Friday, 6 April 2018

उद्धवसेना ३ : पत्रकार हेमंत जोशी


उद्धवसेना ३ : पत्रकार हेमंत जोशी 
अलीकडे त्याच्याशी फारसे बोलणे होत नाही, भेट देखील क्वचित होते, कधी भेटला कि मी त्याला ' सेनेतील प्रधान कसे आहेत तुम्ही ' विचारतो आणि पश्चातापाची आयुष्यात वेळ येणार नाही असे काहीतरी स्वतःसाठी करून ठेव, २३-२४ वर्षे सतत त्याला हेच सांगत आलोय, त्यावर तो सांगतो, अंजली करतेय, छोटेमोठे उद्योग, माझा मात्र त्यात फारसा सहभाग नसतो, असे हा सेनेतील प्रधान सांगून मोकळा होतो. हर्षल प्रधानने सारे सोडले आणि सेने भवनात आपले बस्तान हलविले ते कायमचेच असे अलीकडे दिसतेय. मातोश्रीवर काही माकडे हाती तलवार घेऊन ठाकरे कटुंबाच्या नाकावरची माशी उडवायला तापून बसलेले असतांना एक मात्रनक्की हर्षल त्यातले एक माकड कधी ठरले नाही, तो त्याचे काम प्रामाणिकपणे आणि चोखपणे बजावतोय, नाही म्हणायला काही अप्रामाणिक मुजोरांना त्याचे हे असे सरळ मार्गी वागणे सहन होणे शक्य नसल्याने त्याला बदनाम करण्यासाठी अनेकदा या अशा मंडळींकडून ट्रॅप देखील रचले जातात पण जे आडातच नाही ते पोहऱ्यात कसे येईल, जे तो करणे शक्य नाही त्यात त्याचे अडकणे कसे शक्य आहे...

एक बरे आहे, उद्धवजी ऐकतात जनाचे आणि करतात मनाचे, त्यामुळे हर्षलविरोधात डी४ गॅंगने सतत कान फुंकून देखील फारसे काही साधल्या गेले नाही पण कधी कधी हर्षलच्याही चेहऱ्यावरची अस्वस्थता लपत नाही, शेवटी तोही एक महत्वाकांक्षी तरुण आहे त्यामुळे ठाकरे कुटुंबाचे प्रेम तेवढे मिळते, इतर अनेक मात्र मलिदा खाऊन म्हणजे पद आणि पदके मिळवून मोकळे होतात, काही माकडे मजेत आहेत. पण काही मिळाले नाही म्हणून टोप्या बदलविण्यातला तो नाही त्याची नितांत श्रद्धा कायम त्यांच्याच चरणी, ठाकरे कुटुंबियांच्या म्हणून घरीदारी दुर्लक्ष करून त्यांच्या कायम सेवेतल्या या हनुमानाला आम्ही गमतीने सेनेतला प्रधान म्हणतो हा तेवढा हनुमान इतर काही, माकडे...पुरावे असल्याशिवाय काहीही बोलू लिहू नये असे माझे इतरांना नेहमी सांगणे असते, अमुक एखादा वाईट आहे, भ्रष्ट आहे असे अमुक एखाद्याविषयी किंवा अनेकांविषयी मी लिहावे म्हणून सांगितल्या जाते, पुरावे द्या, लिहितो, असे मी त्यांना सांगतो, त्यांचे पुरावे देणे होत नाही, केवळ असूयेतून ते बोलणे असते, आम्हा मराठींची ती एक अत्यंत वाईट सवय आहे, इतरांवर विनाकारण शिंतोडे उडविण्याची, विना पुरावे वाईट सांगणाऱ्या, नको ते सांगणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचे असते. मिलिंद नार्वेकरांनीच आपल्या राजकीय करिअरची वाट लावली असा समाज किंवा अपसमज झाल्याने काही वर्षांपूर्वी इतर अनेकांचे जे होते ते मोहन रावले यांच्याही बाबतीत घडले त्यांनी थेट नको ते आरोप मिलिंद नार्वेकर यांच्यावर केले पण त्यातले काहीही सिद्ध झाले नाही उलट नार्वेकर मोठे झाले आणि रावले राजकारणातून आणि शिवसेनेतून जवळपास बाहेर फेकल्या गेले ते आजतागायत किंवा कायमचेच. बाळासाहेब आणि मीनाताई ज्या मोहन रावले यांना मुलासमान मानायचे आणि 
वागवायचे पुढे त्याच रावलेंचा ' जयदेव ' झाला आणि मिलिंद नार्वेकर मात्र मोहन रावले यांच्या कितीतरी पुढे निघून गेले. अनेकांना मिलिंद नार्वेकर यांचे अचानक यश डोळ्याला खुपते, त्यांच्या मनाला बोचते आणि हृदयाला जखम करते, पण जे उद्विग्न होऊन नार्वेकर यांच्याविषयी रावले म्हणाले ते मात्र अद्याप कोणीही आकडेवारीसह सिद्ध करू शकलेले नाही म्हणजे नार्वेकर दलाल आहेत, ते शिसैनिकांकडून पैसे घेतात, शिवसेनेला बदनाम करतात, त्यांनी मातोश्रीच्या भरवशावर करोडो कमावले, असे एक ना अनेक आरोप कधी राणे तर कधी रावले यांनी नार्वेकरांवर केले पण सिद्ध झाले नाही उलट नकारात्मक प्रसिद्धीचा प्रचंड फायदा नार्वेकर यांनाच झाला, होतो आहे. पुढे तेच मोहन रावले उद्धव ठाकरेंसमोर हात जोडून उभे राहिले आणि माझेच चुकले, ते म्हणाले. राज ठाकरे ते आजतागायत अनेक, कितीतरी, ज्यांनी मिलिंद नार्वेकर विरोधात बंड केले तेच अडचणीत आले, नार्वेकर मात्र वेळोवेळी गालातल्या गालात हसले, अनेकदा मी म्हणतोही कि नार्वेकर यांचे आडनाव ' नागवेकर ' असायला हवे होते...

जो उठतो, तो नार्वेकरांच्या विषयी माझ्याकडे वाट्टेल ते बोलून, सांगून मोकळा होतो, मी त्यावर फक्त हसतो कारण मला पुरावे हवे असतात, लोकांकडे ते नाहीत किंवा नसतात, अनेकदा असूयेतून नार्वेकर गटाचे हर्षल प्रधान विषयी आणि अनेकांचे मिलिंद नार्वेकर विषयी आरोप प्रत्यारोप करणे सुरु असते, पुरावे असले तरच बोलायचे असते अन्यथा त्याचा मोठा फायदा मिलिंद नार्वेकरांनाच होतो आहे, उद्या ते आमदार होतील आणि मंत्री देखील होतील पण त्यांच्याबाबतीत नेमके सत्य जर असलेच ते उजेडात आले तर उद्धव ठाकरे त्यांचाही मनोहर जोशी, नारायण राणे, मुकेश पटेल, जयंत जाधव, स्मिता ठाकरे करून मोकळे होतील, एकदा त्यांची सटकली कि...


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment