Monday, 12 February 2018

संघ आणि भाजपा ३ : पत्रकार हेमंत जोशी


संघ आणि भाजपा ३ : पत्रकार हेमंत जोशी 
अगदी क्वचित प्रसंगी, अन्यथा संघ परिवारातले कोणीही जाहीर भाषणं ठोकतांनाकरतांना कधीही दिसणार नाहीत आढळणार नाहीत, केवळ संघ परिवार एकत्र येऊन त्यांचे पदाधिकारी विचार मांडतात संघवाले त्या प्रकाराला बौद्धिक म्हणतात, लहानपणी संघस्थानावर म्हणजे संघाच्या शाखेत किंवा संघातल्या विविध अनेक कार्यक्रमात असे बौद्धिके ऐकणे त्या वयात एकप्रकारे आपल्यावर जुलूम केल्या जातोय असे वाटायचे, बौद्धिके संपल्याशिवाय खायला मिळायचे नाही त्यामुळे तेथे उपस्थिती अनिवार्य असायची. पोटात गरिबीमुळे भूक असायची आणि बौद्धिके समजण्याचे ते वय देखील नव्हते त्यामुळे ते प्रदीर्घ बौद्धिके म्हणजे संकटे वाटायची. आमच्यातले बहुतेक खाली मान घालून झोपायचे, मी तर अनेकदा बसल्या बसल्या जागच्या जागी लुडकलो होतो, मग पुन्हा उठून बसायचे कारण बौद्धिके ऐकणे तेथे अत्यावश्यक असायचे, एकमेकांकडे एरंडेल तेल प्यायल्यासारखा किंवा एनिमा घेतांना जसा आपला चेहरा होतो त्या तशा चेहऱ्याने आम्ही एकमेकांकडे बघत असू...

भाजपा सत्तेत आल्याने भलेही संघ परिवारातले जे राजकारणात उतरले ते नितीन गडकरी यांच्यासारखे अनेक नेते मंत्री म्हणून श्रीमंत झाले आहेत किंवा असतील पण संघाने सत्तेतल्या भाजपाकडून आर्थिक मदत घेतली किंवा ते घेतात असे चुकुनही घडत 
नाही म्हणून जे संघावर टीका करतात किंवा ज्यांना संघ अजिबात समजलेला नाही त्यांनी संघ परिवारातल्या सामाजिक सेवा करणाऱ्या संस्थांचा व्यवस्थित सखोल अभ्यास करून तदनंतर टीका करावी. संघाने हाती घेतलेले जवळपास सारेच प्रकल्प मर्यादित आकाराचे दुर्गम भागात उभारलेले विविध संकटांना सामोरे जाणारे आणि अतिशय लहान क्षेत्रात काम करणारे असतात भारतातल्या बहुतेक आदिवासी भागतून स्थानिक हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केल्या जाते, विशेषतः ख्रिश्चन धर्मगुरू हे असे धर्मांतराचे काम करण्यात पटाईत असतात, गोड गोड बोलून ते आदिवासींचे मतपरिवर्तन करतात शिवाय त्यांना मोठ्या प्रमाणावर परदेशातून आर्थिक रसद पुरविल्या जाते. तुम्हाला वेळ मिळालेला तर ज्या शाळा हे धर्मगुरू किंवा नन्स चालवितात, त्या शाळांचे जर नीट निरीक्षण केले तर तुमच्या ते सहज लक्षात येते कि आर्थिक रकमेशिवाय गहू तेल बिस्किटे तांदूळ कपडे इत्यादी कितीतरी 
आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचे मोठाले गोडाउन्स तेथे उभारले जातात आणि हे सारे आदिवासी भागात धर्मांतर करतांना पद्धतशीर त्याचे वाटप केल्या जाते....

मी आता किंवा समजायला लागल्यापासून कधीही संघात गेलो नाही मी संघ स्वयंसेवक नाही पण मी कट्टर हिंदुत्ववादी असल्याने नेमके काय घडते आहे सांगून मोकळा होणार आहे आणि संघ म्हणजे काय हे जे मला समजले ते तुम्हाला सांगणार आहे. संघाच्या विविध फांद्या शाखा, राष्ट्रीय सेवा भारती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, विद्याभारती, विवेकानंद केंद्र, दीनदयाळ संशोधन संस्था, इत्यादी माध्यमातून अशा ठिकाणी जाऊन काम करतात जेथे तुम्ही आम्ही चार दोन दिवसांची सहल म्हणूनही जाणे अशक्य आहे, असते. हिंदूंचे फार मोठ्या प्रमाणावर होणारे धर्मांतर ते रोखतात तेथल्या मंडळींना मुख्य प्रवाहात आणण्याचे स्वीकारलेले व्रत यशस्वी करतात, विशेष म्हणजे त्यांच्या या जवळपास सर्व उपक्रमात स्त्री आणि पुरुष दोघेही आपल्या आयुष्याचे बलिदान करून विविध चळवळी ज्या योजनाबद्ध मार्गाने गाजावाजा न करता ते ठरवून दिलेले काम पूर्ण करवून दाखवतात मला वाटते हि अशी माणसे मेल्यानंतर नक्कीच स्वर्गात जात असतील. आणखी एक जमात अशी आहे कि जी हमखास स्वर्गात जाते ती आहे बेवड्यांची म्हणजे खूप खूप दारू ढोसणाऱ्यांची कारण दारू ढोसणारे खूप चढल्याने जेवत नाहीत थोडक्यात त्यांना अनेकदा उपवास घडतो आणि देवाकडे नियमित उपवास करणाऱ्यांना थेट स्वर्गात प्रवेश असल्याने बहुतेक बेवडे थेट स्वर्गात पोहोचतात...
अपूर्ण :


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment