Friday, 6 April 2018

उद्धवसेना १ : पत्रकार हेमंत जोशी


उद्धवसेना १ : पत्रकार हेमंत जोशी 
कार्यक्रम मनोहर जोशी यांचा म्हणजे शिवसेना नेत्याचा आपसूकच तेथे महत्व उद्धव ठाकरे यांनाच, ते तिकडे मंचावर पलीकडे बसलेले म्हणून जवळच उभ्या असलेल्या मिलिंद नार्वेकरांना पवारांनी बोलावून एवढेच सांगितले कि मी निघालो तेवढे उद्धवजींना सांगा, ज्याला मार्केटिंग जमते त्याचे काम फत्ते होते, पवारांचे तोंड आणि नार्वेकरांचा कान, मिळाली कि मीडियाला विशेषतः वाहिन्यांना बातमी कम ब्रेकिंग न्यूज...दुसऱ्या फळीतल्या लोकांचे शेअर बाजारासारखे असते, हे असे काही घडले कि शेअरसारखा एकतर त्यांचा भाव वधारतो किंवा भलतेच काही विपरीत घडले कि गडगडतो. छगन भुजबळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते त्यांचे आणि वसंत डावखरे या दोघांचेही निवासस्थान मंत्रालयासमोरील शासकीय छोटेखानी बंगल्यात होते. शरद पवार कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी भुजबळांच्या बंगल्यात बसायचे, त्यामुळे भुजबळांचा शेअर त्यादरम्यान एकदम वधारलेला असायचा, एक दिवस भलतेच घडले, पवारांनी आपले बस्तान भुजबळांच्या बंगल्यावरून थेट डावखरेंच्या बंगल्यावर हलविताच इकडे राजकीय बाजारात भुजबळ कंपनीचे शेअर गडगडले आणि डावखरे आणि कंपनीचे भाव गगनाला भिडले ते कायमचेच जवळपास त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत नाही म्हणायलाअधून मधून ठाण्यातल्या जितेंद्र आव्हाड नामक कंपनीचे भाव शरद पवार अचानक एकदम वाढवून द्यायचे त्यामुळे राजकीय शेअर बाजारात अनेकदा वसंत डावखरे आणि कंपनीचे भाव थोडेफार पडायचेही पण चतुर डावखरेंनी आपल्या कंपनीचे महत्व शेवटपर्यंत खुबीने चढते ठेवल्याने त्यांचा शेअर शेवटपर्यंत डिमाण्डेड होता, आता ते गेल्याने त्यांच्या वारसदारांच्या म्हणजे निरंजन यांच्या हाती कंपनी आल्याने भाव कमालीचे गडगडले आहेत, पक्षासाठी खिशात हात घालायचा नाही फक्त जो समोर येईल त्याच्या पाया पडायचे, एवढ्याने भागत नसल्याने सध्या डावखरे कंपनीचे शेअर कोणी खरेदी करायला तयार नसल्याने कदाचित लवकरच त्यांच्या नावाआधी ' मा. आमदार म्हणजे माजी आमदार ' अशी उपाधी लागण्याची अतिशय दाट शक्यता आहे....

इकडे शिवसेनेत नाही म्हणायला नार्वेकर कंपनीचे शेअर नक्कीच अलीकडे गेल्या अनेक कित्येक वर्षांपासून गगनाला भिडलेले आहेत, आमच्याकडं नार्वेकर कंपनीचे शेअर आहेत, असे सांगणारा माणूस शिवसेनेत भाग्यवान समजल्या जातो, नेते आणि व्यापारी दोघेही राज्याला लुबाडायलाच बसल्याने या दोघांच्याही दुकानदारिची तुलना मुद्दाम येथे शेअर मार्केटशी केली आहे. नार्वेकरांचा शेअर पुढल्या काही महिन्यात या राज्यातला मोस्ट डिमाण्डेड शेअर म्हणून डिक्लेअर झाल्यास अजिबात त्यात आश्चर्य वाटून घेऊ नये कारण पुढल्या काही महिन्यात शिवसेनेच्या वाट्याला विधान परिषदेच्या ज्या तीन जागा येणार आहेत त्यातले एक नाव नक्की रिपीट होईल म्हणजे ऍडव्होकेट अनिल परब यांना पुन्हा एकवार संधी दिल्या जाईल आणि दुसरे नाव फक्त आणि फक्त मिलिंद नार्वेकर यांचेच असल्याने त्यांच्याऐवजी जर अन्य कोणीही तेथे क्लेम केल्यास त्याला बघितल्या जाईल, असा अप्रत्यक्ष ' संदेश' पोहोचविण्याचे काम बायकांत बसणाऱ्या भाओजींवर सोपविण्यात आल्याचे समजते, मिलिंद नार्वेकर आधी राज्यमंत्री होतील नंतर विधान परिषदेवर जातील असेही त्यांच्या खुशमस्कऱ्यांचे सांगणे आहे, अर्थात भाओजींना देखील तेवढेच जमते, नेमक्या मंडळींना गॉड गॉड बोलून आपले तेवढे साधून घेणे,नाही म्हणायला त्यांच्यावर अलीकडे रायगडातल्या स्थानिक निवडणुकांची जबाबदारी सोपविण्यात आली होती पण भावोजी तेवढे बायकांपुरते हे तेथे दिसले, तटकरे आणि पाटील जोडगळीने उलट त्यातून केंद्रीय मंत्री गीते यांचेच महत्व कमी केले त्यामुळे वैतागून गीते उद्धवजींना म्हणाले, भाऊजींना तेवढे मातोश्रीपुरतेच मर्यादित ठेवा किंवा बायकांत फारतर नेऊन बसवा, येथे आम्हा मर्दांचे कार्य अडचणीत आले आहे, शिवसेना मर्द नेत्यांची समजली जाते...

जे दिवंगत बाळासाहेबांचे होते तेच उद्धव ठाकरे यांचे देखील अनेकदा ते त्यांच्या देहबोलीतून असे दिसते कि जे नियम बाळासाहेबांनी स्वतःभोवती आखून घेतले होते त्याचीच री उद्धवजी ओढत असल्याने बाळासाहेबांच्या पश्चातही सेनेचा ग्राफ कायम उंचावत गेल्याचे दिसते, तेच पुढे आदित्य करताहेत असेही दिसते म्हणजे सामान्य शिवसैनिकांपेक्षा आणि ठाकरे कुटुंबापेक्षा जो कोणी स्वतःला मोठा समजतो त्याचा मनोहर जोशीच केल्या जातो, होतो, ज्याला आपल्या मर्यादा नेमक्या माहित असतात तो तेथे कायम महत्वाचा ठरतो, किंवा नेमके अंतर राखून मातोश्री वर सुमधुर संबंध कसे टिकवायचे हे ज्याला नक्की ठाऊक असते थोडक्यात ज्याला संजय राऊत यांच्यासारखे नेमके वागणे बोलणे जमते त्याचे महत्व मातोश्रीवर अबाधित टिकते अन्यथा नेता मग तो कितीही मोठा असेल, मातोश्री आणि सामान्य शिवसैनिकांच्या डोक्यावर बसतो आहे असे ठाकरे कुटुंबांच्या लक्षात आले कि त्याचा पुढल्या काही दिवसात आनंद दिघे, गुलाबराव गावंडे होतो, माझा रोख मालाड मधून थेट पाली हिलवर राहायला आलेल्या सामान्य पीए कडे म्हणजे मिलिंद नार्वेकर यांच्याकडे आहे, काही वैचारिक मतभेद असू शकतात पण अतिशय कष्टातून नेते म्हणून आजमितीला आभाळाला टेकलेल्या नार्वेकरांना थेट पाताळात जाण्याची वेळ येऊ नये असे मनापासून वाटते...हि इज ग्रेट...
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment