Tuesday, 27 March 2018

थर्डग्रेड घरत परत परत २ : पत्रकार हेमंत जोशी


थर्डग्रेड घरत परत परत २ : पत्रकार हेमंत जोशी 
वेश्या हि वेश्याच असते म्हणजे दिवसाकाठी एखादेच ग्राहक जाळ्यात ओढणारीही वेश्या असते आणि रात्रीच्या एकांतात कडेला उभे राहून ग्राहकांना हाक देणारीही वेश्याच असते, कल्याण डोंबिवली महापालिकेवरून मला हे असले थर्डग्रेड उदाहरण आठवले म्हणजे या महापालिकेतील बदनाम आणि बदमाश अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि त्याला हाकलून द्या, निलंबित करा म्हणणारे दोघेही तसे अप्पलपोटेच, घरत यांच्या विरोधातले देश्प्रेमापोटी पेटून उठलेले असे अजिबात नाही, साऱ्यांचे भांडण 
तसे वाटणीवरूनच पण त्यातल्या त्यात घरत यांचे विरोधक बरे म्हणजे कॉल गर्ल व रांड, हा जो फरक असतो, म्हणून माझा लढा घरत यांच्याविरुद्ध अधिक तीव्र आहे....

आश्चर्य वाटते किंवा वाटले ते कल्याण डोंबिवली महापालिकेत किंवा इतर अनेक सरकारी कार्यालयात, महापालिकांमध्ये माहितीच्या अधिकारातून म्हणाल तर दरारा किंवा म्हणाला तर दहशत निर्माण करणारे कौस्तुभ गोखले थेट मुख्यमंत्री किंवा सचिव, नगरविकास खाते यांच्याकडे, घरत यांना वाचविण्यासाठी त्या वादग्रस्त राज्यमंत्री रवी चव्हाण यास संगे घेऊन नेऊन जीव तोडून जो प्रयत्न करताहेत, वाईट त्याचे वाटले. तसे कौस्तुभ आणि मी अतिशय जुने मित्र, मूळ आम्ही दोघेही विदर्भातले आणि डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणित विद्यार्थी चळवळीत काम करणारे, पण एका छान सकाळी आमच्या लक्षात आले कि डॉ. जिचकार कार्यकर्त्यांना वापरून घेण्यात तेवढे चतुर, मग आम्ही दोघांनीही काढता पाय घेतला, मी पूर्णवेळ पत्रकारितेत रमलो आणि कौस्तुभ सासूच्या गावी सासूच्या घरी डोंबिवलीला राहायला गेला तो कायमचा, त्याने तेथे काहीही केले नाही पण तो श्रीमंत झालाय, कानावर पडत होते.मग अशी शंका मनाला चाटून जाते कि संजय घरत यांच्यासारखे भ्रष्ट अधिकारी हाताशी धरून कौस्तुभ गोखले श्रीमंत होत गेला कि काय पण आजही मनाला वाटते, माहितीच्या अधिकारातले एक फेमस नाव कौस्तुभ गोखले हे असं वाईट धंदे करून श्रीमंत झाला असेल, वाटत नाही. एक मात्र नक्की तो अगदी उघड संजय घरात याची बाजू घेऊन लढतोय, घरत निलंबित होणार नाही किंवा त्याची बदलीही होऊ नये म्हणून आमचा कौस्तुभ म्हणे जिवाच्या आकांताने प्रसंगी नगर विकास खात्याच्या सचिवांशी देखील पंगा घेतोय, आणि हे जे कानावर पडते ते सत्य असेल तर नक्की डोळ्यात अश्रू येतील आणि मन मनाशी म्हणेल, अरे, कौस्तुभ देखील त्याच वळणावर, जे अनेक, इतर माहितीचा अधिकार वापरून फायदे उकळून घेताहेत तसा, निदान कौस्तुभच्या बाबतीत तरी हे खरे ठरू नये, अफवा ठरावी...

इकडे ज्या पनवेल महापालिकेत येण्यासाठी संजय घरत धडपडतोय किंवा राज्यमंत्री आणि रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री रवी चव्हाण घरत यास तेथे बसविण्यासाठी सतत प्रयत्न करतोय, तेथे नेमके काय सुरु आहे हे देखील विस्ताराने सांगणे गरजेचे वाटते. मी त्या दोघांनाही बऱ्यापैकी जवळून बघतो किंवा ओळखतो. ते दोघेही शासनात काम करणारे प्रशासकीय अधिकारी त्यातले एक डॉ सुधाकर शिंदे, हा लेख लिहीपर्यंत पनवेल महापालिकेचे आयुक्त म्हणून काम करणारे आणि दुसऱ्या पल्लवी प्रवीण दराडे ज्या सध्या आयुक्त म्हणूनच अन्न आणि औषधे विभागात व्यस्त आहेत. हे दोघेही तसे आयआरएस आणि मुंबईतल्या आयकर विभागातले पैकी पल्लवी यांना काही कौटुंबिक अडचणी असल्याने त्या राज्याच्या सेवेत थेट प्रशासकीय अधिकारी म्हणून आल्या आणि सुधाकर शिंदे हे देखील. मला आठवते, ते जेव्हा आयुक्त म्हणून मुंबईतल्या आयकर विभागात होते त्यांचा तेथे प्रामाणिक आणि धडाकेबाज आयुक्त म्हणून मोठा दबदबा होता पण त्यांचे बंधू श्रीयुत राम शिंदे फडणवीस मंत्री मंडळात मंत्री झाले आणि सुधाकर यांनीही या राज्याच्या प्रेमापोटी नको ते केले, येथे या राज्याचे प्रशाकीय अधिकारी म्हणून ते केंद्रातून राज्यात आले....

पुढे फडणवीसांनी या दूरदृष्टी असलेल्या धडाकेबाज, देशभक्त डॉ. शिंदे यांना पनवेल महापालिकेत थेट मंत्रालयातून आयुक्त म्हणून पाठविले आणि बदनाम ठाकूर पिता पुत्राची डोकेदुखी वाढली. आपल्याच पक्षाचे मंत्री राम शिंदे त्यांचे सख्खे बंधू सुधाकर शिंदे यांना ज्या पद्धतीने राम ठाकूर आणि त्यांचे आमदार पुत्र प्रशांत ठाकूर या दोघांनी अलीकडे ज्या वाईट आणि विचित्र पद्धतीने शिंदे यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला, किंवा भाजपाच्याच नगरसेवकांनी ठाकूर बाप बेट्याच्या नेतेउत्वाखाली हे वाईट कृत्य केले, कसे हे हलकट बाप बेटे म्हणून मनस्वी राग आला, एका प्रभावी मंत्र्याच्या भावाला जर हे ठाकूर बाप बेटे असे त्रस्त करून सोडतात, उद्या समजा तुकाराम मुंडे यांच्यासारखा एखादा ' अकेला ' पनवेल महापालिकेत आयुक्त म्हणून आला तर हे ठाकूर तर त्याची रवानगी थेट वेड्यांच्या इस्पितळात करतील, शी शी ....

स्वाभाविक आहे, राज्यमंत्री मग तो रवी चव्हाण असो अथवा हे असे ठाकूर छाप भाजपातले त्या नरेंद्र मेहता यांच्यासारखे वादग्रस्त नेते, व्हेस्टेड इंटरेस्ट मार खायला लागलेत कि त्यांना पक्ष किंवा पक्ष शिस्त अजिबात महत्वाची नसते, त्यांना अशावेळी जवळ करायचे असते रस्त्याच्या कडेला धंदा घेणाऱ्या वेश्येसारखी वृत्ती असणारे संजय घरत यांच्यासारखे भ्रष्ट नीतिभ्रष्ट अधिकाऱ्यांची पण सलाम त्या सुधाकर शिंदे यांच्या धाडसी वृत्तीला, असे अधिकारी खरोखरी या राज्याची गरज आहे कारण राज्यद्रोही नेते साऱ्याच राजकीय पक्षांमध्ये दडलेले आहेत, असतात, त्यांना वठणीवर आणण्याचे काम हे असे प्रशासनातले शिंदे झक्कास करून सोडतात.बघूया, कणखर मुख्यमंत्री कोणती भूमिका घेतात ते त्या दोघांच्याही बाबतीत म्हणजे थर्डग्रेड संजय घरत आणि ग्रेड वन सुधाकर शिंदे यांच्या बाबतीत...
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Monday, 26 March 2018

उंदीर पुराण नेमके १ : पत्रकार हेमंत जोशी


उंदीर पुराण नेमके १ : पत्रकार हेमंत जोशी 
उंदीर प्रकरणातील नेमके सत्य येथे मांडायचे आहे, बारकाईने वाचा, बातमी मागची नेमकी बातमी काय आहे, ती जाणून घ्या आणि त्यातले सत्य कृपया हा लेख हे लिखाण व्हायरल करून लोकांपर्यंत पोहोचवावे. खरोखरी राज्यातल्या या शिवसेना भाजपा युतीची अवस्था क्रिकेटपटू शमी सारखी झालेली आहे, घरातल्यांनीच या सरकारची अब्रू वेशीवर टांगून युतीची पार द्रौपदी करून सोडलेली आहे. एक क्षुल्लक प्रकरण त्या उंदीर मारण्याचे त्यात भाजपाच्या या राज्यातल्या सर्वश्रेष्ठ नेत्यानेच म्हणजे एकनाथ खडसे यांनी अकारण बादरायण संबंध लावून थेट मुख्यमंत्र्यांचे शरसंधान केले त्यांनी नेमके त्यात काय साधले, हा खरा सवाल आहे. तुम्हाला किंवा खडसे यांना काय वाटते हे असे ते लागल्याने त्यांचे आयुष्य अस्ताला जात असतांना, त्यांचे किंवा त्यांच्या कुटुंब सदस्यांचे फार मोठे भले होणार आहे, वाट्टेल ते राजकारणात बोलले कि अमुक एखादा नेता मोठा होतो, हा एकनाथ खडसे यांचा मोठा गैरसमज आहे, विनाकारण बोलत सुटले कि आपले राजकीय आयुष्य तर अस्ताला जातेच पण पुढली पिढी देखील राजकारणातून बाजूला फेकल्या जाते हे एका माजी मुख्यमंत्र्यांचे ज्वलंत उदाहरण तुम्हा आम्हा सर्वांसमोर आहे आणि असे कितीतरी त्या शालिनीताई पाटील, सुरेशदादा जैन यांच्यासारखे, जो कोणी नेता खडसे यांचा बोलविता धनी असलाच तर त्याचे काम खडसे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फत्ते झाल्यानंतर तो किंवा त्याचा पक्ष कधीही खडसे यांच्या पाठीशी उभे राहणे शक्य नाही, अति बोलणाऱ्या, घालून पाडून सतत बोलणाऱ्या नेत्यांचे घटस्फोट घेतलेल्या तरुण स्त्रीसारखे होते, तिचे बान्धखोर वागणे, सर्वांना वेठीस धरणे, तिचे दुसरे लग्न जमणे कठीण होऊन बसते कारण ज्याला त्याला वाटते, काल परवा हिने आधीच्या कुटुंबाला नामोहरम केले उद्या हे बालंट आपल्यावरही येऊ शकते मग तिला एकटीलाच उर्वरित आयुष्यसि कुढत काढावे लागते, खडसे असे तुमचे त्या घटस्फोट घेतलेल्या तरुण स्त्रीसारखे होऊ नये असे अगदी मनापासून वाटते...

एकनाथ खडसे इज ऍन असेट टू बीजेपी, ते खान्देशातले खरोखरी अतिशय मोठे लोकप्रिय, लोकमान्य नेते आहेत नेतृत्व आहे पण त्यांच्या अशा सततच्या आक्रस्ताळ्या स्वभावामुळे ते संघ आणि भाजपा परिवारातून बाजूला सारल्यासारखे झालेले आहेत, फडणवीसांनी त्यांना आता जवळ करणे तर फार दूरचे पण उद्या, आमचाही फडणवीस होऊ शकतो, या भीतीने त्यांना दानवे किंवा गडकरी यांच्यासारख्या नेत्यांनी देखील दूर केल्यास फारसे आश्चर्य वाटण्याचे कारण नसेल. उंदीर मारणे हा विषय नेमका त्या सार्वजनिक बांधकाम खात्याशी म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या खात्याशी संबंधित आणि हे खडसे यांना शंभर टक्के माहित असतांना त्यांनी फडणवीस यांची विनाकारण, बादरायण संबंध लावून बदनामी केली त्यावर नेहमीप्रमाणे 'सामनातुन' श्रीमान उद्धव ठाकरे यांनी अग्रलेख लिहून विनाकारण खडसे यांनी जखमी केलेल्या फडणवीस यांच्या त्या जखमांवर पोतेभर मीठ चोळले. ज्या घोटाळ्याशी काडीचाही मुख्यमंत्र्यांचा संबंध नाही त्या घोटाळ्याचा संबंध जेव्हा सामनाच्या अग्रलेखातून थेट चारा घोटाळ्याशी जोडल्या जातो, म्हणजे देवेंद्र फडणवीस हे जणू या राज्याचे 'लालूप्रसाद यादव' असे अप्रत्यक्ष तेही अग्रलेखातून लिहिल्या जाते त्यावर हसावे कि रडावे...

ज्यांची राजकीय कारकीर्द जडणघडण ज्या शिवसेनेतून झाली त्या विधान परिषद सदस्य श्रीमान प्रवीण दरेकर या अनुभवी नेत्याला नेमके विचारावे कि बोगस मजूर संस्थेचे नेमके जनक कोण आहे, ते त्यावर हुकूमत असल्यासारखे सांगतील, त्यातून ते स्वतःच कदाचित अडचणीत देखील येतील. अर्थात हे विचारण्याची, शोधण्याची जबाबदारी तशी त्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्याची म्हणजे चंद्रकांत पाटील यांची. अलीकडे मी अगदी जीव तोडून चंद्रकांत दादांना म्हणालो, ज्या खात्यामुळे नितीन गडकरी आधी या राज्यात नंतर संपूर्ण देशात तदनंतर अख्या जगात गाजले, गाजताहेत ते गडकरी तुम्ही नक्की झाले असते, दुर्दैवाने ते अजिबात घडले नाही आणि त्यात त्यांची मोठी चूक आहे, असे खडसे यांच्यासारखी जीभ टाळूला लावून मी मोकळा होणार नाही....

जो उठतो तो अलीकडे चंद्रकांत पाटील आणि त्यांचे खाजगी सचिव श्रीनिवास जाधव यांच्यावर तोंडसुख घेऊन मोकळा होतो. शिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर तर कागदपत्रे फडकावीत म्हणाले होते, दादांचे सारे धंदे उघड करायला यापुढे मी मोकळा आहे पण बघता बघता त्यांची भीमगर्जना हवेत विरली आणि बजेट अधिवेशनानिमित्ते भलतेच दृश्य दिसले, क्षीरसागर यांचा चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयातील वावर मनाला सुखावून गेला, त्यांचे नेमके त्या दादांशी कुठे जमले आणि का बिनसले होते हा तसा अभ्यास करण्याचा विषय, मातोश्रीवरून त्यास्तव आदेश जाणे गरजेचे. एकाचवेळी दादा चंद्रकांत पाटलांकडे राजकीय समनव्यय साधण्याची मोठी जबाबदारी अगदी सुरुवातीलाच भाजपा आणि मुख्यमंत्र्यांतर्फे त्यांच्यावर टाकण्यात आली वरून त्यांच्याकडे महसूल आणि सार्वजनाईक बांधकाम हि दोन्ही टेक्निकली अतिशय कठीण असलेली खाती देण्यात आली, हि कसरत दुर्दैवाने चंद्रकांत पाटलांना नेमकी जिंकता आली नाही, आणि मंत्रिमंडळात फेरबदल देखील झाले नाहीत अन्यथा चंद्रकांत पाटील आपल्याकडले सार्वजनिक बांधकाम खाते सोडणार होते, दुर्दैवाने कामाच्या जबाबदारीतून म्हणा किंवा तणावातून म्हणा, आयुष्यातल्या सुवर्णसंधीचे सोने त्यांना करता आले नाही, वास्तविक दादांचे अख्खे कार्यालय तसे बऱ्यापैकी बुद्धिमान पण ते सारे कमी पडले आणि पाटील या राज्याचे नितीन गडकरी झाले नाही, उरलेल्या वर्षभरात ते शक्य होईल असे वाटत नाही पण चंद्रकांत पाटलांकडे किंवा त्यांच्या कार्यलयात, त्यांच्या खाजगी सचिवांकडे काम घेऊन जाणारे लोकप्रतिनिधी नाराज झाले असे फारसे घडले नसावे, अर्थात महसूल आणि सार्वजनिक बांधकाम तसे दोन्ही खाते मलईदार, त्यामुळे अनेकांनी दबाव टाकून स्वतःचे फार भले करून घेतले मला ते अतिशय व्यापक माहित आहे. येथे महत्वाचे असे कि उंदीर मारण्याचा विषय तसा सार्वजनिक बांधकाम खात्यातील समस्त अभियंत्यांचा, पण मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम खाते आणि मुंबई पुणे नाशिक ठाणे येथील समस्त अभियंत्यांनी अक्षरश: चंद्रकांत दादा पाटलांना बेवकूफ बनवून या खात्याची वाट लावली. ज्या बागुल आडनावाच्या उपअभियंत्याच्या अखत्यारीत हे उंदीर प्रकरण घडले हे स्वतःला विनाकारण सज्जन म्हणवूनघेणारे उपअभियंते हे महाशय गेले २५ वर्षे सतत क्रीम पोस्टवर ठाण मांडून बसलेले आहेत त्यांनी साईड पोस्टिंग कधी बघितलेच नाही त्या बेवड्या घाडगे सारखे...
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Sunday, 25 March 2018

संजय घरत आला परत १ : पत्रकार हेमंत जोशी


संजय घरत आला परत १ : पत्रकार हेमंत जोशी 
अलीकडे एक सज्जन प्रशासकीय अधिकारी मला म्हणाले, हे सरकार खरोखरी बावळटांचे वाटले, निदान या सरकारातील तमाम सदस्यांनी आधीच्या आघाडी सरकारात पुण्यातले भोसले किंवा मुंबईतले जाधव यांच्यासारखे नेहमीचे जे नीच हलकट देशद्रोही राज्य लुटणारे डाकुछाप दलाल आहेत त्यांच्याऐवजी नव्या दमाचे तरी दलाल घडवायला हवे होते पण तसे अजिबात घडले नाही, आजही मंत्रालय असो कि विधान भवन, तेच ठरलेले नेहमीचे नागपुरातल्या मुंडे यांच्यासारखे हरामखोर थर्डग्रेड दलाल जेथे तेथे नजरेस पडतात, अत्र तंत्र सर्वत्र नेहमीच्याच गरिबांचा गु खाणाऱ्या दलालांचे फावतांना दिसते आहे म्हणजे गणपतराव देशमुख यांच्यासारखे आदर्श आमदार अमुक एखाद्या मंत्र्यांच्या केबिनबाहेर ताटकळत बसलेले असतांना झंवर यांच्यासारखे दलाल मात्र आतल्या केबिनमध्ये म्हणजे अँटी-चेंबर मध्ये मंत्र्याच्या मांडीला मांडी लावून हास्यकल्लोळात बुडालेले असतात, खरे आहे ते, सरकार मग ते कोणतेही असो, दलालांची पाचही बोटे तुपात असतात...

हे लिखाण तुमच्या हाती पडेपर्यंत कदाचित कल्याण डोंबिवली महापालिकेचे वादग्रस्त भ्रष्ट अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्यावर ओढवलेले संकट त्यांच्या बदलीवर निभावले असेल म्हणजे त्यांनी येथे लूट लूट लुटले आता तेच करायला ते दुसरीकडे फारतर गेले असतील. संजय घरत यांच्या या संकटात मदतीला मनापासून धावणारे राज्यमंत्री रवी चव्हाण व माहितीच्या अधिकारातील एक सनसनाटी नाव कौस्तुभ गोखले, घरटांच्या मदतीला अगदी उघड धावले म्हणून घरत यांचे निव्वळ बदलीवर निभावले, निलंबन झाले नाही असे विरोधकांचे म्हणणे आहे....

माहितीच्या अधिकाराचा अतिशय सखोल अभ्यास असणारे, विशेषतः उभ्या राज्यात नगरविकास आणि महसूल खात्यात जरब दरारा धाक असणारे डोंबिवलीतले कौस्तुभ गोखले तसे फाटके व साधे व्यक्तिमत्व आहे, तुमचा त्यांच्यासमोर घरत यांच्याबाबतीत टिकाव लागणे अशक्य, मी घरत यांच्या विरोधकांना म्हणताच, तुम्हीच त्या गोखले यांचे कौतुक करावे त्यांना फाटके फारतर गरीबही म्हणावे. स्वतःला माहितीच्या अधिकारातले हुकमी म्हणणारे गोखले यांच्या उत्पन्नाचे सुरुवातीपासूनच साधन कोणते, मग ते एवढ्या प्रचंड इमारतीत राहायला कसे, त्यावर मी म्हणालो, अहो, ती त्यांच्या सासूची वडिलोपार्जित इमारत आहे मला नाही वाटत त्यांची स्वतःची अशी,किंवा त्यांच्या कुटुंबाच्या नावे ठाणे किंवा पुणे जिल्ह्यात आणि मुंबईत कित्येक कोटी रुपयांची मालमत्ता असावी, तुम्ही तसे आरोप करण्यापूर्वी पुरावे द्या, तदनंतर मी स्वतः वाटल्यास त्यांच्या विरुद्ध आखाड्यात उतरेन पण उठसुठ कौस्तुभ लढताहेत म्हणून त्यांना उगाच बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका, पुराव्यांशिवाय कृपया काही बोलू नका. बघूया हि माणसे त्यांचे बोलणे खरे करणार आहेत किंवा नाहीत, कौस्तुभ गोखले आणि कुटुंबीय कित्येक कोटींचे मालक, त्यांच्या पश्चात बोलणारे त्यांचे विरोधक, पुराव्यांशिवाय काहीही बोलू नका, असे मी त्यांना ठणकावल्यानंतर वास्तवात नजीकच्या काळात काही सिद्ध करू शकतील वाटत नाही, सध्यातरी वाट पाहणे आपल्या तेवढे हातात आहे...

केवळ थर्डग्रेड संजय घरत यांच्या पाठीशी एक मित्र म्हणून कौस्तुभ गोखले उभे म्हणून तेही वाईट, म्हणणे नक्की चुकीचे. पुराव्यंशिवाय कोणावरही आरोप केले तर काय होते हे घरत यांनी दाखवून दिले आहे, गोखले यांचे आवडते वकील खन्ना यांनी स्थानिक नगरसेवक मंदार हळबे यांना घरत यांच्या बदनामीची नोटीस पाठविली असल्याचे मला कळले आहे. नेमके काय ते पुढल्या भागात मांडतो....

श्री मंदार श्रीकांत हळबे हे डोंबिवलीतल्या रामनानगर परिसरातल्या प्रभाग क्रमांक ६८ मधून निवडून आलेले अत्यंत धाडसी, बुद्धिमान नगरसेवक, तेच संजय घरत प्रकरणातले प्रमुख हिरो, न घाबरता ते सम्राट घरत यांच्याविरुद्ध लढा देताहेत, आता तर सारेच नगरसेवक मग ते कुठल्याही राजकीय पक्षाचे, घरत यांच्या अगदी उघड विरोधात एकवटले आहेत, हळबेंनी तर घरत यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे जमा करून त्यावर तोफ डागलेली आहे म्हणून शासनाने देखील वादग्रस्त रवी चव्हाण राज्यमंत्री असतानाही हळबे यांच्या तक्रारींची सिरियसली दाखल घेतलेली आहे. भाजपचे स्थानिक नेते, अध्यक्ष आणि आमदार नरेंद्र पवार हे देखील नेमके घरत यांच्या संदर्भात नेमके पुरावे घेऊन आले असतांना मला संबंधित सचिवांकडे मंत्रालयात भेटले, म्हणाल तर त्यांची अचानक गाठ पडली, तेही घरत विरोधी प्रवाहात दाखल झाल्याचे बघून समाधान वाटले, बघूया पुढे नेमके काय घडते ते....
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

सहन होत नाही सांगताही येत नाही : पत्रकार हेमंत जोशी

सहन होत नाही सांगताही येत नाही : पत्रकार हेमंत जोशी 

आता तो नेता मंत्री जिवंत नाही, नरकात नक्कीच सडत असेल, त्याला नेता किंवा आमदार म्हणून फार जवळून बघता आले नाही पण मंत्री असतांना त्याचे चाळे सतत दिसायचे कानावर पडायचे, त्याचे कर्तुत असे कि ज्या स्त्रीवर त्याची नजर पडली ती त्याला हवी असे, मग तो त्याची हवस भागेपर्यंत तिच्यासाठी वाट्टेल ते करीत असे, शरद पवारांचे मात्र अगदी उलट आहे, शरद पवार यांची आजही ज्या व्यक्तीवर नजर पडते त्या व्यक्तीचे कोणतीही अपेक्षा न ठेवता पवार भले करून सोडतात, तन मन धनाने त्यासाठी धावून जातात. मोठे करतात. ज्यांचे भले केले असे आपल्या राज्यात तर न मोजता येणारे पण देशातही संख्येने कितीतरी. ज्यांना आधी कवडीची किंमत नसते पवारांनी डोक्यावर हात ठेवला कि समोरची व्यक्ती मग ती कितीही सामान्य असली तरी असामान्य वाटायला लागते किंवा असामान्य होते. पण ज्याला शरद पवार आधी मोठे करतात त्यालाच ते एक दिवस असे काही कोपऱ्यात भिरकावून देतात कि समोरचा तेव्हापासून अक्षरश: कोलमडून पडतो किंवा स्वतःला कसेबसे सावरतो म्हणजे भारती लव्हेकर यांना अतिशय उदार अंतकरणाने मोठ्या मनाने मराठा नसतांनाही जर विनायक मेटे यांचे आशीर्वाद लाभले नसते तर आज त्या आमदार होणे फार दूरचे, चार घरी केवळ हळदी कुंकवाला जाणे तेवढे त्यांच्या हाती उरले असते, कारण याच लव्हेकर बाईंना पवारांनी थेट राष्ट्रवादी कार्यालयात स्थान देऊन त्यांना अगदी हाकेच्या आणून बसविले नंतर एक दिवस नेहमीच्या स्वभानुसार दूर केले. अर्थात असे या राज्यात भारती लव्हेकर, गिरीश गांधी, दत्ता मेघे, अजय पाटील, संजय खोडके, गजानन देसाई, दिवंगत गोविंदराव आदिक आणि गुरुनाथ कुलकर्णी असे कितीतरी...

एकदा गप्पांच्या ओघात मी गुरुनाथ कुलकर्णींना म्हणालोही, आतातरी पवारांनी तुमची दखल घ्यायला हवी, तुम्हाला मंत्री करायला हवे, कुलकर्णी म्हणाले, त्यांच्या मनात यावेळी मला मंत्री करायचे होतेही पण राज्यपालांनी नियुक्त केलेल्या विधान परिषद सदस्यांना मंत्री करता येत नाही, त्यामुळे मला मंत्री होणे अशक्य आहे, असे शरदराव म्हणाल्याने, मला नाही वाटत माझे मंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. पुढल्या आठच दिवसात राज्यपालांनीच नियुक्त केलेल्या फोउजिया खान यांना मंत्री म्हणून संधी देण्यात आली, पवारांनी त्यांच्या मराठवाड्यातल्या या मुस्लिम कार्यकर्तीला संधी दिली आणि कुलकर्णी यांची तब्बेत तदनंतर घसरत गेली...

सुदैवाने ज्यांना म्हणून काळाच्या ओघात शरदरावांनी आधी मोठे केले, आर्थिकदृष्ट्या किंवा राजकारणात उभे केले नंतर बाजूला केले त्या सर्वांशी माझे जेव्हा जेव्हा बोलणे होते, साऱ्यांचे म्हणणे सेम असते, पवारांनी पुन्हा एकदा आम्हाला जवळ घ्यावे, पूर्वीचे प्रेम द्यावे. पण पवारांचेही त्या कुमार केतकरांसारखेच असावे म्हणजे कुमार ज्या वाहिनी किंवा वृत्तपत्रातून बाहेर पडले त्यांनी पुन्हा कधी तेथे नोकरी करण्यासाठी पाऊल ठेवले नाही, पवारांनी व्यक्तीश: त्या सर्वांना बोलावून मोठ्या मायेने जवळ घ्यावे, ते सारे पवारांचे ऋण मानतात आजही त्या सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे, पवारांचा नेताम्हणून विरह, पवारांच्या सहावासातल्या कडू गोड आठवणी त्या सर्वांना अस्वस्थ करून सोडतात, पवारांनीच त्या साऱ्यांना समज गैरसमजुतीतून दूर केले आहे, स्वतः पवारांपासून दूर गेलेले तसे फार कमी आहेत...

मी राजकारणात अनेकदा अतिशय जवळून बघितले आहे कि आभाळाला टेकलेले जे नेते, त्यांना आधीच्या आयुष्यात ज्यांनी अगदी जवळ राहून साथ दिलेली असते त्या साथीदारांना जेव्हा केव्हा आभाळाला टेकल्यानंतर काही नेते दूर करतात, त्यांना भेटणे किंवा त्यांच्याशी बोलणे बंद करतात, संबंध तोडतात, त्या दूर केलेल्यांचे हाल प्रियकराने सोडून दिलेल्या प्रेयसीसारखे होतात, त्यांच्यातल्या अनेकांना आत्महत्याही करावीशी वाटते. पवारांनी सोडून दिलेले दूर केलेले नेते किंवा त्यांचे कार्यकर्ते यांचे तन आणि मन खरोखरी पुढली अनेक वर्षे नैराश्येने ग्रासलेले असते, हीच वस्तुस्थिती आहे...


पत्रकार हेमंत जोशी 

Sunday, 18 March 2018

व्यक्ती आणि वल्ली ४ : पत्रकार हेमंत जोशी


व्यक्ती आणि वल्ली ४ : पत्रकार हेमंत जोशी 

आपकी कसम मधले ते गाणे, जिंदकी के सफर में गुजर जाते है....हे गाणे स्वतः राजेश खन्नाने देखील डोक्यात ठेवले नाही, मग ते गाणे त्यालाही हुबेहूब लागू पडले, यशाच्या उच्च शिखरावर अनेक पोहोचतात, पण यशस्वी आणि किंवा त्यांचे कुटुंब सदस्य हे गाणे किंवा त्या गाण्यातले विचार डोक्यात न ठेवता हवा तेवढी त्यांच्या डोक्यात जाते आणि अशी यशस्वी माणसे, कुटुंबे एखादा प्रचंड वृक्ष धाडकन जमिनीवर जसा कोसळतो, तेच त्यांचे होते. यश पचविणे खरेच अतिशय अवघड काम आहे. केदार दिघे किंवा पूनम महाजनांसारख्या म्हणजे आनंद दिघे किंवा प्रमोद महाजनांच्या कुटुंबातून आलेल्या या सदस्यांना विचारा, आनंद किंवा प्रमोदजींच्या निधनानंतर त्यांनी मोठे केलेली किती माणसे त्यांच्या पश्चात यांच्या मदतीला धावली, मला तर असे वाटते प्रमोदजींनीं समजा लोढा आडनावाच्या एखाद्या मित्राला त्यांच्या हयातीत त्याचा व्यवसाय वृद्धिंन्गत व्हावा म्हणून करोडोंची रोख काढून त्याला मोठे केले असेल अशा लोढा छाप मंडळींनी प्रमोदजींच्या पश्चात त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत केले असतील....मला नाही वाटत, असे घडते, मग ते प्रमोदजी असोत दिघे असोत किंवा अन्य कोणीही...उपकारांची परतफेड न करणाऱ्यांपेक्षा जी यशस्वी कुटुंबे सत्ता पैसे आल्यानंतर त्या धुंदीत जगणे पसंत करतात, त्यांची अवस्था अनेकदा किंवा बहुतेकवेळा मोठी दयनीय होते. मला अलीकडे माहिती आणि जनसंपर्क खात्याला एका बड्या आणि स्वतः उत्तम लेखक असलेल्या अधिकाऱ्याचा अचानक फोन आला, म्हणाला भाऊ, तुम्हाला स्वतःला कधी ते लक्षातच आले नाही कि तुम्ही या राज्यातले पहिल्या पंचातले पत्रकार लेखक आहात ते, मी त्यावर म्हणालो, लक्षात येते, तरीही साधे वागणे मी पसंत करतो कारण गर्व माणसाला उध्वस्त करतो. कधी कधी माझ्या कुटुंब सदस्यांना विशेषतः विक्रांतला मी म्हणतोही, घरी किंवा दारी प्रत्येकाशी चांगले बोलावे आणि वागावे अन्यथा डोक्यात हवा गेली कि सारे संपायला काही क्षण पुरेसे असतात...

हे सारे येथे सांगण्याचे कारण सध्या विधान परिषद विरोधी पक्ष नेता म्हणून गाजवून सोडणारे तरुण तडफदार नेते श्रीमान धनंजय मुंडे, ते जेव्हा केव्हा भेटतात तेव्हा त्यांना अगदी तळमळीने सांगतो, धनंजय कृपया गाढवाच्या मागून आणि शरद पवारांच्या पुढून जाण्याचा विचार अजिबात मनात आणू नका, दुर्दैवाने त्यांनी माझे हे बेंबीच्या देठापासून सांगितलेले ध्यानात ठेवलेले नाही कारण शरद पवार म्हणे धनंजय मुंडे आठवले रे आठवले कि मनाशी खुद्कन हसायला लागले आहेत, त्या हसण्यामागे त्यांना कधीतरी छगन भुजबळ आठवतात आणि अलीकडे त्यांना दरदिवशी निदान काही क्षण तरी धनंजय मुंडे आठवू लागले आहेत, अमुक एखाद्या कार्यकर्त्याने किंवा त्यांच्या पक्षातल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्याने पुढे जाणे पवारांना आवडत नाही असे अजिबात नाही, पण अमुक एखाद्याचा अतिरेक त्यांचे त्यावर डोके भणकते, मग अशा मंडळींचा अजित पवार, दत्ता मेघे, डॉ. पदमसिंह पाटील किंवा छगन भुजबळ होतो, मला धनंजय मुंडे यांना मिळालेल्या यशाची आता मित्र म्हणून भीती वाटायला लागली आहे, आणि माझी भीती नेहमी बहुतेकवेळा खरी ठरते....

जे त्यांना सांगतो ते तसे अलीकडे त्यांच्या बाबतीत घडलेलंही, ते त्यातून भलेहि सहीसलामत बाहेर पडले असतील पण संशय दूर झाला असे अजिबात नाही उलट संशय त्यांच्याबाबतीत झपाट्याने वाढला आहे, वाढतो आहे. विधान परिषदेत प्रश्न न विचारण्यासाठी त्यांनी पैसे मागितले कि घेतले असा थेट आरोप अगदी अलीकडं त्यांच्यावर झाला त्यांनी तो पुसून काढलाही असेल म्हणजे त्यांच्यावर झालेल्या आरोपातून ते बाहेर आलेही असतील मात्र यापुढे त्यांचा राजकीय प्रवाहातला, प्रवासातला धोका अधिक वाढला आहे हे त्यांनी पक्के लक्षात घ्यावे, हे त्यांना अन्य कोणीही सांगणार नाही, मी येथे सांगतो आहे कारण एक उत्तम तरुण नेते म्हणून ते या राज्याची गरज आहे पण उद्या जर विधान भवनात तोडपाणी कारणारा नेता म्हणून त्यांचे नाव खराब झाले तर धनंजय यांचे पवारांच्या राज्यात मग काही खरे नाही. मी त्यांना मागेही म्हणालो होतो तुमच्याकडे जे चार दोन पत्रकार अगदी मुक्कामाला असल्यासारखे तळ ठोकून असतात, त्यांना ते स्थान देऊ नका, तोडपाणी करणे हेच त्यांचे सततचे काम आहे, अगदी अलीकडेच त्यातल्या एकाने कुठल्याशा मंत्र्याच्या खाजगी सचिवांशी मोठी तोडपाणी केली आहे, सध्या मला त्यावर काही उघड व्हावे अशी इच्छा नाही. धनंजय कदाचित तोडपाणी करणारे विरोधी पक्ष नेते नसतीलही पण त्यांच्या कार्यालयात ठाण मांडून बसणार्या या अशा नालायक हरामखोर पत्रकारांसारखी किंवा ठक्कर बाप्पा सारखी मित्र मंडळी त्यांनी तपासून बघितली पाहिजे, धनंजयजी, ठक्कर, बाप्पा नेमके कसे, मी नक्की सापुरवा सांगून मोकळा होईल, ठक्कर बाप्पा अमुक एखाद्या सरकारी किंवा मंत्री कार्यालयात स्वतः धनंजय मुंडे आले या थाटात वावरतात का, तपासून घेणे गरजेचे आहे अन्यथा धनंजय मुंडे तुमचे उत्तम चाललेले राजकीय करिअर अडचणीत येऊ शकते. अर्थात या विषयावर मला येथे सध्या तरी अधिक तोंड उघडायचे नाही. धनंजय मुंडे यांचा नेतृत्वात ' पंकजा मुंडे ' होऊ नये, ते अतिशय तडफदार आहेत, काका गोपीनाथ सारखे ते दिलदार आहेत, आक्रमक आहेत, त्यांची भाषण करण्याची उत्तम स्टाईल आहे, ते सभागृहात किंवा सभागृहाबाहेर अतिशय आक्रमक नेते म्हणून अगदी तरुण वयात राज्यातल्या सर्वांना, सर्वसामान्यांना मान्य आहेत. ते आकर्षक व्यक्तिमत्व असलेले धाडसी नेते आहेत, थोडक्यात उत्तम नेता होण्यासाठी जे जे म्हणून आवश्यक असते ते सारे त्यांच्यात आहे त्यामुळेच त्यांनी सावध असावे, सावध राहून यापुढे पुढे पुढे जावे. भामटा भ्रष्ट माणूस आपला किंवा आपल्या कार्यालयाचा गैरफायदा घेणार नाही याची त्यांनी डोळ्यात तेल घालून काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा उद्या अमुक एखाद्याला वाचविण्यासाठी तुम्ही किती घेतले हि आकडेवारी सर्वप्रथम त्या शरद पवारांच्या कानावर जाईल आणि तुमचा मग भुजबळ व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. लोकांना बोलायला काय लागते, ते राजकीय असूयेतून बोलतच असतात कि तुम्ही अधिकारी ' विश्वास ' सारख्या अधिकाऱ्यांकडून सभागृहात अविश्वास येऊ नये म्हणून पैसे घेतले, असे कदाचित घडत देखील नसते पण सभोवतालची तुमच्या नावाने दुकानदारी करणारी माणसेच नको ते सांगून मोकळे होत असतात...

अत्यंत अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे मिस्टर धनंजय मुंडे आज ना उद्या या राज्याचे 
मुख्यमंत्रीपद नक्की तुमच्या वाट्याला येणार आहे मग आपण अडचणीत येणार नाही याची 
तुम्ही मनापासून काळजी घ्या हि शपथ या लिखाणातून मी तुम्हाला देतो आहे, व्यक्तिगत 
मला तुम्ही अतिशय आवडलेले नेते आहेत, जीव तुटतो म्हणून सांगितले, प्रत्येकालाच 
आम्ही हे असे सांगत नसतो. नेमके काय करायचे, कसे वागायचे तुमचे तुम्ही ठरवा...


पत्रकार हेमंत जोशी 

व्यक्ती आणि वल्ली ३ : पत्रकार हेमंत जोशी


व्यक्ती आणि वल्ली ३ : पत्रकार हेमंत जोशी 

श्री श्री शरद पवार यांच्यातले मला सर्वाधिक काही आवडलेले असेल तर त्यांच्या नातेवाईकांची, प्रचंड मोठ्या संख्यने असलेल्या कुटुंब सदस्यांची एकी आणि पवारांचे जवळपास ५००-६०० संख्यने असलेले कुटुंब सदस्य मग ते जगात कुठेही वास्तव्याला असोत, हे सदस्य अमुक एखादा महत्वाचा निर्णय घेताना शेवटचा शब्द शरदरावांच्या असतो, ते म्हणतील तसे करायचे, त्यांचे सर्वांचे ठरलेले आहे. अलीकडे हे मी अर्थात लिहिलेलेही आहे. अनेकदा तर शरदरावांनाच विचारल्या जाते कि अमुक एका सदस्याने आता काय करायचे आहे मग शरदराव सांगतात, याने अमुक करायचे आहे, त्याने तमुक करायचे आहे पण शरदरावांच्या शब्दाला एवढा मान कि उद्या समजा शरदरावांनी सांगितले कि अमुक एखाद्याने केश कर्तनालय काढायचे आहे तर तो सदस्य दुसरे दिवसापासून तयारीला लागेल...

शरदरावांचे जे जे जवळचे नातेवाईक आहेत किंवा त्यांचे कुटुंब सदस्य आहेत ते जवळपास सारेच अतिशय सुखी आहेत कारण ते त्यांच्या घरातल्या या बुजुर्ग, अनुभवसंपन्न, दूरदृष्टी असलेल्या कप्तानाचे ऐकून मोकळे होतात, असेही नाही कि अमुक एखादा निर्णय एकतर्फी असतो, त्यातही हेल्दी डिस्कशन असते पण शेवटचाशब्द मात्र फक्त आणि फक्त शरदरावांच्या असतो, जो त्या सदस्याचे उर्वरित आयुष्य सुखमय करून जातो म्हणून जो तो आम्ही शारदरावांचे नातेवाईक आहोत, सांगण्यासाठी धडपडत असतो म्हणजे उद्या गिरीश बापटांनी देखील मी शरदरावांच्या मावसभाऊ आहे, सांगितले तर त्यात कोणालाहि आश्चर्य वाटणार नाही. असे त्या पुण्यात किंवा आसपासच्या परिसरात अनेक आहे कि जे सांगून मोकळे होतात कि आम्ही पवारांचे नातेवाईक आहोत किंवा मी शरद पवारांच्या वर्गात होतो, उद्या समजा प्रमोद हिंदुराव यांनी सांगितले कि मी आणि शरद पवार शाळेत असतांना एकाच बेंचवर बसत असू, कृपया हादरून जाण्याचे कारण नाही, यावरूनच तर मागे शरदराव केव्हातरी ते मुख्यमंत्री असतांना म्हणाले होते कि मला एकदा जाऊन बघायचे आहे कि माझ्या शाळेतला तो बेंच किती मोठा होता. काही माणसांची अंगकाठी त्यांचे वय कितीही वाढले तरी तशीच राहते त्या प्रमोद हिंदुराव यांच्यासारखी म्हणजे उद्या जर हिंदुराव म्हणाले कि मी आणि मराठीतली हेलन, अभिनेत्री मानसी नाईक एकाच शाळेत आणि एकाच वर्गात होतो तरीही त्यात फारसे आश्चर्य वाटणार नाही....

घ्या घरातली माणसे आभाळाला टेकतात, प्रचंड मोठी होतात त्या घरातली पुढली पिढी जर नालायक व्यसनी आणि त्या कर्तव्य पुरुषाचे ऐकणारी नसेल तर आकाशाला टेकलेल्या त्या कुटुंब प्रमुखाचे आणि त्या घराचे वसे फिरायला तदनंतर फारतर काही वर्षे लागतात, अशी घरे अशी कुटुंबे तदनंतर काही वर्षातच रस्त्यावर येतात, उघडा डोळे पहा नीट, तुमच्या ते अगदी सहज लक्षात येईल कि घरातल्या कटकटींमुळे, आपापसातल्या दररोजच्या भांडणांमुळे, त्या कर्तव्य पुरुषाचे न ऐकल्याने ते घर आणि तो पुरुष अस्ताला गेल्याचे....शून्यातून विश्व् निर्माण करणाऱ्या कुटुंब प्रमुखाच्या घरातले वातावरण जर खेळीमेळीचे आणि वयाचा विचार न करता एकमेकांचा आदर राखणारे नसेल तर अगदी शंभर टक्के अशा घराचे नजीकच्या काळात वाटोळे होते आणि वाटोळे झाल्यानंतर, कपाळावर हात मारून घेण्यात काहीही उपयोग नसतो. एकीचे बाळ हेच सर्वस्व असते हे नक्की आहे, पवारांचे यशस्वी घराणे हे त्यांच्यातल्या एकीचे यश आहे. आमच्याही घरात छोट्या मोठ्या कुरबुरी होतात पण सर्वांना सांगून ठेवले आहे जर तुम्ही बेताल वागायला सुरुवात केली, घरातले वातावरण बिघडविले तर मी मागला पुढला कोणताही विचार न करता हे घर सोडून मोकळा होईल, थोडक्यात, जर मी उद्या कोणालाही न सांगता आमचे घर सोडून अज्ञात स्थळी कायमचा निघून गेलो तर हे समजायला हरकत नाही कि मी लोकांना ज्ञान पाजळणारा, माझेच घर नीट सांभाळू शकलो नाही, अर्थात हे असे साऱ्याच कर्तव्य पुरुषांनी मनाशी ठरविले पाहिजे कि कुटुंब सदस्यांना तुम्ही आयुष्याचे बलिदान करून सर्वकाही उपलब्ध करून दिले असेल आणि ते जर माजल्यासारखे एकमेकांची डोकी फोडत असतील, एकमेकांच्या उरावर बसून एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत त्यांची मजल जात असेल तर हेच भले त्या घरातल्या प्रमुख माणसाने उठावे आणि अज्ञात स्थळी निघून जावे सारी मोह माया तेथेच सोडून....

आपल्या राज्यातली जी घरे आभाळाला टेकलेली आहे, असतात क्षेत्र मग ते कोणतेही असो, त्या घरातली शांती टिकविणे अत्यंत गरजेचे असते हे येथे पुन्हा सांगतो. मुख्यमंत्री फडणवीस किंवा अन्य कोणीही, बाहेरच्या जगात हि माणसे यशस्वी होत असतांना समजा घरातले नातेवाईकच, कुटुंब सदस्य त्यांना साथ देणे बाजूला पण दररोज नवीन काहीतरी भानगडी करून मोकळे होणार असतील तर अशी मोठी माणसे फार लवकर खचून जातात, कोलमडून पडतात, सभोवताली नीट बघितले तर ते लक्षात येते. वास्तविक अजित पवार २००४ मध्येच 
राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या काँग्रेसपेक्षा अधिक असल्याने मुख्यमंत्री झाले असते पण त्यावेळी दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच ते होऊ दिले नाही. आपल्याला वाईट वाटले कि पुतण्या काकांच्या पुढे जाईल अशी काकांना भीती वाटल्याने त्यांनी पुतण्याच्याही पायात पाय अडकवला आहे पण त्यावेळी शरदरावांनी घेतलेला निर्णयच योग्य होता हे कालांतराने लक्षात आले कारण त्यानंतरच्या काळात अजित पवार साधे मंत्री असतांना नको तसे वागले,जर ते मुख्यमंत्री झाले असते तर....उगाच नाही, शरदराव नेतृत्वात जगमान्य आहेत कारण त्यांना दूरदृष्टी आहे, जे आपल्या लक्षातही येत नाही ते त्यांना फार आधी जसेच्या तसे दिसत असते. अर्थात अजित पवारांच्याही हे सत्तेतून पायउतार झाल्यानंतर लक्षात आलेले आहे कि सुनील तटकरेंसारखे सभोवताली जमलेले सारे त्यांना पद्धतशीर वापरून घेतात, आर्थिक फायदा अजितदादांचाही झाला असेल पण जो सिंचन अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पडून आहे त्यात अजित पवार अडचणीत आल्याचे स्पष्ट दिसते, तटकरे सारख्या मंडळींनी स्वतःच्या अंगाला साधी धूळ देखील लावून घेतलेली नाही आणि अजितदादा तर चिखलाने माखले आहेत असे त्या अहवालात वारंवार वाटत राहते. अजितदादांच्या देखील ते लक्षात आल्याने यावेळचे सभागृहातले अजितदादा नेतृत्वात अधिक परिपकव झाल्याचे स्पष्ट चित्र दिसते आहे, यापुढे ते अधिक सावध राहून आणि पूर्वीच्या चुकांना फाटा देऊन, मीच खरा शिवाजींच्या घरातला पराक्रमी संभाजी, असे सिद्ध करून मोकळे होतील. यानंतरचे अजितदादा नेते म्हणून फार वेगळे असतील, आता मात्र ते नक्की खूप मोठे होतील प्रसंगी काकाच्याही पुन्हा एकवार पुढे निघून जातील.....
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Friday, 16 March 2018

व्यक्ती आणि वल्ली २ : पत्रकार हेमंत जोशी


व्यक्ती आणि वल्ली २ : पत्रकार हेमंत जोशी 
अलीकडेच वाचण्यात आलेल्या एक झक्कास किस्स्याने पुढल्या लिखाणाला 
सुरुवात करतो...पुण्यातल्या गोखले आजोबांचा शतकमहोत्सवी वाढदिवस होता, केक कापला, टाळ्या झाल्या, सगळे हॅपी झाले, पण आजोबांच्या शतकाचे गूढ नेमके काय, सगळ्यांना हवे होते, आपल्या पंचाण्णव वर्षांच्या पत्नीची अनुज्ञा घेऊन आजोबा सांगू लागले, माझ्या पंचविसाव्या वर्षी आमचे लग्न झाले. लग्नानंतर मी आणि बायको बाहेर पडलो, वेगळे राहू लागलो. आमचीही तुमच्यासारखीच भांडणे होऊ लागली. भांडणाला कंटाळून आम्ही एक निर्णय घेतला. ज्याची चूक असेल त्याने घराबाहेर पडायचे व पाच किमी चालून परत यायचे. तेव्हापासून मी दररोज पाच किमी चालत आलो आहे. माझ्या उत्तम तब्बेतीचे हेच रहस्य, गुपित आहे...अहो पण आजी देखील स्लिम निरोगी ठणठणीत आहे त्याचे काय? आजोबांना विचारल्यावर ते पुढे सांगू लागले, हे पहा, माझ्यावर विश्वास नसणे हेच तर आम्हा दोघांतल्या भांडणाचे कारण होते, कारण असे. मी पाच किमी जातो कि वाटेत हॉटेलात जातो हे पाहण्यासाठी हि सुद्धा माझ्या पाठोपाठ येत असे, त्यामुळे तिचीही तब्येत उत्तम आहे, ठणठणीत आहे...

सेना भाजपा युतीचे सरकार आणि गोखलेदाम्पत्य या दोघात खूपच साम्य आहे, दोघांचा विशेषतः उद्धव ठाकरे यांचा फडणवीस किंवा भाजपातल्या अख्ख्या मंत्र्यावर विश्वास नसल्याने उद्धव यांची ' गोखले आजी ' आणि देवेंद्र फडणवीस यांचा ' गोखले आजोबा ' झाला आहे, म्हणूनच दोघांचे उत्तम चालले आहे, हे गोखल्यांसारखे निरोगी सरकार असल्याने त्या दोघात काहीही होणार नाही, युती तुटणार नाही आणि निदान हि पंचवार्षिक योजना संपेपर्यंत तरी फडणवीस सरकार गडगडणार नाही, समजा गोखले आजोबांना जे त्यांच्या आप्तांनी विचारले, ते तसे पवारांच्या आघाडीने विचारले तर उद्धव आणि फडणवीस हेच म्हणतील, आमचे गोखले दाम्पत्यासारखे....त्यामुळे उत्तम चालले आहे, उद्धव हे गोखले आजीच्या भूमिकेत आणि माझे गोखले आजोबांसारखे हुबेहूब, त्यामुळेच आमचे युती सरकार दीर्घायुषी ठरले आहे, इतरांना काळजी नसावी...

व्यक्ती आणि वल्ली मथळ्याखाली मला संपत आलेली पंचवार्षिक योजना जेव्हा सुरु झाली तेव्हाच त्या तिघांविषयी नेमके काय घडते, अगदी जवळून बघायचे होते कारण त्या तिघांचेही राजकीय बळ, राजकीय भवितव्य यावेळी बदलणारे असेल, मला वाटलेच होते, तसेही ते तिघे तरुण नेते मला मनापासून आवडणारे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे हे ते तिघे, याठिकाणी हे तिघे नेमके कसे किंवा या पंचवार्षिक योजनेत म्हणजे युती सरकार सत्तेत आल्यानंतर आणि अजित पवार व धनंजय मुंडे विरोधी बाकावर बसल्यानंतर त्यांचे काय झाले, त्यावर काही सांगायचे आहे, लिहायचे आहे, काही महत्वाचे पुरावे सांगायचे मांडायचे आहेत...

गोखले आजी म्हणजे ठाकरेजिंचे हे असे सतत संशयाने बघणे व वागणेही, त्यातून फडणवीस चालताहेत चालताहेत, एवढे काम करताहेत कि त्यांचा नागपुरातील मित्र मला सांगत होता कि त्याने अलीकडे कुठलेसे काम होते म्हणून फडणवीसांना मेसेज केला त्यांनी त्यावर त्याला रात्री अडीच वाजता उत्तर दिले. नंतर या मित्राने पुन्हा सकाळी सात वाजता मुख्यमंत्र्यांना मेसेज केला, त्याला लगेचच साडेसात वाजता पुन्हा उत्तरही आले, तो म्हणाला फडणवीसांचे नेहमीचेच हे असे,जेव्हा केव्हा त्यांच्यावर मोठी जबाबदारी असते, हे महाशय फारतर चार तास झोप घेतात आणि उठले कि लगेच नेहमीच्या उत्साहात कामाला लागतात....

परफेक्ट जन्मवेळ आणि त्याआधारे अभ्यास असल्याने तयार केलेली कुंडली, भारतीयांच्या या ज्योतिष शास्त्रावर माझा अतिशय विश्वास आहे. राशी स्वभाव हे या नेमक्या कुंडलीतूनच योग्य पद्धतीने नक्की सांगितल्या जाते, थापाडे उपाध्ये म्हणजे राशी शास्त्र असा मात्र तुम्ही उगाचच समज करवून घेऊ नका, उपाध्येपलीकडे कितीतरी अभ्यासू चांगली माणसे या क्षेत्रात आहेत. मध्यंतरी प्रकाश बापट यांनी काही छान लिहून पाठविले होते, त्यांच्या मते, देवेंद्र फडणवीस यांना गुरुचे पाठबळ असावे, त्यांचा गुरु प्रबळ असावा कारण या साडेतीन वर्षांच्या कालखंडात फडणवीसांना सर्वांनी मिळून जेवढे अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले याआधीच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत एवढे घडले नाही अगदी पंतांच्या किंवा दिवंगत सुधाकरराव नाईकांच्या बाबतीतही विशेषतः त्यांची अति भयावह कोंडी करण्याचे काम जसे विरोधकांकडून झाले किंवा होते आहे त्यात अनेकदा शिवसेनेने, कुटुंब सदस्यांनी, स्वकीयांनीही हातभार लावल्याचे स्पष्ट चित्र दिसते. उद्धव ठाकरे आणि जाणते राजे हे तर एकही संधी न सोडलेले, प्रत्येक वेळी असे वाटते, यावेळी देवेन्द्रजी अडचणीत येतील, राजीनामा देतील किंवा राजीनामा घेतल्या जाईल...

शेतकऱ्यांची कर्जमाफी असो कि मराठ्यांचे मोर्चे आणि मेळावे, भीमा कोरेगाव प्रकरण असो कि बहुतेक मंत्र्यांचे अत्यंत बेशिस्त व भ्रष्ट आचरण किंवा लाल बावट्याचा परवाचा मोर्चा, असे वाटते दरदिवशी कोणतीतरी शक्ती हे घडवून आणते आहे, आगीत तेल ओतते आहे, आणि हे काम या राज्यात कोणाला मस्त जमते, तुम्हाला माहित आहे. ते मुख्यमंत्री झाल्यापासून त्या हेलिकॅफ्टर्सनी देखील त्यांना सोडले नाही, हे बसले कि ते शिवसेनेसारखे भरकटते. तेथेही मुख्यमंत्री सहीसलामत बाहेर पडतात, फारतर असे म्हणता येईल कि परमेश्वर पाठीशी आणि त्यांचे जनतेच्या सतत भल्यासाठी काम करणारे हात, फडणवीसांना हेच आशीर्वाद वाचवताहेत किंवा त्यांच्या कुंडलीत गुरुचे पाठबळ असावे, ब्राम्हणेतर त्यांना पेशवे म्हणून सारखे चिडवतात, हा पेशवा साऱ्यांना अद्याप तरी पुरून उरतोय....
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

व्यक्ती आणि वल्ली १ : पत्रकार हेमंत जोशी


व्यक्ती आणि वल्ली १ : पत्रकार हेमंत जोशी 
आधी अनुभवायला हवे, जवळून पारखायला हवे अभ्यासायला हवे तदनंतर नेमके ठरवायचे असते, एखाद्या व्यक्तीवर शिक्कामोर्तब करायचे असते कि अमुक एखादी व्यक्ती नेमकी कशी आहे म्हणजे चांगली आहे कि वाईट आहे, आपल्यातले बहुतेक अर्धवट विचारांचे ते जीभ उचलतात आणि टाळूला लावून मोकळे होतात, ते योग्य नाही, अमुक एखाद्याला तो चांगला कि वाईट पटकन झटक्यात ठरवायचे नसते, काहीही माहिती नसते आणि भले भले बोलून मोकळे होतात. शेतकऱ्यांचे मोर्चे निघताहेत पण हि जी पश्चिम महाराष्ट्र वगळता उर्वरित शेतकऱ्यांवर आजची अत्यंत बिकट अवस्था आलेली आहे, ओढवली आहे त्यासी जबाबदार शरद पवार आणि त्यांचा खादाड भ्रष्ट नीच कंपू आहे याकडे कोणाचे अजिबात लक्ष नाही, ज्या सिंचन योजनेचा हवा तसा लाभ न मिळाल्याने आजचा शेतकरी चिंतातुर आहे ते सिंचन खाते सतत पंचवीस वर्षे फक्त आणि फक्त शरद पवार आणि खादाड कंपूच्या दावणीला बांधलेले होते म्हणजे डॉ. पदमसिंह पाटील, अजित पवार, भारत बोन्द्रे, सुनील तटकरे हेच या खात्याचे मंत्री होते, या सर्वांना भर चौकात उभे करून त्यांच्या शेजारी १९९७ दरम्यान याच सिंचन खात्याचे युतीचे मंत्री असलेल्या एकनाथ खडसे यांनाही उभे करून विचारले पाहिजे कि सिंचनाचे पैसे कुठे गेले, उत्तर देणे त्या सर्वांना अशक्य आहे कारण या सर्वांनी सिंचनाचे पैसे याच सिंचन खात्यातील अभियंत्यांना हाताशी धरून स्वतःच्या घरी जिरविले, सिंचनाचे काहीही भले केले नाही म्हणून शेतकरी आज रस्त्यावर उतरले, त्याचा जाब शेतकऱ्यांचा मसीहा समजणाऱ्या आणि जे जबाबदार नाहीत त्यांना भाषणातून सतत शाब्दिक भोसकणाऱ्या शरद पवारांना विचारले पाहिजे तुमच्या मंत्र्यांनी नेमके काय हो केले...हे बघा, आपण भारतीय कर्मांवर विश्वास ठेवणारे आहोत, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, हेही मान्य त्यामुळे नेते आणि शासकीय प्रशासकीय अधिकारी किंवा अन्य कोणीही जे सर्वसामान्यांना लुटून मोकळे झाले आहेत, मोकळे होताहेत त्यांना सारे येथेच भोगून वर जायचे आहे, येथेच सारे सोडून जायचे आहे, पोटाला चिमटे लावून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भरवशावर श्रीमंत झालेल्या पतंगराव कदम यांना येथेच सारे सोडून जावे लागले, आपण सारेच पतंगराव कदम किंवा वसंत डावखरे, त्यांच्यातले आपल्यातले असे फार कमी त्या आर आर आबांसारखे सुखासमाधानाने स्वर्गात पोहोचले असतील, इतरांना आवाज न काढणारी पण हृदयावर घाव घालणारी काठी नक्की बसते, थोडक्यात लुबाडणारे आपले भोग भोगतातच पण विनाकारण सर्वसामान्य जनता तमाम नालायक अधीकाऱ्यांमुळे, नेत्यांमुळे, मंत्र्यांमुळे, दलालांमुळे जिवंतपणी नर्कयातना भोगते वाईट त्याचे वाटते...

नेमक्या विषयाकडे वळतो, येथे मला ' व्यक्ती आणि वल्ली ' या लेख मालिकेची सुरुवात पत्रकार कुमार केतकर यांच्यापासून करायची आहे, खूप खूप खूप आनंद झाला जेव्हा ' आमच्यातले ' कुमार केतकर हे राज्यसभेवर जाताहेत कळले, त्यांचे अगदी मनापासून अभिनंदन. येथेही तेच ज्यांची कवडीची लायकी नाही किंवा लिखाणात कोणतेही फारसे योगदान नाही ते जेव्हा केतकरांना, ' सुमार केतकर ' चिडवून मोकळे होतात, तळपायाची आग मस्तकात पोहोचते. कुमार यांना सुमार म्हणण्याची लायकी नक्की भाऊ तोरसेकर यांच्याकडे आहे म्हणून त्यांनी त्यांच्या या मित्राचा उल्लेख ' सुमार केतकर ' असा केला होता, इतर उठसुठ जेव्हा हे असे म्हणतात, ते नालायक आहेत, म्हणावे लागेल. किंबहुना ज्यांनी कुमार यांना अगदी जवळून बघितले आहे, अनुभवले आहे ते हे असे म्हणण्याचे धाडस नक्की करणार नाहीत, तोरसेकरांचे इतरांशी वैचारिक आणि नेमके मतभेद असतात म्हणून ते निखिल यास ' वटवागळे ' म्हणून लिहून मोकळे होतात, इतरांनी म्हणजे सर्वसामान्य मंडळींनी स्वतःला भाऊ तोरसेकर समजू नये....

एक मात्र नक्की कुमार केतकर यांनी आपल्यातल्या अनेकांचे काम सोपे करून ठेवले आहे म्हणजे शारदा साठ्ये यांनी आपले आडनाव पूर्वीचेच कायम ठेवले, आपण आता मैत्रिणीसंगे हॉटेलात राहायला गेल्यानंतर सांगू शकतो, आम्ही केतकरांचे अनुकरण करतो. गमतीचा भाग सोडा पण काँग्रेसच्या नेत्यांनी हा अतिशय दूरदर्शी आणि योग्य निर्णय घेतला आहे, त्यांनी केतकरांना राज्यसभेवर आपल्या घोळक्यातून पाठविणे म्हणजे बिकिनी घातलेल्या उत्तान तरुणींच्या घोळक्यात नऊवारी नेसलेल्या खानदानी देखण्या तेजस्वी स्त्रीने एंट्री घेतल्यासारखे....

तुम्हाला माहित आहे का, ज्या कुमार केतकर यांनी म्हणजे संपादक म्हणून कधीकाळी महाराष्ट्र टाइम्स चा ' सोनिया टाइम्स ' केला, ज्यादिवशी त्यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला, त्यांच्या सोबतीने म्हणे ज्या भारतकुमार राऊत यांनी संपादक म्हणून ज्या महाराष्ट्र टाइम्सचा ' जयमहाराष्ट्र टाइम्स ' केला, तेही जातीने केतकारांसंगे आले होते. अर्थात हा सारा गंमतीचा भाग आहे म्हणजे शारदाताई आणि कुमार दोघेही आजही पक्के लाल निशाणवले पण कुमार यांनी लाल निशाण सांभाळत आयुष्यभर काँग्रेस ला देखील घट्ट मिठीत पकडून ठेवले होते, ठेवले आहे, आता त्याचेच म्हणावे तर त्यांना बक्षीस मिळाले आहे लाल निशाणवाल्या केतकरांना काँग्रेस च्या कट्टर गांधी घराण्याने राज्यसभेवर पाठविले आहे, जमते बुवा एखाद्याला चांगले, जे पत्रकार कुमार केतकरांना जमले आहे, म्हणजे एकाचवेळी बायकोला मिठी मारायची आणि त्याचवेळी प्रेयसीला देखील पोटुशी, प्रेग्नन्ट ठेवायचे, केतकरांच्या बाबतीत हे असे घडले आहे, काँग्रेसच्या झेंड्यात त्यांनी लाल झेंडा उभा केला आहे....

उत्तम वक्ते, अभ्यासू , प्रचंड बुद्धिमान केतकरांच्या स्वभावासारखीच त्यांची लेखणीही,एकदम रोखठोक, म्हणजे रोख धरून ठोक देणारी..आपला मुद्दा पुढे रेटून एखाद्याचा बुद्धीभेद करावा केतकरांनीच. त्यांनी अनेकांना लेखणीतून दुखावले, पण कुणी त्यांचे कायमचे शत्रू झाले नाहीत. परवा त्यांनी फॉर्म भरल्यानंतर विनायक मेटे यांनी त्यांचे अभिनंदन केले. याच मेटेंनी केतकरांच्या घरावर हल्ला केला होता. आता भाजपकडून नारायण राणे आणि काँग्रेसकडून कुमार केतकर राज्यसभेवर, म्हणजे दोन्ही पक्ष कसे 
बदलताहेत पहा. असे वाटते शेजारचे गोविंदराव त्यांच्या शेजारी राहणाऱ्या वनमाला बाईंकडे आपले घर सोडून राहायला गेले आहेत. कुमार केतकर यांनी मंत्रालय विधिमंडळ कधीकाळी कव्हर केले आहे. महत्वाचे म्हणजे त्यांनी संपादक झाल्यावरही आपल्यातला वार्ताहर कधीच मरु दिला नाही किंवा त्यांनी इतर अनेक वार्ताहराचे जसे होते विशेषतः ' लोकमत ' मध्ये तसेही स्वतःचे होऊ दिले नाही म्हणजे त्यांनी केवळ ' मंत्रालय प्रतिनिधी ' म्हणून स्वतःला कधीही मर्यादित ठेवले नाही म्हणून केतकर मोठे झाले, संपादक म्हणून जगभर गाजले, इतर अनेक केतकर होण्याच्या लायकीचे आहेत पण त्यांनी स्वतःचा कायम ' अरविंद ' करून घेतला, घेताहेत. आता यापुढे केतकर वरून पाहिलेल्या सभागृहात थेट उतरणार आहेत, मला खात्री आहे त्यांचा ' भारतकुमार ' होणार नाही, त्यांची पत्रकारिता तेथे शाहिद होणार नाही, त्यांच्यातला पत्रकार कायम जिवंत राहील, तशी खात्री वाटते....
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Saturday, 10 March 2018

खासदाराचे अल्टिमेटम ३ : पत्रकार हेमंत जोशी


खासदाराचे अल्टिमेटम ३ : पत्रकार हेमंत जोशी 
शत्रूचा नाश केला तर फायदा होतो आणि आपलेच संपवायला घेतले तर वाटोळे साऱ्यांचेच होते. दोष स्वतःचे आणि बोट दुसऱ्याकडे, अशी माणसे मूर्ख असतात. गुणी माणसांचे दोष काढणारे त्यांची निन्दा करणारे प्रगतीकडे वाटचाल करणे अशक्य. आता नेमक्या विषयाला हात घालतो...मुंबईत बसून हेमंत जोशी दूरवर अकोल्यातले राजकीय नाट्य लिहिण्यात यासाठी गुंतलेले आहेत कारण भाजपचे खासदार संजय धोत्रे यांनी त्यांच्या कम्पूला म्हणजे आमदार गोवर्धन शर्मा किंवा आमदार रणधीर सावरकर, अकोल्याचे महापौर विजय अग्रवाल इत्यादींना हाताशी धरून त्यांच्याच पक्षातल्या राज्यमंत्र्याशी थोडक्यात थेट सरकारशी सरळ सरळ हुबेहूब त्या नाना पटोले यांच्या बंडाशी साधर्म्य असलेले बंड अगदी उघड पुकारलेले आहे, त्यांनी त्यांच्याच पक्षश्रेष्ठींना अल्टिमेटम देणे म्हणजे उघड आव्हान केल्यासारखे आहे, पण अकोला जिल्ह्यातल्या मतदारांना संजय धोत्रे यांनी केलेले हे बंड किंवा दिलेले आव्हान फारसे आश्चर्यात टाकणारे नाही, त्यांचे म्हणणे असे कि मागल्या लोकसभेच्या वेळीच धोत्रे भाजपमधून बाहेर पडून पवारांना बिलगून मोकळे झाले असते पण मोदी लाट आली नेमकी या राज्यातली पवारांची लाट त्यादरम्यान अति झपाट्याने उतरली म्हणून धोत्रे यांचे पक्षांतर थांबले, यावेळी त्यांचे बंड हवेत विरणे अकोलेकरांना अशक्य वाटते, धोत्रे यांचे पक्षांतर करणे जवळपास निश्चित झाले आहे असेच त्यांना आता वाटते आहे. भाजपा ला धोत्रे यांचे पक्ष सोडून जाणे फारसे नुकसान करणारे नसेल मात्र अकोला जिल्ह्यात फारशी अस्तित्वात नसलेली राष्ट्रवादी काहीसे नक्की बाळसे धरेल. पण भाजपाचे एक बरे आहे त्यांच्याकडे राज्यमंत्री रणजित पाटलांच्या रूपाने नक्की प्रभावी नेता आहे, धोत्रे केवळ अकोला जिल्ह्याचे नेतृत्व करतात, रणजित पाटलांची मात्र थेट पाच जिल्ह्यावर म्हणजे अकोला, वाशीम, यवतमाळ बुलढाणा आणि अमरावती वर हुकूमत आहे, पकड आहे त्यामुळे अगदीच तशी वेळ आली म्हणजे धोत्रे हे पटोले यांच्या मार्गाने गेले तर भाजपाचे 
अतोनात नुकसान झाले असे होणार नाही...

विदर्भातला पदवीधर मतदार अतिशय सावध आहे, चिकित्सक आहे, तो नेमके मतदान करतो, प्रसंगी त्याच्या पसंतीचे उमेदवार नसतील तर वर्हाडी मतदार मतदानाच्या दिवशी घरी बसणे पसंत करेल पण चुकीचा उमेदवार त्याने निवडला असे होत नाही म्हणून बी टी देशमुख हे तसे मधू दंडवते सारख्या आदर्शाच्या रांगेतले नेते वर उल्लेख केलेले पाचही जिल्ह्यातले सुशिक्षित मतदार त्यांना नेहमी पदवीधर विधान परिषद मतदार संघातून निवडून पाठवायचे पण अशी वेळ आली कि याच मतदारांनी त्यांना पराभूत केले आणि रणजित पाटलांना निवडून दिले. याच चिकित्सक मतदारांनी मागल्या वर्षी पुन्हा एकदा रणजित पाटील यांना तब्बल ५५००० हजार मतांच्या फरकाने निवडून दिले, त्यांच्या विरोधातल्या उमेदवाराला म्हणजे काँग्रेस च्या संजय खोडके यांना भाजपमधले नेमके हेच अकोल्यातले नेते अगदी उघड मदत करीत असतांनाही...थोडक्यात एकही संधी धोत्रे आणि कंपूने सोडली नाही जेथे रणजित पाटील यांची छळवणूक किंवा अडवणूक झाली नाही मात्र त्याचवेळी रणजीत पाटलांनी वागण्यातली बोलण्यातली सभयता कधीच सोडली नाही. त्यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतल्या घेतल्या थेट खासदाराचे घर गाठले, पाया पडून म्हणाले, संजयजी आपण बुजुर्ग आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, आपण विकासाचे कोणतेही काम सांगावे आणि मी ते ऐकावे, करावे असे सतत माझ्याकडून घडेल, तरीही द्वेषाचे राजकारण वाढत गेले आणि आता भाजपाचे नुकसान झाले तरी बेहत्तर, रणजित पाटलांची हकालपट्टी करण्यासाठी धोत्रे आणि कंपू रुसून फुगून बसला आहे..

अत्यंत बेजबाबदार वक्तव्य म्हणजे धोत्रे यांनी रणजित पाटीलांसंदर्भात बोलतांना, शिशुपालाचे शंभर अपराध भरले, असे उदगार काढले. केवढे हे गंभीर वक्तव्य, असे कोणते गुन्हे त्यांच्याकडून घडले कि पाटील शिशुपाल ठरले. कुठलेतरी शुक्लकाष्ठ मागे लावून द्यायचे नंतर त्यातून काही निघाले नाही म्हणून आदळआपट करायची, एखाद्या हिंदी मालिकेला शोभण्यासारखे हे वागणे...राज्याच्या मंत्र्याविषयी एकेरी उल्लेख करून मीडिया समोर अद्वातद्वा बोलणे, त्यातून निष्पन्न काहीही नाही, उलट धोत्रे यांची जनमानसातली प्रतिमा त्यातून झपाट्याने खालवण्याची दाट शक्यता आहे, 
तेच सत्य आहे....
 पत्रकार हेमंत जोशी 

Thursday, 8 March 2018

खासदाराचे अल्टिमेटम २ : पत्रकार हेमंत जोशी


खासदाराचे अल्टिमेटम २ : पत्रकार हेमंत जोशी 
काल परवा एका प्रशासकीय अधिकाऱ्याशी सहजच गप्पा मारीत बसलो होतो, ते म्हणाले, पत्रकार उदय तानपाठक तुमचे सॉफ्ट टार्गेट आहे, मी जोराने हसलो, तुम्ही नेमके उलटे सांगताय, उलट आम्ही सारे पत्रकार, उदयचे सॉफ्ट टार्गेट आहोत, जेवढ्या आमच्या बायका आम्हाला घालून पाडून बोलल्या नसतील, त्यापेक्षा कितीतरी अधिक पाणउतारा तेही अगदी चारचौघात आम्हा सर्वांना सहन करावा लागतो, मी त्यांना म्हणालो. तो वयाचा गैरफायदा घेतो, आम्हा सर्वांपेक्षा तो वयाने मोठा असल्याने....

कानावर पडलय, बजेट अधिवेशनानंतर म्हणे उदय अमेरिकेला निघालाय, अशावेळी त्याला काही सूचना कराव्या लागतात म्हणजे विमानाबाहेर हात काढू नको, विमानात झोपू नको नाहीतर विमान पुढे निघून जाईल, हवाई सुंदरी वाकली म्हणून लगेच आपणही वाकून बघायचे नसते, त्यांचे कपडे बंद गळ्याचे असतात, आणि जे दिसते तसे काहीही नसते, आतून पॅडिंग केलेले असते. विमानात वाट्टेल ते मागू नको, मागल्या वेळी एकाने पाणी मागितले, दुसर्याने पांघरुण माहीतले, तिसऱ्याने सॉफ्ट ड्रिंक मागितले, हे बघून मग उदयने यादीच खिशातून बाहेर काढून वाचायला सुरुवात केली, अमुक द्या तमुक द्या, अंगावर शिंपडायला गोमूत्र द्या, वाचायला हनुमान चालीसा द्या, बटन तुटलंय सुई दोरा द्या, डोक्याला झंडू बाम चोळून द्या, वगैरे वगैरे...

नेमक्या मुद्द्याकडे वळतो. विदर्भातील अकोला जिल्ह्यात भाजपामधले गढूळ  झालेले किंवा ढवळून निघालेले गलिच्छ राजकारण हा विषय येथे मला नेमका विशद करायचा आहे. राज्यमंत्री रणजित पाटलांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा हा अल्टिमेटम स्थानिक भाजपा खासदार संजय धोत्रे यांनी थेट मीडिया समोर मांडला आहे तेही अकोल्याचे स्थानिक आमदार लालाजी उर्फ गोवर्धन शर्मा यांच्या साक्षीने...गोवर्धन शर्मा हवा मग कोणत्याही राजकीय पक्षाची असो अकोलाशहरातून भाजपातर्फे विधानसभेला नेहमी निवडून येतात. ते एवढे साधे सिम्पल आहेत कि अमुक एखाद्याला हात दाखवून त्याची स्कुटर थांबवतात आणि पाठीमागे बसून मार्गस्थ होतात, त्यांच्या त्या मनोहर पर्रीकर यांच्यासारखे म्हणजे कोणत्याही टपरीवर उभे राहून ते चहा घेतील किंवा मिसळ खाऊन जमलेल्यांशी गप्पा मारतील. समजा एखाद्या पिंजऱ्यासमोर उभे राहून शाळेतली मुले माकडाला वाकुल्या दाखवत असतील तर हेही तेच करतील किंवा संघस्थानावर शिशु कोलांटी उडी मारतांना दिसलेत तर हे देखील कोलांट्या उद्या मारून मोकळे होतील. अर्थात तेथे शर्मा आहेत म्हणून ते निवडून येतात असेही नाही कारण अकोला शहर विधानसभा परिघातल्या मतदारांना कट्टर हिंदू उमेदवार तेथे हवा असतो तसेही संपूर्ण अकोला जिल्हा केवळ आणि केवळ जातीच्या राजकारणाने बरबटलेला आहे, किळस येते ती सारी जातीची समीकरणे बघून, लाज वाटते कि जो तो केवळ जात बघून त्या जिल्ह्यात राजकारण खेळतो, निवडणुका लढवतो...

खासदार संजय धोत्रे व त्यांचा गट त्यांच्या नातेवाईकांचा कंपू अशी एकही संधी सोडत नाही जेथे त्यांनी राज्यमंत्री रणजित पाटील यांच्यावर तोंडसुख घेतले नाही आणि एखाद्याने अगदी एकमेव तरी उदाहरण द्यावे कि पाटलांनी संजय धोत्रे असोत किंवा अगदी विरोधी पक्षातलेही, कधी पातळी सोडून अमुक एखाद्याविषयी त्यांनी अपशब्द वापरलेत, कधीही नाही. मला पक्षाने सेवा करण्याची संधी दिली, अधिकार दिले, आमदारकी दिली, शेवटच्या श्वासापर्यंत उद्या भाजपा सत्तेत असेलही नसेलही, मी तेथेच असेल, रणजित पाटील नेहमी हे असे अगदी उघड सांगून मोकळे होतात. वास्तविक रणजित पाटील यांच्याविषयी असलेली मनातली खदखदा धोत्रे आणि कंपूने त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे मांडावी पण त्यांचे हे असे उघड उघड सतत धमकी देणे, बघून वाटते त्यांनाही स्वतःचा नाना पटोले करवून घ्याचा असेल म्हणून ते उठसुठ आपले गार्हाणे अंतर्गत न मांडता, मीडियासमोर ते घसा खाकरून खाकरून मांडताहेत. डॉ. नेने यांना माधुरी मिळाली म्हणून आम्ही नेने यांचा राग करणे किंवा उद्या समजा लोणीकरांनी दोन तीन लग्ने केलीत म्हणून अविवाहित राजन पारकर यांनी उठसुठ त्यांच्या अंगावर धावून जाणे रावल यांनी जमिनी हडपल्या म्हणून मीही तेच कारेन असे एखाद्या स्थानिक नेत्याने म्हणणे जसे चुकीचे ठरते ते तसे त्या अकोल्यातही, म्हणजे 'तेरी साडी मेरे साडीसे सफेद क्यो, धर्तीवर केवळ रणजित पाटलांना राज्यमंत्रीपद मिळाले आणि आपल्याकडे ते चालून आलेले नाही असे जर काहींना वाटत असेल तर हे असे अस्वस्थ होणे साफ चुकीचे, त्यांना आज मिळाले, तुम्ही चांगले वागलात तर उद्या ते नक्की तुमच्याकडेही चालून येऊ शकते, अस्वस्थतेचे लक्षण म्हणजे अपरिपकवतेचे गचाळ दर्शन आहे असेच त्या अकोल्यातले सारे सांगतात आणि भाजपातले तर कपाळावर हात मारून घेतात, उर बडवून घेतात, तोबा तोबा म्हणतात...
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Wednesday, 7 March 2018

Happy Women's Day!!

Happy Women's Day!!

I generally avoid writing on any one officer and his or her achievements in the field they work. It looks very 'paid'. But the occasion of 8th March i.e. International Women's Day couldn't be missed. I thought it wouldn't be fair on my part if I did not highlight some of outstanding work of this lady officer on this day. We have some great minds in bureaucracy in the likes Medha Gadgil, Malini Shankar, Manisha Mhaiskar, Ashwini Joshi, Ashwini Bhide, Mokshada Patil, Nidhi Choudhari etc...working for our state day in & day out; but now this league is joined by another firebrand lady officer. Currently she is handling the most prestigious Shirdi Sansthan and doing a brilliant job too. IAS Rubal Agarwal  is currently is working as the CEO of Shri Saibaba Sansthan Trust. In the month of November last year had visited Shirdi and met the affable Rubal ji, as she is popularly known in her circles, but chose the date of writing on her nearly after 4 months as thought it would be the perfect occasion to describe her achievements and celebrate Women's Day perfectly. Coincidentally, Rubal Agarwal tomorrow i.e.  on the 9th of March complete's exactly a year at her current post. Now on too some of her achievements....

When Rubal Agarwal resumed her job on the 9th March, not many know this, but she is the first ever WOMEN CEO to be appointed at the Shirdi Sanasthan.  Immediately within the month of her joining, a High Power Committee (HPC) led by CM Devendra Fadnavis sanctioned Rs. 3023 crores for the Cenetary Year Celebrations. For devotees, there are new arrangements made such as New Darshan queue under A/C plus all facilities under one roof. This proposal was finally approved by the Law & Judiciary department on the 16th February 2018. Then Rs. 112 crore project DPR is ready and tender process for the same has been initiated. On the 7th February 2018 the same L&J department approved the New Water Supply scheme from the Nilwande Dam for Sansthan worth Rs. 260 crore. For the same tender process has been initiated too...

If world is moving towards the digital age, how could our Shirdi Sansthan be left behind? The CEO took drastic & quick steps towards revamping of the old website and introducing devotee oriented mobile App launching for all types of bookings and information. 

One of the giant steps Agarwal initiated was the Paduka Yatra all across India. The devotees from Goa, Pondicherry, Delhi Surat Ahmedabad & all Vidharbha districts were able to experience this. A record number of 2 crore devotees visited Shirdi in 2017 and it being a Cenetary Year Shirdi Sansthan is equipped to welcome more than 3.5 crore devotees. Blood donation camps, Free Jaipur Foot camp, Free Medical camps are part of the Sanasthan every now & then.  Being the fire brand lady and lot of monies to be exchanged via tendering process, Rubal has kept an eye of a vigilante too...The entire focus on procedures of procurement, requirement and work culture of Sansthan remains her top most agenda. 

It was an event in the history of Sansthan when on 1st October 2017 Hon'ble President of India innnaugrated the Cenetary Year and hosted the Cenetary Flag in Lendi baugh. Hon'ble Vice President of India inaugurated the second International Sai Submit in 23rd December 2017. In middle of all the works happening, just imagine the pressure these people along with the police department to host so many VVIP's.

I have personally seen the construction of Tensile Fabric Sheet big mandap for Cultural & Social Programmes & Bhajan Sandhya. This has a capacity of occupying more than 1500 people at one time. Being the cenetary year, every corner of the Mandir is clean, neat & renovated. For devotee's there is free prasad, free medical facility, free tea-coffee for senior citizens and arrangement for special & free darshan for the physically challenged. Also those intending to flex some muscle, there is a free gym in the gardens. Then there are 3D diaries, & New year Calendars with Sai Charitra avaibale in more than 20 languages. 

It is not only the Mandir or Sastha that has caught the eye of Agarwal. She has extended support to the Nagar Panchyatas too wherein the Amrut Water Supply Scheme will distribute Rs. 6.58 crore for cleaning of Shirdi Nagar Panchayat area. The proposal for the same has been sent to give Rs. 35 lakhs per month and BVG group has been given the responsibility for Shirdi Cleanliness Project. 

Rs. 55 crore Medicine Tender is finalised for people living below poverty line and needy patients. Medical facility is free of cost at the Sainath Hospital. There is focus on new machinery instalment. The same has been put under tender have been invited for installations of 220 machines of Saibaba & Sainath Hospital worth Rs. 30 crore. The Sansthan released fund for Shirdi Airport and help in inauguration of the same on the 1st October. Then there is Smart Shirdi Project. They are working very closely with the IT department for installation of CCTV's for security & surveillance. Sai Shrusti Project which is very prestigious will be done on the (Built Operate Transfer) BOT basis. Also on the same basis there is SAi Virtual Reality Show is ready and ready to be implemented. Immersity Infotect Pvt Ltd. from Mumbai will be the agency incharge.

A project has been initiated for renovation of the 500 room Bhaktniwas for Rs. 18 crore. New Laddu & Bundi Processing unit of Rs. 15 crore and renovation of Sai Prasadalaya are on the way. Then there is New education Complex proposed for Rs. 120 crore and latest a New Senior College of Arts, Science & Commerce has been given the nod by the Government. For the New Education Complex 28 Hectare Land has been identified and Zone has been changed. 

The above achievements, or whatever Rubal Agarwal could do in one year, speaks for itself; and yes it wasn't a cake walk. But today we are celebrating Women's Day; the opposition from the Trust & their foul play some other time in my own style. But for now, Hats Off to Rubal Agarwal, her husband Prakher, in particular, who is working at Pune and does not get to see his family for weeks together if time and distance does not permit. This is the only negative thing I could sense whilst talking to Rubal ji. After all, after the hard day's work if you don't have your family to get back to, it alls seems to be a bit futile... May our state get more of such able officers!!

Wishing one & all A very Happy Women's Day!!

Vikrant Joshi 

PS: The  picture of Mine with Rubal ji is 4 months ago, hence please do not talk about weight gain when any of you meet me, I know I'm young & need to do something but friends, chill!!..Have a good one!!