Thursday, 26 April 2018

आपले मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी

आपले मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी 
नागपुरातले ' गांधी ' श्री गिरीश गांधी भाजपाचे नाहीत ते तनाने राष्ट्रवादीत आहेत आणि मनाने मनापासून मनातून केव्हाच राष्ट्रवादीतून बाहेर पडले आहेत. त्यांना भाजपामध्ये प्रवेश करायचा नाही तरीही नेहमीच ते भेटले कि मुद्दाम सांगतात, परवा भेटले तेव्हाही हेच म्हणाले कि विदर्भाला प्रगतीपथावर नेणारे आजतागायतचे उत्तम महामार्ग म्हणजे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस व या दोन महामार्गांना जोडणारा अत्योत्तम पूल म्हणजे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. गिरीश गांधी जे म्हणाले त्यात काहीही अजिबात वावगे नाही, खोटे नाही, अवास्तव नाही. त्यावर आणखी एक उदाहरण पुरेसे आहे. जेव्हा मराठ्यांचे मोर्चे निघत होते ते यशस्वी करण्यासाठी काही पदाधिकारी बुलढाण्याला आले त्यांनी एक बैठक घेतली, त्या बैठकीत एक मराठा 
शासकीय अधिकारी मोर्चे आयोजित करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना म्हणाले, तुम्हाला आमच्याकडून कोणतेही सहकार्य मिळणार नाही कारण विदर्भाच्या इतिहासात असे पहिल्यांदा घडते आहे कि फडणवीस आणि गडकरी आमचे भले करण्यासाठी दिनरात 
झिजताहेत. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातील मंडळींनी कधी ढुंकूनही आमच्याकडे बघितले नाही जेव्हा राजेंद्र शिंगणे बुलढाणा जिल्हा सहकारी बँक वाचविण्यासाठी त्यांच्याच नेत्यांना म्हणजे शरद पवारांना सरकारकडून आर्थिक मदत द्या, टाहो फोडत होते तेव्हा हेच पवार साखर कारखान्यांना कोट्यवधी रुपये लुटून देत होते, आमचे शिंगणे शेवटी मंत्रिपदाचा राजीनामा देतात कि काय असे त्यादरम्यान वाटायला लागले होते. तेथे जमलेल्या सर्वांनी या अधिकाऱ्याच्या वाक्यांवर जोरदार टाळ्यांनी दाद दिली होती...अत्यंत महत्वाचे म्हणजे विदर्भातली माणसे मोठ्या मनाची आहेत, सांगायचे झाल्यास केवळ विदर्भविकास हे गडकरी आणि फडणवीस यांचे पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा मराठवाड्यातल्या नेत्यांसारखे हेकेखोर वागणे नाही कारण ते हलकट नाहीत दिलदार आहेत म्हणून एकाचवेळी गडकरी देशाचा आणि फडणवीस राज्याचा विकास करण्यात जणू एकमेकांचे विकास कामातले स्पर्धक झाले आहेत, ते विदर्भाचा विकास साधतांना त्यांच्यासमोर इतरही आहेत म्हणून त्यांना ढोपरापासून सलाम.....

पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी इतरांचे कधीही भले केले नाही हि वस्तुस्थिती आहे, मराठी माणसाने कधीही संकुचित असू नये असे मला वाटते. एखादा मोठा होत असेल तर त्याला दाद आणि साथ द्यावी असेही मला वाटते. नीरज गुंडे या व्यक्तीचा सध्या या राज्यात प्रचंड दबदबा आहे, हे असे नेहमीच घडत आले आहे म्हणजे अशोक चव्हाण मुख्यमंत्री असतांना पुण्यातल्या जयंत शाह यांचा असाच दबदबा दरारा होता, त्यांनी हो म्हटले कि काम होऊन जायचे अलीकडे ते तसेच चेंबूरच्या नीरज गुंडे यांच्या बाबतीत घडते आहे, युतीचे सरकार आले आणि गुंडे मोठे झाले असे घडलेले नाही तर गुंडे यांनी युतीचे सरकार किंवा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतांना जी मोठी भूमिका बजावली त्यातून ते मोठे झाले आणि त्यावेळी घेतलेल्या रिस्क ची फळे ते चाखताहेत, एक मराठी माणूस मोठा होतांना अनेकांना बहुतेकांना सहन होत नाही, आमचे तसे नाही त्यामुळे कोण काही त्यांच्याविषयी सांगितले कि आम्ही दुर्लक्ष करतो, आमच्या पोटात दुखत नाही, नीरज नेमके कसे त्यावर मी कालनिर्णय चे आणि जयराज साळगावकर अधिक चांगले सांगू शकतो पण गुंडे यांच्याविषयी नकारात्मक चर्चा नसावी असे आज तरी आम्हाला वाटते...

तीच बाब टाइम्स ऑफ इंडिया चे पोलिटिकल एडिटर श्रीमान प्रफुल्ल मारपाकवार यांच्या बाबतीत. प्रफुल्ल हे दरवर्षी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात त्यांच्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ काही पुरस्कार देतात, विशेषतः हे पुरस्कार पत्रकारांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिले जातात. पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात प्रफुल्ल यांनी नेहमीचा त्यांचा हा पुरस्कार सोहळा घेतला नाही म्हणून मी अगदी सहज काही पत्रकारांना विचारले कि त्यांनी हे का केले नाही त्यावर, मारपाकवार निवृत्त झाले म्हणून त्यांनी हे पुरस्कार दिले नाहीत असे मला काहींनी सांगितले जे साफ खोटे ठरले. प्रफुल्ल यांना आमच्यातले बहुतेक मोस्ट व्हिमजिकल ठरवून मोकळे होतात, वाटल्यास प्रफुल्ल यांना थोडेसे तिरसट स्वभावाचे म्हणावे पण ते मोस्ट व्हिमजिकल आहेत, मला हा आरोप अजिबात मान्य नाही, जो माणूस संकट मग ते कोणत्याही पत्रकारावर आले कि तन मन धनाने धावून जातो, जो आपली मुले उत्तम घडवून मोकळा होतो ज्याचा उच्चाधिकारी म्हणून काम केलेल्या पत्नीला उत्तम संसार केला म्हणून अभिमान आहे ते प्रफुल्ल मोस्ट व्हिमजिकल आहेत, म्हणणे साफ खोटे आहे. आणि प्रफुल्ल यांच्यावर केवळ व्यक्तिगत राग, त्यातून ते निवृत्त झाले अशी अफवा पसरविण्यात आली, अत्यंत महत्वाचे म्हणजे आजतागायतच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या इतिहासात अख्ख्या भारतात फक्त दोनदा असे घडले कि निवृत्तीच्या दिवशी अमुक एका स्टाफला भरघोस वेतनवाढ देऊन एक्सटेंशन देण्यात आले त्यात एक दिल्लीचे सेनगुप्ता होते आणि दुसरे होते आमचे आपले प्रफुल्ल मारपाकवार, जे आजही टाइम्स ऑफ इंडिया चे पोलिटिकल एडिटर आहेत, केवळ त्यांचे बोलणे काहीसे तिरसट म्हणून ते वाईट, हे असे सांगत सुटणे केव्हाही चुकीचे, याउलट जेव्हा केव्हा प्रफुल्ल यांची भेट होते, माझ्या नागपुरातला हा माणूस अख्खे राज्य या मुंबईत बसून गाजवून सोडतो आहे, बघून मनाला आनंद होतो, मला वाटते, बघण्याची दृष्टी नेहमी सकारात्मक असावी. अमुक एखाद्या मुद्द्यावर मनभेद किंवा मतभेद झाले म्हणजे समोरचा माणूस वाईट, हे असे एखाद्याविषयी सांगणे किंवा कोणताही व्यक्तिगत अनुभव आलेला नसतांना समोरचा बदमाश ठरविणे त्याला दोष देणे चुकीचे आहे असे मला वाटते. प्रफुल्ल भेटलेत कि मी त्यांना नेहमी पत्रकारितेतला राजकुमार ( सिनेमावला) म्हणून मोकळा होती मग तेही खळखळून 
हसून मनापासून दाद देतात....

संस्कृतच्या एका सुभाषितात असे म्हटले आहे कि बालकाबरोबर मैत्री, विनाकारण हसणे, स्त्रियांबरोबर वाद, दुष्टांची सेवा, गाढवावरची स्वारी, असंस्कृत बोलणे या सहा गोष्टींमुळे माणसाला कमीपणा येतो, गुंडे असोत कि मारपार्कवर हे दोघेही असे वागणारे नाहीत, फारतर असे म्हणता येईल, माणूस मोठा झाला कि इतरांच्या डोळ्यात खुपतो....
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment