Sunday, 6 May 2018

पवारांचे पॉलिटिक्स २ : पत्रकार हेमंत जोशी


पवारांचे पॉलिटिक्स २ : पत्रकार हेमंत जोशी 
शरद पवारांना फार फार फार दूरवरचे दिसते आणि त्यांना ते कुडमुडे जोशी नसलेत तरी भविष्य तंतोतंत कळते. समजा प्रमोद हिंदुराव त्यांच्यापासून पाच किलोमीटर दुरून चालताहेत आणि मध्येच हिंदुरावांचे एक जरी पाऊल वाकडे पडले तरी इकडे पवारांच्या ते लगेच लक्षात येते किंवा वाकडे पडलेले पाऊल त्यांना दिसते. अजित पवार राजकारणात आले, सक्रिय झाले, आमदार म्हणून थेट लोकांतून निवडून आले नंतर राज्यमंत्री आणि मंत्री झाले, दादांच्या येथपर्यंतच्या प्रवासाचे शरदरावांना नक्कीच कौतुक होते आणि त्यांच्या मनात होते म्हणून दादा झटक्यात मोठे झाले, पवारांच्या घराण्यातले इतर कोणीही राजकारणात मोठे झाले नाही कारण शरदरावांच्या ते मनात नव्हते म्हणजे दिवंगत बंधू आप्पासाहेब पवारांची मुले किंवा सुना किंवा स्वतः आप्पासाहेब कायम सतत धडपडत आलेले सत्तेतल्या राजकारणात येण्यासाठी पण या राज्यातल्या ब्रम्हदेवाला म्हणजे दस्तुरखुद्द शरद पवारांनाच ते मान्य नसल्याने उद्या थेट नरेंद्र मोदी यांनी जरी त्या बारामतीत जाऊन आप्पासाहेब पवारांच्या लेकाला कडेवर जरी घेतले तरी त्यांचे साधे सरपंच किंवा ग्रामसदस्य होणे देखील अशक्य असेल, शक्य नसते...

दूरचे दिसणाऱ्या पवारांना जेव्हा दिसले कि अरे ज्याला आपण कडेवर घेतलेले आहे तोच वारंवार आपल्या डोक्यावर हागुन ठेवतो आहे आणि खांद्यावर बसून वारंवार मुतून ठेवतो आहे, विशेष म्हणजे हे त्यावेळी फक्त आणि फक्त शरद पवारांच्याच लक्षात आले होते अजित नामें मोती नाकापेक्षा जड होतो आहे, जेव्हा किंवा जे पवारांच्या आधीच लक्षात आले होते ते इतरांच्या लक्षात आलेम्हणजे शरदराव राज्याच्या राजकारणातून संपले आणि अजितकुमार युग सुरु झालेले आहे तेव्हा सारे हेच म्हणाले पुढले युग केवळ अजितदादांचेच, शरदजी सहकुटुंब आता लवकरच काठेवाडीला मार्गस्थ होतील, पुढले निवृत्तीचे आयुष्य जुने अल्बम बघण्यात घालवतील, किंवा वारीत रिंगण करून स्वतःभोवती गोल गोल गिरक्या घेऊन टाळ मृदूंग बडवितांना दिसतील. पवार संपले आहेत असे वाटून त्यात पवारांचे जीवघेणे दुखणे पाहून त्यादरम्यान अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटून काहींना तर हर्षवायू होतो कि काय असे वाटू लागलेले होते, पण जे सर्वांना वाटले किंवा शरदरावांच्या बाबतीत बहुतेकांना जे बोचते खुपते आणि त्या त्या खुपण्यातून विरोधकांना जे आनंदाचे उधाण येते त्यात काहीही तथ्य नसते किंवा नव्हते आणि लोकांच्या हे ध्यानीमनी देखील नव्हते कि मिस सुप्रिया पवारांची सौ. सुप्रिया सुळे झालेली शरदरावांची अमेरिकेत स्थायिक झालेली लेक राज्यात परतेल आणि राजकारणात उतरेल, मात्र ते घडले, हळूहळू डोक्यावर बसलेले अजितदादा खाली उतरले किंवा अलगद उतरविल्या गेले आणि ती जागा आता घेताहेत किंवा घेतली आहे फक्त आणि फक्त सुप्रिया सुळे यांनी...

होय, पुढे जेव्हा केव्हा येथे या राज्यात आघाडीचे सरकार सत्तेवर असेल या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळेल तो सुप्रिया पवार सुळे यांना आणि सुप्रिया यांच्या ' शशिकला ' असतील दिवंगत आर आर पाटील यांच्या कन्या, अलीकडेच आनंद थोरात यांच्याशी विवाहबद्ध झालेल्या स्मिता पाटील थोरात. सुप्रिया सुळे यांची आर्थिक दृष्ट्या जयललिता भलेही होणार नाही पण या राज्यातल्या राजकारणातल्या त्या नजीकच्या काळात जयललिता असतील आणि त्यांच्या उजव्या हात असतील त्यांच्या शशिकला असतील स्मिता पाटील थोरात. पुढे जाऊन हेही सांगतो, दिवंगत आमदार सुभाष कुल यांचे चिरंजीव विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या नक्की पायाखालची जमीन सरकलेली असेल कारण त्यांच्या जागी पुढल्या आमदार असतील सौभाग्यवती आमदार असतील, ची. सौ. का. स्मिता पाटील थोरात. इच्छुकांनो, जा उठा आणि कामाला लागा, ज्यांनी आपली गर्दी अजित पवारांभोवती जमवलेली होती त्यांनी मनातले सांगतो आता झटक्यात उठावे आणि ताईंभोवताली कडबोळे करून उभे राहावे. 
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment