Friday, 9 February 2018

भय्यूजी तुमची विकृत बुवाबाजी : पत्रकार हेमंत जोशी


भय्यूजी तुमची विकृत बुवाबाजी : पत्रकार  हेमंत जोशी 
या देशातले बुवा लागोपाठ तुरुंगात चाललेत त्याला घाबरून आपल्या राज्यातले नाणीजच्या नरेंद्रसारखे किंवा स्वयंघोषित युवराष्ट्रसंत भय्यू महाराजांसारखे अनेक अध्यात्माचे थोतांड मांडून बसलेले त्याभरवंशावर लैंगिक आणि आर्थिक शोषण करणारे भामटे काही दिवसांपासून त्याभीतीने बऱ्यापैकी प्रसिद्धीपासून दूर असल्याचे एव्हाना तुमच्या ते लक्षात आलेच असेल पण त्यांची बुवाबाजी बंद झाली किंवा त्यांनी ती आटोपती घेतली असे अजिबात नाही, त्यांचे बुवाबाजीचे दुकान आहे तसेच सुरु आहे, त्यांचा हा बिनभांडवली धंदा अजिबात थांबलेला नाही. हे सारेच्या सारे म्हणजे अनिरुद्ध बापू असो कि भय्यू महाराज किंवा नरेंद्र सारखे इतरही, सुद्न्य सुशिक्षित मराठी मंडळींच्या हल्ली हल्ली ते बऱ्यापैकी लक्षात आले आहे कि बुवा बाबा महाराज मग तो कोणीही असो हे सारेच आसाराम बापू असतात म्हणजे फसवणूक आणि भक्तांची लुबाडणूकच करणारे असतात पण कौतुक त्यांचे कि ज्यांनी आम्हा तमाम बुवाप्रेमी भक्तांचे डोळे उघडले, ज्ञानेश महाराव, श्याम मानव इत्यादी अंधश्रद्धेच्या विरोधात मोठी 
रिस्क घेऊन कार्य काम करणाऱ्यांचे त्रिवार ढोपरापासून हात जोडून अभिनंदन...

मला आठवते १०-१२ वर्षांपूर्वी विदर्भातील अकोट चे नेते भावी आमदार आमचे टाईमपास मित्र गमतीदार कष्टाळू हास्यसम्राट मित्र श्रीमान अनिल गावंडे ( होय मी बामन, जवळपास सारेच मित्र मात्र ब्राम्हणेतर ) मी आणि भय्यू महाराज त्यांच्या काही भानगडी कानावर आल्या होत्या म्हणून नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी महाराजांच्या इंदोरस्थित वादग्रस्त आश्रमात गप्पा मारीत बसलो होतो, आम्ही तिघेही मूळ विदर्भातले म्हणून आमचे भय्यू महाराजांना हेच सांगणे होते कि तुमचे विदर्भात अनेक भक्त आहे, तुमच्या लोकप्रियतेचा सकारात्मक फायदा आपण उचलू या म्हणजे आपल्या विदर्भातले गरिबी बेरोजगारीमुळे जो तरुण तरुणी वर्ग काहीसा भरकटला घाबरला भांबावला आहे त्यांना हिम्मत मदत देऊन मोठे करवू या, खोटे वाटेल, पण महाराजांनी कबुल केल्याने मी त्यांच्यावर त्यानंतर कितीतरी सकारात्मक लिखाण चहाच्या कपाची देखील अपेक्षा न करता, केले, ते अंक अनेक वेळा विदर्भात पोहोचते केले, या राज्यातले मग अनेक नेते मंत्री अधिकारी पत्रकार त्यांच्या पाठीशी उभे राहिले पण या सर्व यशाचा मुळात मनात विकृती ठेवूनच जगणाऱ्या भय्यू महाराजांनी कधी सकारात्मक उपयोग करून घेतलाच नाही, ते नेमके कसे, हळूहळू बहुतेकांच्या लक्षात आले, आम्हीही पिच्छा सोडला, कानावर त्यांच्या भानगडींचे अनेक पुरावे आले त्यातून हलकेच भय्यू महाराज लयाला गेले, आता अगदीच थोडासा तग धरून आहेत, त्यांची उरली सुरली इज्जत बायको मेल्या मेल्या त्यांनी ज्या पद्धतीने पोटच्या तरुण मुलीचा बिचार न करता, लग्न केले, तेव्हापासून अगदीच खालची पातळी गाठून मोकळी झाली....

माझी एक धडपडी बुद्धिमान विधवा चरित्रवान तरुण देखणी खानदानी उद्योगपती मैत्रीण कम मानलेली बहीण पुण्यात असते, केवळ तिच्या व्यवसायावर आणि वैक्तीतक आयुष्यावर विपरीत परिणाम होईल म्हणून मी आणि ती गप बसून आहोत पण भय्यू महाराज आणि त्यांच्या हरामखोर गुंड प्रवृत्तीच्या फसव्या वृत्तीच्या कंपूने त्या तरुण महिला उद्योजिकेला ज्या वाईट पद्धतीने आर्थिक आणि लैंगिक फसविले आहे, तुम्ही ऐकलेत तर पुन्हा या भय्यू महाराजांचे तोंड देखील बघणार नाहीत. दुसऱ्या एक महिला उद्योजिका वर्षा सत्पाळकर आता तुरुंगात आहेत किंवा नाहीत मला नेमके माहित नाही पण त्या कुठे भेटलात तर त्यांना विश्वासात घेऊन विचारा तर, कि त्यांची याच भय्यू महाराज आणि कंपूकडून किती व कशी फसवणूक झाली आहे ते, आणि अशा कितीतरी महिला, जाळ्यात अडकलेल्या असे कितीतरी पुरुष मंडळी ज्यांचे असर्थिक आणि मानसिक शोषण झालेले...सत्पाळकर यांच्याविषयी एक मात्र वाईट वाटते, ही घरंदाज कर्तृत्ववान बुद्धिमान कष्टाळू विधवा महिला उद्योगपतीही नेमक्या नेहमीच्याच पद्धतीने फसविल्या गेलेली आहे, तिला तर तुरुंगात देखील जावे लागले आहे. वास्तविक असे कितीतरी ज्यांची आर्थिक किंवा लैंगिक किंवा दोन्ही पद्धतीने फसवणूक झालेली आहे, त्यांचे हे काम आहे, पुढे येऊन त्यांनी या असल्या भानगडी करणाऱ्यांचे नेमके स्वरूप लोकांसमोर आणायला हवे. सर्वाधिक वाईट याचे वाटते कि मोठी माणसे मग ते या देशाचे राष्ट्रपती असोत कि या राज्याचे विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे आजी माजी मुख्यमंत्री, किंवा दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे यांच्यासारखे आजी माजी मंत्री, मोहनराव भागवत असोत कि थेट नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि काही चित्रपट कलावंत देखील, हे सारे, किंवा असे अनेक मान्यवर कितीतरी, का म्हणून सामान्य भक्तांना फसविणार्या या बुवांसमोर नतमस्तक होतानाचे फोटो काढू देतात, कारण हे असेच फोटो दाखवून सामान्य माणसाची भक्ताची लुबाडणूक होते जे अतिशय खेदजनक आणि निराशाजनक आहे.. 

अशुद्ध विचारांच्या नालायक असणाऱ्या मनात पाप ठेवून जगणार्या लोकांना न ओळखता त्यांना या देशातल्या समृद्ध विचारांच्या मंडळींनी डोक्यावर घेऊन नाचावे, त्यांचे केवळ, मतांच्या आशेपोटी उद्दात्तीकरण करावे हे मनाला मोठ्या वेदना देणारे आहे. याबाबतीत मग कौतुक करावे तेवढे कमी त्या शरद पवार आणि अजित पवारांचे म्हणजे याच पवारांच्या घरातले एक कुटुंब संपूर्ण भय्यू महाराजांच्या नादी लागलेले असतांना या दोन्हीही काका पुतण्यांनी किंवा सुप्रिया सुळे यांनीही त्या भय्यू महाराजांना किंवा तत्सम भोंदू बुवांना कायम दूर ठेवले, धुडकावून लावले, अनेकदा अनेकांनी आग्रह केला तरी.....भक्तांनी देखील हे लक्षात घ्यावे कि सदगुरु निवडतांना नेमके कोणाला निवडावे त्यावर आधी शांत डोक्याने बिचार करावा तदनंतर आपल्या मनाची जेथे शुद्धी होते असेच ठिकाण निवडावे, या असल्या बुवांना कसली पातळी आणि त्यांचे कसले परमेश्वरी आचरण, हे तर सारे विकृत आणि 
महाठग, अशांना चार हात लांबच ठेवावे....
अपूर्ण :


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment