Monday, 30 April 2018

मुख्यमंत्री फडणवीस २ : पत्रकार हेमंत जोशी


मुख्यमंत्री फडणवीस २ : पत्रकार हेमंत जोशी 
अनेकदा आपण बघतो अमुक एखाद्याला खुश करण्यासाठी त्या व्यक्तीचे हुजरे त्याच्यासमोर तोच तो बकाल बेशिस्त बकवास विभत्स नागीन डान्स करून त्या त्या व्यक्तीला खुश करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतांना दिसतात. अहो, तुम्हाला अमुक एखाद्याला खुश करायचेच असेल तर त्यासाठी अनेक उत्तमोत्तम नृत्य प्रकार आहेत, ते करावेत, असे भलते सलते करू नये असे निदान मला तरी वाटते. ते तसेच कविता किंवा एखाद्या स्तुतीपर लिखाणाच्या बाबतीत, अमुक एखाद्याला खुश करण्यासाठी त्याच्यावर कविता करणारे अनेक नवकवी आपण सभोवताली बघतो, विशेष म्हणजे जसे प्रत्येकाला आरशात बघतांना वाटते आपण छान दिसतो किंवा बाथरूम मध्ये गाताना वाटते आपण डिट्टो लता रफी आहोत तेच नवकवींचे असते, नवकवींच्या साऱ्याच कवितांना कंपलसरी दाद द्यावी असेही त्यांना कायम वाटत असते. अमुक एखाद्याला खुश करण्यासाठी मग जे काय हे नवकवी लिहून मोकळे होतात, ते वाचून वारंवार वाटते कि हि मंडळी समोर आली रे आली कि त्यांना कायम बदडून काढत राहावे. तुम्हाला अमुक एखाद्याचा बदला घ्यायचा असेल तर त्याच्या घरी एकाचवेळी तीन चार नवकवींना स्वखर्चाने पाठवून द्यावे, तुमचे बदला घेण्याचे काम आपोआप होते. एकदा एकनाथ शिंदे किंवा प्रताप सरनाईक यांनी मुद्दाम हे करावे त्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडे काही नवकवींना तेही भरपेट दारू पाजून पाठवावे,नाही आव्हाडांनी राजकारण सोडले तर मला हेमंत जोशी म्हणू नका, वाटल्यास, पुढारी दैनिकाशी पंगा घेणारे प्रमोद हिंदुराव म्हणा....

वरील परिच्छेदात हे असे मला पुण्याचे पत्रकार आशिष चांदोरकर यांच्या नागीन डान्स वरून, माफ करा, त्यांच्या ' मॅन ऑन मिशन महाराष्ट्र ' पुस्तकावरून लिहावेसे वाटले म्हणजे एखादया रटाळ नवकवीने अमुक एखाद्याला खुश करण्यासाठी त्याच्यावर रचलेल्या रटाळ कवितांसारखे चांदोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचावर भले मोठे भरगच्च पुस्तक लिहून काढले आहे. ते पुस्तक वाचल्यानंतर मला आणि ज्यांनी वाचले त्यांनाही हे असेच वाटले. अर्थात अरुण टिकेकरांचे लिखाण जसे त्यांच्या पत्नीला आवडायचे ते तसे आशिष चांदोरकरांच्या बाबतीत होऊ शकते, त्यावर मात्र माझ्याकडे इलाज नसेल. मनातले सांगतो, राष्ट्रवादी सत्तेत असतांना शरद पवारांना खुश करण्यासाठी अनेक पुस्तके काढल्या जायची पण ती सारी पुस्तके संग्राह्य आणि वाचनीय ठरली त्यातल्या कुठल्याही पुस्तकाचा ' मॅन ऑन मिशन महाराष्ट्र ' झाला नाही म्हणजे एखादे सरकारी पुस्तक आपण वाचतोय असे पवारांवर काढलेल्या पुस्तकांचे झाले नाही...

दुर्दैवाने ज्यादिवशी सदर पुस्तकाचे दिमाखदार आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्या विजया रहाटकर बाईंनी उदघाटन म्हणजे प्रकाशन समारंभ घडवून आणला तेव्हा मी तेथे म्हणजे सह्याद्री या विशेष शासकीय अतिथी गृह येथे कोणाला तरी भेटायला गेलो होतो, त्यामुळे नेमके कोणाला मुख्यमंत्र्यांना खुश करायचे आहे ते लक्षात आले, पैसे खर्च करायचेच होते तर ते असे वाया घालवायचे नव्हते, त्याच चांदोरकरांना खुसखुशीत लिखाण करून सदर पुस्तक वाचनीय करावे असे जर रहाटकर बाईंनी सांगितले असते तरीही ते आशिष यांनी केले असते, हे असे रटाळ आणि नजर टाकून बाजूला ठेवण्यासारखे फडणवीसांवरील पुस्तकाचे झाले नसते...

परफेक्ट नागीन डान्स कसे करावेत, सॉरी, अमुक एखाद्याला खुश करण्यासाठी त्याच्यावर नेमके कसे वाचनीय लिहावे हे जर आधी चांदोरकर आणि रहाटकर यांनी बुजुर्ग आणि त्यातले तद्न्य, पत्रकार मधुकर भावे यांच्याकडून समजावून घेतले असते तर या दोघांचे रटाळ नृत्य झाले नसते म्हणजे नजर टाकून पुस्तक बाजूला ठेवावे असे ' मॅन ऑफ मिशन महाराष्ट्र ' या पुस्तकाचे झाले नसते, केलेला अमाप खर्च वाया गेला नसता. पुस्तक नक्की वाचनीय आणि संग्राह्य झाले असते, महाराष्ट्र टाइम्स मध्ये काम करणाऱ्या आशिष चांदोरकर यांचाही नेमका भारतकुमार राऊत झाला म्हणजे लिखाण कंटाळवाणे ठरले दुर्दैवाने...

या पुस्तकाची प्रस्तावना साहित्यिक सदानंद मोरे यांनी लिहिल्याने त्यांच्यात यानिमीत्ते आचार्य अत्रे बघायला मिळाले म्हणजे अत्रे कसे एखाद्या मुर्दाडाला देखील प्रसंगी दारासिंग करून त्यांच्या जादुई शब्दातून वाक्यातून जिवंत करायचे ते तसे हुबेहूब मोरे यांचे झाले त्यांनी प्रस्तावना लिहिल्याने निदान ती तेवढी तरी नक्की वाचनीय ठरलेली आहे. आमचे पत्रकार मित्र उदय तानपाठक हे जेव्हा विद्या बालन चा डर्टी पिक्चर रिलीज झाला तेव्हा त्यातले एक गाणे तेवढे बघून लगेच बाहेर पडायचे,ज्या गाण्यात तेवढा एक क्षण शाळा मास्तरीण विद्याच्या साडीचा जो पदर ढळतांना दाखविलेला आहे, तेथेच पैसे वसूल होतात, ते तसेच या पुस्तकाच्या बाबतीत झाले आहे म्हणजे मोरे यांची प्रस्तावना तेवढी वाचावी आणि पुस्तकातून लगेच तानपाठक यांच्यासारखे बाहेर पडावे. बोरिंग पुस्तक नेमके कसे असते त्यासाठी केवळ बघावे, मॅन ऑन मिशन महाराष्ट्र..
पुस्तकातील मजकूर पुढल्या भागात...
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

मुख्यमंत्री फडणवीस : पत्रकार हेमंत जोशी


मुख्यमंत्री फडणवीस : पत्रकार हेमंत जोशी 

पुढले संपूर्ण लिखाण केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावरच आहे, अलीकडले देवेंद्र नेमके कसे हे मला येथे सांगायचे आहे तत्पूर्वी त्यांच्यावर केलेल्या एका चुटक्याने लिखाण सुरु करतो...

स्थळ : ब्रिजवासी दुग्धालय अर्थात पुण्यातले. 
ग्राहक : एक लस्सी द्या. 
ब्रिजवासी : कोणती लस्सी देऊ अटल, नरेंद्र कि देवेंद्र ? 
ग्राहक : हा काय प्रकार, नेत्यांच्या नावाने...लस्सी मध्ये फरक तो काय असेल..
ब्रिजवासी : अटल लस्सी मोठ्या ग्लासात देतो तेही भरपूर मलाई मारून शिवाय त्यात ड्रायफ्रूट्स देखील असतात, ग्राहकाचे पैसे वसूल होतात..नरेंद्र लस्सी देखील मोठ्याच ग्लास मध्ये देतो आणि बाहेरून ती छान आहे, कमी पैशात ड्राय फ्रुट्स टाकलेली भरपूर लस्सी मिळते आहे, असे ग्राहकाला वाटते पण तसे अजिबात नसते, या लस्सीच्या ग्लासचे बूड खुबीने बनविलेले आहे, लस्सी बाहेरून भरपूर दिसते पण आत तसे अजिबात नसते, शिवाय ड्रायफ्रूट्स देखील स्वस्तातले असतात,हि फसवी लस्सी आम्हाला सर्वाधिक पैसे मिळवून देते..आणि देवेंद्र लस्सी वेगळी अशी काहीही नाही, आम्ही ती स्वतः तयारहीकरीत नाही, सकाळी सकाळी गोखल्यांच्या तबेल्याबाहेर उभे राहतो आणि त्यांच्याकडले गोड ताक येथे आणून देवेंद्र लस्सी म्हणून विकतो...😄

अर्थातच हा चुटका आणि पुढले लिखाण याचा परस्पर अजिबात संबध नाही. मला अटलजी आणि नरेंद्र मोदी या दोघांविषयी फारसे सांगता येणार नाही पण देवेंद्र बाहेरून लस्सीसारखे आणि आत स्वस्तातले ताक, असे ते अजिबात नाहीत, जसे मी नेहमी सांगतो, येथे ते पुन्हा सांगतो कि मागल्या पंचवार्षिक योजनेत जर खडूस पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून येथे थेट दिल्लीहून आले नसते तर राज्यातल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी, गेट वे ऑफ इंडिया, राणीचा बाग, व्ही.टी.स्टेशन, विमानतळ इत्यादी आमच्याच मालकीचे आहे, बघा सात बार्यावर आमचे नाव आहे, सांगून तेही विकले असते. तेच राज्यातल्या भाजपा नेत्यांचीही, सत्तेतले बहुतांश भाजपा नेते हे प्रकाश मेहता वृत्तीचेच असल्याने म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फारतर धाकले बंधू असल्याने या पंचवार्षिक योजनेत जर दवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नसते तर नरेंद्र मेहता सारख्या नेत्यांनी मीरा भायंदर खाडीवर आपले नाव कोरून तीही विकली असती, फारतर असे म्हणता येईल कि राष्ट्र्वादीतल्या अनेक नेत्यांची वृत्ती दरोडेखोर पद्धतीची होती आणि भाजपातल्या नेत्यांना नेमके कसे आणि कुठे खायचे असते, का बदनाम व्हायचे नसते हे माहित नसल्याने त्यांच्या अननुभवाचा मोठ्या प्रमाणात गैरफायदा या राज्यातल्या भोसले जाधवांसारख्या नीच आणि नामचीन दलालांनी फार मोठ्या प्रमाणावर घेतलेला आहे, मागचे चित्र फारसे काही बदलले नाही किंबहुना भोसले यांच्यासारखे पाप हे युतीच्या काळात भाजपाच्या वरिष्ठ दिवंगत नेत्यांनीच जन्माला घातलेले आहे, भाजपाचा राष्ट्रवादी जरी झालेला नसला तरी त्यांच्यातल्या अनेकांच्या सवयीने, मंत्र्यांनी नेमके काय करायचे असते, माहित नसल्याने भाजपाचे मोठे नुकसान झाले आहे. तुम्हाला काय सांगू, मी कट्टर हिंदू असल्याने मला येथे शिवसेना किंवा भाजपाची मोठी लफडी लिहिणे त्या स्वार्थापोटी शक्य नसते पण असेही मंत्री मला थेट पुराव्यांसहित माहित आहेत कि त्यातल्या एकाला तर दररोज नवी बाई लागते, त्यासाठी त्याने स्वतंत्र सदनिकाच भाड्याने घेऊन ठेवलेली आहे, ज्या दिवशी माझी सटकेल, सारे पुरावे नक्की सांगून लिहून मोकळा होईल, विशेष म्हणजे या मंत्र्याला थेट अमित शाह किंवा फडणवीस किंवा त्यांच्या बायकोने दम भरून देखील त्याला काडीचाही फरक पडलेला नाही. 

दुसरे एक मंत्री तरुण असूनही दुपारी चार पर्यंत झोपून असतात, त्यांना मंत्रालयात येणे तर सोडा पण कानाकोपऱ्यातून त्यांच्या बंगल्यावर आलेल्या मंडळींना साधे भेटायचे देखील नसते, अर्थात वेगळ्या पाश्चिमात्य पद्धतीच्या मूड मध्ये कि व्यसनांमध्ये हे मंत्रीमहोदय दिवसातले अनेक तास असतात जसे मागल्यावेळी एक मंत्री असे होते कि ते आपली ऐय्याशी थेट जुहू परिसरात येऊन साजरी करायचे, विशेष म्हणजे विशिष्ट औषधे घेतल्याशिवाय या आजोबा झालेल्या मंत्र्याला बेडवरले पुढले जमणे शक्य नसायचे पण विशीष्ट औषधे घेतल्यानंतर त्यांच्या खोलीतले आवाज थेट विदर्भात म्हणे ऐकू जायचे, ऐयाशी मंत्री मग ते आघाडीतले असोत कि युतीचे, त्यांनी एकदा विशिष्ट डोस घेतला कि त्यांच्यात मग ताकदवान तरुण संचारतो....

म्हणून जीव तोडून सांगतो आहे, मंत्रिमंडळ फेरबदल अतिशय आवश्यक आहे. मला वाटते सुरुवात माधव भंडारी यांच्यापासून झालेली आहे, त्यांना महामंडळ दिल्या गेले आहे आणि याचा सरळ अर्थ असा आहे कि भंडारी यांचे निदान या पंचवार्षिक योजनेत तरी विधान परिषद सदस्यत्व हुकले आहे, या सिनेमात तुझी हिरोईन अमृता खानोलकर ऐवजी शुभा खोटे, असे एखाद्या नामवंत हिरोला दिग्दर्शकाने सांगावे तसे भंडारी यांचे त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी करून ठेवल्याचे स्पष्ट चित्र दिसते आहे. नटाला तरुण अभिनेत्री दिली तर तो तिच्या शरीराचे पार खोबरे करून ठेवेल असे वाटल्याने जसे त्या नटाला वृद्धेबरोबर काम करणे भाग पडते, मला वाटते ते तसे माधव भंडारी यांच्याबाबतीत त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना वाटले असावे, पण भंडारी यांचे यावेळी मोठे राजकीय नुकसान झाले आहे, हे मात्र नक्की आहे....
क्रमश :


पत्रकार हेमंत जोशी 

आपले मुख्यमंत्री २ : पत्रकार हेमंत जोशी

आपले मुख्यमंत्री २ : पत्रकार हेमंत जोशी 

भुजबळ आणि फडणवीस दोघांमध्येही दोन बाबतीत कमालीचे साम्य आहे, माझ्या या वाक्यावर उगाच डोळे मोठे करून वाचू नका..मी माहिती आणि जनसंपर्क खात्याच्या भुजबळांविषयी म्हणतोय,एकतर या दोघांच्याही नावात ' देवेंद्र ' आहे आणि दुसरे साम्य म्हणजे दोघांचाही माहिती आणि जनसंपर्क खात्याशी संबंध आहे, एक या खात्याचे संचालक आहेत तर दुसरे या खात्याचे मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत...

हे साम्य येथे त्या ' रवींद्र ' या नावावरून येथे अगदी सहजच आठवले. अलीकडे माझ्या दोन लेख वाचण्यात आले, विशेष म्हणजे दोन्ही लेख लिहिणारे ' रवींद्र ' आहेत आणि या दोन्ही रवींद्र यांनी दोन वेगवेगळ्या पण या राज्यातल्या जबरदस्त बऱ्यापैकी म्हणाल तर फेमस म्हणाल तर वादग्रस्त व्यक्तींवर लिहिले आहे, तुमची उत्सुकता येथे आणखी ताणून धरत नाही. श्री 
रवींद्र गोळे यांनी शिवधर्माचे संस्थापक श्री पुरुषोत्तम खेडेकर सपत्नीक पांडुरंगाचे दर्शन घेतानाचा फोटो विविध माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर जे लिहिले आहे ते संग्राह्य ठेवण्यासारखे आहे...

दुसरे रवींद्र आहेत, ठाण्यातले पत्रकार रवींद्र पोखरकर, त्यांनी बिग बॉस मध्ये गेलेल्या अनिल थत्ते यांचा जो इतिहास नेमक्या शब्दात सांगितला आहे, तो लेख किंवा ते लिखाण देखील संग्रही ठेवण्यासारखे. हे दोन्ही लेख तुम्हाला एकत्र उद्यापासून नक्की वाचता येतील त्यासाठी तुम्हाला एक करावे लागेल, माझे ऑफ द रेकॉर्ड पाक्षिक व ऑनलाईन वाचावे लागेल...

श्रीमान पुरुषोत्तम खेडेकर आणि अनिल थत्ते हे दोघेही वादग्रस्त माणसे मला तशी जवळून परिचयाची आणि कोणाला आवडो अथवा न आवडो, मला मात्र अतिशय आवडलेली. होते काय, आपण अमुक एखाद्या आभाळा टेकलेल्या व्यक्तीचे नेमके दोष तेवढे बघत असत, माझे मात्र तसे नाही, त्यांचे नेमके गूण कोणते, ते मी पारखतो आणि पुढे जातो. अमुक एखाद्या नावाजलेल्या व्यक्तीचे महत्व जर कालांतराने कमी झालेले असेल तर त्याने आपले नेमके काय चुकले, त्यावर स्वतःचे अवलोकन करायला हवे. खेडेकर आणि थत्ते या दोघांनाही मला नेमके हेच सांगायचे आहे, त्यांनी आपण कुठे चुकलो, तेवढे बघायचे आहे आणि मी मात्र नेमका स्वार्थी, त्यांच्यातले गूण तेवढे पारखतो, त्या गुणांची नक्कल करून यश मिळविण्याचा प्रयत्न करतो..

श्रीमान पुरुषोत्तम खेडेकर पांडुरंगाच्या दर्शनाला गेले म्हणजे ते आणि त्यांचा शिवधर्म संपला म्हणून त्यांनी पराभव पत्करला, असे मला अजिबात वाटत नाही कारण अगदी अलीकडे मी कुठल्याशा कामानिमित्ताने अकोल्याला राज्यमंत्री रणजित पाटलांना जेव्हा भेटायला गेलो होतो, त्यांनी त्यादिवशी जे शिवधर्माचे अधिवेशन होते त्याच्या सांगता समारंभाला मला मुद्दाम नेले, खेडेकर माझे मित्र, मी बघितले, त्या भव्य मंडपात पाय ठेवायला देखील जागा नव्हती, म्हणून सांगतो, त्यांचे महत्व संपले असे वाटत नाही पण त्यांचे हृदयानंतर झाले असेल तर सर्वांनी त्याचे स्वागत करायला हवे....

दुसरे आमचे पत्रकार मित्र अनिल थत्ते, पोखरकर यांनी नेमके लिहिले आहे कि थत्ते यांनी आपल्या ओघवत्या लेखन शैलीचा सकारात्मक उपयोग केला असता तर वेगळे काहीतरी घडले असते. मी तर म्हणतो, आणखी एक व. पु. पु. ल. किंवा अत्रे महाराष्ट्राला मिळाले असते पण ते दुर्दैवाने घडले नाही, थत्तेंच्या विकृत लिखाणाने त्यांचा घात केला ज्याचाप्रचंड त्रास ताप त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला देखील झाला. एखाद्या सुंदर स्त्रीच्या वक्षस्थळांकडे निरखून बघत बसण्यापेक्षा तिचे नेमके सौंदर्य पारखण्यासाठी तिच्या चेहऱ्याकडे एकटक बघावे, मनस्वी आनंद मिळतो. माझे थत्तेंच्या बाबतीत तेच झाले, त्यांच्या विकृतीकडे किंवा त्यांच्या वादग्रस्त स्वभावाकडे मी दुर्लक्ष केले आणि नक्कल केली ती त्यांच्यातल्या लेखन शैलीची, त्यामुळे थत्ते जरी लिखाणातले दिलीपकुमार होते आहेत, मी मात्र राजेंद्रकुमार झालो म्हणजे त्यांच्यापेक्षा लिखाणात कमकुवत असतांनाही राजेंद्रकुमार ठरलो, अधिक यशस्वी झालो....

लक्षात ठेवा, आपण मोठ्या माणसांचे गूण तेवढे पारखायचे असतात आणि त्या गुणांचे प्रसंगी अगदी जाहीर कौतुक देखील करायचे असते, तेवढे मी केले. दोष तर माझ्यातही खूप आहेत, दोषांकडे कानाडोळा करणे अधिक चांगले, समाजाला वठणीवर आणण्याचा आपण ठेका घेतलेला नाही...
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Thursday, 26 April 2018

आपले मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी

आपले मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी 
नागपुरातले ' गांधी ' श्री गिरीश गांधी भाजपाचे नाहीत ते तनाने राष्ट्रवादीत आहेत आणि मनाने मनापासून मनातून केव्हाच राष्ट्रवादीतून बाहेर पडले आहेत. त्यांना भाजपामध्ये प्रवेश करायचा नाही तरीही नेहमीच ते भेटले कि मुद्दाम सांगतात, परवा भेटले तेव्हाही हेच म्हणाले कि विदर्भाला प्रगतीपथावर नेणारे आजतागायतचे उत्तम महामार्ग म्हणजे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस व या दोन महामार्गांना जोडणारा अत्योत्तम पूल म्हणजे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. गिरीश गांधी जे म्हणाले त्यात काहीही अजिबात वावगे नाही, खोटे नाही, अवास्तव नाही. त्यावर आणखी एक उदाहरण पुरेसे आहे. जेव्हा मराठ्यांचे मोर्चे निघत होते ते यशस्वी करण्यासाठी काही पदाधिकारी बुलढाण्याला आले त्यांनी एक बैठक घेतली, त्या बैठकीत एक मराठा 
शासकीय अधिकारी मोर्चे आयोजित करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना म्हणाले, तुम्हाला आमच्याकडून कोणतेही सहकार्य मिळणार नाही कारण विदर्भाच्या इतिहासात असे पहिल्यांदा घडते आहे कि फडणवीस आणि गडकरी आमचे भले करण्यासाठी दिनरात 
झिजताहेत. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातील मंडळींनी कधी ढुंकूनही आमच्याकडे बघितले नाही जेव्हा राजेंद्र शिंगणे बुलढाणा जिल्हा सहकारी बँक वाचविण्यासाठी त्यांच्याच नेत्यांना म्हणजे शरद पवारांना सरकारकडून आर्थिक मदत द्या, टाहो फोडत होते तेव्हा हेच पवार साखर कारखान्यांना कोट्यवधी रुपये लुटून देत होते, आमचे शिंगणे शेवटी मंत्रिपदाचा राजीनामा देतात कि काय असे त्यादरम्यान वाटायला लागले होते. तेथे जमलेल्या सर्वांनी या अधिकाऱ्याच्या वाक्यांवर जोरदार टाळ्यांनी दाद दिली होती...अत्यंत महत्वाचे म्हणजे विदर्भातली माणसे मोठ्या मनाची आहेत, सांगायचे झाल्यास केवळ विदर्भविकास हे गडकरी आणि फडणवीस यांचे पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा मराठवाड्यातल्या नेत्यांसारखे हेकेखोर वागणे नाही कारण ते हलकट नाहीत दिलदार आहेत म्हणून एकाचवेळी गडकरी देशाचा आणि फडणवीस राज्याचा विकास करण्यात जणू एकमेकांचे विकास कामातले स्पर्धक झाले आहेत, ते विदर्भाचा विकास साधतांना त्यांच्यासमोर इतरही आहेत म्हणून त्यांना ढोपरापासून सलाम.....

पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी इतरांचे कधीही भले केले नाही हि वस्तुस्थिती आहे, मराठी माणसाने कधीही संकुचित असू नये असे मला वाटते. एखादा मोठा होत असेल तर त्याला दाद आणि साथ द्यावी असेही मला वाटते. नीरज गुंडे या व्यक्तीचा सध्या या राज्यात प्रचंड दबदबा आहे, हे असे नेहमीच घडत आले आहे म्हणजे अशोक चव्हाण मुख्यमंत्री असतांना पुण्यातल्या जयंत शाह यांचा असाच दबदबा दरारा होता, त्यांनी हो म्हटले कि काम होऊन जायचे अलीकडे ते तसेच चेंबूरच्या नीरज गुंडे यांच्या बाबतीत घडते आहे, युतीचे सरकार आले आणि गुंडे मोठे झाले असे घडलेले नाही तर गुंडे यांनी युतीचे सरकार किंवा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतांना जी मोठी भूमिका बजावली त्यातून ते मोठे झाले आणि त्यावेळी घेतलेल्या रिस्क ची फळे ते चाखताहेत, एक मराठी माणूस मोठा होतांना अनेकांना बहुतेकांना सहन होत नाही, आमचे तसे नाही त्यामुळे कोण काही त्यांच्याविषयी सांगितले कि आम्ही दुर्लक्ष करतो, आमच्या पोटात दुखत नाही, नीरज नेमके कसे त्यावर मी कालनिर्णय चे आणि जयराज साळगावकर अधिक चांगले सांगू शकतो पण गुंडे यांच्याविषयी नकारात्मक चर्चा नसावी असे आज तरी आम्हाला वाटते...

तीच बाब टाइम्स ऑफ इंडिया चे पोलिटिकल एडिटर श्रीमान प्रफुल्ल मारपाकवार यांच्या बाबतीत. प्रफुल्ल हे दरवर्षी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात त्यांच्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ काही पुरस्कार देतात, विशेषतः हे पुरस्कार पत्रकारांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिले जातात. पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात प्रफुल्ल यांनी नेहमीचा त्यांचा हा पुरस्कार सोहळा घेतला नाही म्हणून मी अगदी सहज काही पत्रकारांना विचारले कि त्यांनी हे का केले नाही त्यावर, मारपाकवार निवृत्त झाले म्हणून त्यांनी हे पुरस्कार दिले नाहीत असे मला काहींनी सांगितले जे साफ खोटे ठरले. प्रफुल्ल यांना आमच्यातले बहुतेक मोस्ट व्हिमजिकल ठरवून मोकळे होतात, वाटल्यास प्रफुल्ल यांना थोडेसे तिरसट स्वभावाचे म्हणावे पण ते मोस्ट व्हिमजिकल आहेत, मला हा आरोप अजिबात मान्य नाही, जो माणूस संकट मग ते कोणत्याही पत्रकारावर आले कि तन मन धनाने धावून जातो, जो आपली मुले उत्तम घडवून मोकळा होतो ज्याचा उच्चाधिकारी म्हणून काम केलेल्या पत्नीला उत्तम संसार केला म्हणून अभिमान आहे ते प्रफुल्ल मोस्ट व्हिमजिकल आहेत, म्हणणे साफ खोटे आहे. आणि प्रफुल्ल यांच्यावर केवळ व्यक्तिगत राग, त्यातून ते निवृत्त झाले अशी अफवा पसरविण्यात आली, अत्यंत महत्वाचे म्हणजे आजतागायतच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या इतिहासात अख्ख्या भारतात फक्त दोनदा असे घडले कि निवृत्तीच्या दिवशी अमुक एका स्टाफला भरघोस वेतनवाढ देऊन एक्सटेंशन देण्यात आले त्यात एक दिल्लीचे सेनगुप्ता होते आणि दुसरे होते आमचे आपले प्रफुल्ल मारपाकवार, जे आजही टाइम्स ऑफ इंडिया चे पोलिटिकल एडिटर आहेत, केवळ त्यांचे बोलणे काहीसे तिरसट म्हणून ते वाईट, हे असे सांगत सुटणे केव्हाही चुकीचे, याउलट जेव्हा केव्हा प्रफुल्ल यांची भेट होते, माझ्या नागपुरातला हा माणूस अख्खे राज्य या मुंबईत बसून गाजवून सोडतो आहे, बघून मनाला आनंद होतो, मला वाटते, बघण्याची दृष्टी नेहमी सकारात्मक असावी. अमुक एखाद्या मुद्द्यावर मनभेद किंवा मतभेद झाले म्हणजे समोरचा माणूस वाईट, हे असे एखाद्याविषयी सांगणे किंवा कोणताही व्यक्तिगत अनुभव आलेला नसतांना समोरचा बदमाश ठरविणे त्याला दोष देणे चुकीचे आहे असे मला वाटते. प्रफुल्ल भेटलेत कि मी त्यांना नेहमी पत्रकारितेतला राजकुमार ( सिनेमावला) म्हणून मोकळा होती मग तेही खळखळून 
हसून मनापासून दाद देतात....

संस्कृतच्या एका सुभाषितात असे म्हटले आहे कि बालकाबरोबर मैत्री, विनाकारण हसणे, स्त्रियांबरोबर वाद, दुष्टांची सेवा, गाढवावरची स्वारी, असंस्कृत बोलणे या सहा गोष्टींमुळे माणसाला कमीपणा येतो, गुंडे असोत कि मारपार्कवर हे दोघेही असे वागणारे नाहीत, फारतर असे म्हणता येईल, माणूस मोठा झाला कि इतरांच्या डोळ्यात खुपतो....
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Wednesday, 25 April 2018

OFF THE RECORD review on some of todays headlines...

1. D.K. Jain's name finalised as Chief Secretary.
In a closed door meeting held at ITC Grand Maratha Sheraton with few builders and some top officials of our state, the name of D.K.Jain has got the final stamp. I had reported about this name as to who will be our new CS, some months ago. Also by the way, the Nanar Refinery project which is in the news for all the wrong reasons, anyone getting hands on the names of landowners around the refinery, please don't stop there...Spread it out to as many people. I have heard a lot of "Jain's" are the owners of the land around Nanar refinery and it is also said they were informed some months ago to purchase the land by some "Jain" in Mantralaya... What a coincidence sir jee? The declaration of this name formally, will be just a formality now...Hard Luck- Sudhir Shrivastava,Medha Gadgil, Sunil Porwal, & so on...

2. Who is eying to be the new UD secretary in place of Kareer?
I never attend any press conferences. But yesterday it was a special one. My city's planning for next 20 years was to be presented to the pressers and to top that, two of my most liked bureaucrats were addressing it. UD Secretary Nitin Kareer & Mumbai Municipal Commissioner Ajoy Mehta. Third one was ACS Housing-SanjayKumar, favourite of many Pune waalahs having Bentleys's & Rolce Royce's....At the question answer session after the press, one of my colleague (the I know everything attitude) did try to checkmate Sanjay Kumar in a technical question asked, but Nitin Kareer and Mehta were too good even for this 'mischievous' journo. Anyway, friends its time for you to guess--Who is the one person amongst the remaining two who is eyeing for the post of Nitin Kareer i.e. to be the future UD Secretary for Government of Maharashtra? The one who is trying does not know Kareer well, I guess. Behind the nicest nature and ever smiling face lies intention of deep honesty to serve his people and that too with a brilliant mind & clean soul..Even after having more than 40 years (My father +Moi) of Journalism experience we haven't heard a single person saying anything negative about Kareer. For him the work can be either done or it cannot be done, then you ask the PM to call him, he will not do it if does not fit the law...he will be direct on your face to say a NO. But yes, if the work is happening and he says a YES, he is a man of his word....by the way there are no agents to be met nor the driver of his car for giving packets after the work is done. So, it might a bit difficult for the ACS ranked officer to come close to Kareer's commitment to his job and filling in his shoes. By the way just for the sake of gossip mongers, Kareer isn't going anywhere. The rumours of him that he was in the race to be the new MC of Mumbai, have died down. Now thats like a far fetched dream for many to oust Kareer...it's like Paramvir Singh taking help of Kalyankar to become CP of Mumbai...far fetched right?

3. Time for GAD to think on these lines...
Time & again our country's some or the other state goes on elections. So, a chunk of IAS officers are deputed to that particular state to be the governing officers from our state. So like when elections in Gujarat were declared a number of IAS officers went there as observers, governing officers and so on...Who will go or who will be deputed is a job GAD (General Administration Department ) to decide and they accordingly inform the concerned department and then the Election Commission office at Delhi. But there is one hitch here. GAD ends up sending field duty officers who are directly at the helm of affairs on day to day basis. They send Officers of Municipal Corporations & other departments. Now these top officers (particularly IAS) have to be present in their respective city/town everyday as in a state like Maharashtra anything can happen anytime. To top that there are numerous visitors coming up with their day to day problems every single day and then there is huge pile of paperwork these officers need to deal with. My suggestion to GAD--instead of sending the on field officers, how about allocating officers of the rank of Divisional Commissioner's for such job. Anyways, they are the monitors of the class who are required only when things get disrupted, rest of the time just utilise them nah? Also for information, when the election commissions sends their requirements, I guess Maharashtra must be the only state who must be fulfilling all the requirements of the Commission office. None of the other states send their that number of officers as required....Why this happens GAD only with us? Why does Maharashtra have to comply with everything and anything Centre demands?

Friday, 20 April 2018

मंत्रिमंडळ विस्ताराचे गाजर : पत्रकार हेमंत जोशी


मंत्रिमंडळ विस्ताराचे गाजर : पत्रकार हेमंत जोशी 

पुढल्या काही दिवसात मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल तसेच महामंडळावरील नियुक्त्या झाल्या नाहीत तर जे मतदारांमधून निवडून आलेले आमदार आहेत त्यातल्या अनेकांना मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन उपचार करवून घ्यावे लागतील, काही आमदार संतापाच्या भरात रस्त्याने सैरावैरा धावत सुटतील, काह पुरुष आमदार कपडे फाडून घेतील आणि डोक्यावरचे केस उपटत इकडून तिकडे आणि तिकडून इकडे वेड लागल्यागत धावत सुटतील, काही आमदार दुःखसागरात बुडून जातील आणि रफी लताची जुन्या सिनेमातली रडवणारी गाणी एकतर ऐकतील किंवा मिणचेकरांसारखे आमदार स्वतःच गाऊन  दाखवतील. महिला आमदार उपवास ठेवतील आणि नेत्यांच्या नावाने अगदी चार चौघात कडाकडा बोटे मोडतील, सारेच नेत्यांच्या नावाने शिमगा साजरा करतील, अनेकांना निद्रानाश जडेल, त्यातले काहीतरी अस्वस्थ होऊन जमिनीवर लोळण घेतील, काही मोठ्याने मध्येच उठून हंबरडा फोडतील...

ज्यांना कवडीची अक्कल नाही किंवा जे विधान परिषदेत आयत्या बिळावर नागोबा पद्धतीने जाऊन बसले आहेत त्यांना मंत्रिपद बहाल केल्या गेले आहे आणि जे सतत लोकांमधून मोठ्या मुश्किलीने निवडून येतात त्यांना यावेळी म्हणजे तब्बल १५-१६ वर्षानंतर युतीची सत्ता आल्यानंतरही जर अमुक एखादे महत्वाचे मंडळ किंवा मंत्री, राज्यमंत्रीपद मिळत नसेल तर त्यांनी झपाट्याने मतदार संघाची कामे कशी उरकायची आणि कोणत्या तोंडाने मतदारांसमोर मते मागायची, अशा अस्वस्थ मनस्थितीत ते सारे अडकलेले आहेत, मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदल जर पुढल्या काही दिवसात झाला नाही तर त्याचे अतिशय वाईट परिणाम सेना भाजपा युतीला भोगावे लागणार आहेत कारण जे मंत्री आहेत राज्यमंत्री आहेत ते कार्यक्षम नाहीत त्यातले बहुतेक किंवा अनेक अकार्यक्षम आहेत आणि बहुतांश प्रशासकीय शासकीय अधिकारी जणू आपण आघाडीचे ताबेदार पद्धतीने वागत असल्याने ते युतीच्या आमदारांना फारसे सहकार्य न करता एकतर ते आघाडीच्या नेत्यांना, आमदारांना सहकार्य करून मोकळे होतात किंवा आपापली घरे भरून मोकळी होतात. राजीव निवतकर सारखे भ्रष्ट आणि आघाडीला जवळ करणारे प्रशासकीय अधिकारी जर या राज्यात मुख्य सचिवांच्या कार्यालयात यावेळीही मोक्याच्या जागेवर बसून केवळ स्वतःच्या श्रीमंतीत भर घालण्यात विकृत आनंद घेत असतील तर युतीच्या आमदारांनी जिंकायचे कसे किंवा निवडून यायचे तरी कसे. अतिशय भ्रष्ट, बदनाम आणि बदमाश असलेले शासकीय किंवा प्रशासकीय अधिकारी मोक्याच्या महत्वाच्या पदावर बसणार नाहीत याची वास्तिव डोळ्यात तेल घालून मुख्यमंत्र्यांनी आणि मुख्य सचिवांनी काळजी घ्यायला हवी होती, दुर्दैवाने ते घडले नाही, यावेळीही हिरालाल सोनवणे सारख्या वादग्रस्त अधिकाऱ्यांची पाचही बोटे तुपात घोळवल्या गेली, अशांनीच मजा केली...

जाऊद्या वेगळ्या विषयाकडे वळतो. अलीकडे मॉरिशसला उद्योगपती असलेल्या ब्राम्हणांची व्यावसायिक परिषद होती, पुण्यातून जवळपास ५५-६० ब्राम्हण व्यावसायिक स्थानिक आमदार मेधाताई कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली या परिषदेला गेले होते. ब्राम्हण तेही पुण्यातले आणि एकाचवेळी ५०-६०, जर मी त्यांचे नेतृत्व केले असते तर परतल्यानंतर तुम्ही सारे मला भेटायला सांताक्रूझ ऐवजी ठाण्याला आले असते. मेधाताई कुलकर्णीची कमाल आहे त्या जाहीर सत्कार आणि कौतुकास पात्र ठरल्या आहेत. माझे मुंबईतले एक व्यावसायिक मित्र देखील सदर परिषदेस गेले होते कारण त्यांचे तेथे भाषण होते, विशेष म्हणजे पुणेकर बुद्धिमान ब्राम्हणांनी या मित्राचेही भाषण योग्य ठिकाणी टाळ्यांनी दाद देऊन ऐकले कारण मागे एकदा वागळेंचे जेव्हा पुण्यातल्या ब्राम्हणांसमोर भाषण झाले होते तेव्हा त्यांच्या भाषणाला नको त्या वाक्यांवर एवढ्या टाळ्या पडल्या कि वागळेंनी मध्येच भाषण सोडून आणि स्वतःच्या गालावर स्वतःच्याच टाळ्या मारून बाहेर पडले होते...

मेधाताई पुण्यातल्या अत्यंत यशस्वी आमदार आहेत आणि त्या खालून वर आल्या आहेत थेट आमदार म्हणून त्या निवडून आल्या नाहीत तर त्या आमदार होण्याआधी पुणे महापालिकेत तब्बल तीन वेळा आधी नगरसेविका म्हणून सतत निवडून आल्या, लोकप्रिय झाल्या नंतर त्या विधानसभेला उभ्या राहिल्या आणि तेथेही त्या निवडून आल्या, पुढल्या वेळीही त्या निवडून येतील, आमदार होतील. त्या एक स्त्री असल्याने त्यांचे वय विचारणे तसे घातक ठरेल पण एक नक्की आजचे त्यांचे जे काय वय असेल त्यापेक्षा त्या उत्साहाच्या बाबतीत शंभर टक्के किमान २० वर्षे तरी लहान वाटतात, एखाद्या तडफदार तरुण स्त्रीसारख्या सतत स्वतःला सार्वजनिक कामात आणि उपक्रमात गुंतवून ठेवतात. एकाचवेळी स्वतःचा संसार आणि उत्तमरीत्या मतदार संभाळणाऱ्या मेधाताई कुलकर्णी यांचे करावे तेवढे कौतुक कमी. त्यांच्यावर आणखी खूप काही लिहायचे आहे, येथे ते नक्की अपूर्ण आहे...


पत्रकार हेमंत जोशी 

Thursday, 19 April 2018

OFF THE RECORD review on IAS transfers

OFF THE RECORD review on IAS transfers


1. Vijay Singhal rocks SWM. 
Solid Waste Management is synonymous with corruption, blacklisting of contractors, dominance of Gadkari's man from Delhi (some Gulab Singh from Metro West) and the infamous ruler of this department contractor- Anthony. While the DMC "Balaam Pyare" was shunted out to Zone 1 as DMC an equally good officer (Shankarwar) has taken the role of Deputy Municipal Commissioner -SWM at the BMC. The contractors who were picking up debris in the name of waste and made some bucks have finally given in to the pressure and no-corruption will be tolerated attitude of only one man Additional Municipal Commissioner for eastern suburbs-Mr. Vijay Singhal. In literal sense, the blue eyed boy of MC Ajoy Mehta, Singhal has received tremendous support from the MC, and both of them have not only punished the guilty but also managed to answer the gossip mongers by protecting the contractors who were made scapegoats months ago. By scrapping all the previous terms & conditions, today Singhal has issued 6 new tenders Zone wise and he is confident that now this department will run with extreme ease. By fighting with the contractor lobby he has also  managed to root out corrupt ones and managed to save 1000 kgs of debris the contractors made money from. In literal sense Singhal will save some crores of rupees of the Corporation that went in waste! Kudos to Vijay Singhal!!

 Major transfers in Maharashtra Bureaucracy took place this week. Few conclusions I could draw from them.

1. Those who go to Buldhana end up getting MSRDC. This time it is Dr Chandrakant Pulkundwar and last time it was K.V. Kurundkar (recently posted at Mantralaya). Now that Nirupama Dange is there at Buldhana as collector, her next posting will be at MSRDC, am assuming. But finally officers like Pulkundwar get justice. His batchmates by blackmailing Ministers had already moved to Mumbai and surrounding areas but Pulkundwar served his term at Washim & Buldhana. CM's way to tighten grip over MSRDC. I have know Pulkundwar since his PS days at Minister Suresh Shetty. Very efficient and no-nonsense officer. Hope MSRDC does not spoil him.  

2. What should I say about Sampada Mehta & Sunil Chavan. Both have 'managed' to get their transfers cancelled next day of the orders issued. Sampada Mehta in her entire tenure of Collector-Greater Mumbai wasn't impressive. The 'noise' that Dr. Ashiwini Joshi made whilst her tenure as Collector, Mehta couldn't even do it 1%. Ashwini Joshi currently Excise Commissioner sits one floor above Mehta at the Old Custom House. As per my sources in the entire tenure as Collector, Mehta did climb that floor once only to say "hello" to Joshi. What I know of Joshi, she would have been more than co-operative to give Mehta all the clubs history. But it was Mehta who did not want want her superiors to rub the wrong way as many of them are members of these high flying clubs. Must say, after Joshi went, and the docile Mehta came in, someone at a higher post in Revenue Department must have surely heaved a sigh of relief. Lets see how Jondhale performs now, will he carry on the work Joshi left or will he be another Mehta?

Sunil Chavan--haha-- If currently you ask me which bureaucrats rule the roaster in Mantralaya--I would name it to the Thane team. All of them have super hold-The Collector, the Municipal Commissioner  & the Police Commissioner-- Sunil Chavan is an Additional Commissioner  at the  Thane Municipal Corporation. His boss is Sanjeev Jaiswal, the Commissioner--frankly I have failed to judge Jaiswal now. If he is non-corrupt and works by ethics, (at least thats what is portrayed) NO 1 thing Jaiswal should have done is--he should have shunted people like Chavan long ago. Jaiswal does share that kind of rapport with the CMO & with the CM himself--- for him to dictate terms who will be with him and who won't, is not a problem . But the fact that Chavan got transferred to Aurangabad  and got his order cancelled next day, has definitely had me thinking now on the intentions. If we have Gharat in KDMC who is known to carry his chair to his grave, for Thane it will be Sunil Chavan. For so many years these people are at the same posts...How & Why? No activist, journalist have the ba**s to write against such officers. God knows why? IS the Maratha card taken too seriously these days friends?

Now on to Dr. Sudhakar Shinde--Wasn't it decided behind closed doors that all Corporations henceforth will be headed only by the IAS? Then how come Ganesh Deshmukh got the post of Panvel Commissioner--CMO? OK...he is the Chief Officer cadre and what I hear he has done tremendous good work at Kolhapur & Sangli & CM was very impressed with him. But sir, rules are rules nah !!OK, now some are calling it CM's best move to suspend the No confidence motion passed against Shinde on the 12th April and to transfer him on the 13th the next day, but at the same time some are saying CM was worried about the Thakur's from Panvel and that racketeer Guardian Minister Ravindra Chavan. If Sudhakar Shinde had to be shunted than why was the motion suspended. If the motion was suspended, then why the transfer? Heard it was a way to thank Prashant thakur for getting the corporation in BJP's control and giving a free hand to the Minister. Heard very soon CIDCO will be given to Thakur as well!!

Shekar Channe & Saurav Rao were expected to be retained with good postings as the news of their postings was doing rounds since months now and appointment of Sachin Kurve as Collector Mumbai was the master stroke. CM has not touched the BMC, as it is in the best hands under able guidance of Ajoy Mehta. But now all eyes on the CS posting. DK Jain will be crowned the new prince of state bureaucracy very soon but I know who is eyeing for the post of Jain when he retires later this year.  Another round of transfers (now the bigger ones ) will take place once Mullick retires month end. But my thoughts for CMO's Rajesh Narvekar. He will have to do Collector ship. If he was given Bandra or Greater Mumbai now he would have come back to the CMO say after 6-9 months just before code of conduct sets in. But now another 6 months or 1 year the new Collectors won't be transferred. So if at all there is new Government or new CM of same party, where will he be given remains the question. 

In all, transfers of bureaucracy is no longer dependant on how ethical you are-- be it any government. it strictly depends on which subject was handled by you & how it was dealt? You can be like that corrupt & bogus Chavan or you can be a Ajoy Mehta or a Sumit Mullick. Not that Mehta & Mullick don't get pressure or offers, it is the way they handle the matter and saying NO also has elegance. It does not leave a bad taste in anyone's mouth. Whereas if you are a Chavan you will say yes to everything and at times even stoop to a level for getting your work done. Then people like Chavan don't get bad mouthed-they are used to it for years now--the image of their boss falls.

Vikrant Joshi 

Wednesday, 18 April 2018

बुवा बनलेले बदमाश : पत्रकार हेमंत जोशी


बुवा बनलेले बदमाश : पत्रकार हेमंत जोशी 
मध्य प्रदेशातल्या भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे शिवराजसिंग चौहान यांनी इंदोरच्या वादग्रस्त भय्यू महाराजांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिलेला आहे पण लोक सोशल मीडियावर असे चेकाळलेत जणू त्यांना मध्यप्रदेश मंत्रिमंडळात राज्यमंत्री केले, असे अजिबात घडलेले नाही, हा झालेला गैरसमज मनातून काढून टाकणे गरजेचे आहे...तिकडे भय्यू महाराजांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिल्यानंतर इकडे मला विविध फोन, मेसेजेस येणे अपेक्षित होते आणि ते घडलेही, अनेकांनी तर माझी तोंडावर खिल्ली देखील उडविली कि ज्यांच्या विरोधात तुम्ही लढला किंवा लढ़ताहात ते तर राज्यमंत्री झाले, त्यावर नेमकी वस्तुस्थिती सांगण्यासाठी हे लिखाण येथे खास तुमच्यासाठी....

अत्यंत महत्वाचे म्हणजे राज्यमंत्री असणे आणि राज्यमंत्र्याचा दर्जा यात फार मोठा फरक आहे म्हणजे मी देवेंद्र फडणवीस यांना ओळखतो पेक्षा देवेंद्र फडणवीस मला ओळखतात, असा तो फरक आहे किंवा एखादे नृत्य मुख्य नटी करते तिला जेवढे महत्व असते तेवढे महत्व तिच्या मागे उभे राहून एक्सट्राज मध्ये नृत्य करणाऱ्याला नसते किंबहुना एक्सट्राज मध्ये नाचणार्यांचे चेहरे आमच्या लक्षात 
आहेत असे सांगणारे जसे कोणी भेटत नाही तो तसा प्रत्यक्ष राज्यमंत्री आणि राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळालेल्यांमध्ये फरक असतो थोडक्यात भय्यू महाराज यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळणे म्हणजे एक्सट्राज मध्ये नाचणाऱ्यांशी फारतर त्यांचे साम्य दाखविता येईल....

आणखी एक महत्वाचा मुद्दा कि अमुक एखादे पद मिळाले कि तो माणूस मोठा झाला असे घडत नसते म्हणजे पप्पू कलानीने नाशिक महामार्गावर इगतपुरी येथे त्याच्या दारूच्या कारखान्यात शंकराचे मंदिर बांधले याचा अर्थ पप्पू कलानी देशभक्त देवभक्तांच्या रांगेत बसला असे अजिबात नसते किंवा वादग्रस्त रवींद्र चव्हाण संघाच्या मुशीतून जन्माला आलेल्या भाजपामध्ये राज्यमंत्री झाले म्हणजे ते परमेश्वर ठरले असे अजिबात नसते, लोकशाहीचे आता ते संकेतच ठरले आहेत कि माणूस जेवढा अधिक वाईट तो मोती खातो आणि श्रेष्ठ माणूस दाणे शेंगदाणे खाऊन कसेतरी दिवस काढतो. थोडक्यात भय्यू महाराज यांना पद मिळाले म्हणजे ते देव झाले परमेश्वर ठरले असे अजिबात नाही. याला पुरस्कार दे त्याचा सत्कार कर असे करून कोळसा घोटाळ्यात अडकलेले दर्डा त्यामुळे श्रेष्ठ ठरले असे होत नसते, सामान्य माणूस बोलत नाही पण त्याला ते सारे समजते, आपली कोळसा घोटाळ्यातून सुटका व्हावी म्हणून हि केलेली चापलुसी, सामान्य वाचकांना ते समजत असते पण सर्व गुंडांसमोर सामान्य माणूस हतबल ठरला आहे, त्याचे काहीही चालत नाही, चूप बसण्यापलीकडे त्याच्या हाती काहीही नसते....आता शेवटच्या आणि महत्वाच्या मुद्द्याकडे वळतो. बघा, जे वाईट असतात, समाजविघातक असतात त्यांच्याविरुद्ध वर्षानुवर्षे लढावे लागते तेव्हा कुठे यश मिळत असते, या राज्यात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणारे वर्षानुवर्षे लढले त्यात काहींचे बळी देखील गेले तेव्हा कुठे त्यांना यश मिळाले, अलीकडे राज्यातल्या बुवाबाजीला त्यातून आळा बसला, महाराज किंवा बुवा मग ते अनिरुद्धबापू असतील, भय्यू महाराज असतील, नाणिजचे नरेंद्र असतील, या मंडळींचा पूर्वी जो गाजावाजा होता ते सारे बऱ्यापैकी संपलेले आहे, कसेबसे हे असे बुवा आता या राज्यात आपले स्थान टिकवून आहेत, त्यांचे नशीब ते तुरुंगात गेलेले नाहीत. भय्यू महाराजांच्या बाबतीती सांगायचे झाल्यास विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर तर पृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्री म्हणून कालखंड सुरु होईपर्यंत या भय्यूमहाराजांचे आपल्या राज्यात म्हणजे अख्य्या महाराष्ट्रात त्या दहा बारा वर्षात एखाद्या देवासारखे तेही राज्यातल्या प्रत्येक मोठ्या नेत्याच्या घरात थेट चुलीपासून तर देवघरापर्यंत अक्षरश: देवासारखे स्थान होते, सर्वांनी त्यांना फोटोच्या रूपात थेट देवघरात नेऊन बसविले होते, आम्हाला तेव्हाही हसायला यायचे पण भय्यू महाराजांचे राजकीय महत्व वाढलेले असल्याने राज्यातल्या दिलीप वळसे पाटलांसारख्या साऱ्याच चतुर नेत्यांनी शरद पवार आणि अजित पवारांचा अपवाद वगळता भय्यू महाराजांना थेट देव केले होते कारण मोठ्या नेत्यांमध्ये दबदबा असल्याने या भय्यू महाराजांमुळे आपले भले होईल हाच त्यामागे अनिल देशमुखासारख्या प्रत्येक नेत्याच्या ते मनात होते पण जे नेत्यांना वाटते ते तसे भय्यू महाराज अजिबात नाहीत प्रत्यक्षात ते विकृत किंवा थापाडे कसे हे सततच्या लिखाणातून आणि आलेल्या अनुभवातून मी लोकांना या नेत्यांना दरवेळी समजावून सांगितले, सत्य तेवढे मांडले त्यातून आज भलेही त्या मध्य प्रदेशात त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळालेला असेल पण येथे या राज्यात मग घर ते उद्धव ठाकरे यांचे असो कि अकलूजच्या मोहिते  पाटीलांचे येथे यापुढे भय्यू महाराज केवळ नेत्यांच्या तोंडी लावण्यापुरते उरले आहेत, आणि तेच आमचे यश आहे. येथले बडे सरकारी अधिकारी, अत्यंत मोठे नेते आणि आणि या राज्यातले एकेकाळी भय्यू महाराजांच्या चरणी देव म्हणून बऱ्यापैकी लिन झालेला मराठा समाज, ते सारेच्या सारे भय्यू महाराजांपासून दूर गेले आहेत हे माझे यश कमी पण भय्यू महाराजांचे फसवे वागणे त्याला अधिक कारणीभूत ठरले आहे. त्यांनी सुरुवातीला जे चित्र निर्माण केले होते ते तसे भय्यू महाराज वागले असते तर आमच्या विदर्भात आणि उभ्या महाराष्ट्रात देखील ते खऱ्या अर्थाने संत तुकडोजी किंवा गाडगे महाराज किंवा गजानन महाराज ठरले असते, झाले असते, आता सारे संपले आहे जणू स्वर्गात पोहोचलेल्या त्यांच्या पहिल्या बायकोचे किंवा इतरही वर्षा सत्पाळकर यांच्यासारख्या फसविलेय गेलेल्या भक्तांचे शाप त्यांना आता भोवले आहेत, ती पहिली बायको, बिचारी भोगून भोगून वर गेली आहे, तिच्या लाडक्या कुहूला पोरकी करून, निदान कुहूचे तरी चांगले व्हावे...
तूर्त एवढेच.


पत्रकार हेमंत जोशी 

Monday, 16 April 2018

इकडले तिकडले : पत्रकार हेमंत जोशी


इकडले तिकडले :  पत्रकार हेमंत जोशी 
उद्धव ठाकरे परदेशातून परतल्यानंतर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती पुन्हा व्हावी म्हणून त्यांची भेट राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार घेणार होते तसे जवळपास ठरलेलंही होते पण हि भेट झाली नाही, नजीकच्या काळात लवकर होईल असे चिन्ह दिसत नाही पण भेट होईल, थोडा वेळ लागेल किंवा सुधीर मुनगंटीवार आणि उद्धव ठाकरे एकमेकांना भेटले आणि एकत्र निवडणूक लढविण्याचे ठरले, असे देखील लगेच होणार नाही कारण हि भेट म्हणजे हिंदी सिनेमा नाही त्यात कसे एका क्षणी नट नटी मधुचंद्र साजरा करतांना दाखवितात आणि पुढल्याच क्षणी नटीला नववा महिना लागल्याचे दाखवितात, असे युतीच्या बाबतीत नक्की घडणार नाही, आज तरी युती होईल असे वाटत नाही किंवा युती होईलही पण सेनानेते खूप आढेवेढे घेतील नंतरच मधुचंद्राला ते दोघे एकत्र जातील एकत्र साजरा करतील म्हणजे सेना आणि भाजपा एकत्र पुन्हा येतील निवडणुकाही एकत्र लढवतील, हातात हात घेतील पण हे नक्की यावेळी पटकन किंवा एका झटक्यात घडले असे अजिबात होणार नाही, कारणे नेमकी किती आणि कोणती हे त्या उद्धव ठाकरे यांनाच ठाऊक पण ते केंद्रातल्या म्हणजे राज्यातल्या नव्हे भाजपा नेतृत्वाला काहीसे खूपसे उबगले आहेत त्यांचा केंद्रातल्या नेत्यांवर विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर राग आहे, त्यांना देवेंद्र फडणवीसांबद्दल राग नाही उलट आदर आहे आणि मुख्यमंत्री देखील उद्धव यांच्याशी चांगले संबंध जपून आहेत हे तुम्हा सर्वांनाही चांगले ठाऊक आहे. बघूया मुनगंटीवार यांच्या प्रेमाने डोळा मारण्याला उद्धव केव्हा कसा आणि किती झटपट रिस्पॉन्स देतात ते....

जेव्हा मुख्यमंत्र्यांनी राधेश्याम मोपलवार या धाडसी प्रशासकीय अधिकाऱ्यावर समृद्धी महामार्ग हे महास्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी टाकली तेव्हा अनेकांनी त्यांच्या नावाने कडाकडा बोटे मोडली किंवा नाके मुरडली पण मला त्यांच्या या निर्णयाचे कौतुक वाटले होते कारण मोपलवार जेव्हापासून सरकारी नोकरीत आले तेव्हापासून तर आजतागायत मी त्यांना बऱ्यापैकी जवळून बघत आलेलो आहे म्हणून जो निर्णय फडणवीसांनी घेतला आहे घेतला होता म्हणजे आधी समृद्धी महामार्गाची जबाबदारी त्यांनी मोपालवारांनवर टाकली तदनंतर मोपालवारांना त्यांनी निवृत्तीनंतर देखील वर्षभरासाठी जे एक्सटेंशन दिले ते त्यांचे दूरदर्शी डिसिजन होते त्यात फारसे वावगे वागण्यासारखे काहीही नव्हते कारण समृद्धी महामार्गाचे काम सुरु करणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हते तेथे एकाचवेळी डोके आणि ताकद लावू शकतो अशा धाडसी आणि बुद्धिमान प्रशासकीय अधिकाऱ्याची नितांत गरज होती आणि ते काम मुख्यमंत्र्यांनी परफेक्ट केले असे आमचे मत आहे विशेषतः जे मोपालवारांना अगदी जवळून बघतात ते नक्की माझ्याशी सहमत होतील, काही माणसे त्यांच्या दोषांसहित स्वीकारायची असतात कारण ते धाडसी असतात, दस्तुरखुद्द नितीन गडकरी यांचे दोष दाखवा असे जर कोणी मला सांगितले तर त्यावर नक्की अख्खे पुस्तक लिहिणे अगदी सहज शक्य आहे पण गडकरी हे देखील कमालीचे धाडसी म्हणून त्यांनी आपले आणि बांधकाम विभागाचे नाव देशात गाजवून सोडले किंवा त्यांचे एकमेव असे खाते होते त्याच खात्याचे काम या पंचवार्षिक योजनेत दिसले गडकरींचा पियुष गोयल झाला नाही म्हणजे फक्त गोयल यांच्याप्रमाणे गडकरी यांच्या केवळ कुटुंबाचे उत्पन्न या पंचवार्षिक योजनेत कित्येक पटीने वाढले असे झाले नाही थोडक्यात नितीन गडकरी यांचा पियुष गोयल किंवा प्रफुल्ल पटेल झाला नाही, त्यांनी चांगले कामही करून दाखविले, कामे सुरु आहेत....

मराठी बिग बॉस सुरु करण्यापूर्वी एका पत्रकालाही त्यात सामावून घेण्याचे जेव्हा ठरले तेव्हा तीन पत्रकारांच्या नावाची चर्चा तेथे आघाडीवर होती त्यातले एक निखिल वागळे हेही होते, तीसरे नाव मी येथे सांगत नाही पण अगदी शेवटी वागळे कि थत्ते या चर्चेत थत्ते अधिक उजवे ठरले आणि ते मराठी बिग बॉस मध्ये आले. आता नेमके हे बघायचे आहे कि थत्ते तेथे किती आणि कसे टिकतात विशेषतः थत्ते त्यातल्या इतरांना वेडे करून सोडतात कि तेथे जमलेले थत्ते यांना वेडे करून सोडतात, हे बघण्यात मजा येणार आहे, काहीही असो थत्ते अनेक वर्षानंतर प्रकाशझोतात आलेले आहेत कारण अलिकडल्या काही वर्षात जसे आसूड ओढणारे रस्त्याने दिसणारे कायम स्वतःचा आसूड स्वतःवरच मारून घेतात तसे अनिल थत्ते स्वतःच स्वतःची वेगळ्या पद्धतीने जाहिरात करून घ्यायचे ज्याची त्यांना वास्तवात अजिबात गरज नव्हती, थत्ते यांनी आपली लेखणी बंद पाडली नसती तर ते आज या राज्यातले लिखाणातल्या पत्रकारितेत प्रथम क्रमांक पटकावून मोकळे झाले असते जे मी नेहमीच लिहीत आलेलो आहे पण त्यांनी मूळ मुद्य्यांकडे दुर्लक्ष केले त्याची करणे त्यांना स्वतःलाच नेमकी माहित असतील पण झाले तेही 
छान झाले म्हणजे बिग बॉस च्या माध्यमातून का होईना इतरांनी त्यांना प्रकाशझोतात आणले, बघूया पुढे काय घडते ते....


पत्रकार हेमंत जोशी 

Sunday, 15 April 2018

My Thailand diaries-Part 2

The first day began with landing at the airport and clearing immigration. Since it was a late night flight and arrival scheduled for early morning the toilets were 'clogged' by Indians. The Thai staff at the airport which was appointed for the maintainence of the toilet couldn't believe her eyes when she saw people in their vests and underwear's (I so wanted to click) in toilets some taking insulin shots, someone brushing and someone putting gutkhas in their mouth to clear the stomachs. We are Indians after all. My bowels were to be controlled as hardly could find a space to even stand. But luckily there was no one queuing outside the toilet which marked "Handicapped", and I rushed in before anyone could actually sit inside and do their job. My job was done....

As the luggage arrived we met the affable "Penny" an old associate of Dilip who works closely with the biggest in business such as Cox & kings, Kesari & so on...Dilip treats her as his own sister and the affection and warmth could be seen. Penny is Dilip's associate for Thailand for more than 7 years now. You just walk into Thailand, and if you Penny you are sorted.  Then walks in a handsome man in his mid 40's (I first told him he would pass off anything in his late 30s) to accompany me Dilip & Jay. This man had boarded Kolkata-Bangkok flight and had landed 40 minutes ahead of us. Dressed in blue shirt and denims this man's physical appearance gave us (in our mid-thirties) run for our money. Jay introduced him as Mahesh (Bhaiyya) Toshniwal and Dilip murmured in my ears, "He is the guru"....We packed our bags in a mini-truck hired by Penny and our journey for 4 hours to Hua-Hin began. When I told him I write about state politics, I was surprised to know that a Man from Kolkata knew so much about Maharashtra Politics...Well informed, I quipped. 

Since the group of 60 was to arrive the next day, it was we 4 who had the company for each other in the plush resort of Hua-Hin. But as luck prevailed, whilst coming down a staircase in a Mall, I missed a step and had a nasty fall. The little finger on my left leg was swollen pretty bad and pain was excruciating. Seeing me in this conditon, the Guru gave his first lesson to me called "Correction Theory". Everything is related to mind. Maheshji asked me to practice some exercise the night I fell before I slept 15 times, and friends believe me I was 50% normal the next morning...Magic Isn't it? Now What is Correction Theory and how does it work? If I tell you, I might miss on to some important points, hence will leave it to the master. 

Next day the group arrived & I was 50% alright. The first few hours after the breakfast the rooms were allocated. The second day after Lunch the session began. Basis of entire teachings of Mahesh Toshniwal is based on certain Laws. They are Laws of Attraction and Laws of Circulation. According to him, if you master this, you are the champion of your life. 

The days began with sharp 6am Meditation Class along with a new concept called Solar Plexus. It is a breathing format. Mediation by the sea in non-polluted air and silence with just the waves sound just made our mornings perfect. Then breakfast, tea break, lunch, high tea and dinner was all pure Vegetarian affair (not only VEG but even the Jains had a buffet). Hats off to Dilip to arrange this kind of menu for all 6 days. In between, the sessions where Maheshji spoke was an internal part. Also there were tasks given to all 60 people which needed to be done at any cost even it meant for some of to loose their sleep. In short it was a rejoice! Believe me when I say this...be it a 10 year old boy or 65 year old man none of us slept for more than 4 hours everyday...No partying, No drinking only listening to the great Mahesh Toshniwal and learning new techniques to LIVE. 

Best thing of all 6 days was the Red carpet event which was conducted every night after the dinner. Every member was divided into a team and was asked to give a thought of their ultimate aim in life. The entire team has to enact a sequence in front of everyone as if they have achieved that aim of theirs. You have to be formally dressed (people carried suits and gowns in Bangkok, Jay still fitted in the same blazer he had worn on his reception night 8 years ago) and you have to express GRATITUDE towards your achievement. Then only success stays, believes Toshniwal. It was such  an enthralling experience that everyone would give their best shot. Everyone had to fill in with their roles and enact as if they have achieved whatever they had dreamt. Then we had a wedding sequence of a girl from Delhi event enacted where she actually dressed up like a bride. 

Oh by the way, I was lucky to be presented the book written by the master himself called "WOW". By the way Mahesh Toshniwal's life was not always about training and preaching gratitude. He had a successful career in Cement Industry. But it was when he lost his dear mother in 2007, Mahesh ji who had severed all ties with all his best friends in Kolkata for 2 years, realised Gratitude is what everyone needs in life. From that moment onwards it was never looking back spiritually for Mahesh ji. Today he travels length & breath of our country to conduct one day, 3 days corporate events wherein the biggest in the all the industry attend his lectures. 

I thank Mahesh ji & Jay for allowing me to come to his class & take something back. By the way though Jay is Mahesh Toshniwal relative and played an integral part of the success of this rejoice trip, my sincere thanks to Dilip for making it a grand event. But when I was back in Mumbai and all the naughty questions were popped as to what all happened in HUAHIN--I replied HUAHIN me Kuch Hua Hi Nahi!


My Thailand diaries--Part 1

My Thailand Diaries--Part 1

As Paul Tillich says, "Loneliness express the pain of being alone and solitude expresses the glory of being alone". I couldn't have agreed more. 28th March when the final bell in the corridors of Vidhan Bhavan rang, I knew I was done.... Done with everything... Done with reporting, done with everyday chores...I needed a break! I just wanted to be FAR; Yes!! far from everything...Far from what was happening in Maharashtra, far from bureaucratic transfers, far from the cabinet reshuffle, far from getting OFF THE RECORD news, far from family, far from even my everyday self. Obviously such behaviour had its own reasons... Last 3 months particularly were very hectic for me- from the gruelling & boring Budget session that lasted for almost 50 days to the coffee shop business & visiting doctors for health checkups, all of this had drained me--I was done, both physically & mentally... And to add salt to the wound, the crazy Mumbai traffic everyday & weather had made it worse. Every week some or the other family member was falling ill due to this dubious weather ... I just wanted to get out...getting out meant in literal sense to do something unusual to get my sanity back...someone said join Yoga..& I was like dude, I'm 35...still time for that phase...I also knew the show will go on, the world won't stop if for 8 days I didn't report....And yes what's great if I missed the chaos of our country, state & family for next 8 days....The answer came from within--Vikrant you need a Vacation! The decision was made instantly...What next then?

Have couple of extremely close friends who are in tourism business, so asking them for a backpack tour was obviously the next thing. I actually din't even mind tagging along to that group tours where you are made to do 100 sight seeing in 6 days...Believe me I was that worked up...I just needed someone to take me out...I had to travel abroad... The reason I wanted a trip abroad is if you calculate, you spend Rs. 50,000 (plus minus 10%) more if you travel abroad more than travelling in India, but in that you get to see the world, different people & different culture. Yes, travelling in India NOW is also as expensive affair as compared travelling to any country in the far east. 

So one of them responded.  It was a six days trip to Thailand. ...As soon as I got this message from my friend, I knew I won't even be allowed outside Santacruz by the family, if I mentioned travelling o Thailand alone. Although modern, but whenever a man takes a trip to Thailand solo, family's every sentiment & character are at stake! But I being Me, I had made up my mind to face the consequences, come what may. Thailand, it had to be. Convinced family, my wife surprisingly din't break a sweat when I mentioned this. I'm sure I must be good with Trust issues, for her to not event taunt me for travelling to the paradise for men. My son's being 11 & 7, never understood the deep concern my 59 year old father had for me for travelling alone to Bangkok, but the thought of getting bag full of clothes & shoes & everything a BATH could buy, and few swears (a typical Indian thing-wherein if you promise not to do somethings by putting your hand on God, or else Demon will eat you, if you break it) I was ALLOWED!

Now a bit about my friends accompanying me...Dilip is in travel business-He looks intelligent, and has a heart of gold....even though in business which requires him to be an extrovert, our Dilip Babu  behaves like a virgin at times...he is like our Sharad Pawar. Not even Pratibha Tai (his wife) knows what going on in his mind...Very calm, quiet, but yet is brilliant at what he does...Dilip is the same...He runs magnificent & a very big & successful travel agency from Lokhandwala, Andheri.  Our one more friend Jay was accompanying us too. Jay is a typical babu from Kolkata (Marwari) living in Mumbai since years now. Fun guy, but yes, got to know him better during our stay. One thing I din't understand why Jay's wife made video calls to him every night only after 1030? And our Jay babu would be all pink when he spoke to his wife till she use to hang up...True Love, my guess...hahaha...But I must tell you with all honesty, we all boys behaved ourselves in Thailand...including Jay too who would finish his pint in flat 6 minutes even during our classes... At the end of the day it was JAY's show at Thailand...will get into it bit later on...

Anyways, the journey of 3 boys had began. Best part was when we were in the overcrowded bus proceeding towards our aircraft. All I could see were MEN and yes married couples --who were surely flying for the first time for their honeymoon to Thailand. The other MEN the only hungry expression they had, "यार हम कब थाईलैंड पहुंचेंगे? "...After all they were travelling to "Bang cock"....sorry Bangkok right?   

Readers, now comes the real surprise. As soon as we had boarded the flight, Dilip chose to speak....I had a faint idea that he was heading some group for touring the whole of Thailand....But than the mysterious Dilip spoke and in literal sense I couldn't feel sensation for next 10 minutes he & Jay spoke...It took 3 pegs of JD's on the Dreamliner for me to come to my senses... As learnt, we were only travelling to a place called Hua-Hin ...it is a 3 hour drive from Bangkok airport & some Mahesh Toshniwal would be conducting REJOICE classes not only for us but 60 other people (Jains & Marwari's) from Kolkata & Vadodara...& make no mistake-- the classes would begin at 6am and end at 2am in the morning...20 hours of spirituality & rejoice for the next 6 days....God...Was I travelling to Thailand or Tibet? Was I better remembering Minister Vidya Thakur & Minister Sudhir Mungantiwar and gathering news in my town? Why God Why? I think my wife had surely cursed me, even if she did not say a word on my face...

But friends, in the second part of the blog will explain you all how this certain MAHESH TOSHNIWAL changed my life...He is no BABA like our own Bhaiyyu Maharaj or no Ramdev BABA...He is no Narendra Maharaj from Nanij who sweats the whole day in the heat and removes PeDHA from his armpit for his followers.....Mahesh Toshniwal is modern day Maharaj for me...He has cured cancer and made people rich whosoever has paid attention to the man who can stand and talk for 18 hours non-stop....The 60 Marwari's who ate Jain food all 3 times in the resort where we were put up were all multi millionaires and 90% of them were following Toshniwalji for years....So Toshniwal ain't no fake...He has character and he is solid! In my next part shall mention about his MAJIC....My recommendations for all bureaucrats---google this man and attend his classes which he conducts ONE DAY basis in your choice of city in India....Your life will change....Thursday, 12 April 2018

मुनगंटीवारांची मध्यस्थी : पत्रकार हेमंत जोशी


मुनगंटीवारांची मध्यस्थी : पत्रकार हेमंत जोशी 
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे बोलण्यावर आणि खाण्यावर नितांत प्रेम आहे. ते पक्के खवय्ये आहेत आणि बोलघेवडे आहेत. त्यांचे बोलणे वायफळ नसते, ऐकावेसे वाटते. त्यांच्या बोलण्यावर सारे फिदा होतात, त्यांना अतिरिक्त बायकांचा नाद नाही अन्यथा या वयात देखील त्यांच्यावर, त्यांच्या बोलण्यावर एखादी कतरीना किंवा मानसी नाईक सारखी सेक्सी नटी फिदा झाली असती, त्यांना सोबत घेऊन गोल गोल झिम्मा फुगडी खेळली असती...

सुधीरभाऊंनी ते गडकरी यांचे खंदे समर्थक असूनही मुख्यमंत्र्यांशी चांगले जुळवून घेतले आहे. म्हणजे एकाचवेळी ते गडकरींचा हात करकचून आपल्या हातात घेतात त्याचवेळी फडणवीसांना फ्लायिंग किस देऊन मोकळे होतात. त्यांना मुख्यमंत्र्यांनी फ्री हॅन्ड दिला आहे, असे क्वचित घडते. आणि त्याच मोकळीकीचा त्यांनी अलीकडे फायदा घेण्याचे ठरविले आहे, तशी सुरुवात देखील त्यांनी केली आहे म्हणजे मोदी शाह किंवा फडणवीसांकडून कोणत्याही सूचना नसतांना त्यांनी युतीच्या प्रस्तवासाठी थेट उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे सुरु ठेवले आहे. उद्धव यांचे जसे फडणवीसांशी जमते ती तशी नाळ त्यांची सुधीरभाऊंबरोबर देखील फार पूर्वीपासून जोडल्या गेलेली आहे...

म्हणजे सुधीरभाऊ समोर आलेत किंवा दिसलेत कि उद्धव ठाकरेंना जसे जागच्या जागी नाचावेसे वाटते तेच सुधीरभाऊंचेही उद्धवजींच्या बाबतीत होते, वासरू जसे गायीला बघताच जागच्या जागी बागडायला लागते तेच सुधीरभाऊंचे होते, उद्धव यांना बघताच त्यांना आनंदाच्या प्रेमाच्या स्नेहाच्या मैत्रीच्या उकळ्या फुटायला लागतात. या लेखाचे महात्म्य संपेपर्यंत उद्धव ठाकरे अमेरिकेतून परतलेले असतील आणि त्याच दिवशी रात्री सुधीरभाऊ त्यांची भेट घेऊन मोकळे होतील, युती करावी असा आग्रह देखील धरतील पण आतली बातमी अशी कि यावेळी कोणत्याही अमिषाला प्रलोभनाला बळी न पडता उद्धव ठाकरेंना म्हणजे शिवसेनेला भाजपाशी निदान लोकसभा निवडणुकीपूर्वी युती करायची नाही, त्यांना लोकसभा भाजपाला बरोबर घेऊन लढवायची नाही हे त्यांनी ठरविलेले आहे, त्यांचा निर्णय झाला आहे...

लोकसभा निवडणुकीपूर्वी भलेही मुनगंटीवार आणि उद्धवजी यांच्यात आणखी अनेकदा भेटीगाठी होतील पण युतीची शिष्टाई सफल होणार नाही हि आता काळ्या दगडावरची रेघ आहे. आम्हाला आधी गोंजारले जाते आणि निवडणूक आटोपली कि कंडोम सारखे वापरून बाहेर फेकल्या जाते हे त्यांच्या मनात पक्के ठसलेले असल्याने उद्धवजी त्यांच्या निर्णयावर यावेळी ठाम असतील, यदाकदाचित जर मुनगंटीवार यांची शिष्टाई सफल झालीच तर भाजपा नेत्यांनी सुधीरभाऊंचा गिरगाव चौपाटीवर जाहीर सत्कार घडवून आणावा. पण असा सत्कार करण्याची वेळ येणार नाही असे निदान आज तरी शंभर टक्के चित्र आहे, समजा मिलिंद नार्वेकर वर्षावर उठबैस करून मुख्यमंत्र्यांच्या कानात काहीबाही सांगतही असतील तर ती त्यांची लोणकढी थाप आहे असे समजावे....

एक सांगायचे राहूनच गेले, तेवढे सांगतो आणि हा लेख पूर्ण करतो. पार पडलेल्या बजेट अधिवेशनादरम्यान मी, उदय तानपाठक आणि अभय देशपांडे तिघेही विधान भवनाच्या आव्हाड कट्ट्यावर उभे राहून गप्पा मारीत होतो तेवढ्यात काँग्रेसचे मधू चव्हाण तेथे आले आणि उदयला म्हणाले, मटाले तुम्ही कसे आहेत म्हणजे ते उदय तानपाठक यास थेट देवदास मटाले समजले याचा अर्थ जेव्हा केव्हा त्यांना मटाले भेटत असतील, तानपाठक तुम्ही कसे आहेत, विचारून मोकळे होत असतील. मटाले कसे आहेत तुम्ही, असे जेव्हा मधू चव्हाणांनी विचारले, एरवी लोकांची टर खेचणाऱ्या उदयचा चेहरा हवाबाण हर्डे चा डोस ज्यादा घेतल्यासारखा झाला होता..
तूर्त एवढेच...


पत्रकार हेमंत जोशी 

Wednesday, 11 April 2018

उद्धव सेना ५ : पत्रकार हेमंत जोशी


उद्धव सेना ५ : पत्रकार हेमंत जोशी 
उद्धव ठाकरे रस्त्याने ताठ मन करून आणि छाती फुगवून चालतात कारण त्यांचा मुलगा त्यांचा आदित्य बापाचा द्वेष राग मत्सर करीत नाही आणि हे भाग्य ज्या बापाच्या वाटेला येते तो नशीबवान असतो, भाग्यवान ठरतो. मुलांना दाबून ठेवू नका त्यांना उंच उडू द्या म्हणजे ते आदित्य ठाकरे होतील, सचिन तेंडुलकर ठरतील. राजकीय वंशावळीत हे क्वचित घडते, राजकारणात तू फार पुढे पुढे करायचे नाही हे पश्चिम महाराष्ट्रातील एका दिवंगत नेत्याने प्रत्यक्ष बापापेक्षा अधिक गुण असलेल्या मुलास सांगितल्यानंतर पुढे मुलाने देखील बापास त्यांच्या मालकीच्या शैक्षणिक संकुलात क्षेत्रात पाय ठेवू दिला नाही याउलट त्याने आपल्या काकाला अधिक जवळ केले होते. उद्या समजा अजितदादा त्यांच्या मुलांना हे करू नका ते करू नका, राजकारणात येऊ नका, स्वतःचा व्यवसाय उघडू नका असे कायम पोटच्या मुलांवर बिंबविणारे असतील तर मुलांनी करावे तरी काय, त्यातून त्यांना नैराश्य येणे स्वाभाविक आहे, असा बाप घरी यायच्या आधी मुले घराबाहेर पडतात आणि बाप बाहेर पडल्यानंतर घरी परततात कारण त्यांना स्वातंत्र्य न देणाऱ्या बापाचे तोंड देखील बघायचे नसते, अर्थात अजितदादांचे हे उदाहरण येथे सहजच दिले ते खोटेही असू शकते.मी जे तुम्हाला सांगतो, जे लिहितो ती माहिती अतिशय आतल्या गोटातून मिळालेली असते हे कायम लक्षात असू द्या. बाळासाहेब गेल्यानंतर काही काळ उद्धव ठाकरे मनाने खचले होते आणि शरीराने खंगले होते, त्यांनी आजारपण काढले होते पण त्यांना हिम्मत दोघांकडून मिळाली, रश्मीवाहिनी आणि आदित्य ठाकरे या दोघांकडून, असेही म्हणता येईल कि बाळासाहेब गेले आणि आदित्य अधिक जोमाने कामाला लागल्याने उद्धवजी नैराश्येतून फार लवकर बाहेर पडले,बघता बघता बाळासाहेबांच्याही पुढे निघून गेले, आणि हे असे घडेल, कोणालाही वाटले नव्हते याउलट राज ठाकरेच बाळासाहेबांची जागा घेतील जो तो म्हणत होता, ते घडलेलंही असते जर राज यांना सेनेतून बाहेर पडावे लागले नसते तर, पण शेवटी त्यांचाही नंबर लागला...

आदित्यच्या वयाच्या आसपास असलेल्या विविध राजकीय पक्षातील नेत्यांच्या मुलांना केव्हाच त्याने मागे टाकले आहे किंबहुना आदित्य त्यात पहिल्या क्रमांकाने पास झालेला आहे, त्याच्या आसपास देखील कोणी पोहोचलेले नाही, जयंत पाटील, अजित पवार इत्यादी नेत्यांना ते जमले नाही जे उद्धव ठाकरे यांना जमले आणि अशा या नेत्यांना स्वतःलाच अजून वाटते कि आपली मुले नव्हे आपणच तरुण आहोत, लग्नाचे आहोत. पुढले जाऊन सांगतो, राज्यातली प्लास्टिक बंदी हे पर्यावरण मंत्री रामदास कदमांचे नव्हे तर आदित्यचे यश आहे, त्यांनीच तसेआदेश कदमांना दिले होते, कोणतीही तोडपाणी न करता आपल्याला प्लास्टिक बंदी अभियान राबवायचे आहे असा दम आदित्यने दिल्याने निदान ते एक काम तरी कदम यांच्या कार्यालयातून चांगले झाले....

आदित्यची काम करण्याची पद्धत रा. स्व. संघासारखी आहे, अतिशय खुबीने त्याचे कार्य तो सुरु ठेवतो आणि हाती घेतलेली मोहीम यशस्वी करूनच दाखवतो. माझ्या घराखाली जुहू गार्डन आहे, तेथे मी अनेकदा फिरायला जातो. अलिकडल्या वर्षा दोन वर्षात त्या गार्डन मध्ये जिम उभारल्या गेल्याने आसपासचे म्हणजे अगदी मुस्लिम स्त्रिया देखील तेथे अगदी बुरखा ओढून व्यायाम करतांना दिसतात आणि 
हे असे जिम्स मुंबईतल्या रस्त्यारस्त्यावर उभारल्याचे श्रेय द्यावे ते फक्त आणि फक्त आदित्य ठाकरेला, असे म्हणता येईल कि मुंबई महापालिकेचा खऱ्या अर्थाने इमेज डेव्हलप करतांना त्याने खुबीने उपयोग करून घेतला आणि लोकांच्या विशेषतः तरुणांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आणि असे उपक्रम राबविल्यानेच अलीकडे आदित्य ठाकरे यांनी थेट अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला चारी मुंड्या चित करून मुंबई विद्यापीठाच्या त्या सिनेट निवडणुकीत दहा पैकी दहा जागा जिंकून घेतल्या, विरोधकांची अनपेक्षित वाट लावली....

आजच्या युवा पिढीने त्याच्या कार्यपद्धतीचा अगदी शिकवणी लावून अभ्यास करावा. यापुढे अनेक वर्षे विधान परिषद सदस्यांची जी पदवीधर मतदारांतून निवड होते तेथे देखील या पट्ठ्याने तब्बल ४६००० मतदार नोंदवून घेतल्याने यापुढे शिवसेनेच्या उमेदवाराला परमेश्वराला देखील पराभूत करणे अशक्य आहे. एवढेच सांगतो, नेते मग ते सेनेतले असतील किंवा या राज्यातले, अनेकांनी आदित्यचे शिवसेनेत नेता म्हणून ऍक्टिव्ह होणे हसण्यावारी नेले होते त्या सर्वांचे दात पडले. ज्या आदित्यलाहे सारे इटुकला पिटुकला इवलासा नखाएवढा लुंगापुंगा चिमुरडा चिमणा छोटासा सानुला लेकुर्डा छोटेखानी समजले तो नेतृत्वात विशाल महाकाय भलामोठा कसा त्याने ते फार लहान वयात दाखवून दिले, आता तर त्याने स्वतःची टीम देखील उभी केलेली आहे, समाधान सदा सरवणकर सारखे धाडसी तरुण त्याने मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून धाडले आहेत किंवा सुरज चव्हाण सारख्या नजीकच्या सवंगड्याला थेट सेनेतले नेतेपद मिळवून दिले आहे. पुढल्या विधानसभा निवडणुकीनंतर तुम्हाला हे चित्र विधानसभेतही दिसेल त्याची तशी तयारी आहे....

जो धैर्यशील पराक्रमी असूनही डोक्यात मस्ती जाऊ न देता भेटायला येणाऱ्यांशी, वडिलधाऱ्यांशी लोकांशी सर्वांशी आदराने वागतो आणि नेमके शब्द त्यात्या वेळी बोलण्यातून वापरतो, जो गर्वाने गलेलठ्ठ होत नाही तोच नेता होण्यास लायकीचा असतो, मोठा नेता होण्याची त्याच्यात नक्की क्षमता असते. आदित्य ठाकरे तुमचे छान सुरु आहे...
तूर्त एवढेच.


पत्रकार हेमंत जोशी