Monday, 30 April 2018

मुख्यमंत्री फडणवीस : पत्रकार हेमंत जोशी


मुख्यमंत्री फडणवीस : पत्रकार हेमंत जोशी 

पुढले संपूर्ण लिखाण केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावरच आहे, अलीकडले देवेंद्र नेमके कसे हे मला येथे सांगायचे आहे तत्पूर्वी त्यांच्यावर केलेल्या एका चुटक्याने लिखाण सुरु करतो...

स्थळ : ब्रिजवासी दुग्धालय अर्थात पुण्यातले. 
ग्राहक : एक लस्सी द्या. 
ब्रिजवासी : कोणती लस्सी देऊ अटल, नरेंद्र कि देवेंद्र ? 
ग्राहक : हा काय प्रकार, नेत्यांच्या नावाने...लस्सी मध्ये फरक तो काय असेल..
ब्रिजवासी : अटल लस्सी मोठ्या ग्लासात देतो तेही भरपूर मलाई मारून शिवाय त्यात ड्रायफ्रूट्स देखील असतात, ग्राहकाचे पैसे वसूल होतात..नरेंद्र लस्सी देखील मोठ्याच ग्लास मध्ये देतो आणि बाहेरून ती छान आहे, कमी पैशात ड्राय फ्रुट्स टाकलेली भरपूर लस्सी मिळते आहे, असे ग्राहकाला वाटते पण तसे अजिबात नसते, या लस्सीच्या ग्लासचे बूड खुबीने बनविलेले आहे, लस्सी बाहेरून भरपूर दिसते पण आत तसे अजिबात नसते, शिवाय ड्रायफ्रूट्स देखील स्वस्तातले असतात,हि फसवी लस्सी आम्हाला सर्वाधिक पैसे मिळवून देते..आणि देवेंद्र लस्सी वेगळी अशी काहीही नाही, आम्ही ती स्वतः तयारहीकरीत नाही, सकाळी सकाळी गोखल्यांच्या तबेल्याबाहेर उभे राहतो आणि त्यांच्याकडले गोड ताक येथे आणून देवेंद्र लस्सी म्हणून विकतो...😄

अर्थातच हा चुटका आणि पुढले लिखाण याचा परस्पर अजिबात संबध नाही. मला अटलजी आणि नरेंद्र मोदी या दोघांविषयी फारसे सांगता येणार नाही पण देवेंद्र बाहेरून लस्सीसारखे आणि आत स्वस्तातले ताक, असे ते अजिबात नाहीत, जसे मी नेहमी सांगतो, येथे ते पुन्हा सांगतो कि मागल्या पंचवार्षिक योजनेत जर खडूस पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून येथे थेट दिल्लीहून आले नसते तर राज्यातल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी, गेट वे ऑफ इंडिया, राणीचा बाग, व्ही.टी.स्टेशन, विमानतळ इत्यादी आमच्याच मालकीचे आहे, बघा सात बार्यावर आमचे नाव आहे, सांगून तेही विकले असते. तेच राज्यातल्या भाजपा नेत्यांचीही, सत्तेतले बहुतांश भाजपा नेते हे प्रकाश मेहता वृत्तीचेच असल्याने म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फारतर धाकले बंधू असल्याने या पंचवार्षिक योजनेत जर दवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नसते तर नरेंद्र मेहता सारख्या नेत्यांनी मीरा भायंदर खाडीवर आपले नाव कोरून तीही विकली असती, फारतर असे म्हणता येईल कि राष्ट्र्वादीतल्या अनेक नेत्यांची वृत्ती दरोडेखोर पद्धतीची होती आणि भाजपातल्या नेत्यांना नेमके कसे आणि कुठे खायचे असते, का बदनाम व्हायचे नसते हे माहित नसल्याने त्यांच्या अननुभवाचा मोठ्या प्रमाणात गैरफायदा या राज्यातल्या भोसले जाधवांसारख्या नीच आणि नामचीन दलालांनी फार मोठ्या प्रमाणावर घेतलेला आहे, मागचे चित्र फारसे काही बदलले नाही किंबहुना भोसले यांच्यासारखे पाप हे युतीच्या काळात भाजपाच्या वरिष्ठ दिवंगत नेत्यांनीच जन्माला घातलेले आहे, भाजपाचा राष्ट्रवादी जरी झालेला नसला तरी त्यांच्यातल्या अनेकांच्या सवयीने, मंत्र्यांनी नेमके काय करायचे असते, माहित नसल्याने भाजपाचे मोठे नुकसान झाले आहे. तुम्हाला काय सांगू, मी कट्टर हिंदू असल्याने मला येथे शिवसेना किंवा भाजपाची मोठी लफडी लिहिणे त्या स्वार्थापोटी शक्य नसते पण असेही मंत्री मला थेट पुराव्यांसहित माहित आहेत कि त्यातल्या एकाला तर दररोज नवी बाई लागते, त्यासाठी त्याने स्वतंत्र सदनिकाच भाड्याने घेऊन ठेवलेली आहे, ज्या दिवशी माझी सटकेल, सारे पुरावे नक्की सांगून लिहून मोकळा होईल, विशेष म्हणजे या मंत्र्याला थेट अमित शाह किंवा फडणवीस किंवा त्यांच्या बायकोने दम भरून देखील त्याला काडीचाही फरक पडलेला नाही. 

दुसरे एक मंत्री तरुण असूनही दुपारी चार पर्यंत झोपून असतात, त्यांना मंत्रालयात येणे तर सोडा पण कानाकोपऱ्यातून त्यांच्या बंगल्यावर आलेल्या मंडळींना साधे भेटायचे देखील नसते, अर्थात वेगळ्या पाश्चिमात्य पद्धतीच्या मूड मध्ये कि व्यसनांमध्ये हे मंत्रीमहोदय दिवसातले अनेक तास असतात जसे मागल्यावेळी एक मंत्री असे होते कि ते आपली ऐय्याशी थेट जुहू परिसरात येऊन साजरी करायचे, विशेष म्हणजे विशिष्ट औषधे घेतल्याशिवाय या आजोबा झालेल्या मंत्र्याला बेडवरले पुढले जमणे शक्य नसायचे पण विशीष्ट औषधे घेतल्यानंतर त्यांच्या खोलीतले आवाज थेट विदर्भात म्हणे ऐकू जायचे, ऐयाशी मंत्री मग ते आघाडीतले असोत कि युतीचे, त्यांनी एकदा विशिष्ट डोस घेतला कि त्यांच्यात मग ताकदवान तरुण संचारतो....

म्हणून जीव तोडून सांगतो आहे, मंत्रिमंडळ फेरबदल अतिशय आवश्यक आहे. मला वाटते सुरुवात माधव भंडारी यांच्यापासून झालेली आहे, त्यांना महामंडळ दिल्या गेले आहे आणि याचा सरळ अर्थ असा आहे कि भंडारी यांचे निदान या पंचवार्षिक योजनेत तरी विधान परिषद सदस्यत्व हुकले आहे, या सिनेमात तुझी हिरोईन अमृता खानोलकर ऐवजी शुभा खोटे, असे एखाद्या नामवंत हिरोला दिग्दर्शकाने सांगावे तसे भंडारी यांचे त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी करून ठेवल्याचे स्पष्ट चित्र दिसते आहे. नटाला तरुण अभिनेत्री दिली तर तो तिच्या शरीराचे पार खोबरे करून ठेवेल असे वाटल्याने जसे त्या नटाला वृद्धेबरोबर काम करणे भाग पडते, मला वाटते ते तसे माधव भंडारी यांच्याबाबतीत त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना वाटले असावे, पण भंडारी यांचे यावेळी मोठे राजकीय नुकसान झाले आहे, हे मात्र नक्की आहे....
क्रमश :


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment