Sunday, 18 March 2018

व्यक्ती आणि वल्ली ४ : पत्रकार हेमंत जोशी


व्यक्ती आणि वल्ली ४ : पत्रकार हेमंत जोशी 

आपकी कसम मधले ते गाणे, जिंदकी के सफर में गुजर जाते है....हे गाणे स्वतः राजेश खन्नाने देखील डोक्यात ठेवले नाही, मग ते गाणे त्यालाही हुबेहूब लागू पडले, यशाच्या उच्च शिखरावर अनेक पोहोचतात, पण यशस्वी आणि किंवा त्यांचे कुटुंब सदस्य हे गाणे किंवा त्या गाण्यातले विचार डोक्यात न ठेवता हवा तेवढी त्यांच्या डोक्यात जाते आणि अशी यशस्वी माणसे, कुटुंबे एखादा प्रचंड वृक्ष धाडकन जमिनीवर जसा कोसळतो, तेच त्यांचे होते. यश पचविणे खरेच अतिशय अवघड काम आहे. केदार दिघे किंवा पूनम महाजनांसारख्या म्हणजे आनंद दिघे किंवा प्रमोद महाजनांच्या कुटुंबातून आलेल्या या सदस्यांना विचारा, आनंद किंवा प्रमोदजींच्या निधनानंतर त्यांनी मोठे केलेली किती माणसे त्यांच्या पश्चात यांच्या मदतीला धावली, मला तर असे वाटते प्रमोदजींनीं समजा लोढा आडनावाच्या एखाद्या मित्राला त्यांच्या हयातीत त्याचा व्यवसाय वृद्धिंन्गत व्हावा म्हणून करोडोंची रोख काढून त्याला मोठे केले असेल अशा लोढा छाप मंडळींनी प्रमोदजींच्या पश्चात त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत केले असतील....मला नाही वाटत, असे घडते, मग ते प्रमोदजी असोत दिघे असोत किंवा अन्य कोणीही...उपकारांची परतफेड न करणाऱ्यांपेक्षा जी यशस्वी कुटुंबे सत्ता पैसे आल्यानंतर त्या धुंदीत जगणे पसंत करतात, त्यांची अवस्था अनेकदा किंवा बहुतेकवेळा मोठी दयनीय होते. मला अलीकडे माहिती आणि जनसंपर्क खात्याला एका बड्या आणि स्वतः उत्तम लेखक असलेल्या अधिकाऱ्याचा अचानक फोन आला, म्हणाला भाऊ, तुम्हाला स्वतःला कधी ते लक्षातच आले नाही कि तुम्ही या राज्यातले पहिल्या पंचातले पत्रकार लेखक आहात ते, मी त्यावर म्हणालो, लक्षात येते, तरीही साधे वागणे मी पसंत करतो कारण गर्व माणसाला उध्वस्त करतो. कधी कधी माझ्या कुटुंब सदस्यांना विशेषतः विक्रांतला मी म्हणतोही, घरी किंवा दारी प्रत्येकाशी चांगले बोलावे आणि वागावे अन्यथा डोक्यात हवा गेली कि सारे संपायला काही क्षण पुरेसे असतात...

हे सारे येथे सांगण्याचे कारण सध्या विधान परिषद विरोधी पक्ष नेता म्हणून गाजवून सोडणारे तरुण तडफदार नेते श्रीमान धनंजय मुंडे, ते जेव्हा केव्हा भेटतात तेव्हा त्यांना अगदी तळमळीने सांगतो, धनंजय कृपया गाढवाच्या मागून आणि शरद पवारांच्या पुढून जाण्याचा विचार अजिबात मनात आणू नका, दुर्दैवाने त्यांनी माझे हे बेंबीच्या देठापासून सांगितलेले ध्यानात ठेवलेले नाही कारण शरद पवार म्हणे धनंजय मुंडे आठवले रे आठवले कि मनाशी खुद्कन हसायला लागले आहेत, त्या हसण्यामागे त्यांना कधीतरी छगन भुजबळ आठवतात आणि अलीकडे त्यांना दरदिवशी निदान काही क्षण तरी धनंजय मुंडे आठवू लागले आहेत, अमुक एखाद्या कार्यकर्त्याने किंवा त्यांच्या पक्षातल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्याने पुढे जाणे पवारांना आवडत नाही असे अजिबात नाही, पण अमुक एखाद्याचा अतिरेक त्यांचे त्यावर डोके भणकते, मग अशा मंडळींचा अजित पवार, दत्ता मेघे, डॉ. पदमसिंह पाटील किंवा छगन भुजबळ होतो, मला धनंजय मुंडे यांना मिळालेल्या यशाची आता मित्र म्हणून भीती वाटायला लागली आहे, आणि माझी भीती नेहमी बहुतेकवेळा खरी ठरते....

जे त्यांना सांगतो ते तसे अलीकडे त्यांच्या बाबतीत घडलेलंही, ते त्यातून भलेहि सहीसलामत बाहेर पडले असतील पण संशय दूर झाला असे अजिबात नाही उलट संशय त्यांच्याबाबतीत झपाट्याने वाढला आहे, वाढतो आहे. विधान परिषदेत प्रश्न न विचारण्यासाठी त्यांनी पैसे मागितले कि घेतले असा थेट आरोप अगदी अलीकडं त्यांच्यावर झाला त्यांनी तो पुसून काढलाही असेल म्हणजे त्यांच्यावर झालेल्या आरोपातून ते बाहेर आलेही असतील मात्र यापुढे त्यांचा राजकीय प्रवाहातला, प्रवासातला धोका अधिक वाढला आहे हे त्यांनी पक्के लक्षात घ्यावे, हे त्यांना अन्य कोणीही सांगणार नाही, मी येथे सांगतो आहे कारण एक उत्तम तरुण नेते म्हणून ते या राज्याची गरज आहे पण उद्या जर विधान भवनात तोडपाणी कारणारा नेता म्हणून त्यांचे नाव खराब झाले तर धनंजय यांचे पवारांच्या राज्यात मग काही खरे नाही. मी त्यांना मागेही म्हणालो होतो तुमच्याकडे जे चार दोन पत्रकार अगदी मुक्कामाला असल्यासारखे तळ ठोकून असतात, त्यांना ते स्थान देऊ नका, तोडपाणी करणे हेच त्यांचे सततचे काम आहे, अगदी अलीकडेच त्यातल्या एकाने कुठल्याशा मंत्र्याच्या खाजगी सचिवांशी मोठी तोडपाणी केली आहे, सध्या मला त्यावर काही उघड व्हावे अशी इच्छा नाही. धनंजय कदाचित तोडपाणी करणारे विरोधी पक्ष नेते नसतीलही पण त्यांच्या कार्यालयात ठाण मांडून बसणार्या या अशा नालायक हरामखोर पत्रकारांसारखी किंवा ठक्कर बाप्पा सारखी मित्र मंडळी त्यांनी तपासून बघितली पाहिजे, धनंजयजी, ठक्कर, बाप्पा नेमके कसे, मी नक्की सापुरवा सांगून मोकळा होईल, ठक्कर बाप्पा अमुक एखाद्या सरकारी किंवा मंत्री कार्यालयात स्वतः धनंजय मुंडे आले या थाटात वावरतात का, तपासून घेणे गरजेचे आहे अन्यथा धनंजय मुंडे तुमचे उत्तम चाललेले राजकीय करिअर अडचणीत येऊ शकते. अर्थात या विषयावर मला येथे सध्या तरी अधिक तोंड उघडायचे नाही. धनंजय मुंडे यांचा नेतृत्वात ' पंकजा मुंडे ' होऊ नये, ते अतिशय तडफदार आहेत, काका गोपीनाथ सारखे ते दिलदार आहेत, आक्रमक आहेत, त्यांची भाषण करण्याची उत्तम स्टाईल आहे, ते सभागृहात किंवा सभागृहाबाहेर अतिशय आक्रमक नेते म्हणून अगदी तरुण वयात राज्यातल्या सर्वांना, सर्वसामान्यांना मान्य आहेत. ते आकर्षक व्यक्तिमत्व असलेले धाडसी नेते आहेत, थोडक्यात उत्तम नेता होण्यासाठी जे जे म्हणून आवश्यक असते ते सारे त्यांच्यात आहे त्यामुळेच त्यांनी सावध असावे, सावध राहून यापुढे पुढे पुढे जावे. भामटा भ्रष्ट माणूस आपला किंवा आपल्या कार्यालयाचा गैरफायदा घेणार नाही याची त्यांनी डोळ्यात तेल घालून काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा उद्या अमुक एखाद्याला वाचविण्यासाठी तुम्ही किती घेतले हि आकडेवारी सर्वप्रथम त्या शरद पवारांच्या कानावर जाईल आणि तुमचा मग भुजबळ व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. लोकांना बोलायला काय लागते, ते राजकीय असूयेतून बोलतच असतात कि तुम्ही अधिकारी ' विश्वास ' सारख्या अधिकाऱ्यांकडून सभागृहात अविश्वास येऊ नये म्हणून पैसे घेतले, असे कदाचित घडत देखील नसते पण सभोवतालची तुमच्या नावाने दुकानदारी करणारी माणसेच नको ते सांगून मोकळे होत असतात...

अत्यंत अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे मिस्टर धनंजय मुंडे आज ना उद्या या राज्याचे 
मुख्यमंत्रीपद नक्की तुमच्या वाट्याला येणार आहे मग आपण अडचणीत येणार नाही याची 
तुम्ही मनापासून काळजी घ्या हि शपथ या लिखाणातून मी तुम्हाला देतो आहे, व्यक्तिगत 
मला तुम्ही अतिशय आवडलेले नेते आहेत, जीव तुटतो म्हणून सांगितले, प्रत्येकालाच 
आम्ही हे असे सांगत नसतो. नेमके काय करायचे, कसे वागायचे तुमचे तुम्ही ठरवा...


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment