Friday, 9 February 2018

संघ आणि भाजपा : पत्रकार हेमंत जोशी


संघ आणि भाजपा : पत्रकार हेमंत जोशी 
जसे दादा म्हणजे एकच दादा, अजितदादा किंवा पवारसाहेब म्हणजे एकच शरद पवार तसे येथे या लेखात संघ म्हणजे एकच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इतर कोणताही संघ नाही भारिप महासंघ, मराठा सेवा संघ वगैरे वगैरे..अख्खा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजावून घेणे तसे मोठे कठीण काम कारण रा. स्व. संघाची विविध क्षेत्रात आणि जगभरात व्याप्ती फार मोठी आहे, संघाच्या कोणत्याही फांदीविषयी विस्तृत लिहावयाचे झाल्यास एक ग्रंथ निघेल, विविध फांद्यांवर कित्येक ग्रंथ निघतील म्हणजे संघाचे आदिवासी भागातले काम किंवा संघाचे देशाबाहेरचे स्वयंसेवक असे कोणतेही विषय निवडलेत तरी त्यावर ग्रंथ निघेल, सुप्त आणि गुप्त पद्धतीने संघाचे जगभर विविध प्रांतात पसरलेले जाळे, भारतीय हिंदूंना किंवा जगातल्या हिंदूंना अभिमान वाटावे असे आहे किंवा हिंदुत्व टिकविण्यात संघाचा मोठा हातभार आहे, संघ नसता तर हिंदुत्व नक्कीच धोक्यात आले असते . मी संघाचा स्वयंसेवक नाही तरीही जे चांगले ते कौतुकाने घेणे मला आवडते म्हणून येथे सांगितले कि हिंदुत्व खऱ्या अर्थाने टिकवून ठेवले किंवा टिकवून ठेवेल रा. स्व. संघ....

ज्यांना आपण हिंदू आहोत याचा अभिमान आहे किंवा ज्यांना वाटते घरात उत्तम संस्कार रुजायला हवेत त्यांनी संघ परिवारात सामील होणे अत्यावश्यक आहे असे अजिबात नाही केवळ त्यांनी कट्टर स्वयंसेवकांशी संबंध ठेवून मोकळे व्हावे जे संघ स्वयंसेवक राजकारणात आले आणि संघ विसरून भलत्याच मार्गाला लागले अशा श्रीकांत भारतीय यांच्यासारख्या संघ स्वयंसेवकांकडून मात्र नेमके संस्कार मिळण्याची अपेक्षा ठेवू नये, असे संस्कार वाटल्यास तुम्हाला अतिशय खोलवर फडणवीसांमध्ये आजही आणि उद्याही बघायला मिळतील, ते मुख्यमंत्री होऊनही फारसे संघ संस्कार विसरलेले नाहीत, नक्कीच नाहीत. येथे मोठ्या जबाबदारीने श्रीकांत भारतीय यांचे नाव घेतले आहे, पुढे, ते आज नेमके कसे नक्की लिहून मोकळा होणार आहे...

एक मात्र अतिशय वाईट असे घडते आहे म्हणजे ज्या संघाने या देशात या राज्यात ज्या भाजपाला जन्माला घालून सत्तेत स्थान मिळविले, सत्ता भाजपाकडे येते आहे बघून बहुसंख्य सत्तालोलुप मोठ्या खुबीने भाजपामध्ये घुसले पण घडले असे कि आज सत्ता हाती आल्यानंतर अगदी या राज्यातही भलतेच मजा मारून मोकळे होताहेत श्रीमंत होताहेत अत्यंत वेदनादायी म्हणजे जे संघ स्वयंसेवक सत्तेत बसले आहेत किंवा सत्तेच्या अगदी जवळ आहेत पुन्हा तेच फडणवीसांसारखा एखादा दुसरा अपवाद सोडल्यास मूळ जो स्वयंसेवक आहे त्यांना हे सत्तेतले कोणीही अगदी थूकी लावूनही विचारात नाहीत त्यातून बहुतेक संघ स्वयंसेवक खूप निराश झाले आहेत पण त्यांची मोठी बांधिलकी संघाशी असल्याने ते उघड नाराजी व्यक्त करीत नाहीत, कट्टर संघ स्वयंसेवकाचे मनावर मोठे नियंत्रण असते त्यांना त्याग करणे तेवढे माहित असते म्हणून ते बोलत नाहीत, राग उघड व्यक्त करीत नाहीत पण हि 
वस्तुस्थिती आहे, संघ स्वयंसेवकांना गृहीत धरून त्यांना डावलणे त्यांना टाळणे सत्तेतल्याचें आता ते अंगवळणी पडले आहे...

म्हणजे प्रसाद लाड जेव्हा आमदार नव्हते तेव्हाही थेट समजा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अँटी चेंबर मध्ये प्रवेश करून आपले काम तेथल्या तेथे करवून घेऊन वरून तासभर गप्पा मारून बाहेर पडत असेल त्याचवेळी कट्टर संघ स्वयंसेवक बाहेर आधी ताटकळत बसून वाट पाहत असेल तदनंतर काम न झाल्याने बाहेर पडत असेल, तर मला फारसे आश्चर्य वाटणार नाही जर उद्या संघ स्वयंसेवकानीच मंत्रालयातून आत्महत्या करणे सुरु केले तर, आणि संघ स्वयंसेवकांच्या बाबतीत हे अलीकडे भाजपाच्या बाबतीत नेहमीच घडते आहे....

अलीकडे मला ठाणे जिल्ह्यातला संघाचा एक मोठा स्वयंसेवक भेटला, त्याने नेमके हे सांगितले कि आमची कोणत्याही भाजपा नेत्याकडे, मंत्र्याकडे, अधिकाऱ्यांकडे कामे होत नाहीत याउलट एकनाथ शिंदे तेथल्या तेथे सहकार्य करतात, म्हणजे आता आम्ही शिवसेनेत जायचे का, महत्वाचे म्हणजे आम्हा संघ स्वयंसेवकांचे कोणतेही मलिद्याचे किंवा खाजगी काम नसते असते ते सार्वजनिक स्वरूपाचे तरीही आमची कामे होत नाहीत, सरकारी अधिकाऱ्यांच्या तर आम्ही कोणत्याही खिसगणतीत नाही, सर्वात 
गांडू आणि निरुपद्रवी माणूस म्हणजे संघ स्वयंसेवक हेच त्यांना वाटत असल्याने ते आम्हाला थेट फाट्यावर मारून बाहेर काढतात पण त्याचवेळी सामान्य शिवसैनिक जरी आत घुसला तरी घाबरून त्याला आधी खुर्ची बसायला देतात नंतर काहीही न स्विकारता न घेता त्याचे काम करून मोकळे होतात. संघ स्वयंसेवकांचे काम झालेच पाहिजे असे आमच्या वतीने सत्तेतले कोणीही सांगणारे नसल्याने सर्वाधिक कोंडी झालीआहे ती केवळ संघ स्वयंसेवकांची...मला त्याचे सांगणे पटले...

मित्रहो, एक कट्टर हिंदू म्हणून सांगतो, मुसलमानांकडून आणि ख्रिश्च्नांकडून अवैध मार्गाने, योजनाबद्ध होणारी हिंदूंची धर्मांतरे रोखण्याचे मोठे काम ज्या संघ स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून केले त्याला तोड नाही, आजही हिंदूंची धर्मांतरे हा विषय संपलेला नाही उलट फोफावतो आहे, आणि मी हे वेगळे सांगतो आहे असे अजिबात नाही, तुम्हाला देखील ते माहित आहे कि हिंदू मोठ्या प्रमाणात बाटवल्या जातो आहे, धर्मांतर मोठ्या प्रमाणात होते आहे. आपण हिंदू धोक्यात आहोत, एकाचवेळी जगभरात आणि अवघ्या हिंदुस्थानातही मुसलमान आणि ख्रिस्ती या दोघांच्या लोकसंख्येचे प्रमाण वाढते आहे आणि मर्यादित कुटुंब संख्या, धर्मांतरे इत्यादींमुळे आम्ही तुलनेत संख्यने कमी कमी होत चाललो आहोत विशेष म्हणजे सरहद्दीवरील हिंदू यापुढे दिसतील कि नाही एवढे तेथे धर्मांतरे जोरात सुरु आहेत त्याचवेळी धर्मांतरे रोखण्याचे काम जे संघ स्वयंसेवक प्रसंगी जीवाची पर्वा चिंता न करता, करताहेत त्यांनाच जर या राज्यात या देशात भाजपाची सत्ता आल्यानंतरही सहकार्य करतांना डावलेल्या जात असेल तर उद्या संघ स्वयंसेवकानी, तुमच्यापेक्षा काँग्रेसवाले बरे,असे म्हणायला सुरुवात केली तर त्यात ते चुकीचे म्हणताहेत असे जाणकारांना अजिबात वाटणार नाही...
अपूर्ण :


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment