावून ज्या तिसऱ्या व्यक्तीने मोलाची कामगिरी बजावलेली आहे, बजावतो आहे तो माझा बालमित्र डॉ. किशोर केला हे तर थेट माझया गावातले म्हणजे जळगाव जामोद चे आहेत आणि आजही ते मुंबईत राहणे अगदी सहज शक्य असतांना आमचे गाव सोडून गेलेले नाहीत, आजही ते तेथेच जळगाव जामोद येथेच वास्तव्याला आहेत. चांडकजी, आणि मित्रवर्य शिरीशजी आणि डॉ. किशोर केला, मला, आम्हा सर्वांना तुमच्या तिघांचाही खूप खूप खूप अभिमान आहे...
क्रमश:
 
पत्रकार हेमंत जोशी