Tuesday, 27 March 2018

थर्डग्रेड घरत परत परत २ : पत्रकार हेमंत जोशी


थर्डग्रेड घरत परत परत २ : पत्रकार हेमंत जोशी 
वेश्या हि वेश्याच असते म्हणजे दिवसाकाठी एखादेच ग्राहक जाळ्यात ओढणारीही वेश्या असते आणि रात्रीच्या एकांतात कडेला उभे राहून ग्राहकांना हाक देणारीही वेश्याच असते, कल्याण डोंबिवली महापालिकेवरून मला हे असले थर्डग्रेड उदाहरण आठवले म्हणजे या महापालिकेतील बदनाम आणि बदमाश अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि त्याला हाकलून द्या, निलंबित करा म्हणणारे दोघेही तसे अप्पलपोटेच, घरत यांच्या विरोधातले देश्प्रेमापोटी पेटून उठलेले असे अजिबात नाही, साऱ्यांचे भांडण 
तसे वाटणीवरूनच पण त्यातल्या त्यात घरत यांचे विरोधक बरे म्हणजे कॉल गर्ल व रांड, हा जो फरक असतो, म्हणून माझा लढा घरत यांच्याविरुद्ध अधिक तीव्र आहे....

आश्चर्य वाटते किंवा वाटले ते कल्याण डोंबिवली महापालिकेत किंवा इतर अनेक सरकारी कार्यालयात, महापालिकांमध्ये माहितीच्या अधिकारातून म्हणाल तर दरारा किंवा म्हणाला तर दहशत निर्माण करणारे कौस्तुभ गोखले थेट मुख्यमंत्री किंवा सचिव, नगरविकास खाते यांच्याकडे, घरत यांना वाचविण्यासाठी त्या वादग्रस्त राज्यमंत्री रवी चव्हाण यास संगे घेऊन नेऊन जीव तोडून जो प्रयत्न करताहेत, वाईट त्याचे वाटले. तसे कौस्तुभ आणि मी अतिशय जुने मित्र, मूळ आम्ही दोघेही विदर्भातले आणि डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणित विद्यार्थी चळवळीत काम करणारे, पण एका छान सकाळी आमच्या लक्षात आले कि डॉ. जिचकार कार्यकर्त्यांना वापरून घेण्यात तेवढे चतुर, मग आम्ही दोघांनीही काढता पाय घेतला, मी पूर्णवेळ पत्रकारितेत रमलो आणि कौस्तुभ सासूच्या गावी सासूच्या घरी डोंबिवलीला राहायला गेला तो कायमचा, त्याने तेथे काहीही केले नाही पण तो श्रीमंत झालाय, कानावर पडत होते.मग अशी शंका मनाला चाटून जाते कि संजय घरत यांच्यासारखे भ्रष्ट अधिकारी हाताशी धरून कौस्तुभ गोखले श्रीमंत होत गेला कि काय पण आजही मनाला वाटते, माहितीच्या अधिकारातले एक फेमस नाव कौस्तुभ गोखले हे असं वाईट धंदे करून श्रीमंत झाला असेल, वाटत नाही. एक मात्र नक्की तो अगदी उघड संजय घरात याची बाजू घेऊन लढतोय, घरत निलंबित होणार नाही किंवा त्याची बदलीही होऊ नये म्हणून आमचा कौस्तुभ म्हणे जिवाच्या आकांताने प्रसंगी नगर विकास खात्याच्या सचिवांशी देखील पंगा घेतोय, आणि हे जे कानावर पडते ते सत्य असेल तर नक्की डोळ्यात अश्रू येतील आणि मन मनाशी म्हणेल, अरे, कौस्तुभ देखील त्याच वळणावर, जे अनेक, इतर माहितीचा अधिकार वापरून फायदे उकळून घेताहेत तसा, निदान कौस्तुभच्या बाबतीत तरी हे खरे ठरू नये, अफवा ठरावी...

इकडे ज्या पनवेल महापालिकेत येण्यासाठी संजय घरत धडपडतोय किंवा राज्यमंत्री आणि रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री रवी चव्हाण घरत यास तेथे बसविण्यासाठी सतत प्रयत्न करतोय, तेथे नेमके काय सुरु आहे हे देखील विस्ताराने सांगणे गरजेचे वाटते. मी त्या दोघांनाही बऱ्यापैकी जवळून बघतो किंवा ओळखतो. ते दोघेही शासनात काम करणारे प्रशासकीय अधिकारी त्यातले एक डॉ सुधाकर शिंदे, हा लेख लिहीपर्यंत पनवेल महापालिकेचे आयुक्त म्हणून काम करणारे आणि दुसऱ्या पल्लवी प्रवीण दराडे ज्या सध्या आयुक्त म्हणूनच अन्न आणि औषधे विभागात व्यस्त आहेत. हे दोघेही तसे आयआरएस आणि मुंबईतल्या आयकर विभागातले पैकी पल्लवी यांना काही कौटुंबिक अडचणी असल्याने त्या राज्याच्या सेवेत थेट प्रशासकीय अधिकारी म्हणून आल्या आणि सुधाकर शिंदे हे देखील. मला आठवते, ते जेव्हा आयुक्त म्हणून मुंबईतल्या आयकर विभागात होते त्यांचा तेथे प्रामाणिक आणि धडाकेबाज आयुक्त म्हणून मोठा दबदबा होता पण त्यांचे बंधू श्रीयुत राम शिंदे फडणवीस मंत्री मंडळात मंत्री झाले आणि सुधाकर यांनीही या राज्याच्या प्रेमापोटी नको ते केले, येथे या राज्याचे प्रशाकीय अधिकारी म्हणून ते केंद्रातून राज्यात आले....

पुढे फडणवीसांनी या दूरदृष्टी असलेल्या धडाकेबाज, देशभक्त डॉ. शिंदे यांना पनवेल महापालिकेत थेट मंत्रालयातून आयुक्त म्हणून पाठविले आणि बदनाम ठाकूर पिता पुत्राची डोकेदुखी वाढली. आपल्याच पक्षाचे मंत्री राम शिंदे त्यांचे सख्खे बंधू सुधाकर शिंदे यांना ज्या पद्धतीने राम ठाकूर आणि त्यांचे आमदार पुत्र प्रशांत ठाकूर या दोघांनी अलीकडे ज्या वाईट आणि विचित्र पद्धतीने शिंदे यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला, किंवा भाजपाच्याच नगरसेवकांनी ठाकूर बाप बेट्याच्या नेतेउत्वाखाली हे वाईट कृत्य केले, कसे हे हलकट बाप बेटे म्हणून मनस्वी राग आला, एका प्रभावी मंत्र्याच्या भावाला जर हे ठाकूर बाप बेटे असे त्रस्त करून सोडतात, उद्या समजा तुकाराम मुंडे यांच्यासारखा एखादा ' अकेला ' पनवेल महापालिकेत आयुक्त म्हणून आला तर हे ठाकूर तर त्याची रवानगी थेट वेड्यांच्या इस्पितळात करतील, शी शी ....

स्वाभाविक आहे, राज्यमंत्री मग तो रवी चव्हाण असो अथवा हे असे ठाकूर छाप भाजपातले त्या नरेंद्र मेहता यांच्यासारखे वादग्रस्त नेते, व्हेस्टेड इंटरेस्ट मार खायला लागलेत कि त्यांना पक्ष किंवा पक्ष शिस्त अजिबात महत्वाची नसते, त्यांना अशावेळी जवळ करायचे असते रस्त्याच्या कडेला धंदा घेणाऱ्या वेश्येसारखी वृत्ती असणारे संजय घरत यांच्यासारखे भ्रष्ट नीतिभ्रष्ट अधिकाऱ्यांची पण सलाम त्या सुधाकर शिंदे यांच्या धाडसी वृत्तीला, असे अधिकारी खरोखरी या राज्याची गरज आहे कारण राज्यद्रोही नेते साऱ्याच राजकीय पक्षांमध्ये दडलेले आहेत, असतात, त्यांना वठणीवर आणण्याचे काम हे असे प्रशासनातले शिंदे झक्कास करून सोडतात.बघूया, कणखर मुख्यमंत्री कोणती भूमिका घेतात ते त्या दोघांच्याही बाबतीत म्हणजे थर्डग्रेड संजय घरत आणि ग्रेड वन सुधाकर शिंदे यांच्या बाबतीत...
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment