Thursday, 12 April 2018

मुनगंटीवारांची मध्यस्थी : पत्रकार हेमंत जोशी


मुनगंटीवारांची मध्यस्थी : पत्रकार हेमंत जोशी 
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे बोलण्यावर आणि खाण्यावर नितांत प्रेम आहे. ते पक्के खवय्ये आहेत आणि बोलघेवडे आहेत. त्यांचे बोलणे वायफळ नसते, ऐकावेसे वाटते. त्यांच्या बोलण्यावर सारे फिदा होतात, त्यांना अतिरिक्त बायकांचा नाद नाही अन्यथा या वयात देखील त्यांच्यावर, त्यांच्या बोलण्यावर एखादी कतरीना किंवा मानसी नाईक सारखी सेक्सी नटी फिदा झाली असती, त्यांना सोबत घेऊन गोल गोल झिम्मा फुगडी खेळली असती...

सुधीरभाऊंनी ते गडकरी यांचे खंदे समर्थक असूनही मुख्यमंत्र्यांशी चांगले जुळवून घेतले आहे. म्हणजे एकाचवेळी ते गडकरींचा हात करकचून आपल्या हातात घेतात त्याचवेळी फडणवीसांना फ्लायिंग किस देऊन मोकळे होतात. त्यांना मुख्यमंत्र्यांनी फ्री हॅन्ड दिला आहे, असे क्वचित घडते. आणि त्याच मोकळीकीचा त्यांनी अलीकडे फायदा घेण्याचे ठरविले आहे, तशी सुरुवात देखील त्यांनी केली आहे म्हणजे मोदी शाह किंवा फडणवीसांकडून कोणत्याही सूचना नसतांना त्यांनी युतीच्या प्रस्तवासाठी थेट उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे सुरु ठेवले आहे. उद्धव यांचे जसे फडणवीसांशी जमते ती तशी नाळ त्यांची सुधीरभाऊंबरोबर देखील फार पूर्वीपासून जोडल्या गेलेली आहे...

म्हणजे सुधीरभाऊ समोर आलेत किंवा दिसलेत कि उद्धव ठाकरेंना जसे जागच्या जागी नाचावेसे वाटते तेच सुधीरभाऊंचेही उद्धवजींच्या बाबतीत होते, वासरू जसे गायीला बघताच जागच्या जागी बागडायला लागते तेच सुधीरभाऊंचे होते, उद्धव यांना बघताच त्यांना आनंदाच्या प्रेमाच्या स्नेहाच्या मैत्रीच्या उकळ्या फुटायला लागतात. या लेखाचे महात्म्य संपेपर्यंत उद्धव ठाकरे अमेरिकेतून परतलेले असतील आणि त्याच दिवशी रात्री सुधीरभाऊ त्यांची भेट घेऊन मोकळे होतील, युती करावी असा आग्रह देखील धरतील पण आतली बातमी अशी कि यावेळी कोणत्याही अमिषाला प्रलोभनाला बळी न पडता उद्धव ठाकरेंना म्हणजे शिवसेनेला भाजपाशी निदान लोकसभा निवडणुकीपूर्वी युती करायची नाही, त्यांना लोकसभा भाजपाला बरोबर घेऊन लढवायची नाही हे त्यांनी ठरविलेले आहे, त्यांचा निर्णय झाला आहे...

लोकसभा निवडणुकीपूर्वी भलेही मुनगंटीवार आणि उद्धवजी यांच्यात आणखी अनेकदा भेटीगाठी होतील पण युतीची शिष्टाई सफल होणार नाही हि आता काळ्या दगडावरची रेघ आहे. आम्हाला आधी गोंजारले जाते आणि निवडणूक आटोपली कि कंडोम सारखे वापरून बाहेर फेकल्या जाते हे त्यांच्या मनात पक्के ठसलेले असल्याने उद्धवजी त्यांच्या निर्णयावर यावेळी ठाम असतील, यदाकदाचित जर मुनगंटीवार यांची शिष्टाई सफल झालीच तर भाजपा नेत्यांनी सुधीरभाऊंचा गिरगाव चौपाटीवर जाहीर सत्कार घडवून आणावा. पण असा सत्कार करण्याची वेळ येणार नाही असे निदान आज तरी शंभर टक्के चित्र आहे, समजा मिलिंद नार्वेकर वर्षावर उठबैस करून मुख्यमंत्र्यांच्या कानात काहीबाही सांगतही असतील तर ती त्यांची लोणकढी थाप आहे असे समजावे....

एक सांगायचे राहूनच गेले, तेवढे सांगतो आणि हा लेख पूर्ण करतो. पार पडलेल्या बजेट अधिवेशनादरम्यान मी, उदय तानपाठक आणि अभय देशपांडे तिघेही विधान भवनाच्या आव्हाड कट्ट्यावर उभे राहून गप्पा मारीत होतो तेवढ्यात काँग्रेसचे मधू चव्हाण तेथे आले आणि उदयला म्हणाले, मटाले तुम्ही कसे आहेत म्हणजे ते उदय तानपाठक यास थेट देवदास मटाले समजले याचा अर्थ जेव्हा केव्हा त्यांना मटाले भेटत असतील, तानपाठक तुम्ही कसे आहेत, विचारून मोकळे होत असतील. मटाले कसे आहेत तुम्ही, असे जेव्हा मधू चव्हाणांनी विचारले, एरवी लोकांची टर खेचणाऱ्या उदयचा चेहरा हवाबाण हर्डे चा डोस ज्यादा घेतल्यासारखा झाला होता..
तूर्त एवढेच...


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment